छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'स्वयंपाकघर'. स्वयंपाकघर, तिथल्या वस्तू, विविधरंगी, विविध पोत असणारे मसाले, भाज्या, शिजवलेले, सजवलेले पदार्थ, एकंदरच अन्न या मूलभूत गरजेशी संबंधित गोष्टींचे लाळ गाळू पहाणारे, फक्त डोळ्यांनाच सुखावणारे, किंवा यापेक्षा अधिक काहीतरी सुचवणारे फोटो दिसतील अशी आशा आहे.

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)

४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २ एप्रिलला निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय प्लास्टीक, आणि विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अदिती अधिक काहीतरी सुचवणारे म्हणजे नेमके काय
हे स्पष्ट कर

खरकटी भांडी, घरकाम करणार्या काकूनी दांडी मारल्याने भांड्याचे पडलेले ढीग, स्वैपाक घरातील फसलेले प्रयोग इत्यादी फोटो चालणार काय Wink Blum 3

.

(फक्त) खातानाचे फोटो चालतील का? Wink

स्वगत: फार्फार तर चहाच्या भांड्याचा फोटू टाकता येईल ब्वॉ!

-Nile

खरकटी भांडी, घरकाम करणार्या काकूनी दांडी मारल्याने भांड्याचे पडलेले ढीग, स्वैपाक घरातील फसलेले प्रयोग इत्यादी फोटो चालणार काय

(फक्त) खातानाचे फोटो चालतील का? (डोळा मारत)
स्वगत: फार्फार तर चहाच्या भांड्याचा फोटू टाकता येईल ब्वॉ!

छतावरचं कोळीष्टकही स्वयंपाकघराशी संबंधित आहे असं फोटोमधून दाखवू शकलात तर ते ही चालेल.
अधिक काही म्हणजे काय सुचवायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. मागच्या धाग्यात 'युके आणि भारत' असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यात ऋताला 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरचा हल्ला दिसला, राजेशला एकच शहर असावं असं वाटलं. तसं अन्नपदार्थांच्या रचना करून इतर काही गोष्टीही दाखवता येतील. बिस्कीटांवर चीज, टोमॅटोचे मनोरे रचता येतील आणि त्यातून काहीतरी गोष्ट सांगता येईल. किंवा 'खुराक' असंही काही सुचवता येईल.

Nile, जेवण स्वतःच बनवायला पाहिजे असं काही नाही. बाहेर कुठे कुठे हादडतोस तिथले मनोरंजक फोटो टाकलेस तरी चालेल. स्वयंपाकघर याचा मुदपाकखाना असा अर्थ लावला तरी चालेल. (पण प्लीज, प्लीज, प्लीज माझ्या धाग्याला प्रतिसाद द्या.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुची चे केक, ब्रेड चे फोटो आठवले. खास करुन टी पार्टीचा. खूप सुंदर होता तो. आधी 'रंग' या आव्हानात दिलेला होता. तो परत या आव्हानात देता येईल का?
पाव च्या धाग्यावर इतरांनी देखील कसले टेम्प्टिँग फोटो दिलेले.
अदिती, काळजी नको खूप रिस्पॉँस येईल या आव्हानाला. तुला निवड करणंच आव्हान होइल.

घरातल्या (डोमेस्टिक) स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित आहे का विषय?

"Nile, जेवण स्वतःच बनवायला पाहिजे
असं काही नाही. बाहेर कुठे कुठे
हादडतोस तिथले मनोरंजक फोटो टाकलेस
तरी चालेल. स्वयंपाकघर
याचा मुदपाकखाना असा अर्थ
लावला तरी चालेल. (पण प्लीज, प्लीज,
प्लीज माझ्या धाग्याला प्रतिसाद
द्या. )"
हे वाचा की राव. 'एनिथिँग रिलेटेड विथ फुड' चालेल.

अर्र.. स्वारीच की..

फक्त धागा वाचून प्रतिसाद दिल्ता.. हपीसात संक्षिप्तात वाचावं लागतं ना कधीकधी.. Smile


Model NIKON D40X
ISO 125
Exposure 1/125 sec
Aperture 5.6
Focal Length 38mm
Flash Used false

Saachu in Kitchen

कॅमेरा- निकॉन डी ९०, F-5, 1/15 Sec

Photo 116/>

निकॉन डी९०, f 3.3, 1/640 Sec.

स्पर्धेसाठी नाही. स्रोत - http://twistedsifter.com/2012/11/the-eye-of-the-drain/

ड्रेनाक्ष आवडल्या गेला आहे!!!!!! अतिश्य कल्पक अन रोचक!!!!!!!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थंबनेलमध्ये भारीच दिसतोय!

-Nile

Camera – SONY DSC-HX1
ISO – 400
Exposure Time – 1/2000 sec

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

Camera – SONY DSC-HX1
ISO – 400 f/4
Exposure Time – 1/1600 sec

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

जगन्नाथ

कॅमेरा : सॅमसंग गॅलॅक्सी एस-३
अनावरणकाल : १/१५ सेकंद
छिद्रमान : एफ/२.६
आय एस ओ : ८००
केंद्रमान : ३.७ मिमि
GIMP 2.8.4 वापरून कातरले

संपादकः width="" height="" टाळावे ही विनंती

हा फोटो जरा जास्तंच आवडला!

-अनामिक

छान कल्पना! पण फटु किंचित हलला आहे असे वाटतेय.
समोरून फोटो घेताना स्टँड वापरता येतो तसा असा वरून फोटो घ्यायचा असेल तर असा कंप येऊ नये म्हणून काही क्लृप्ती आहे का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बर्‍याचदा जिथे क्लिक करताना कॅमेरा हालण्याची शक्यता असते त्यावेळी मी २ सेकंदाचा टायमर लावतो. म्हणजे क्लिक करून फोटो हालण्यापे़क्षा हे असे काढलेले फोटो चांगले येतात. पॉईंट अँड शूट कॅमेर्‍यातही रात्रीच्यावेळी फोटो काढताना ही युक्ती कामी येते.

-अनामिक

फोटो आवडला. मला वाटते हाताच्या कंपाऐवजी कमी प्रकाशामुळे एक्सपोजरचा काहीतरी घोळ झाल्याने चित्र हलल्यासारखे वाटत आहे.

फोटोतील धूसरपणा निवडल्यामुळे आहे. (अनेक फोटो काढले होते, वगैरे.) अर्थात ही निवड योग्य किंवा अयोग्य, हवे ते संदेशन करण्यात कार्यक्षम की अडथळा? याबाबत बघणार्‍याचे मत माझ्या मतापेक्षा विपरित असू शकते.

(वेगळा तांत्रिक मुद्दा : @ऋषिकेश, होय काही ट्रायपॉडांमध्ये वरून खालचे चित्र काढायचे सोय असते.)

फोटो आवडला. धूसरपणा, (खरंतर फोटोकडे बघताना डोळ्यांचा फोकस चित्रापलीकडे(?) करून पाहिल्याने, नाहीतर माझे लक्ष फोटोतल्या गोष्टींकडेच उरत होते) विषय पोहोचला (असे वाटते). पण मग दोन्ही कॉईल्स का पेटवल्या नसतील, तिरका फोटो का इ. शंका आल्या

-Nile

'चिमण्या' दिव्यात वाढणारे कोंबः

तुम्ही 'आक्वा नतुराले'वाले वाट्टं ! Wink
भर उन्हाळ्यात कधितरी 'फ्रिझ्झान्ते'ही चाखून पाहा.

'फ्रिझ्झान्ते' चेहर्‍यावरचे भाव न बदलता पिऊ शकत्ये आता...पण आक्वा नातुराले हीच पहिली निवड.

'भटारखाना' - व्हॅली ऑफ किंग्ज, लक्जर - इजिप्त. हा धाबा बहुधा सायंकाळी चालत असावा. दिवसा बंद. धाब्याच्या भिंतीवर रेखाटलेले हे भटारखान्याचे चित्र. कणिक मळणे, रोट्या थापणे - लाटणे, त्या भट्टीत भाजायला घेऊन जाणे आणि भाजलेली खरपूस रोटी भट्टीतुन बाहेर काढुन ताटलीत ठेवणे य सर्व क्रिया इथे दाखविल्या आहेत. पार्श्वभूमीवर घरे आहेत, आकाशात पक्षी उडत आहेत - बहुधा सकाळची वेळ असावी, त्यामुळे मंडळी घराबाहेर पडण्याआधी पाकसिद्धता सुरू असावी. वस्तीतल्या स्त्रिया बहुधा एकाच मांडवाखाली जमुन एकत्र रोट्या बनवित असाव्यात किंवा भटारखाना चालवित असाव्यात.
ed1

Camera Nikon D60
Exposure 0.005 sec (1/200)
Aperture f/7.1
Focal Length 42 mm
ISO Speed 200

कॅमेरा: आयफोन ४

अन्नपदार्थांचे प्रकाशचित्रण ही बरीच पुढे गेलेली व्यावसायिक कला आहे. त्याची इतकी उत्कृष्ट उदाहरणे आपण रोज बघतो, की त्यात आपल्याला काय जमणार? असे वाटते. शिवाय तयार अन्नपदार्थांच्या चित्रांत पुष्कळदा स्वयंपाक-रांधणे ही भावना कमीच असते.
स्वयंपाकघरात जाऊन फोटो काढावा, तर असंबद्ध अडगळ चित्रात बोचते आणि स्वयंपाकघराचा "आत्मा" मात्र चित्रातून हरवतो. (येथे सहेतुक अडगळीचे चित्रण म्हणायचे नाही - तसे जमले तर चांगलेच. पण बहुतेक वेळा हेतूला घातक अडगळ चित्रात गजबज करते.)

मला सोपा विषय वाटलेला... कटलरी, ग्लासवेअर, कुकीँग रेंज, वेगवेगळे पदार्थ त्यांच्या वेगवेगळ्या अरेँजमेँटस्... बरेच फोटो काढता येतील. गावाकडे चुलीवर बनणारी भाकरी, मातीच्या भांड्यातली रटरटणारी आमटी, संग्रहालयातील औरंगजेबच्या स्वयंपाक्याने वापरलेली भांडी देखील चालतील Smile
मला स्वयंपाक/घर मधे शुन्य इंटरेस्ट आहे नैतर मीच दिले असते भरपुर फोटो Biggrin

उदाहरणांतल्या कल्पना चांगल्या आहेत खर्‍या. पण प्रत्यक्षातील स्वयंपाकघरे provoke the desire, but it take away the performance of photography. चांगली कलाकृती भावनिक आवाहन करते. खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात भावना भरपूर उद्भवतात. (चुलीवरची भाकरी, रटरटणारी आमटी या विषयांत खूप भावनिक शक्यता आहेत.) परंतु चित्रात तीच भावना प्रकर्षाने जाणवावी अशी मांडणी खर्‍याखुर्‍या स्वयंपाकघरात जमत नाही.

रटरटणारी आमटी मस्त दिसावी त्याचे तंत्र खाद्य-उद्योगातील व्यावसायिक प्रकाशचित्रकारांनी खूप पुढे नेले आहे. मात्र असे चित्र खर्‍या स्वयंपाकघरात काढणे कठिण जाईल. आपण बिगरव्यावसायिक रीतीने काढलेली चित्रे कंटाळवाणी दिसतील, हा धोका फारच असतो. उदाहरणार्थ वरच्या एका चित्रात "तळणी" बिगर-व्यावसायिक स्तरावर चांगली आली आहे. पण दररोज दूरदर्शनवर आणि ग्लॉसी मासिकांत बघतो त्या चित्रांमुळे "तोंडाला पाणी सुटले, तोंडात कुरकुरीतपणा जाणवला" असे व्हायला आजकाल कठिण आहे.

वर लहान मुलीच्या स्वयंपाकाचे चित्र हृद्य आहे. पण पिवळ्या प्रकाशाची अवकळा सुधारेपर्यंत मुलीची ही मस्त "पोझ" टिकली असती का?

किंवा इजिप्तमधील भित्तिचित्रातली सुबक मांडणी बघा. भित्तिचित्रात कृतींची रेलचेल असली तरी गजबज-गोंगाट नाही. खर्‍याखुर्‍या "पूर्वतयारी" चित्रात कथानकाला घातक असा विस्कळितपणा आहे : या प्रसंगी प्रत्यक्षात चित्रकाराला कार्यचैतन्य आणि सहकार्याची भावना अनुभवायला आली असावी. मात्र चित्रात तो भाव गजबजाटामुळे कमी प्रभावी आहे.

वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या छोट्या-मोठ्या वस्तूंची चित्रे काढणे मला फार कठिण जाते. भावनिक आवाहन व्हावे अशी मांडणी संग्राहक करतात खरी. पण मी काढलेल्या चित्रात मला निर्जंतुकता (स्टेरिलिटी) जाणवते.

हम्म Smile मी एवढा विचार नाही केला.. फक्त मला काय बघायला आवडेल ते सांगीतलं.
आधीच्या काही धाग्यात पाहीलेले राजेश, अदिती चे वाईन ग्लास, त्रिलोकेकरांचे कॉकटेल ग्लास, रुची च्या ब्लॉगवरचे किँवा पाव केक चे फोटो मस्त आहेत. इथेदेखील तसेच काही पहायला मिळेल वाटलेलं.

धनंजय यांच्या फोटोग्राफीच्या प्रतिसादांतून बरेच म्हणजे खूप शिकायला मिळते.

एखाद्या मराठमोळ्या स्वयंपाकघराचा फोटो कोणीतरी द्यायला हवा होता असे वाटले. पोळपाट-लाटणे, तवा, परात, कढई, झारा, स्टोव्ह, ग्यास, चूल, सिलींडर, सांडशी, डाव, कुकर वगैरे काहीही. स्वयंपाकघर म्हटले की वाईन, बिअर, ओव्हन वगैरे गोष्टी अजूनही मनात येत नाहीत.

Camera: Nikon COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/20 sec
Aperture: 3.3
Focal Length: 6mm
Flash Used: No

ही चित्रे स्पर्धेकरिता नाहीत.

(काही दिवसाम्पूर्वी घरी बनविलेले कॅरमेल कस्टर्ड.)

१.

२.

दोनही चित्रांसाठी:
Camera: NIKON COOLPIX L120 , ISO: 800, Exposure: 1/6 sec, Aperture: 3.8, Focal Length: 10mm, Flash Used: No

हे चित्र स्पर्धेकरिता नाही.

पम्परनिकल् ब्रेड्, क्रीमी स्क्रॅम्बल्ड् एग्स्, मशरूम्स्, चेरी टोमॅटोज़् (शेफ 'गॉर्डन रॅमसे'ची पाककृती.)

Camera: Nikon COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/2 sec
Aperture: 5.1
Focal Length: 32mm
Flash used : No

brunch
(फोटो स्पर्धेसाठी नाही)
अमुक, तुम्हीपण गोर्डन फॅन का?

भला उनके ...... Smile
वाक्य पूर्ण केले नाहीत त्यामुळे कुणाचे एग्ग्स् ज्यास्त छान आहेत ते गुलदस्त्यातच राहिले. Wink

मशरूम फारच क़ातिल दिसत आहेत.
मी बनवले त्यावेळी माझ्यापाशी ती मशरूम्स् आणि वाईल्ड् टोमॅटो नव्हते. घरी असलेल्या गोष्टींवर निभावून नेले. हिरव्या रङ्गासाठी चाइव्ह्स् नव्हते तर कोथिम्बीर टाकली. टोमॅटोसोबत तीळ टाकून पाहिले. तेही छान लागले.
मी गॉर्डनचा कधी कधी फॅन असतो. या पाककृतीतले एग्ग्स् मला फारच आवडले. तुमच्या चित्रात जे टोमॅटोशेजारी भरीत (ग्रेवी) दिसत आहे ते कसले आहे ते कृपया व्यनितून कळवाल का ? इथे सगळे अवान्तर होत जाईल.

निषेध! व्यनितून नको, जाहिरच कळवा. अवांतर चालेल, पण रेसिपी घालवू नका.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१
वाटल्यास रेसीपीसाठी नवीन धागा काढा.
अमुक आणि रुची यांनी दिलेले फोटो 'वाह! यमी!' आहेत.

साहित्य :
२०-२५ चेरी टोमॅटो किंवा ३-४ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, १०-१२ छोटे सांबार कांदे किंवा १ मध्यम कांदा, ३-४ पाकळ्या लसूण, १ इंच आले (खिसलेले), १ मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, १ चमचा पंचफोरण (मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप, कलौन्जी), फोडणीचे इतर साहित्य (तेल, हिंग, कडीपत्ता), कोथिंबीर, १ मोठा चमचा गूळ, लिंबू किंवा चिंच चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.

कृती :
टोमॅटो, लसूण आणि कांदा चिरून घ्या. तेलाची पंचफोरण घालून फोडणी करा आणि त्यात चिरलेला कांदा, मिरची घालून परता. कांदा मऊ झाल्यावर आले, लसूण घाला, टोमॅटो पेस्ट घाला आणि पुन्हा थोडे परता. आता टोमॅटो घाला आणि शिजेपर्यंत बारीक आचेवर ठेवा. शिजल्यावर मीठ, गूळ आणि कोथिंबीर घालुन हलवा आणि चटणी मिक्सरवर थोडीशी वाटा. जास्त बारीक वाटू नका. हवे असल्यास वरून पुन्हा थोडी फोडणी घाला. थोडे लिंबू किंवा चिंच आंबटपणासाठी घाला. टोमॅटो किंचित आंबट किंवा कच्चे असतील गरज पडणार नाही पण जर टोमॅटो खूप गोड असतील तर घाला.

(वरील पाककृती 'रुची' यान्नी त्याञ्च्या खिरापत या जालनिशीवर लिहीली आहे. कळविल्याबद्दल खूप आभार 'रुची'.)
----

स्क्रॅम्बल्ड् एग्ग्स् ची गॉर्डन रॅमसेकृत पाककृती इथे मिळेल.

हे चित्र स्पर्धेकरिता नाही.

(एक ब्रिटिश डिश. करायला सोप्पी आणि फारच चविष्ट.)

Camera: COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/13 sec
Aperture: 3.2
Focal Length: 6mm
Flash Used: No

चित्र स्पर्धेकरता नाही. ऐसी वर आज आले असता, इतका सुरेख विषय निवडल्याचे पाहून अदितीचे अभिनंदन करावेसे वाटले. स्वयंपाकघर हा मनातील हळवा कोपरा आहे. स्वयंपाकघरात फोटो काढण्यास गेले असता, बरेच विस्कळीत विचार आले. मी ज्या घरात वाढले ते माझ्या आईचे राज्य असलेले स्वयंपाकघर की आताचे माझे राज्य असलेले नक्की कोणता फोटो द्यायला हवा? कारण दोहोत थोडा फरक आहेच.
असो.
माझ्या स्वयंपाकघरात मला हा सुंदर दूधाचा पेला (जग) सापडला. नीळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एक गोंडस सूर्य चितारलेल्या या पेल्यातील दूध त्या चित्रकारीमुळे अधिक गोड लागते असा अनुभव. स्वयंपाक घराचे मुख्य फन्क्शन (काम) हे पोषण (नर्चरींग) आहे याबद्दल दुमत नसावे. आणि या नर्चरींगचे आणि त्यातून जन्म घेणार्‍या व्हायटॅलिटी (आरोग्याचे) प्रतिक म्हणून बाळ सूर्याच्या पेल्यातला दूधाचा फोटो मला योग्य वाटला.

मला हा सुंदर दूधाचा पेला (जग) सापडला

अशा दुधाच्या पेल्याला जग म्हणतात?

Smile टि सेट मधला मिल्क पॉट वाटतोय तो...
क्रॉकरीचा फोटो द्यायची आयडीआ चांगलीय.

स्पर्धेकरता नाही

स्वयंपाक(?) करणारी भुते!

-Nile

Kitchen

Nikon D90, f 3.5, 1/1000 Sec.

छायाचित्राला शक्यतो स्वतःच बोलू द्यावे आणि आपली गोष्ट स्वतःच सांगू द्यावी हे खरेच आहे पण या वरील चित्राची गोष्ट केवळ एका छायाचित्रात उलगडण्यासारखी नाही म्हणून खालची छायाचित्रे देत आहे. खालील चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.

136

134

126

EXIF टाकायचे राहून गेले ते तिन्हीचे एकदम देतो आहे
कॅमेरा - कॅनन ५००डी, 55-250 lens, aperture mode
फोटो १ - f/13, 1/20, ISO 100
फोटो २ - f/13, 1/100, ISO 100
फोटो ३ - f/13, 1/160, ISO 800
तिन्ही फोटो कातरले आहेत आणि पिकासा मध्ये थोडा टोन / कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट केला आहे.

रटरटणारे पातेले छान आहे.

रूची यांचा फोटो सोडून वरील सर्व फोटो 'स्वयंपाकघराचे' म्हणून अजीबात पटले नाहीत.
बहूतेकांनी 'स्वयंपाकघर' म्हणून खाद्यपदार्थ, त्यांच्या डीश आदी फोटो दिले आहेत.

बाबा बर्वे यांचा फोटो थोडा झुकतो आहे पण त्याला स्वयंपाकघर म्हणणे जड जाते आहे. उघड्यावर स्वयंपाक'घर'??

बाकी हॉटेल किंवा टिव्ही शो मधल्यासारखे स्वयंपाकघर हे खरे स्वयंपाकघर वाटतच नाही. घर अन होस्टेल यात फरक राहणारच.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मागच्या स्पर्धेला मिळालेला कमी प्रतिसाद पाहून 'स्वयंपाकघर' असा विषय देताना रोजच्या बघण्यातली गोष्ट असावी म्हणजे जास्त प्रतिसाद मिळेल असा माझा विचार होता. तो तसा मिळाला याचा आनंद झाला. खाद्यपदार्थांचे फोटो, धनंजय म्हणतो तसे, व्यावसायिकांमुळे खूप जास्त चांगले दिसतात. म्हणून फक्त खाद्यपदार्थांचे फोटो मला अपेक्षित नव्हतेच. पण त्यातही अमुक आणि रुचीचे खाद्यपदार्थांचे फोटो फारच आवडले. तळणीचा फोटो, मुखपृष्ठावरचा आणि बाबा बर्वेंचाही, अशी काही माझी अपेक्षा आहे/होती; पण त्यापेक्षा अधिक वेगळेपण दिसलं. ऋताच्या 'Buon appetito'ची कल्पना आवडली; त्यातलं अन्न ओव्हरएक्सपोज्ड वाटतंय. सर्वसाक्षींचा 'भटारखाना' फोटो म्हणून रोचक आहे (पण स्वयंपाकघर या थीमपेक्षा चित्र म्हणून मला जास्त आवडलं).

पदार्थ बनवण्याची पूर्वतयारी, प्रत्यक्ष पदार्थ बनवणे आणि वाढणे, सजावट असे फोटो आहेत. त्यात व्यावसायिक सफाई असण्यापेक्षाही रोजच्या व्यवहारांचं डॉक्यूमेंटेशन हे मला आवडतं. 'द आय ऑफ द ड्रेन' आणि धनंजयच्या फोटोची कल्पना मला आवडली ती रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीच, वेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत म्हणून! बाबा बर्वेंची 'तळणी, रुचीने दाखवलेलं 'स्वयंसिद्धेचं स्वयंपाकघर', 'काळाबरोबर थांबलेलं स्वयंपाकघर' आणि मैत्रचा 'आटुकाल पोंगल' हे ही मला आवडले.

विजेता म्हणून एकच फोटो निवडावा लागणार; मैत्रचा 'तीन दगडांची चूल' मला फार आवडला. त्यातली गती, रंग, मांडणी हे सगळंच मला आवडलं. मैत्रने पुढच्या धाग्याचा विषय द्यावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो आवडला याचा आनंद आहे.
मला बाबा बर्वे यांचा तळणीचा आणि रुचीच्या गोंडस उत्साही मुलीचा फोटो आवडला. तळणीच्या फोटोच्या तांत्रिक बाबी उजव्या आहेत तर चिमुकल्या कूकचा आनंद आणि एकूण कंपोझिशन मस्त आहे.
जगन्नाथ ही संकल्पना चांगली वाटली .. हलल्यामुळे त्याचा चार्म थोडा हरवला.
बाकी योगायोगाने गेल्याच आठवड्यात स्क्रॅम्बल्ड एग शोधल्यावर गॉर्डनचा व्हिडिओ मिळाला आणि प्रयोगही झाले. पण इथले फोटो पाहून खाणार्‍यांचा हेवा वाटला Smile

पुढच्या स्पर्धेचा धागा लवकरच येईल.. तोपर्यंत एक इनोव्हेटिव्ह (मराठी?) असा उपयोग पाहिला तो इथे दाखवावासा वाटतोय..