बोन्साय

'चौकट राजा' हा चित्रपट पाहिल्यापासूनच 'बोन्साय' या प्रकाराबद्दल मनात काही प्रमाणात अढी होती. पण हे नक्की कसं करतात याबद्दल अनेक प्रश्नही होतेच. एक दिवस राजधानीच्या शहरात भेटायचं आहे तर आर्बोरिटमला जाऊन बोन्साय गार्डन पाहू, असं २ विरूद्ध शून्य अश्या प्रचंड मताधिक्याने ठरलं. नेहेमीप्रमाणे जरूरीपुरतं इंप्रेशन मारण्याएवढी माहिती आपल्याला असावी या विचाराने मी विकीपिडीयावरचं बोन्सायचं पानही वाचलं. त्यातूनच ही थोडी माहिती, फक्त मराठीतून:

盆景 (उच्चारी पेनज्यिंग असं काहीसं) या चिनी शब्दाचं झाडांच्या बाबतीतलं जपानी रूपांतरण बोन्साय. "नैसर्गिक सौंदर्याला मानवी सौंदर्यदृष्टी आणि कलाकुसर यांची जोड दिली असता त्या सौंदर्याची माणसाला कदर करता येते. अन्यथा झाड रानटी रहतं" अशा आशयाचं विधान १० व्या शतकातल्या जपानी साहित्यात आढळतं. साधारण सहाव्या शतकापासून चीनमधून जपानमधे आयात केलेली ही कला आज आपल्याला जपान्यांची कला म्हणून माहित आहे. व्हिएतनाममधेही ही कला 'हाचि-नो-की' या नावाने अस्तित्वात आहे. बोन्साय केलेल्या झाडांपासून काहीही उत्पादन अपेक्षित नाही; घराचे, वास्तूचे सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टीनेच बोन्सायकडे बघितले जायचे. काही बोन्सायना फळं, फुलंही असतात; पण तो त्यांचा मुख्य उद्देश नाही.

आर्बोरिटमच्या बोन्साय आणि पेनज्यिंग गार्डनच्या सुरूवातीलाच ठेवलेला हा जपानी शुभ्र पाईन.

welcome

याच्याकडे पाहून मला एखाद्या जपानी म्हातार्‍याची आठवण झाली. बसकं नाक, छोटेसे डोळे आणि बुटकासा हा म्हातारा पाय दुमडून चहा प्यायला बसला आहे असं काहीसं हे बोन्साय पाहून मला वाटलं. बागेच्या आतल्या भागात चिनी वड, कॅलिफोर्निया ज्युनिपर वगैरे साधारण दहा प्रकारच्या झाडांची बोन्साय होती. बरीचशी साधारण १९५०-७० या वीस वर्षांत बनवलेली होती, पण काही बोन्साय त्याहीपेक्षा जुनी होती. कॅलिफोर्निया ज्युनिपर जातीचं हे बोन्साय मला फारच आवडलं. विविधरंगी पोशाख घालणारी फिगर स्केटर किंवा अ‍ॅथलीट असावी असं काहीसं मला या बोन्सायकडे पाहून वाटलं. हे फोटो:

skater-1 skater-2

सगळ्यात मजा वाटली ते १६२५ सालचं झाड पाहून. "हे झाड शिवाजीच्या काळापासून आहे" असाही शेरा दोन विरूद्ध शून्य मतांनी कामकाजाच्या टिप्पणीत समाविष्ट झाला. हेच ते बोन्साय.

1625 Bonsai

हे इतर काही बोन्सायचे फोटो.

1 2
3 4
5 6

यातला शेवटच्या रांगेतला डाव्या बाजूचा फोटो पाहून रस्त्यात मधूनच दिसणारं गर्द रानाचं बेट आठवलं. आणि त्याशेजारच्या बोन्सायला एखादा छोटासा झोपाळा आणि तिथे बागडणारी मुलं असं काही नसणं म्हणजे "काय हे कल्पनादारिद्र्य!" असं काहीसं माझ्या भारतीय मनाला वाटलं.

बोन्साय बनवण्यासाठी झाडं कुंडीत लावली जातात, वेळोवेळी त्यांची छाटणी करावी लागते, बोन्साय जुनं दिसण्यासाठी खालच्या बाजूच्या फांद्या तारा लावून खाली झुकवल्या जातात. (खालच्या फांद्या सगळ्यांत जुन्या, त्यांच्यावर गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव जास्त काळ पडलेला असल्यामुळे त्या फांद्या खाली झुकलेल्या असाव्यात.) बोन्साय चांगलं असण्यासाठी खोडापासून बाहेरच्या दिशेलाच फांद्या वाढलेल्या असाव्यात, खोडाच्या उंचीच्या एक तृतीयांश उंचीपासून पुढेच फांद्या असाव्यात, जुन्या बोन्सायची मुळं दिसावीत किंवा जास्त मुळं दिसणारी बाजूच 'दर्शनी' बाजू असते, झाडाच्या खोडाप्रमाणे बोन्सायच्या सालीवरूनही त्यांचं वय दिसावं अशा काही अटी असतात. शिवाय कुंडीतून छोट्या भांड्यात बोन्साय आणलं जातं तेव्हा त्याची ७५% मुळं छाटली जातात. या छोट्या भांड्याची उंची किती असावी हे सुद्धा झाडाच्या उंचीवरून ठरतं. दर दोन-तीन वर्षांनी बोन्सायची कुंडी बदलली जाते तेव्हाही अर्धी मुळं छाटली जातात. मुख्यतः जाड मुळांना कात्री लागते, कारण ही मुळं फार जागा खातात. बोन्साय कलाकाराकडे या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती असणं आवश्यक असतं.

अनेक ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध ठिकाणी, उदाहरणार्थ गड किल्ले, महाल, इ., त्या जागेची छोटी प्रतिकृती ठेवलेली असते. चिनी पेनज्यिंगमधे या प्रतिकृतीचांही समावेश होतो. सहाव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या कलाप्रकाराला तेव्हा प्रतिष्ठा न मिळती तर नवलच. काही प्रतिकृतींचे हे फोटो,

penjing-1 penjing-2

२०व्या शतकात झाडांनाही जीव असतो हे सप्रमाण सिद्ध झालं. त्यानंतरही आपल्या आनंदासाठी बनवलेल्या कलाकृतीपायी एखाद्या जीवाला असं बटू बनवून ठेवणं कितपत नैतिक वाटतं? चिनी बायकांची उंची फार वाढू नये म्हणून लहान मुलींचे पाय बांधून ठेवतात या गोष्टीची इथे प्रकर्षाने आठवण झाली. मुलांची उंची हवी तशी वाढत नसेल तर त्याचा गंभीरपणे विचार करणार्‍या पालकांना कदाचित ही कळकळ जास्त जवळची वाटावी.

जाताजाता: जीएम (जेनेटीकली मॉडीफाईड) पिकांचं फ्याड आता फारसं राहिलं नाही (आता ऑरगॅनिक गोष्टींचं फ्याड आहे). पाश्चिमात्य देशांतल्या अनेक दुकानांत अनेक प्रकारच्या भाज्या-फळं एवढी मोठमोठी का दिसतात? पुन्हा एकदा, आपल्या आनंदासाठी, झाडांची फळं कृत्रिमरित्या मोठी करणं, त्यातलं साखरेचं प्रमाण वाढवणं, बियाविरहीत फळांसाठी संप्रेरकं (हॉर्मोन्स) वापरणं कितपत न्याय्य वाटतं?

१. 'चौकट राजा' चित्रपटातलं एक प्रमुख पात्र आहे डोक्याची वाढ थांबलेला एक मुलगा, जो आता शारीरिकदृष्ट्या पुरूष आहे.
२. इंग्लिश शब्दरचना: in training since ....

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मला तरी जितपत झाडावरचं फळ तोडून खाणे, भाज्या-पाने खुडणे, फुले खुडणे, कच्ची कैरी खाणे (म्हणजे तिची पूर्ण वाढ न होऊ देता), बेबी कॉर्न, बेबी स्पिनॅच खाणे, लॉन मोव करणे वगैरे जितके नैतिक वाटतं तेवढंच बोन्झाय नैतिक वाटतं. Smile मांसाहाराबद्दल नंतर कधीतरी बोलू.

मुळं छाटून वाढ कमी केली जाते त्याच प्रमाणे झाडे वरून छाटूनही त्यांची वाढ रोखली जाते. माझ्या घरासमोरची सर्व झुडपे मी नित्यनियमाने कापते. त्यांना विशिष्ट आकार देऊन सुशोभित करण्याचा प्रयत्न करते. असे करण्यात मला हळहळ वाटत नाही. फक्त माझे गुलाब जोपर्यंत येतात तोपर्यंत मी ते राखते. पुढल्या १-२ आठवड्यांत त्यांनाही प्रून करून टाकणार आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मनात कधीच बोन्सायबद्दल अढी नव्ह्ती.

मला तरी जितपत झाडावरचं फळ तोडून खाणे, भाज्या-पाने खुडणे, फुले खुडणे, कच्ची कैरी खाणे (म्हणजे तिची पूर्ण वाढ न होऊ देता), बेबी कॉर्न, बेबी स्पिनॅच खाणे, लॉन मोव करणे वगैरे जितके नैतिक वाटतं तेवढंच बोन्झाय नैतिक वाटतं. Smile

असंच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्या सायटीवर भलत्याच अ‍ॅक्टीव हो तुम्ही!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदितींच्या लेखातल्या पहिल्या वाक्याशी सहमत. मलाही बोन्साय बद्दल मनात अढी तेव्हा पासून होती आणि ती बहुतेक जाणारही नाही. पाहायला गेलं तर कलात्मकतेने फुलवलेलं/ फळाने डवरलेलं पण दुसरीकडे स्वतःच अस्तित्व गमावून बसलेलं शोभेचं झाड असंच मी म्हणेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोन्साय दिसायला छान असले तरी त्यांची मुळं कापुन मुद्दाम त्यांची वाढ होउ देत नाहीत त्यामुळे अज्जिबात पटत नाहीत. असं करणं अजिबात न्याय्य, नैतिक वगैरे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नैतिकता, न्याय्य या संकल्पना, व्याख्या, चौकटी वगैरे मानवानेच बनवलेल्या. दुसर्‍या प्राण्याला जीवानीशी खाणे निसर्गात 'नैसर्गिकच'. झाडा झूडपांनाही अगदी बाल्यावस्थेपासून आजूबाजूच्या सजीवांकडून प्राप्त होण्यार्‍या अंताशी झगडावे लागतेच. मला तर उलट निसर्गातील सजावटीवर मानवाने कल्पकतेने लावलेल्या डेकोरेटीव्ह लेसचे कौतुकच वाटते. (दवण्यांची क्षमा मागून! Wink ) जोवर निसर्गाची मोठी, नोंद घ्यावी इतकी हानी होऊन आपण आपले छंद जोपासत नाही तोवर मला ह्यात काही गैर वाटत नाही. शेवटी जगाची चिंता करणारा मनुष्य हा एकमेवच सजीव असावा.

शिवाजीच्या काळातले झाड पाहून 'लै भारी' वाटले. अमेरीकेपेक्षाही जूना बोन्साय अमेरीकेत, वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणा पासुनच बोन्साय बद्दल एक आकर्षण आहे.
शाळेत असताना थोडीफार माहिती गोळाकरुन घरातल्या एका कुंडीत बोन्साय करण्याचा उपद्य्वाप केला होता. (पयत्न जमला नाही ते सोडा.)

अदिती ही माहिती अनुवाद्/भाषांतरकरुन मराठीतुन दिल्या बद्दल आभार. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

'चौकट राजा'१ हा चित्रपट पाहिल्यापासूनच 'बोन्साय' या प्रकाराबद्दल मनात काही प्रमाणात अढी होती.
मलाही असेच काहीसे वाटत होते. त्यात मतिमंद मुलाला(पुरुषाला) बोन्सायची उपमा दिल्याने त्या बोन्साय या प्रकाराबद्दल मनात घृणाच निर्माण झाली होती असं म्हणायला हरकत नाही.

परंतु नंतर बर्‍याच ठिकाणी वेगवेगळे बोन्साय बघण्यात आले आणि ते इतके कलाकुसरीने, नजाकतीने सांभाळलेले दिसले की ती अढी आता तोडी सैल झाल्यासारखी वाटतेय. बोन्साय बनवण्याच्या कृतीतून त्या झाडाला नेमकी काय हानी पोहचते किंवा नाही याची मला काहिही कल्पना नाही. त्यामुळे ते किती नैतिक आणी किती अनैतिक याबाबत मनात नक्की ठरवता येत नाही. मुळं कापून वाढ न होवू देणे हे जितकं अनैतिक वाटतं तितकंच प्रियाली यांनी म्हटलेलंही पटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

माझ्यामते उद्दिष्टावरून कार्याची नैतिकता ठरवावी, उद्दिष्ट वाढ/प्रगती असेल तर वेळोवेळी केलेली काटछाट कदाचित न्याय्यच वाटेल, आता वाढ आणि प्रगती कशात आहे हे परिस्थिती/समाज सापेक्ष आहे.

पण उगाच वडासारख्या महाकाय वृक्षाला असा बघायला फार-काळ मजा येत नाही हे खरं, हे म्हणजे उद्या छोटे-छोटे घोडे, जिराफ, मगर, देवमासा आणि हत्ती बघायला मिळाल्यास जसे वाटेल तसे वाटते.

Smile छोट्या गोष्टी मोठ्या करण्याची आणि व्हाइस व्हर्सा करायची माणसाला भारी हौस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छायाचित्रे आवडली. बोन्साय करणार्‍या कलाकारांचे कौतुक वाटले. १६२५ सालापासून सांभाळलेले झाड म्हणजे कमाल आहे!

बोन्साय करण्यात अनैतिक, अन्याय्य असे काही वाटत नाही. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला बघायला, खेळायला आणि कामे करायला आवडतील अश्या अनेक जाती 'नैसर्गिक' पद्धतीने माणसाने बनवल्या आहेत.

इतर प्राणीदेखील आपला भोवताल आपल्याला सोयीचा होईल असा करण्याच्या प्रयत्नात असतात. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे, हे विसरायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"बोन्साय" ~ बटुवृक्ष असे एकजण म्हटल्याचे आठवले. या कल्चरविषयी उलटसुलट मतप्रवाहही ऐकायला/वाचायला मिळतो. असे असले तरी एखाद्या घरी गेलो आणि अचानक अजिबात कल्पना नसताना यजमानाने हौसेने गॅलरीत जपलेले बोन्साय दाखविले तर ते पाहून थोडासा का होईना आनंद होतो, हे मला मान्य करावेच लागेल. या प्रकारामध्ये 'पापपुण्या'च्या कल्पनांना प्रवेश देऊ नये असे वाटते त्याला कारण म्हणजे अवाढव्य वडाचे एक छोटे रूप आपल्या घरी ठेवले म्हणजे चित्रगुप्त आपल्या नावापुढे लाल रेघेचा एक दंड टाकतो असेही काही नसते.

माझ्या घरी फिश टॅन्क आहे आणि त्यात अगदी बोटाच्या पेरावर बसू शकणार्‍या माशांची जात आहे तसेच शार्क आणि डॉलरसारखी मोठे मासेही आहेत. यांचे प्रचंड रूपडे थेट नदीत वा सागरात असतेच, पण म्हणून घरी 'बोन्साय' सम मासे पाळण्याला कुणी विरोध करीत असेल असे वाटत नाही.

बाकी अदिती यानी इथे दिलेले बोन्सायचे नमुने पाहून डोळ्यांना छान गारवा लाभला.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माशांच्या जाती वेगळ्या आहेत, कुणी त्याचे कल्ले वगैरे छाटुन बारीक केलेलं नाही हे विसरताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदितीने दिलेल्या लेखातून बरीच माहिती मिळाली.
भारतातहि या कल्चरचा प्रसार झालाय.
काल परवाच मटात याविशयी लेख वाचला होता.
त्यात बोन्साय आँफ इंडीया या संस्थेचा उल्लेख आला होता.
वैयक्तिक रीत्या बोन्साय करणे मलाही आवडत नाही
पुलंच्या व्यक्तिचित्रणातील त्या चौकोनी कुंटुबातील स्रीची(फ्रीजमधील गोठलेलं सोँदर्य = मालती) आठवण होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

बॉन्साय हा प्रकार मनापासून आवडतो. संत्री लगडलेली आणि डाळींबे लगडलेली बॉन्साय पाहीलेली आहेत. अतिशय मोहक, लीलीपुटीयन अशी दिसतात. नैतिक-अनैतिकतेचा बाऊ याबाबत फारसा करावासा वाटत नाही. नेत्रसुख अधिक महत्त्वाचे वाटते.
लेख खूप आवडला. इथे ही माहीती दिल्याबाद्दल,अदितीचे धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख आवडला.

जीएम पीकांसाठी 'फ्याड' हा शब्द योग्य वाटत नाही. जीएम पीकांचा वापर कमी होत नसून वाढतच आहे. खालच्या चित्रात (विकिपिडियावरून साभार) जेनेटिकली इंजिनियर्ड कापूस आणि सोयाबीन यांची लागवड अमेरिकेत जोमाने वाढत असल्याचे दिसेल.

अमेरिकेत लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फ्याड' कमी होत आहे यात नावीन्य कमी होत असल्यामुळे त्यातला उच्चभ्रूपणा गेला आहे असं काहीसं म्हणायचं होतं. ऑरगॅनिक उत्पादनं उच्चभ्रू समजली जातात. माझी शब्दनिवड किंचित चुकलीच, पण त्यामुळे निदान क्रेमर यांनी एक अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला हे आवडले.

सोकाजी, तुमच्या लेखाची वाट पहाते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बोन्सायच्या माहेरघरी,जपानला,असताना बोन्सायच्या बर्‍याच बागांमधे जाण्याचा योग आला आणी बोन्साय अनुभवता आला.
एक लेख तिथल्या बोन्साय अनुभवावर टाकवा म्हणतो:)

-(बोन्साय कलाप्रेमी) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाकाच एखादा सचित्र लेख. वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छायाचित्रांमुळे डोळे निवले. माझ्या मनात अढी होतीच या प्रकाराबद्दल पण काही प्रतिसाद वाचूण थोडेसे मत बदलते आहे असे वाटते आहे. नाइल, मी वगैरेंचे प्रतिसाद विशेष आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

फोटो आणि वर्णन दोन्ही माहितीपूर्ण.
माझ्याही मनात अढी होती पण लेख आणि प्रतिसाद वाचून मत बदलते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पंदन या ब्लॉगलेखिकेच्या परवानगीने त्यांच्या ब्लॉगवरील काही माहिती इथे चोप्य पस्ते करत आहे -

१. वड पिंपळासारखे वृक्ष उंच वाढतात, पण बहुतेक वेळा त्यांच्या बिया कुठे तरी कडेकपारीत, किंवा एखाद्या भिंतीवर, किंवा एखाद्या झाडावरच्या फांदीच्या बेचक्यात रूजलेल्या दिसतात. तिथे त्या झाडांचे पोषण होईलच याची कोणतीही खात्री नसते, तरीही ती झाडे तिथे रुजतात, अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरतात. तसंच निसर्गातल्या इतर झाडांच्या बियाही जिथे रूजतील तिथे वाढतात. निसर्गातले सर्वच वृक्ष अशा कठीण परिस्थितीला सामोरे जातात, त्यातल्या ज्या झाडांच्या वाढीला पोषक परिस्थिती असते, त्यांचे वृक्ष बनतात, इतर मात्र खुरटलेल्या स्थितीतच तगून राहतात, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचीही वाढ होते. (अशा खुरटलेल्या वृक्षांपासूनच माणसाला बोन्साय करण्याची प्रेरणा मिळाली.)

बर्‍याचदा मोठ्या झाडांखाली पुरेशा पोषणाअभावी किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्याने लहान झाडे, रुजलेली रोपटी वाढू शकत नाहीत, त्यांची वाढ खुरटते. कधीकधी जंगलातील प्राण्यांमुळेही (हत्ती, माकडे, वाळवी, मुंग्या इ.) झाडांच्या फांद्या मोडल्या जातात. त्यामुळे फक्त एखादा वृक्ष मोकळ्या जागेत वाढला म्हणजे त्याची उंच वाढ होतेच असे नाही. जंगलातही झाडांची वाढ रोखणारे, खुंटवणारे अनेक घटक असतात.

वनव्यवस्थापन (Forest Management) करतांनाही झाडांच्या काही विशिष्ट प्रजाती वाढवतांना तिथली इतर काही झाडे (वृक्ष) काढून टाकावे लागतात.

चिकू सारख्या बागायती झाडांची लागवड केली जाते, तेव्हा दर काही वर्षांनी त्यांची झाडापासून काही अंतरावर असलेल्या मुळांची नियमित कापणी करावी लागते. व्यावसायिक शेतीमध्ये ज्या झाडांचे कंद लावलेले असतात, अशा झाडांना मुख्य खोडाजवळ फुटणारे फुटवे काढून टाकावे लागतात.

बोन्सायमध्ये केल्या जाणार्‍या फांद्या आणि मुळांच्या कापणीबाबत इतकेच सांगता येईल, की ते झाड छोट्या कुंडीत वाढतांना त्याला पुरेसे पोषण मिळावे म्हणून त्याच्या अनावश्यक फांद्या आणि मुळे कापली जातात आणि इतर झाडांचीही अशी कापणी केली जाते हे मी वर लिहिलेच आहे. बर्‍याच वेळी निसर्गात वाढलेली खुरटलेली झाडेच बोन्साय करायला निवडली जातात. मी स्वतः बोन्साय करून पहिलेला नाही, पण एक नक्की सांगू शकेन, की बोन्साय करणे म्हणजे झाडाचे कुपोषण करणे नाही, तर योग्य ते पोषण देऊन मोठा वृक्ष लहान आकारात वाढवणे. जर झाडाला योग्य पोषण मिळाले नाही, तर त्याची वाढ खुरटून त्याला फुले, फळे येणे बंद होते. जेव्हा एखाद्या बोन्सायला फुलं किंवा फळं येतात तेव्हा त्याला योग्य ते पोषण मिळालं आहे याचे ते निदर्शक असते. झाडांना असे पोषण जेव्हा मिळते आणि झाडांची वाढ खुरटलेली नसते तेव्हाच दोनशे / तीनशे वर्षे वयाचे फुलणारे, फळणारे बोन्साय वृक्ष वाढवणे शक्य होते. जपानमध्ये हजार वर्षांहून अधिक वय असलेले बोन्सायवृक्ष वाढवलेले आढळतात.

म्हणून असे म्हणावेसे वाटते, की बोन्साय म्हणजे फ़क्त झाडांना शोभेसाठी बुटके करून ठेवणे नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध कला आहे, पण ती सगळ्यांनाच जमेल असे नाही.

२.उंच झाडं सगळ्यांनाच बघायला आवडतात. पण एखाद्या उंच वृक्षाच्या आजूबाजूला शोधक वृत्तीने पाहिलं, तर त्याच्याखालच्या जमिनीवर, त्याच वृक्षाच्या बियांमधून रुजलेली पण वाढ खुरटलेली पाचसहा तरी झाडं बघायला मिळतात, हा निसर्गाचाच अविष्कार आहे. असो.

झाडांनाही भावना असतात आणि त्यांनाही संवेदना असतात. पण माणसामध्ये जशी चेतासंस्था असते, तशी चेतासंस्था झाडांमध्ये नसते, तिचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे झाडांना जाणवणार्‍या संवेदनांचे स्वरूप हे माणसाला जाणवणार्‍या संवेदनेपेक्षा काहीसे वेगळे असते. एखाद्या माणसाचा हात किंवा पाय कापावा लागला, तर त्याला वेदना होईल, अवयव गमावल्याचे दुःख होईल आणि आपले रूप डिफॉर्म झाले यामुळे त्याला काहीसे असुरक्षित वाटेल (कारण माणसाला दोनच हात किंवा दोनच पाय असतात आणि त्यापैकी एखादा गमावला तर नवीन हात किंवा पाय फुटणार नसतो.) पण जर एखाद्या झाडाची फांदी कापली गेली, तर त्या झाडाला वेदना होईल, त्याचबरोबर कापलेली फांदी ही त्या झाडाचे प्रोपॅगेशन होण्याची एक शक्यता असल्याने त्याचा आनंदही जाणवेल तसेच या तुटक्या फांदीमुळे त्याजागी अजून नवीन फांद्या येण्याची शक्यताही वाढते, त्यामुळे डिफॉर्म झाल्याचा असुरक्षितपणा झाडात निर्माण होण्याची शक्यता कमीच असेल.

थोडक्यात प्रत्येक वाढ झालेली फांदी कापली गेली, की ती झाडासाठी प्रोपॅगेशनची संभाव्यता असल्याने झाडाला जाणवणारी वेदना ही माणसाला जाणवणार्‍या वेदनेपेक्षा वेगळी ठरते.

एखादं झाड खूप उंच वाढू दिलं, त्याची एकही फांदी कापली नाही, एकाही प्राण्याला त्या झाडाबरोबर कोणतीही इंटरअ‍ॅक्शन करण्याची संधी दिली नाही, तर त्या झाडाची फांदीमुळे प्रोपॅगेशन होण्याची शक्यता खूपच कमी होईल आणि त्याला फक्त बिया रुजून होणार्‍या प्रोपॅगेशनवर अवलंबून रहावे लागेल. अशा वेळी खूप वाढ झालेल्या फांद्याच्या वजनाचा भार झाडाला पेलवत नाही आणि काही जास्त वाढलेल्या फांद्या स्वतःहूनच कोसळून पडतात. हे खूपच परस्परसापेक्ष आहे.

त्यामुळे बोन्सायबाबत तटस्थपणे बोलतांना त्या झाडाच्या फांद्या आणि मुळं कापणं हे अगदी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही किंवा ते अनैतिक आहे, असाही दावा करता येणर नाही. शिवाय बोन्साय केलेली झाडं जर कुंडीतून काढून परत जमिनीत लावली, तर ती पुन्हा जोमाने वाढतात. त्यांची बोन्सायची ही स्थिती पुन्हा बदलता येऊ शकते.

अर्थात तुमचं बोन्सायबाबतचं मत बदलावं म्हणून मी हे सांगत नसून, "बोन्साय करणं हे नैतिक की अनैतिक" ह्या संभ्रमात सापडलेल्या व्यक्तींना निसर्गाचा यासंदर्भातला रोल असा असतो ह्याची जाणिव करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

३.संपूर्ण शाकाहारी लोकांना vegan म्हणतात, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरणार्‍या शाकाहारींना lacto vegetarian म्हणतात. आपण आपल्या मनाशी काही पूर्वग्रह बनवलेले असतात आणि त्याचप्रमाणे आपण विचार करतो, ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

झूऑलॉजीच्या ह्याच वेबसाईट वर अजून एक लिंक आहे http://www.sciencedaily.com/releases/2008/07/080728221236.htm

सॅलॅमॅंडर सारखा प्राणी जेव्हा एखादे बोट गमावतो तेव्हा त्या प्राण्याला पुन्हा बोट फुटते. तसेच सेंटीपेड सारखे प्राणी सुद्धा अर्भकावस्थेत असतांना एखादा पाय गमावतात, तेव्हा त्यांना तो पाय परत फुटतो. शेपटी तुटलेली पाल तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल, शत्रूला चकवण्यासाठी पाल स्वतःच स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि पळत सुटते, अर्थात पालीला परत शेपटी फुटते. या सगळ्या प्राण्यांमध्ये जशी पुनर्निर्माणाची शक्ती असते, काहीशी तशाच प्रकारची पुनर्निर्माणाची शक्ती झाडांमध्येही असते. पाल ज्या सहजतेने स्वतःची शेपटी तोडून टाकण्याची क्रिया स्वीकारते, त्याच सहजतेने झाडेही स्वतःची मुळे आणि फांद्या तोडून टाकणे स्वीकारतात. त्याशिवाय झाडाची वेगळ्या प्रकारची चेतासंस्था असते, म्हणून झाडाला त्याच्या फांद्या आणि मुळे कापून लहान आकारात वाढविणे क्रूरपणाचे ठरत नाही. निसर्गाने एखादा परिपक्व वृक्ष किती उंचीपर्यंत वाढावा याच्यावर मर्यादा घातली आहे, पण परिपक्व वृक्षाला फुले आणि फळे लागण्यासाठी त्याची उंची कमीत कमी किती असावी याच्यावर निसर्गाने काहीही निर्बंध घातलेला नाही, म्हणून जंगलात सुद्धा खुरटलेल्या वृक्षालाही फुले, फळे लागलेली दिसतात.

असे जरी असले, तरी जी झाडे (वृक्ष) कठीण परिस्थितीत तग धरून राहू शकतात - ज्यांची अशा प्रकारे राहण्याची क्षमता असते, त्यांचाच बोन्साय होऊ शकतो. मनात आणले म्हणून वाटेल त्या झाडाचा बोन्साय करता येत नाही. नारळासारख्या उंच झाडांचा बोन्साय करता येत नाही. वाळवंटात काही मीटर उंच वाढणार्‍या निवडुंगाचाही बोन्साय करता येत नाही. किंवा गणेशवेलीसारख्या नाजूक पण पसरट वाढणार्‍या वेलींचाही बोन्साय करता येत नाही. नारळ, निवडुंग, गणेशवेल इत्यादींचा बोन्साय करायचा ठरवला तर ते क्रूरपणाचे ठरेल, कारण त्यांची तशा प्रकारे वाढण्याची क्षमताच नसते.

बोन्सायच्या झाडांकडे जर दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही, तर त्यांची पाने सुकतील, कदाचित गळतीलही, पण त्यांची मुळे मात्र वेगाने वाढून आजूबाजूला पसरतील आणि पाण्याचा शोध घेतील आणि बहुतेक वेळा ते झाड पाणी मिळेपर्यंत तग धरून जिवंत राहिलेले दिसेल... कारण ते त्यांच्या जीन्समध्येच आहे. पण काचेच्या बंदिस्त टेरॅरियममध्ये वाढणार्‍या झाडांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही किंवा जास्त घातले गेले, तर ती नाजूक झाडे तग धरू शकणार नाहीत कारण तसं त्यांच्या जीन्समध्येच नाही. अर्थात बोन्सायपेक्षाही काचेच्या टेरॅरियममध्ये झाडे वाढवणे जास्त चिंतेचे आहे.

- (ब्लॉगलेखिका देवयानी देवकर या प्रस्तुत संकेतस्थळाच्या सदस्या नाहीत म्हणून मी हा चोप्य पस्ते उद्योग केलेला आहे. थोडा भाग काटून टाकलेला आहे, कारण तो त्यांच्या कॉमेंट्सचा भाग होता, आणि तो काटल्याने त्यांच्या माहितीत काही फरक पडत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चाविषय मी सुरू केल्यामुळे माझी मतं मांडावी आणि चर्चाविषयाचा, इतर प्रतिसादकांच्या मतांचा समोरापात आढावा मी घ्यावा अशी संस्थळाच्या धोरणांमुळे अपेक्षा आहे; त्याचा प्रयत्न करते.

बोन्साय बनवणं ही कला आहेत, त्यात मेहेनत आणि कलात्मक दृष्टी या दोन्हींची गरज आहे यात संशय नाही. मला स्वतःला ही बोन्साय बाग बघायला आवडली हे खरंच आहे. ही बाग बघितल्यामुळे ती मेहेनत काय असते आणि बोन्सायमधली कलात्मकता या दोन्ही गोष्टी समजल्या. त्यातून आनंद मिळाला. लेखात जे सहा फोटो एकत्र टाकले आहेत, त्यातला उजवीकडचा मधला फोटो पहा. या बोन्सायचं डोकं सपाट आहे. असं बोन्साय बोन्सायच्या इतिहासात २०व्या शतकातच सर्वप्रथम केलं गेलं. ते पाहूनही मला थोडी गंमत वाटली. शंभर-सव्वाशे वर्षांचे वटवृक्ष पाहिलेले आहेत त्यामुळे वड आणि पारंब्यांचं बोन्साय बघायला मजा येईल असंही वाटलं. पण ....

'जीवो जीवस्य जीवनम' यावर अविश्वास दाखवून चालणार नाही. तसं नसल्यास पुन्हा एकदा अनैसर्गिक कृत्यामुळे अविश्वास दाखवणार्‍या प्राण्याला मरावं लागेल. कोणत्याही जीवाची मूळ वृत्ती अशी असते की आहे त्या परिस्थितीत जगायचं. आत्महत्या हा प्रकार माणूस वगळता इतर प्राणी करत नाहीत. आणि माणसांमधेही हे प्रमाण अत्यल्प आहे. कितीही कठीण परिस्थिती असेल तरीही शक्यतोवर सर्व प्रयत्न करून तग धरणे (आणि आपली गुणसूत्रे पुढच्या पिढीमार्फत जपणे) ही सर्व सजीवांची नैसर्गिक प्रेरणा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत; प्राणी आणि झाडांच्या अन्न आणि निवारा या आहेत. प्राणी आणि झाडांच्या बाबतीत निवारा म्हणजे त्यांच्या शरीरासाठी योग्य अशी जागा; बंगाली वाघ कितीही शूर असले तरी ते बहुदा राजस्थानात आणि अंटार्क्टीकात जगू शकणार नाहीत. देवगड हापूसचं कलम कदाचित इंग्लंडमधे जगेल पण त्याला फळ धरलंच तर कसं असेल हे सांगू शकत नाही.

मृदुला म्हणते, "इतर प्राणीदेखील आपला भोवताल आपल्याला सोयीचा होईल असा करण्याच्या प्रयत्नात असतात. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे, हे विसरायला नको." हे मलाही मान्य आहे. जंगलात झाडं 'बेशिस्त' वाढतात आणि त्यामुळे काही झाडं खुरटलेलीच रहातात. यात इतर झाडांची जगण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही जास्त असते. पुन्हा एकदा 'जीवो जीवस्य जीवनम' यात काही झाडं तगतात, काही झाडं खुरटतात आणि काही मरतात. हरणाला का मारलं असा जाब चित्त्याला विचारण्यात अर्थ नाही. पाळलेली कोंबडीसुद्धा का मारली असा यात प्रश्न येत नाही. गुलाबांचं प्रूजिंग, पावसाळ्याआधी गुलमोहोर, जास्वंद वगैरेंच्या फांद्या कापणं याची तुलना मी खराब दात काढून टाकण्याशी करू इच्छिते. झाडांचं पूर्निंग करणारे शक्यतोवर यातलं शिक्षण घेतलेले, अनुभवातून शिकलेले असतात. दिसली फांदी की कापा असा प्रकार नसतो. झाडांच्या निरोगी वाढीसाठी, आणि एका प्रकारे त्यांच्या पुनरूत्पादनात मदत करण्याचंच काम या प्रूनिंग (योग्य मराठी शब्द?) करण्यामुळे होतं. पण बोन्सायच नव्हे, तर पाळीव मांजरी, कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यात मला तीच अडचण वाटते. आपल्या आनंदासाठी आपण इतर काही जीवांचा काही नैसर्गिक आनंद हिरावून तर घेत नाही ना असं वाटतं. हे काहीसं आपल्या हाताने ताटात अन्न घेऊन, चव आवडली असली तरी नंतर फेकून देण्यासारखं वाटतं.

मनुष्याची नेमकी गरज काय आणि त्यात आपण दुसर्‍या प्राण्यांच्या जीवनात कितपत ढवळाढवळ करावी असा प्रश्न मला पडला आहे. हव्याहव्याश्या वाटणार्‍या अनेक गोष्टी असतात पण काही व्यापक विचारांनी आपण त्या विचारांवर कृती करत नाही. बोन्साय बनवलेल्या झाडांचं प्रमाण इतर झाडांच्या तुलनेत अगदी नगण्यच असेल, पण आपल्या आनंदासाठी आपण त्या झाडांना निर्वासित करून, आपल्याला हव्या त्या कुंडीमधे वाढवतो; धरणग्रस्तांना नदीच्या खोर्‍यातून दोन महिन्यांत शहरात आणून घराचा तुकडा आणि नोकरीचं आमिष दिल्यासारखंच.

पण तरीही पुन्हा एकदा, बोन्साय पाहून मला दृष्टीसुख मिळालं आणि मिळेल हे नि:संशय.

फोटो आवडले म्हणणार्‍या सर्वांना धन्यवाद. मोठे फोटो बघायचे असतील तर फोटोवर राइट क्लिक करून 'व्ह्यू इमेज' हा पर्याय निवडल्यास मोठे फोटो दिसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यात मला तीच अडचण वाटते. आपल्या आनंदासाठी आपण इतर काही जीवांचा काही नैसर्गिक आनंद हिरावून तर घेत नाही ना असं वाटतं.

आमच्या बिट्टू भुभु ची ही शस्त्रक्रिया केली होती. त्याची नख बहिर्वक्र झाली व पंजा लाल झाला म्हणुन ही शस्त्रक्रिया करावी लागली. त्यावेळी मी डॉक्टरांना अगदी हाच प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की या शस्त्रक्रियेमुळे त्याची कामप्रेरणा नाहीशी होईल. कामप्रेरणा असूनही त्याला वंचित ठेवले असे म्हणता येणार नाही.

बोन्सायच्या बाबत देखील मला वाटत की आपल्याला ते छान दिसाव म्हणुन आपण त्याची वाढ खुंटवतो. आपली ही वाढ अशी निसर्गाने वा अन्य शक्तीने खुंटवली तर काय? कुंडीत वडाचे झाड पहाताना मला त्यांचे बिच्चारेपण पाहवत नाही.
शेवटी आपल्या आनंदासाठी वा दु:खाची टोचणी लागू नये म्हणुन युक्तिवाद आपण आपल्याला हवे तसे अनुकूल करुन घेत असतोच. असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बोन्साय्बद्द्ल मनात अढी होती आणि अजूनही पुर्णपणे गेलेली नाही. मी दर काही महिन्यांनी जेव्हा झाडांची माती बदलते, तेव्हा बरीच मुळं तुटतात, काही फांद्या तुटतात आणि नंतर नवीन मुळं/फांद्या येतात हे प्रत्यक्ष बघूनही, झाडाच्या पोषणाकरता तात्पुरते नुकसान होणं/आणि केवळ दॄष्टिसुखाकरता नैसर्गिक वाढ रोखणं यात फरक आहे असं वाटतं.

असो. बोन्साय्रच्यासंदर्भात घडलेला एक किस्सा. माझ्या एका मैत्रिणीचे वडील तिच्याकडील अमेरिकावारीत तिच्या बागेची काळजी घेणं, पाणी घालणं, खत घालणं ही कामे उत्साहाने करत असत. त्याच उत्साहात त्यांनी तिच्या बोन्सायलाही 'मिरॅकल-ग्रो' नावाचे खत घातले आणि 'ना धड बोन्साय, ना धड झाड' अशी त्या झाडाची अवस्था केली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख व फोटो आवडले. बर्‍याच जणांसारखी माझ्याही मनांत अढी होती. पण तरीही, 'बोन्साय' दिसायला गोजिरवाणे दिसले तरी मनांत कुठे तरी खटकत रहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मला बोन्साय म्हटले की छोटे पाय फार सुंदर दिसतात या समजुतीपायी पाय बांधुन ठेवण्याच्या (चीनी?) प्रथेचे नेहमी स्मरण होते. कितीही नैसर्गिक, पूर्ण वाढ होणं असं म्हणा, ही झालेली वाढ - असलेलं रुप नसून 'केलेली वाढ - बनवलेलं रुप' आहे हे डोक्यातून जात नाही

अर्थात त्यात काहि 'वाईट' आहे असं नाहि मात्र तरीही काहितरी 'रोखल्यासारखं - मुद्दाम अडवल्यासारखं' वाटतं त्याला इलाज नाही. सोन्याच्या पिंजर्‍यातली मैना कितीही सुंदर असली-दिसली तरी ती पिंजर्‍यात गाते हे नजरेआड करणे मल कठीण जाते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बगीचेकाम (यात वाफे बनवणे आणि विशिष्ट वनस्पती विशिष्ट ठिकाणीच वाढवणे, झुडुपे छाटणे, तण काढणे... बगीचेकामात हे सर्व अनैसर्गिक प्रकार येतात) आणि बोन्साय या दोहोंत मला कुठलाही मोठा नैतिक फरक दिसत नाही.

"चौकट राजा" चित्रपट बघण्यापूर्वी कित्येक वर्षे मला बोन्सायबाबत माहिती होती. जेव्हा चित्रपट बघितला, आणि संवादात ही उपमा ऐकली, तेव्हा मला पटकथा लेखकाचा हा दोष भासला. चुकीची उपमा देऊन संवाद कमजोर होतो.

चित्रे आणि वृत्तांत आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला व्यक्तिश: सुंदर वाटत नसले तरी ज्याची त्याची आवड म्हणून दुर्लक्ष करतो. मुलींचे पाय बांधून ठेवणे, मानेत कड्या घालून ती लांब करणे या प्रकारांच्या बाबतीतही तेच.
अर्थात या आदिम प्रकारांपेक्षा भयानक प्रकार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालू असतात पण दॄष्टी आड सृष्टी.

अवांतरः चिनी भाषेत चिनी भाषेला 'चिनी' भाषा म्हणत नाहीत. शिवाय जपानला जपानी लोक जपान म्हणत नाहीत. निहोन् किंवा निप्पोन म्हणतात. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचित्र लेख आवडला/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0