'अस्वस्थ वर्तमान'

'अस्वस्थ वर्तमान' ही आनंद जातेगावकर यांची कादंबरी अस्वस्थ करून सोडते . ती खूप चांगली कादंबरी आहे म्हणून नाही तर वाचताना आपण नक्की काय वाचतोय असा प्रश्न पडतो म्हणून . रूढ अर्थाने एका माणसाची, अशोकजी गोरे यांची ही जीवन गाथा आहे ज्यात अनेक व्यक्ती येतात याला कादंबरीच म्हणायला पाहिजे . पण म्हणता येत नाही .

नायकाच्या तोंडून लेखक अनेक लोकांचा इतिहास खणत राहतो . त्यात कुणीच सुटलेलं नाही .
पार गालिब पासून लोकमान्य टिळक , गुरुदत्त पासून शाहू महाराज , बहादुरशहा जफर पासून
क्राईम पनिशमेंट चा नायक ते शरदचंद्राचा देवदास असे सगळे त्यात येउन जातात . ''अशोकजी बघतायेत'' असं वाक्य टाकून एकामागून दुसरा इतिहास चालू होत राहतो आणि आपण नक्की काय वाचतोय , कुठे होतो हे चाचपडत राहतो .

वाचता वाचता इतिहासाचे ढीगभर संदर्भ येत राहतात . वर्तमानाच्या धबडग्यात इतिहासाचे अनेक संदर्भ , अनेक संहिता , विवेचन कोसळत राहते. मधेच अशोकजींची कथा डोकं वर काढत राहते . थोडसं काही हाती लागतंय वाटतं तोवर एकदम नायकाने लिहलेलं नाटक चालू होतं . शेवटाकडे जाताना ज्याला नायक कविता म्हणतो असं काहीतरी सुरु होतं . शेवटी 'एक न धड भारंभार चिंध्या' या म्हणीची आठवण होते .

'अशोकजी गोरे बघतायेत' असंच या कादंबरीचं नाव असायला हवं होतं . किंवा 'अस्वस्थ इतिहास' तरी . एकूणच एक प्रकारचा निराशाजनक अनुभव देणारं पुस्तक.

http://www.bookganga.com/eBooks/Book/4862103121238641578.htm

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)