जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?
ही बातमी वाचून प्रश्न डोक्यात आला- आपल्या जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?
त्या मित्राने चीटींग (विश्वासघात किंवा व्यभिचार) केला हे योग्य की अयोग्य हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेऊ. माझ्यामते ते अयोग्यच पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊ.
पण खातं उघडं दिसलं म्हणून त्यात डोकावणे/मेसेजेस वाचणे कितपत योग्य आहे? त्याने केलेल्या गुन्ह्याइतकाच त्या मैत्रिणीचाही गुन्हा अक्षम्य नाही का? का आपला जोडीदार आहे म्हणून सगळे हक्क गृहीत धरायचे?
त्या मित्रावर अनेकजण टीका करायला सरसावतील पण तिच्या गुन्ह्याचे काय? हे म्हणजे दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही असे मला तरी वाटते.
त्या स्त्रीने जी भूमिका घेतली आहे ती पाहता या गाण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
एवढेच म्हणेन की तो फसवणारा मित्र अन ही चोरुन मेसेजेस वाचणारी स्त्री बोथ डिझर्व्ह ईच अदर!!!
फार थिल्लर वाटल्यास हा धागा उडवून लावावा. किंवा "ही बातमी वाचली का?" या धाग्यात प्रतिसाद म्हणून हलवावा. सॉरी उशीरा लक्षात आले.
????
मुळात आपण (सध्याच्या युगातील नवराबायकोपुरते न्युक्लीअर असे) कुटुंब हे एकक मानतो की व्यक्ती हे एकक मानतो यावर जोडीदाराच्या खात्याची (चोरून किंवा इतर अर्थाची) पाहणी या गोष्टीचा न्यायनिवाडा करता येईल. माझ्या मते तरी जोडीदाराने आपले खाते पाहू नये अशी अपेक्षा असल्यास नात्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे असाच त्याचा अर्थ आहे.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अजिबात
अजिबात योग्य नाही. चोरुन वाचणे तर अक्षम्यच.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
+१
मध्यमवर्गीय, तरूण लोकांकडे माणशी एक कंप्यूटर/लॅपटॉप नाही हे मला अविश्वसनीय वाटतं. प्रगत देशांसाठी अधिकच. माझ्या घरी माणशी एक लॅपटॉप आहेच; पण एकमेकांचे इमेल पासवर्ड्स कंप्यूटरमधेही आहेत. कधीतरी दुसर्याचे इमेल्स दिसले तर वैताग येतो, जीमेल.कॉम उघडल्यावर स्वतःचं खातं दिसण्याची सवय असते. वेगळं काहीतरी दिसतं म्हणून हा क्षणिक वैताग. दुसर्याचे इमेल्स वाचण्याची इच्छा होत नाही आणि ते पटतही नाही.
चोरी करायला ना नाही, पण ती पकडली न जाण्याइतके हुशार असाल तरच करावी. नाहीतर "चोर" म्हणून जे परिणाम सहन करावे लागतील त्याची तयारी ठेवावी.
माझे इमेल्स कोणी वाचले तरी काही धोका नाही. सगळी 'लफडी' मी आवाजी करते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वर "अजिबात योग्य नाही, चोरुन
वर "अजिबात योग्य नाही, चोरुन वाचणे तर अक्षम्यच" या संजोपरावांच्या प्रतिसादाला तू +१ अशी सहमती दिली आहेस.
नंतर माणशी वेगळा लॅपटॉप कसा नसतो असं आश्चर्य व्यक्त केलं आहेस. तरीही एकमेकांचे मेलबॉक्स नजरेला पडतात आणि वैताग येतो, पण ते वाचण्याची इच्छा नसते.
हे सर्व एकदम रास्त. पण शेवटाकडे एकदम काहीतरी पॅरेडॉक्स जाणवतो.
हा देखील एक विचार म्हणून ठीकच, पण वरच्या सहमतीशी अजिबात सुसंगत नाही. जे करणे विशेषतः चोरुन तर अक्षम्यच, त्याला विरोध दर्शवल्यावर "चोरी करायला ना नाही, पण ती पकडली जाऊ न देता करावी" अशा आशयाचे वाक्य पूर्ण वेगळी विचारधारा दर्शवते.
-"ग"वि बाजू.
-"ग"वि बाजू. - हे सर्वात
-"ग"वि बाजू. - हे सर्वात जास्त आवडल्या गेले आहे.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
:ड
श्री. "ग"वि बाजू, चोर जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत तो/ती साव असतात; ही म्हण तुम्हाला माहित नाही याचा अर्थ तुम्ही चौथीत स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अभ्यास केला नव्हतात हे स्पष्ट आहे.
अवांतरः "ग"वि बाजू यापेक्षा गवि अमृतसागर अशी काही सही अधिक शोभली असती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चोरी करायला ना नाही, पण ती
पकडली न जाण्याइतके हुशार असाल तरच करावी. ... +१
जर चोरी करायचीच असेल तर आपल्या ओ एस वर की लॉगर इन्स्टॉल करावे. नंतर आरामात कुणी नसताना अॅक्सेस करून वाचावे. ते करताना टॉर किंवा क्रोम (ईन-कॉग्निटो) मोड मध्ये वापरावे जेणे करून कुणी आल्यास, ब्राऊजर घाई गडबडीने बंद केल्यास सगळे सेशन्स आपोआप लॉग अऊट होतील.
पण अगदी खर खर म्हणजे अस सगळ कशाला कराव? हे सगळ करण्यात जो कीतीतरी वेळ वाया जाईल तो सेल्फ डेवलेपमेंट मध्ये लावता येईल.
खोटं बोलणं, चोरी या गोष्टी
खोटं बोलणं, चोरी या गोष्टी आळशी आणि चटपटीतपणा नसणार्या लोकांनी करण्याच्या गोष्टीच नव्हेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अशा लोकांनी करायच्या गोष्टी कोणत्या मग??
अशा लोकांनी करायच्या गोष्टी कोणत्या मग?? आळसामुळे आधीच नव्वद टक्के गोष्टी टाळल्या जात असताना त्यात अजून रीस्ट्रीक्श्न्स ??
अशा लोकांनी करायच्या गोष्टी
अधिक आळस!
आळशी लोकांना आळस कसा करायचा याबाबत आणखी चॉईस मिळतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अहो ते नंतर
आधी तसल्या बातम्या वाचणं थांबवा पाहू!
-Nile
+१
या गतीने, पुढेमागे 'जोडीदाराची अंतर्वस्त्रे चोरून घालून पाहणे कितपत योग्य आहे?' असाही धागा या संकेतस्थळास सुशोभित करून गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. आणि प्रेरणेसाठी बातमीचा दुवा थोडेफार शोधल्यास कोठे ना कोठेतरी मिळेलच.
शिवाय, 'हा अक्षम्य गुन्हा नाही का?' पासून ते 'मुळात आपण कुटुंब हे एकक मानतो की व्यक्ती यावरून याच न्यायनिवाडा करता येईल.' (कोणी सांगितलेय?) पर्यंत किंवा 'जोडीदाराने आपली अंतर्वस्त्रे घालून पाहू नये अशी अपेक्षा असल्यास नात्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे' पासून ते 'मध्यमवर्गीय, तरूण लोकांकडे माणशी किमान एक अंतर्वस्त्रांचा जोड नाही हे अविश्वसनीय वाटतं. प्रगत देशांसाठी अधिकच. आमच्या घरी माणशी भरपूर जोड आहेतच; शिवाय ते इतस्ततः पसरलेलेही असतात. कधीतरी दुसर्याचे दिसले तर वैताग येतो. दुसर्याचे घालण्याची इच्छा सहसा होत नाही, बरोबर वाटो वा ना वाटो. आणि माझी अंतर्वस्त्रे कोणी घालून बघितली तरी धोका नाही. तशीही खुल्लमखुल्ला उघ॑ड्यावर पडलेली असतात.' पर्यंत सगळे आयाम त्यात येऊ शकतील.
सांगण्याचा मुद्दा, धाग्याचा प्रेरणास्रोत टुकार आहे, आणि धागा दोन ओळींचा प्रतिसाद देण्याइतकाही वेळ घालवण्यायोग्य नाही. पण एवीतेवी या क्षणी मला उद्योग नाहीत, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
कलोअ.
उशीरा लक्षात आल्याने पुरवणी
उशीरा लक्षात आल्याने पुरवणी जोडली आहे की धागा बातमी सदरात हलवावा. अन गतीने वगैरे काही नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार, इच्छेनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे जसे संपादकांना धागा उडवण्याचे. सगळेजण थोडे "वैविध्य" (डायव्हर्सिटी) अॅप्रिशिएट करायला शिकले तर काही आभाळ कोसळणार नाहीये.
अर्थात आपला प्रतिसाद विनोदी आहे याबद्दल दुमत नाही.
हॅलो
कधी कधी (न-१)व्या बाजूवर थांबल्यास चालेल असे वाटते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नायल्या च्या असल्या
नायल्या च्या असल्या प्रतिसादाला मार्मीक श्रेणी देणारा/री कॅन यु प्लीज कम फॉरवर्ड?
मी दिली.
काय म्हणणे आहे?
थँक्स!!! नाऊ दॅट आय हॅव्ह
थँक्स!!! नाऊ दॅट आय हॅव्ह टेकन अ क्लोझर लुक, यु मे गो बॅक टू लाइन
या "समोर हजर" होण्यावरुन एक
या "समोर हजर" होण्यावरुन एक गोष्ट आठवली. एक लाकूड तोडणारी आज्जी नेहमी देवाचा धावा करायची. "देवा रे सोडव मला. कंटाळा आला या कष्टांचा" वगैरे. एकदा देव साक्षात उभा ठाकला व म्हणाला "बोल म्हातारे का बोलावलस?" त्यावर ती उत्तरते "काही नाही रे बाबा, एवढी मोळी उचलायला जरा मदत कर
"
चोरून वाचू नये, ऐकू नये , आणि
चोरून वाचू नये, ऐकू नये , आणि बघू नये.
उघडपणे.. सांगूनसवरून आणि संबधित व्यक्तीची परवानगी घेऊन वाचायला हरकत नसावी.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
मुलांनो खोटे कधी बोलू नये,
मुलांनो खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करु नये.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
व्हय म्हाराजा!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
जंगलातली एक म्हण...
आपलं ठेवावं झाकून, दुसर्याचं पाहावं वाकून.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जोडिदाराचेच नव्हे तर कुणाचेही
जोडिदाराचेच नव्हे तर कुणाचेही इमेल किंवा कोणत्याही खात्यातील माहिती त्याव्यक्तीच्या परवानगीशिवाय म्हणजे अर्थातच चोरून बघणे गैरच!
इमेल्सचे तरी ठिक आहे, आपल्या चांगल्या सुशिक्षित जोडिदाराचे/ सज्ञान पाल्याचे/ पालकांचे / सज्ञान भावंडांचे बँकेचे व्यवहार सांभाळणारे जोडिदार/पालक/पाल्य/भावंडे इ. बघितले की (ज्याचे खाते इतरांना सांभाळावे लागते आहे त्याच्या) अडाणीपणाची (की आळशीपणाची?) चीड येते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पैशाचे व्यवहार अन लग्न हा तर
पैशाचे व्यवहार अन लग्न हा तर एक वेगळ्याच व्याप्तीचा विषय आहे. जितकी लग्नं तितके आर्थिक तडजोडीचे नुआन्सेस म्हणता येतील. आर्थिक व्यक्तीमत्वे जुळत नसतील तर आयुष्य मिझरेबल होत असावे.
पैशाचे व्यवहार अन लग्न हा तर
+१ सहमत आहेच.
फक्त वरिल प्रतिसाद केवळ जोडिदारच नव्हे तर कोणत्याही नात्याबद्द्ल आहे. दुर्दैवाने अनेक नात्यांमध्ये एकमेकांना आर्थिक बाबतीत एकतर गृहित धरले जाते किंवा धरलेच जात नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जमत असेल तर वाचावं, काहीही
जमत असेल तर वाचावं, काहीही वाचण्यात गैर काहीच नाही. पुढे काय करावं हा ज्याच्या-त्याच्या विवेकाचा भाग आहे.
मल्ल्यांच्या पार्टीला मी
मल्ल्यांच्या पार्टीला मी येणार नाही हे त्यांना तूच पटवून सांग अशी गळ कॅट ने घातली तेव्हां तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मल्ल्या माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे तिला चांगलंच ठाऊक आहे. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला म्हटलं फॅशन स्ट्रीलला शॉपिंगला जायची काय गरज होती ?
त्यावर खळखळून हसत तॉ ओह नो करत राहिली. म्हणजे तू पाहीलंस तर असं तिला म्हणायचं होतं. मग थोड्या वेळाने म्हणाली काय बिघडलं तिथं शॉपिंग केली तर ?
फॅशन स्ट्रीटचा माल स्पेनला नेला आणि पिक्चर्स लीक झाले तर ते फारच चीप दिसतं गं... मी काळजीने म्हणालो.
,
,
,
अस्दस्द ज्क्स्द सद अस्द्ल्क्ज्स
सद्ज्जस स्दस्द्क
अस्दस
-------------------------------------------------------------------------------------
मित्रांनो, फेबु स्टेटस असं लिहावं. वाचलं जातं..
....
लेव्हल ऑफ ट्रस्ट.
१. त्या बातमीतले ब्रेकप लेटर : वहीच्या पानावरचे गर्लिश हँडरायटिंग, हाताने लिहिलेल्या लिखाणात वापरलेले इमोटिकॉन्स, इ. पाहून हे सुमारे ११वी कॉमरस, तुकडी ड मधल्या मधल्या मंदीने तिच्या बीएफला लिहिलेले पत्र असावे असे वाटते. या वयातल्या जेलसीज अन केल्सी'ज मेसेजेस असल्या ब्रेकप्ससाठी पुरेसे असतात. पण ते असो.
२. या वयातली मुले मुली एकमेकांवरील प्रेमाचा पुरावा म्हणून त्यांच्या फेसबुक व ईमेल अकाऊंटांचे पासवर्ड एक्स्चेंज करीत असतात हे दुसरे सत्य आहे. (म्हणजे ऑफिशियली उघडून पहाता येण्याची परवानगी)
३. या पलिकडे जाऊन, संशयपिशाच्चाने पछाडले, की, ऑफिशियली ग्रांटेड अॅक्सेस असला तरीही, केल्सी कोण, तो निरोप नक्की कसला याची विश्वासाने चौकशी करणे, वा सरळ ब्रेकप करणे, किंवा त्याहीपुढे जाऊन मोठी भांडणे/शारिरीक इजा करणे इतपत लेव्हल्स तो वा ती या दोहोंकडून वापरले जाऊ शकतात.
शेवटी,
हे तुमचे कन्क्लूजन १००% योग्य आहे असेच म्हणावेसे वाटते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तुम्ही चांगले की मूर्ख यावर अवलंबून आहे.
तुम्ही इतरांची ईमेल वाचत नसाल, तर तो तुमचा चांगुलपणा. तुमच्या ईमेल जर इतर लोक वाचत असतील तर तो तुमचा मूर्खपणा.
मी इतरांची ईमेल वाचत नाही आणि इतरांना माझी ईमेल वाचू देत नाही. (सीलबंद पत्राबाबतपण तसाच नियम).
हम्म
तुमच्या मांजरीला तुम्ही "इतर" म्हणताय म्हणजे नक्कीच त्या हे वाचत नसणार. का बोचकारे आवडतात?
(उपाशी ठेवलंय म्हणून रागावला असला तरी थेट इतर म्हणणे म्हणजे धाडसाचं काम ब्वॉ!)
-Nile
हा हा हा
इतर म्हणजे मांजर, पिलावळ आणि प्राणिसंग्रहातले इतर सगळे प्राणी आले.
(उपाशी = कारण माझा उपास आहे, म्हणून )
लॉल..
हे काय बा नवीन!!
- प्रशांत उपासनी
नव-याचा खिसा, कागद, चिट्ठ्या,
नव-याचा खिसा, कागद, चिट्ठ्या, रुमाल, शर्टवरचा केस, सुगंध यांचा मागोवा घेणं हा बायकांचा हक्कच आहे. मग चुकून उघडं राहीलेलं खातं...हा गलथानपणा पुन्हा त्या मित्राचाच नाही का ?
....
हक्क नाही तो इन्सिक्युअरपणा
हक्क नाही तो इन्सिक्युअरपणा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरंय ते. पण मजेनं लिहीलं होतं
खरंय ते.
पण मजेनं लिहीलं होतं
( फेबु वर लोक काय काय स्टेटस लिहीतात. एकतर सुविचारांचा महापूर, मीग्रेट मीग्रेट वाल्या पोष्टी नैतर मग दुपारच्या वेळेला म्हैलामंडळाचं गटग ! )
....
हम्म खरंय म्हणा ते.
हम्म खरंय म्हणा ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बालिश
जोडिदाराची पत्रे/इ मेल्स्/फेसबुक वाचण्यासाठी धडपडणे ह बालिशपणा आहे.
जोडिदार असे वाचू पहात असेल तर त्याच्यापासून ते लपवण्याची धडपड करणे हा अजून मोठा बालिशपणा आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
जोडिदार असे वाचू पहात असेल तर
का? जोडीदाराला भोचकपणा करण्यापासून रोखणे म्हणजे पोटेन्शिअल इन्फिडेलिटी असे काहीसे तर सुचवावयाचे नाही ना
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो
मुळात व्यवहार पारदर्शक असला तर जोडिदाराने आपले अकाउंट वाचण्याने बावचळण्यासारखे काहिच नाही.
एखादी माहिती तुम्ही जोडिदारापासून लपवण्यासारखे तुमच्याकडे काही असेल तर देव तुमचे भले करो. तुमचे गुपित , गुपित राहो.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हम्म तसे सरसकट म्हणता येईल
हम्म तसे सरसकट म्हणता येईल काय याबद्दल साशंक आहे इतकेच नमूद करतो तूर्तास.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जोडीदार म्हणजे मराठीत स्पाऊस
जोडीदार म्हणजे मराठीत स्पाऊस का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुन्हा तेच?
बायको असेल तर 'माऊ' अन नवरा असेल तर माऊस!
-Nile