विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only. WEB 2.0 च्या तांत्रिक क्रांतीतून निव्वळ वाचनाचा आनंद न घेता आता इंटरनेटवर लिहिताही येऊ लागले. 'ब्लॉग' नावाचे माध्यम तमाम लिखाळ लोकांना उपलब्ध झाले आणि इंटरनेटवर माहितीचा पूर येऊ लागला. त्यात 'Wikipedia' आणि 'Google Search' ह्या सर्वात मोठ्या अलीबाबाच्या गुहा ठरल्या. 'अनंत हस्ते इंटरनेट देता, किती घेशील दोन कराने' अशी अवस्था झाली. अनेक विचारवंत आणि हौशी लेखक 'Wikipedia' आणि 'Google' च्या मदतीने माहितीचे संकलन करून लिखाण करू लागले. बर्‍याच जणांनी त्यात कौशल्य मिळवून यश प्राप्त केले. बऱ्याच जणांची पुस्तकेही प्रकाशित झाली. खास करून मराठी भाषेतल्या मराठी संस्थळांवर चांगले लेखन मराठी भाषेत उपलब्ध होऊ लागले. इंटरनेट ह्या माध्यमातही 'मराठी पाऊल पडते पुढे' अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण एक माशी शिंकली. ह्या यशस्वी झालेल्यांना 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' असे हिणवले जाऊ लागले. माहिती आणि त्यावर आधारित ज्ञान हे त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावे? ह्या प्रश्नाचे उत्तर न देताच हिणकस शेऱ्यांनी त्या लेखनकर्त्यांची खिल्ली उडवली जाण्यात धन्यता मानली जाऊ लागले. 'सोशल नेटवर्किंग' ह्या इंटरनेटच्या दुसऱ्या अपत्याच्या माध्यमातून आपले कंपू तयार करून त्या लेखनकर्त्यांविषयी चकाट्या पिटल्या जाऊ लागल्या. आजतागायत हे प्रकार चालले आहे. पण 'माहिती आणि त्यावर आधारित मांडल्या गेलेल्या ज्ञानाचा दर्जा हा त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावा?' ह्या प्रश्नावर ह्या खिल्ली उडवणाऱ्यांनी कधीही विचार केला नाही.

ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka). अमेरिकेतील मेरीलॅंड राज्यातील क्राउन्सविले येथील एका शाळेत शिकणारा 15 वर्षाचा शाळकरी मुलगा. ह्याने 15 व्या वर्षीच संशोधन करून स्वादुपिंड (pancreatic), अंडकोष (ovarian) आणि फुफ्फुस (lung) यांच्या कॅन्सरची शरीराला लागण झाली आहे का ह्याचे निदान करणाऱ्या तपासणीची एक कमी खर्चिक पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीत डिपस्टीक पद्धतीचा एक 'सेंसर पेपर' (लिटमस पेपर सारखा) त्याने शोधला आहे. हा पेपर कॅन्सरचा प्रादुर्भाव दर्शविणारी, रक्तात किंवा लघवीत असणारी प्रथिने शोधतो आणि अगदी लवकरच्या स्टेजवर कॅन्सरचे निदान होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.


जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka)

शाळेत असल्यापासूनच विज्ञानात रस असलेला हा धडपड्या जॅक नववीत असताना त्याचा एक अतिशय जवळचा नातेवाईक स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान लवकर न झाल्यामुळे दगावला आणि जॅकचे आयुष्य त्याने बदलून गेले. त्याने ह्यावर 'निदान तपासणी' शोधायचा मनाशी निर्धार केला. शाळेत जीवशात्रात त्याला 'प्रतिजैवके' आणि 'कार्बन नॅनोट्यूब्जचा तपासणीच्या पद्धतींमध्ये वापर' ह्या विषयांची तोंडओळख झाली होती. त्यांचा वापर करून स्वस्तातली निदान पद्धती शोधता येऊ शकेल असे त्याला तेव्हा वाटले. शाळेतल्या लायब्ररीत जाऊन त्याने पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. पण शाळेतल्या लायब्ररीतल्या पुस्तकांच्याही पुढची माहिती आणि ज्ञान त्याला त्यासाठी हवे होते.

ते त्याने कसे मिळवले? त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याने "a teenager's two best friends: Google and Wikipedia" यांचा वापर करून त्याला हवी असलेली माहिती मिळवली. त्याच्या आधारे त्याचा 'संशोधन प्रकल्प' सुरू करून तो Intel International Science and Engineering Fair मध्ये सादर केला आणि त्याबद्दल पारितोषिक मिळवले. त्यानंतर केंब्रिज ऑक्सफर्ड हार्वर्ड ह्या सारखी विद्यापीठे त्याला अॅडमिशन द्यायला पायघड्या घालून तयार आहेत.

आतापर्यंत करोडो डॉलर्स, अत्याधुनिक लॅब्ज मध्ये संशोधनासाठी खर्च करून जे जमले नव्हते ते ह्या लहानग्या जॅकने एका छोट्या आणि साध्या प्रयोगशाळेत साध्य करून दाखवले. त्यासाठी त्याने 'विकिपीडिया' आणि 'गूगल' ह्यांचा सढळ हाताने उपयोग केला आणि त्याच्या मुलाखतींमध्ये तसे सांगायलाही तो विसरत नाही.

तर, 'विकीपंडीत' किंवा 'गुगलपंडीत' अशी हेटाळणी करणाऱ्यांनी आता ह्यातून बोध घ्यावा आणि माहिती ही माहिती असते आणि योग्य प्रकारे वापरल्यास त्यातून मानवजातीवर उपकारच होतात हे समजून घ्यावे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

वॉव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या मते विकी किंवा गुगलचा उपयोग करणार्‍याला विकीपंडीत किंवा गुगलपंडीत समजले जात नाही तर आपले ज्ञान केवळ याच स्रोतांवर सिमीत ठेवणार्‍यांना किंवा या ठिकाणी दिलेल्या माहितीला अनुभव/इतर स्रोतांशी पडताळणी न करता प्रमाण मानून फक्त त्याचे भाषांतर केल्यासार्खे लेख पाडणार्‍यांना असे म्हटले जाते.

आता यात हिणवण्यासारखे काही आहे का नाही हे ती व्यक्ती या स्रोतांशिवायही त्या विषयात किती खोलात आहे आहे यावर अवलंबून असावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या संशोधनाबद्दल जॅकचे अभिनंदन आणि आभारही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जालीय शोधानंतर चिकाटीने नवीन प्रयोग केले, चाचणीचा यशस्वी विकास केला, जॅकचे अभिनंदन.

इन्टर्नेट शोधयंत्रांमुळे आणि जालीय माहितीगारांमुळे खूप माहिती आज आपल्या हाती येते, हे तर खरेच आहे. चाचणीचा विकास करणारे काही प्रयोग घरी केले, तर काही प्रयोग अनिर्बान मैत्र नामक संशोधकाच्या प्रयोगशाळेत केले, असे जॅक अ‍ॅन्ड्रेकाच्या विकीपानावरून कळते. काही प्रयोग घरगुती नव्हे तर प्रगत प्रयोगशाळेत करणे आवश्यक होते, असे वाटते.

स्मिथ्सोनियन मासिकाच्या पानावरून जॅकच्या चिकाटीचे वर्णन :
> Andraka wrote up an experimental protocol and e-mailed it to 200 researchers. Only Maitra responded.
> “It was a very unusual e-mail,” he remembers. “I often don’t get e-mails like this from postdoctoral
> fellows, let alone high-school freshmen.” He decided to invite Andraka to his lab. To oversee the project,
> he appointed a gentle postdoctoral chemist, who took the baby-sitting assignment in stride. They expected
> to see Andraka for perhaps a few weeks over the summer.

> Instead, the young scientist worked for seven months, every day after school and often on Saturdays until
> after midnight, subsisting on hard-boiled eggs and Twix as his mother dozed in the car in a nearby parking
> garage. He labored through Thanksgiving and Christmas. He spent his 15th birthday in the lab.

Read more: http://www.smithsonianmag.com/science-nature/Jack-Andraka-the-Teen-Prodi...
Follow us: @SmithsonianMag on Twitter

फ्रान्सिस कॉलिन्सने जॅक अ‍ॅन्ड्रेकाची मुलाखत घेतली, त्या चित्रफितीचा दुवा जॅक अ‍ॅन्ड्रेकाच्या विकिपानावरती आहे. विकी-गूगलवरून सुगावा लागल्यावर नंतर पियर-रिव्ह्यू निबंध मोफत मिळणे किती महत्त्वाचे, ही चर्चा कॉलिन्स आणि अ‍ॅन्ड्रेका करतात. सरकारी गुंतवणुकीने झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष (अन्य वैज्ञानिकांनी तपासल्यानंतर) मुक्तपणे उपलब्ध झाले पाहिजेत.

मला वाटते, जेव्हा विकिपांडित्य किंवा गूगलपांडित्य म्हणून हिणवतात, तेव्हा पुढील पाऊल न उचलता तकलादू माहितीवर समाधान मानणार्‍यांची निंदा केलेली असते.

----------
जॅक अ‍ॅन्ड्रेकाच्या विकीपानावरील अन्य वैयक्तिक माहिती : या धाग्याकरिता अवांतर, पण जॅक अ‍ॅन्ड्रेकाकरिता अवांतर नाही, असे तो म्हणतो. हे रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याजवळ आहे ते ज्ञान व इतरांकडे आहे ती माहिती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

इंटरनेटद्वारे मिळणाऱ्या ज्ञानाने महाप्रचंड फरक पडत आहेत, पण नक्की बोट ठेवण्यासारखं काय ते स्पष्ट सांगता येत नाही. या लेखात आलेल्या उदाहरणामुळे ते स्पष्ट व्हायला मदत होते.

बाकी विकीपंडित किंवा गूगलपंडित हे शब्द हिणवण्यासाठी वापरणारांची काही इतरही लक्षणं मला दिसून आलेली आहेत. लिबरल विचार मांडणारांना हीच मंडळी विचारजंत असं म्हणून हिणवतात. म्हणजे मुद्द्याचा प्रतिवाद करण्याऐवजी ते मतं मांडणाऱ्यांवर व्यक्तिगत हल्ला करतात. एकंदरीत व्यक्तिसापेक्ष विचार आणि व्यक्तिनिरपेक्ष विचार या स्पेक्ट्रमवर ती व्यक्तिसापेक्षतेकडे झुकलेली असतात. आकडेवारी किंवा संशोधनापेक्षा त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर अधिक विश्वास ठेवतात. अर्थात ही माझी निरीक्षणं सर्वसाधारण आहेत, प्रत्येक बाबतीत ती लागू होतीलच असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासूगुर्जींशी पूर्ण सहमत आहे.

आकडेवारी नीट न पाहता नुसती उद्धृत केली- तीही बेसिक सॅनिटी चेक्स न लावता-तर गूगलपंडित अशी टीका होणार हे ओघाने आलेच. तदुपरि, अन्य बाबतीत एकदम लिबरल असणारे लोक अडचणीच्या मुद्द्यांपासून पलायन करताना दिसता आणि स्वतःला सोयीस्कर तिथेच आणि तेवढ्याच ठिकाणी वाद घालताना दिसतात. तथाकथित व्यक्तिनिरपेक्ष मते फक्त सोयीच्या ठिकाणीच बाळगताना दिसतात, शिवाय त्यातली व्यक्तिसापेक्षता सरळ सरळ दिसूनही नाकबूल करतात. शिवाय स्वतःला समाजापासून वेगळे समजतात पण शेवटी ज्यांवर टीका करतात त्यांचेच गुणधर्म बाळगताना दिसतात. हा विरोधाभार फार रोचक आणि रञ्जक वाटतो खरा. इथे जालीय कीटकभृंगन्याय लागू होतो की काय असे वाटू लागते.

अर्थातच, ही निरीक्षणेही अंमळ जेनेरिक आहेत. एवंगुणस्पेक्ट्रमाभिनिविष्ट प्रत्येक व्यक्तिविशेषाला अ‍ॅज-इज लागू होतील असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0