उत्तर-पूर्व भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले.
मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग्(सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता.
गुवाहातीला पोचल्यावर आमच्या दिमतीला इनोव्हा होत्या. प्रथम आम्ही काझीरंगा अभयारण्याला गेलो. अंतर साधारण २०० किमी आहे.

काझीरंगाहून तवांग बरेच लांब आहे.(अंदाजे ५०० किमी) म्हणून मधे बोमदिलाला स्टॉप घेतला. (८५००फूट) तिथेही रुम हिटर लागण्याइतकी थंडी होती.
बोमदिलाहून तवांगला जाताना आसाम सीमेवरचे भालुकपाँग लागते. तिथे आपले 'इनर लाईन परमिट' चेक केले जाते. अरुणाचल प्रदेश सेंसिटिव्ह असल्यामुळे हे परमिट लागते. वाटेत 'सेला पास' १३७०० फुटांवर आहे. तिथे दुपारीही खूपच थंडी होती. तिथली लेक छान आहेत. वाटेत जसवंतगढ्ही आहे. तिथे त्या शूर शिपायाचे स्मारक आहे.पुढे दिवेलागणीच्या सुमारास (संध्याकाळी ५ वाजता) तवांगला पोचलो. तवांगहून जवळ दोन तीन प्रसिद्ध आणि कित्येक अप्रसिद्ध लेक्स आहेत. तिथे जायचा मार्गही खडतर आहे. वाटेत पीटी त्सो हे लेक बघितले. पुढे वाय पॉईंट येतो. तिथून तेरा किमी अंतरावर 'बुमला' येथे चीनची सीमा आहे. पण तिथे जायला स्पेशल परमिट लागते. ते नसल्यामुळे आम्ही वायच्या दुसर्‍या फाट्याला सेंग्येन त्सॉर लेक (माधुरी दिक्षितचे तिथे कुठले तरी शुटिंग झाले असल्यामुळे टुरिस्ट त्याला माधुरी लेक असेही म्हणतात, पण स्थानिक लोकांना ते अर्थातच आवडत नाही.) संपूर्ण भागावर आपल्या मिलिटरीचे नियंत्रण आहे. जिथे सामान्य माणसाला श्वास लागतो तिथे हे लष्कराचे लोक क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळत होते. त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या.

तवांगहून परत येताना आधी वॉर मेमोरियल बघितले. १९६२ च्या युद्धात आपले अत्यंत शूर असे २२४० ऑफिसर्स तिथे धारातीर्थी पडले. ते बघून प्रथम दु:ख आणि नंतर राजकारण्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होते. वाटेत पुन्हा सेला पास लागला. येताना चेंज म्हणून बोमदिलाच्या ऐवजी 'दिरांग'ला थांबलो. हे गांवही छान आहे.
दिरांगहून लवकर निघालो कारण गुवाहातीला पोचायला ४०० किमी चा प्रवास होता. गुवाहातीला एक रात्र राहून सकाळी शिलाँगला(१०० किमी) निघालो. ती मेघालयची राजधानी आहे. फारच सुंदर हिल स्टेशन आहे ते. तिथे डॉन बॉस्को म्युझियम व कॅथेड्रल चर्च बघितले. शिलाँगहून ५३ किमी वर चेरापुंजी बघितले, जवळ एका खडकाळ गुहेतून आरपार जाण्याचा अनुभव घेतला. दुसर्‍या दिवशी जिवंत मुळांचा पूल आणि 'आशियातले सर्वात स्वच्छ' असा लौकिक असलेले एक खेडे बघितले.
अरुणाचलचा निसर्ग वेगळा तर मेघालयचा एकदम वेगळा! नॉन एसी गाडीतून प्रवास करताना तिथल्या घनदाट जंगलांमधल्या वृक्षांचा गंध, वेगवेगळ्या वनस्पती बघून डोळ्यांचे पारणे फिटले. हिमालयाचे आणखी एक रुप बघून अत्यंत तृप्त मनाने आम्ही परत आलो.
वर्णन त्रोटक आहे पण फोटोच जास्त बोलतील.

१. बांबूचे झाड

२. काझीरंगा हॉटेल बाहेरील बाग

३. गेंडा

४. पिल्लु मागे मागे

५. काझीरंगातील पाळीव हत्ती

६. कामेंग नदी

७. सेला पास लेक-१

८.सेला पास लेक-२

९. लेक जवळचे बर्फाच्छादित डोंगर

१०. पी.टी. त्सो लेक, तवांग

११.माधुरी उर्फ सेंग्यत्सार लेक, तवांग

१२.घाटातल्या रस्त्यांचे साप

१३. शिलाँग 'पिक' कडे येणारा रस्ता

१४. एलिफंट फॉल्स, शिलाँग

१५. चेरापुंजीतली पर्वतराजी

१६.चेरापुंजीचा रोडावलेला धबधबा

१७. लिविंग रूट ब्रिज

१८. हा मात्र मराठीच वाटतोय

१९. मोविलाँग खेडे (आशियातले सर्वात स्वच्छ)

२०. लाकडी खलबत्ते विकणारीचा मुलगा

२१. कॅथेड्रल चर्च, शिलाँग

२२. दिवसाढवळ्या चंद्र डोकावतोय

२३. शिलाँग मेन लेक

संपादकः छायाचित्र देताका कृपया width="" height="" चा वापर टाळावा. अवतरणांच्या आत रोमन आकडे द्यावेत किंवा मग अख्खा टॅगच काढून टाकावा. width="" height="" मुळे काही ब्राऊझर्समध्ये चित्रे दिसत नाहीत याची नोंद घ्यावी

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त, मस्त! आता पुढची सहल उत्तर पूर्वेचीच!
कोणत्या टूरतर्फे गेला होतात? खाजगी व्यवस्था करुन जाण्यापेक्षा ते अधिक बरे पडते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हाफिसात छायाचित्र बघता येत नाहियेते ती घरी जाऊन बघेन

काझीरंगात एक हत्तीचं पिल्लु आमच्या दिशेने दुडदुडत आलं होतं त्यानं (म्हणे) प्रेमानं आपली सोंड आमच्यातील एकाच्या खांद्यावर ठेवली. त्या काही आठवड्याच्या पिल्लाच्या सोंडच्या हलक्याशा स्पर्श-वजनाने ती व्यक्ती खालीच बसली आणि आम्ही बेफाम हसत सुटलो ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

width="" height="" काढल्यावर चित्रे दिसली.

अतिशय सुरेख चित्रे आहेत.
त्या कोंबड्याच्या चित्रावरून आठवले. पुर्वोत्तर राज्यांत जरी आपल्यासारखेच कोंबडे असले तरी हिमाचलपासून अफगाणिस्तानपर्यंतच्या पट्ट्यात हिमालयन स्नोकॉक नावाची जात दिसते. दिसायला बेताचीच पण अति रुचकर Wink

मात्र तिचे स्थानिकांत - हिमाचलमध्ये आहे - जर काही धार्मिक महत्त्व असले तर तिला मारू देत नाहीत (शिवाय ही कोंबडी सोन्याचे अंडे देते असाही समज प्रचलीत आहेच). आमच्या ड्रायव्हरने तिला कुठूनसे मिळवून (का पळवून? देव जाणे) आमच्यासाठी वाटेत शेकोटी पेटवून हे खाऊ घातले होते. अह्हाहा.. लाजवाब!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाह! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो फार आवडले. माणसाच्या अन गेंड्याच्या अशा दोन्ही पोरांचे फटू अगदी गोड की कायसेसे दिसत आहेत. अन्य फोटो "प्रिस्टाईन" शब्दाची दृश्य व्याख्या जणू स्पष्ट करणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त. फोटो पाहून तुम्हाला हिमालय पुन्हा पुन्हा का हाका घालतो याचा अंदाज आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहेत फोटो-आठवा फोटो सगळ्यात जास्त आवडला. हिमालयाचा हा भाग खासच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेरपुन्जीच्या पावसाचा तुमचा काय अनुभव ते सान्गावे . दिवसाढवळ्या चन्द्र आनि शिलोन्ग लेक हे फोटो आवडले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो कुठेत??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ह्याच महिन्यात एका लांबलचक ट्रेक सदृश मोठ्या वॉक - नेचर ट्रेल ला जाणार होतो शिलाँगजवळ.
मित्राच्या गाढवपणामुळं प्लान रहित झाला.
ही चित्रं पाहून अजूनच वाईट वाटलं आपलं तिथं भटकणं झालं नाही म्हणून.
.
प्रवास छान. वातावरण मस्त वाटले.
.
अवांतरः-
उत्तर पूर्व, प्रधानमंत्री , रक्षामंत्री ह्या शब्दांना मराठीत अनुक्रमे इशान्य (की ईशान्य?) पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री असे शब्द आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars