खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.
१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील
२) चहा-पट्टी (गवती चहा) साधारण खूपच गरीब लोकांचे आणि शेतकऱ्यांचे पीक आहे, त्यांच्या पिकांना भाव येईल. हा गवती चहा महाराष्ट्रात-गुजरात मध्ये आणि खूप कमी ठिकाणी मिळतो, त्यामुळे आपल्या गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल.
३) दुधाचा भाव कमी होईल.
४) गवती चहा प्यायल्या मुळे तुमच्या शरीरात रक्त-प्रवाह सुरळीत होतो, हार्ट एकदम चांगले काम करते.
५) रोज गवती चहा पिणाऱ्यांना कधीही कॅन्सर होत नाही.
साभार-अभय जोशी
Taxonomy upgrade extras