आंतरजालावर उगवून आलेले - १ (गणेशोत्सव)

आपल्यापैकी अनेक जण आंतरजालावर वावरत असतो. बरेच वाचनीय / श्रवणीय / प्रेक्षणीय संकेतस्थळांवर आपण जात असतो. मात्र तरीही एखाद्या विषयावर काहि माहिती हवी असेल तर मात्र गुगल बाबा की जय करावे लागते. गुगलून प्रत्येक वेळी हवी तीच माहिती मिळेलच याची शाश्वती नसते, अश्यावेळी आपण परिचितांना माहिती विचारू लागतो. या धाग्याचे स्वरूप असेच अनौपचारीक आहे.

आंतरजालावर तुम्हाला काय दिसले / मिळाले वगैरे धागे आपण बघतो. मात्र इथे त्यापुढे एक पायरी जाऊन एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधीत माहिती एका धाग्यावर मिळावी असा उद्देश आहे.

-- यात प्रस्तुत विषयावर जर तुम्हाला काही वाचनीय / श्रवणीय / प्रेक्षणीय असे काहि आंतरजालावर उपलब्ध असल्याचे माहित असेल तर त्याचा दुवा द्यायचा आहे
-- विषय 'ढोबळ' स्वरूपाचा देण्याचा प्रयत्न राहिल, ज्याच्याशी थेट अथवा काहिसा दुरसा संबंध असलेले रोचक लेखनाचे / श्राव्याचे / व्हीडीयोचे दुवे देता येतील.
-- दुव्या सोबत त्या दुव्यावर नक्की काय आवडलं किंवा/आणि तेथील दस्ताइवजाचा / माहितीचा सारांश दिल्यास अधिक उत्तम!

सुरवात म्हणून मी विषय निवडला आहे 'गणेशोत्सव'

अपेक्षा आहे गणेशोत्सवाचा इतिहास, स्वरूप, बदल, नोंदी, छायाचित्रे, उत्सवाच्या निमित्ताने झालेली भाषणे, घटना, विविध वृत्त, नोंदी, काहि नाविन्यपूर्ण कल्पना, याविषयाशी संबंधीत रोचक माहिती देणारे ब्लॉग्ज, पुस्तके, संस्थळे इत्यादी संबंधीचे दुवे इथे दिले जातील.
अर्थात प्रत्येक दुव्याशी संबंधीत चर्चाही इथेच करता येईल. चर्चा लांबल्यास (किंवा अधिक चर्चेची शक्यता वाटल्यास) ती वेगळी काढता येईलच!

चला तर सांगा तुम्ही या विषयाशी संबंधीत जालावर असे काय पाहिलेत/वाचलेत/ऐकलेत जे इतरांनीही पहावे/वाचावे/ऐकावे असे तुम्हाला वाटते?

टिपः दर आठवड्याला एक विषय देण्यात येईल. जर एखाद्या विषय सुचवायचा असेल तर मला व्यनी करावा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

गणपती विसर्जनाच्या वेळेस होणार्‍या कचर्‍यासंदर्भात चालणारी ओरड बहुदा नवीन नसावी. पण त्या संदर्भात हे पोस्ट मिळालं.
अकलेचा उकीरडा: http://restiscrime.blogspot.in/2012/10/blog-post.html

त्यातले विचार मला १००% पटले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< त्यातले विचार मला १००% पटले नाहीत. >>
म्हणजे - एकही विचार पटला नाही?
की सगळेच्या सगळे विचार पटले नाहीत - काही पटले आणि काही नाही - ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वच्छता असावी हे मान्य, पण स्वच्छतेच्या अभावासाठी फक्त स्वतःला/गणपतीभक्तांना दोषी ठरवणं पटलं नाही.

एका दिवसात अचानक लोकांच्या सवयी बदलत नाहीत. लहान वयापासून कचरा कचरापेटीत टाकण्याची सवय न लावण्यात शिक्षण कमी पडतं, कचरा टाकायला जागोजागी पेट्या उपलब्ध नसतं यात महापालिका, रेल्वे, इ. संस्थानं कमी पडतात. मग अचानक गर्दी जमते आणि या सवयी डोळ्यात खुपण्यासारख्या दिसतात.
त्यापेक्षा गणपती मंडळांना गणपती बसवण्याची परवानगी देतानाच या पुढच्या व्यवस्थापनासाठी पैसे का घेत नाहीत? दुसर्‍या दिवशी सफाई कर्मचार्‍यांना अधिक वेतन किंवा अधिक कंत्राटी कामगारांना नोकरीही मिळेल. आपलं घर साफ करायला आपण अनेकदा मोलाने माणूस ठेवतो तर मग घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे का मोजू नयेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>> या पुढच्या व्यवस्थापनासाठी पैसे का घेत नाहीत

काही अंशी सहमत. पण असा पैसा घेणे (किंवा आधीच घेणे) याकारणास्तव गणेश मंडळांना (हाच न्याय नवरात्र मंडळ, दही हंडी यांनाही लागू व्हावा) वर्गणी (खंडणी ??) घेण्यास मोकळे रान मिळेल. त्यापलीकडे जावून असाही विचार करता येईल की आताच्या काळात सार्वजनिक गणेशउत्सवाला काही महत्व आहे काय? काय मोठी सामाजिक उत्र्कांती होते यातून? काहीच नाही. सर्वसाधारण (average) देखावे अन त्यातील कलात्मकता, सौंदर्यदृष्टी यांची मोठी वनवा असते.

मान्य आहे की या अशा उत्सवातून मोठी आर्थीक उलाढाल होते. हातांना कामे मिळताते. पण तो पैसा व्यर्थ कारणी लागतो आहे हे नक्की.

मला सांगा किती गणेश मंडळे सार्वजनिक खांबांवरून बेकायदा विज खेचत नाही? किती मंडळे रस्ते खोदत नाही? असा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आता आली आहे.

यात प्रदूषण वैगेरे हा मुद्दासुद्धा लागू करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हा विषय निवडायला कारणीभूत ठरलेला दुवा इथे देतो.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्यामागे टिळकांचे असलेले उद्देश वगैरेवर आपण अनेकदा एका दृषीकोनातून पाहिले आहे. टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे असलेले उद्देश हे "राजकीय" होते - फारसे सामाजिक नव्हते यावर एकमत व्हावे. मात्र या राजकीय उद्देशात केवळ इंग्रजांविरुद्ध जमनत एकत्रित करण्यासाठी हे एकच प्रमुख कारण अनेकदा दिले जाते.

दुवा पाहण्याआधी सुचना दुव्यावरिल मते काहिशी एकांगी तर प्रसंगी वातावरण गढूळ करणार असतील. मात्र अभिनिवेशाकडे डोळेझाक केली तरी त्यामागची तथ्ये विचारात घेण्यासारखी आहेत

तर हा तो दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!