'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग २

मागच्या पाच्-सात महिन्यांत कधीतरी सकाळ चे रविवारचे सप्तरंग (किंवा कदाचित लोकसत्ताचे चतुरंग सुद्धा असावे; नक्की आठवत नाहिये) वाचत असताना एका समाजाबद्दल वाचलं होतं.
हे लोक धार्मिक ख्रिश्चन आहेत. कल्ट म्हणता यावी अशी त्यांची जीवनशैली आहे. दीड दोन शतकांपूर्वी ते अमेरिकेत आले. बहुतेक जर्मनी-स्वित्झर्लंड ह्या भागातून ते आले असावेत.
प्रथम त्यांची नोंदणी केली गेली तेव्हा केवळ पाच हजार असतील १९०५च्या आसपास . आता त्यांची संख्या तीन-साडे तीन लाखांच्या पुढे गेली आहे.
त्यांची जीवनशैली वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ते संततिनियमन वापरत नाहित. मोठ्या शहराम्त ते रहात नसून स्वतःपुरते घोळका करुन राहतात. सामायिक शेतीसारखा प्रकारच म्हणा ना.
म्हणजे त्यांचे स्वतःचे एक जणू स्वतंत्र शहर असते. आधुनिक कोणतीही औषधेही ते वापरत नाहित कारण तर बायबल मध्ये दिलेले नाही.
दाढी वाढवितात. मूर्तीपूजा मानत नाहित. सिमेंटच्या अपार्ट्मेंट्स बांधतही नाहित, त्यात रहातही नाहित.
थोडक्यात अमेरिकेसारख्या आधुनिक , संपन्न ठिकाणी राहूनही ह्यांची जीवनशैली ह्यांनी कटाक्षाने पारंपरिक अशीच जपलेली आहे.
तेव्हा लेख भलताच घाईघाईत चाळल्याने त्या समूहाचे नाव आणि अधिक तपशील आत्ता आठवत नाहित.
इथे अमेरिकेत वास्तव्य असणार्‍यांची संख्या बरीच आहे आणि इतर सभासदही बहुश्रुत असल्याने माहिती मिळण्याची शक्यता वाटली.
कुणी तपशील देइल का प्लीझ?

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

क-ह-र!!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अज्जिबात लक्ष देऊ नका. दु-र्ल-क्ष करा. कारण बायका त्यांना फार मिळणार्‍या लक्षामुळे आधीच चढलेल्या असतात. त्यात जर कोणी दुर्लक्ष केलं तर प्र-चं-ड intriguing वाटते. हे खरे आहे (अनेक जणींचा अनुभव आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने