मराठी लिखाण आणि लैंगिकता

डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. साहित्य, साहित्याचे वाचन यातील एका (माझ्या मते अदुर्लक्षणीय , पण सभ्यतेपायी न बोलल्या जाणार्‍या) पैलूबद्दल मी लिहितो आहे अशी माझी भावना आहे. इतरांना यात वावगे तर वाटू नयेच , पंण यात कुणाला भर घालावीशीही वाटावी अशी माझी आशा आहे. इथे प्रश्न एकंदरीत "जेंडर बेस्ड इशूज ऍंड् सेक्शुआलिटी"चा आहे. मराठीत या दोन्ही संज्ञांना "लैंगिकता" असाच शब्द आहे. मात्र या दोन गोष्टी अर्थातच वेगवेगळ्या होत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

अलिकडे मेघना पेठे यांची "नातिचरामि" ही कादंबरी पुन्हा एकदा चाळत होतो. त्यातल्या काही भागात , मानवी संबंधांबद्दल बोलत असताना , कित्येकदा लैंगिक वर्णने येतात. हे सारे वाचताना मनात विचार आला : आपले सारे आयुष्य आपण मराठी पुस्तके वाचत आलो आहोत. तर लिखित वाङ्मयात , लैंगिकता आपल्याला एक वाचक म्हणून कसकशी भेटत गेली ? या सार्‍याचा आपल्यावर नक्की काय परिणाम होत गेला ? या निमित्ताने , एकूण थोडे सिंहावलोकनच झाले असे म्हणायला हरकत नाही.

लहानपणी राजा-राणी-राजपुत्र-राजकुमारी इ. इ. च्या गोष्टी वाचायचो. त्याच्यात अर्थातच नाईट्-एरंट आणि डॅमसेल्-इन्-डिस्ट्रेस (आणि अर्थातच तिला डिस्ट्रेस मधे टाकणारे दूष्ट (दुष्ट नव्हे ! Wink ) यांचा पॅटर्न असायचा. राक्षसाला/जादूगाराला पळवून नेलेल्या राजपुत्रीशी लग्न करायचे असायचे. माझ्या मते, स्त्रीला पळवून नेणे , तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित करणे, नाईट्-एरंटच्या शौर्याची इतिकर्तव्यता प्रस्तुत स्त्रीस सोडवून आणून अंतिमतः तिच्याशी लगीन लावणे यात दर्शवलेली असणे यातच कुठेतरी , लैंगिकता (सेक्शुऍलिटी) जरी नव्हे , तरी लैंगिक साचेबद्धता (जेंडर स्टीरिओटाइपिन्ग) ही ठाशीवपणे नोंदली जात होती हे नि:संशय. कुमारवयात वाचल्या जाणार्‍या, रामायण/महाभारतामधील कथांमधे माझ्यामते लैंगिकतेचे सूचन कमी आणि सरळसरळ उल्लेख असा प्रकार होता.(लेस सटल्टी अँड मोअर ऑब्व्हियस) . रावण-सीता यांचे नाते , लक्ष्मण-शूर्पणखा एपिसोड , अंबा-अंबिका-अंबालिका प्रकरण , भीष्मप्रतिज्ञा , द्रौपदीविवाह आणि अर्थातच वस्त्रहरण या सार्‍यांना , अगदी बालवाङ्मयात आणतानाही , या सर्व प्रसंगांमधली जी वाहक शक्त - ती म्हणजे स्त्रीपुरुषांमधील आकर्षण - ती बालवाङ्मयकारानाही एका विशिष्ट मर्यादेपलिकडे शर्करावगुंठित रीतीने सांगणे अशक्यच होते. एकूणच , ठकसेन-जादूचा शंख या सार्‍यामधे जितकी अप्रत्यक्ष लैंगिकता होती/असते त्यापेक्षा , या प्रमुख पौराणिक कथांमधे ती निश्चितच ठळकपणे होती. सुष्ट-दुष्टादि विभाजनामधेही , हा लैंगिकतेचा घटक अगदी बेमालूमपणे येऊन मिसळतो.

आज थोडा विचार करताना जाणवते की, परिकथा असोत की पुराणकथा - निदान त्यांच्या बाळबोध रूपात - या सार्‍या पुरुषप्रधान दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. नाईट्-एरंट आणि डॅमसेल-इन्-डिस्ट्रेस यांमधे सरळसरळ जेता/उपभोक्ता आणि जेय/उपभोग्य असे नाते आहे. महाभारतादि महाकाव्ये त्यांच्या बृहद्स्वरूपामधे वाचल्यास बहुदा त्यांच्यातील गुंतागुंतीमुळे , उप-उप-कथानकांमुळे केवळ पुरुषप्रधान आहेत असे सरसकट म्हणता येणार नाही ; मात्र त्यांच्या संक्षिप्त, बाळबोध प्रकारात हा लैंगिक असमतोल (जेंडर बायास) सरळसरळ दिसतो.

प्रस्तुत लिखाणात लैंगिकतेचा विचार हा मराठी साहित्यापुरताच मला मर्यादित ठेवायचा असल्याने , चित्रपटादि (जास्त परिणामकारक) दृक्-श्राव्य माध्यमांचा इथे विचार होणार नाही ; मात्र "अमर चित्र कथा" या ब्रँडने येणार्‍या कॉमिक्सना कदाचित साहित्य आणि चलच्चित्रे यांच्या सीमारेषेवर असलेले मानावे लागेल. आणि यातही , ही कॉमिक्स पुस्तकरूपात असल्याने, त्यांची विभागणी साहित्यातच होईल. तर , या कॉमिक्स मधे अर्थातच , कथानकाच्या जोडीने चित्रेही असत. या चित्रांमधूनही स्त्री-पुरुषांच्या सौष्ठवादि संकल्पनाना , बर्‍यापैकी साचा मिळाला असे म्हणता येईल. याच कालावधीमधे , मँड्रेक, फँटम यांच्या "इंद्रजाल" कॉमिक्सनी हे साचे जास्त बळकट केले असे मला आठवते.

इथे ही गोष्ट नमूद करायला हवी की, कुमारवयात वाचले गेलेल्या प्रत्येक गोष्टीमधे केवळ लैंगिकताच नव्हती. इसापच्या गोष्टी होत्या , बिरबल होता, शिवाजी-राणा प्रतापादि शुद्ध शौर्यरसाचाच परिपोष करणारे हिरोज् होते. फास्टर फेणे होता , भारा भागवतादि लेखकांच्या इतर गोष्टीही होत्याच , गोट्या-चिंगी होते , किशोर-कुमार होते. चांदोबामधे , बाकी पुन्हा राजपुत्र-राजकन्या यांच्या सोबत चोर-श्रीमंत-वेताळ-विक्रम यायचे. चांदोबामधल्या कथानकांमधे जरी अर्थातच सरळसरळ लैंगिकता नसली तरी स्त्रीचा मोह, स्त्रीला जिंकणे/विकत घेणे/ती जिंकण्याचा- पर्यायाने सूचित उपभोगाचा विषय असल्याचे उल्लेख ठायीठायी होते.

मला वाटते , प्रत्यक्ष लैंगिकतेच्या प्रदेशातली पहिली पाऊले ही यापुढे दोन वेगवेगळ्या दिशांच्या पुस्तकांमधून पडत गेली. रामायण/महाभारतादि कथांच्या वाटे जेव्हा इतर पौराणिक कथानकांचे वाचन झाले ती एक दिशा आणि साहसी कथांच्या थोड्याशा अधिक पुढच्या अवस्थांमधल्या कथा-कादंबर्‍या.

साहसी कथांमधे कॅप्टन निमोच्या जहाजावरील सुंदर मडमा , खलाशांचे-त्यांचे प्रणयाराधन , (क्वचित प्रसंगी केलेला अतिप्रसंगही !) दर्यावर्दी , साहसी , शूरवीर , सैनिक-सेनानी यांच्यावर फिदा असलेल्या स्त्रिया , त्यांचा विरह , त्यांची मीलनप्रसंगीची लीला यांची (कुमारवाङ्मयात खपतील अशी ) वर्णने यामुळे लैंगिकतेची ओळख पूर्वीइतकी धूसर राहिली नाही.

मात्र , लैंगिकतेचा पहिला सणसणीत , इन्-युअर्-फेस असा झटका जर का या कळत्या-न-कळत्या वयात अतिशय अनपेक्षितरीत्या कुठून बसला असेल तर तो होता पुराणादिक "धार्मिक" वाङ्मयातून ! घरातल्या सर्वात कर्मठ समजल्या जाणार्‍या काकांनी जी पुस्तके दिली , त्यातल्या काही पुस्तकांमधे जे होते त्याला विश्वरूपदर्शन - किंवा विचित्रविश्वाचे विकृद्दर्शन असे म्हणावे लागेल. सरस्वतीचा जन्म , ब्रह्मदेवाचे तिच्यामागे लागणे , इंद्राची लालसा , परशुरामाची कथा .. आणि एके दिवशी , या पुस्तकांच्या संग्रहातून हाती पडले "नवनाथ कथासार" ! बापरे ! यातील एकेका "नाथाच्या" अवतारामधे लैंगिकतेची वर्णने ठासून भरलेली होती. काही उदाहरणे पुरेशी होतील :
-स्त्री राज्यात अर्थातच केवळ स्त्रिया रहायच्या. त्यांची वंशवृद्धि कशी व्हायची ? तर त्या नगरीच्या बाहेर मारुति बसायचा. त्याच्या भुभु:काराने स्त्रियाना गर्भ रहायचा.
- कित्येक व्यक्तींचा जन्म हा पुरुषाचे "रेत" सांडून "ऋतुस्नात" स्त्रीच्या द्रवाशी त्याचा संयोग होऊन , एखाद्या प्राणी/पक्षी/माशाने खाऊन त्या श्वापदाला गर्भ राहून व्हायचा.( पहा : मीननाथाचा जन्म.)
"रेत" , "ऋतुस्नात" , "गुह्यांगे" असे कितीतरी शब्द मला ही धार्मिक पुस्तके वाचूनच कळलेले आहेत.
या सार्‍या धार्मिक पुस्तकांमधले जेंडर स्टीरिओटाईप्स , त्यातली एकूणच मूल्यव्यवस्था हा (थोडे सौम्यपणे बोलायचे तर ) भयानक रोचक आणि (किंचित तीव्रपणे बोलायचे तर ) प्रसंगी उलटी येईल इतपत विकृत मामला आहे.

यापैकी "नवनाथ कथासार" आता ऑनलाईन उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा Smile : http://navnath.net/simple_marathi.html

आमच्या ओळखीमधे एक वृद्ध गृहस्थ होते. वेदशास्त्रपुराणे आणि इतर धार्मिक साहित्याचे वाचक. १४-१५ वर्षांचा असताना , त्यांच्या संग्रहातून मला "अनंगरंग" या प्राचीन ग्रंथाचा मराठी (आणि बहुदा संक्षिप्त ) अनुवाद मिळाला होता. तोवर नवनाथ कथासार वाचून झाल्याने "अनंगरंगा"चा धक्का प्रचंड नव्हता ; मुख्य म्हणजे त्यातील संपूर्ण आशय लैंगिक कृतींच्या , अवयवांच्या , विचारांच्या संदर्भातला असला , तरी इतर कृतक्-धार्मिक साहित्यातील मजकूराप्रमाणे त्याचे स्वरूप उत्तेजक ("टिटीलेटींग्" चा मराठी शब्द?) नव्हते. काही आकृत्याही होत्या. हे सारे पौगंडावस्थेत असलेल्या समजूतदारपणाच्या अभावामुळे जरी पुरेसे "मजेदार" वाटले असले तरीही , बहुदा आधुनिक ज्ञानाच्या संदर्भात या सार्‍याचे संदर्भ आता पुरातन गोष्टींच्या इतपतच शिल्लक असले तरी यात काहीतरी विचार आहे , पुराणे आणि इतर उठवळ प्रकार नि यात फरक आहे याची जाणीव तेव्हाही झालेली होती.

याच वयात वरवर चाळायला मिळालेले एक विनोदी पुस्तक म्हणजे "ब्रह्मचर्य हेच जीवन , वीर्यनाश म्हणजे मृत्यू" हे (बहुदा स्वामी शिवानंद असे लेखकाचे नाव असलेले) पुस्तक. त्यात रक्ताच्या काही हजार थेंबातून वीर्याचा एक थेंब बनतो ( का याच्या उलटे कायसेसे ) असे विनोदी उल्लेख होते. त्या वयात हे सर्व वाचायची भूक खूप असली तरी , दुर्दैवाने (?) मला हे पुस्तक इत्थंभूत वाचता आलेले नव्हते.

पुढे पौगंडावस्थेत वाचलेल्या यादीतले अजून एक ठळक नाव म्हणजे चंद्रकांत काकोडकर. ६० च्या दशकात यांच्या "श्यामा" नावाच्या कादंबरीवर अश्लीलतेचा खटला भरला गेला होता आणि यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

पौगंडावस्थेत असताना , लायब्री ("लायब्ररी" नव्हे Wink ) मधली काही "निवडक" पुस्तके उचलण्याची एक युक्ती माझ्या या क्षेत्रातल्या आद्यगुरुने शिकवली होती. ती अशी की , अशा खुमासदार लेखकाची एखादी कादंबरी उचलावी आणि एखाद्या "फ्लिकर" प्रमाणे त्याची पाने अंगठ्याने भरभर उलटवावी. "फ्लिकर" जिथे थांबेल ती पाने म्हणजे या कादंबर्‍यांमधली विशेष "रंगीत" पाने होत. हीच पाने परत परत वाचली गेलेली असल्याने , फ्लिकर तेथे थांबतो. आपल्याला हवे असलेले "ज्ञानकण" तेथे वेचावेत. या न्यायाने ही पुस्तके घरी नेऊन वाचण्यातला धोका टाळता येतो ; एरवी निरुपयोगी असलेल्या या कादंबर्‍यांमधून आपल्याला हवे तेच "सत्व" वेचता येते आणि हे सर्व "लायब्री"च्या एका कोपर्‍यात उभे राहूनच. ही दीक्षा त्याने मला दिल्यानंतर मी "गुरुमाऊली ! काय हा साक्षात्कार ! " असे म्हणून त्याच्या चरणांशी पडायचा तेव्हढा बाकी होतो ! Wink

दुर्गाबाई भागवतांनी "मराठी साहित्यात काहीही अश्लील नाही ; जे आहे ते सुमार आहे, उठवळ आहे ; पण अश्लील म्हणवण्यासारखे काहीही नाही" अशा स्वरूपाचे विधान केल्याचे स्मरते. एकूणच स्त्रियांच्या लिखाणाली लैंगिकता ही "संयत" वाटते . स्त्रियांच्या लिखाणात - विशेषतः लैंगिकतेच्या संदर्भात - व्यक्तींचे objectification (म्हणजे त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून न पहाता एक उपभोग्य वस्तू म्हणून पहाणे) हे क्वचित् पहायला मिळते. वर उल्लेखिलेल्या काकोडकरादि प्रभृतींच्या लेखनातल्या सुमारपणाबरोबरच , स्त्रीदेहाची आंबटशौकी वर्णने हा ठळक घटक आहे.

(या लेखापैकी काही भाग पूर्वप्रकाशित आहेत. )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

> त्यात रक्ताच्या काही हजार थेंबातून वीर्याचा एक थेंब बनतो ( का याच्या उलटे कायसेसे ) असे विनोदी उल्लेख होते.

माझ्या अाठवणीप्रमाणे एकेकाळी हा हिशेब रक्ताचे चाळीस थेंब म्हणजे वीर्याचा एक थेंब असा होता. अाता हा अाकडा वाढून काही हजारांवर गेला अाहे हे वाचून अाश्चर्य वाटलं. याचा अर्थ अलिकडच्या तरुणांचं वीर्य तरी फार दाट झालेलं अाहे किंवा रक्त तरी फार पातळ झालेलं अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

किंवा रक्त तरी फार पातळ झालेलं अाहे.

अलीकडेच पाहिलेल्या एका इंजिनियर- टर्न्ड् - हौशी संगीतकाराच्या गाण्यातले शब्द आठवले Smile

जब गम ये रम में खो गया
तो खून भी पतला हो गया
वरना क्वालिटी थोडी 'थिकर' होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा.. सुरेख लेख...
...
अकरावी बारावीत हॉस्टेलात असताना इतर सहाध्यायींच्या कृपेने मराठी आचरट पुस्तके वाचली. पण त्यांचा दर्जा आणि वर्णने अत्यंत सुमार असल्याने पहिले कुतूहल शमल्यावर लगेचच नाद सोडला. या असल्या पुस्तकांना लेखक असतात, ते सर्जनशीलता म्हणून काहीबाही लिहितात, प्रकाशक छापतात आणि काही लोक ते विकत घेऊन वाचतात याचे नंतर बराच काळ भयंकर आश्चर्य वाटत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

असेच म्हणतो. सुरेख लेख. जण्रल मध्यमवर्गीय मराठी लिखाणाबद्दल काय बोलावे, त्यातली लैंगिकता अगदी ना के बराबर. अधूनमधून कडक अपवाद भेटले तरी. बाकी पिवळ्या पुस्तकांबद्दल बोलायचे झाले तर मचाक हा अतिशय समर्थ अन फ्री ऑप्शन आहे. पण नेट नसलेल्यांसाठी अशी पुस्तके अजून चालतात. पोलीस टाईम्स नामक वृत्तपत्रात अगदी तिखटमीठ लावून अशी वर्णने अगदी यमकबद्ध रीतीने केलेली असतात, तोही त्यातलाच भाग म्हणावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जरी "ययाती" वगैरे वाचले तरी ६ वी ७ वी पर्यंत साहीत्यीक लैंगिकतेशी ओळख झाली नाही कारण ती वाचूनही कळली नाही. पुढे एकदा दिवाळीच्या सुट्टीत मेनकाच्या एका दिवाळीअंकात "भुशुंडी रामायणावरचा" अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला. ज्यामध्ये राम-सीतेच्या एकांताचे कामुक वर्णन वाचले. "सीता रामाची "नको नको" अशी परोपरीने विनवणी करत असतेवेळी, तिचे लक्ष नसलेला एक क्षण साधून रामाने वेगाने भेदन केले व सीता सुखाच्या लाटेवर आरुढ होऊन "हाय हाय..." अशी व्हिव्हळू लागली. तेव्हा जरी नक्की काय भेदन केले ते कळले नसले हा प्रसंग स्मृतीपटलावर कोरला गेला.

नंतर नंतर जयवंत दळवींच्या कथांची अतिशय, अतोनात गोडी लागली. त्यातील स्त्रीपुरुष संबंधांचे सूचकतेच्याही पलीकडे जाऊन केले गेलेले चित्रण व एखादे तरी वेडसर पात्र असणे ही वैशिष्ट्ये अतिशय आवडली. जयवंत दळवींच्याच (बहुतेक) एका कथेते कॉलनीत दिवे जातात अन मग कशी मजा येते, कोणी पुरुष अंधारात चुकून बायकोचा परकर घालून मीटरपाशी, खाली येतो , "चान्स घेऊन" कोणी कुणाला तरी अंधारात मागून आवळते, दोघानांही एकमेक कोण ते कळत नाही पण रिस्पॉन्स दिला जातो अन मग दिवे आल्यावर जीवन परत आलबेल होते अशा टाइपची हलकीफुलकी कथा वाचली. अन आवडलीही होती.

कोण्या लेखकाची, एक कथा वाचली होती ज्यात नायक नायिकेला भविष्य सांगायच्या बहाण्याने विचारतो की तुझ्या ओठावर तीळ आहे ना? ती ओठावरुन हात फिरवत म्हणते नाही तर हे तर खोटं भविष्य आहे. त्यावर तो म्हणतो "वरच्या नाही खालच्या" अन नायिका रागाने व लाजेने लाल होते....... बाप रे! तो प्रसंग केवढा विचीत्र वाटलेला तेव्हा. विशेषतः ती उपमा.

पुढे अन्य काही कथा वाचल्या ज्यात पात्रांच्या लैंगिकतेचे वर्णन घृणा, आनंद, मत्सर आदि रंगांमध्ये वाचले. बाकी एखादी काकोडकर कथा वाचली. पिवळी पुस्तके कधी वाचली नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यामध्ये राम-सीतेच्या एकांताचे कामुक वर्णन वाचले. "सीता रामाची "नको नको" अशी परोपरीने विनवणी करत असतेवेळी, तिचे लक्ष नसलेला एक क्षण साधून रामाने वेगाने भेदन केले व सीता सुखाच्या लाटेवर आरुढ होऊन "हाय हाय..." अशी व्हिव्हळू लागली.

हा टेक्निकली रेप नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्निकली होय पण प्रेमिकांच्या लटक्या रुसव्या-फुगव्याच्या खेळात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सीता रामाची "नको नको" अशी परोपरीने विनवणी करत असतेवेळी, तिचे लक्ष नसलेला एक क्षण साधून रामाने वेगाने भेदन केले व सीता सुखाच्या लाटेवर आरुढ होऊन "हाय हाय..." अशी व्हिव्हळू लागली.

टेक्निकली रेप किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही, परंतु अधोरेखित हे तांत्रिकदृष्ट्या* कसे शक्य असावे, याची कल्पना करून पाहतोय. जमत नाहीये. Sad


* नाही म्हणजे, हा 'योग' साधण्यासाठी राम आणि सीता दोघेही किमानपक्षी कमरेच्या खाली विवस्त्रावस्थेत असणे आवश्यक नाही काय? रामाचे एकवेळ सोडा, पण एवढी 'नको, नको' अशी परोपरीने विनवणी करण्याच्या मनःस्थितीत असलेली सीता विवस्त्रावस्थेत होती, ते काय प्रचंड उकाड्याने जीव जात होता म्हणून? (शी:! असल्या घामाच्या चिकचिकाटात असले काहीतरी सुचते तरी कसे, म्हणतो यांना!)

आणि दोघेही जर कमरेखाली विवस्त्रावस्थेत नसतील, तर या प्रसंगाचे चित्र डोळ्यांपुढे उभारण्याचा प्रयत्न करूनही उभे राहत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>शी:! असल्या घामाच्या चिकचिकाटात असले काहीतरी सुचते तरी कसे, म्हणतो यांना!

नाशिक परिसरात घामाची चिकचिक नसते असे वाटते. एक दीड लाख वर्षांपूर्वी कसे होते ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घामाचा चिकचिकाट नसेल, जीव जाण्यासारखा मनस्वी उकाडा जर नसेल, तर मग दोघेही कमरेखालचे सोडून बसले नेमके कशासाठी होते, असा प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कमरेखालचे सोडून बसले नेमके कशासाठी होते

कल्पना नाही.

राम आणि सीता हे सौदिण्डियन पद्धतीने लुंग्या घालत असतील तर "सोडून बसले" असतीलच असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असल्या घामाच्या चिकचिकाटात असले काहीतरी सुचते तरी कसे, म्हणतो यांना!)

हाच घाम कालीदासाच्या काव्याचा विषय आहे (समुद्गतस्वेद्चितांगसंधय:... इ. ऋतुसंहार सर्ग १)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे असे बघा, ते राम आणि सीता यांच्यामध्ये असे काही घडले, ते त्या दोघांपैकी कोणी नंतर प्रस्तुत लेखकमहोदयांना सांगायला गेले होते, की दोघांपैकी कोणी आपले फेसबुक स्टेटस तसे अपडेट केले होते? मग ही घटना प्रस्तुत लेखकमहोदयांना कळली कशी?

काही नाही, स्वतःची फ्याण्टशी अशी राम-सीतेच्या नावावर खपवून द्यायची, झाले. तेव्हा, जो घडलाच नाही, तो टेक्निकली रेप होता, किंवा कसे, याबद्दल टेन्शन कशापायी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी साहित्यातल्या लैंगिकतेचा आढावा आवडला. भाऊ पाध्ये - तेंडुलकर - मेघना पेठे - सुमेध वडावाला रिसबूड* यांच्या लिखाणात येणार्‍या, कमीअधिक प्रमाणातल्या दबलेल्या लैंगिक भावनांच्या प्रकटीकरणाबद्दल आणि तुलनेने मुख्य प्रवाहातल्या लिखाणाबद्दल (उदा. नंदा प्रधानचं 'किती बाया पाहिल्या आहेत यानं?' हा त्या काळात कदाचित धीट वाटणारा आणि आता धीटपणाच्या बहुधा कक्षेतही न येणारा प्रश्न किंवा अपूर्वाईत 'भलतेच आनंदी' असा समलैंगिकांवर मारलेला शेरा) वाचायला आवडेल.

*चटकन आठवलेली चार नावं. एकाच पंक्तीत आलेली असली तरी त्यांना एकाच पंगतीत बसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, या निष्कर्षावर कुणी येऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी सिनेमा जसा, ग्लोबलायझेशनच्या आधी तुंबलेल्या अर्थव्यवस्थेने मुक्त आर्थिक धोरण येताच खळखळून स्खलित व्हावे, तसा अचानक वयात आला, तसे हे संकेतस्थळही बघता बघता आणि अचानकच वयात आले आहे. 'स्वर्ग पतीके चरणोंमे नही, थोडा उपर होता है' या संवाद किंवा (निवडणुकीतला अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात ) 'तुम विथड्रॉ करोगे के नही?' या सवालाला ' 'अगर तुम्हारे बापने टाईमपे विथड्रॉ किया होता, तो तुम पैदाही नही होते' असले संवाद पचवण्याइतपतच नव्हे तर मिटक्या मारत त्यांचा आनंद घेण्याइतपत जसा आपला प्रेक्षकही उन्नत झाला, तसा विलास सावंतांच्या 'फोनमेट' पासून मेघना पेठेंच्या कोणत्याही कथेवर प्रत्यक्ष नव्हे पण आभासी गप्पा मारण्याइतपत मराठी वाचकही उत्थापित झाला. स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांपासून कॉन्डोमपर्यंत सर्व विषयांवर लिहिणे वाचणे आंतरजालावर टरारले. एकीकडे पडद्यावरची प्रणयदृष्ये अधिक धीट आणि थेट झाली. नायक नायिकेने जवळ यायचे आणि मग कुठे एकमेकांवर घासली जाणारी फुलेच दाखव, कुठे चोचीत चोच घालणारी पाखरेच दाखव अशांऐवजी नायक नायिकेच्या ओठांवर धाडसीपणाने आणि क्वचित धसमुसळेपणाने आपले ओठ रुतवू लागले. आला रे आला, हिंदी सिनेमा वयात आला. ढीचँग ढीचँग ढीचँग ढीचँग ...
मराठी संकेतस्थळे हा हिंदी सिनेमाप्रमाणेच जनमनाचा आरसा आहे असे एक गृहितक धरल्यास हिंदी सिनेमा धीट झाला म्हणजे एकूण समाज धीट झाला आणि मराठी संकेतस्थळ धीट झाले म्हणजेही एकूण समाज धीट झाला. मानव मर्त्य आहे, सॉक्रेटीस मानव आहे, म्हणून सॉक्रेटीस मर्त्य आहे. समाजात जे घडते त्याची प्रतिबिंबे संकेतस्थळावर उमटतात. समाजातल्या धुतल्या जाणार्‍या लुगड्या-धोतरांचे ओघळ संकेतस्थळांवर येतात. समाजातल्या रंगलेल्या पानांच्या पिचकार्‍या संकेतस्थळांवर उमटतात. मग कधी सादा मसाला, तर कधी फूलचंद, कधी कलकत्ता मीठा तस कधी बनारस एकसोबीस तीनसो..तर ते असो. तस्मात 'ऐसे अक्षरे'वर हल्ली अचानकच लैंगिकतेवर खुल्लमखुल्ला झंकारबीट डॅन्सबार लेखनाचे पेव फुटले आहे.'मराठी संकेतस्थळाचा 'तेचतेचपणा' आणि हे पेव याचा काही संबंध असावा की काय?
असे असले तरीही मी 'नाग या कथेमधली सूचक आणि बारीक लैंगिकता' या विषयावर एक लेख लिहिण्याचा मानस बाळगून आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अनिल कुंबळेवर कोणीतरी 'फार स्पिन करत नाही' अशी टीका केल्यावर तो म्हणाला होता की 'चेंडू फक्त चार इंच वळण्याची गरज असते, फक्त तो वळतोय की नाही, कुठे वळतोय हे बॅट्समनला कळता कामा नये.' हे आठवण्याचं कारण म्हणजे तिरकस लेखनालाही हे लागू होतं. सन्जोप रावांचा अशा सटल तिरकस लेखनाबद्दल कोणीच हात धरू शकणार नाही. Smile

मराठी संकेतस्थळांना जनमानसाचा आरसा म्हणणं म्हणजे नरीमन पॉइंटवरच्या बिल्डिंगींकडे बोट दाखवून 'हे भारताचं प्रातिनिधक रूप' असं म्हणणं वाटतं.

तस्मात 'ऐसे अक्षरे'वर हल्ली अचानकच लैंगिकतेवर खुल्लमखुल्ला झंकारबीट डॅन्सबार लेखनाचे पेव फुटले आहे.

छे हो, अशा खुल्लमखुल्ला चर्चा करणं हे ऐसीच्या जन्मापासूनच सुरू आहे. (आठवा - पेड्डामानिषी, हस्त मैथुन शाप कि वरदान, पिवळ्या पुस्तकांना संग्रहालयात पाठवा. हे लेख पहिल्या दोनतीन आठवड्यांतच आलेले होते) कदाचित तुम्हाला असं म्हणायचं असेल की ऐसी अक्षरे चे आगमन हेच खुल्लम खुल्ला मुक्त चर्चेच्या सुरूवातीचं लक्षण आहे. तसं म्हणताना केवळ ऐसीचं कौतुक करताहात की इतर संस्थळांवर कोतेपणाचा आरोप करत आहात हे समजत नाही. म्हटलं ना, चार इंच इथे की चार इंच तिथे वळतोय हेच कळत नाही.

असे असले तरीही मी 'नाग या कथेमधली सूचक आणि बारीक लैंगिकता' या विषयावर एक लेख लिहिण्याचा मानस बाळगून आहे!

नाग कथेवरचं तुमचं भाष्य वाचायला निश्चितच आवडेल. पण या लेखाच्या नावातला बारीक शब्द काढून तिथे दुसरा काही योजाल अशी आशा करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बारीक शब्द का काढायचा? सूक्ष्म शब्द वापरला नाही यात नशीब माना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी संकेतस्थळ धीट झाले म्हणजेही एकूण समाज धीट झाला.

समाज धीट होण्याचं चिन्ह माझ्यामते एकच. त्या समाजाच्या भाषेत जे चित्रपट निर्माण होतात ते किती धीट आहेत. आत्ता कुठे मराठी सिनेमात बिकीनी आली. बेडसीन्स यायला अजुन कदाचित १५-२० वर्षे जावी लागतील.

नुकतंच एका फेसबुकग्रुपवर नग्नता असलेले पेटींग शेअर केलं तर केव्हढा थयथयाट केला गेला, तो अजुन आठवणीत ताजा आहे (एका कोउन्सेलिंग करणा-या बाईनी जे अकलेचे तारे तोडले ते वाचुन डोके बधिरच झाले.)

तस्मात समाज धीट झाला हे थोडं धाडसी विधान होईल. धीट होऊ पहातोय, हे जास्त अचूक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादातला खुसखुशीतपणा आवडला.

>>> असे असले तरीही मी 'नाग या कथेमधली सूचक आणि बारीक लैंगिकता' या विषयावर एक लेख लिहिण्याचा मानस बाळगून आहे! <<<

माधव आचवल यांनी आपल्या सुप्रसिद्ध आणि प्रदीर्घ लेखामधे "नाग" ही कथा घेऊन जीए सेंद्रीय प्रतिमांचा वापर कसा करतात हे दाखवून दिले आहे ते आठवले. जीएंच्या एकंदरीत चिरेबंदी लिखाणामधे या कथेची वीण (तुलनात्मक दृष्ट्या किंचितच) कमी घट्ट असल्याने या कथेचा "डेमो" करता चांगला वापर होईल असं आचवल आवर्जून म्हणतात.

जीएंच्या "कवठे" या कथेमधे अ‍ॅडम-ईव्हचं रूपक कसं वापरलं गेलं आहे त्याचं सांगोपांग विश्लेषण धोंवि देशपांडे करतात तेही आठवलं.

सन्जोपराव यांचा लेख याच उज्ज्वल परंपरेतला एक ठरेल यात शंका नाही. या निमित्ताने "नाग"च नव्हे तर "जीएंच्या लिखाणातली लैंगिकता : काही दृष्टीक्षेप" असा लेख लिहावा असं मी नम्रपणे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लिखाण आवडले. बाबा कदम आणि जयवन्त दळवी यांच्या साहित्याने बहुतेक लैंगिकतेशी माझी ओळख झाली असावी. हिंदी कादंबऱ्या चोरून वाचायचाही नाद होता. ययाती, मृत्युंजय वाचतानाही, कर्ण/वृषाली/द्रौपदी, ययाती/देवयानी/शर्मिष्टा यांच्या संदर्भातल्या वर्णनाची पारायणे केलेली आठवतात. पण ते तेवढे ठळक नव्हते. अगदीच बाळबोध (रोमँटीसाईज्ड) वर्णने असायची. खरी लैंगिक वर्णने इंग्रजी पुस्तकातूनच जास्त वाचायला मिळाली, तेही खूप नंतर.

मराठी साहित्यात हातचं राखून लिहायची प्रथा आहे. एकतर खूप बौद्धिक/वैचारिक(मग ते अवास्तव का असेना) लिहले तरच ते चांगले साहित्य असा काहीतरी समज. थोडं लैंगिक वर्णन आले कि अश्लीलतेचा आरोप किंवा पॉपकोर्न लिटरेचरचा शिक्का. पेंडसेंचे "रथचक्र" आठवतेय, माझी आवडती कादंबरी. त्यात पौगंडावस्थेतला मुलगा, हॉटेलमालकिणीच्या लैंगिक, कामुक हालचालींनी उत्तेजित होतो आणि कागदावर काहीबाही चित्रं काढतो, नंतर तिच्या रुममधेही जातो आणि तिला नको त्या अवस्थेत बघतो. माझ्या वाचण्यात आलेले, मराठीतल्या चांगल्या साहित्यातले ते एकमेव अश्लील वर्णन असावं! तेव्हाही पेंडसेंना कित्येकांनी ते वर्णन काढण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मानला नाही ते आपले नशीब!

शाळेत असतानाचा एक मजेदार प्रसंग आठवतोय. सुट्टीत आजोळी असताना, आम्हा भावंडांना अर्धनग्न स्त्रीपुरुषांच्या चित्रांचं एक जुनं पुस्तक घरात कुठेतरी सापडलं. मला दोन लग्नाळू मामा होते. त्यांची फजिती करायला म्हणून आम्ही ते आजोबांना दिले (अर्थातच आमचे त्याआधी ते दोन-तीनदा संपूर्ण चाळून, त्यावर खी-खी करून झाले होते). वाटलं ते आता मामांना खूप बोलणार. पण तसं काही झालं नाही. नंतर आम्ही आजोबांना मात्र काही पानं चाळताना बघितलं! :O

<<"फ्लिकर" जिथे थांबेल ती पाने म्हणजे या कादंबर्‍यांमधली विशेष "रंगीत" पाने होत. हीच पाने परत परत वाचली गेलेली असल्याने , फ्लिकर तेथे थांबतो. आपल्याला हवे असलेले "ज्ञानकण" तेथे वेचावेत. >>
हा प्रयोग आम्हीही करून पहिला होता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी साहित्य + लैंगिकता + स्मरणरंजन (आम आदमीचे जिव्हाळ्याचे विषय) त्रिवेणीसंगम की काय म्हणतात ते साधले की एका लेखात.

>>(माझ्या मते अदुर्लक्षणीय , सभ्यतेपायी न बोलल्या जाणार्‍या) क्या बात!!
रमाबाई कुरुसुंदीकर यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!

---------------------------------------------------------------------
पुन्हा पुन्हा तेच तेच पासुन पुन्हा एकदा तेच ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा. छान लेख.
जवळपास अगदी असेच अनुभव लहानपणी आलेले आठवतात. धार्मिक पुस्तके इ. वरून एक प्रसंग आठवला:

शालेय वयात माझ्या इतर मित्रांना त्याकाळचे धार्मिक सिनेमे बघायला मिळायचे. 'महासती अनुसूया' 'हनुमान पाताल -विजय', आणि काय काय. आमच्या घरी मात्र धार्मिक वातावरण अजिबात नसल्याने असे सिनेमे बघण्याचा प्रश्नच नव्हता. एकदा मी माझ्या एका खास मित्राला विचारलं, "कारे, तू असे सिनेमे का बघतोस?"
त्यावर त्यानं सांगितलं, की त्या सिनेमांमधे बघण्यासारखं बरंच काही असतं, म्हणून.
मला काही उलगडा झाला नाही, म्हणून मी त्याला विचारलं, की त्याला त्यातले चमत्कार वगैरे खरे वाटतात का?
त्यावर तो जे म्हणाला, ते ऐकून मी चाटच पडलो होतो:
"आपल्याला काय करायचंय त्या चमत्कारांशी? अरे, अश्या सिनेमातल्या त्या सत्या-सावित्र्या वगैरे असतात ना, त्या चक्क काचोळी घालून वावरतात. वरती नावापुरतं एकादं कापड, आणि खाली लहानसं धोतर. एकदम मस्त दिसतात त्या सत्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भलताच रोचक "धार्मिक" दृष्टिकोन.

यावरून आमच्या घरात घडलेली गोष्ट आठवली. आमच्या जन्माच्या आधीची.
आमचे पिताश्री धार्मिक वृत्तीचे. एकंदर सिनेमानाटकांच्या बाबत भलतेच अडाणी. साठच्या दशकातली गोष्ट. "संगम" नावाचा सिनेमा आलेला आहे, तो लोकप्रिय आहे असं त्यांनी उडतउडत ऐकलं. मग स्वतःच्या मातोश्रींचे भक्त असलेले आमचे पिताजी आमच्या आज्जीबाईंना "गंगायमुनेचा संगम प्रत्यक्ष नाही तर निदान सिनेमात तरी दाखवावा", म्हणून तिला घेऊन तो सिनेमा पहायला गेले होते. पुढील प्रसंग काय वर्णावा महाराजा. जेहेत्ते कालाचे ठायीं तो वर्णन करण्याचे बळ आम्हांपाशी नाही.

आमच्या घराण्याची (!) उज्ज्वल (!!) परंपरा पुढेही अनेक वर्षांनी कायम असल्याची प्रचिती आम्हांस मिळाली. आमची एक चुलतबहीण ग्राज्वेट झाल्यानंतर "सेलेब्रेट्" करण्याकरता तिच्या मैत्रिणींबरोबर सिनेमाला जायला निघाली. एरवी तसे "साधेसुधे" सिनेमे बघणार्‍या या ग्रुपला असं नुकतंच कळलं होतं की, त्या वर्षी "द लास्ट एंपरर" या सिनेमाला ऑस्कर मिळालेले आहे. नुकतेच ग्राज्वेट झाल्यामुळे त्यांनी उच्च कलात्मक अभिरुचीचे सिनेमे यापुढे पहाणे अपरिहार्य होते. म्हणून त्यावेळी इंग्रजी सिनेमे दाखवणार्‍या शहरातल्या एकमेव थेट्रात या "मिळून सार्‍याजणी" गेल्या. ऑस्करविजेत्या सिनेमाला आलेला प्रेक्षकांचा वर्ग मात्र झोपडपट्टीचा. तरी हिय्या करून तिकीट काढले. कळकट्ट थेटर. सिग्रेटचे वास. जीव मुठीत धरून बसलेल्या मुलींच्या व्यतिरिक्त बाकी प्रेक्षक पुरुषच. शेवटी एकदाचा तो सिनेमा सुरू झाला. सिनेमाचं नाव होतं "द लॉस्ट एम्पायर". मदिरा आणि मदिराक्षी यांमुळे साम्राज्ये कशी लयाला गेली याची इत्थंभूत चित्रणे असणारा बी-ग्रेडी पट. पुढील प्रसंग काय वर्णावा महाराजा. || ध्रु ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

डिट्टो असाच अनुभव आम्हा मैत्रिणींना 'काम सूत्र' बघताना आला होता. पंधरा मिनिटातच आम्ही सिनेमा गृहा बाहेर होतो. बॅंडीट क्वीनचीही आठवण झाली. तो मी डोळ्यावर हात ठेऊनच पहिला होता तेव्हा महत्वाचे सगळे सीन बंद डोळ्याआडच पाहिले/कल्पिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जात्याच जिज्ञासू असल्यामुळे लगेचच नवनाथ कथासार ऑनलाईन असल्याचा लाभ घेतला Smile मी हे फारच लहान असताना (३री-४थी बहुतेक) एकदा कोणाच्यातरी घरी वाचले होते, पण त्यातील लैंगिकता तेव्हा डोक्यावरून गेली होते. नंतर मराठी आंतरजालावरच एकदा याचे थोडे संदर्भ बघितले होते, कदाचित मुक्तसुनीत यांच्याच जुन्या लेखात असावेत, त्यामुळे उत्सुकता होती. या लेखात सुद्धा शिवसंहितेचा असाच एक संदर्भ आहे.

रामायण, महाभारत थोड्या कळत्या वयात वाचले होते आणी त्यातील संदर्भ (मंत्राने पुत्रप्राप्ती होणे वगैरे) समजले होते पण मूळ कलाकृतीतील वर्णने फार रोमँटिक वगैरे वाटली नाहित. परंतु या महाकाव्यांवर आधारीत जे काही derivative work आहे, ययाती, मृत्युंजय वगैरे, त्यांत लेखकाने बरेच स्वातंत्र्य घेतले आहे. या गोष्टी परत परत वाचलेल्या मलाही आठवतात. अजून एक गोष्ट आठवते ती म्हणजे काही दिवाळी अंक केवळ खप वाढवण्यासाठी soft porn म्हणता येइल असे छापत, तेही परत परत वाचल्याचे आठवते.

दोन तीन वर्षांपूर्वी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वाचले होते, त्यावरून माझा कयास असा आहे की जुन्या धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ती वर्णने मुद्दामून आली नसून ज्याकाळात ती पुस्तके लिहिली गेली त्याकाळातील समाजाचे प्रतिबिंब त्यात पडले आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या बाबतीतपण हे खरे असावे. American sitcoms बद्धल माझी अशाच स्वरूपाची निरीक्षणे आहेत पण या लेखाचा विषय "मराठी लिखाण आणि लैंगिकता" असल्यामुळे ती इथे मांडत नाही.

अशा खुमासदार लेखकाची एखादी कादंबरी उचलावी आणि एखाद्या "फ्लिकर" प्रमाणे त्याची पाने अंगठ्याने भरभर उलटवावी. "फ्लिकर" जिथे थांबेल ती पाने म्हणजे या कादंबर्‍यांमधली विशेष "रंगीत" पाने होत.

याची माहिती नव्हती, आता हे नक्की करून बघण्यात येइल. कोणी खुमासदार लेखक किंवा कादंबरी सुचवेल काय?

बाकी नवनाथ कथासाराच दर्जा मला एखाद्या comic book सारखा वाटला, अवांतर होइल म्हणून इथे जास्त लिहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कामुक गोष्टींशी परिचय धार्मिक/पौराणिक वाङ्मयातून होतो या मताशी सहमत आहे.
सगळ्या गोष्टींचे संस्कार करण्यास उत्तम प्रकार म्हणजे रामायण-महाभारत. अगदी लहान असतानाच अमकीला तमक्यापासून ढमका झाला अशी भाषा ऐकून मुलं कशी होतात याचा अंदाज आलाच होता; पण लहानपणी या गोष्टींच्या सचित्र पुस्तकांचा (चांदोबा) फार मोठा परिणाम झाला आहे.
अजूनही मला त्यातली अहिल्येची, अनसूयेची, अर्जुन-ऊर्वशी, कीचक-सैरंध्री, विश्वामित्र-मेनका वगैरे गोष्टी आठवतात. अर्थात भाषा अगदी थेट नसली तरी चित्रे मात्र बर्‍यापैकी सूचक असत. सुंदर स्त्रीचे शरीर आणि कपडे यांच्या कल्पना घडवण्यात या चित्रांचा मोठा हातभार लागला.
पुढे सचित्र पुस्तके वाचणे बंद झाले आणि लघुकथा वाचण्याची आवड लागली. जीएंच्या कथांमध्ये काही वर्णने अत्यंत कामुक वाटतात. एकेका वाक्यात वासना मूर्त करण्याचे त्यांचे कसब कमाल आहे. सापाला आपल्या नग्न शरीरावर मनसोक्त दंश करू देणारी राणी असो की गायन मास्तराला आपल्या सर्वांगावर हात फिरवू देणारी तालेवारीण असो की मनोर्‍यावरचा प्रकाश बघायला जाणार्‍याला आपले स्तनयुग्म दाखवून थांबवू पाहणारी रखवालदार असो, मनात क्षणात एखाद्या ठिणगीसारखी उमटून जाणारी वासना त्यातून इतकी परिणामकारकपणे दिसते की बस. शिवाय त्यांची वाक्ये तर एक से एक:"चाफ्याचा वास असलेली शुक्राची चांदणी", "सर्वांगावर फिरणारे लालतोंडाचे वासनेचे सरडे" इत्यादी.
त्यानंतर लैंगिकतेचा एक अंतःप्रवाह आपल्याला जयवंत दळवी यांच्या लेखनात दिसतो हे वरती अनेकांनी मांडलेले आहेच, पण व्यंकटेश माडगूळकरांच्या काही कथांमध्ये मला तो जाणवला. "जांभळाचे दिवस"मध्ये नवर्‍याने टाकलेल्या मुसलमान मुलीशी नदीकाठी होणार्‍या गाठीभेटी आणि एकाही शब्दात न सांगितलेले पण पदोपदी जाणवणारे कथेच्या नायकाला तिच्याबद्दल वाटणारे आकर्षण अत्यंत प्रभावशाली आहे. तसाच प्रकार पत्र लिहून देणारा आणि पत्र लिहून घेणारीच्या कथेचा. काहीही न घडता त्या बाईचे चित्र आणि नायकाला वाटणारे अनावर आकर्षण डोळ्यासमोर उभे राहते.
स्त्रियांच्या बाजूने लैंगिक वर्णन असलेल्या फार कथा वाचलेल्या नाहीत, नाही म्हणायला (बहुतेक अंबिका सरकारांची) एक कथा वाचली होती. त्यात काही उच्चभ्रू जोडप्यांची पार्टी लाईफस्टाईल आणि त्यातून स्वाभाविकपणे दुसरा पुरुष बिछान्यात कसा असेल अशी नायिकेला वाटणारी उत्सुकता आणि अंधारात तसे कल्पून आपल्या पतीशी केलेला समागम अशी एक कथा वाचली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>परिकथा असोत की पुराणकथा - निदान त्यांच्या बाळबोध रूपात - या सार्‍या पुरुषप्रधान दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. <<

शुकबहात्तरी किंवा तत्सम साहित्यामध्ये ह्याला अपवाद सापडावेत. लहानपणी वाचलेल्या अशा काही कथांत अनेक पुरुषांबरोबर संबंध ठेवणारी चतुर विवाहित स्त्री हा एक ठोकळा (टाईप) आठवतो आहे. आनंद साधले यांनी आपल्या 'आनंदध्वजाच्या कथां'मध्येदेखील असे काही नमुने रंगवले होते.

'अमर चित्र कथां'च्या माध्यमातून येणारी लैंगिकता मला लहानपणी रोचक वाटली होती. उदाहरणार्थ, शकुंतलेला काचणारी काचोळी आणि तिच्याभोवती भुणभुणणारा भुंगा वगैरे कालिदासावरून उघडउघड उचललेले होते, किंवा 'कुमार संभव'मधला शंकराचं जळजळतं वीर्य उचलून गंगेत टाकणारा अग्नि वगैरेसुद्धा आठवतात.

बाकी काकोडकर आठवतात तर मग अशोक मेंगजी, द. स. काकडे वगैरेसुद्धा आठवायला हवेत. चिंतामणी लागू यांची 'सागरपुत्र' नावाची कादंबरी शाळेत वाचली होती. त्यात गच्चीवर एकट्या झोपलेल्या कुमारवयीन नायकाला एक विवाहित प्रौढा रात्री चोरून भेटते आणि त्याचा कौमार्यभंग करते असा काहीसा प्रसंग आठवतो. आणि 'मिल्स अ‍ॅन्ड बून'ची कुमुदिनी रांगणेकरांनी केलेली भाषांतरं म्हणजे स्त्रियांसाठीचं (पक्षी : बाहुपाश आणि चुंबनांपुरतं मर्यादित त्यामुळे 'चांगल्या घरच्या स्त्रियांना वाचता येईल असं) पिवळं साहित्यच होतं.

एकंदर मराठी साहित्यातली लैंगिकता सुमार आहे ह्याच्याशी सहमत. मात्र श्री.ना.पेंडशांचीच 'ऑक्टोपस' त्या काळी वेगळ्या प्रकारे आणि गांभीर्यानं लैंगिकतेकडे पाहणारी म्हणून आवडली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऑक्टोपस ही दीर्घकथा होती का? श्रीमंत धनाढ्य असामी व त्यांची रखेल अशा काही वळणाने जाणारी? अन या असामीचा मृत्यूही तिच्याशी रत असताना अचानक होतो वगैरे? मला एक आवडलेली कथा अगदी फेंट आठवते आहे. अन तिचे नाव "ऑक्टोपस" असावे असेही काहीसे स्मरते. पण मला वाटतं बेहेरे का काही आडनाव होतं लेखकाचं. इतकी वर्ष झालीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रत्नाकर मतकरी: अक्षर दिवाळी अंक
पुराणातील उषा अनिरुद्ध प्रणयाची रंगीत वर्णने
आनंद साधले
अरेबियन नाईट्स (कोणितरी केलेला लंपट अनुवाद)
वगैरे
...
मग इंग्रजी वाङमयाचा शोध लागला आणि आयुष्य अधिक समृध्द झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनःपूतम समाचरेत्|

>>रत्नाकर मतकरी: अक्षर दिवाळी अंक << "अ‍ॅडम" कादंबरी ?
>> आनंद साधले << "आनंदध्वजाच्या कथा" ?
>>>> अरेबियन नाईट्स (कोणितरी केलेला लंपट अनुवाद) <<< गौरी देशपांडे यांनी केलेल्या अनुवादाचे १५-१६ खंड ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आनंद साधले << "आनंदध्वजाच्या कथा" ?
होय.
पुरुषांच्या चावडीवरच्या गप्पा, गर्थ, पत्नीचे प्रेम ती पतीच्या गैरहजेरीत काय करते यावरुन मोजणे, त्यावरुन पैजा लावणे, आसनांचे नवनवीन प्रकार झ्त्यादी. सगळे मजेदार प्रकार आहेत.
अफाट पुस्तक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

मुसुशेठ, धागा ज-ब-ह-रा आहे!!!
पाटी-पेणसल घेऊन नोट्स काढतो आहे!!! Smile

शाळेत आठवी/नववीत असतांना माझ्या दप्तरात बाईंना 'आनंदध्वजाच्या कथा' सापडलं. प्रायव्हेट लायब्ररी लावलेली त्याचं होतं ते, लायब्ररी शाळेत जायच्यायायच्या रस्त्यावरच असल्याने ते दप्तरात राहिलं इतकंच!
बाईंनी आधी मला न भूतो न भविष्यति असं शाब्दिक बोचकारलं आणि नंतर आमच्या पालकांना बोलावणं धाडलं.
"अहो तुमच्या मुलाच्या दप्तरात बघा काय पुस्तक मिळालं!!", बाई.
"मग? दप्तरात पुस्तक नाही मिळणार तर काय मिळणार?", आई.
"अहो पण हे पुस्तक वाचलंय का तुम्ही?", बाई
"नाही, काय आहे त्याच्यात?", आई
"अहो स्त्री-पुरुषसंबंधांची वर्णनं आहेत! असलं वाचतो तो!!!", बाई
"मग त्यात काय झालं? या वयातल्या कुतुहलाला अनुसरूनच वागतोय की तो!!!", आई (माजी शिक्षिका)
"आई, होऊ कसा उतराई?", मी (मनात).
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य तुमच्या मातु:श्री!! खरेच असे पालक, त्यातूनही आई मिळायला भाग्य लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तेही चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात!!
तसा मी भाग्यवानच!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोळे पाणावले.

अशीच अमुची आई असती...... (तर आम्ही छत्रपती झालो असतो असं नाही) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा प्रतिसाद कालच वाचला आणि टेडवरचा हा व्हीडीओ आजच सापडला.

Mechai Viravaidya: How Mr. Condom made Thailand a better place

थायलंडमधली लोकसंख्या वाढण्याचा दर १९७४ ते २००० या काळात ३.३% इथून ०.५% एवढा कमी कसा झाला आणि १९९० च्या दशकात HIV पसरण्याचं प्रमाण ९०% कमी कसं केलं याबद्दल मेकाई वीरावैद्य, थायलंडचे "श्री. निरोध", यांचं हे टॉक आहे. आपल्याकडे अजूनही लैंगिक शिक्षणाबद्दल ठराविक वर्गात प्रचंड औदासीन्य आहे. थायलंडने लहान मुलामुलींना प्रशिक्षण दिलं आणि आपल्या वयाच्या मुलामुलींना शिकवण्याची अनुमती दिली. यातली काही वाक्य, पंचेस फारच आवडले. उदा: Weapons of mass protection (निरोधाचं वर्णन), Condoms are girls best friends; in Thailand most people cannot have diamonds.

पण सुरूवातीलाच आलेलं एक वाक्य फारच आवडलं. (गर्भनिरोधाच्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवली; त्यासंदर्भात) "नाही हे उत्तर नव्हतं, ही प्रश्नाची सुरूवात होती."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लैंगीकता म्हणजे भयंकर कैतरी...बोलु नये (पण हळुच कार्यभाग उरकावा) अशा कैतरी सामाजिक भावना असल्या की उघडपणे बोलणं म्हणजे पुढारलेले असल्याचं दाखवणं असा विचार असतो असं माझं मत.

पिवळी पुस्तकं म्हणजे कोणती ? भाउ पाध्ये अन तेंडुलकर वाचलेत थोडेसे. धार्मिक पुस्तकांत सुद्धा भरपुर वर्णनं आहेत याच्याशी सहमत. मग अशा लेखांची गरज का पडावी? कारण भारतीय समाज मुळातच दांभिक आहे. अन जुन्या काळी मीनाक्षी नावाच्या अभिनेत्रीने जमुना जळी खेळु खेळ या गाण्यात स्विम सुट घातला आहे..झालंच तर हंटर नादिया का असंच काहीसं नाव असलेल्या अभिनेत्रीचे न्युड सीन्स असलेले पिच्चर पण आहेत. त्यामुळे नंतरच्या काळात दांभिकपणा वाढुन परत एक वर्तुळ पुर्ण होईल इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊ पाध्ये, तेंडुलकर यांचा पीतसाहित्याशी संबंध लावणे म्हणजे.. पण जाऊ दे. ते पिवळे साहित्य नव्हे.
माझ्या आठवणींप्रमाणे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी 'रंभा', 'मेनका', 'कामदेवी' अशा नावाची मासिके निघत असत. त्यात संभोगाची चावट, सूचक आणि काही वेळा खुल्लमखुल्ला वर्णने असत. 'आवाज' च्या दिवाळी अंकात असत तशी किंवा त्याहून धीट अर्कचित्रे असत (अशी चित्रे काढणार्‍यांमध्ये दिलीप परदेशी हे एक ठळक नाव होते!). चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबर्‍या (आणि 'चंद्रकांत' हा दिवाळी अंक) हेही शृंगारिक साहित्यातले मानदंड होते. काकोडकरांच्या कादंबर्‍यांतले नायिकेने लाजून खाली मान वळवणे आणि कानशिले आरक्त होणे हे त्या काळच्या नऊवारी मनांना गुदगुल्या करायला पुरेसे होते. पण तरीही हे काही क्लासिकल पिवळे साहित्य नव्हे. पिवळ्या साहित्यात खरी भर घातली ती बेळगावाहून प्रसिद्ध होणार्‍या 'इब्लिस', 'हैदोस' अशा मासिकांनी. महाराष्ट्रातले पुस्तकविषयक धोरण त्या काळात भलतेच सोवळे होते, त्यामुळे ही पुस्तके कर्नाटकातून महाराष्ट्रात यायची. स्त्री-पुरुष संबंधांबाबत अवाजवी अपेक्षा फुलवण्याचे महान कार्य या पुस्तकांनी केले. विशेषतः इंद्रियांच्या आकारांबाबत इंच आणि फुटांची गणिते वाचून आणि लैंगिक संबंधांच्या एकूण कालावधीच्या, क्षमतेच्या वगैरे अफाट कल्पना वाचून एका पिढीच्या पिढीला एक जबरदस्त न्यूनगंड दिला तो या साहित्याने. पुढे सिलिकॉन आणि स्टेरॉईडस (आणि ट्रिक फोटोग्राफी) यांच्या मदतीने बनवलेल्या ब्ल्यू फिल्मसने हेच काम अधिक प्रभावीपणाने केले. एस.टी. स्थानकांवर ही पुस्तके उपलब्द्ध असत. पॉकेटमनी वाचवून असली पुस्तके विकत घ्यायची आणि त्यातली वर्णने चेकाळून वाचायची आणि अस्वस्थपणे कुशी बदलत तळमळत पडून राहायचे हे नेमाडेंच्या कादंबर्‍यांत वर्णन केलेले आयुष्य त्या काळात तरुण होऊ घातलेल्या असंख्य दुर्दैवी जीवांच्या वाट्याला आले आहे. याच काळात उत्तर भारतातून प्रसिद्ध होणार्‍या हिंदी साहित्याने मराठी तरुणांना पुरते पोळवून टाकले होते. 'मसलने लगा', ''कराहोंसे कमरा गूंज उठा', 'छा गया' असल्या वाक्प्रचारांचा मर्‍हाट्यांना परिचय झाला तो याच वेळी. चतकोर आकाराच्या अशा पुस्तकांची शीर्षके 'हमाम में तीन नंगे' अशी बिनधास्त असत. (आणि चतकोर आकारामुळे ही पुस्तके लपवायलाही सोपी पडत!) या सगळ्या साहित्यात लैंगिक फँटसीच अधिक असे. प्रौढ, पुष्ट स्त्रीने तिच्यापेक्षा लहान वयाच्या तरुणाशी संग करणे, बॉसने त्याच्या सेक्रेटरीशी रत होणे, वहिनी-दीराचे संबंध येणे असले सगळे ते असे. ही पुस्तके भाड्याने मिळण्याचीही सोय होती.
त्यानंतर इंटरनेट आले आणि मग हे सोनेरी दिवस संपले. वर एका प्रतिक्रियेत 'मचाक' चा उल्लेख झाला आहे. सूचकता ते फँटसी ते विकृती असा मराठी पीतसाहित्याचा कसा प्रवास झाला हे आता ध्यानात येते. दुर्दैवाने या सगळ्याचे कुठे 'डॉक्युमेंटेशन' झाल्याचे माझ्या तरी बघण्यात नाही. ('मराठीतले अश्लील साहित्य- एक तौलनिक अभ्यास' हा विषय महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतल्या मराठी विभागांत पी.एच.डी. साठी चालेल काय?) त्यामुळे हे सगळे - 'टायटॅनिक' मध्ये रोझ म्हणते तसे ' एक्झिस्टस ओन्ली इन माय मेमरी'....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

+१११११११११११११११११११११११११.

याचे डॉक्युमेंटेशन कुठेतरी होणे मस्ट आहे. मराठीतील असभ्य वाक्प्रचारांवर जसे मध्यंतरी पुस्तक निघाले होते तसे यावरही पुस्तक इ. निघणे आवश्यक आहे. आणि भाऊ पाध्ये इ. ना पिवळे साहित्य म्हणणे म्हंजे अन्न तिखट लागल्यामुळे नॉनव्हेज आहे असा आरोप करणे होय. वरच्या प्रतिक्रियेत उल्लेखिलेले सर्व काही आता नेटवर आलेले आहे, शंकाच नाही. पण अजूनही या पुस्तकांचा खप बराच आहे असे अनुमानिण्यास अडचण नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

> एस.टी. स्थानकांवर ही पुस्तके उपलब्द्ध असत.

माझ्या घरातल्या अडगळीत 'Rasvanti' या नावाचं अतिशय घाणेरड्या इंग्रजीत लिहिलेलं असं एक मासिक मला मिळालं होतं. पूर्ण रेफरन्स असा:

RASVANTI only for couples, Editor & Publisher: Dr. Vardhan, Vol. 6, Dec. 1973, No. 2.

RASVANTI PRAKASHAN, Ahmedabad-1. (Govt. of India Regd. No. R. N. 15124-68)

या मासिकातली एक कविता (सगळ्या चुका मुळाबरहुकूम):

Magic of Rasvanti
-by Naresh Kumar

'RASVANTI' seen when
Father-in-law came in
Told many stories and
Asked me to read

By reading 'RASVANTI'
Forgotten world naughty
In embrace of Father-in-law
I spoiled as flower by bee

Opening the jacket
He said Sweet heart
Saree fell down, when
Called me Darling

Climbed on Spreading my legs
entered with a push
'Oh' I cried
'Stop' he said

with grace of 'RASVANTI'
reached heaven mighty
Here after my choice hearty
is the lovely 'RARVANTI'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

Ewwwwwwwwww!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिवळ्या साहित्यात खरी भर घातली ती बेळगावाहून प्रसिद्ध होणार्‍या 'इब्लिस', 'हैदोस' अशा मासिकांनी. महाराष्ट्रातले पुस्तकविषयक धोरण त्या काळात भलतेच सोवळे होते, त्यामुळे ही पुस्तके कर्नाटकातून महाराष्ट्रात यायची.
ही माहिते मजेदार , रोचक वगैरे.
त्यानंतर इंटरनेट आले आणि मग हे सोनेरी दिवस संपले.
प्रचंड सत्य Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेचसे मुद्दे तुमच्याच लेखनात आधी वाचले होते. भर घातलेला लेखही आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय सुंदर लेख.
मला 'सिंहासन बत्तिशी'मधे असे भलतेच रोचक तपशील मिळाले होते. 'त्याने तिचे वस्त्र फेडले व तिच्या डाळिंबाच्या देठांप्रमाणे दिसणार्‍या पुष्ट स्तनाग्रांवर आपल्या नखांचे व्रण उठवले' हे वाक्यही चांगलेच आठवते. आधी अविश्वास, मग अपार कुतुहल, मग मैत्रिणीला हे दाखवून काही आठवडे अनावर अवेळी हसणे, यांत गेले. काकोडकर अगदीच 'ह्या:' होते. लायब्रीत चाळलेल्या (होय होय, फ्लिकर पद्धत) त्यांच्या एका पुस्तकात कुणा चावट माणसाने 'आरक्त' हा शब्द हुडकून हुडकून त्याखाली लाल रेषा मारून ठेवल्या होत्या. ते पुस्तक चाळल्यावर मग काकोडकर राहिले ते राहिलेच. इंग्रजी वाचायचा भलताच कंटाळा येई (तो तसा अजुनी येतो म्हणा), तेव्हा सिडने शेल्डनच्या भाषांतरित कादंबर्‍या खूप वाचल्या. त्यात ही असली वर्णने भारी. त्याच सुमारास मतकरींचे 'अ‍ॅडम' आणि पाठोपाठ गौरी देशपांडे. नको नको म्हणत असताना एका पाहुण्या मामीने आयते मिळाले म्हणून समोर पडलेले 'थांग' वाचले आणि मग ती माझ्या पुस्तकांना हात लावेनाशी झाली. 'कैतरीच वाचतेस तू' हा तिचा शेरा आणि तिच्या आवडीच्या 'गॄहशोभिका'मधले 'नवर्‍याला खूश कसे ठेवावे' टायपाचे लेख यांच्या कॉम्बोमुळे भलतीच करमणूक झाली. (बादवे, 'गृहशोभिका' हा प्रकार भलताच भारी असतो. नवरा घरी येण्याच्या वेळी आकर्षक, मादक कसे दिसावे इथपासून ते आपले समाधान होते की नाही, हे कसे समजावून घ्यावे, इथवर सगळे काही त्यात असते. जोडीने मैद्याच्या चकल्या, शाही ब्रेड टुकडा, मेंदीची डिझाइन्स, चंदनाच्या फेसप्याकची कृती हे सगळे सुखनैव नांदत असते.)
'शेरलॉक'च्या निमित्ताने फॅनफिक या प्रकाराची ओळख झाली. त्यातही बर्‍याच गोष्टींत हे तपशील प्रामुख्याने आणि नि:संकोच येणारे. त्यातल्या एका अतिशय आवडलेल्या पोर्नोग्राफिक गोष्टीचे भाषांतर करावेसे वाटले, तेव्हा लक्षात आले - मातृभाषेत हे असले काही नि:संकोच मोकळेपणाने लिहिण्याबोलण्याचे आपल्या भाषेतल्या साहित्याला (आणि पर्यायाने आपल्याला) किती वावडे आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते सिडने शेल्डन आणि गृहशोभिकेबद्दल पूर्ण सहमत!! बाकी अस्मादिकांनी वेळीच नासदीयसूक्तभाष्य वाचल्याने पिवळी पुस्तके वाचूनही अवास्तव कल्पना मनात रुजल्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'आरक्त' हा शब्द हुडकून हुडकून त्याखाली लाल रेषा मारून ठेवल्या होत्या.

आरक्त आणि लाल रेषा ही जोडी रोचक आहे Smile

बाकी अगदी मो. रा. वाळंबेंच्या पुस्तकात 'वसंततिलका' वृत्ताचे लक्षण -

आरक्त होय प्रणयी फुलुनि पलाश
फेकी रसालतरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?

अशा ओळींत दिल्याचे आठवते.
आमच्या मराठी माध्यमाच्या सोवळ्या शाळेत तेही गाळून, त्या जागी पर्यायी उदाहरण म्हणून -

मातीत ते पसरले अतिरम्य पंख
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले
निष्प्राण देह पडला श्रमही निमालें

या ओळी शिकवल्या होत्या. (त्याच पर्यायी कवितेचे शीर्षक वापरायचे झाले तर) केवढे हे क्रौर्य! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुही शाळा कंची?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

....तेही गाळून, त्या जागी पर्यायी उदाहरण म्हणून...
...............'न्वोवो चिनेमा पारादिसो' मधील मूकपटांतील चुंबन-दृश्ये कापणारा पाद्री आठवला !

स्पॉयलर अलर्ट -
(आणि आज इतक्या वर्षांनी तुम्हांला अशी सर्व 'कात्रणे' जपून ठेवून भेट म्हणून देणारा एक आल्फ्रेदो भेटलेला दिसतोय ! Wink)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गौरी देशपांड्यांनी केलेले अरेबियन नाइट्स चे भाषांतर आज कुठे उपलब्ध आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही फक्त जयदीप चिपलकट्टीनी केलेली भाषांतरे वाचली आहेत. ती मात्र भ...न्ना...ट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. औटॉफप्रिंट. लायब्र्यांतून मिळतात मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

३ वर्षांपूर्वी 'पीपल्स् बुक् हाऊस्' [15, Meher House, Behind BSE, CP Street, Fort, Mumbai - 400001, (022) 22873768, 24362474 ] मध्ये समग्र उपलब्ध होते. मी एक संच घेतला. त्यावेळी आणखी एकच संच उपलब्ध होता. पण त्यात सर्व खंड बहुधा नव्हते. दूरध्वनी करून चौकशी करून पाहायला हरकत नाही कारण मी गेलो होतो तेंव्हाही ते दुर्लक्षित अवस्थेत मागल्या बाजूच्या फळ्यांवर होते. अजूनही तसेच असेल कदाचित. सर्व खंड वापरलेले वाटत होते. नवे-कोरे मिळणे शक्य नाही बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी साहित्यात लैंगिकता ही इनडारेक्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

पणजोबांच्या जुन्या घरातील माळ्यावरती या संस्कृत पुस्तकाचे हस्तलिखित सापडले होते. घर विकायचे म्हणून वडील व मी (~१२ वर्षीय) माळा साफ करत होतो. पूर्ण बांधलेली पोथी म्हणून मी "हे ठेवूया" म्हटले. पुस्तकाबाबत किंवा त्यात्या विषयाबाबत मला काही ठाऊक नव्हते. वडील काहीशी विचित्र मुद्रा करून "बरे, तर ठेवून घे" असे म्हणाले. त्या काहीशा संकोचलेल्या मुद्रेचा अर्थ मला तेव्हा कळला नाही. संस्कृत वाचन मला झपाट्याने करता येत नाही, तसा म्हटला तर थोडा कंटाळाच आहे Smile , म्हणून मूळ अनंगरंग मी अजूनही वाचलेला नाही!

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागावर काढत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™