बैठक

लावणीची बैठक सिनेमात बघून, काही आंबट शौकिनांच्या गप्पातून आणि थोडीफार पुस्तकातून माहित होतीच. मध्यंतरी प्राध्यापक निवड समितीवरील सन्मानणीय प्राध्यापक सदस्यांनी उमेदवार निवडी बाबतची कार्यवाही यशस्वी रित्या चोख बजावल्याने, त्यांच्या बैठकीच्या ईच्छापूर्तीची अवघड जबाबदारी , यशस्वी उमेदवार आणि सदर यशामागील, प्रभावी सुत्रधार प्राध्यापक महोदयांवर येऊन आदळली. सुत्रधार प्राध्यापक महोदय मला 'जस्ट डायल' सर्व्हिस समजत असल्यामुळे , आमच्यात तासाला दहा या हिशोबात फोनाफोनी झाली आणि पुणे परिसरातील धानोरी, शुक्रवारपेठ, सनसवाडी इथे असलेल्या ठावठिकाण्यांचा सुगावा माझ्या एका पत्रकार मित्राकडून दोन तासाच्या अथक परिश्रमात लागला. आणि पत्रकार मित्रासह सात लोकांचा ताफा एका लोककला केँद्रावर पोचला.
१५ गट असलेलं कलाकेँद्र. प्रत्येक गटात पाच ते सात बायका , प्रत्येक गटात जाऊन बायका पाहून गट निवडण्याची विनामोबदला सोय. कलाकेँद्र म्हणजे पिव्वर वेशीबाहेर वसलेल्या वस्तीची कळा असलेलं ठिकाण. कोल्हाटी समाजाच्याच बायकांचा तुडूंब भरणा. त्या एक तासाचे अठराशे रुपये घेतात. दोन तास लावण्या, फिल्मी गाणी यावर अश्लिल हावभावा सहीत माफक देहप्रदर्शन करत नृत्य सादर करतात. तिथे वारंवार जाणारी बडी धेंड , चिरा न उतरलेली एखादी कोवळ्या वयाची पोरगी हेरुन बोली लावतात. आणि ती रात्र साजरी करतात. तिथे नाचणारी प्रत्येक स्त्री कोवळ्या वयातून गेलेली असते. ती मुलगी नंतर इतरांसमोर नृत्य करत चिरा बोलीत प्रबळ ठरलेल्या बड्या धेँडाची (धेँडाचे नामकरण नंतर 'मालक' असे होते ) हक्काची त्याला हवी तेव्हा शय्या सोबतीन करणारी बाई रखेल काय वाट्टेल ते म्हणुन राहते. देहप्रदर्शन व विक्री काही अटींच्या आधिन राहून केली जाते.
गट निवडला आणि आत गेलो. गाणी चालू झाली. गटातली थोडी वयस्कर बाई जिला मामी म्हटलं जात होतं. जी आता नाचण्यास काबिल नाही. म्हणुनच ती केवळ गाणी म्हणते. गटातल्याच एखाद्या ताई बाईचा भाऊ ढोलकी बडवत असतो. दिवसभराच्या चार सहा बैठका करुन मामी ज्याम दमलेली असते. दम खात खोकला दाबत पह्यले तेरी आंखोने चूम लिया प्यारसे असं काय बाय म्हणत असते. कारभारी दमानं म्हणताना खरंच दमलेली असते. प्राध्यापक महोदय न जाओ संय्याच्या सुरुवातीला जवळ येऊन पायावर केस मोकळे सोडण्याचा जटील आग्रह एका लहानगीला करत असतात. कोवळी देखणी पोर खळण्या कपड्यातल्या अनपेक्षित वागण्याला भलतीच बिचकलेली असते. स्वतःला आयी मायीवरुन शिव्या देत मी मुतायच्या बहाण्याने बाहेर येतो. चायना मोबाईल वर गेम खेळणारी पोरं बघत राहतो. कधी उरकणार म्हणुन थोड्या वेळाने पुन्हा आत डोकावतो. गाणं थांबलेलं असतं. शाँटचा बंदोबस्त होईल काय ? ही आग्रही विचारणा आत गटप्रमुख महिलेकडे चालू असते. यशस्वी उमेदवार आणि सुत्रधार प्राध्यापक महोदय वैतागलेले असतात. समिती सदस्यांचा मोबाईल वाजतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रिंगटोन संवाद खंडीत करते. मी उल्ट्या होईस्तोर दारु प्यायला सज्ज होतो. आणि गाडीत वाट बघत निमूट बसतो.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (6 votes)

प्रतिक्रिया

मेघना तुला व्यनी केलाय

बाकी काहीचे अपेक्षित प्रतिसाद वाचून हसू सुध्या आले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

जरूर ती कृती आहे. पण इथं एक गडबड आहे. लेखक आधी अशा गोष्टींसाठीचा मध्यस्थ झाला आहे. लेखक त्यात फसवून गुंतलेला नाही. बुद्ध्याच त्याने हे काम केले आहे. त्यासाठी त्याच्या परिचयातील साधनस्रोतांचा उपयोग त्याने केला आहे. त्यामुळं त्याविषयी प्रश्न येतीलच.
मध्यस्थ झाल्यानंतर पापक्षालनार्थ वगैरे लेखन केले आहे, असा संशय घेण्यास लेखनातूनच जागा निर्माण झाली आहे. अर्थात, त्याचा अर्थ लेखकाने पाप केलेच आहे, असा नाही. तसा निष्कर्ष काढण्यासाठी आणखी काही प्रमाणे लागतील. मात्र ती जागा लेखनातून निर्माण झाली आहे हे नक्की.
मला वाटतं, 'कमला' या नाटकात अशा स्वरूपाच्या प्रश्नाची हाताळणी झाली होती. बातमीच्या सिद्धतेसाठी पत्रकार त्या स्त्रीला विकत घेतो, हे नैतीक आहे का, असा काही तरी प्रश्न असावा, असे अंधुकसे स्मरते.
वैयक्तिक लेखक जाऊ द्या. या प्रकरणात गुंतलेले हितसंबंध नेमके काय आहेत हा गंभीर प्रश्न आहे. निवड समितीवरील प्राध्यापक, त्यांच्या सोयीसाठी एक प्रभावी प्राध्यापक आणि त्याच्या हाताशी स्वतःचा आत्मटीकेच्या स्वरूपात 'जस्ट डायल' असा उल्लेख करणारा प्राध्यापक, मग त्यापुढे एक पत्रकार... हे हितसंबंध नेमके काय आहेत? त्या स्त्रियांचे शोषण हा मूळ लढ्याचा मुद्दा. त्यात अशा हितसंबंधांतून शोषणाची व्यवस्था निर्माण करणे हा त्या लढ्याला आणखी खोलात नेणारा मुद्दा. या हितसंबंधात नोकरी मिळणे हा एक भाग आहे. एखाद्याला ती नोकरी मिळवून देण्याचा (प्रभावी प्राध्यापकाचा प्रयत्न) हा एक भाग आहे. त्यानंतर तेथील आपले सारे वर्तुळ बिनछेद असावे अशा स्वरूपात केलेली 'जस्ट डायल' कृती आहे. व्यवस्था, व्यवस्था म्हणजे काय? हीच ती.
लेखकाचा प्रामाणिकपणा इतकाच की त्याला नंतर ओकेस्तोवर दारू प्यावीशी वाटली (इथे दारू लाक्षणीक आहे) हेही त्याने लिहिले. एकूण, ज्यात जाऊन पडलो त्या गोष्टीची शिसारी आली, असे त्याने सूचित केले आहे.
आता प्रश्न इतकाच की, या लेखनातून या व्यवस्थेला आव्हान दिले जाते आहे का? एखाद्याला वाटेल या प्रश्नाला आवाज फोडणे हेही आव्हानच. ज्याला हा प्रश्न असा आहे हे आधीच माहिती असेल त्याच्यालेखी यात कसले आले आहे आव्हान! ज्याची - त्याची समज, आकलन... वगैरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी विचारते आहे त्या प्रश्नांचा सतीश वाघमारे यांच्याशी आणि त्यांच्या या लेखाशी थेट संबंध असेलच असं नाही. या लेखाचं फक्त निमित्त आहे.

१) व्यवस्थेबद्दल असंतोष/विषाद व्यक्त करणार्‍या दरेक लेखनातून व्यवस्थेला आव्हान दिलं गेलंच पाहिजे, ही पूर्वअट आहे का?
२) ज्याला याबद्दल आधीच माहीत असेल, त्याच्यालेखी केवळ एखाद्या समस्येचं दर्शन घडवण्यात आव्हान दिसणार नाही, हे ठीकच. पण हे जगातल्या कुठल्याही प्रकारच्या लेखनाला लागू व्हावं. (अगदी शाळेत असताना मला 'सजा ए कालापानी' हा प्रचंड भारी सिनेमा वाटला होता. पुढे 'शिंडलर्स लिस्ट' पाहिल्यावर त्याचा 'सजा'वरचा प्रचंड प्रभाव लक्षात आला नि माझ्या भाबडेपणाची मजा वाटली. पण म्हणून 'सजा ए काला पानी'नं असूच नये का? प्रभावित गोष्टींचा आपला असा एक टारगेट ऑडियन्स असतोच. नि त्याचं एक विशिष्ट महत्त्वही असतं.)आव्हानाच्या पातळ्या बदलत जाणं अपरिहार्य आहे.
३) बाजू बदलून पाहिल्याशिवाय काही तपशील कळणं अशक्यच असतं. अशा वेळी बाजू बदलून उघड केलेल्या झालेल्या माहितीला महत्त्व द्यावं, की बाजू बदलल्यामुळे / बदलताना गमावलेल्या नैतिकतेचा खल करावा? (याचं एकच एक ठाम उत्तर असू शकत नाही, परिस्थितीनुसार नि व्यक्तीनुसार ते बदलतं असेल, हे मला ठाऊक आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

निमित्ताविषयी सहमत. मी हा मुद्दा थोडा अधिक या विशिष्टापुरता आणला.
१. पूर्वअट नाही. पण त्यासाठी लेखन तसे निर्भेळ हवे. त्यात, आणि त्याच्या अनुषंगाने, भूमिका घेतल्या की भूमिकांच्या संदर्भात व्यवस्थेला आव्हान देण्याची अपेक्षा निर्माण होते, आणि ते स्वाभाविक आहे, इतकेच माझे म्हणणे आहे. दिलेच पाहिजे असे नाही. दिले तर भूमिका प्रामाणिक ठरतात, एरवी ते पवित्रे ठरतात (स्ट्रॅटेजी या शब्दातच एक असत्य दडलेलं आहे असं एक जुना मित्र म्हणायचा त्याची आठवण झाली)
२. आव्हानाच्या दोन्ही पातळ्या मी माझ्या प्रतिसादातच मांडल्या आहेत. मुरलेल्याला 'कसलं आलंय आव्हान' असं वाटेल, नवागताला तसं लिहिणं हेदेखील आव्हान वाटेल. दोन्ही शक्यता आहेत, म्हणजे दोन्हीचं अस्तित्त्व आहे. थोडक्यात, कृष्णधवल पाहता येणार नाही. पाहिलं जाऊ नये.
३. बाजूचा मुद्दा पटत नाही. त्याचं कारण मी स्वच्छ लिहिलं आहे. इथं हितसंबंध आहेत. हितसंबंधांच्या पोषणासाठी ती गोष्ट घडलेली आहे. हितसंबंध न ठेवताच बाजू बदलून सम्यकतेनं वास्तव आणि त्यामागील सत्य पाहता येतं. 'कमला'चं उदाहरण त्याच अंगानं दिलं आहे. तिथं त्या स्त्रिची खरेदी करताना त्या पत्रकाराचा बातमी सिद्ध करणं (त्याच्यालेखी समाजहितैषी काम) हा हेतू होता. इथं तसं दिसत नाही. कुणाची तरी नोकरी (म्हणजे, जगण्याचा स्रोत), तिची बांधबंदिस्ती (म्हणजे ती करताना इतर काही तडजोडी, ज्या समाजहिताच्या विरोधात असू शकतात, झालेल्या आहेत, असे मानण्यास जागा आहे), त्यानंतर हितसंबंधांचं वर्तुळ बिनछेद ठेवण्याची भूमिका अशा गोष्टी इथं आहेत. त्यामुळे बाजू बदलण्याइतका सरळपणा यात नाही. तो तसा नसल्यानेच लेखनातील ओकारीच्या मुद्याचाही निखळपणा मी नोंदवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिसर्‍या मुद्द्याबाबत तुमचं म्हणणं समजलं. मान्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बैठकीला जाऊन वर त्याबद्दल लेख लिहिणे म्हंजे तर अत्याचाराला समर्थन देणेच होय अशा छापाची मते वाचून हहपुवा झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुळात लेखकाला जबाबदार धरणे हा मुद्दा तितकासा महत्वाचा नाही. अपेक्षा जरका त्याने पिक्चरमधल्या 'हिरो' सारखं अन्यायाचा विरोध करावा अशी असेल तर ते सगळं अ‍ॅकॅडमिक आहे.
लेखक त्यात सहभागी आहे की नाही यावर जो शोषणाचा मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष करण्यात काय अर्थ आहे?
'मी आज पासुन भ्रष्टाचारात सामिल होणार नाही, लाच देणार नाही' वगैरे टाईपच्या 'प्रतिज्ञा' अण्णा आंदोलनात दिल्या जात होत्या. त्याची जशी लिमिटेड उपयुक्तता आहे (Feel good वाली) तसंच...
एक लोकशिक्षण म्हणून ठिक आहे पण असं नुसतं म्हणून लोक लाच द्यायची/घ्यायची सोडून देतील इतकी बालिश अपेक्षा असेल तर मग प्रश्नच नाही.
व्यवस्थेत जे 'सर्जिकल' बदल हवे आहेत ते ओळखणे आणि त्यावर चर्चा करणे हे एक ध्येय होऊ शकते. अन्यथा सगळ्याच गोष्टींना/घटनांना नैतिक/ननैतिक, चांगलं/वाईट अशा 'कॉस्मेटीक' चौकटीत बसवून आपले पुर्वग्रह पुनःपुन्हा दॄढ करता येउ शकतात. ते सोपंय...
आणि केवळ इथंतिथं लिहुन काय होतंय असं वाटत असेल तर अशा चर्चांपासुन दूर राहिलेलंच बरं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच बोल्तो.
कुणी काही बोलायला गेलं , वाफ बाहेर पडू लागली की लागलिच घाईनं अशी तात्विक नैतिकची झाकणं बसवणं ठीक वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लिखाण एका न पाहिलेल्या जगाच्या एका तुकड्याचं दर्शन घडवणारं वाटलं.

ज्या शोषणाचं वर्णन/चित्रण या लिखाणामधे आलेलं आहे त्याच्या लेखकालाच त्या शोषणामधे सामील झाल्याची (किंवा खुद्द लेखक त्याला एका अर्थाने जबाबदार आहे असं म्हण्टल्याची) प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सूचना चुकीची वाटते. इंग्रजीमधे "डोंट किल द मेसेंजर" अशी एक म्हण आहे त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मनोबा
लिखाणाला विरोध नाहीच
किँबहुना त्यांच्या या आधीच्या लिखाणाच कौतुकही झाल आहे
नैतिकता व्यक्तीसापेक्ष असते हे मान्य
फक्त हे लिखाण दांभिकतेने स्वतचा अजेँडा राबवण्यासाठी केललं नसाव हीच अपेक्षा

बाकी बहुत काय बोलणे
असोच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

फक्त हे लिखाण दांभिकतेने स्वतचा अजेँडा राबवण्यासाठी केललं नसाव हीच अपेक्षा

असे ह्या लेखात जाणवले?

असो, बाकी श्रामोंशी बाडिस.


मी उल्ट्या होईस्तोर दारु प्यायला सज्ज होतो.
आणि गाडीत वाट बघत निमूट बसतो.

व्यवस्थेबद्दलची हतबलता अधोरेखित करणारी चपखल मार्मिकता.

- (दांभिक) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे ह्या लेखात जाणवले?

मला जे जाणवले, अनुभवले ते निरीक्षण नोंदवले. तुम्हाला आणि ईतरांना जाणवावच असा आग्रह नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

चर्चा वाचली. लेखावर काही प्रतिक्रिया देण्याआधी संपादक म्हणून काही गोष्टी नोंदवणं आवश्यक वाटतं.

अनेक प्रतिसादांमध्ये व्यक्तिगत व काहीसा आक्रमक स्वर दिसून आला. त्याची तीव्रता कमी झालेली आवडेल. लेखक, मूळ लिखाणाचा असो की प्रतिसादाचा, त्याच्यामागे एक व्यक्ती दडलेली असते - वैयक्तिक भावना, पूर्वग्रहांचं भेंडोळं, कमी-अधिक आक्रमक शैली यांसकट. आपले तेवढे विचार आणि दुसऱ्याचे ते पूर्वग्रह असंही बहुतेकांना वाटतं. आणि या सगळ्यात काही वाईट असं नाही. माणूस असण्याचा तो एक भाग असतो. त्यामुळे संघर्ष होतात, आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते व्हावेच. मात्र ही मर्यादा ओलांडली जाणार नाही याची जाणीव आपण सर्वांनीच ठेवायला हवी. स्वतः लिहिताना आणि दुसऱ्याने काही लिहिलेलं वाचताना. ती शिस्त इथे काहीशी ढिली झालेली दिसली.

संपादक म्हणून आमचा प्रयत्न असा असतो की विशिष्ट पातळीच्या खालचे प्रतिसाद असतील तरच ते काढावेत. बाकीचं लेखन - अगदी एकमेकांना उद्देशून केलेलंदेखील - राहू द्यावं. 'गप्प बसा, अमुक अमुक लिहायचं नाही, लिहिलंत तर काढून टाकू' अशी सरसकट पालक-छाप भूमिका घेणं वाचक/लेखकांच्या ज्ञानाचा आणि प्रगल्भतेचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं. यात अर्थातच सर्व वाचक-लेखक सज्ञान आणि सुजाण आहेत हे गृहितक आहे. त्या गृहितकाशी सुसंगत वागणूक आत्तापर्यंत बहुतेक सर्व लेखनात दिसलेली आहे. तीच कायम दिसेल अशी आशा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश च्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. तरी एक मुद्दा राहतोच कि लेखावर किंवा इतरांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना कुणालाच दुखावयच नाही ही भूमिका घेतली तर विचारांची देवाणघेवाण होणार नाही. तु पण छान मी पण छान. सगळ्यांचाच पहिला नंबर. असे होणार नाही. प्रतिसादकर्त्यांच्या मागे एक माणुसच आहे. राग लोभ मद मत्सर द्वेष वगैरे भावना या त्याच्या मनात असणारच आहेत. किंबहुना ते माणुस असल्याचेच लक्षण आहे. तरीही संवादाचे प्रतल राखण्यासाठी काही स्वयंशिस्त आवश्यक आहे,
व्यक्तिमत्वातील अंतर्विरोध वा अंतर्विसंगती हा मुद्दा अनादी काळापासून चालत आला आहे. माणूस एकाच वेळी नायक व खलनायक असू शकतो. सध्या अच्युत गोडबोलेंच 'मनात' हे पुस्तक वाचतो आहे. त्यात व त्यामुळे हे विशेष जाणवते. सतिश वाघमारेंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले तरी त्यांची स्वतःची सदसदविवेकबुद्धी काही तरी कौल देत असणारच ना? ते स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीशी प्रामाणीक आहेत कि प्रतारणा करताहेत हे फक्त तेच सांगू शकतात.
सगळ्यांनी आपल्या मनात आलेले सर्व विचार खरे खरे मांडायचे व त्याचे डॉक्युमेंटेशन करायचे असे झाल्यास काय होईल याचा विचार करतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अवांतर होइल, पण सांगतोच.
तरीही संवादाचे प्रतल राखण्यासाठी काही स्वयंशिस्त आवश्यक आहे,

अजिबात नको. स्वतःशी प्रामाणिक असलात तर पुरे. जे मनात आहे, जसं आहे, ते तसं येणं मला महत्वाचं वाटतं.
स्वयंशिस्त ह्याचा अर्थ मनात एक आणि जनात दुसरं असं असेल तर स्वयंशिस्त नकोच."तो चोट्टा आहे" असं मला म्हणायचं असेल तर मी ते नक्कीच म्हटलं पाहिजे. त्याशिवाय "तो चोट्टा नाही." किंवा "चोट्टा असला तरी त्याचीही काही एक बाजू आहे" ह्या वर्गातली आर्ग्युमेंटास ताकदीने समोर येणारच नाहित.
तस्मात, प्रामाणिकपणे जे जसं वाटतय, ते तसं लिहा. वाद झाले तर होउ द्यात.clash of values होतच राहणार. कुणी एकच बरोबर असं व्यावहारिक जगात कधीच होणार नाही.पण नेहमी वादाला घाबरुनही चालणार नाही.
(एक ताजे उदाहरण :- परवाच एका विदुषींना खरडीत जाउन "तुम्ही कर्कश्श आणि निष्ठूर आहात " ह्या धाटणीचं काहीतरी टंकून आलो. ते टंकलं नसतं, तर मला काय म्हणायचय ते मी कसं सांगितलं असतं. नेहमीच "ह्यावेळी लेखन प्रभावी वाटले नाही " , "अमुक म्हणण्यात गल्लत होते आहे" अशी पार्लमेंटरी भाषा कशाला? )
.
माणूस एकाच वेळी नायक व खलनायक असू शकतो.
यप्स. परवाच मी त्रागा धागा लिहिला होता. त्यात विनोबा लै डो़कं उठवतात असं लिहिलं. आता त्यात मला त्रास देणारे विनोबा सध्या हयात तरी आहेत का? नक्कीच नाहित. पण "विनोबा हे व्यक्तिमत्व मनोबामध्ये खोलवर रुतून बसलय. मनोबा ह्या व्यक्तीला त्याचा व्यावहारिक जीवनात शॉट्ट बसतोय." असे ते होते. त्यावेळी विनोबाही मीच आणि मनोबाही मीच. अंतर्विरोध वगैरे. त्यामुळेच सहमत.
.

सगळ्यांनी आपल्या मनात आलेले सर्व विचार खरे खरे मांडायचे व त्याचे डॉक्युमेंटेशन करायचे असे झाल्यास काय होईल याचा विचार करतो आहे.

अजिबात काही होणार नाही(माझा त्रागा धागा पहा, डोक्यात आले ते सरळ लिहिले.).किंवा खरे तर, काहीही झाले तरी आपण त्याची फिकिर का करा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी ठीक पण

अजिबात काही होणार नाही(माझा त्रागा धागा पहा, डोक्यात आले ते सरळ लिहिले.).किंवा खरे तर, काहीही झाले तरी आपण त्याची फिकिर का करा?

याच्याशी असहमत. मनातले खरे विचार कुठल्या संदर्भातले आहेत यावरही बरंच काही अवलंबून आहे Wink त्रागा प्रामाणिक असला तरी विषय कमरेखाली किंवा अजून कुठे जातच नव्हता, त्यामुळे तादृश अडचण नव्हती. आता प्रामाणिकपणे सर्व विषयांबद्दलचे खरेखरे विचार लिहायचे म्हटले तं औघड आहे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या येडझवा दिसतो. अतिग्रीकवाचनाने मतिमंद झालय काय त्याचं टाळकं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'दिसतो' याऐवजी 'आहे' हा शब्द नेमका ठरला असता. Wink
नेमकेपणा नसल्याने मार्मीक ही श्रेणी गमवलीत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL

का बे का, खरं तेच तं सांगून र्‍हायलो मी Wink

"४ रोचक" उगीच मिळाली का आँ Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक करता येइल का? 'लेखक तिथे का गेले' आणि 'शेवटी त्यांना शिसारी आली की नाही' हे प्रश्न पुर्णपणे बाजुला ठेउन या लेखाकडे पाहता येईल का?
शैक्षणीक शोषणासाठी ते वेगळा धागा काढतील. किँवा त्यांना बैठकीच कुतुहल असेल किँवा त्यांना बैठक ऐँजॉय देखील करायची असेल. it can be anything, extreme positive or extreme negative, but usualy grey area inbetween... आणि शिसारी येण वगैरे टिआरपी साठी देखील असू शकेल.
पण इथे प्रश्न लेखक या व्यक्तीचा आहे का? त्यांना सिँपथी देण्याची किँवा दुटप्पी, दांभिक म्हणण्याची या धाग्यात तरी गरज नाही असे मला वाटते. लेखक कसेही असले तरी त्यामुळे,
"काही पांढरपेशे लोकं बैठकीला गेले आणि त्यातल्या एकाचं वागणं तिथल्या कोवळ्या मुलीलादेखील अनकंफर्टेबल वाटेल एवढ चीप झालं आणि शेवटी त्याने डायरेक्ट शॉट मागितला जे बाकीच्या काही जणांना पुर्ण अनपेक्षीत होतं"
यात काही बदल होणार आहे का? मग या लेखाचा असा आणि एवढाच विचार करता येइल का?
मला रंग, अदिती, ननि, मन यांचे प्रतिसाद योग्य मुद्यांभोवतीचे आहेत असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सतिश वाघमारे व श्रावण मोडक हे भविष्यात उत्तम मित्र होतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सतीश वाघमारे यांच्याशी ओळख झाली. बोलणं झालं. त्यांनी बैठक हा धागा वाचायला सांगितले म्हणून आवर्जून वाचलं. संपूर्ण धागा काही वाचून झाला नाही. पण मुक्तसुनीत यांची प्रतिक्रिया आवडली.

लेखकाने प्रामाणिकपणे लिहीले आहे. यावर हे लिखाण काल्पनिक आहे पासून तुम्ही तिथे कशासाठी गेला होतात असे आक्षेप घेतए गेलेत. मुळात या लेखामुळं हे कळालं याचे गुण लेखकाला द्यायला हवेत. त्यांच्या लिखाणात त्रुटी जरूर असतील, पण त्या फटींवर एव्हढी मोठी चर्चा करण्यापेक्षा पुण्यात इतक्या जवळ असे प्रकार चालतात तर ते थांबवण्यासाठी मी हे करू शकतो हे हिरीरीने भांडणा-या कुणाला सांगता येईल का ? माझ्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर कियेविन पांडीत्य म्हटलं कि ते फटी शोधण्यात गर्क असणार यात नवल ते काय ?

अर्थात क्रिया केलीच पाहीजे का असा प्रतिप्रश्न येऊ शकतो, ज्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही असं अनुभवातून मत झालेलं आहे.

( प्रतिसाद देताना मोझिला मधून टेक्स्ट गायब होतं हा अनुभव हल्ली येतो आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाने