अमेरिकन अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह पुरस्कृत बुडबुडा फुटण्याचा इशारा

रोनाल्ड रेगन यांच्या कारकीर्दीत बजेट डायरेक्टर या पदावर काम केलेल्या श्री. डेव्हिड स्टॉकमन यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेत भरपूर पैसा ओतून एक बुडबुडा निर्माण केला आहे आणि तो लवकरच फुटेल असा इशारा दिला आहे.
२००८ च्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी क्युईच्या नावाखाली पैसा छापून तो अर्थव्यवस्थेत ओतण्यात आला. त्याने शेअर बाजारात तेजी आली असली तरी मुख्य अर्थव्यवस्था (Main Street Economy) कमजोरच राहिल्याने ह्या अतिरिक्त पैशाने अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
जेव्हा हा अतिरिक्त तरलतेचा बुडबुडा फुटेल तेव्हा कोणतीही मदत करण्याच्या परिस्थितीत सरकार वा अन्य कोणी नसेल आणि अमेरिका एका आर्थिक अडचणींच्या व राजकीय संघर्षांच्या गर्तेत जाईल असे भाकित त्यांनी केले आहे.
६६ वर्षीय डेव्हिड स्टॉकमन यांचे "The Great Deformation: The Corruption of Capitalism in America" हे पुस्तक एक एप्रिल २०१३ रोजी प्रकाशित झाले असून त्यापूर्वीच त्यांनी ही विधाने केली आहेत.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ श्री. पॉल क्रुगमन यांनी या विधानांची 'म्हातारचळ' अशी संभावना केली आहे

हे भाकित आहे की सवंग प्रसिद्धीसाठीचा घंटावाद हे काळच ठरवेल.

मूळ बातमी:http://www.bloomberg.com/news/2013-03-31/stockman-warns-of-crash-of-fed-fueled-bubble-economy.html

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

लिंकिंगचंद्र??????

ख-ह-त-ह-र-ह-ना-हा-क-ह.

रच्याकने, ही पदवी, म्हंजे (ही पदवी नव्हे, या पदवीच्या जन्माचं श्रेय निर्विवाद बॅट्यालाच, पण) हा हुद्दा, नंदनकडे असल्याचं ऐकलं होतं. त्याची पदावनती झाली काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

णंदणभौंची पदावनती??? ध्रुवतारा आपल्या पदापासून ढळणार?? आयला, मी का मरूण णै गेळो हे ऐकण्याअगोदर..हा हण्त, हण्त, हण्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

If it seems too good to be true, it probably is.
गॅस आणि तेलात फरक आहे. पण प्रचार असा केला जातो की अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार.
दिलेल्या लिंकांपैकीच एका लिंकेत हे सापडलं:

However, setting up CNG facilities across countries and converting vehicles to run on CNG remains a major challenge. It may never happen in the US.

इतकी वर्षे पारंपारिक तेलाच्या विहीरीतून मिळणारा नैसर्गिक वायू केवळ वाहून नेणे महाग पडते म्हणून सरळ जाळून टाकला जायचा.
मुळात फ्रॅकिंगचे तंत्रज्ञान नवे नाही. १९४७ मध्ये पहिल्यांदा हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंगचा अभ्यास केला गेला होता; पण फ्रॅकिंगचे तंत्र आत्ताच सापडले आहे आणि आता नैसर्गिक वायूच्या रुपात तेलाला विस्थापित करू शकेल असा पर्याय सापडला आहे असा प्रचार करायची सध्या लाट आली आहे. पारंपारिक तेलाचे नवीन साठे सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे म्हणूनच हे अवघड प्रकार करायची वेळ आलेली असताना, असे भासवले जाते की तेल भरपूर आहे पण स्वयंपूर्ण होण्यासाठी आम्ही हे टार सॅन्ड्स, शेल ऑईल आणि शेल गॅस वापरायचे ठरवले आहे. जर तेलाची जागा गॅस घेऊ शकत असता तर ट्रिलियनावधी डॉलर्स घालून अमेरिकेने इराकचे युद्ध केले नसते.
पारंपारिक तेलाचा EROEI १०० असेल तर शेल ऑईल/गॅसचा EROEI १० आहे. कारण या फ्रॅकिंगच्या विहीरी अल्पकाळात कोरड्या होतात आणि सतत नवीन विहीरी खणाव्या लागतात.
फ्रॅकिंगसाठी लागणार्‍या पाण्याबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल बोलायलाच नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदिप वासलेकर ह्या नावाचा उल्लेख असलेले, अमेरिका,सौर ऊर्जा ह्यांच्याबद्दल माहिती देणारे एक ढकलपत्र मिळाले.
ते जसेच्या तसे खाली पेश्टवत आहे. त्यात सौर ऊर्जेबद्दल आशावादी उल्लेख आहे.
.

केवळ पाच वर्षांपूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रथम निवडून आले, तेव्हा सौरऊर्जा उत्पादन करण्याचा खर्च एका वॉटसाठी 6 डॉलर होता, तो आता 2 डॉलरपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं पाहिलं तर सध्या सौरऊर्जा त्यांना प्रतिकिलोवॉट तासाला 40 सेंट या दरानं मिळते. 2050 पर्यंत 6 सेंटपर्यंत हा दर कमी होईल, त्या वेळी अमेरिकेतली 33 टक्के ऊर्जा ही सौरऊर्जा असेल. केवळ पाच वर्षांत अमेरिकेला सौरऊर्जा स्वतः उत्पादित करण्यात जे प्रचंड यश मिळालं, त्यामागं आहेत स्टीफन च्यू. चिनी वंशाचे एक अमेरिकी नागरिक.याच पाच वर्षांत अमेरिकेनं दुसऱ्या काही क्षेत्रांत प्रचंड बाजी मारली आहे. त्यातला एक उपक्रम काही विशिष्ट प्रकारचे जंतू निर्माण करतो. ते जंतू एखाद्या झिजलेल्या अथवा तुटलेल्या धातूच्या वस्तूवर पसरवले तर ती वस्तू काही काळात पुन्हा नवी होते. दुसऱ्या एका प्रकारचे जंतू रासायनिक रोबोटमध्ये मिश्रित केले तर तो रोबोट स्वतःहून लहान होतो व एका कापडाच्या अथवा भिंतीच्या छिद्रातून पलीकडं जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यावर पुन्हा पूर्ववत्‌ होतो! असे दोन नव्हे, तर शेकडो उपक्रम अमेरिकेच्या संरक्षण खात्यातली "डार्पा' ही संस्था चालवते. त्या संस्थेच्या संचालक आहेत आरती प्रभाकर. भारतीय वंशाची महिला.आपण जरी अमेरिकेतल्या आर्थिक धोरणात अलीकडं झालेल्या चुकांबद्दल चर्चा करण्यात एरंडाचं गुऱ्हाळ चालवलं, तरी अमेरिका ही संशोधन, ज्ञान व शाश्‍वत मूल्यं यांचा त्रिवेणी संगम करून पुढची अनेक शतकं जगावर प्रभुत्व निर्माण करण्यात मग्न झाली आहे. युरोप, जपान, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, इस्राईल हे एवढेच देश अमेरिकेशी सहकार्य अथवा स्पर्धा करून पुढची 500-700 वर्षं जगावर स्वामित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात गुंतले आहेत.
जगातल्या संशोधनांपैकी 30 टक्के खर्च एकटी अमेरिका करते. संशोधन केल्याबद्दल तिथल्या कंपन्यांना करात केवळ सहा टक्के सवलत मिळते; म्हणजे उद्योगसमूह कर वाचवण्यासाठी संशोधन करत नाहीत, तर त्यांना संशोधनावर व ज्ञानावर आधारित समाज निर्माण करायचा आहे, म्हणून ते संशोधन करतात. त्यासाठी केवळ गुणवत्तेवरच तरुण शास्त्रज्ञांना संधी दिली जाते. त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. हे शास्त्रज्ञ चिनी अथवा भारतीय किंवा अजून कोणत्या वंशाचे आहेत हे पाहिलं जात नाही. त्यांना दूरदृष्टी आहे का व त्यांच्यात कर्तबगारी आहे का, एवढंच पाहिलं जातं. म्हणून बराक ओबामा यांनी स्टीफन च्यू यांना देशाचं ऊर्जामंत्री केलं आहे, तर आरती प्रभाकर यांना अमेरिकेच्या संरक्षण साम्राज्यातल्या सर्वांत गुप्त व महाप्रभावी अशा संशोधन कार्यक्रमाच्या संचालकपदी नेमलं आहे.
युरोपच्या आर्थिक संकटांबद्दल भारतीय प्रसारमाध्यमांनी बरंच काही लिहिलं आहे; पण परदेशी संशोधकांच्या सहकार्यानं मूलभूत संशोधन करण्यासाठी युरोपनं 52 अब्ज युरो (35 हजार कोटी रुपये) एवढी रक्कम ठेवली आहे. त्याचा फायदा जगातील कुणीही शास्त्रज्ञ घेऊ शकतात. भारतातले शास्त्रज्ञही घेऊ शकतात; पण भारतातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांना "भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे व युरोपचं वाटोळं होणार आहे,' असला पोकळ प्रचार करण्यात मजा वाटते. युरोपमध्ये भारतातल्या व जगातल्या शास्त्रज्ञांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध आहेत, त्यावर चर्चा करणं उपयुक्त वाटत नाही. अमेरिका व युरोप आपलं लक्ष कृत्रिम जीव, सौरऊर्जा, मानवाच्या मेंदूपेक्षा जास्त वेगानं विचार करणारे संगणक, गटारातल्या पाण्यापासून नवजलाची निर्मिती असे अनेक नवीन शोध लावून चौथी औद्योगिक क्रांती घडवून आणत आहेत. ते लोक जुने-पुराणे समजले जाणारे, मोटारगाड्या उत्पादन करण्याचे कारखाने भारतीय उद्योगपतींना विकतात. आपले उद्योगपती असले कारखाने विकत घेऊन स्वतःची संपत्ती चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वापरायची सोडून जुन्या अर्थव्यवस्थेची अर्चना करण्यासाठी वाहतात व आपला उच्चभ्रू वर्ग त्याला "वाहवा' करून दाद देतो.भारतीय नेत्यांना बरंच काही माहीत आहे. आपल्याला कोणत्या दिशेनं जायला हवं, याची संवेदनाही त्यांच्याकडं आहे. 2008 मध्ये प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपती असताना त्यांनी मला राष्ट्रपती भवनात न्याहारीसाठी बोलावलं होतं. त्यांना आधुनिक विज्ञानाची खूप माहिती व आवड आहे. बोलताना मोंटी जोन्स यांचा विषय निघाला. मोंटी जोन्स हे आफ्रिकेतले कृषिशास्त्रज्ञ. दुष्काळी भागात अत्यल्प पाणी लागणाऱ्या तांदळाचा शोध त्यांनी लावला. भारतात अनेकदा अवर्षण आल्यास असा तांदूळ खूप उपयोगी पडेल, म्हणून प्रतिभाताईंनी मोंटी जोन्स यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मी आयोजिलेल्या एका परिषदेसाठी त्या आल्या, तेव्हा मी मोंटी जोन्स यांना मुंबईला मुद्दाम बोलावलं व प्रतिभाताईंचं भाषण झाल्यावर त्यांची ओळख करून दिली; परंतु राजशिष्टाचार व सुरक्षेच्या कारणांमुळे प्रतिभाताई तिथं थांबू शकल्या नाहीत व हा मुद्दा तिथंच थांबला. त्यानंतर डिसेंबर 2011 मध्ये मला "सिंबायोसिस'ची मानद डॉक्‍टरेट देण्यात आली, तेव्हा राष्ट्रपती या नात्यानं प्रतिभाताई पुन्हा भेटल्या. त्यांनी भारतात सौरऊर्जा कमी खर्चात करण्यासाठी संशोधन करण्याबद्दल खूप रस दाखवला; पण पुन्हा एकदा नोकरशाहीच्या नियमांमुळे हा संवाद पुढं सरकला नाही.
त्या दिवशी अशा प्रसंगी जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते किंवा जर्मनीच्या पंतप्रधान असत्या तर तिथं नोकरशहांचं जास्त चाललं नसतं. दरम्यानच्या काळात इतर काही व्यक्ती व संघटनांच्या पुढाकारानं भारतात अवर्षण हवामानात निर्माण होणाऱ्या तांदळाचा शोध लागला आहे. दक्षिण भारतात त्याची लागवडही करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात दुष्काळ असताना असं अल्प पाणी लागणारा तांदूळ, गहू निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न होतात की नाही, याची मला माहिती नाही.
भारतीय कृषिसंशोधन क्षेत्रात बरंच संशोधन सुरू आहे; पण त्याला मिळालेलं यश किती वेळा देशासमोर येतं? किती वा हिन्यांवर चर्चा होतात? या संशोधन-संस्थांना आवश्‍यक ते आर्थिक साह्य व उपकरणं देण्यासाठी किती उद्योगसमूह पुढं येतात? शास्त्रज्ञांना वैचारिक स्वातंत्र्य किती देण्यात येतं? जातीपातीचा विचार न करता उन्नती किती प्रमाणात घडवली जाते? आंतरराष्ट्रीय प्रवास करून जगातल्या नवीन शोधांचा वेध घेण्याची सोय किती प्रमाणात मिळते? यावर संसदेत अथवा विधिमंडळात किती चर्चा होतात? अमेरिका, युरोप, चीन, जपान, स्वित्झर्लंडमध्ये असं काही नवीन संशोधन सुरू आहे, की ज्यामुळं येत्या 40-50 वर्षांत सारं विश्‍व बदलून जाईल. यात भारत कुठं असेल? ज्या भारतीय युवकांची असं परिवर्तन करण्याची क्षमता आहे त्यांना पाठिंबा द्यायला आपले उद्योगपती, राजकीय नेते, प्रसारमाध्यमं व शिक्षणसंस्था तयार आहेत का? इतर देशांत एखाद्या युवकाकडं वैज्ञानिक कल्पकता असेल, तर त्या युवकाला कसा पाठिंबा मिळतो, याचं हे उदाहरण बघा ः काही वर्षांपूर्वी माद्रिदला एका हॉटेलच्या लॉबीत मी बसलो होतो. तेवढ्यात समोरून एक ओळखीचे गृहस्थ आले.
त्यांच्याबरोबर एक युवक होता. त्यांनी त्या युवकाशी माझी ओळख करून दिली. त्या युवकानं बॅटरीवर चालणाऱ्या मोटारींची एक योजना बनवली होती. त्यानुसार शहरातल्या सर्व पेट्रोल पंपांचं बॅटरी स्टेशनमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे मोटार-उत्पादक आपोआप पेट्रोलऐवजी विजेवर चालणाऱ्या गाड्यांचं उत्पादन करतील, असा हिशेब होता. त्या युवकाकडं पैसे व मोठ्यांच्या ओळखी नव्हत्या.
काही दिवसांनी ज्यांनी माझी त्या युवकाशी ओळख करून दिली, त्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीशी त्याची ओळख करून दिली. त्या वयोवृद्ध व्यक्तीनं त्या युवकाला आपल्या गावी ऑफिसात बोलावलं. त्या वडीलधाऱ्या माणसानं मग गावातल्या अनेक श्रीमंत माणसांना स्वतः (सेक्रेटरीमार्फत नव्हे!) फोन करून त्या युवकाला भेटायला सांगितलं. तो युवक त्या श्रीमंतांना भेटला व रिकाम्या हातानं परत आला. रोज सकाळी तो युवक वयोवृद्ध माणसाच्या ऑफिसात जाई. वडीलधारी व्यक्ती स्वतः श्रीमंतांना फोन करून युवकाला भेटायला सांगे. असं काही दिवस झाल्यावर काही श्रीमंतांना युवकाची कल्पना आवडली व त्यांनी त्याला पूर्ण भांडवल दिलं. त्या युवकाचं नाव होतं शाही आगासी. त्या वृद्धाचं नाव होतं सिमॉन पेरेस. ते इस्राईलचे राष्ट्रपती होते व सध्याही आहेत. मला राष्ट्रपती सिमॉन पेरेस यांनी पश्‍चिम आशियातल्या शांतताविषयक चर्चेसाठी त्यांच्या घरी एकदा बोलावलं. बोलताना त्यांनी एका नवीन संशोधनाची माहिती दिली. बर्फाच्या लादीवर अंडं ठेवलं तर पंधरा फुटांवर काही अदृश्‍य लहरींचा वापर करून अंडं शिजतं; पण बर्फ तसाच राहतो, अशी नवीन प्रकारची ऊर्जा इस्राईल तयार करीत आहे.
मी आणि पेरेस चौथ्या औद्योगिक क्रांतीसंबंधी बराच वेळ बोललो. मला देण्यात आलेली वेळ केव्हाच संपली होती; परंतु त्यांच्या कार्यालयातल्या कुणालाही सुरक्षेच्या अथवा राजशिष्टाचाराच्या कारणांमुळं आमचा संवाद थांबवावा असं वाटलं नाही.

आरती प्रभाकर, सुनीता विल्यम्स, हरगोविंद खुराना यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांना जन्म देणारी ही आपली भारतभूमी; पण त्यांची गुणवत्ता ओळखतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष! भारतात आजही कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी गुणवान युवक आहेत. आपले नेते व उच्चभ्रू वर्ग त्यांच्यामागं कधी उभा राहणार? की जग चौथ्या औद्योगिक क्रांतीवर स्वार होऊन प्रचंड वेगानं पुढं चालल्याचं आपण केवळ "नातीगोती', "जातीपाती' असा जप करत पाहत राहणार? आणि फक्त चकचकीत मॉल, सॉफ्टवेअर कर्मचारी व जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली' असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा वासलेकरांचाच लेख आहे, सप्तरंग पुरवणीमधला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर लेखात बराच अतिरिक्त अभिनिवेश असल्याने त्यात मांडलेल्या "भारतात 'संशोधन आणि निर्माण' क्षेत्राकडे कमी लक्ष दिले जाते" ही व्यथा बाजुला पडून बाह्या सरसावून मांडलेल्या विधानांचे खंडन करायचा मोह होतो आहे Smile

वानगीदाखल,

आरती प्रभाकर, सुनीता विल्यम्स, हरगोविंद खुराना यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांना जन्म देणारी ही आपली भारतभूमी; पण त्यांची गुणवत्ता ओळखतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष!

सुनीता विल्यम्स जन्मली अमेरिकेत, हरगोविंद खुराना ब्रिटीश भारतातल्या पश्चिम पंजाबात (किंवा आताच्या पाकिस्तानात) Smile

पण असो, हल्ली अश्या लेखांवर फार वेळ घालवायला मजा येत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला फक्त सौर ऊर्जेचा मुद्दा चर्चेशी सुसंगत वाटला. तेवढ्यासाठी सारे चिटकवले. बाकी चर्चा वाचायला आवडेल, पण इथे नको.( "दोन दिवसात भारत अमेरिकेला आणि आख्ख्या जगाला खिशात टाकून फिरेल" हा दुसर्‍या बाजूचा, vision 2020 वाल्यांचा आवेशही इतर ठिकाणी दिसतो. इथे दिसलेला आवेश हा त्यामुळेच प्रतिक्रियात्मक वाटतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>ते जंतू एखाद्या झिजलेल्या अथवा तुटलेल्या धातूच्या वस्तूवर पसरवले तर ती वस्तू काही काळात पुन्हा नवी होते. दुसऱ्या एका प्रकारचे जंतू रासायनिक रोबोटमध्ये मिश्रित केले तर तो रोबोट स्वतःहून लहान होतो व एका कापडाच्या अथवा भिंतीच्या छिद्रातून पलीकडं जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यावर पुन्हा पूर्ववत्‌ होतो! असे दोन नव्हे, तर शेकडो उपक्रम अमेरिकेच्या संरक्षण खात्यातली "डार्पा' ही संस्था चालवते. त्या संस्थेच्या संचालक आहेत आरती प्रभाकर. भारतीय वंशाची महिला.

हे उपक्रम यशस्वी झाले की सांगा.... तोवर झोपतो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संदीप वासलेकरांबद्दल चांगले मत होते माझे आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रूप म्हणजे काहीतरी फार भारी असेल असे वाटले होते.
असो.
सनटेक नामक जगातल्या सर्वात मोठ्या सौरऊर्जाप्रतलोत्पादक कंपनीने दिवाळे जाहीर करून काही महिनेही उलटले नसतील, तरीही अमेरिकेत सैरऊर्जेचा किती विकास होतोय अशा कंड्या पिकवल्या जातात.
लास वेगासमध्ये एक मोठा १५००० प्रतलांचा २५ एकरावर पसरलेला प्रकल्प २० मिलियन डॉलर खर्चून उभारला आहे म्हणे.
हा प्रकल्प तिथल्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टला लागणार्‍या ऊर्जेपैकी फक्त २०% ऊर्जा पुरवणार आहे.
ही जर वाळवंटातली २०१२-२०१३ ची स्थिती असेल तर कोणत्या आधारे उत्पादन खर्च कमी झाला आहे असे म्हटले आहे ते वाचायला आवडेल.

Perrigo said the solar panels and other energy efficiency programs, such as installing LED light bulbs, have helped cut the city’s annual energy bill from $15 million to $10 million over the last three years.

The treatment plant project was funded using money from the city’s sanitary enterprise fund. Using rebates and grants, Perrigo said, the city is able to drive down the costs of installing solar panels.

The renewable energy projects will pay for themselves in about 25 years, but they are expected to be in use for upwards of 40 years, he said.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने