छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ११ : दोन
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : दोन
जेव्हा ऋषिकेश आणि आतिवास असे दोन विजेते घोषित झाले तेव्हा नियमाला मुरड घालण्यासारखं होतं खरं.. पण दोघांनी विचार केल्यावर आधीच्या निर्णयात नव्या विषयाची नांदी दिसत होती. 'दोन' हा विषय केवळ जोडी किंवा युती इतकाच सिमीत असायचे बंधन नाहीच. आपापल्या प्रतिभेला आव्हान देऊन 'दोन' या विषयाला न्याय देईल असे कोणतेही छायाचित्र येऊ देत.
अतिवास आणि ऋषिकेश हे दोन आव्हानदाते याचे विजेते निवडतील
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमुद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २६ नोव्हेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २७ नोव्हेंबर मंगळवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. याचा अर्थ तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.
चला तर मग! आव्हानदात्यांना "दोन" द्या!
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - गर्दी.
स्पर्धा का इतर?
जुळे तरी वेगळे
जुळे भाऊ - एक पोलीस तर दुसरा दरोडेखोर! ही थीम बॉलीवूड प्रेक्षकांना नवी नाही!!
गुलाबाच्या एकाच झाडाला आलेले हे दोन वेग-वेगळ्या रंगाचे गुलाब!
(घरच्या बगिच्यातील ह्या गुलाबांचा फोटो जुन्या मोबाईलवरून ४-५ वर्षांपूर्वी काढला होता. सबब, कॅमेरा/लेन्स इत्यादी माहिती आता उपलब्ध नाही)
जोडी तुझी माझी...
वेड्या राघूची जोडी...
Camera Canon PowerShot SX10 IS
ISO 200
Exposure 1/400 sec
Aperture 5.7
Focal Length 100mm
वाईतील तहसिलदार कार्यालयातील ही एक जोडी...
Camera SAMSUNG GT-S5830
ISO 100
Exposure 1/20 sec
Aperture 2.6
Focal Length 4mm
आणि
माऊ आणि तिची सावली ही एक जोडी...
Camera SAMSUNG GT-S5830
ISO 50
Exposure 1/961 sec
Aperture 2.6
Focal Length 4mm
हे तीन, 'दोन'साठी
खेळ आवरूनः
Exposure: 1/320
Aperture: f/5.6
Focal Length: 55 mm
ISO Speed: 100
द्वैत
Exposure: 1/160
Aperture: f/9
Focal Length: 21 mm
ISO Speed: 100
Orthogonal
Exposure: 1/125
Aperture: f/5.6
Focal Length: 55 mm
ISO Speed: 100
सर्व फोटोंसाठी कॅमेरा: Canon T3, लेन्स: १८-५५ मिमी
पहिल्या दोन फोटोंचं तापमान आणि सॅच्युरेशन पिकासा वापरून वाढवलं आहे. पहिला फोटो उजवीकडून कातरला आहे. तिसरा फोटो फक्त कातरला आहे.
माझे दोन
From Tulip Festival 2011 |
ISO 800
Exposure 1/100 sec
Aperture 7.1
Focal Length 55mm
From Tulip Festival 2011 |
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z812 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 400
Exposure 1/1000 sec
Aperture 3.6
Focal Length 21mm
![]() |
From Downtown |
Camera Nokia
Model 6630
ISO 400
Exposure 1/101 sec
Aperture 3.2
Focal Length 5mm
माझी तीन प्रकाशचित्रे
१. Two become one...
Camera: Canon PowerShot SD1400 IS
ISO: 400
Exposure: 1/100 sec
Aperture: 5.9
Focal Length: 20mm
----
२. 'दोनाचे चार' ?
Camera: Canon PowerShot SD1400 IS
ISO: 400
Exposure: 1/100 sec
Aperture: 5.9
Focal Length: 20mm
-----
३. अ'द्वैत' : निसर्गाशी पानकिड्याचे (किडा नीट दिसला का ?)
Camera: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/10 sec
Aperture: 3.5
Focal Length: 45.2mm
------------------------------
निकाल
आतिवास आणि ऋषिकेश यांनी त्यांना आवडलेल्या प्रत्येक प्रकाशचित्रावर चर्चा करून, दोघांनी स्वतंत्रपणे गुण दिले. दोघांच्या वैयक्तीक मतांना व गुणांना एकत्र करून हा 'सामायिक' निकाल त्यांनी दिला आहे तो इथे देत आहोत.
विशेष उल्लेखःलंबुटांग यांच्या दोन इमारती, चिऊ यांच्या माऊची सावली आणि माणसे (या तीनही प्रकाशचित्रांचे विषय आवडले मात्र अधिक तांत्रिक सफाई हवी होती असे वाटले), रुची (दोन घरे - एक घर नीट दिसत नाहिये - सिमेट्री जरा गंडलीये :) असे वाटले, पण मांडणी, कल्पना आवडली),
तृतीय क्रमांक (विभागून):
अमुक यांचे 'टू बिकम वन' हे प्रकाशचित्र: वेगळा विषय.. नेमके स्थळ.. फक्त पुतळ्याला दिलेले अधिक महत्त्व वेगळी कहाणी सांगते (जी मुळ चित्र काढताना अधिक अपेक्षीत असावी)
आणि धनंजय यांचे बैलजोडी: तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सफाईदार ..मात्र दोन म्हटल्यावर पटकन डोळ्यांसमोर येणार्या विषयांतील एक
द्वितीय क्रमांकः तर्कतीर्थ यांचे दोन म्हातार्यांचे पहिले प्रकाशचित्र. तांत्रिक सफाई तर आहेच, विषय म्हटला तर नेहमीचा पण वेगळ्याच्य दृष्टीने आणि (अँगलनेही) मांडला आहे. चित्र विलक्षण बोलके वाटले.
आणि प्रथम क्रमांकः Nile यांचे डोळे हे प्रकाशचित्र! तांत्रिकदृष्ट्या सफाईदार चित्र आहेच शिवाय "केवळ विषय" घेऊन वेगळ्या दृष्टीने प्रेक्षकाला धडकायचे धाडस आवडले . त्यांचा विषय नेहमीचा वाटला तरी अगदी वेगळा आहे - शिवाय त्यातली यंत्राबद्दलची (किंवा या विशिष्ट यंत्राबद्दलची :) ) 'भावना' आवडली!
अभिनंदन Nile! पुढील आव्हानाची वाट पाहत आहोतच!
धन्यवाद
दोन या विषयावर 'एकसे एक' फोटो आलेले असताना माझ्या फोटोस प्रथम क्रमांक मिळाला म्हणून 'दुप्पट' आनंद झाला.
पुढिल आव्हानासाठी 'नातं' हा विषय सुचवतो आहे. नातं म्हणजे फक्त मनुष्यांतलंच किंवा अगदी सजीवांमधीलच असायला हवे असे नाही. इतर सर्व नेहमीप्रमाणेच. तसा नविन धागा संपादकांनी सुरू करावा अशी विनंती.
सद्ध्या भारतात प्रवास करतो आहे, येथील वेगवान आयुष्या(आणि हळुवार इंटरनेट)मुळे उत्तर देण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व.
(No subject)
एक्झिफ विदा उपलब्ध नाही
कॅमेरा कॅनन ५५० डी लेन्स - ५५-२५० मिमि