आमच्या गावातील एक आश्चर्य

आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .
लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.
पण गणितात मात्र प्रचंड हुशार! त्याला १ पासून कितीही संख्येचा पाढा विचार, क्षणात उत्तर तयार. १२८७ /१५४८९४ चा पाढा विचारा/, लगेच म्हणून दाखवणार. कितीही संख्येची बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,वर्गमूळ, वर्ग ,इत्यादी सगळे क्षणात उत्तर तयार. तुम्ही कॅल्क्युलेटर घेवून बसलात तरी तुम्ही कॅल्क्युलेटरवर गणित करण्या आधी त्याचे उत्तर तयार असते.
तुम्ही प्रश्न विचारल्यावर तो एक सेकन्दभर नजर आकाशाकडे करून बघतो. आणि उत्तर सांगतो. संख्या फार मोठी असेल तर फक्त तो आकडे म्हणून दाखवतो. उदा.२५ कोटी १२ लाख ७८ हजार ३९८ ही संख्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल तर तो २५१२७८३९८ असे एकेक आकडे सांगतो. तो जेव्हा आकाशाकडे बघतो, तेव्हा त्याला प्रश्नाचे उत्तर नजरेसमोर दिसते ,असे तो सांगतो.
"स्टार माझा " वाहिनीचे रत्नागिरी प्रतीनिधी सचिन देसाई यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये या बाबू च्या अचाट आणि अतर्क्य चमत्कारावर आधारित एक मुलाखत घेऊन ती प्रसिद्ध केली होती. "स्टार माझा "वर ती प्रसारित ही झाली होती. त्यापूर्वी विविध स्थानिक वृत्तपत्रातून सुद्धा बाबू बद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे
आधुनिक मेंदू-विज्ञानाला आव्हान ठरू शकणार्या आणि अतींद्रिय शक्तीच्या अभ्यासकांना एक चमत्कार म्हणून अभ्यास करण्यासारखे या बाबुकडे नक्की काहीतरी आहे. गरज आहे ती त्याची दखल घेण्याची! नाहीतर गेली ४०-४५ वर्षे गावकरी त्याला वेडसर म्हणून दुर्लक्ष करत आहेतच!पण खरेच त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखे काही असेल,तर संशोधन व्हायला हवे,असे वाटते...................!धन्यवाद!
शिरीष चव्हाण उर्फ बाबू देवरुखकर
मु.पो.चोरवणे ,व्हाया-पाली
नाणीज जवळ- (रत्नागिरी -कोल्हापूर हायवे.)
ता.संगमेश्वर,जिल्हा-रत्नागिरी.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

अशा व्यक्तींना idiot savant म्हटलं जात असे, पण अलिकडे उघडच कारणांमुळे हे संबोधन आक्षेपार्ह समजलं जातं. त्यांच्यावर 'संशोधन' (म्हणजे सायकियॅट्रिस्ट, न्यूरॉलॉजिस्ट इत्यादिंनी अशा क्षमतांमागची कारणमीमांसा शोधून काढण्याचा प्रयत्न करणे) हे होत आलेलं आहे, पण काही स्पष्ट निष्कर्ष निघालेले आहेत असं मला वाटत नाही. अॉलिव्हर सॅक्सच्या 'An Anthropologist on Mars' या पुस्तकात अशा कित्येक व्यक्तींबद्दल वाचल्याचं आठवतं.

https://en.wikipedia.org/wiki/Savant_syndrome

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धन्यवाद जयदीप जी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre