मोकळेपणा...

काल माझ्या मुलीने तिच्या क्लासला दांडी मारली आणि माझ्या देखत तिच्या बाईंना फोनकरून सांगितले. बाईनी तिला कारण विचारले तेव्हा ती अत्यंत सहज म्हणाली, "अहो मॅडम, माझे पिरीयडस् आले आहेत आणी पोट खुप दुखतंय." मला त्या संवादातल्या सहजतेची आणि मोकळेपणाची ( किंचित हेवा आणि) खूप गंमत वाटली. तिचे पिरीयडस् चालु झाले तेव्हा १ल्यांदा तिने अगदी आनंदात मलाच सांगितले होते.

पुरुषांच्या लैंगिक जीवनाबद्दल असा मोकळेपणा मला आजतागायत दिसला नाही. कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?

आयायटीत असतानाचा एक प्रसंग. सुटी असल्यामुळे हॉस्टेल बरेच शांत होते. मी व्हरांड्यात फेर्‍या मारताना माझ्या एका मित्राच्या खोलीतून खडखड आवाज ऐकू आला. मला आश्चर्य वाटले म्हणून तिथे रेंगाळलो. पण खडखडाट तसाच चालु राहिला. मग माझं कुतुहल चाळवलं म्हणुन मित्राच्या रुमच्या खिडकीला लावलेल्या फाटलेल्या कागदाच्या छिद्रातुन आजुबाजुला कोणी नाही हे बघुन आत काय चाललंय हे बघितले, तर अनपेक्षितपणे सर्दच झालो. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेला माझा मित्र एका हातात प्लेबॉय घेऊन दुसर्‍या हाताने आत्मानंदाच्या उपासनेत तल्लीन झाला होता. अनपेक्षित दृष्याने अंगावर शहारे आल्याने मी तिथुन बाजुला झालो.

संध्याकाळी ४ च्या सुमारास हाच मित्र माझ्या रुमवर आला आणि म्हणाला, "चल मी "स्टाफ-सी"ला (कॅण्टीन) चहा प्यायला जातोय, येतोस का?" मी हो म्हटलं आणि त्याच्या बरोबर गेलो. त्याने दोघांसाठी चहा आणला, आणि आम्ही थोड्या इकडच्यातिकडच्या गप्पा मारल्यावर, माझ्यावर नजर रोखून त्याने मला विचारले,

"Can I ask you a question?"

मी होकारार्थी उत्तर दिले.

"राजीव, डु यु मास्टरबेट?" मित्राने मला विचारले.

या अचानक आलेल्या प्रश्नाने मी कावराबावरा झालो आणि इकडेतिकडे बघायला लागलो. तेव्हा आमच्या शेजारच्या टेबलावर बसुन आमचा संवाद ऐकणारे एक प्राध्यापक महाशय उठले आणि आपला चहाचा कप घेऊन दुसर्‍या टेबलावर जाऊन बसले...

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?

कायम या शब्दावर पहिला जोरदार आक्षेप. हस्त किंवा कोणत्याही मैथुनाला वल्गर म्हणत असाल तर दुसरा जोरदार आक्षेप.
बाकी, फक्त आयआयटीतल्या पुरुषांची अभिव्यक्ती कायम वल्गर स्वरूपात बाहेर पडत असेल तर माहित नाहि ब्वॉ Wink

एका महत्त्वच्या विषयावरील लेख अगदीच सरसकटीकरण करणारा वाटल्याने मुळ विषयाशी संबंधीत प्रतिसाद द्यावासा वाटत नाहिये असे खेदाने म्हणावेसे वाटते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश,

तुमचे निष्कर्ष जरा चुकले आहेत. हा धागा जरा पुढे गेला तर मी "कायम वल्गर" असे का म्हणतो ते कळायला मदत होईल.

हस्त किंवा कोणत्याही मैथुनाला वल्गर म्हणत असाल तर

हा दुसरा घाईघाईत काढलेला निष्कर्ष. मी फक्त लैंगिकतेच्या पुरुषी अभिव्यक्तीबद्दल माझे निरिक्षण नोंदवले. त्याला सरसकटीकरण म्हणणे मला योग्य वाटत नाही.माझी बायको म्हणते आजकालच्या मुली फर्टीलिटी ट्रिट्मेटबद्दल आपापसात अगदी सहज गप्पा मारतात. पुरुषांमध्ये हा मोकळेपणा कधिच दिसला नाही. असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कधीच', 'कायम' अशा शब्दयोजनेनंतरही हे सरकटीकरण नसेल तर नसो बापडे.

बाकी, आमच्या लहानपणी तरी सोडा-बाटली फुटणे वगैरे शब्दप्रयोगाद्वारे यावर ८वी वगैरेच्या मुलग्यांमध्ये उघड चर्चा होत असे. ज्यु.कॉलेजांमध्ये हस्तमैथुनाच्या 'फ्रिक्वेन्सी'वर चर्चा झाल्याचेही पुसटसे आठवते आहे. माझ्या कॉलेजातील मुली पिरिएड्स आहेत हे मुलांनाही सहज सांगत असत. (साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट). पातळ जोकर गमकडे बघत केलेल्या विनोदांवर मुले-मुली दोघेही निखळपणे हसत. परवाच आमच्या परिचितांचा मुलगा (वय १२-१३ असावे) वडिलांना स्पर्म डोनेशनचे मौलिक उपयोग सांगत असल्याची चमचमीत बातमीही कानावर आली. असो. अधिक डिटेल्स जाहिर नकोत.

बाकी बायका त्यांच्या हस्तमैथुनाबद्दल, वेटड्रीम्सबद्दल मोकळेपणाने जाऊद्या उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणेही एकमेकिंशी बोलताना मात्र मी अजूनतरी ऐकलेले नाही. तरीही त्या मोकळ्या आणि पुरूष वल्गर कसे?

तेव्हा पुरुषांमधे या विषयावर बोलताना मोकळेपणा दिसला नसेल तर तुमचे परिचय विश्व तरी कमी असावे किंवा तुम्हाला या विषयांवर चर्चा करण्यात रस असणार्‍या वयोगटाची मुले घाबरत तरी असावीत किंवा तुमचा अतिशय आदर करत असावीत अशी शक्यता वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरषांशी बोलत नसतील पण एकमेकींशी बोलतो. क्वचित बोलतो पण बोलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पुरुषांच्या लैंगिक जीवनाबद्दल असा मोकळेपणा मला आजतागायत दिसला नाही. कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?<<

असहमत. माझा असा अनुभव आहे की ज्या गोष्टींविषयी गांभीर्यानं बोलायला लोक कचरतात त्यांबद्दल ते मोकळे होण्यासाठी समोरचा माणूस ते तितक्याच गांभीर्यानं घेईल ह्याविषयी त्यांना विश्वास वाटणं गरजेचं असतं. तो विश्वास वाटला की लोक आपापल्या कामजीवनाविषयी, विशेषतः त्या संदर्भात असलेल्या असुरक्षितता किंवा भीती किंवा गंड यांबद्दल मोकळेपणानं आणि गांभीर्यानं बोलतात.

एखादा पुरुष आपल्या खोलीत हस्तमैथुन करताना दिसला तर सर्द होणं, किंवा 'तू हस्तमैथुन करतोस का?' ह्या प्रश्नावर कावराबावरा होणं ह्यामधून 'लेखक लैंगिकतेबद्दल मोकळा नव्हता' एवढाच निष्कर्ष काढता येतो. पण तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऋ ह्यांच्याशी सहमत -१००%

@तर्कतीर्थ -

मी ह्या विषयावर माझ्या मित्रांशी आणि समवयस्क भावडांशी नेहमीच अगदी मोकळेपणाने बोललो आहे. आणि मित्र म्हणजे एक ठरावीक 'ग्रूप' मधले नव्हे तर वेगवेगळ्या मित्रांशी (शाळेत, कॉलेज, होस्टेल, ऑफीस ई. ) झालेल्या गप्पा तितक्याच मोकळ्या होत्या/आहेत. त्यात कुठल्याही ग्रुप मधे असे कधीच काही 'vulgur' वाटले नाही. काही वेळेस तर ह्या संवादांमुळे काही मित्रांना ह्याचे फायदेही झाले (ज्या मित्रांचा संगणक, अंतरजालाशी तेव्हा फार सबंध नव्हाता तेव्हा बाकी लोक्स आपआपले ज्ञान पाजळायचे त्यातून ह्यांना माहिती कळायची उदा. हस्तमैथुनामूळे वंध्यत्व येतं, अकाली वृद्धत्व येतं इ. अंधश्रद्धा आमच्या अश्या मोकळ्या चर्चांमूळे कायमच्या दूरच झाल्या).

पण तुमच्या मित्राने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाने तुम्ही कावरेबावरे का झालात ह्याचे कुतूहल आहे (मैत्रिणीने विचारल्यास असे वाटणे समजू शकतो, तेही व्यक्तिशः मला तसे वाटणार नाही). तुमच्या मित्राने विचारलेल्या प्रश्नाने तुम्ही कावरेबावरे झालात म्हणून मला एक प्रश्न तुम्हाला विचारवा वाटतो, त्याने विचारलेला प्रश्न तुम्हाला खरंच 'vulgur' वाटला होता तेव्हा? तसे असल्यास मला वाटते तुम्ही तुमच्या वैयक्तिक विचारसरणीचा निष्कर्ष "पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती" ह्याच्याशी सरसकटपणे लावता आहात. हे माझे मत झाले, चुकही असू शकते.

"तेव्हा आमच्या शेजारच्या टेबलावर बसुन आमचा संवाद ऐकणारे एक प्राध्यापक महाशय उठले आणि आपला चहाचा कप घेऊन दुसर्‍या टेबलावर जाऊन बसले..." मला असे वाटते की प्राध्यापक साहेबांनी तुम्हाला उलट 'मोकळेपणा'च दिला असावा.. त्यांना असे वाटले असेल तुम्हाला उगीच त्यांचे व्यत्यय नको म्हणून ते स्वतःच तिथून तुम्हाला न रागावता व काही बोलता निघून गेले असावे. तसे असल्यास त्यांचा आदरच वाटतो.

(पण एक मोकळेपणाचा अभाव मला नेहमीच जाणवतो पुरुषांमध्ये. एक मुलगी तिच्या मैत्रिणीला किती सहज सांगते की तुझा भाऊ कसला चि़कणा आहे ओळख करुन दे ना असं .. तसं पुरुष त्याच्या मित्राला कधीच मोकळेपणाने सांगत नाही की तुझी बहीण कसली चिकणी आहे ते Blum 3 Smile .. एका फोरवर्डेड विनोदात हे वाचलं होतं पण ते पटलं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(पण एक मोकळेपणाचा अभाव मला नेहमीच जाणवतो पुरुषांमध्ये.

हाच माझा मुद्दा आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा तर्कतीर्थ साहेब, मी ते गमतीने म्हणालो आहे, त्याचं पुढे मी विश्लेषण दिलं आहे... तुमच्या मूळ लेखाशी मी सहमत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा तर्कतीर्थ साहेब, मी ते गमतीने म्हणालो आहे, त्याचं पुढे मी विश्लेषण दिलं आहे... तुमच्या मूळ लेखाशी मी सहमत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चि. जंतू

" ह्या प्रश्नावर कावराबावरा होणं ह्यामधून 'लेखक लैंगिकतेबद्दल मोकळा नव्हता' एवढाच निष्कर्ष काढता येतो."

त्या अनुभवापर्यंत मी नक्कीच मोकळा नव्हतो आणि माझ्या आजुबाजुचे वातावरण पण नक्कीच मोकळे नव्हते. कदाचित हा आमच्या जनरेशनचा परिणाम असेल. माझा एक मामेभाऊ (वीस वर्षांनी लहान)मला सांगायचा की आम्ही ब्लुफिल्म्स पाहिल्या म्हणुन आम्हाला आईबाबा मला कधीच रागावले नाहीत. मी ज्या वातावरणात वाढलो त्यात हे स्वातंत्र्य अशक्य होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन रोचक वाटले. त्याबद्दल बरीच भवति-न भवति होऊ शकेल.

यावरून एक दुसरा रोचक संदर्भ आठवला, तो येथे देतो.

कथाकार सतीश तांबे यांच्या कथेमध्ये खालील अर्थाचा संवाद/उल्लेख आहे. तो या धाग्यातल्या विवेचनाशी संबंधित आहे असं मला वाटलं. तांबे (बहुदा एका पात्राच्या तोंडी) असं काहीसं म्हणतात:

"आपल्याकडे मुलींना सर्वात प्रथम पाळी येते त्याबद्दल आत्यंतिक काळजी घेतली जाते. मुलींच्या आया त्यांना पूर्वीपासून कल्पना देऊन ठेवतात. इतकं करून शाळेत जाणार्‍या एखाद्या मुलीला अनपेक्षितपणे पाळी आली तर त्याचा बडिवार माजवला जातो. सर्वतोपरीने काळजी घेऊन शेवटी तिला घरी पाठवलं जातं. मुलग्यांचं पौगंडावस्थेमध्ये येणं याची कुणीही दखल घेत नाही आणि त्याची गरजही निर्माण होत नाही. असं का असावं ? तर मला वाटतं की मुलींना पाळी येते तेव्हा त्याचा लालभडक डाग त्यांच्या कपड्यांवर दिसतो आणि त्याचा बभ्रा होतो. मात्र, मुलग्यांचा वीर्यस्त्राव - मग तो झोपेतला असो की जागेपणीचा असो, मुद्दाम घडवून आणलेला असो की नकळत घडलेला असो - तो transparent असतो आणि बहुतांशी त्याचे डाग दिसत नाहीत/पुसट असतात/विरून जातात. थोडक्यात मुलींच्या वयात येण्याचा बागुलबुवा किंवा त्याच्या भवतालची अधिकची संवेदनशीलता ही, निव्वळ त्या लैंगिकतेचं अपरिहार्य दर्शन लपवण्याबद्दलची असते. मुलग्यांचं वयात येणं हे गृहित धरलं जातं आणि त्याचा "इव्हेंट" होत नाही कारण त्याचे ठळक असे दृष्य परिणाम नसतात. "

वरच्या परिच्छेदातले शब्द तांब्यांचे नाहीत. माझ्या आठवणीतून लिहिलं आहे. पण मला हे विवेचन (किमान मला परिचित असलेल्या, मी ज्या वातावरणात वाढलो त्या भारतीय संदर्भात) पटलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मूळ स्त्रोतापासून केलेले उधृत :

"माझ्या या स्वयंस्फूर्त लैंगिक शिक्षणामुळे काही मुलं तर - मला आजही आठवतंय की - मी दिसलो की 'पोरं पकडायची गाडी आल्यागत' लांबलांब पळायची. ह्याबाबतचे अनेक किस्से मला आठवतात. त्यातील एक मासलेवाईक किस्सा सांगतो आणि हा विषय आटोपता घेतो.

पहिल्यांदा गळल्यावर म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं तर 'वीर्यस्खलन' झाल्यावर बहुतेक मुलं अस्वस्थ होतात. जशा बहुधा मुलीही पहिल्या पाळीमुळे होत असतील. पण पाळीचा तांबडा ओघ शोषून घेण्यासाठी मुलींना पूर्वतयारी करावी लागत असल्यामुळे 'नाइलाज को क्या इलाज' ह्या न्यायानेही असेल; घरातील आयाबाया मुलींशी पाळीसंबंधात आधी थोडंफार तरी बोलतात. मुलांच्या बाबतीत मात्र तो नैसर्गिक पांढुरका स्त्राव तिथल्यातिथे बिनबोभाट कपड्यातच जिरायची सोय असल्याने त्यांच्याशी घरातील बाप्ये ह्या विषयावर सहसा काही बोलत नाहीत, हे जाणवून मी वयात येऊ घातलेल्या मुलांशी त्या काळात 'झोपेत गळणं' ह्या विषयावर जाणीवपूर्वक बोलत असे. तसंच हस्तमैथुन - म्हणजेच बोली भाषेत सांगायचं तर 'गाड्या मारणे, मुठ्ठ्या मारणे' - ह्या विषयावरही बोलत असे. हेतू हा, की त्यांच्या मनात कोणताही गंड तयार होऊ नये!"

कथा : "करीना, माझी वियाग्रा"
संग्रह : "रसातळाला ख.प.च."
लेखक : सतीश तांबे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काय झाले वाटतं जेवण? काय बेत होता ब्वॉ आज? असे चारचौघात विचारले जाणे हे सहज आहे. त्यात कुणाला आक्षेपार्ह वाटत नाही. पण हीच गोष्ट लैंगिकते बद्दल विचारण आजही शिष्टसंमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमचे म्हणणे अगदी पटते प्रकाश पण ह्या लेखात ते जे म्हणतात किंवा त्यांचा जो मूळ प्रश्न आहे "पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?" हे काही पटत नाही. हे त्यांचे खूप व्यक्तिगत मत वाटते, असे सरसकटपणे सगळीकडे होतच असे नाही (बहुतांशी तसे होत नाहीच, थोड्याफार प्रमाणात का होईना तो मोकळेपणा पुरुषांमध्ये असतोच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>त्या अनुभवापर्यंत मी नक्कीच मोकळा नव्हतो आणि माझ्या आजुबाजुचे वातावरण पण नक्कीच मोकळे नव्हते. कदाचित हा आमच्या जनरेशनचा परिणाम असेल. माझा एक मामेभाऊ (वीस वर्षांनी लहान)मला सांगायचा की आम्ही ब्लुफिल्म्स पाहिल्या म्हणुन आम्हाला आईबाबा मला कधीच रागावले नाहीत. मी ज्या वातावरणात वाढलो त्यात हे स्वातंत्र्य अशक्य होतं.<

आईवडिलांबरोबर ह्या गोष्टी बोलणं आणि समवयस्क मित्रांत बोलणं ह्यात फरक करायला लागेल. तुमचा मूळ मुद्दा हा समवयस्क पुरुषांमधल्या लैंगिक अभिव्यक्तीबद्दल असावा असं मला वाटतं. आईवडिलांशी बोलणं निषिद्ध असलेल्या अनेक गोष्टी समवयस्क मुलांत मोकळेपणे बोलल्या जात असायला हरकत नाही. किंबहुना तो एक महत्त्वाचा मोकळा अवकाश सर्वांना सर्व पिढ्यांत उपलब्ध असतो किंवा असायला हवा. त्यामुळे वयात येताना समवयस्क मुलांतदेखील लैंगिक गोष्टी गांभीर्यानं चर्चिल्या जात नसतील तर ते हानिकारक असेल हे मान्य. पण सरसकट तसंच होतं हे अमान्य. 'हस्तांदोलन' ह्या धाग्यात मागे मी म्हटलं होतं त्याप्रमाणे काही गोष्टी खास मराठी नागरी मध्यमवर्गीय (आणि त्यामुळे तेव्हा अल्पसंख्य असलेल्या) समाजात सर्रास असल्या तरी तो सरसकट सर्व समाजाचा गुणधर्म ठरत नाही.
!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्या काळची गोष्ट. आमच्या खेड्यात इंटरनेट नव्हतं, नुकतीच तिथे गेल्यामुळे लॅप्टॉपचे पैसे जमा झाले नव्हते. भारतातही नुकतंच केबलनेट वगैरे आलेलं होतं. त्यामुळे अर्बन डिक्शनरी माहित नसणारे तरूण लोकच इंटरनेटवर जास्त असतील.

आम्ही काही विद्यार्थी विद्यापीठाच्या घरात एकत्र रहायचो. सुरूवातीला मला सगळ्यांचे इंग्लिश उच्चार समजत नव्हते आणि पुरेशी मैत्रीही झाली नव्हती. काही महिन्यातच एकमेकांची पुरेशी ओळख पटल्यावर जो मोकळेपणा आला होता त्यातून झालेला गंमतीशीर संवाद. थंडीतल्या एका रविवारी घरातले बरेचसे काही ना काही कारणामुळे घरातून बाहेर असणार होते. घरी इंटरनेट नसल्यामुळे मुख्य टाईमपास व्हीडीओ गेम्स हाच होता. माईक एकटाच घरी असणार होता. त्याला कोणीतरी विचारलं, "तू एकटाच घरी कशाला रहातोस. तू पण माझ्याबरोबर चल किंवा घरी जाऊन ये. एकटा कंटाळशील."
माईक म्हणे, "नाही. मी कशाला कंटाळेन? माझं प्लेस्टेशन आहे, नवा गेम घेऊन आलं की झालं."
तरीही समोरचा, "अरे पण एकट्याला कंटाळा येईल. तू काय करणार घरी बसून?"
माईकने शांतपणे उत्तर दिलं, "हॅव अ वँक."
लोकांचं हसून झाल्यावर माझा ढ प्रश्न, "म्हणजे काय?"
माईक आणि आणखी एकाने तेवढ्याच शांतपणे, "मास्टरबेशन" असं उत्तर दिलं.
पुन्हा एकदा माझं अज्ञानप्रदर्शन आणि जोकवर हसले. यावेळेला मलाही हसता आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी काँप्युटरचा कोर्स करत होते. प्रॅक्टीकल्स्ना मेहनत अन चिकाटी लागायची लागायची, वेळखाऊ काम होते. क्लासमधले सगळेच तरुण अन टारगट होते. टीमवर्क होते, भरपूर मेहनतीनंतर एक प्रॉब्लेम सुटला.

माझ्या टीममध्ये आम्ही ४ जणं तरी होतो. दुसर्‍या टीममधल्याने आमच्या टीममधल्या एकाला अविश्वासाने विचारले - लेकीन तूने कुछ ट्राय मारा क्या? तूने कुछ किया क्या?
यावर हा उत्तरला - "नही सिर्फ हिलाते बैठा था" यावर जो हशा पिकला. मला हसता आले नाही, खूप ऑकवर्ड झालं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ऋषिकेश ह्यांचे म्हणणे पटले. बायका कदाचित periods आणि fertility बद्दल बोलत असतील, पण masturbation/ मैथुन ह्याबाबतीतल त्या क्वचितच बोलतात. त्याची कारणमीमांसा करायची म्हटला तर एकच गोष्ट माझ्या मनात येते: periods येणं/ infertile असणं ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत, पण masturbation करणं ह्यामध्ये "करणं" आहे (एखादी गोष्ट जी आपण थांबवू शकतो), त्यामुळे मुली/ स्त्रिया कदाचित ह्याबद्दल बोलत नसाव्यात. पण त्या हि गोष्ट करत नाहीत ह्यावर माझा विश्वास नाही, पण त्या तसा करत नसाव्यात ह्यावर ठाम विश्वास असणारे बरेच सापडतील.

Vulgarity बोलायचा झाला तर, एखादी गोष्ट vulgar किंवा ओंगळवाणी आहे ह्याचा प्रत्येकाचं मोजमाप वेगळ असू शकत. मुलींनी periods बद्दल बोलणं, पुरुषांनी mastubation बद्दल बोलणं ह्या दोन्ही गोष्टी मध्ये vulgar खरंतर काहीच नाही. आपली मानसिकता आपल्याला तसा विचार करायला भाग पाडते.
इथे एका लेखाची link देत आहे, ह्या विषयाशी थेट संबंध नाही, पण जवळून जाणारा विषय आहे .
http://genderbytes.wordpress.com/2010/12/17/is-it-a-crime-to-menstruate/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्व्युत्तर शिक्षण घेताना आपल्या मोकळेपणाच्या अथांग व्यासंगाचे प्रदर्शन व इतर अज्ञान बालकांना ज्ञान देण्याबद्दल असलेला उत्साह मी पुरूषवर्गात पाहिला आहे, काही मुली देखील क्वचित त्यांच्या अनुभवांबद्दल बोलत असत पण मुली आपापसात अधिक बोलत असतील अशी शंका होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या मोकळेपणाच्या अथांग व्यासंगाचे प्रदर्शन व इतर अज्ञान बालकांना ज्ञान देण्याबद्दल असलेला उत्साह मी पुरूषवर्गात पाहिला आहे,

हाहाहा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१११११११११११११११११,

हा हा हा, तंतोतंत!!!!

चिऊ: अरे, हा अथांग व्यासंगाचं प्रदर्शन करतोय!!

विशू: कारण विषयच अथांग आहे Wink

या उत्साहाला "विशूगंड" म्हणावे काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अथांगपणाबद्दल एक मस्त वाक्य वाचलं होतं - मध्य रेल्वेवर चिमणी मुतली तरी पाणी साचतं. Wink
हाहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरारारा ROFL ROFL यासारखेच, मुंगीला मुताचा पूर असेही वाचले होते.

असो. अलम् मूत्रेण Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर लोकभाषेतील हस्तमैथुनासाठी वर वापरले गेलेले काही शब्द्प्रयोग ("हलवणे", "वॅन्क", " मुठ्ठ्या मारणे") हे मला (तरी) व्ह्ल्गर वाटतात. "माझे पिरीयडस आले" यात असलेला स्वच्छपणा/मोकळेपणा वरील पुरूषी भाषेत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझे पिरीयडस आले" यात असलेला स्वच्छपणा/मोकळेपणा वरील पुरूषी भाषेत नाही.

मी काही शब्दप्रयोग ऐकलेले आहेत ते मलाही अश्लील वाटतात. बायका सर्रास असे शब्दप्रयोग वापरतात. उदा: काका आल्येत, मावशी आल्ये, पाहुणे येणारेत, इ.

विनोदी प्रकाराने ऐकलंय म्हणजे ब्लड कॅन्सर झालाय, नळाचा वॉशर बिघडलाय, इ.

अनोळखी लोकांसमोर बोलताना, कमीतकमी स्कँड्युलस भाषेत "महिन्यातले चुकीचे दिवस" असा शब्दप्रयोगही ऐकला/वापरलेला आहे.

वर ज्या माईकबद्दल लिहीलेलं आहे, तो wank हा शब्दच काय, कधीमधी हातानेही नाटकी कृती करत असे. एकंदर त्याचा स्वभाव, हेतू, पवित्रा पाहून ते सगळं विनोदी असण्यापलिकडे काहीही वाटलं नाही. तरीही जोशीकाकूंनी वर काढलेला मुद्दा, आपसूक होणारी गोष्ट आणि मुद्दाम करावी लागणारी गोष्ट असा फरक रहातोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणी कुणाची चड्डी दिसत असेल तर आम्ही "हॅपी बर्थ्डे" म्हणत असू त्याची आठवण झाली.
पण किती लहानपणी तर कधीमधी कोणाची चड्डी दिसत असे इतक्या लहानपणी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>लहानपणी कुणाची चड्डी दिसत असेल तर आम्ही "हॅपी बर्थ्डे" म्हणत असू त्याची आठवण झाली. <<

काही वर्षांपूर्वी एकांकडून ऐकलेला वाक्प्रचार : "एबीसीडी" म्हणजे "अगं बाई, चड्डी दिसते !"

(अवांतर : सांगणार्‍या माणसाने जरी तो स्त्रियांच्या बाबत सांगितला असला तरी पुरषांनाही लागू होऊ शकतो. फारतर "अरे बापरे, चड्डी दिसते" असं होईल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आम्हाला जुनिअर कॉलेज मध्ये 'एका कपातून चहा पिला तर प्रेग्नंट राहत नाही' वगैरेसारखी लेक्चर्स एक दोनदा ठेवली होती. पण सेक्स म्हणजे काय किंवा मुले कशी होतात यावर काहीही ज्ञान दिले नव्हते.
वरचे वाचून एका प्रसंगाची आठवण झाली. आम्ही सिनिअर कॉलेजमध्ये असताना र. धो कर्वें बद्दल एक पुस्तक आम्ही मैत्रिणीनी वाचले होते. समागम करताना स्त्री पुरुष खरंच संपूर्ण नग्न असतात का, यावरच मी अडलेली (म्हणजे मनाला ते पटतच नव्हते, विविध कारणांनी :)). ते पुस्तक मला कितीस कळलं होतं कुणास ठाऊक? पण त्यानंतर माझ्या अतिशय साध्या, सरळ, नाकासमोर चालणार्या (म्हणजे माझ्यासारख्या उर्मट, बिनधास्त मुलीच्या अगदी उलट) मैत्रिणीने 'ते लिंग आपल्या एवढ्याशा जागेत कसे जात असेल?' असा प्रश्न विचारला आणि मी हादरूनच गेले. मुका आणि मिठीच्या पलीकडे आमचं ज्ञान खुंटलेल. मनाने त्याची कल्पनाही करायला संस्कारांनी बंदी घातलेली. आणि तिने कसले विचित्रच चित्र आमच्या दृष्टीसमोर उभे केले.आत्तापर्यंत तगीने धरून ठेवलेला अज्ञानाचा पडदा क्षणार्धात गळून पडला.
आज जेव्हा माझी दहा वर्षांची मुलगी मलाच सांगत असते कि प्रेग्नंट कसे राहतात/ बाळ कसे तयार होते त्याचे व्हिडीओ तिने शाळेत बघितलेत म्हणून, तेव्हा थक्क व्हायला होते. काय काळ बदललाय नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेन्युइन शंका- डॉक्टर डॉक्टर हा खेळ युनिव्हर्सल आहे काय? परवा एका इंग्रजी ब्लॉगवरही त्याचा उल्लेख वाचलेला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ धाग्याशी अवांतर आहे पण परवाच माझ्या सहा वर्षांच्या मुलीशी झालेले संभाषण आठवून अजूनही हसू येते आहे.
नवर्याला सहज मुका देताना पाहिल्याने कन्यकेने "डर्टी किस" अशी टिप्पणी करून आपला चेहेरा ओंजळीत लपवला हे पाहून आम्ही फारच चपापलो. हे काय नवीनच असे म्हणूनच मी थोडी चाचपणी केल्यानंतरचे संभाषणः
मी: हे डर्टी किस काय प्रकरण आहे आणि तू ते कुठे ऐकलस?
मुलगी: मी नाही सांगणार, तू चिडशील.
मी: मी मुळीच नाही चिडणार, तू सांग.
मुलगी (घाबरत) : आफ्टरस्कूल केअरमधे विकी सांगत होती.
मी: ही विकी कोण? तुझ्या वर्गात आहे का?
मुलगी: नाही, ती चौथीत आहे.
मी: तिने अजून काय सांगितले?
मुलगी: चौथीत गेल्यावर मला पीनट्स बद्दल शिकावे लागेल.
मी: पीनट्स??? पीनट अ‍ॅलेर्जी का?
मुलगी: नाही गं...पीनट्स...म्हणजे प्रायव्हेट पार्ट.
मी (हसून हसून दमल्यावर) : मला तर फक्त खायचे पीनट्स माहिती आहेत. तिने अजून काय सांगितले?
मुलगी: मी नाही सांगत, तू खरंच चिडशील.
मी: मी नाही गं चिडत..तू पहातेयस ना की मी हसतेय.
आतापर्यंत हसू लपवत काही ऐकलेच नाही असे दाखवणारा नवरा (माझ्या कानाशी कुजबुजत): तू उगीच तिला जास्त विचारत बसू नकोस..ती अजून लहान आहे.
(त्याच्या कपाळावरचा घाम मला स्पष्ट दिसतोय... या पुरुषांना लैंगिक संभाषणात मोकळेपणा की काय ते कळतच नाही ;-))

मुलगी: तिने सांगितले की मुलेमुली एकमेकांना डर्टी किसेस देतात आणि मग लग्न झालेले नसताना त्यांना मुले होतात.
मी (चहाटळपणे): लग्न झालेल्या लोकांनी डर्टी किसेस दिले तर काय होते?
मुलगी (लाजत): काही नाही.
मी: मग मी डॅडीला किस दिला तर तू का लाजलीस?
नवरा (माझ्याकडे चिडून पाहत) : आता पुरे झालं. (मुलीकडे पाहत): त्या विकीकडे तू लक्ष देत जाऊ नकोस.
मुलगी (त्याच्यकडे दुर्लक्ष करत): आणि विकी अजून खूप घाणारडे शब्द वापरत होती...इतके घाणारडे शब्द की मी बोलूच नाही शकणार..'एस वर्ड'!
मी: एस वर्ड?? मला सांग ना. मी खरंच नाही चिडणार.
मुलगी (घाबरत) : सेक्स.
नवरा: आता बास.
मी: बेटा, तो घाणेरडा शब्द नाही पण मोठ्या लोकांनी वापरायचा शब्द आहे. विकीला तो शब्द कोणी सांगितला?
मुलगी: चौथीत गेल्यावर त्यांना शिकावं लागतं शाळेत. पण आई सेक्स म्हणजे काय?
मी: अगं ते समजायला तू अजून छोटी आहेस, चौथीत गेल्यावर शिकशीलच.
नवरा (मनातल्या मनात): सुटलो.
नवरा (प्रकट): आता बास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीनट्स ROFL ROFL ROFL ROFL

चहाटळ समासविग्रहाची उर्मी रोखून धरल्या गेली आहे. पण संभाषण हिलेरियस एकदम!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. पीनट्सचे कळले पण 'बर्डस् अ‍ॅंड् बीज़्' चे काय स्पष्टीकरण ? (की मी अजून मोठा झाल्यावर मला ते आपोआप कळणार ?;))
२. विकीला चौथीत हे सारे शिकविले जाते असे ती म्हणते. पण, एक म्हणजे ते किसेस् डर्टी आहेत आणि दुसरे म्हणजे ते दिल्याने लग्नाआधी मुले होतात, यासारख्या कल्पना त्या शिकण्यातून तयार झाल्या आहेत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर वरील संभाषणाच्या उत्तरार्धात आहे. (आधी टंकायचा कंटाळा आला आणि नंतर एकदा टंकलेला सारा मजकूर गायब झाला असो.)
मुलांना प्राणीसृष्टीची जवळून ओळख व्हावी म्हणून मुलीच्या वर्गात एक प्रकल्प केला गेला होता. बदकाची अंडी आणून उबवली गेली, मग पिल्ले बाहेर आली..वगैरे वगैरे. रोज मला सविस्तर वृत्तांत ऐकवला जायचा. एके दिवशी आईचे, 'पुनरुत्पादन' या विषयावर बौद्धिक घ्यायचे बाईसाहेबांच्या मनात आले.
मुलगी: आई, आज आम्हाला बदक मुलगा हे की मुलगी हे कसे ओळखायचे ते समजले.
मी: कसे?
मुलगी: बदकाचे पिल्लू उचलून हातात घ्यायचे, ते उलटे करायचे आणि फुंक मारून त्याची पिसे उडवायची. त्यांना प्रायव्हेट पार्ट असतील तर ते मुलगे आणि नसले तर मुली.
मी (स्वगत): देवा!
मी (प्रकट): हो का?
मुलगी: आणि आई, तुला माहितीय? बदकांची आई जरी अंडी देत असली तरी त्यांच्या बाबांना पण एक महत्वाची गोष्ट आईकडे पाठवावी लागते.
मी: हं.
मुलगी: त्यांचं काही माणसांसारखं नसतं, सगळं बाळ फक्त आईकडून यायला!
आता मात्र एरवी संकोचणाऱ्या नवऱ्याचा अहंकार एकदम जागा झाला.
नवरा: असं नाही काय, माणसातही बाळासाठी एक महत्वाची गोष्ट डॅडीला द्यावी लागते.
मुलगी: पण डॅडी, ती आईच्या पोटात कशी जाते?
(आपली घोडचूक नवर्याच्या लक्षात आलेली असते.)
नवरा: ते तुला चौथीत गेल्यावर समजेल.
मुलगी (वैतागून): म्हणजे मला अजून तीन वर्षे थांबावे लागणार?...वेट...इज दिस अबाऊट द 'एस वर्ड' अगेन? आई सांग ना 'एस वर्ड' म्हणजे काय?
मी (चतुरपणे): पिटूसीटूई
(सध्या मुलीला 'हरून अँड द सी ऑफ स्टोरिज' वाचून दाखवतेय.)
मी (स्वगत): आज कधी नव्हे ते योग्य वेळेस योग्य गोष्ट बोलता आली!
मुलगी (वैतागून): नॉट फेअर.
--------------------------------------------------------------------------------------------
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, चौथीतल्या विकीने आपल्या नवीन मिळालेल्या ज्ञानाने, हुरूप येऊन लहान मुलींची शाळा घेतल्याने त्यांना गोष्टी अशा समजल्या Smile एकीने दुसरीच्या कानात, दुसरीने तिसरीच्या कानात या प्रकारानंतर आमच्या कन्यारत्नाला उमगलेलं ज्ञान असं होतं.
परवा या प्रसंगाबद्दल मैत्रिणीशी बोलताना अजुनच मजा समजली. तिची मुलगी चौथीत असताना जेंव्हा त्यांना शाळेत हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना त्याविषयी मुलांना विचारायला सांगितलं. माझ्या मैत्रिणीने मुलीला विचारलं की काय शिकवलं आज शाळेत? तर ती उत्तरली "काहीतरी 'रजायना' बद्दल सांगत होते. ('रजायना' हे कॅनाडातले एक गाव आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

तुमच्या कन्यारत्नाला भेटायला मजा येईल. श्रीयुत रुची यांच्याबद्दल अपार करूणा दाटून आली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'पीटूसीटूई' हे प्रकरण केवळ धन्य __/\__ !

वेट...इज दिस अबाऊट द 'एस वर्ड' अगेन?
..............हुशार आहे हो पोरगी ! चौथी = 'एस वर्ड' हे समीकरण तिच्या डोक्यात घट्ट बसले आहे.
(मला तर चौथी म्हटली, की स्कॉलरशिपचाच एस् आठवतो. Lol

शाळेत हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना त्याविषयी मुलांना विचारायला सांगितलं.
..........हा प्रकार उपयुक्त आहे. त्याचे निकाल शिक्षकांपर्यंत पोहोचले म्हणजे मिळवली.

(पीनट्स् झाले, बर्डस् झाले आता फक्त 'बीज्' विषयी कळले की धडा बहुधा पूर्ण होईल.. Smile
मी केवळ गंमत करतो आहे. चौथीतल्या शिक्षणाचा एकूण प्रकार लक्षात आला. सविस्तार उत्तराबद्दल आभार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण संभाषण हिलेरियस एकदम!!!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीचा ऋतुस्त्राव आणु पुरुषाचे हस्तमैथुन म्हणजेच लैंगिकता असे या चर्चेचे गृहितक दिसते आहे. आईने आपल्या मुलीला ती ऋतुमती होण्या आधी तशी कल्पना देणे आणि बापाने आपल्या मुलाला तसे काहीही न सांगणे हे किंवा स्त्रियांनी आपल्या ऋतुस्त्रावाबद्दल मोकळेपणाने बोलणे म्हणजे तो खुल्लमखुल्लेपणा आणि पुरुषांनी आपल्या हस्तमैथुनाबद्दल उघडपणे न बोलणे किंवा तसे कुणी बोलले की अस्वस्थ होणे म्हणजे व्हल्गॅरिटी असाही एक हायपॉथिसिस दिसतो. इतक्या बंदिस्त चिरेबंदीत काही निष्कर्षाप्रत येणे कठीण आहे. मोकळेपणा विरुद्ध चोरटेपणा आणि श्लील विरुद्ध अश्लील असा काही वाद असता तर काही बोलता आले असते.
बाकी भारताबाबत बोलायचे तर (सरसकटीकरणाचा संभाव्य आरोप सहन करुनही) भारत हा एक मोठ्या प्रमाणावर लैंगिक वैफल्य आलेल्या लोकांचा देश आहे. मुलांमध्ये लैंगिक भावना जागृत होणे, उत्थापन होणे, समागमाची भावना होणे आणि प्रत्यक्षात समागमाची संधी मिळणे यामध्ये बराच मोठा काळ जातो. दरम्यान हे सगळे सळसळत्या वीर्याचे जवान आसुसल्या नजरेने येणार्‍याजाणार्‍या स्त्रियांची छाती-नितंब न्याहाळत, गणेशोत्सवाच्या गर्दीत मिळेल तिचे मिळेल ते कुरवाळत, सविताभाभी-वेलम्मा बघत कापडा-फडक्यांत आपल्या कोट्यावधी शुक्राणूंचा निचरा करत असतात. हे असह्य झाले आणि सगळे शरीर 'आता बाई हवी' म्हणून बंड करुन उठले की मग जी हाती येईल ती मादी भोगली जाते. एरवी साठ वर्षाच्या बाईवर आणि चार महिन्यांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचे काय समर्थन आहे? त्यातून अनैसर्गिक संभोग-गुदमैथुन वगैरे म्हणजे आणखी वरच्या पातळीवरचा आनंद -एक्सटसी - अशी समजूत आंतरजाल आणि पिवळ्या कागदांत मिळणारे साहित्य यांनी करुन दिली आहे. त्यामुळे कामसुखाची -आम्ही कॉलेजात असताना गमतीने करत असू तशी - लिंगभोगाचे घर्षणजन्य सुख ही व्याख्या कालबाह्य होऊन तिला परपीडनाचे एक परिमाण प्राप्त झाले आहे. (दिल्ली रेप केस)
बाकी मुले लैंगिकतेविषयी बोलताना अधिक अश्लील बोलतात -आणि खुलेपणानेही बोलतात - हे खरे असावे. आमच्या होस्टेलच्या मजल्यावर एकूण मुले किती, त्यातली रोज हस्तमैथुन करणारी किती, प्रत्येक हस्तमैथुनात निचरा होणारे वीर्य किती, मग हे सगळे एकत्र केले तर दररोज आपल्या होस्टेलवर किती वीर्य गोळा होईल अशी अभ्यासपूर्ण चर्चा होत असे. दार बंद करुन कुणी आत एकटा असला की दारावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव होई आणि बावरलेल्या चेहर्‍याने त्याने दार उघडले की 'पाटल्या, रोज मुठ्ठी नको मारत जाऊस साल्या..' असे म्हणून त्याच्या पाठीत धपाटे मारले जात. परीक्षेच्या दिवसांत तर काय, हस्तमैथुन हा झोप घालवण्याचा हमखास उपाय होता. 'तू जाऊन ये, मगे मी जातो' असे ठरवून होत असे. ब्ल्यू फिल्म पहिल्यांदा बघताना आळीपाळीने बाथरुममध्ये जाऊन येणे यात काही वावगे कुणालाच वाट्त नसे. आमच्यापैकी एकाने चक्क वृत्तात बसणारे 'लिंगस्तोत्र' लिहिले होते. त्याचे मोठमोठ्यांदा वाचन होई. लैंगिक शिव्या तर काय वाक्यागणिक एक वापरल्या जात. कायम चूर्णाच्या जाहिरातीतल्या 'मैं कब्ज हूं' असे म्हणणार्‍या राक्षसाच्या उद्गाराचे 'बाईला फ्रीज हवा' च्या धर्तीवर विडंबन होत असे. त्या काळात आमच्या काही मोकळ्या मैत्रिणी 'आम्हीही लैंगिक बोलतो, पण ते फार कमी आणि अगदी सूचक असे असते' असे सांगत असत. मला वाटते, लैंगिक उपासमार झाल्याने मुले ही मुलींपेक्षा जास्त फ्रस्ट्रेट होत असावीत. यावर काही संशोधन झाल्याचे कुणाच्या पहाण्यात आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

प्रतिसाद आवडला.

लैंगिक उपासमार झाल्याने मुले ही मुलींपेक्षा जास्त फ्रस्ट्रेट होत असावीत. यावर काही संशोधन झाल्याचे कुणाच्या पहाण्यात आहे काय?

यावर संशोधन नक्कीच झालं असणार; शोधावं लागेल.

अशा विषयावर झालेलं संशोधन आणि त्यासंबंधी अनेकविध टीव्ही कार्यक्रम हिस्टरी, स्मिथसोनियन, नॅशनल जिओग्राफिक वगैरे वाहिन्यांवर सुरू असतात. त्यातून समजलेल्या वरवरच्या माहितीमधून केलेला विचार (मत असं म्हणत नाही. लाऊड थिंकिंग)

फ्रस्ट्रेशनच्या बाबतीत, जेवढी कामेच्छा आणि दुर्लक्ष/कार्पेटखाली सारणं जास्त तेवढं फ्रस्ट्रेशन जास्त असं म्हणता यावं. स्त्री आणि पुरुषांची शारीर संबंधांची इच्छा, प्रेरणाच वेगवेगळ्या आहेत. पुरुषांची (प्राण्यांमधे नरांची) प्रेरणा अधिकाधिक स्त्रिया (माद्या) मिळवून त्यांच्याशी संभोग करणं अशी असते. स्त्रियांची (माद्यांची) प्रेरणा योग्य तोच पुरुष (नर) शोधून मगच संभोग करणं अशी आहे. नरांना (मुद्दामच पुरुष असा उल्लेखय केला नाही) आपली गुणसूत्र जेवढी जास्त प्रमाणात पसरवता येतील तेवढी पसरवायची असतात; माद्यांना मर्यादित काळातच संभोगातून पुनरुत्पादनाची संधी असते, ती अयोग्य नरासाठी ही संधी वाया घालवणं त्यांना परवडणारं नसतं.

लैंगिक प्रेरणाच वेगळ्या प्रकारच्या (क्वांटीटी विरूद्ध क्वालिटी) असल्यामुळे अशा प्रकारचा फरक असणं नैसर्गिक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर मुद्दे आहेत हे.
बऱ्याच चर्चांमध्ये, लेखनामध्ये काही अभ्यास वगैरे उद्धृत करत हे मी नेहमी वाचत आलो आहे -

नरांना... आपली गुणसूत्र जेवढी जास्त प्रमाणात पसरवता येतील तेवढी पसरवायची असतात; माद्यांना मर्यादित काळातच संभोगातून पुनरुत्पादनाची संधी असते, ती अयोग्य नरासाठी ही संधी वाया घालवणं त्यांना परवडणारं नसतं.

हे वाचल्यानंतर मला कायमच काही प्रश्न पडले आहेत. याचा आधार काय असावा? जो अभ्यास झाला (असेल) त्यात या प्राण्यांच्या मुलाखती वगैरे घेऊन त्यांची कामसुखामागची प्रेरणा तपासून घेतली असावी का? तपासणीचे निकष काय असावेत? एखाद्या कुत्र्याच्या किंवी कुत्रीच्या संदर्भात ही तपासणी कशी झाली असावी? की हे एक नैसर्गीक तथ्य म्हणून मानलेले गृहितक आहे?
अतिअवांतर प्रश्न: गुणसुत्रे वगैरे वैज्ञानिक तथ्ये माणसाला समजली ती अलीकडच्या काळात, असे विज्ञानाचा इतिहास सांगतो; कामसुखाची त्याआधीच्या हजारो वर्षांची प्रेरणा गुणसूत्रे पसरवणे हीच असण्यासाठी माणसाला गुणसुत्रे वगैरे असतात हे माहिती असणे आवश्यक नव्हते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मुलाखती वगैरे घेऊन त्यांची कामसुखामागची प्रेरणा तपासून घेतली असावी का?

मुलाखती घेता आल्या नसल्या तरी वर्तनाचा निरीक्षणात्मक अभ्यास सखोल केला गेलेला आहे. त्यातुन वर्तनाची शास्त्रीय सत्याची सांगड घातली गेली असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाला गुणसुत्रे वगैरे असतात हे माहिती असणे आवश्यक नव्हते काय?

एखाद्या प्राण्याला गुणसूत्रं म्हणजे काय हे माहित असतं, आणि ती पसरवणं आपलं काम आहे हे माहित असतं म्हणून तो ती पसरवतो असं नसतं. गुणसूत्रं असतात. त्यांच्यानुसार प्राणी बनतात. त्या गुणसूत्रांमुळे त्या प्राण्यांना विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. हे गुणधर्म तत्कालीन परिस्थितीत त्यांची प्रजा वाढते अगर न वाढते. या वाढलेल्या प्रजेतून कुठची गुणसूत्रं (कुठचे गुणधर्म) पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात दिसतील हे ठरतं. जे गुणधर्म त्या परिस्थितीत उपयुक्त ठरतात, ते गुणधर्म प्रदान करणारी गुणसूत्रं पुढच्या पिढ्यांमध्ये टिकलेली दिसतात. यालाच उत्क्रांती म्हणतात. या प्रक्रियेत गुणसूत्रांचं ज्ञान असण्याची काहीच आवश्यकता नाही. जगातल्या काही कोटी प्रजातींपैकी फक्त माणसालाच गुणसूत्रांचं ज्ञान आहे. पण इतरांचं त्यावाचून काहीही अडलेलं नाही.

जो अभ्यास झाला (असेल) त्यात या प्राण्यांच्या मुलाखती वगैरे घेऊन त्यांची कामसुखामागची प्रेरणा तपासून घेतली असावी का?

तर्कतीर्थांनी जे नर व मादी यांच्याबाबतीत लिहिलेलं आहे ते कामसुखापेक्षा सर्वसाधारण लिंगभूमिकांविषयी आहे. कधीकाळी लैंगिक पुनरुत्पादन सुरू झालं. त्याकाळी नर आणि मादी असे भेदभाव असण्याची गरज नव्हती. बहुधा असे भेद नव्हतेच. सुरूवातीला केवळ जनुकांच्या सरमिसळीतून तयार होणारा नवीन प्राण्यात रोगप्रतिकारकशक्ती, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती अधिक म्हणून हे झालं. मग हळूहळू हे भेद तयार झाले. ते होताना नेहेमीप्रमाणेच जनुकीय स्ट्रॅटेजी तयार झाल्या. म्हणजे एका प्रजातीतल्या काही प्राण्यांमध्ये एक क्ष जनुक आहे, ज्यायोगे तयार होणाऱ्या पिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे अधिक अन्न साठवण्याची सोय आहे. अर्थातच अशा प्रकारच्या प्राण्यांना जनुकीय डिमांड आली. कदाचित काही काळ सगळ्यांमध्येच आपल्या बीजाबरोबर अन्न साठवण्याची सोय करण्याची जनुकीय फॅशन आली असेल. मग अशा लोकसंख्येत स्वतः अन्न साठवत बसण्यापेक्षा ज्यांनी साठवलंय अशांबरोबर अधिक पिलं निर्माण करणारा य जनुक असलेला प्राणी यशस्वी ठरतो. त्याची जनुकं पसरतात. शेवटी ध्रुवीकरण होत होत निम्मे नर, निम्म्या माद्या तयार होतात. (हाच क्रम उलटा असणंही शक्य आहे) या सगळ्यात प्रजननाची प्रक्रिया करण्याची ऊर्मी कुठेतरी दोन्हींमध्ये असलीच पाहिजे. आपल्याला गोड खाण्याची जन्मजात ऊर्मी असते तशी. गोडसुखाप्रमाणेच कामसुख उत्क्रांत होतं.

तर्कतीर्थांनी जे लिहिलेलं आहे तो पुढचा भाग झाला. एकदा का नर आणि मादी अशा लिंगभूमिका ठरल्या की त्यातही काही स्ट्रॅटेजी थोड्या वेगवेगळ्या करण्यासाठी वाव असतो. नराकडे जननक्षमता जवळपास अनंत असते. मादीकडे मर्यादित असते. त्यामुळे नर निवडण्याची, त्याच्याकडून आपल्या पिलात गुंतवणुक करून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या प्रजातीत तयार झालेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैंगिक प्रेरणाच वेगळ्या प्रकारच्या (क्वांटीटी विरूद्ध क्वालिटी) असल्यामुळे अशा प्रकारचा फरक असणं नैसर्गिक वाटतं.
हे पटण्यसारखे आहे. लैंगिक सुखाचे आयुष्यातले महत्त्व याबाबत पुरुष आणि स्त्रिया यांच्या व्याख्या वेगवेगळ्या असणे शक्य आहे. उदाहरणार्थ जर खालील प्रश्नावलीप्रमाणे विदा गोळा केला तर त्यात स्त्रिया अणि पुरुष यांचे प्रतिसाद अगदी वेगळे येतील काय?

प्रश्न १: लैंगिक सुखाचे तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे? अजिबात नाही / फारसे नाही / साधारण /महत्त्वाचे महत्त्वाचे / अत्यंत महत्त्वाचे
प्रश्न २: लैंगिक सुखाच्या परमावधीची तुमची कल्पना काय आहे? प्रेमळ संवाद /हळुवारपणा / शृंगारिक संभाषण / शारिरीक जवळीक /हळुवार शरीरसंबंध / धसमुसळे शरीरसंबंध / अनैसर्गिक शरीरसंबंध
प्रश्न ३: लैंगिक सुख आयुष्यातून वजा केले तर तुमच्या आयुष्यात किती फरक पडेल? फारसा नाही/ थोडाफार /फार/ कमालीचा
प्रश्न ४: लैंगिक सुखासाठी जोडीदार निवडताना तुमचा सर्वात महत्त्वाचा निकष काय असेल? सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेला/ली / मानसिक तार जुळणारा/री/ / शारीरिकदृष्ट्या आकर्षक/ सहजासहजी उपलब्ध असणारा/ री / काहीही निकष नाही
प्रश्न ५: संधी आणि धाडस यांची उपलब्धता असेल तर तुम्ही केवळ वैयक्तिक सुखासाठी विवाहबाह्य संबंध ठेवाल काय? कदाचित / सांगता येत नाही / बहुदा / होय / नक्कीच
प्रश्न ६: लैंगिक विषयावर तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणींशी / तुमच्या लैंगिक जोडीदाराशी मोकळेपणाने बोलता काय? कधीकधी / नेहमी/ बोलतो/ते पण मला ते आवडत नाही / नेहमी
प्रश्न ७. तुमच्या जोडीदाराकडून असलेल्या तुमच्या लैंगिक अपेक्षा तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पष्ट शब्दांत सांगू शकता काय? नाही/ कधीकधी / होय पण मला ते आवडत नाही / नेहमी
ही प्रश्नावली प्रातिनिधिक नाही, पूर्ण तर नाहीच नाही. पण असा विदा गोळा केला ( आणि त्यात विदा भरणार्‍या/री चे नाव गुप्त राहील अशी व्यवस्था केली तर त्यातून काही रोचक निष्कर्ष काढता येतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

चांगले प्रश्न आहेत. आधीचा प्रतिसादही आवडला होता. अश्या प्रकारचा अभ्यास झाला आहे असे वाटते. मागे कुठेतरी वाचले होते. हाफिसात अनेक फिल्टरे असल्याने गुगललेले सगळे दुवे उघडत नाहियेते. घरून शोधुन बघतो

अवांतरः प्रशन क्र. ५ मधे "नाही" हा पर्याय का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक प्रश्नावली आहे.

अगदी मर्यादित, म्हणजे ज्यांच्याशी अगदी टोकाच्या मोकळेपणाने संवाद होतो अशा स्त्रिया-मुलींचा विचार केला तर प्रश्न क्र. ७ संदर्भात लग्न झालेल्या आणि न झालेल्या अशी विभागणी करता येईल असं वाटलं. या सगळ्या महानगरांमधे वाढलेल्या, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वतंत्र विचार करू शकतात अशा आहेत.

प्रायमेट्सकडून आलेल्या लैंगिक प्रेरणा (ज्यांच्याबद्दल राजेशच्या प्रतिसादातही माहिती आहे) या अशाच्या अशा दिसतीलच असं नाही. संस्कार, संस्कृती, सभ्यपणा इ मुळे मानवी वर्तन बरंच वेगळं घडतानाही दिसतं. पण सर्व्हेचं सँपल पुरेसं मोठं (म्हणजे किती, हे माहित नाही.) असेल तर पूरक निष्कर्ष निघतील असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.surveymonkey.com/

या सुविधेचा फायदा घेता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नावली रोचक आहे. प्रामाणिकपणे त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तरी ती प्रामाणिक उत्तरे ही तुमच्या मूड नुसार वेगळी असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ती प्रामाणिक उत्तरे ही तुमच्या मूड नुसार वेगळी असू शकतात.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजोपरावांचा प्रतिसाद हे उत्तमरित्या मांडलेलं निखळ सत्य चित्र आहे.

हा प्रतिसाद वाचून कॉलेजच्या दिवसातला "अखिल भारतीय वीर्योत्पादक संघ" आठवला. त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह इत्यादि पदांवर कोणाकोणाच्या (मानद?!) नेमणुका? तसेच खोलीतल्या कोणाला चाचा हलवाई म्हणत आणि इतरही काय काय आठवून हळवा झालो. Smile

पोरे मोकळेपणाने बोलत नाहीत अशी शंका वाचून एकदम "अँ?" झाले होते.

व्हल्गर वगैरे हे सब्जेक्टिव्ह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलगे मोकळेपणी बोलत नाहीत असं नसून जे बोलतात ते रिअ‍ॅलिस्टिक नसतं असं असावं.
[वीर्योत्पादक संघ वगैरे त्या विषयातील रिअ‍ॅलिस्टिक आणि सिरिअस बोलणं नसतं].

या विषयात मुले सिरिअसली केव्हा बोलतात? तर लग्नाच्या आधी अनुभवी मित्रांकडून टिप्स घ्यायच्या वेळीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रिअलिस्टिक नसतं, मौजमजाच असते हे खरं. मूळ प्रश्नाविषयीचा तुमचा तर्क योग्य आहे. पण लेखात खालील वाक्ये आल्याने त्यात फक्त मुळात "मोकळेपणी एकमेकांत बोलणे" (याचा अभाव) इतकाच भाग अपेक्षित वाटला. शास्त्रीय किंवा रियलिस्टिकपणाचा अभाव असा नव्हे.. उदा:

कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?

तर अनपेक्षितपणे सर्दच झालो. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेला माझा मित्र एका हातात प्लेबॉय घेऊन दुसर्‍या हाताने आत्मानंदाच्या उपासनेत तल्लीन झाला होता. अनपेक्षित दृष्याने अंगावर शहारे आल्याने मी तिथुन बाजुला झालो.

"राजीव, डु यु मास्टरबेट?" मित्राने मला विचारले.

या अचानक आलेल्या प्रश्नाने मी कावराबावरा झालो आणि इकडेतिकडे बघायला लागलो.

बाकी मुली त्या वयोगटात पीरियडविषयीच फक्त बोलतात की आणि काही, आणि पीरियडविषयी रियलिस्टिक बोलतात की टाईमपास हेही माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच माझ्या एका मित्राचे फेसबुकवर आलेले स्टेटस फार महत्त्वाचे वाटते. तो लिहितो - "Today's parents will never be able to talk to the kids about sex: they do not have the ability , knowledge or language. "

लैंगिक अभिव्यक्तीसाठी "भारतीयांकडे योग्य भाषा नाही" हा मुद्दा मला सर्वार्थाने पटतो कारण माझ्या व्ह्लगरतेच्या आक्षेपाला तो पुष्टी देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैंगिक अभिव्यक्तीसाठी "भारतीयांकडे योग्य भाषा नाही" हा मुद्दा मला सर्वार्थाने पटतो कारण माझ्या व्ह्लगरतेच्या आक्षेपाला तो पुष्टी देतो

तुमचा व्हल्गरतेचा आरोप पुरूषांच्या लैंगिक अभिव्यक्तीवर होता, भारतीय लैंगिक अभिव्यक्तीवर नव्हे! हा मुद्दा नम्रपणे नजरेस आणून देऊ इच्छितो. का वरील चर्चेनंतर हा मुद्दा केवळ पुरूषांशी संबंधित नसून अधिक व्यापक असल्याच्या जाणिवेची ही कबूली आहे?

बाकी हा मुद्दा केवळ भारतीय असल्याबद्दलही कोणताही ठाम विदा नाहि. काहि युरोपिय देश (तेथेही पूर्व युरोपात किती मोकळे वातावरण आहे क्ल्पना नाही) व उत्तर अमेरिका + कॅनडा अणि दक्षिण गोलार्धातील काहि ऑष्ट्र्लियन व्यक्तीसमुह सोडल्यास इतर जगातील बहुतांश लोकसंख्या या विषयात किती मोकळी आहे याविषयी विदा कोणाकडे असल्यास वाचायला आवडेल. उगाच काय ते भारतीयांना एकट्यालाच झोडपायचं? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचा व्हल्गरतेचा आरोप पुरूषांच्या लैंगिक अभिव्यक्तीवर होता, भारतीय लैंगिक अभिव्यक्तीवर नव्हे! हा मुद्दा नम्रपणे नजरेस आणून देऊ इच्छितो.

माझा व्हल्गरतेचा आरोप भारतीय पुरूषांच्या लैंगिक अभिव्यक्तीवर होता, कारण माझे निरीक्षण तेव्ह्ढेच मर्यादित आहे (काही गल्लत/दिशाभूल झाली असल्यास क्षमस्व!). (अवांतर- अपवाद फक्त एका फ्रेंच मित्राच्या कुटुंबाचा. मी त्यांच्याकडे काहीकाळ (दिल्लीत) राहिलो होतो. त्यांच्याकडे नग्नतेचे अजिबात वावडे नव्हते. त्यामुळे व्हल्गरतेचा मागमूस नव्हता. या कुटुंबाबरोबर मी पिना बॉशचे एक नाटक बघायला गेलो होतो. त्या नाटकात तर स्टेजवर काही पात्रे नग्नावस्थेत वावरतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रस्ट्रेशनबद्दल बोलायचे झाले तर मुली/बायकांच्या कामेच्छांना आपसात बोलताना तरी वाट मिळते की नाही काय माहिती. त्या तसे जास्त काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना कामेच्छा तितपत होत नाही असे मानणे गैर आहे. त्यांना फ्रस्ट्रेशन नक्कीच येत असावे, आणि ते जर पुरुषांइतके नसेल तर त्याची कारणे निव्वळ जीवशास्त्रीय असतील असे नाही. सामाजिक कारणेही तितकीच महत्वाची आहेत, उदा. स्त्रीच्या सेक्शुआलिटीची गळचेपी इ.इ. आणि या सगळ्याचा डैरेक्ट संबंध जीवशास्त्राशी लावताना हे मधले दुवे नजरेआड केल्या जाऊ नयेत असे वाटते.

मुलांचे/पुरुषांचे फ्रस्ट्रेशन हे पिवळी पुस्तके, पोर्न, इ. बघून सारखी कामेच्छा चाळवल्यामुळे जास्त वाढते. ते नसते तर फ्रस्ट्रेशन नक्कीच काही प्रमाणात का होईना, कमी झाले असते. बर्‍याच मुलींसमोर या दोन गोष्टी येत नसल्याने कामेच्छा चाळवणे हे जास्त होत नसावे. पॉर्न किंवा पिवळी पुस्तके वाचणार्‍या मुली बर्‍याच असतीलही, पण परिचयातल्या काही मुलींना-ज्यांबरोबर मोकळेपणाने बोलू शकतो अशांना हे प्रकार फारसे परिचयाचे नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाली टेड टॉकच्या लिंका दिलेल्या आहेतच, पण नरांची कामेच्छा चाळवल्यामुळे वाढतेच असं म्हणता येणार नाही. त्याला डार्विनीय कारण आहे. 'शिळ्या' स्पर्मची बीजांडाचं कवच भेदण्याची क्षमता कमी होते.

पिवळी पुस्तकं मी वाचलेली नाहीत (एकही नाही). पण एक गंमतीदार प्रसंग आठवला. मी एमेस्सीला असतानाची गोष्ट. साधारण २००१-०३. वर्गातली एक मुलगी माझ्याकडे थोडं शिकायला आणि त्या विषयाच्या मी काढलेल्या लेक्चर नोट्स फोटोकॉपी करून घ्यायला घरी आली होती. हे सगळं झाल्यानंतर मला हळूच विचारलं, "तुला एक प्रश्न विचारू का?"
मी: विचार की.
ती: प्लीज, वैतागू नकोस. पण तू तसलेवाले इंग्लिश पिक्चर पहातेस का?
मी: तसले म्हणजे? ए का एक्स?
ती: ए वाले. त्यातले 'तसले वाले' सीन्स पाहून तुला काही होतं का?
मी: म्हणजे? मी काय एवढीही माणसाबाहेरची नाहीये गं.

टेडच्या टॉक्समधलं जे दहा कारणं देणारं आहे यात काही मजेशीर विदाही आहे. एकीला म्हणे पापण्यांवरून हात फिरवण्यामुळे, कोणाला दात घासण्याच्या क्रियेमुळे ऑरगॅझम येतो. चाळवण्याची भावना नैसर्गिक आहे; कारणं बदलू शकतात. इथे म्हटल्याप्रमाणे स्त्रियांना कामसुख दिल्यामुळे मुलं लाघवी वगैरे होत नाहीत; फक्त होतात (होण्याची शक्यता वाढते). Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चाळवण्याची भावना नैसर्गिक आहे; कारणं बदलू शकतात.

यावरून आठवले की मागे एका डिस्कवरीवरील कार्यक्रमात सांगत होते चाळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे/हुकमी असते ते घ्राणेंद्रिय. प्रत्येक व्यक्तीस काहि विशिष्ट वासांनी हमखास चाळवल्यासारखे होते तर काहि विशिष्ट वास हमखास परावृत्तही करतात.

त्यातही काहि वास बहुतांश लोकांना परावृत्त करणारे आहेत. (यावरून वाटले की जर अवेळी एकटे फिरावे लागणार्‍या स्त्रियांनी या परावृत्त करणार्‍या वासाचे स्प्रे जवळ बाळगले तर बलात्काराच्या प्रमाणात घट होऊ शकेल काय!? Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१५-१७ वर्षांपूर्वी ऑफीसात माझा शेजारी इतका जीवघेणा पर्फ्यूम लाऊन आलेला होता. अगदी हार्ड्-कोअर चाळवले नाही पण मनच थार्‍यावर राहीना. पीसासारखे हलके, तरल वाटू लागले. कॉन्सन्ट्रेट्च करता येईना. त्याला म्हटलं - नको रे बाबा हा पर्फ्यूम लावूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शलॉट' या गोष्टीच्या संदर्भात जयवंत दळवींनी खोडकरपणे लिहिले होते की मोहना अंकलीकरचा पत्ता काय? त्याच लायनीवर विचारतो, 'कुठला हो हा असला तरल वगैरे करणारा परफ्यूम? जरा विचारुन सांगता का?' Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हाहाहा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवेळी एकटे फिरावे लागणार्‍या स्त्रियांनी या परावृत्त करणार्‍या वासाचे स्प्रे जवळ बाळगले तर बलात्काराच्या प्रमाणात घट होऊ शकेल काय!?
रोचक कल्पना आहे. यापुढेही जाऊन अशा स्त्रियांनी डीओडरंट किंवा टूथपेस्ट न वापरणे इतपर्यंतही कल्पनाविलास करता येईल.
'सावित्री मुक्यानेच मेली' ही एक करुण कथा आहे की टूथपेस्टची जाहिरात? हा विनोद आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लैंगिकतेसंदर्भात टेडवरची काही भाषणं अचानक सापडली. 8 great talks about love

यातली दोन ऐकून झाली:
Helen Fisher: Why we love, why we cheat
आणि
Mary Roach: 10 things you didn't know about orgasm

रोचक आहेत.

नेटफ्लिक्सवर हीच भाषणं इथे उपलब्ध आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख पहील्यांदा वाचला तेव्हा पिरीयड्सच्या वेदनाबद्दल बोलणे आणि मास्टरबेशनच्या आनंदाबद्दल बोलणे एकाच मापात कसं काय येउ शकतं वाटलेलं.
पण प्रतिसाद/चर्चा खूप छान चालुय.
स्त्रियांना कामसुख दिल्यामुळे मुलं लाघवी होतात >> आता कळलं लाघवी लोकं एवढी कमी का असतात ते Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख पहील्यांदा वाचला तेव्हा पिरीयड्सच्या वेदनाबद्दल बोलणे आणि मास्टरबेशनच्या आनंदाबद्दल बोलणे एकाच मापात कसं काय येउ शकतं वाटलेलं...

सहमत. मला अजूनही अस्संच वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन