Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १४ : युगांतर

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : युगांतर.

आठवड्याची सुरुवात रविवारी (का सोमवारी), वर्षाची सुरुवात जानेवारीमध्ये (का पडव्याला), शकाची सुरुवात राजाचा अभिषेकाने (शालिवाहनाच्या का विक्रमाच्या)... सर्व कालमापनांची, युगांची सुरुवात निव्वळ सामाजिक ठरावाने होते. त्याला निसर्गातला पाया वगैरे पुष्कळदा नसतोच. पण तरी समाजाने ठरवले, आणि सर्वांनी मानले, तर ते तथ्य होते. काहीतरी नवे चैतन्य अशा प्रसंगी खरेच सळसळते. जुने काहीतरी संपल्याची हळहळ खरीच वाटते.

या वेळच्या आव्हानाचा विषय आहे "युगांतर". म्हणजे परिवर्तन. कॅमेरा म्हणजे घडामोडींना स्तब्ध थिजवणारा. कधीकधी हलत्या वस्तूंचे चित्र काढले, तर गतीचा भास होतो खरा. तरी युगांतर म्हणजे केवळ गती नव्हे, तर जुने काहीतरी पुरते संपून अगदीच नवे असे काहीतरी येणे. परिवर्तनाची प्रक्रिया स्थिर चित्रातून सांगणे म्हणजे चित्रकाराचे कसब. तर चला लोकहो, कल्पनाशक्तीला चालना द्या! नववर्षाभिनंदन!

------

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १४ जानेवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १५ जानेवारीच्या मंगळवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. याचा अर्थ तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - विसंगती.

स्पर्धा का इतर?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/01/2013 - 10:37

दोन्ही फोटोंसाठी कॅमेरा: कॅनन टी ३, लेन्सः १८-५५ मिमी

घड्याळ

Exposure Time: 1/20 s, Aperture: f/3.5, Focal Length: 18 mm, ISO Speed: 800

बदल

Exposure: 1/25 s, Aperture: f/3.5, Focal Length: 18 mm, ISO Speed: 800

अमुक Mon, 07/01/2013 - 22:54

In reply to by ऋषिकेश

फ्लॅश अनवधानाने उडला की मुद्दामहून उडवला ?
प्रकाश बराच दिसतो आहे आणि तरीही फ्लॅश वापरला आहे, म्हणून उत्सुकता.

ऋषिकेश Tue, 08/01/2013 - 08:39

In reply to by अमुक

खरं सांगायचं तर आता नक्की आठवत नाही. क्षमस्व!
पण माझी तत्कालीन छायाचित्रणाची समज लक्षत घेता हा "ऑटो" मोड वर काढलेला फोटो असावा, त्यामुळे फ्लॅश उडवायचा की नाही हे क्यामेराने ठरवले असावे. :) (सध्याची समज झाकली मुठ ;) )

आबा Tue, 08/01/2013 - 05:27

खरं सांगायचं तर या विषयासंबंधीत एकही फ्रेम डोळ्यासमोर येत नाहीये..
वरच्या फोटोज मधला सुद्धा फक्त ऋषिकेश यांचा फोटो थोडाफार विषयाच्या जवळ जाणारा वाटला.
आव्हान देताना धनंजय साहेबांच्या डोळ्यासमोर काही फोटो असतिलच, ते पहायला आवडतील.

बाय द वे, हा खालचा फोटो युगांतरच्या जवळपास जातोय
(सद्दाम हुसेनचा पुतळा पाडताना)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/01/2013 - 07:08

In reply to by आबा

लिंक देताना मागे http:// लावलेलं नसेल तर ड्रूपॉल आपण होऊन मागे www.aisiakshare.com लावतं त्यामुळे मूळची लिंक दिसत नाही. यावर कायमस्वरूपी उपाय काय ते माहित नाही. ड्रूपॉलवर आधारित वेगवेगळ्या संस्थळांवर अशी गडबड झालेली बघितलेली आहे.
यासाठी योग्य सर्च टर्म काय द्यावी म्हणजे कोणाला उपाय सापडलेला आहे का तो शोधता येईल इथे सध्या गाडी अडलेली आहे.

FAQ मधेही ही माहिती लिहून ठेवली आहे.

आता वरची लिंक सुधारलेली आहे. तिथे फोटो दिसतोय. विषयानुरूप आहे.

वाचक Tue, 08/01/2013 - 23:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

I searched for
Links entered with no http prefix + drupal

मग काही माहिती समोर आली.
उदा हा दुवा बघा: http://drupal.org/node/1697446

पॅच झाले की नाही महिती नाही पण तुम्ही link checker module मधे स्वतच कोड लिहुन लिंक external or internal आहे ते ठरवून स्वतच http अ‍ॅड करु शकाल असे वाटते आहे.

धनंजय Wed, 09/01/2013 - 05:05

युगांतर किंवा परिवर्तनाकरिता वर दिलेलॉ काही चित्रे कल्पक आहेतच. येथे काही उदाहरणे (काही अर्थातच हौशी चित्रकाराकरिता करिता शक्य नाहीत)
मार्तिन क्लिमास (http://www.martin-klimas.de/) याचे चित्र :
http://cdn.booooooom.com/wp-content/uploads/2008/07/klimas_01.jpg

आपले नेहमीचे "सुरवंट सुप्तावस्थेत जाणे :
http://lifecycle.onenessbecomesus.com/10.%20Pupation.JPG
किंवा फुलपाखरू बाहेर पडणे...

अर्धवट बांधलेली इमारत
इमारती आणि झोपड्या शेजारी-शेजारी
पडझड झालेली गल्ली, पण पूर्वीची शान जाणवायला पाहिजे
अर्धवट जळलेली / अर्धवट अगदी चकचकीन "नवी-कोरी" वस्तू (वस्तू कुठली निवडली, यावर भावनिक आशय ठरेल)
तसा फारसा उमदा नाही/तशी फारशी सुंदर नाही, पण लग्नाच्या पोशाखात नटलेला/नटलेली व्यक्ती (त्यात कुत्सा किंवा कौतुक असे अगदी वेगवेगळे भाव चित्रकार कौशल्याने आणू शकतो)

http://poraschaudhary.photoshelter.com/image/I0000XEBH247NUAg
http://www.alleephotography.com/uploads/processed/0835/0808241838451ind…

खाटिकाच्या कट्ट्यावर अजून "चेहरा" असलेली जनावरे. कोळिणीकडचे जिवंत/मृत मासे

कातळा-खडकातून किंवा कोरड्या खोडातून अंकुर

तव्यावर अर्धवट वितळलेली "चीज"वस्तू

नववर्षाच्या समारंभातील वैशिष्ट्यपूर्ण क्षण टिपणे... वगैरे.

अमुक Wed, 09/01/2013 - 08:59

दुसर्‍या महायुद्धात बर्लिनमधील उद्ध्वस्त झालेले एक चर्च आणि त्याशेजारी उभारलेली उत्तुङ्ग इमारत ही एका अत्याधुनिक चर्चचीच आहे.


-----
Camera: Panasonic DMC-FZ28
ISO: 100
Exposure: 1/320 sec
Aperture: 5.6
Focal Length: 4.8mm
Flash Used: No

---------------------------
अवान्तर -
त्या अत्याधुनिक चर्चमधला अत्याधुनिक अन्तर्भाग अन् येशू -

Camera: Panasonic DMC-FZ28
ISO: 800
Exposure: 1/10 sec
Aperture: 3.2
Focal Length: 9.2mm
Flash Used: No

धनंजय Tue, 15/01/2013 - 22:26

तृतीय क्रमांक अ: ऋषिकेश यांचे पहिले चित्र "१५ ऑगस्ट १९४७" विषयाकरिता. वेगळ्या अँगलने किवा पॅनिंग करून चित्रकाराला आपला छाप अधिक उमटवता आला असता.
तृतीय क्रमांक ब : अदिति यांचे चित्र "घड्याळ" चांगली कल्पना आहे.

द्वितीय क्रमांक अ/ब : अमुक यांचे संग्रहालयातले आणि बाकाचे चित्र. संग्रहातले चित्र कथानकाकरिता, आणि बाकाचे चित्र कल्पकतेकरिता.

प्रथम क्रमांक : अमुक यांचे चित्र क्रमांक ३. नाट्यमयता आहे, परदेशाचा किनारा म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील युगांतर आणि ढगामागून बाहेर येणारा (किंवा ढगात जाणारा) सूर्य म्हणजे परिवर्तन, वगैरे सर्व घटक एकमेकांना पोषक आहेत.

श्री. अमुक यांचे अभिनंदन.

कदाचित पुढचे आव्हान अधिक लांब ठेवावे (१ महिना) आणि दर आठवड्याला धागा वरती आणावा, असे काही करता येईल काय?

ऋषिकेश Wed, 16/01/2013 - 08:52

In reply to by धनंजय

कदाचित पुढचे आव्हान अधिक लांब ठेवावे (१ महिना) आणि दर आठवड्याला धागा वरती आणावा, असे काही करता येईल काय?

अधिक चित्रे येण्यासाठी म्हणून कल्पना चांगली आहे, पण मग वर्षात केवळ १२ विषयांवरच चित्रे पाहता येतील.
यावर माझ्या डोक्यात विचार आहे की एका वेळी दोन धागे चालु करावेत आणि दोन्हीचा काळ एका महिन्याचा असावा. म्हणजे विविध विषयांवर काढलेली छायाचित्रे पहाता येतील तसेच महिन्याचा कालावधी मिळेल.
हे ठिक वाटते का? तसे असल्यास या धाग्यात द्वितीय क्रमांकही अमुक यांनीच मिळवला असल्याने तृतीय क्रमांकाच्या विजेती म्हणून ३_१४ अदिति यांनी अजून एका धाग्यात विषय द्यावा असे सुचवेन

अमुक Wed, 16/01/2013 - 02:36

नवे आव्हान लवकरच देतो.

चित्र क्र. ३ ची तुम्ही लावलेली अर्थसङ्गती माझ्या चित्र देतेवेळपेक्षा वेगळी आहे (तुम्ही टिपलेल्या गोष्टी मात्र अचूक आहेत). त्यामुळे ते वाचताना मजा आली. कलेची हीच तर गम्मत आहे, की एकदा निर्मिती करणार्‍याच्या हातून ती निर्मिती सार्वजनिक झाली की ती सार्वनजिक कधी होईल, कधी कुणाला त्यातून काय गवसेल हे साङ्गता येत नाही. व्यक्तीसापेक्ष अन्वयार्थाची देवाण-घेवाण होणे हीच कलेतली, आस्वादातली मजा.

ऋषिकेश Wed, 16/01/2013 - 08:47

जर बर्लिनच्या चर्चचे चित्र स्पर्धेसाठी असते तर तेच पहिला क्रमांक जिंकले असते असे वाटते. मला ते चित्र विषयासाठी अत्यंत चपखल वाटले आणि तांत्रिक दृष्ट्या स्पर्धेत सहभागी बहुतांश चित्रांत उजवे आहे.

धनंजय तुमचे मत?

अमुक दुसरे चित्र स्पर्धेत ठेऊन चर्चचे न ठेवण्याचे कारण समजेल काय? मला बहुदा तुमचे दुसरे चित्र समजलेले नाही

अमुक Wed, 16/01/2013 - 18:55

In reply to by ऋषिकेश

दुसरे चित्र स्पर्धेत ठेऊन चर्चचे न ठेवण्याचे कारण समजेल काय?
........... चर्चचे चित्र आणि अङ्कुराचे चित्र मी स्पर्धेसाठी देणार होतो. परन्तु ते देण्याआधीच 'आबा'ञ्च्या विनन्तीनुसार धनञ्जय यान्नी विषयाची काही उदाहरणे दिली.
त्यात १. अर्धवट जळलेली/अर्धवट अगदी चकचकीत "नवी-कोरी" वस्तू , २. कातळा-खडकातून किंवा कोरड्या खोडातून अंकुर, या दोन्हीही कल्पना होत्या. थोडक्यात, माझ्या डोक्यात जे होते, तेच धागाकर्त्याला अपेक्षित होते याचे समाधान मिळाले. परन्तु कल्पना आधी उघड झाल्याने, त्यानन्तर जर चित्रे टाकली असती तर ती 'माझी' म्हणून देणे मला प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी दोन्ही चित्रे 'स्पर्धेसाठी नाहीत' म्हणून दिली.

मला बहुदा तुमचे दुसरे चित्र समजलेले नाही
.............दुसरे म्हणजे बाकाचे चित्र का ?
त्या चित्रात डावीकडे झाड आहे, त्याची फान्दी कापलेली आहे. उजवीकडे बाक आहे तोदेखील लाकडाचाच (चित्राच्या सुदैवाने त्या झाडाच्याच रङ्ग/पोताचा वाटणारा). या दोन गोष्टीन्ना जोडणारी अवस्थान्तराची गोष्ट म्हणजे 'निसर्गाच्या एका घटकाचे माणसाने आपल्या सोयीसाठी केलेले अवस्थान्तर'. झाड --> तोड --> लाकूड --> जोड --> बाक.

(किंवा एखाद्या कवीमनाच्या व्यक्तीने हेच चित्र 'झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया' म्हणत दिले असते, कुणास ठाऊक ! त्यातही अवस्थान्तर आहेच. ;))

ऋषिकेश Thu, 17/01/2013 - 10:06

In reply to by अमुक

ओह! कापलेली फांदी बघुनही लक्षातच घेतली नव्हती. लक्ष आपोआप बाक आणि मागचा पुल (त्याकडे जाणारा अस्पष्ट माणूस) याकडे जात होते आणि काहितरी संगती लावायचा प्रयत्न करत होते.

आता चित्र आवडले आहे :)