कादंबरी

एम अँड द बिग हूम

Em and the Big Hoom

रीटा वेलिणकर वाचल्यानंतर, जेरी पिंटो यांचं 'एम अँड द बिग हूम' वाचणं साहजिक वाटलं. मी मूळ पुस्तक वाचलं, पण शांता गोखलेंनी याचा मराठी अनुवादही केला आहे. आणि शांता गोखलेंबद्दल मिळेल ती माहिती घेताना, त्या दोघांचा एक फार सुंदर व्हिडियो बघायला मिळाला, ज्यात दोघांच्या मैत्रीची झलक बघायला मिळाली. या पुस्तकाला २०१६मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी, अमेरिकेचा विंडहॅम-कॅम्पबेल पुरस्कारही मिळाला.

समीक्षेचा विषय निवडा: 

रीटा वेलिणकर

Rita Welinkar

समीक्षेचा विषय निवडा: 

“अंतर्यामी खजुराहो”ची मालिका येऊ दे…

गोपाळ आजगावकर यांच्या “अंतर्यामी खजुराहो” कादंबरीविषयी युसुफ शेख : कादंबरी कितीही वेळा वाचली तरी ती नेहमी तेवढीच जिवंत, रसरशीत वाटते व सत्तरीच्या दशकातील कालखंडाची प्रचंड अस्वस्थकारक, घालमेल उडवणारी सफर घडवून आणते.

समीक्षेचा विषय निवडा: 

रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!

रंगमयी .... रसमयी बाणाची कादंबरी !!

समीक्षेचा विषय निवडा: 

ढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय

काळ उघडी करणारी पुस्तके आणि इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना हे लेख वाचून माझ्या आवडत्या पुस्तकाची आठवण झाली. त्या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख मुक्त शब्द मासिकात प्रकाशित झाला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

ढढ्ढाशास्त्री परान्ने

समीक्षेचा विषय निवडा: 

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

दोन पुस्तकं.

आम्ही देर आलो असू, पण दुरुस्त आलो आहोत.
मुंबईतल्या मे महिन्याच्या दिवसांत, गरगरत्या पंख्याच्या डायरेक्ट खाली दुपारी नुसतं बसूनही घामाचे ओघळ माझ्या कपाळावरून टपकत असतानाही मी हे पहिलं पुस्तक वाचूनच संपवलं.
म्हणजे मग हे पुस्तक खरंच भारी आहे. त्याच्या विषयी नंतर सविस्तर लिहावं लागेल. पण हे पुस्तक क्र. १ भारी आहे.
================*===============
त्यानंतर मग हे दुसरं पुस्तक हाती आलं, पहिल्या पुस्तकाचा परिणाम म्हणून की काय, मी जरा आधाशीपणेच हातात घेतलं.

समीक्षेचा विषय निवडा: 

धर्मांतराची कथा आणि व्यथा

परवा वि ग कानिटकरांची एक वेगळीच कादंबरी मला पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तक-तीर्थामध्ये(हो, पुस्तकचे दुकान म्हणणे कसे तरी वाटते!) मध्ये पुस्तके चाळता चाळता हाती लागली. शीर्षक होते होरपळ, आणि ती एका धर्मांतराची कथा होती. मी ती कादंबरी घेतली आणि वाचली. तुम्ही म्हणाल धर्मांतर हा काय विषय आहे का आज-कालच्या जागतिकीकरणाच्या जगात. पण धर्माच्या संबंधित दहशतवाद आपल्या आसपास आहेच. त्यामुळे हा विषय आजही लागू आहेच. धर्मांतर म्हटले की आपल्याला आठवते ते बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धधर्म स्वीकारणे, आदिवासी, पददलित समाजाचे कधी मन वळवून, तर कधी जबरदस्तीने मिशनर्‍यांनी केले धर्मांतर.

समीक्षेचा विषय निवडा: 

अरबी कहाण्या

मी जुन्या पुस्तकांचा चाहता आहे. जसे जमेल तसे मी ती गोळा करत असतो. गौरी देशपांडे यांनी अरेबियन नाईट्सचे केलेल्या मराठी भाषांतराचे १६ खंड आहेत त्याबद्दल ऐकले, वाचले होते. काही वर्षांपूर्वी मी ते बरेच दिवस शोधत होतो. आणि एकदाचे मिळाले. महाभारत, जातक इत्यादी प्रमाणे मौखिक परंपरेतून आलेल्या वास्तव आणि अद्भूतरम्य यांचे मिश्रण असलेल्या गोष्टी आहेत, ज्या कित्येक शतके सांगितल्या जात होत्या आणि लोक-परंपरेचा भाग होता(आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत) असे अभ्यासक सांगतात. त्याची बरीच म्हणजे बरीच भाषांतरे आहेत. पण रिचर्ड बर्टनने केलेले भाषांतर हे मुळाबरहुकुम आहे असे म्हणतात.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - कादंबरी