व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मदत हवी आहे.

व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मदत हवी आहे.

केंद्र शासनाच्या दोन वर्षांपूर्वी merge (मराठी?) झालेल्या एका कंपनीच्या ३५ ते ५० वर्षे वयोगटातील ३० अधिकाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण द्यायचे आहे. पुढील आठवड्यात हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमातील विषय:

  1. Self-motivation
  2. Working in Teams
  3. Positive attitude (primarily focused on change in attitude towards positivity and change management)
  4. Personality development (focused on inter personal and professional relationships)

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सध्या हाताशी विशेष काही काम नाही, (कदाचित म्हणून) वेळेवर पगार होत नाहीत. पुढचे भविष्य फारसे आशादायक वाटत नाही, काहीजण नोकरी सोडण्याचा विचारात आहेत, पण त्यांना इतरत्र फारशी संधी उपलब्ध नाही. नोकरी सोडू नये म्हणून त्यांना प्रेरित करणे हाही एक प्रशिक्षणाचा भाग आहे. (अनेकांची चाळीशी उलटलेली असल्याने) एकूणच संस्थेतील उर्जा-पातळी (Energy-level) खूप कमी झालेली आहे. (सरकारी कर्मचारी आणि त्यांचा वयोगट यामुळे) बदलास विरोध (Resistance for change) नवीन काही शिकण्याची अनिच्छा (Resistance for learn) ही आव्हाने आहेत.

माझी उद्दिष्टे:
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांत रस निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे Creating and sustaining interest
कार्यक्रमातून योग्य तो संदेश देणे Effective and practical take-away solutions
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचे मनोबल वाढवणे व बदल स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला आपली मदत- सल्ला, सूचना, उदाहरणे, Games and activities इ. स्वरूपात हवी आहे.

हा धागा आणि त्याची मांडणी विस्कळीत वाटल्यास क्षमस्व!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हाताशी विशेष काम नसलेलय अवस्थेत असलेल्या व्यक्तीला मोटिव्हेट करणं अवघड आहे.
पगार वेळेवर होत नसताना ते करणं त्याहून अवघड.
कार्यक्रमास शुभेच्छा.
एक विडियो सामावून घ्या लागलाच तर :-
spirit to live the life हे यूट्यूबवर टाकल्यावर येणारा विडियो अफ्लातून आहे. "पंगुम् लंघयते गिरिम्" चे उदाहरणच म्हणता येइल.
तिथून सनदशीर मार्गानं काही उचलता आलं तर पहा.
.
पब्लिकच्या पोटावर पाय न येवो ही प्रार्थना. ज्याला त्याला आपला छदाम मिळो ही कामना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars