Skip to main content

' बाळूचे स्वप्न - '

सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।

शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।

मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।

कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।

उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।

बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
.

तिरशिंगराव Fri, 25/10/2013 - 16:46

बाळूने मोजले राक्षसाचे दांत
एकाच ठोशात सगळे गेले आंत|

बाकीची कविता छानच आहे.