छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १७: कार्यमग्न
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : कार्यमग्न.
या विषयाबद्दलही अधिक काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. तसा सोपा विषय म्हणता यावा. अर्थ किती व्यापक असू शकतो हे चित्रांमधूनच पाहू !
------
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ३ मार्च रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल . ४ मार्चच्या गुरुवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - संध्याकाळ आणि विजेते छायाचित्र (क्र. १).
स्पर्धा का इतर?
फोर्ट
१. मे महिन्यातल्या एका टळटळीत दुपारी फोर्टमधल्या अग्यारीबाहेर कागदपत्रांत गढून गेलेले हे एक आजोबा:
छायाचित्र फोनने घेतले आहे. कातरलेले नाही.
२. ग्रँड बझार, इस्तंबूल
कमालीच्या वाक्चातुर्याने निरनिराळ्या मिठाया विकणारा विक्रेता:
Exif data
Exposure 0.04 sec (1/25)
Aperture f/3.5
Focal Length 18 mm
ISO Speed 500
Exposure Bias 0 EV
हा हा
छान आहे चित्र. कार्यमग्न म्हटले की मला लहानपणी वाचलेल्या 'ठकठक' मधील एक चित्रमय विनोद नेहमी आठवतो. त्यात एका मुलाचे बाबा मुलाला सांगतात बघ या मुंग्या किती काम करतात, शिस्तीत वागतात, रांगेत चालतात, कष्ट करतात, भविष्यासाठी तजवीज करुन ठेवतात. मुलगा म्हणतो, ' हो. आणि कुणाच्यातरी पायाखाली येऊन मरतात".
त्यावेळी तो विनोद वाटायचा. आता त्यात एखादी फिलॉसॉफी दिसते.
असो.
चाळा कॅमेरा: कॅनन रेबेल टी
चाळा
कॅमेरा: कॅनन रेबेल टी ३, Exposure: १/५ से, Aperture: f/5.6, Focal Length: 50 mm, ISO Speed: 400, Flash Used: No
खेळ
Camera: Canon PowerShot S3 IS, Exposure: १/२५०० से, Aperture: f/3.5
विक्रेती
Camera: Canon PowerShot S3 IS, Exposure: १/२५० से, Aperture: f/3.5
आणि हा एक, मी काढलेला नाही.
एक प्रश्न
'कॅनन् रेबेल् टी' आणि 'पॉवरशॉट्' ने काढलेल्या चित्रान्त काही दर्शनीय/लक्षणीय फरक आढळला का ?
'रेबेल्'ची चिप् सी-मॉस् आहे (सीसीडी नाही) म्हणून विचारत आहे. दोन्ही कॅमेर्यातील बाकी सर्व गोष्टी समान ठेवून अन्धारात काढलेली काही चित्रे असतील, तर फरक कळू शकेल.
दोन्ही कॅमेर्यातील बाकी सर्व
दोन्ही कॅमेर्यातील बाकी सर्व गोष्टी समान ठेवून अन्धारात काढलेली काही चित्रे असतील, तर फरक कळू शकेल.
प्रयोग करून परिणाम दाखवते.
मुख्य फरक माझ्या मते भिंगाचा व्यास, चिपचा आकार आणि कॅमेर्याचा प्रोसेसर यांच्यामुळे पडतो. 'रेबेल'च्या भिंगाचा व्यास ५६ मिमी आहे, पावरशॉटला तेच पोलरायजर, यूव्ही फिल्टर अॅडॅप्टर वापरून वापरता येतात, पण भिंगाचा व्यास थोडा कमी आहे. क्षेत्रफळातला फरक साधारण दुपटीचा असावा. 'रेबेल'मधे कच्च्या (रॉ) फॉरमॅटमधेही फोटो साठवता येतात. कॅननने कॅमेर्याबरोबर दिलेलं साधं सॉफ्टवेअर वापरूनही कच्च्या चित्रांमधे बरेच बदल करता येतात जे जेपेग किंवा पीएन्जीमधे जमतीलच असं नाही. काही प्रतिमांमधे मी चिपची 'गेन' कमी-जास्त करून HDR प्रतिमा बनवल्या आहेत. फक्त प्रकाशाची तीव्रता (brighness) बदलून जेपेगमधे असा परिणाम बहुदा मिळत नाही.
आता रेबेल वापरण्याचं कारण म्हणजे (बहुदा) अतिवापरामुळे पावरशॉटचं मेकनाईज्ड झूम-इन, झूम-आऊट मधूनच बंद पडायला लागलं. परवडतंय आणि वापरता येईल अशी खात्री आहे तर मग एसेलारच घेऊ म्हणून पावरशॉटऐवजी रेबेल घेतला.
दोन्हींमधे उच्च आय.एस.ओ.ला नॉईज जाणवण्याइतपत आहे.
प्रयोग करून परिणाम
प्रयोग करून परिणाम दाखवते.
..............ठीक. धन्यवाद.
मुख्य फरक माझ्या मते भिंगाचा व्यास, चिपचा आकार आणि कॅमेर्याचा प्रोसेसर यांच्यामुळे पडतो.
.......... या सगळ्या गोष्टी खर्या असल्या तरी माझा मुख्य निर्देश १. अतिशय कमी प्रकाशात खूप आय्. एस्. ओ. ला नॉईज़् जाणवणे आणि २. अतिजलद टिपून आलेल्या चित्रान्तील सफाई या गोष्टीङ्कडे आहे. सी.मॉस्. चा वापर मुख्यत्वे कमी नॉईज़् आणि अॅनलॉग् --> डिजिटल् रुपान्तर प्रक्रियेसाठी लागणारा अतिशय कमी वेळ या दोन गोष्टीञ्चा फायदा घेण्यासाठी केला जातो.
दोन्हींमधे उच्च आय.एस.ओ.ला नॉईज जाणवण्याइतपत आहे.
............अच्छा.
प्रोसेसर दोन्हीत सारखेच आहेत पण
मेगा-पिक्सेल चा फरक आहे आणि इतरही फरक आहेत, इथे अधिक माहिती मिळेल.
http://www.usa.canon.com/cusa/consumer/products/cameras/slr_cameras/eos…
http://www.usa.canon.com/cusa/consumer/products/cameras/slr_cameras/eos…
सर्धेसाठी नहीत
पॅपायरसपत्रावर ग्राहकाचे नांव रेखण्यात गढुन गेलेली विक्रेती
Camera Nikon D60
Exposure 0.017 sec (1/60)
Aperture f/5.3
Focal Length 35 mm
गळाला लागलेला मासा न्याहाळणारे कोळीदादा (चिनीमातीची पारंपारीक कलाकृती)
Camera Nikon D60
Exposure 0.3
Aperture f/20.0
Focal Length 90 mm
ISO Speed 100
Exposure Bias -1/3 EV
बोट स्थिर करण्यासाठी काठाचा दोर बोटीतल्या खुंटांना गुंडाळ्णारा खलाशी
Camera Nikon D60
Exposure 0.013 sec (1/80)
Aperture f/5.6
Focal Length 55 mm
ISO Speed 200
निकाल
निकाल देण्यास उशिरा झाल्याबद्दल क्षमस्व. विजेती छायाचित्रे खालील क्रमाने आहेत
१) राजेश घासकडवी यांनी काढलेले छायाचित्र (landing strip बनवणारा मुलगा)
२) विभागून
२.१) विक्रेती (३_१४ विक्षिप्त आदिती)
२.२) खलाशी (सर्वसाक्षी)
३) विभागून
३.१ ) अमुक यांनी काढलेले भरतकाम करणार्या स्त्रीचे छायाचित्र
3.२ ) रोचना यांनी काढलेले "आणखीन एक नवीन हॉबी"
मी छायाचित्रांमधला एक्स्पर्ट नाही, त्यामुळे हा निकाल जास्तीत जास्त कथेवर अवलंबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं जाणवलं की बरीच छायाचित्रे "कार्यमग्न" पेक्षा "निवांत" या शीर्षकाखाली जास्त शोभून दिसतील. अर्थात हे बघणार्याच्या नजरेवर बरचसं अवलंबून आहे. असो,
ऋषिकेश याच्या दुसर्या छायाचित्राचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. इथे आलेल्या सर्व छायाचित्रांमधून, त्यांच्या छायाचित्राची फ्रेम मला सर्वात जास्त आवडली. परंतू विषयापेक्षा थोडी वेगळी वाटल्या मुळे तिला क्रमांक दिला नाही (परत, "हे सापेक्ष आहे" वगैरे वगैरे).
अवांतर: अमुक यांच्या "Are you kidding me fish" या छायाचित्रामधली मुलगी अगदी "डोनाल्ड झोलान" च्या मॉडेल सारखी दिसतेय. वास्तविक ते छायाचित्रच झोलानच्या एखाच्या पेंटिंग सारखं दिसतंय.
घासकडवीसर अभिनंदन, कृपया पुढचा आव्हानाचा विषय द्या.
अवान्तर - झोलान, मार्था
'डोनाल्ड झोलान' कोण हे माहीत नव्हते. तुम्ही उल्लेख केल्यावर आन्तरजालावर त्याञ्ची चित्रे पाहिली. (चित्रान्तील विषय चाङ्गले असूनही रङ्गकाम मात्र कच्चे वाटले. असो.) तुम्ही म्हणता ते खरे आहे. ती मुलगी झोलानच्या चित्रासाठीच बसल्यासारखी वाटते. चित्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
----
भरतकाम करणारी स्त्री ही 'मार्था वॉशिङ्टन'चे काम करणारी अभिनेत्री आहे. मार्था ही जॉर्ज वॉशिङ्ग्टनची पत्नी.
गेल्यावर्षी 'माउण्ट वेर्नॉन' या वॉशिङ्टन राहत असे, त्या ठिकाणी जाणे झाले. तिथे आता सङ्ग्रहालय आहे. तेथे 'Meet Lady Washington' नामक एका दालनात ही अभिनेत्री त्याकाळचे सर्व कपडे घालून बसलेली असते आणि तिच्या ऐतिहासिक नवर्याबद्दलच्या गोष्टी साङते. लोक समोर खुर्च्यांवर बसून तिच्या गोष्टी ऐकतात. जॉर्ज आणि मार्थाच्या आयुष्याम्बद्दल प्रश्न विचारतात. मग ती त्यावेळी जे घडले ते साङ्गते. एकूण प्रकार रञ्जक होता.
हे ते दालन -
मार्थाबाई उत्तरे देताना -
फेसबुकावर मिळालेले काही फोटो:
फेसबुकावर मिळालेले काही फोटो:
