उत्तराखंड प्रलय...
देव खरंच दयाळू आहे. आपला तर विश्वासच बसला बुवा ! महाराष्ट्रात काळुबाईने अशीच दया दाखवली होती चार पाच वर्षामागे. लहान लहान लेकरं सुध्दा उचलून घेतली. मागे कुंभमेळ्यात पण असाच दयेचा धुरळा उडवला होता. उत्तराखंडच्या देव लोकांनीच का म्हागं रहावं ? लोक भेटायला गेले की हे देव भाडे खुष होतात आणि म्हणतात ही भेट काय खरी नाही गड्याहो. थेटंच भेटाय या ! चला या पटापट वरती. खरंच दयाळू है भाड्या...
यांची ताकद एवढी जबरी का पुण्यात सुखरुप जगून वाचून परतलेले लोक सुध्दा देवाचेच आभार मानतात ! ज्या भारतीय लष्कराने जीव धोक्यात घालून या भडव्यांना वाचवलं ते कार्यकारी कर्तबगार लोक सेकंड नबरला आणि हा नामधारी देव नामक दयाळू भडवा एक नंबरला ? चेमायला आहे काय हा चावटपणा ?
ह्या लेखात वर्गद्वेष
ह्या लेखात वर्गद्वेष आढळतो..देव तर एक बहाणा आहे..
विद्रोहि पुरोगामी लोकांची मुक्त अर्थ व्यवस्थेने पंचाईत करुन ठेवली..
दबलेल्या बुद्धिमान वर्गास संधी मिळाली अन तो वर्ग झपाट्याने नोक~या..पत्र कारिता..कला टी.व्ही..मधे अग्रेसर ठरला.
त्या मुळे हि समाजिक चिडचिड होणारच..
यावरून आठवले...
श्रद्धाळुंना, लष्कराच्या रुपाने देवानेच वाचवलं, असं ही वाटणं शक्य आहे.
यावरून एक किस्सा आठवला.
एकदा एक श्रद्धाळू असाच महापुरात अडकतो.राहत्या उंच बिल्डिंगीच्या गच्चीचा भाग अजूनही जेमतेम पाण्यावर असतो, तेथे जाऊन, कसाबसा जीव मुठीत धरून देवाचा धावा करू लागतो.
शेजारी महापुरातून एक छोट्याशा नावेतून एक माणूस चाललेला असतो. विचारतो, "येताय काय माझ्या नावेतून?"
"काही गरज नाही. माझी देवावर श्रद्धा आहे. देव मला यातून नक्की वाचवेल." नाव निघून जाते. हे महाशय तिथेच. मात्र, त्यांची देवावरची श्रद्धा अढळ असते.
इथे पूर वाढतच असतो. म्हणजे, पाणी जे जेमतेम गच्चीपर्यंत असते, ते गच्चीवर उभ्या राहिलेल्या महाशयांच्या गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचते. महाशयांचा देवाचा धावा आणखी जोरात सुरू होतो.
तेवढ्यात शेजारून एक तराफा येताना दिसतो. तराफ्यावर एकच माणूस असतो, तो महाशयांना म्हणतो, "या तराफ्यावर... या असल्या पुरात जेथे जाईल तेथे जाईल, पण निदान जीव तरी वाचेल."
"काही गरज नाही. माझी देवावर श्रद्धा आहे. देव मला यातून नक्की वाचवेल." तराफा निघून जातो.
आता पुराचे पाणी वाढून चांगले छातीपर्यंत आलेले असते. महाशयांच्या देवाच्या धाव्याचा जोरही त्याबरोबर वाढलेला असतो.
तेवढ्यात आकाशातून एक रेस्क्यू हेलिकॉप्टर येते. हेलिकॉप्टरवाला म्हणतो, "बरे झाले सापडलात. हेलिकॉप्टरमध्ये एकच जागा शिल्लक आहे. छ्या:! कसला पूर आहे! आणखी किती जण अडकलेत, कोण जाणे! पण तुम्ही आत या. निदान तुमचा तरी जीव वाचवतो."
महाशय आपल्या निर्णयावर ठाम. "नको. माझी देवावर श्रद्धा आहे, देव माझी निश्चित काळजी घेईल. तुम्ही जा इतरांना काय वाचवायला जायचे ते." हेलिकॉप्टर निघून जाते.
आता पुराचे पाणी वाढून नाकातोंडापर्यंत येते, नि परिणामी आपले महाशय बुडून मरतात.
शीन क्र. २: मेल्यानंतर महाशय थेट देवाचिये द्वारी पोहोचतात. देवाची भेट होते. महाशय देवाला धारेवर धरतात.
"देवा, मी तुझ्यावर एवढी श्रद्धा ठेवली, पण तू मात्र माझ्या हाकेला धावून आला नाहीस. तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यावर विसंबून राहिलो, पण तू माझा विश्वासघात केलास."
देव (प्रस्तुत लेखकाकडून स्फूर्ती घेऊन) म्हणतो, "भडव्या, मग मी एक नाव, एक तराफा नि एक हेलिकॉप्टर पाठवले, ते काय माझ्या **त किडे होते म्हणून का रे, भाड्या!"
अरे हो की!
मलाही हे लक्षात नव्हते आले. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
पण काय फरक पडतो? बाकी इतक्या श्रेण्या आहेत; द्या कुठलीही ठोकून!
(निदान मी तरी हल्ली असेच करतो. वाट्टेल त्या प्रतिसादाला 'भडकाऊ', 'अवांतर', 'खोडसाळ', 'माहितीपूर्ण' अशी मनाला येईल ती श्रेणी ठेवून देतो, वेळ जात नसला की. तेवढीच करमणूक होते. आताच तुमच्या या प्रतिसादाला 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी ठोकली - द्या टाळी!)
हे ठीकच.
माझ्या किश्श्यात असभ्य भाषा देवाने वापरली, मी ती रिपोर्ट केली, इतकेच.
(तरीही, प्रस्तुत लेखकाने वापरल्याने प्रस्थापित (पक्षी: मुद्रणीय) झालेली असभ्य भाषा वगळता जी नवी (पक्षी: अप्रस्थापित) असभ्य भाषा किश्श्यात आली, ती फुल्यांकित करण्याची खबरदारी घेतलेली आहे, हे आपल्या चाणाक्ष नजरेतून सुटलेले नसेलच.)
आणि ठीक आहे. मी असभ्य भाषा देवाच्या वतीने वापरली; तुम्ही श्रेणी देऊन वचपा देवाच्या वतीने काढलात. झाली फिट्टंफाट. (शिवाय, दोन्हीं बाजूंनी जे केले, ते देवाच्या सँक्शनने, हा अतिरिक्त फायदा आहेच. म्हणजे, दोघांनाही दैवी सँक्शन आहे, ही तर विन-विन सिच्युएशन.)
भाषा खुप गोड आहे
भषा खुप गोड आहे. देवाला डायरेक्ट भडवा म्हणल्यामुळे मन भरून आले. एक चांगले लेखन करणारा लेखक म्हणून असलेला आदर खुप वाढला. शेवटी आम्ही देवालाच नावे ठेवणार ना? कारण लेखकाला अशी भाषा वापरण्याची बुद्धी पण त्यानेच दिली ना?
आम्ही ज्या देवाला मानतो, त्या देवाने लेखकाला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना.
भगवति
ऐं भगभुगे भगिनि भगोदरि भगमाले भगावहे भगगुह्ये भगयोने भगनिपातिनि सर्वभगवशंकरि भगरुपे नित्यक्लिन्ने भगस्वरुपे सर्वभगानि मे ह्यानय वरदे रेते सुरेते भगक्लिन्ने क्लिन्नद्रवे क्लेदय द्रावय अमोघे भगविच्चे क्षुभक्षोभय सर्वस्त्वान् भगेश्वरि ऐं ब्लूं जं ब्लूं भे ब्लूं मों ब्लूं हें ब्लूं हों क्लिअन्ने सर्वाणि भगानि मे वशमानय स्त्रीं हर ब्लें ह्रीं |
बाकी चालू द्या.
भगक्लिन्ने क्लिन्नद्रवे
भगक्लिन्ने क्लिन्नद्रवे क्लेदय द्रावय अमोघे भगविच्चे
भगेश्वरि ऐं ब्लूं जं ब्लूं भे ब्लूं मों ब्लूं हें ब्लूं हों क्लिअन्ने सर्वाणि
हे काही शब्द वाचून ही अगम्य पुराणकालातल्या भाषेतली तत्कालीन एखाद्या हार्पिकसदृश क्लीनींग सोल्युशनची जाहिरात असावी असा भास का झाला बरे..?
"ब्लू नींबू ब्लीच"युक्त एखादे "सिर्फ दो बूंदे काफी" द्रव्य असावे का?
विरोध भक्ती
वा! वा! हा तर विरोधभक्तीचा उत्तम नमुना. त्या देवांची ही वर्गवारी आहे. विष्णु राम कृष्ण दत्त हे देव उच्चवर्णीयांचे. म्हसोबा, काळूबाई, मरीआई असले देव बहुजनांचे. म्हसोबाला खेटराची पुजा लागते. कष्टकरी समाजातील बाईचे काम जर या म्हसोबाने केले नाही तर त्याला शिव्यांची लाखोली वाहून त्याची खेटराची पुजा केली जाते. बाई संकटात असताना जर म्हसोबानी मदत केली नाही तर तो कसला आलाय देव? आम्ही तर म्हणतोच निर्गुण निराकार देव असला काय आन नसला काय? त्यान भक्तवत्सल करुणाघनच असल पाहिजे. नाहीतर खा शिव्या! च्यायला या देवाच्या *****
देव या विषयांवर बोलताना
देव या विषयांवर बोलताना तोँडावाटे लिहिताना कागदावर टंखताना किबोर्डवर एकही अपशब्द काढायचा नाही..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असा मी निश्चय केलाय... भ्यांचोत देवाशप्पथ अगदी खरा ! :-)
प्रेरणा गुरुवर्य गजू तायडे !
आमच्या द्येवाचं मूळ आईच्या गांडीत आणि बापाच्या बोंडीत आहे.
हे वाचून रा.चिं.ढेरे यांचा एक अनुभव आठवला. त्यांच्या 'लज्जागौरी' पुस्तकात त्यांनी नमूद केल्यानुसार ढगो-मेघो या महार समाजातील देवांच्या संदर्भातील संशोधनासाठी एका गावात गेले असताना तेथील घोडके हा तेथील पुरोहित (महार समाजातील पुरोहित) त्यांना शिव्या घालत म्हणाला..."अरे जा रे..जा..! आमच्या देवाचे मूळ पोथ्या-पुराणात नाही. आमच्या द्येवाचं मूळ आईच्या गांडीत आणि बापाच्या बोंडीत आहे."
या श्रद्धाविश्वात ढग आणि पृथ्वी यांचा सहसंबंधाचे सृजनात्मक प्रतिक देवत्व पावल्याचं दिसतं! त्यामुळे अनुभूती आणि अभिव्यक्तीचे असे प्रकार सश्रद्धांच्या विश्वात आढळत नाहीत असं नाही.
पण हा धागा गुंडाळावा कसा?
कोणी कशावर तोंडसुख घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नातून काही प्रश्न उपस्थित होतात ते असे.
1. धाग्याचे अंग नक्की कसे पाहायचे? :p
2. विनोदी अंगाने न जाऊ द्यायला काही महत्त्वाची कारणे वगैरे आहेत का? :-B
3. धर्मांचा अभ्यास असल्याशिवाय त्यांच्यावर टीका करूच नये की काय? :O
माफ करा भेदक पाषाण, मला तुम्ही छुपे प्रतिक्रांतिवादी वाटता. J)
देवाला शिव्या देण्याची आपली महान परंपरा
'सद्गुरूमाय कुंटीण ़झाली', 'विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या' किंवा 'तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे' ह्या प्रकारच्या, म्हणजे भावनावेगातून देवाला शिव्या देण्याच्या परंपरेत वाघमारे यांच्या शिव्या बसतात. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याआधी आपली संतपरंपरा तपासावी. इथे शिव्या अजिबात अस्थानी वाटल्या नाहीत, कारण घडलेल्या घटनेविषयीचा त्रागा त्यामागे आहे.
मात्र, एखाद्या ट्वीटपेक्षा जास्त आशय धाग्यात नाही, आणि गेल्या काही दिवसांत ह्या आशयाचे अनेक प्रतिसाद पाहिले आहेत. त्यामुळे ह्या धाग्यात फारसं काही उल्लेखनीय सापडलं नाही, हेदेखील नमूद करतो.
इथे शिव्या अजिबात अस्थानी
इथे शिव्या अजिबात अस्थानी वाटल्या नाहीत, कारण घडलेल्या घटनेविषयीचा त्रागा त्यामागे आहे.
म्हणजे घडलेल्या घटनांविषयी त्रागा व्यक्त करायचा असेल तर शिव्या चालतात का?
त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याआधी आपली संतपरंपरा तपासावी
बऱ्याच दिवसांपासून विचारेन म्हणतोय. आक्षेप म्हणून नव्हे, तर शंका म्हणून. एखादी गोष्ट संतपरंपरेत आहे किंवा आणखी कुठल्या परंपरेत आहे हे त्यावर आक्षेप घेऊ नये असे आहे का? कदाचित असेही असू शकेल की मानवसमूह वर्षानुवर्षे काही गोष्टी चुकीच्या करत आला असेल. पूर्वापार चालत आलेली गोष्ट बरोबर मानायची, तर स्त्रीवादाच्या अनेक अंगांना धक्का बसेल.
हा प्रश्न केवळ ह्या मुद्द्याबाबत नसून एकूणच ह्या प्रकारच्या आर्ग्युमेंटविषयी आहे.
मान्य
मिहिर यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. माझ्या समजुतीप्रमाणे पर्याय असे आहेत:
(१) देवांना शिव्या देणं योग्य आहे.
(२) देवांना शिव्या देणं अयोग्य आहे.
जर (२) बरोबर असेल, तर संतपरंपरेने शिव्या देण्याचं समर्थन होत नाही. अयोग्य ती गोष्ट अयोग्यच, मग ती संतपरंपरेने केली काय किंवा लालूप्रसाद यादवने केली काय.
याउलट जर (१) बरोबर असेल, तर संतपरंपरा मध्ये आणण्याची काहीच गरज नाही. योग्य ती गोष्ट योग्यच, मग ती संतपरंपरेने केली काय किंवा अशोक सराफने केली काय.
आता (१) बरोबर की (२) याचा निर्णय कसा घ्यायचा हा वेगळा प्रश्न. पण संतपरंपरा कुठल्याच पारड्यात टाकून काहीच फरक पडत नाही.
टीप: माझा देवाच्या किंवा देवांच्या अस्तित्वावर विश्वास नाही; तेंव्हा 'देवांना' हा शब्द 'सांताक्लॉजला' अशासारखा वापरलेला आहे.
संतप्रंप्रा आणि वाघमारे
संतप्रंप्रा आणि वाघमारे यांच्या लेखनात शिव्या सोडल्या तर नक्की काय साधर्म्य आहे हा एक प्रश्न. शिवाय दुसरा महत्वाचा पैलू असा, की संतप्रंप्रेत देवाला शिव्या दिल्या जातात त्या एखाद्या हक्काच्या माणसाला द्याव्यात तशा. संतांचा देवावर आणि त्याच्या विधायक सामर्थ्यावर विश्वास आहे, ते त्याला घरचा माणूस असल्याप्रमाणे सलगीने संबोधतात. त्यातून आलेल्या या शिव्या आहेत. वाघमारे यांच्या लेखनातून तसे काही जाणवत नाही. तस्मात निव्वळ "शिव्या आहेत" या एका निकषावरून असा निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.
आमच्या द्येवाचं मूळ आईच्या गांडीत आणि बापाच्या बोंडीत आहे.
वरचीच कॉमेंट पुन्हा इथे डकविण्याचे पाप करतो! ;)
हे वाचून रा.चिं.ढेरे यांचा एक अनुभव आठवला. त्यांच्या 'लज्जागौरी' पुस्तकात त्यांनी नमूद केल्यानुसार ढगो-मेघो या महार समाजातील देवांच्या संदर्भातील संशोधनासाठी एका गावात गेले असताना तेथील घोडके हा तेथील पुरोहित (महार समाजातील पुरोहित) त्यांना शिव्या घालत म्हणाला..."अरे जा रे..जा..! आमच्या देवाचे मूळ पोथ्या-पुराणात नाही. आमच्या द्येवाचं मूळ आईच्या गांडीत आणि बापाच्या बोंडीत आहे."
या श्रद्धाविश्वात ढग आणि पृथ्वी यांचा सहसंबंधाचे सृजनात्मक प्रतिक देवत्व पावल्याचं दिसतं! त्यामुळे अनुभूती आणि अभिव्यक्तीचे असे प्रकार सश्रद्धांच्या विश्वात आढळत नाहीत असं नाही.
ते ठीकच, पण...
म्हणजे भावनावेगातून देवाला शिव्या देण्याच्या परंपरेत वाघमारे यांच्या शिव्या बसतात. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याआधी आपली संतपरंपरा तपासावी. इथे शिव्या अजिबात अस्थानी वाटल्या नाहीत, कारण घडलेल्या घटनेविषयीचा त्रागा त्यामागे आहे.
देवाला शिव्या देण्याची आपली परंपराच (संत- किंवा अन्यथा) आहे, वगैरे ठीकच. त्यात काहीच नावीन्य नाही.
पण देवाने शिव्या देण्याचा (मी वर उद्धृत केलेल्या विनोदातल्यासारखा) प्रकार आपल्याकडे आधी कधी पाहिला आहेत काय?
अजून डिटेलवार
संत प्रंप्रा !
एकनाथी भारूड.
सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥
अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥
परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥
भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥
वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥
जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥
अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥
एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥
------------------------------------------------
हे घ्या तुकारामं
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि
फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी
हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती
सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी
सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय
तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी
घ्या आरती प्रभुच ऎकू !
उसनीं मिळालीं शरिरें अम्हांला
विक्रीस जोड्यांइतुकीं तयार;
चिंता न त्रागा. . . रांडेप्रमाणे
नियमीत घेतों सनदी पगार..
स्त्री शिव्या देतांना हवी? 'झाला विठ्या रांडेचा' हा जनाबाईंचा अभंग शोधा.
शिवी देणारी स्त्री अलिकडची हवी? 'ती फुलराणी' आठवा (खरचं) खुशाल 'रांडीचा' म्हणुन शिवी दिलीय.
आता मला प्रश्न पडला ,
कृष्ण करें तो रास ? और हम करें तो त्रास
वो करें तो लिला ? और हम करें तो गिला !
वारे वा ....
जर त्या शिव्या हाच लेखनविषय होत असेल तर....
स्वतः शिव्या देत नसलो तरी शिव्यांचा वापर करण्याबद्दल स्वतःचे असे ठोस धोरण नाही. विरोधही नाही.
सार्वजनिक लेखनातही शिव्या येण्यास विरोध नाही, मात्र वाचकांच्या दृष्टीने अश्या लेखनात जर त्या शिव्या हाच लेखनविषय होत असेल तर लेखकाने आपले म्हणणे पोचवायला वेगळा- अधिक प्रभावी -प्रयोग करायला हवे असे वाटले.
बाकी, ह्या धाग्यात फारसं काही उल्लेखनीय सापडलं नाही, या चिंजंच्या मताशी सहमती नोंदवतो.
मातीच्या पायांचे देव
>> एखादी गोष्ट संतपरंपरेत आहे किंवा आणखी कुठल्या परंपरेत आहे हे त्यावर आक्षेप घेऊ नये असे आहे का? कदाचित असेही असू शकेल की मानवसमूह वर्षानुवर्षे काही गोष्टी चुकीच्या करत आला असेल. पूर्वापार चालत आलेली गोष्ट बरोबर मानायची, तर स्त्रीवादाच्या अनेक अंगांना धक्का बसेल.
देवाला शिव्या देण्याविषयी ज्यांना आक्षेप आहे त्यांना आधीपासूनचे हे पायंडे ठाऊक आहेत का, आणि परंपरेत त्यांना काही चूक आढळते का? असल्यास कोणती? भारतीय परंपरेत देव हे माणसाची गुणवैशिष्ट्यं बाळगतात. त्यांना विकारही असतात. म्हणजे त्यांना कामेच्छा होते, त्यांना लोभ होतो, गर्व होतो, वगैरे. त्यांना कसं वागवावं आणि त्यांच्याशी कसा व्यवहार करावा ह्याविषयी त्यामुळे भारतात मोठी लवचिकता आढळते. माझ्या मते हा भारतीय संस्कृतीचा एक चांगला भाग आहे. मला त्यात काही गैर वाटत नाही.
सबळ कारणं द्या
>> माझ्या समजुतीप्रमाणे पर्याय असे आहेत:
(१) देवांना शिव्या देणं योग्य आहे.
(२) देवांना शिव्या देणं अयोग्य आहे.
तेवढे पर्याय पुरेसे नाहीत, कारण काहींचा आक्षेप हा 'माणसांना एक वेळ शिव्या द्या, पण देवाला मात्र नको' असा असावा. म्हणून मी म्हणतो आहे की भारतीय श्रद्धापरंपरेत असा, म्हणजे देवामाणसांत फरक केला जात नसल्याची उदाहरणं सापडतात. माणसांना जे विकार असतात, त्यांना देवही बळी पडतात. जर माणसांना शिव्या दिलेल्या पाहून तीव्र प्रतिक्रिया येत नसेल, तर मग देवाला शिव्या दिलेल्या पाहून ती का यावी? जर शिव्या देणं मूलतः अयोग्य असेल, तर देवामाणसांत फरक करण्याची गरज काय? आणि मग असा, म्हणजे देवामाणसांत फरक करणारा आक्षेप कुणी ग्राह्य तरी का मानावा?
>> आता (१) बरोबर की (२) याचा निर्णय कसा घ्यायचा हा वेगळा प्रश्न. पण संतपरंपरा कुठल्याच पारड्यात टाकून काहीच फरक पडत नाही.
माझा मुद्दा असा आहे की विविध परस्परविरोधी दृष्टिकोन सह-अस्तित्वात असण्याचा भारतीय श्रद्धापरंपरेचा इतिहास सोडून देऊन विशिष्ट दृष्टिकोनाला वगळण्याच्या, म्हणजे असहिष्णू दृष्टिकोनाच्या पारड्यात मी माझं मत टाकावं ह्यासाठी श्रद्धाळूंकडून काहीच युक्तिवाद केले जात नाहीत. तद्वत त्यांचा मुद्दा मला दखलपात्र वाटत नाही.
परंपरेची परवानगी कशाला हवी?
> माझा मुद्दा असा आहे की विविध परस्परविरोधी दृष्टिकोन सह-अस्तित्वात असण्याचा भारतीय श्रद्धापरंपरेचा इतिहास सोडून देऊन विशिष्ट दृष्टिकोनाला वगळण्याच्या, म्हणजे असहिष्णू दृष्टिकोनाच्या पारड्यात मी माझं मत टाकावं ह्यासाठी श्रद्धाळूंकडून काहीच युक्तिवाद केले जात नाहीत.
माझ्या मते 'विविध परस्परविरोधी दृष्टिकोन सह-अस्तित्वात असू देणं' ही गोष्ट शहाणपणाची आहे म्हणून करावी, ती स्वत:ची श्रद्धापरंपरा आहे म्हणून करू नये.
समजा एखादा कर्मठ ज्यू माणूस म्हणाला, "जनहो, लेविटिकस आणि ड्यूटरॉनॉमी वाचून माझं असं मत झालेलं आहे की माझी श्रद्धापरंपरा ही असहिष्णुतेची आहे, तेंव्हा मी असहिष्णूच राहणार." तर मी असं नाही म्हणणार की, बाबारे, तुझी तशी परंपराच असेल तर मग माझा काही आक्षेप नाही. त्याच्या असहिष्णुतेविरुद्ध माझे जे आक्षेप पूर्वी होते, ते आत्ताही राहतीलच. मी त्याच्याही पोथीचा अधिकार मानत नाही अाणि माझ्याही नाही.
शिव्याविषयी काही आक्षेप नसला तरी
मला वाटतं, दरवेळी श्रद्धा-अश्रद्धाविषयीचे वाद घालत बसण्याला काही अर्थ नाही. सश्रद्धांचे आणि अश्रद्धांचे समांतर अस्तित्व असायचेच हे व्यवहार्य सत्य लक्षात घेऊन उभय पक्षांनी सबुरीने घ्यायला हवं! कुणी सश्रद्ध असला किंवा अश्रद्ध असला म्हणजे जगाचे कल्याण/अकल्याण होते अशी श्रद्धा उभय पक्षाकडून का पाळली जावी? निदान 'डोळस' नास्तिकांकडून तरी विवेक पाळला जावा असे वाटते. शिवाय सद्भावना, समता, करुणा, दया ही मूल्ये पापभीरू, विवेकी लोकांची आहेत. नास्तिक विचाराच्या लोकांच्या समुहांचा जसा तो पाया आहे तसाच आयडियली तो मंदिरातील भटा-भिक्षुकांच्या,भन्ते,मुल्ले,पाद्र्यांच्या आणि धर्मपीठाच्या विचारांचाही पाया आहे!! पण मुळातच मानवी पातळीवरचे व्यक्तिगत स्वार्थ-लोभ-द्वेष हे गुणही स्वाभाविक रीतीने दोन्ही ठिकाणी आहे! त्यामुळे आस्तिकांनी नास्तिकांना किंवा नास्तीकांनी आस्तिकांना व धर्मपीठांना एलियनेट करून/वेगळे पाडून पुरोगामी आणि प्रामाणिक धर्मचळवळीचेही भले होणार नाही! दोन्ही बाजूच्या लोकांचे असणे हे सामाजिक वास्तव मान्य करून याचा विचार होणे आवश्यक वाटते.
आणखी या लिखाणासंदर्भात महत्त्वाचे असे की, प्रस्तुत ठिकाणी मला शिव्याविषयी काही आक्षेप नसला तरी (माझ्या वरच्या कॉमेंटमधून ते तसे दिसेलच) झालेल्या आपत्तीच्या संदर्भात निदान आजघडीला तरी लोकांच्या श्रद्धेला नावे ठेवण्याचा पुरोगामीपणा दाखवणे अनुचित ठरते. पुरोगामीपणा दाखवायच्या संधी अन्यथा काही काळाने मिळतीलच. तेव्हा त्यांच्या अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न अवश्य करावेत. इथे आज घडीला देव-धर्माला नावे ठेवण्याच्या या प्रकारात मला एक शुष्कपणा जाणवतो. प्रसंगाला तोंड द्यायचे सोडूनहे काय आता? लोकांच्या श्रद्धा, मग तीर्थयात्रांचे अनौचित्य वगैरे तत्त्वज्ञाने सांगायची वेळ नंतर येईलच ! तूर्तास 'ऐशा कळवळ्याच्या' जातीने तिथे जाऊन मदतकार्य करावे किंवा त्यांना सहाय्यभूत व्हावे. ते करायचे नसेल तर निदान आतातरी, या घडीपुरते तत्त्वज्ञाने आणि विद्रोह दाखवण्याचा अभिनिवेश (तो खरा आहे हे समजत आहे) प्रकट करू नये!
किंचित वेगळी मांडणी
देवावर विश्वास असेल, तरच त्याला शिव्या देणे शक्य होते. मुळात देवावर (देवाच्या अस्तित्वावर) विश्वासच नसेल, तर मुळात जे अस्तित्वातच नाही, त्याला शिव्या घालणार कशा?
(देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारे काही जण जे देवाला शिव्या घालतात असे भासते, ते वस्तुतः देवाला शिव्या घालत नसून, देवावर विश्वास ठेवणारांना, त्या विश्वासाला शिव्या घालत असतात, हा सूक्ष्म फरक लक्षात घेण्याजोगा आहे.)
उगाच हक्क, नैतिक अधिकार वगैरे बाबी कशाला मध्ये आणायच्या? त्याची गरजच काय, म्हणतो मी.
दोन आक्षेप
भारतीय श्रद्धापरंपरेत असा, म्हणजे देवामाणसांत फरक केला जात नसल्याची उदाहरणं सापडतात.
हे अर्धसत्य आहे.
म्हणजे, दुपारी देवळात "देव झोपी जात असल्या"बद्दल ऐकलेले आहे खरे. मात्र, आजतागायत एकाही देवळात देवाचा संडास पाहिलेला नाही.
माणसांना जे विकार असतात, त्यांना देवही बळी पडतात.
असे? देवाला जुलाब झाल्याबद्दल कधी ऐकले आहेत काय? (गेला बाजार कांजिण्या, किंवा अगदी तेही नको तर सर्दी?) झालेच तर, देवाला वारा सरलेला कधी ऐकला आहेत काय?
थोडक्यात, दोन्ही विधाने ही घाऊक (मराठीत: ग्रोस) सरसकटीकरणे आहेत, असे प्रतिपादन करू इच्छितो.
पोटात जळजळ
दुपारी देवळात "देव झोपी जात असल्या"बद्दल ऐकलेले आहे खरे. मात्र, आजतागायत एकाही देवळात देवाचा संडास पाहिलेला नाही.
कसे पहाल? त्यावेळी मास्टर बेडरूम ही संज्ञा नसावी. हल्लीच्या बांधकामातच हे झोपायच्या खोलीत संडास बांधण्याचे खूळ शिरले असावे.
माणसांना जे विकार असतात, त्यांना देवही बळी पडतात.
असे? देवाला जुलाब झाल्याबद्दल कधी ऐकले आहेत काय? (गेला बाजार कांजिण्या, किंवा अगदी तेही नको तर सर्दी?)
बाकी माहिती नाही पण गणपतीला पोटात जळजळ होते म्हणे.
शिवाय काहि देवतांना मस्तकशूळ झाला वगैरेही वाचनात येत असतेच की तस्मात "माणसांना जे विकार असतात, त्यांना देवही बळी पडतात" हे तितकेही सरसकटीकरण वाटत नाही
फक्त?
संडास गाभार्यातच (अटॅच्ड) असायला पाहिजे, असा आग्रह नाही. पण देवळात कोठेतरी असायला नको काय? शिवाय, कधीही देवळात गेलात, तर "जरा दोन मिनिटे थांबा, देव परसाकडे गेले आहेत, आत्ता येतील" असे ऐकले आहेत काय?
"देव (दुपारचे) झोपी गेलेले आहेत. दोन तासांनंतर उठतील, तेव्हाच दर्शन होईल," हे मात्र ऐकलेले आहे.
====================================================================================================
देवांना फक्त पोटात जळजळ (पक्षी: अॅसिडिटी) आणि मस्तकशूळ एवढे दोनच विकार होतात, यावरून "माणसांना जे विकार होतात, त्यांना देवही बळी पडतात" या निष्कर्षावर उडी मारणे थोडे धाडसाचे वाटते.
मी वर उल्लेख केलेले विकार दुर्मिळ नाहीत, बर्यापैकी सामान्य आहेत. कोणालाही होऊ शकतात. (पहा विचार करून.) अशा परिस्थितीत, देवांना ते झाल्याचे एकही उदाहरण (व्हेरिफायेबल वा अन्यथा) आजतागायत असू नये, याचे आश्चर्य वाटते.
काय माहित?
आपल्याला काय माहित? झोपायच्या सुट्टीत सारे काही उरकत असतील? (शिव शिव! काय लिहायला लावताय! ;) असो.)
आदरणीय व्यक्तींबाबत भारतीय शिष्टाचारात या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख होत नाही, अर्थात तोच नियम देवाला. उलट याचा उल्लेख झाला असता तर देवाला माणसापेक्षा वेगळी वागणूक मिळते असे म्हणता आले असते.
==========
"एवढे दोनच विकार होतात" असे म्हणणे सरसकटीकरण झाले. केवळ मला पटकन दोन आठवले. जर अख्खी पुराणे धुंडाळली तर सगळे मिळूही शकतील. "माणसांना जे विकार होतात, त्यांना देवही बळी पडतात" असा दावा आहे "त्यातील प्रत्येकाला देव बळी पडतातच" असा नव्हे.
खंडन
झोपायच्या सुट्टीत सारे काही उरकत असतील?
त्यासाठी गाभार्यास अटॅच्ड संडास पाहिजे. (म्हणजे, बेडवेटिंग - किंवा बेडपॅन - अशी काही गृहीतके नसावीत, अशी आशा आहे.)
जर अख्खी पुराणे धुंडाळली तर सगळे मिळूही शकतील.
मी ज्या विकारांचा उल्लेख केला, ते सर्व अतिशय सामान्य विकार आहेत. त्यांचे उल्लेख शोधायला जर आख्खी पुराणे पालथी घालावी लागत असली, तर मग ते दुर्मिळ ठरतात. तितके काही ते दुर्मिळ नाहीत. ('ह.पा.ला' हा मराठीतील एकच वाक्प्रचार याची पुरेपूर साक्ष देतो.)
"त्यातील प्रत्येकाला देव बळी पडतातच" असा नव्हे.
जे अतिसामान्य विकार आहेत, त्यांना तर बळी पडण्याची शक्यता अधिक असायला हवी?
आदरणीय व्यक्तींबाबत भारतीय शिष्टाचारात या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख होत नाही, अर्थात तोच नियम देवाला.
तसेच जर असते, तर फार फार तर "जरा दोन मिनिटे थांबा, देव पाय धुवायला गेलेत, आत्ता येतीलच," असे तरी ऐकायला मिळाले असतेच. पण तेही कधी ऐकलेले नाही.
देव कधी वेळी-अवेळी पाय धूतच नसतील? मग तर ते माणसाहून वेगळे झाले की!
गणपतीला थंडी वाजते म्हणून
गणपतीला थंडी वाजते म्हणून त्याला स्वेटर घालावा लागतो असेही ठाऊक आहे.
चौकटींचं सहअस्तित्व
>> माझ्या मते 'विविध परस्परविरोधी दृष्टिकोन सह-अस्तित्वात असू देणं' ही गोष्ट शहाणपणाची आहे म्हणून करावी, ती स्वत:ची श्रद्धापरंपरा आहे म्हणून करू नये.
हे ठीकच आहे, पण विविध परस्परविरोधी श्रद्धाव्यवस्था किंवा श्रद्धाचौकटी जिथे सहअस्तित्वात आहेत तिथे कोणत्या तरी एकाच व्यवस्थेला किंवा चौकटीला सार्वजनिक अवकाशात स्थान मिळावं अन् इतरांना मिळू नये हा आग्रह मान्य करण्यासाठी कोणतंच सबळ कारण मिळत नाही. जे असा आग्रह धरतात त्यांच्या हे लक्षात आणून देणं गरजेचं वाटतं.
बिच्चारा देव!
ज्यांच्या पूर्वजांना देव फायद्याचा ठरला ते आणि ज्यांचे पूर्वज वंचित राहिले ते असे सगळेच त्याच्या जीवावर उठलेत.
देव ही नष्ट करायचीच गोष्ट झालीय म्हणा ना! काही लोक तर एखाद्या नष्ट करण्याजोग्या गोष्टीला देव म्हणून मोकळे होतात.
मधल्यामध्ये वास्तव देवाचीही राजरोस हत्या चालूच आहे.
देव कोणाचा का असेना, कोणता का असेना, त्याचं काही खरं नाही हेच खरं.
साहजिक आहे
'गुरांमधील क्यानिबलिझम' या विषयावर माझा अभ्यास नाही. पण तरीही,
(१) गुरे१ बीफ खात असतील२, याबाबत साशंक आहे, आणि
(२) परिणामी, बीफ हे बहुधा गुरांस खाण्यास योग्य (आणि म्हणून लायक) ठरू नये. (माणसांनी खाण्यास तरीही प्रत्यवाय नसावा.)
सबब, निदान बीफच्या बाबतीत तरी, आपण मांडलेले दोन्ही निकष अशा रीतीने बहुधा पूर्ण व्हावेत.
तळटीपा:
१ मराठीत कोणत्याही अन्नपदार्थाच्या बाबतीत जेव्हा 'जनावरांस खाऊ घालणे' असा वाक्प्रचार वापरला जातो, तेव्हा प्रस्तुत 'जनावरे' ही सहसा 'गुरे' असणे अपेक्षित आणि अभिप्रेत असते, असा अंदाज आहे. या अंदाजाच्या आधारावरच वरील विवेचनात गुरू३-स्पेसिफिक दृष्टिकोन अवलंबिलेला आहे. अन्यथा, कुत्र्यास बीफ खाऊ घातल्यास त्याने ते आवडीने आणि मोठ्या प्रेमाने मटकवावे, असा अंदाज अधिक अनुभव आहे. अर्थात, भारतात कुत्र्यास आवर्जून (आणि बहुधा त्याकरिता वाकडी वाट करून) बीफ खाऊ घातले जाण्याचे प्रमाण कितपत असावे, याहीबद्दल साशंकच आहे.
२ नाही म्हणायला, अमेरिकेत बीफसाठी पैदा केल्या जाणार्या गुरांना पुष्ट करण्याकरिता त्यांच्या फीडमध्ये अनेकदा बीफ मिसळले जात असल्याबद्दल ऐकलेले आहे. (वेडीगायरोग अशातूनच फोफावला, अशीही एक थियरी ऐकलेली आहे.) खरेखोटे कोण जाणे. परंतु तरीही, गुरे नैसर्गिकरीत्या, जाणतेपणी आणि स्वेच्छेने बीफ खात असण्याबाबत साशंक आहे.
३ येथे 'गुरू' हा शब्द 'गुरे'चे एकवचन अशा अर्थी वापरलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.४
४ यावरून आठवले. 'गौरव' या शब्दाची 'गुरु'पासूनची व्युत्पत्ती लक्षात घेता, गायीचे हिंदूसंस्कृतीतील विशेष स्थान हे त्या गुराचा गौरव आहे, असे मानता यावे काय?
चर्चाविषय सामाजिक ठेवला
चर्चाविषय सामाजिक ठेवला असतांना शिव्याशाप जरा अतीच होतंय.