समजा न्याय करायचा आहे..

"न्याय" या संकल्पनेविषयी तुमचे विचार काय आहेत?
न्याय या शब्दावर आणि त्याच्या अर्थावर आपण किती विचार करतो..?

हो.. कबूलच आहे की हा प्रश्न म्हणजे एक निव्वळ तात्विक काथ्याकूट आहे. पण तरीही..

समजा तुम्हाला "न्याय" करायचा आहे, कोणातरी अन्य व्यक्तीच्या बाबतीत. तुम्हाला ती ताकद दिली गेली आहे. ज्याला न्याय द्यायचा तो / ती व्यक्ती तुमच्याशी थेट संबंधित नाही. किंवा ती व्यक्तीही नसेल.. एखादी कंपनी असेल. हा खटला एका विशिष्ट "कोर्ट ऑफ लॉ" मधे चालू नसेलही. त्याच्यामागे एखाद्या ठराविक देशाची मार्गदर्शक तत्वं (इंडियन पीनल कोड) किंवा ह्युमन राईट्सचा विचार असेलच असं नव्हे.. कोणतीही लिखित नियमावलीची पार्श्वभूमी न ठेवता न्याय करायचा आहे असं समजू..मी आपल्या स्वतःच्या विचारप्रक्रियेबद्दल बोलतोय.

अशा वेळी तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते? न्याय करताना तुमचा मुख्य उद्देश काय असतो? सूड ? शिक्षा? सुधारणा? प्रायश्चित्ताची संधी?

सोपं होण्यासाठी, टू बी स्पेसिफिक, तीन विचित्र उदाहरणं घेऊ. सर्व विचार हा थिअरीचा भागच असल्याने न्यायदान आणि पुढच्या कारवाईचे अमर्याद अधिकार तुम्हाला दिले गेले आहेत असं मानू:

१. "ब्रिटिश" या राज्यव्यवस्थेने भारतावर पूर्वी केलेल्या कब्जाबाबत आज न्याय करायचा आहे.

२. एखाद्या मल्टिनॅशनल स्नॅक कंपनीने भारतीय ग्राहकांना नकळत गायीचं मांस खाऊ घातलं आहे.

३. एका डॉक्टरने पेशंटची चुकीची दाढ काढली आहे.

ही तिन्ही उदाहरणं फार वेगवेगळ्या स्केल्सची आहेत. ही घेण्याचं कारण असं की या प्रत्येक उदाहरणात जे "दुरित" घडलं आहे ते व्यक्तिसापेक्ष कमीजास्त तीव्रतेचं आहे. उदा. आताच्या भारतात जगणार्‍या उच्च मध्यमवर्गीय व्यक्तीला ब्रिटिशांनी पूर्वी केलेल्या अन्यायाची बोच अजिबात नाही. किंवा आवडीने बीफ खाणार्‍या / सर्वाहारी लिबरल व्यक्तीला गायीचं मांस खायला घातलं यात प्रचंड चुकीचं असं काही वाटणार नाही.. पण हिंदू धार्मिक व्यक्तीला हे खूप धक्कादायक ठरेल.

पण आपण न्यायकर्ते आहोत असं आपण समजायचं असल्याने आपल्याला स्वतःचे पूर्वग्रह ठेवून चालणार नाही( नाही का?? ). तर अशा वेळी वर दिलेल्या तिन्ही केसेसमधे तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याल आणि काय न्याय / भरपाई / हिशोब / सूड / शिक्षा / वसुली कराल..?

पुन्हा एकदा सांगतो.. तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत.. "असले खटले कोणत्या कलमाखाली किंवा कोणत्या ज्युरिसडिक्शनच्या हद्दीत भरले जाऊ शकतात किंवा नाही.." "याबद्दल मत व्यक्त करण्याचा नैतिक हक्क मला कसा काय?.. हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.." असे विचार काढून टाकायचे आहेत आणि शुद्ध न्याय करायचा आहे.

विचित्र , अ‍ॅब्सर्ड वाटत असेल तर सोडून दिलं तरी चालेलच. मला फक्त आपण चारचौघे लोक "न्याय" म्हणून कोणत्या दिशांनी विचार करतो इतकं माहीत करुन घ्यायचं आहे. "न्याय" या विषयावर सार्वजनिक जनमत कशातून बनतं? एकेकट्या व्यक्तीने या भूमिकेतून विचार केलेला असतो का आणि काय? हे सर्व पुढचे प्रश्न आहेत, ते सध्या नाही बाहेर काढत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

मेंदूच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकात नीतीनियमांची ऐशीतैशी हे प्रकरण आहे. त्यात अशा प्रकारचे थॉट एक्सपरिमेंट दिले आहेत. निती नियमांशी संबंधीत मेंदूचा भाग बधीर झाला तर माणसाची सारासार विचारशक्ती क्षीण होते लिऑन यंग यांनी हा प्रयोग केला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

न्याय म्हणजे नक्की काय? दोषी आहे का नाही हे ठरवणे आणि/किंवा शिक्षा सुचवणेही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वच. .

किंवा तेही ओपन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहीली केस कॉम्प्लिकेटेड आहे. दुसर्या तिसर्या केस मधे दोषीँकडुन योग्य पैशांचा दंड घेईन बाकी कै नै करणार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अत्यंत रोचक धागा आहे

१. "ब्रिटिश" या राज्यव्यवस्थेने भारतावर पूर्वी केलेल्या कब्जाबाबत आज न्याय करायचा आहे.

तत्कालीन घटनेबद्दल आजच्या नितीनियमांनी न्याय करणे मला योग्य वाटत नाही.तत्कालीन मानसिकता, समाज, नीती-अनीतीच्या कल्पना, 'न्याय - अन्यायाच्या' कल्पना विचारात घेऊन जी काही आचरणे झाली ती झाली, त्याचा मी माझ्या सध्याच्या विचारांच्या कसोटीवर घासून "न्याय" देण्याचा आव आणणे तत्कालीन सर्वच पार्टीजवर अन्यायकारक ठरेल.

सबब या केसवर मी निकाल देण्यास असमर्थ आहे

२. एखाद्या मल्टिनॅशनल स्नॅक कंपनीने भारतीय ग्राहकांना नकळत गायीचं मांस खाऊ घातलं आहे.

यात मी काहि तथ्ये बघेन, शोध घेईन,
१. माझ्या दृष्टीने सदर गुन्हा हा अदखलपात्र आहेच शिवाय जर याबाबत कोणी माझ्याकडे फिर्याद केली नाही तर मी आपणहून, एखाद्या बातमीवरून/पत्रावरून अर्थात "सुओ-मोटो" या केसमध्ये लक्ष घालणार नाही
२. जर तक्रार केली तर मी ज्या तथ्यांची आणि त्याला आधार देणार्‍या पुराव्यांची मागणी करेन ती अशी:
२अ. स्नॅक कंपनीचा परवाना
२ब. स्नॅक कंपनीच्या प्रोडक्टबद्द्ल अन्न सुरक्षा विभागाचे (किंवा तत्सम विभागाचे) मान्यतापत्र
२क. प्रोडक्टचे शेवटचे इन्स्पेक्शन केल्याची तारीख आणि प्रमाणपत्र, शेवटचे इन्पेक्शन केलेल्या अधिकार्‍याचे नाव, पत्ता
२ड. सदर व्यक्तीचे ज्या दुकानातून प्रोडक्ट खरेदी केले आहे तेथील अन्य मालाचे विश्लेषण करून त्यातील घटकांचा सादर केलेला रिपोर्ट
२ई. सदर कंपन्यांचे अन्य शहरांतील प्रोडक्टमध्ये वापरलेल्या घटकांचा रिपोर्ट
२फ. नकळत म्हणजे कोणाच्या नकळत यावर दोन्ही बाजुंचे मत (म्हणजे फक्त ग्राहकाच्याही नकळत का कंपनीच्या नकळत का अपघात?)
निकाल
अ. जर कंपनीचा परवाना अवैध असल्याचे आठळले तर सरळ दुकानाला ताळे ठोकण्याचे आदेश
ब. अन्न सुरक्षा विभागाचे मान्यतापत्र नसताना किंवा एक्सपायर झाले असताना खाद्य पदार्थ विकताना आढळल्यास परवाना रद्द करेन, मात्र काही दंड भरून पुन्हा ३ महिन्यात नव्या परवान्यासाठी अर्जाची सुट देईन
क. जर दोन्ही परवाने वैध असतील, मात्र परवाना गाईचे मांस असलेले पदार्थ विकायचा नसेल तर ज्या व्यक्तीने इन्स्पेक्शन केले आहे त्या व्यक्तीची साक्ष घेऊन त्याची बाजु ऐकेन आणि त्यात गडबड आढळल्यास सदर व्यक्तीवर कारवाई करेनच, त्याच बरोबर (जे सत्य उजेडात येईल त्यानूसार) कंपनीवर कारवाई करेन
ड. सदर कंपनीला अश्या प्रकारचे प्रोडक्ट विकायचा वैध परवाना असेल तर तसे स्पष्ट शब्दात निर्देश प्रोडक्टवर देण्याचे आदेश देईन तसेच तसे निर्देश अजून न दिल्याबद्दल दंडात्मक कारवाई करेन.
ई. जर त्या कंपनीतील अन्य शहरांतील प्रोडक्टमध्ये हे घटक आढळत नसतील तर त्या शहरातील म्यानेजरवर, आचार्‍यावर कंपनीच्या अंतर्गत नियमांनी कारवाई करण्याचे आदेश कंपनीला देईन.
फ. बाकी सारे ठिका आहे आणि हा अपघात असल्यास, कंपनीला आपल्या क्वालिटी कंट्रोलवर लक्ष द्यायची तंबी देऊन सोडून देईन
ग. चुकीची तक्रार आढळल्यास ग्राहकाला तंबी देईन

३. एका डॉक्टरने पेशंटची चुकीची दाढ काढली आहे.

वरील प्रमाणेच.. डॉक्टरचे प्रमाणपत्र बघेन, दाढ काढण्याचा निर्णय बरोबर होता की नाही यावर तज्ज्ञांचे अहवाल मागवेन, डॉक्टरांकडील इक्विपमेन्ट्स किती वापरण्यायोग्य आहेत त्याचा अहवाल मागवेल, त्यांच्या दवाखान्याचे इन्स्पेक्शन झाल्याचा रिपोर्ट मागवेन, त्या डॉक्टरांच्या इतर पेशंटच्या साक्षीने जर हा अपघात असल्याचे डॉक्टरांना सिद्ध करता येतेय का हे ही बघेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. मी केस कालबाह्य म्हणून डिसमिस करीन कारण (गुन्हा असलाच तरी) गुन्हेगारांपैकी आणि बळींपैकी कोणीही जिवंत नाही.
(शिवाजीने अफजलखानास मारले म्हणून आज "खान" नावाच्या माणसाने "भोसले" नावाच्या माणसाला मारणे मंजूर नाही.

२. नकळत गोमांस खाऊ घातले की गोमांस असतेच ते ग्राहकांनी नकळत खाल्ले की ग्राहक हिंदू आहेत म्हणून त्यांचा धर्म भ्रष्ट व्हावा म्हणून मुद्दाम ग्राहकांना न सांगता गोमांस घातले ते पाहीन. बहुधा तिसरी केस असण्याची शक्यता नाहीच. मॅकडोनाल्डच्या फ्रेंच फ्राईजमध्ये बीफ टॅलो वापरला जात होता असे पूर्वी उघडकीस आले होते. (तसेच डालडामध्ये चरबी असते अशी अफवा फार पूर्वी उठल्याचेही आठवते.

३. डॉक्टरने हलगर्जीपणा केला असल्यास दंड + भरपाई द्यायला लावीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

न्याय आणि कायदा यांची मुलभूत गरज किंवा न्याय या संकल्पनेमागची आदिम प्रेरणा समूह / व्यक्तीचे व त्यांच्या हितांचे शोषण त्या त्या व्यक्ती अथवा समूहापेक्षा अधिक बलवान व्यक्ती अथवा बलवान समूहाकडून बळाच्या दुरुपयोगाने घडू नये या प्रेरणेतून होते.गुहांमध्ये राहणार्या आदिमानवापासूनची न्यायविषयक प्रेरणा 'हितांचे रक्षण' हिच आहे. त्यामुळे निवाडा करतांना बघितले गेले पाहिजे कि एखादी गोष्ट (यात जीव, स्थावर जंगम मालमत्तेपासून, स्त्रीची अब्रू , धार्मिक श्रद्धा अश्या abstract गोष्टींपर्यंत ) बळजबरीने एकाकडून दुसऱ्यास मिळत असेल तर तो स्पष्ट अन्याय आहे. न्याय करतांना एकाच्या हितांचा परिपोष दुसर्याच्या हिताची पायमल्ली करून होत नाही ना असा विचार केला गेला पाहिजे. प्रतीशोधांना जन्म देत नाही तोच सुयोग्य कायदा आणि न्याय ठरावा. उदाहरण म्हणून Godfather चित्रपटाची सुरुवात न्याय या विषयावर आदिम आणि रांगडं भाष्य करणारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कायदा कठोर नसावा. ज्याला त्याला निवडीचे स्वातंत्र्य असावे.कुणीच कुठेच नाक खुपसू नये.(स्पेशली बेडरुम मध्ये तर मुळीच नाही.) " हे आणि असे (सध्याच्या बहुतांश जनसामान्यांना ) अतिरेकी (वाटेल इतके) व्यक्तिस्वातंत्र्याचे विचार मांडणारी मंडळी इथे बरीच आहेत.(प्रामुख्याने अदिती, चिजं, राजेश व इतर असे बरेच.सर्वांची नावे घेणे शक्य नाही.) शिवाय त्यांच्या बोलण्यात "नथिंग इज होलि" वगैरे अवतरणे येत असतात. समलिंगीकडे पाहून दचकणे; त्यांचा (खरतर कुणाचाही) विनाकारण द्वेष करणे चूकच. पण मुळात तसे असणे कसे स्वाभाविक आहे हे आता इथे चार्ट वगैरे काढून; मोठे तर्क मांडून आणि व्यक्तिस्वातंत्र्त्याच्या नावाने मांडले जातात. (माझी सध्याची भूमिका :- ते व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे चारचौघात बोलायला ठीक आहे हो; पण अगदि जवळची व्यक्ती अशी असेल तर तुम्हाला चालेल का? मला चालणार नाही. म्हणजे.मी द्वेष करीन असं नाही; पण नितांत दयाभावनेने;सहानुभूतीने पाहिन त्या व्यक्तीकडे(बहुदा ती व्यक्तीही माझ्याकडे अशीच पहात असेल हा तुमचा पॉइंट असणार).)
.
दोन मिनिटासांठी आता भारतीय दंडविधान वगैरे नेउन चुलीत घाला. कारण जोवर एका कलमान्वये हा प्रकार निर्विवाद गुन्हा मानला जात होत होता तेव्हाही "हा कायदाच बदला" अशी मागणी व्यक्तीस्वातंत्र्यवादी म्हणवणारे करायचे.
.
तर विचारायचं म्हणजे "त्यांची इच्छा. त्यांचे स्वातंत्र्य. राजीखुशीचा मामला." असे तर्क इथली मंडळी कुठपर्यंत ताणतात?
एक टोकाचं उदाहरण म्हणजे incest योग्य आहे का? दोन जवळचे नातलग राजीखुशीने संबंध ठेवत असतील तर तुम्हाला चालेल का?
("विकलांग अपत्याच्या शक्यतेमुळे होणारा विरोध" हे एक कारण झालं. दोन मिनिटे ते सोडलं तर? संबंध ठेवताना अपत्य होणार नाही; ह्याची काळजी घेतली नि संबंध ठेवले तर? चालेल का? की "मानसिक उपचारांची ह्यांना गरज आहे" असं तुम्हा म्हणाल(बहुदा मी हेच म्हणेन.) म्हणजे जवलच्या नात्यातील लोकांनी समलैंगिक स्म्बंध राजीखुशीने ठेवले तर? किंवा भिन्नलिंगींच्या केसमध्ये त्यातील एकाने अपत्य न होण्याची १००% खात्री करुन घेतली तर?(menopause नंतर संबंध ठेवले तर? किंवा इतर उपाय* वापरले तर?))
.
खालील बातमीबद्द्ल तुमचे काय मत आहे?:-
http://www.spiegel.de/international/germany/european-court-of-human-righ...
युरोप -अमेरिका इतर जगापेक्षा बरेच खुल्या विचारांचे मानले जाते.
.
व्यक्तीस्वातंत्र्य.... "त्याचे त्याला करु देत" हा अ‍ॅटिट्यूड कुठल्या टोकापर्यंत ठीक आहे?
.
व्यवस्थपनाला विनंती:- हा स्वतंत्र धागा बनवलात तर बरं. पण माझ्या नावानं करु नकात. मला असे बोलताना संकोचायला होते.
.
*हे उपाय vasectomy वगैरे १००% च्या जवळ जातील; पण १००% ग्यारंटेड म्हणता येणार नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जेव्हा निवडीचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हाच कायद्याने नाक खुपसू नये असं म्हणता येतं. निवडीचं स्वातंत्र्य उपभोगण्याचीही जेव्हा शक्यता नसते तेव्हा दुर्बळांचं रक्षण करण्याची समाजाची, पर्यायाने न्यायव्यवस्था, सरकार यांची जबाबदारी असते. (माझे पैसे मला माझ्याच मताप्रमाणे खर्च करता यावेत, कोणा पाकीटमाराला त्याच्या मनाप्रमाणे नाहीत म्हणून पोलिस, कायदे इ. आवश्यक आहेत.)

दोन वयस्क (consenting adults) कोणत्याही प्रकारच्या जोरजबरदस्तीशिवाय एकमेकांची शय्यासोबत करू इच्छितात तर त्याबद्दल आपण कसं बोलायचं? काही बाही करून अन्य लोकांची फसवणूक करणारे जर त्यांच्या नवरा/बायकोला शय्यासोबत करण्यायोग्य वाटत असतील तर त्याबद्दल त्रयस्थ व्यक्ती म्हणून आपण कसं पहावं? टोकाचं उदाहरण हिटलरची पत्नी इव्हा ब्राऊन हिचं. तिला हिटलर बॉयफ्रेंड म्हणून फार आवडत असे. अगदी lame उदाहरण म्हणजे साधारण १९८०-१९९० च्या दशकातले चित्रपट. 'कयामत से कयामत तक'. त्या दोघांना लग्न करायचं असेल तर आई-वडलांनी मधे पडणं जनतेला अमान्य असण्याचं त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसतं. समलैंगिकांकडे 'बहुजन' कशा नजरेने बघतात यामुळे त्यांना फरक पडत नाही; कायद्यामुळे त्यांना अनैसर्गिक वर्तन करावं लागतं किंवा नैसर्गिक बेकायदेशीर मानलं जातं असा प्रश्न होता. दोन वयस्क लोकांच्या परस्परसंमत शय्यासोबतीबद्दल समाज, पोलिस, न्यायव्यवस्था, सरकार यांनी काही बोलावं का नाही असा प्रश्न आहे. मिया-बीवी राजी ... ही म्हण या संदर्भात मूल्यसुसंगत पद्धतीने वापरायची. झालं.

मूळ प्रश्नांमधे जे 'गुन्हे' समजले गेले आहेत त्यात दोन बाजू समान नाहीत. शरीरसंबंध या तिन्ही उदाहरणांपेक्षा वेगळी गोष्ट आहे.

(फार अवांतर झालं तरच वेगळा धागा बनवता येईल. आणि असला तुझ्या नावाने तर असला. तुझ्यामुळे चर्चा सुरू झाल्याचं श्रेय घेता येईल की तुला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चर्चेत भाग घेण्याचं उत्तरदायित्व दोन्ही पार्टी स्विकारत असल्यास कृपया वेगळा धागा काढावा अशी विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा माझ्यानावाने सुरु होत नसेल तर मी चर्चेत भाग घेउ शकेन.
(मूळ धागाकर्ता म्हणून माझे नाव नको)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्वतंत्र धागा कशाकरता? तुमची मतं स्पष्ट आणि ठाम आहेत. तुम्ही ज्यांना 'व्यक्तिस्वातंत्र्यवादी' असं काहीशा तुच्छ सुरात म्हणता त्यांचीही मतं ठाम आहेत. मग चर्चा कशी काय घडू शकते? मी हो म्हणतो, तुम्ही नाही म्हणता... यापलीकडे चर्चा कशी जाणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मग चर्चा कशी काय घडू शकते?
सध्या इथेच चर्चा होताना दिसते आहे. ऋषिकेश, अदिती व मी ह्यांचे प्रतिसाद पहावेत. "अमुक एका टोकाच्या परिस्थितीत तुमची मतं काय आहेत" हे विचारणं चूक कसं?
.
माझी मतं ठाम असल्याचं सांगून माझं जाहिर कौतुक केल्याबद्दल आभार.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला तिरकसपणे काही म्हणायचं नाही. तुमच्या पृच्छेत काहीही चूक नाही. कृपया गैरसमज नसावा.
जालीय चर्चांमध्ये काही विषय हमखास रंगणार्‍या चर्चांची हमी देतात. पण त्या चर्चांमधून कुणाचेच विचार काही अंशी तरी बदलले, त्याला दुसर्‍या गटाचं म्हणणं थोडंफार पटलं.. अशी उदाहरणं आठवत नाहीत. तशा प्रकारच्या चर्चांचा कंटाळा आल्यामुळे मी वरचं मत मांडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझे स्वतःचे विचार तरी बर्‍याचदा फ्लोटिंग मोड मध्ये जातात दुसर्‍याची बाजू पटली नाही तरी समजू लागते.
पूर्वी "गे" माणूस आहे असं ऐकलं की "ईईईईई यक्क" असं करावसं वाटे. आता "वयाच्या विशीत माझे डोक्यावरचे केस गेलेत. म्हणजे फार काही भयंकर वगैरे नाहिये. त्यानं इतर कुणाला काही भयंकर वगैरे त्रास होत नाही. पण ते जागच्या जागी असते तर बरं वाटलं असतं." हे मी जसं स्वतःचय बाबतीत म्हणतो तसच "अमका अमका गे आहे. तो त्रासदायक वगैरे नाही. जगतोय आपला बिचारा. पण तो तसा नसता तर बरं झालं असतं." इथवर आमची मतं आलित. किंवा "गे ला शिक्षा करु नये पण जमल्यास सहानुभूती दाखवावी.(टकल्याला न मागता दाखवतात तशीच.)"
शिवाय गांधी-काँग्रेस- फाळणी ह्यातही आता संभ्रम आहे.(पूर्वी "टकला गांधी हरामी आहे" असे बोलणार्‍यांच्यात वाढलेलो. आता तितका ठाम नाही. असो. सारखी सारखी स्वतःची उदाहरणे द्यायचा कंटाळा येतो बुवा. पुन्हा पुन्हा "मी उथळ होतो हो. आता शहाणा झालो हो" असं म्हणणं हे सुद्धा खरं तर अजूनही शहाणा न झाल्याचच लक्षण आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुद्दा पटला. माझं म्हणणं काहीसं सिनिक होतं, हे मला पटलं आहे. ते मी मागे घेते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवांतर असले तरी रोचक आहे, चर्चा वाढली तर वेगळी काढता येईल. पण तुमचे नाव वापरायचे नसल्यास कशी काढावी असा तांत्रिक विचार करावा लागेल

यातील बहुतांश विषयांवरील माझी मते सर्वपरिचित आहेत असे वाट्टे तरी या अनुषंगाने विस्ताराने देतो.

अगदि जवळची व्यक्ती अशी असेल तर तुम्हाला चालेल का?

अगदी जवळची म्हणजे? उदाहरणे घेऊ. समजा माझी पत्नी तशी आहे हे कळले असते तर कदाचित दोन प्रकाराने दुखावला गेलो असतो. एक स्वार्थी दु:ख (की स्वतःला आनंद मिळणार नाही असे), आणि दुसरे ती उगाच या सामाजिक दबावाला झुकल्याचे आणि त्यामुळे तिला आत्मपिडा होत असल्याचे दु:ख. पत्नी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जवळच्या व्यक्तीचे समलैंगिक असण्याने मला फरक पडेल असे वाटत नाही. किंबहुना माझा एक अत्यंत उत्तम मित्र आणि काहि परिचित (३ पुरूष १ स्त्री) समलैंगिक आहेत. त्यांच्याशी -ही माहिती कळायच्या आधीच्या आणि नंतरच्या- माझ्या वर्तनात काहिहि वेगळे नाही (हे त्यांनीही आवर्जून सांगितले आहे).

हा प्रकार निर्विवाद गुन्हा मानला जात होत होता तेव्हाही "हा कायदाच बदला" अशी मागणी व्यक्तीस्वातंत्र्यवादी म्हणवणारे करायचे.

या मागणीला माझे समर्थन आहे.

दोन जवळचे नातलग राजीखुशीने संबंध ठेवत असतील तर तुम्हाला चालेल का?

होय, जो पर्यंत ते आपल्या कर्माच्या सामाजिक + कायदेशीर परिणामांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत तोवर, मला भावनिक दृष्ट्या नक्की चालेल. अगदी अपत्यप्राप्तीपर्यंत प्रकरण आले तरीही!

खालील बातमीबद्द्ल तुमचे काय मत आहे?

युरोपियनांना "मोठे व्हा, डोळे-कान उघडे ठेवा" असे म्हणेन Smile असे चालत नसते तर भारतातील, मराठीतील बहुतांश शिव्यांचा उगमच लोपला असता. Wink
शिवाय भारतात मामे-मावस भावंडांत काहि समाजात संबंध मंजूर असल्याचे ऐकण्यात येतेच. अन्यवेळी जर अश्या संबंधांनी अपत्यप्राप्ती झालेली चालणार असेल तर मात्र मी चुलत, सख्ख्या, सावत्र भावंडांत या संबंधांच्या जैविक कारणाने विरोधात असेन (जीनेटिक कारणे)

व्यक्तीस्वातंत्र्य.... "त्याचे त्याला करु देत" हा अ‍ॅटिट्यूड कुठल्या टोकापर्यंत ठीक आहे?

जोपर्यंत दुसर्‍या व्यक्तीवर अन्याय किंवा त्रास होत नाहि आणि समाजाचे "मोठे" (सापेक्ष टर्म) नुकसान होत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मामे-मावस्-चुलत ह्या केअसमध्ये अपत्यांना तितका प्रॉब्लेम यायची शक्यत आ नसावी.
बहरतात प्रामुख्याने मामे-नाते प्रचलित दिसते.(मामाच्या पोरिवर डॉळा ठेवणे हा पोट्ट्याचा बाय डिफॉल्ट हक्क असल्याची समजूत आहे.)
.
आख्ख्या मध्य्पूर्वेत(अरब जगतात) चुलत्-मावस सुद्धा प्रचलित आहे. त्याचे भयंकर दुष्पोअरिणाम तत्काळ वगैरे दिसतात असे वाटत नाही. सख्ख्या नात्यात मात्र हे(दुष्परिणाम येणे/दिसणे) लगेच होते(च?).
.
वंशशुद्धीसाठी इजिप्तचे फेरो आणि काही शाक्य कुले incest करायला गेली आणी त्याची भयंकर किंमत त्यांना मोजावी लागली असा एक तर्क वाचला होता.(आता लगेच दुवा द्या; लेखक कोण; विदा दे; चार्ट दाखव असे म्हणू नका प्लीझ.)
.
माझ्या प्रतिसादातील incest मध्ये आते-मामे-चुलत्-मावस ह्यांना incest म्हणून गणलेले नाही.
(अजून फ्रॉइड आणि त्याचा इडिपस कॉम्प्लेक्स चर्चेत कसा टपकला नाही ह्याचे आश्चर्य वाटते. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आधी एका धाग्यात सांगितल्याप्रमाणे मी MP मधली एक सख्ख्या भाउ बहीणीचं लग्न+मुलं अशी केस ऐकली आहे. अर्थातच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते.
माझं याबाबतीत वैयक्तिक मत अदितीप्रमाणे आहे. त्यातल्यात्यात अधीक खोलात जायचं म्हणलं तर मी भाउ बहीणचं नातं जास्त ओपनली एक्सेप्ट करु शकेन, वयातला फरक कमी असल्याने.. जर वयात खूप जास्त फरक असेल तर मला इतर लीगल नातीही एक्सेप्ट करायला अवघड जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊ-बहिणीच्या नात्यातही मुलं झाली आणि त्यांच्यात काही गुणसूत्रीय विकार असले तर त्याची जबाबदारी आई-वडलांवरच येणार. जबाबदारी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असाही प्रश्न या बाबतीत येऊ शकतो. सोसायचं ते शेवटी त्या मुलांनाच सोसावं लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सख्ख्या नात्यात गुणसुत्र विकाराचे 'चान्सेस' जास्त असतात.. विकार असतीलच असं नाही.. आणि विकार असलेली मुलं लीगल नात्यात पण होतातच की.. इथे ऐसीवरच कोणीएकाने म्हणल्याप्रमाणे लग्नाचा उद्देश फक्त मुलं जन्माला घालणे नसतो.
या MP च्या केसमधे मुलं व्यवस्थित होती. फार डिटेल्स माहीत नाही पण त्या मुलांचं वय आता ३०च्या आसपास असेल. मला वाटतं त्याच गावात राहण्याऐवजी ते कुटुंब दुसर्या ठिकाणी रहायला गेलं असतं आणि आमचे कोणी नातेवाईक नाहीत किँवा एका लग्नाच्या वरातीत बसला अपघात होउन मेले सगळे असं सांगितलं असत तर त्या पुर्ण कुटुंबासाठी आयुष्य थोडं सुखकर गेलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा मुद्दा महत्वाचाअ आहेच. जे जीव येउन त्यांना मनःस्ताप होण्याची खात्री आहे; त्यांना इथे आणणं अनैतिक वाटतं.
.
बादवे; अपत्य होणार नाहितच ह्याची खात्री असेल तर?(भारतात काही थोर धार्मिक घरात एक्-दोन मुले झाली की लागलिच ती "अपवित्र पिशवी"च (कित्येकदा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध)काढून टाकतात. उगाच शिवाशिव आणि विटाळ चांडाळ नको म्हणून.)
जर कुणी तसे करुन घ्यायची तयारी दाखवली तर? (मला वाटते ह्यासठी तुमचा मूळ प्रतिसादच लागू होइल."ज्याची त्याची इच्छा" ह्या धर्तीवरचा. बरोबर का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

... कित्येकदा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध ...

यातच उत्तर आलं, नाही का?
जोपर्यंत 'विटाळ' येत रहातो तोपर्यंत स्त्रीचं आरोग्यही अनेक प्रकारे जपलं जातं. अनेकदा, बाळंतपणात होणार्‍या रक्तस्रावापासून स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी हिस्टरेक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) केली जाते. कधी अन्य काही कारणांमुळे डॉक्टरही असे सल्ले देतात. डॉक्टरांचा सल्ला साधारणतः त्रास न देणारे निरूपयोगी अवयव तसेच ठेवावे (अक्कलदाढा, अपेंडीक्स) असा असतो. त्यातूनही कोणी गळ्यात पडलंच तर अक्कलदाढा काढून मिळतात. गर्भाशयही काढलं. अक्कलदाढा कमी पवित्र आणि गर्भाशय अधिक पवित्र असं काही नसावं.

व्यक्तीस्वातंत्र्याच्या जोडीनेच जबाबदारी येते. जर आपल्या कृतीचे परिणाम फार वेगळे नसतील, (उदा केस कापणे) तर जबाबदारीचा प्रश्नही फार नसतो. भावंडांमधल्या लग्नांमधे विकारी मुलं जन्माला येण्याची शक्यता अधिक म्हणून जबाबदारीचा प्रश्न अधिक तीव्र. (जन्मजात विकार घेऊन जन्माला येण्याची शक्यता नात्याबाहेरच्या संबंधांमधेही शून्य नसतेच.)
भावंडांचे आपसांत शरीरसंबंध हा नॉर्म असावा असं दिसत नाही. संबंधित व्यक्तींना स्वतःची समलैंगिकता जशी आपसूक समजते, तसं बहुदा भावंडांमधे शरीरसंबंध नकोत हे बहुदा समजत नाही. (लहानपणापासून शिकवलं गेल्यामुळे अशी भावना नसते.) तरीही अशा प्रकारच्या घटना घडण्याचं प्रमाण फारच विरळा. अशा तुरळक उदाहरणांवरून नियम बनवावेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. अगदी जवळची व्यक्ती अशी असेल तर तुम्हांला चालेल का?

होय. चालेल. या प्रकारच्या नात्यांना समाजात वावरताना काय अडचणी येऊ शकतील, त्याची छाया नात्यांवर पडणे कसे अपरिहार्य असेल - याची कल्पना त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न मी करीन. पण जर अशा नात्यात दोन सज्ञान व्यक्ती राजीखुशीने सहभागी असतील, तर मी त्या नात्याला पाठिंबाच देईन (असे काही घडलेच, तर तो भावनिक उद्रेकांवर मात करून तो मला देता आला पाहिजे). वर ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे माझ्या जोडीदाराने असे काही जाहीर केले, तर अतीव दु़:ख होईल, कारण माझ्या सुखावर थेट घाला येतो. काही प्रमाणात वैचित्र्य, घृणा वाटेल, कारण मी काही नात्यांची चौकट माझ्या डोक्यात मांडलेली असेल, तिला धक्का बसेल. पण तरीही त्याला माझ्यात रस उरला नसेल आणि चाललेल्या गोष्टी उभयपक्षी राजीखुशीने असतील, तर मला ते चालण्याचा व न चालण्याचा प्रश्नच कुठे येतो?

२. व्यक्तिस्वातंत्र्य कुठल्या टोकापर्यंत ठीक आहे?

जोवर दुसर्‍या सज्ञान व्यक्तीचा कोणताही कायदेशीर हक्क हिरावला जात नाही, तोपर्यंत.

३. अपत्यसंभवाबद्दलः

अपत्यसंभवात दोष असू नयेत, म्हणून सगळ्याच संस्कृतींमधून या विषयाबाबतचं कंडिशनिंग पुरेसं आणि पुरेश्या तीव्रतेनं केलं जातं. त्यामुळेच आपल्या मनात वैचित्र्य, घृणा यांसारखे भाव येतात. कायद्यानेही अशा संबंधांतून होणार्‍या अपत्यप्राप्तीला प्रतिबंध केला जावा, संबंधांना नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मन यांना पडलेले प्रश्न हास्यास्पद आहेत असे मी (सकारण) म्हणतो.

मुळात मन यांनी त्यांना जे वाटते* ते का वाटते याचे स्षटीकरण लिहावे. मग त्यावर चर्चा करता येईल. उद्या कोणीही येऊन कशालाही माझे हे मत आहे, तुमचे त्यापेक्षा वेगळे का आहे असे विचारेल, त्याला काही अर्थ नाही.

*उद्धरणे उपरोक्त प्रतिसादातून (प्रश्न कंसात)
१. मला चालणार नाही. (का?) २. सहानुभूतीने पाहिन त्या व्यक्तीकडे (का?) ३. बहुदा मी हेच म्हणेन. (का?) इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ठीकय. सोप्या भाषेत मूळ प्रश्न पुन्हा विचारतो.
incest विरुद्ध जगभरात कायदा आहे. तो बदलावा असे तुम्हाला वाटते का?(गे विरुद्धाचा कायदा काही ठिकाणी बदलण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर ह्याही बाबत कायदा बदलावा का.)
(अमुक अमुक प्रचलित कायदा जर सार्वत्रिक आहे; तर त्या मागची वेगळी बैठक मांडली नाही तरी चालून जावी इतपत प्रचलित असते.)
कायद्यापेक्षा वेगळे तुम्ही बोलत असाल तर तुमची भूमिका काहीतर्री वेगळी; रोचक ठरते. म्हणून तुम्हा मंडळींचं मत जाणून घ्यावं म्हटलं.
सध्या ज्या दृष्टीकोनातून हे उचित समजलं जात नाही; तीच प्रस्थापित भूमिका माझी समजावी. मला विशिष्ट शाब्दिक रचना करुन ते सगळे थोपवणे जमेलसे वाटत नाही. पण तुमचं मत सांगितलत तर बरं होइल.
(उदा:- साठेबाजीविरुद्ध कायदा आहे. काही अर्थशास्त्री तो कायदा रद्दच करायची मागणी करतात. किंवा वेश्या वृत्तीविरुद्ध काही ठिकाणी कायदे आहेत जगात; त्याअमागची भूमिका आधीचीच प्रचलित आहे. त्याविरुद्ध जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची भूमिका वेगळी ठरते. अर्थात ही फक्त उदाहरणे. अगदि गे सुद्धा उदाहरण होते., त्यामुले तेही डिफेंड करीत बसत नाही.मूळ प्रश्न सध्याचा प्रश्न फक्त जगात सर्व प्रमुख कायद्यात त्याज्य ठरलेल्या गोष्टीबद्दल आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारतात इन्सेस्ट इलीगल नाही. माझ्यामते करुही शकणार नाहीत. 'मामे, आते, चुलत, मावस भावंड चालतात आणि फक्त सख्खे चालत नाहीत' हे कसं कायद्यात बसवणार? आणि सावत्र भावंडांच काय? की तिथे एक पालक कॉमन आहे म्हणुन विरोध करायचा. पण तेच पालकाचे भावंड असेल तर चालतं? मग सरळ 'खाप'चं ऐका ना एका गोत्रात लग्न केलं की तो इन्सेस्ट. ही लिँक पहा
en.m.wikipedia.org/wiki/Laws_regarding_incest
माझ्या माहीतीनुसार भारतात वेश्याव्यवसाय देखील इलीगल नाही. पिँपीँग आणि ब्रॉथेल इलीगल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

incest विरुद्ध जगभरात कायदा आहे. तो बदलावा असे तुम्हाला वाटते का?(गे विरुद्धाचा कायदा काही ठिकाणी बदलण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर ह्याही बाबत कायदा बदलावा का.)
(अमुक अमुक प्रचलित कायदा जर सार्वत्रिक आहे; तर त्या मागची वेगळी बैठक मांडली नाही तरी चालून जावी इतपत प्रचलित असते.)

कायदा ठेवावा का बदलावा ह्यावर चर्चा करणार्‍यांनी आपली बैठक मांडायला हवीच. पुर्वी जगभरात दलितांना/मागासवर्गियांना/अल्पसंख्यांकांना "कायद्याने" हक्क नव्हतेच. स्त्रीयांना मतदानाचे हक्क नव्हते वगैरे वगैरे. त्यावेळी कायदे बदलताना दोन्ही बाजूंनी आपली बैठक मांडली होतीच. तुमच्या प्रश्नाची उत्तरं माझ्यासाठी खूप सोपी आहेत, पण तुमच्या ज्या काही धारणा आहेत त्या चूक की बरोबर हे चर्चा करणे महत्त्वाचे. त्या मांडा त्यावर चर्चा करायची तयारी आहे.

कोणाचे मत काय आहे यापेक्षा त्याचे मत तसे का आहे याला माझ्यामते जास्त महत्त्व आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फक्त सुधारणा आणि काही प्रमाणात शिक्षा बघेन ...
राज्यव्यवस्थेचा डायरेक्ट न्याय अवघड आहे पण काही प्रमाणात टेक्नोलॉजी द्यायला लावीन, त्यांनी development मध्ये लक्ष घातले नाही, किंवा इतर काही ठिकाणे ज्यात योग्य राज्यकर्त्याने चांगले काम केले असते आणि त्यांनी गंडवून ठेवले आणि भारताला थोड्या फार प्रमाणात मागे ढकलले गेले
ग्राहकांच्या नकळत आणि कंपनीच्या नकळत २ वेगळे भाग होतील,
१) कंपनीला माहिती आहे आणि ग्राहकांना नाही -
ग्राहकांना माहिती नं देता असे केला गेल तर लायसन्स रद्द, आणि दंड ..
(किती वेळा झालंय, किती केसेस आहेत वगैरे तथ्ये बघून)
२) जर का कंपनीच्या पण नकळत असेल, व्हेज पेकिंग मध्ये नॉन व्हेज तर अपवादात्मक म्हणून ताकीद देवून सोडून देईन
तिसरी केस एका डॉक्टरने पेशंटची चुकीची दाढ काढली आहे., योग्य काळजी नं घेतल्या बद्दल ताकीद आणि पेशंटला संपूर्ण फी माफ, या पलीकडे काही नाही. परत असे घडल्यास दंड आणि अजून एकदा-दोनदा झाले तर लायसन्स रद्द..

संपूर्ण न्याय कल्पना आहे तो कधीच शक्य नाही , बळी तो कान पिळी हा फार जुना नियम आहे..तो बदलणे शक्य नाही..आता एखाद्याला जन्मानेच प्रचंड पैसा मिळतो आणि एखादा गरीब घरात जन्मतो आता हा गरीब पोरावर अन्यायच झाला ना.. (पहिली केस याच्याशी समांतर म्हणून बघता येईल काही प्रमाणात मदत दिली जाऊ शकते इतपतच, पण मानसिकता आणि नैतिक ताकद कुठून आणणार ? प्रत्येक जण वेगळा आहे त्याच्या कल्पना पण वेगळ्या असणार हे पण गृहीतच आहे म्हणा )
हलगर्जीपणाचे चटके ज्याच्याकडे ताकद नाही त्यालाच बसतात, आणि बसणारच..ताकद मिळवूनच या पुढे जाता येतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>१) कंपनीला माहिती आहे आणि ग्राहकांना नाही -
ग्राहकांना माहिती नं देता असे केला गेल तर

समजा जैन ग्राहकांना कांदा वर्ज्य आहे असे मामलेदार मिसळवाल्याला ठाऊक नाही (ठाऊक असण्याचा प्रश्न नाही) आणि त्याच्या मिसळीच्या रस्श्यात कांदा असतोच. पॅकेज्ड उत्पादन नसल्याने मिसळीच्या तर्रीत काय काय आहे हे ग्राहकांना सांगण्याचे बंधन नाही. अशात जैन ग्राहकाने मिसळ खाली तर "ग्राहकाला माहिती न देता कांदा वापरला" हे आर्ग्युमेंट कितपत लागू आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरे तर मी इथे मॅकडोनल्ड्स किंवा केएफसी सारख्या कंपनीचा विचार केलेला, आणि व्हेज-नॉन व्हेजचा तो लाल/हिरवा ठिपका असणे महत्वाचे आहे, म्हणजे ग्राहकाला समजेल की खातोय ते व्हेज आहे नाही.

"ग्राहकाला माहिती न देता कांदा वापरला" हे आहेच तसेच "ग्राहकाने माहिती नं घेता मिसळ खाल्ली हे पण आहेच नं."

प्रत्येक मिसळवाला तशीच मिसळ बनवतो त्यामुळे असे कस्ट्मायझेशन ही त्या जैन ग्राहकाचीच जास्त जवाबदारी आहे असे वाटते.

कोसलामधलं "आम्लेट खाऊन झाल्यावर ते अंड्याचे असते हे कळाले" असे काहीसं वाक्यं आठवलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा जैन ग्राहकांना कांदा वर्ज्य आहे असे मामलेदार मिसळवाल्याला ठाऊक नाही (

शिवाय समोरचा ग्राहक जैन आहे हेही ठाऊक नसण्याची शक्यता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा संदिग्ध वाटतो. न्याय कुणी मागत आहे का व कोण यावर न्याय करणे बहुतांश अवलंबून आहे.
उदा.
१. "ब्रिटिश" या राज्यव्यवस्थेने भारतावर पूर्वी केलेल्या कब्जाबाबत आज न्याय करायचा आहे.
हा न्याय तत्कालीन पिडीत जर मागत असतील तर त्यांची अपेक्षा 'न्याय' म्हणजे काय आहे (नुकसानभरपाई ? किती ? कोणत्या स्वरुपात ? ) हे जाणून घ्यावे लागेल.

२. एखाद्या मल्टिनॅशनल स्नॅक कंपनीने भारतीय ग्राहकांना नकळत गायीचं मांस खाऊ घातलं आहे.
इथे नकळत म्हणजे कसे हे स्पष्ट व्हावे लागेल. म्हणजे पदार्थाच्या पॅकिंगवर नोंद आहे का ?, कंपनीला निषिद्धतेची जाणीव आहे का इ बाबींवर न्याय अवलंबून राहील.

३. एका डॉक्टरने पेशंटची चुकीची दाढ काढली आहे.
इथे अपराध सिद्ध झाला आहे. याबाबत मी असा निर्णय देईन की डॉक्टरने काढावयास हवी असलेली दाढ फी न घेता काढून द्यावी तसेच चुकीच्या दाढेच्या जागी कृत्रिम दाढ विना मोबदला बसवून द्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा संदिग्ध आहे हे कबूल. पण म्हणूनच वाचकाला आपल्या मनातले विचार व्यक्त करायला मोठा स्कोप राहिला आहे. अमुक या चाकोरीतच विचार ऐकण्यात रस आहे असं म्हणून धागा काढला तर मर्यादा पडेल.

शिवाय माझा उद्देश असा आहे की "न्याय मिळाला पाहिजे", "शिक्षा झाली पाहिजे", "सूड घेतला पाहिजे" असे विचार आपल्या मनात नेहमी येतात. पण प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्ष "न्याय" या गोष्टीची काय कल्पना आहे? तसा न्याय करण्याची वेळ आली तर आपण काय पाहू आणि काय निर्णय घेऊ? हे व्यक्तिसापेक्ष उत्तरच अपेक्षित होतं आणि आहे (प्रचलित कायद्याने काय कारवाई करता येईल या प्रकारचा प्रश्न नाहीये). तुम्ही घटनाकारही बनू शकता.

बरीच उत्तरं अत्यंत उत्तमरित्या हा उद्देश पूर्ण करणारी आहेत. खूप जणांनी उत्तरं दिली म्हणून आनंद झाला आहे.

एखाद्या गुन्ह्याविषयी बातमी वाचली की आपल्या मनात बर्‍याचदा या गुन्हेगाराला काहीतरी जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे असा विचार येतो. इथल्या संदिग्ध प्रश्नांचा उद्देश हाच की तुमच्याशी थेट संबंध नसलेल्या (ऑब्जेक्टिव्ह) घटनांबाबत न्याय करायचा झाला तर कोणत्या प्रकारचा न्याय कराल (शिक्षा, माफी, भरपाई..)

उदा. ब्रिटिश राज्यकर्त्यांविषयी न्याय करायचा तर "आर्थिक भरपाई"ला मुख्य प्राधान्य असेल की असंख्य देशभक्तांचे बळी गेले त्याबद्दल केवळ माफीपत्र असेल.. की ते मृत्यूही भरपाईवजा न्यायात धरले जातील आणि आर्थिक भरपाईत कन्व्हर्ट होतील? ब्रिटिशांवर "हल्ला" करुन त्यांचा पाडाव करावा (हास्यास्पद वाटलं तरी) हा न्याय होईल की आता झालं ते झालं.. आमची लॉस्ट अपॉर्च्युनिटी भरुन द्या.. असं म्हणता येईल? पाकिस्ताननिर्मिती, दंगली आणि अन्य काही गोष्टी या "ब्रिटिश राज्याच्या कॉन्सिक्वेन्शियल डॅमेज म्हणून धराव्याश्या वाटतील का एखाद्याला? की त्यांनी दिलेल्या सुविधा आणि आणलेली प्रगती हा एक जमेचा भाग धरला जाईल..?

डॉक्टरने चुकीची दाढ काढली आहे या उदाहरणात, "अन्य" कोणाचीतरी चुकीची दाढ कोणा "अन्य" दंतवैद्याने काढली आहे. इथे माझे थेट हितसंबंध नाहीत. अशा वेळी डॉक्टर हे नोबल प्रोफेशन आहे म्हणून त्याला संशयाचा फायदा द्यावा असं कोणाला वाटेल, की प्रौढ व्यक्तीची दाढ "गेली" की परत उगवत नाही, तेव्हा डॉक्टरने कृत्रिम दाढ फुकट बसवून द्यावी (जे मूळ ट्रीटमेंटपेक्षा जास्त खर्चिक आहे) आणि वरुन मनस्तापाची भरपाई घेऊ नये, कारण डॉक्टरचा अशी चुकीची दाढ काढण्यात काही व्यक्तिगत फायदा नाही...

या निमित्ताने एकूण मॉरल्सवर चाललेली चर्चाही रोचक आहे आणि मूळ विषय ओपन एंडेड असल्याने तो भरकटला आहे असंही म्हणता येणार नाही. उलट माझ्या फिसकटलेल्या रंगाच्या रेघोट्यातून चांगल्या चर्चेचं चित्र तयार झालं हे आनंददायकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याशी संबंधीत न्यायदान काय काय असेल ते वाचायला म्हणून आलो होतो. इकडे तर आपण किती ज्ञानी, समतोल बुद्धीचे, नवीनतेची ध्यास असलेले (अर्थात, सर्व (मुर्ख) समाजाहून भिन्न असलेले अवलिया आहोत) वैग्रे वैग्रे दाखवण्याचीच स्पर्धा चालू दिसली.

बाकी आमचे न्यायदान शिंपल आहे. :-

१. "ब्रिटिश" या राज्यव्यवस्थेने भारतावर पूर्वी केलेल्या कब्जाबाबत आज न्याय करायचा आहे.

बाहेरुन येऊन ब्रिटिशांना इथे राज्य करु दिल्याबद्दल त्या काळातले जेवढे कोण जिवंत असतील (त्याकाळी त्यांचे वय १०+ असणे गरजेचे)त्यांना तोबताबड नोटिसा पाठवणे आणि जाब देण्यास फर्मावणे. तसेच ते दोषी आहेत हे आगोदरच सिद्ध झालेले असल्याने (त्यातील काही क्रांतीकारक असतील देखील, पण त्यांचे प्रयत्न कमी पडले असे सुनवावे.)त्यांना दोन दोन रट्टे हाणावेत आणि माफीनामे लिहून घ्यावेत. सदर माफिनामे लॅमिनेशन वैग्रे करुन राणीला पाठवून द्यावेत.

२. एखाद्या मल्टिनॅशनल स्नॅक कंपनीने भारतीय ग्राहकांना नकळत गायीचं मांस खाऊ घातलं आहे.

अशा कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला, कर्मचार्‍यांना तसेच संबंधीत सर्व लोकांना वरण-भात (तूप आणि लिंबू क्षमस्व) खायला घालावा आणि हात धुवायला पाणी देऊ नये.

३. एका डॉक्टरने पेशंटची चुकीची दाढ काढली आहे.

ताबडतोब डॉक्टरच्या उजव्या कानफाडात दाढ पडेल येवड्या जोरात मारावी. 'उजवीकडे मारले तरी उजवीकडचीच दाढ कशी काय पडली?' असे विचारुन माफी मागून मग डावीकडे एक हाणावी.

ह्या शिक्षांवरती कोणी गदारोळ केल्यास, आपण आंतरजालावरती निवासी संपादक आहोत असे सांगून वेळ मारून न्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

पैसा वसूल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत.. धागा वसूल.. Smile

बादवे: प.रा. यांच्या आजपर्यंतच्या "हलकट"पणाबद्दल काय न्याय करावा आणि त्याची वसुली कोणत्या विभागाच्या "हद्दीत" बसून करावी असा विचार मनात येतो आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे देवा.. या माझ्या प्रतिसादाला कोणी "माहितीपूर्ण" श्रेणी का बरे दिली असावी??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. ब्रिटिश - या बाबतीत मला थत्तेंचं खान वि. भोसले हा युक्तिवाद पटत नाही. ब्रिटिशांनी पद्धतशीर शोषण केलं. त्यामुळे जी भारताची पीछेहाट झाली ती भरून काढण्यासाठी ब्रिटिशांकडून काही प्रयत्नांची मी अपेक्षा ठेवेन. हे काहीसं उच्चवर्णियांनी दलितांना दिलेल्या वागणुकीसारखं आहे. जे व्यक्तिगत अपमान झाले, त्या बाबतीत खान वि. भोसले युक्तिवाद लागू पडतो. पण एक समाज म्हणून अशिक्षित व दरिद्री करण्यात आलं, त्याची भरपाई म्हणून भारतीय घटनेत दलितांचे हक्क राखण्याचा, आणि राखीव जागांमधून आजच्यस व पुढच्या पिढ्यांतली दरी कमी होईल याचा प्रयत्न झाला. न्याय म्हणून मी तशा काहीतरी सुविधा व आर्थिक मदतीची अपेक्षा करेन.

२. गायीचं मांस - यात 'नकळत' या शब्दाचा अर्थ नक्की स्पष्ट नाही, त्यामुळे न्याय करणं कठीण आहे. खरोखरच प्रामाणिकपणे नकळत झालं का, याची कसून तपासणी करावी लागेल. म्हणजे ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या कंपनीवर असेल. कारण मिसळ बनवणारा कोणीतरी आणि एखादी मल्टिनॅशनल कंपनी यांमध्ये फरक आहे. मोठ्या कंपनीला जी गुडविल असते तिचा प्रचंड फायदा होतो. मॅकडॉनल्ड्स वगैरे नाव पाहून एक विशिष्ट क्वालिटीची खात्री असल्याने तिथे अनेक ग्राहक जातात. त्यात 'या पदार्थात गायीचं मांस नाही' असं जाहीर केलेल्या पदार्थात जर सापडणार नाही या विश्वासाचा भंग होतो.

३. डॉक्टरने काढलेली दाढ - डेंटिस्टचे जसे दाढ काढण्याचे दर ठरलेले असतात तसे एव्हाना चुकीची दाढ काढली तर किती कॉंपेन्सेशन द्यायचं याचेही दर ठरलेले असतील असा माझा अंदाज आहे. नवीन कृत्रिम दाढ बसवून घ्यायला जितका पैसा, वेळेचा अपव्यय होईल त्याच्या सुमारे दुप्पट कॉंपेन्सेशन मिळावं. या बाबतीत 'यंत्रणेतल्या अपरिहार्य काही चुका' म्हणून स्वीकारून हा निव्वळ पैशांचा व्यवहार व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. ब्रिटिश - या बाबतीत मला थत्तेंचं खान वि. भोसले हा युक्तिवाद पटत नाही.
नेपोलिअनने १७९० ते १८१२ ह्या काळात जबरदस्त युद्धखोरी करुन आख्ख्या युरोपभर मोहिमा काढल्या.(शार्लमान नंतर जवळपास इतका सलग युरोपिअन भूभाग त्यानेच कमावला असेल.)
पण त्यानं स्वतःचे सैन्य गमावण्यापूर्वी रशिया, इजिप्त ह्या देशांत जो काय धुमाकूळ घातला की विचारु नका.
तर क्षतिग्रस्तांनी भरपाई मागावी काय?(फ्रेंच आजही नेपोलिअनला त्यांच्या आकांक्षांचं आणी अस्मितेचं प्रतीक मानतात. )
.
बाराव्या शतकात मंगोल चंगेझ/चेंगीझ्/चेंगीज खान ह्यानं ट्रान्स्नोक्शिअन पठारापासून ते पर्शियामेन लॅंड पर्यंत जी काही कत्तल सुरु केली त्यास इतिहासात तोड नाही. अक्षरशः दिवसरात्र खाटिकखाना चाले. कुठल्याही संहारक असत्रांशिवाय, किंवा विषारी वायू शिवाय त्यानं बहुसंख्य इराणी कापून कआधले. किती कापले? तर त्यानं बाराव्या शतकात कत्तल सुरु करताना जितके लोक होते, तितकी लोकसंख्या पुन्हा इराणची होण्यासाठी पुढील सातशे वर्षे लागली!! हा एक जागतिक विक्रम आहे. इराण्यांनी मंगोलांना नुकसान भरपाई मागावी का? किती मागावी?
.
भारत्-युरोप इथल्या हूणांचेही असेच.
.
थोडक्यात गविंनी जर प्रश्न अजून हजार वर्षांनी विचारला जात आहे असं म्हटलं तर तुमचं उत्तर हेच राहिल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याच प्रकारे, देवळे-विद्यापीठे, इ. उद्ध्वस्त करण्याबद्दल भरपाई मागावी काय? त्याचा बदला काशी-मथुरेच्या रूपाने घ्यावा काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्रोलिंग.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणजेच प्रचंड प्रमाणावर झालेल्या अन्यायावर / संहारावर न्याय हा N.A. (नॉट अ‍ॅप्लिकेबल) ठरतो का?

न्याय मागण्यासाठी मूळ अन्यायही एका "स्केल"च्या आत पाहिजे आणि एका हद्दीत / मर्यादेत पाहिजे..

(काहीसं पुलंच्या अंतू बर्व्याच्या: "अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत !" या वाक्यासारखं..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी....असे कोणी म्हटले की मग इर्र्याशनल वैग्रे म्हंटात, पण तसे का असावे हा एक प्रश्न आहेच. लैच मोठ्या अन्यायासाठी तितकीच किंवा पासंगाला पुरणारी भरपाई मागितली तर काळाची भिंत वैग्रे मुद्दे येऊ नयेत खरेतर.

आणि मनोबा, ही ट्रोलिंग नैये, खराच प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देव्गळे वगैरेंकडे त्रयस्थ नजरेने पाहता येणे शक्य आहे का?
नाहीतर इथेही एका धमाल स्थळासारखं देवळं हा शब्द पाहिला के लागलिच पुढील अवतरणे येण्याची धास्ती वाटते:-"हाड थू तुम्ही हिंदुत्ववादी" ....
"जारे जा काँग्रेसची चाटा "....इथून वादावादी सुरु होत होत
"श्री अमुक अमुक हे ज्येष्ठ मंत्री त्यांचा आवाका पाहता असे म्हणणे शक्य वाटत नाही"....
"खरं तर सगळा दोष मिडियाचा आहे"...
"आपण सारे मतदान करत नाहित तोवर देश सुधारणार नाही"
"स्त्रियांचं ह्या देशात हेच होणार. मी आपली बरी बै बाहेरच."
"कमोडचा आकार चौकोनी नसणं मानवी उत्क्रांतीचं लक्षण आहे"
"डुकराचे शेण ब्राम्हमुहूर्तावर कुत्र्याच्या सडलेल्या मांसासोबत खाल्ल्यास अष्टमीस धनलाभ निश्चित. आम्हाला अनुभवच आलाय तसा!"
"मुळात लहान मुलांची काळजी अशी घेउ नये. त्यांना थंड वार्‍याचा त्रास होतो"
"भारताने अग्नी ५ची लांबी ५ नव्हे ५० हजार मैलांची ठेवली आहे. आणि ही महासत्ता उद्या अग्निबाण सोडून सूर्यच नष्ट करणार आहे! आहत कुठे?"
" जागतिक अर्थव्यवस्थेत तरलतेची नितांत आवश्यकता आहे"
.
ह्या सर्वांचा आपसात काही संबंध नाही आणि मनोबा किमान पाच पन्नास तांबे भरुन तीर्थप्राशन केल्यावर हे लिहितोय असे वाटेल. बिलिव्ह मी, ह्यात एकही आतिशयोक्ती नाहिये. "देवळे, काशी-मथुरा" ह्या शब्दांचं ह्या जालावर पोटँशिअलच तेवढं आहे बाबा. काहीही कुठेही नेउन बसवणारा जालिम पॉइंतर आहे तो.
म्हणून विषय ताळ्यावर ठेवायचा असेल तर वो छोड के बोल , भाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तो एक पॉइंटर आहे फक्त. आणि इथली पब्लिक मॅच्युअर आहे तितकी. ट्रोल असले तरी चर्चा भरकटणार नाही याची खात्री असल्यानेच मी म्हणतोय तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमची मागणी न्याय्य आहे. जितांविरुद्ध जेत्यांनी असेच केले पाहिजे. इतिहासच सांगतो तसे करायला. १५२७ मध्ये बाबरने हेच केले होते. आणि तसे पुन्हा करता येते हे १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडून कळालेले आहेच. ठीकच आहे. जरी २००० लोकं मेली नंतर त्यामुळे पेटलेल्या हिंसेत पण न्याय मिळाला हे बरे झाले. हितांचे रक्षण झाले. आपल्या देशावरील मुसलमानी अंमल संपला आहे. पण त्यांची वंशावळ शिल्लक आहे ना अजून. तीच लोकं मुसलमानी साम्राज्याची वारस समजून न्याय त्यांच्याकडून वसूल केला गेला पाहिजे. काशी,मथुरा इथे न्याय मिळवायचा बाकी आहे. तिथेही चला. अजून १०००० लोकं मरतील फारतर पण चालतील की. तिथलं झाल्यावर चारमिनार वैगेरे असंख्य स्थळी न्याय मिळवायला तयार राहूच . मी तर म्हणतो जेवढया स्त्रिया नासवल्या गेल्या मुसलमानी राज्यात त्याचा नीट ऐतिहासिक अभ्यास करून नेमक्या तितक्या स्त्रिया मुसलमानी वंशावळीतून नासवाव्या म्हणजे न्यायाचे थोर राज्य अधिक प्रतिष्ठा पावेल. बलपूर्वक बाटवलेल्या लोकांना पुन्हा बलपूर्वक बाटवून घ्यावे म्हणजे हिशेब बरोबर होईल. काळाची भिंत न्याय मिळवतांना कोठेच बाधक ठरू नये. झालेल्या अन्यायाच्या पासंगाला पुरणारा नाही तर योग्य म्हणजे पुरेपूर न्याय मिळवावा त्यात अजीबात हयगय नको. पुन्हा १०००-५०० वर्षात मुसलमान जेते झाले की त्यांनीही परत न्याय घ्यावा. त्यानंतर १०००-५०० वर्षे झाली हिंदू जेते झाले की परत न्याय मिळवावा. कालचक्र फिरत राहील असेच. वाईट काय त्यात. मध्ययुगीन राज्यव्यवस्था हि सगळ्यात न्याय्य व्यवस्था होती. ती टिकलीच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच जालियनवाला हत्याकांडाबद्दल ब्रिटीश पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त करून न थांबता माफी मागावी ही मागणी ठीक वाटते.

---

यू.एस.एस.आर.मधून वेगळ्या झालेल्या लिथुआनिया (का लातव्हिया)ने आताच्या रश्यन फेडरेशनकडून, दुसर्‍या महायुद्धकाळात केलेल्या अन्याय, अत्याचार, नासधुशीची भरपाई मागितली होती. भारत-ब्रिटन संबंधातही असं करता येईल. भारतात झालेल्या मुस्लिम आक्रमणांबद्दल असं म्हणता येईल का? ते आक्रमक बाहेरचे म्हणून आले आणि शेवटी इथेच राहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थोडक्यात किती व कशी नुकसानभरपाई म्हणजे न्याय? अशी चर्चा चालू आहे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला त्याहून अधिक प्रश्न आहेतः-
गुन्हा कोणता आणि चूक कोणती? की असे अद्वैतच अस्तित्वात नाही?
गुन्ह्याचं वय कधीपर्यंत व्हॅलिड असतं?
कुणी करावे आणि कुणी भरावे?(किती पिढ्यांनी)
नुकसानभरपाई देणे हा एक भाग. पण "शिक्षा" करण्याचं काय? ती कुणाला आणि किती करणार? कुठल्या परिस्थितीत करणार? माफ करणार का? कुठल्या निकषावर करणार?
शिक्षा शारिरिक इजा करणारेच असावी का? ती प्रत्यक्ष नुकसानदायकच असावी का?
मुळात गुन्ह्याला शिक्षा की चुकीला शिक्षा?
(मुळात चुकीला माफी मिळावी पहिल्यांदातरी ; ह्या मताचा मी आहे. पण चूक कोणती हेच ठरवणं प्रचंड अवघड आहे. अवांतर :- कित्येकदा सिनेमात तरुण- तरुणींकडून म्हणे "चूक" होते. आणि थोर भारतीय परंपरेनुसार त्याची फळे त्या तरुणीस भोगायची वेळ येते. तर हे विवाहपूर्व असे-तसे काही करणे मुलात चांगले की वाईट वगैरे दोन मिनिटे बाजूला ठेवूयात. आपण परंपरेनुसार ते वाईटच आहेत असे समजू. तसे असेल तर ती चूक नव्हे; तर ते दुष्कृत्य आणि नैतिक गुन्हा ठरत नाही का? "चुकून चालताना धक्का लागला " हे ठीक वाटतं ऐकायला. पण "आम्ही अधून मधून जाता येता काही दिवस चुका करीत बसलो होतो" हे विचित्र वाटत नाही का? "चूक झाली . सोडून द्या" असं म्हणणं ह्या केसमध्ये त्यामुळेच विचित्र वाटतं. "मुळात ते तसं करण चूक नाहिच्च" असं कुणी म्हटलं तर गोष्ट वेगळी. तो वेगळा मुद्दा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ब्रिटिश कब्जाच्या अनुरोधाने काही इतिहास पाहिला तर चांगले होईलसे वाटते.

भारताचे साम्राज्य मिळवणे/वाढवणे ही एक फेज होती आणि १८५७ च्या उठावानंतर दुसरी फेज होती.

पहिल्या फेजमधील अ‍ॅक्टर ब्रिटन हे राष्ट्र नव्हते तर एक खाजगी कंपनी होती. (त्या कंपनीला पाठिंबा होता हे खरेच). त्या फेजमध्ये सुमारे इ स १७०० ते १८०० कंपनीने वेगवेगळ्या स्थानिक सरदारांशी/राजांशी वेगवेगळे करारमदार केले. करार करणार्‍यांनी ते राजीखुशीने (कोणत्यातरी तात्कालिक फायद्यासाठी) केले. करारांत वारसा हक्क कोणाचा हे ब्रिटिश ठरवणार असे कलम मान्य करण्यात त्या राजांची चूक झाली असेल. त्यासाठी आज ब्रिटन नावाच्या राष्ट्राला दंड करावा हे योग्य नाही.

पहिल्या फेजमधील कंपनीच्या वागण्याने असंतोष निर्माण होऊन काही प्रांतात करारांतील दुसर्‍या पक्षांनी करार मोडण्याचा- नाकारण्याचा एक मार्ग (रेमेडी) स्वीकारला. त्याकाळी आर्बिट्रेशन वगैरे काही नसल्याने खळ्ळ फटॅक हीच न्यायाची पद्धत होती. (तरीही काही जणांनी कंपनी विरोधात ब्रिटिश पार्लमेंट मध्ये गार्‍हाणी नेली. किती जणांनी गार्‍हाणी नेली आणि निकाल काय लागले याची काही कल्मना नाही).

पहिल्या फेजमध्येही भारत या प्रदेशाचे शोषण झालेच होते. ब्रिटनची औद्योगिक क्रांती इथून नेलेल्या संसाधनांनी फायनान्स केली असे माझे मत आहे. पण भारत देश अशी संकल्पना नसल्याने नुकसानभरपाई कोणी कोणाकडे मागायची हा प्रश्न आहे.

१८५८ मध्ये ब्रिटिश सरकारने कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारताचा ताबा स्वतःकडे घेतला. त्यानंतर भारताचे अधिकृत ब्रिटिश शोषण सुरू झाले. या शोषणाबद्दल नुकसान वगैरे काही विचार करता येऊ शकेल. कारण १८५८ नंतर भारत खर्‍या अर्थाने परतंत्र होता. परत यात शोषण जसे होते तसे फायदेही होते. म्हणजे कायदा सुव्यवस्था, शिक्षण वगैरे.

कॉम्पेन्सेशन कशाचे मागायचे हा प्रश्न आहे. दलित सवर्ण अ‍ॅनालॉजीत सवर्ण जी नुकसान भरपाई देत आहेत ती इन काइंड स्वरूपाची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोहिनूर चा निर्विवाद निवाडा ह्याच लायनीवरच्या गोंधळामुळे होत नसावा का?
तुलनेनं मकाउ बेटांचा, हॉम्ग्काँगचे हस्तांतरण फारच स्मूथली झाले.
कारण त्यात लिखित अक्रार होता. निश्चित टर्म होती. कोण कुणाला काय देतो आहे हे स्पष्ट होते.(दोन्ही बाजू ह्या state actor होत्या; अजच्या भाषेनुसारसुद्धा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दोन फेजेस, कंपनीशी करार वगैरे गोष्टी पटल्या. शुद्ध न्यायच करायचा त्यातले किती 'लादले' गेले होते वगैरे तपासून बघावं लागेल. अर्थात बळी तो कान पिळी हे तत्व 'तत्कालीन सार्वत्रिक म्हणून न्याय्य' असं म्हटलं तर सगळंच निकालात जातं.

एकंदरीत 'अन्याय झाला, पण मोबदला कोणी कोणाकडून मागायचा' ही तांत्रिक अडचणही मान्य आहे. त्या काळी भारत देश अशी आयडेंटिटी नसली तरी क्लास ऍक्शन सूट प्रमाणे मागे वळून पाहून त्या क्लासचं प्रतिनिधित्व आताच्या भारतीय जनतेला द्यायला माझी हरकत नाही. जर यदाकदाचित जागतिक सरकार झालं तर दलित सवर्ण पद्धतीच्या नुकसानभरपाईची मी अपेक्षा ठेवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>शुद्ध न्यायच करायचा त्यातले किती 'लादले' गेले होते वगैरे तपासून बघावं लागेल

बरोबर. तपासावं लागेल. नुकतेच इतरत्र झाशीची राणि इंग्रजांना ऑफर द्यायला तयार होती असे काहीतरी वाचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरा न्याय हा कधीच मिळू शकत नाही.
खुनी माणसाला फाशी दिली तरी ज्याचा खून झाला आहे वा त्याच्या नातेवाईकांना न्याय कसा मिळणार ? कारण मेलेली व्यक्ती परत आणणे कोणालाच शक्य नाही.
चोरी करणार्‍याला पकडून शिक्षा झाली तरी ज्याची चोरी झाली त्याला त्याचा ऐवज परत जरी मिळाला, तरी त्या प्रकरणात त्याला जो मनस्ताप होतो त्याची भरपाई कशी करणार ?
बलात्काराचेही तसेच आहे.
अशी कृत्ये करणार्‍याला जरब बसावी म्हणूनच न्यायदानाची पद्धत सुरु झाली असावी.
आपल्या देशांत तेही घडत नाही. न्यायाला विलंब म्हणजे अन्याय असे म्हणतात. (त्यामुळे आपल्या देशात तरी कोणाला कधी न्याय मिळू शकेल यावर विश्वास नाही.)

गविंच्या प्रश्नाबद्दलः १. ब्रिटिशांच्या बाबतीत न्याय करण्याची वेळ निघून गेली आहे.
२. कुठल्याही मोठ्या खाद्यान्न तयार करणार्‍या कंपनीत, चुकून दुसरा इनग्रेडियंट जाणे शक्य नसते. अशा केसमधे भरघोस भरपाई देण्याचा निवाडा करीन. यातही बसलेला मानसिक धक्का नाहीसा करता येणार नाही.
३. चुकीची दाढ काढणार्‍यालाही वरील प्रमाणेच न्याय देईन.

न्याय देताना 'सुधारणा' हा एकच निकष मानला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायदेवता आंधळी असते असे म्हणतात ते उगीच नाही तर! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0