'घरकामाच्या गोष्टी' - आवाहन

'ऐसी अक्षरे'च्या सर्व सदस्यांना सस्नेह नमस्कार!

'मिळून साऱ्याजणी' या मासिकाने १९९० च्या मार्च विशेषांकात 'घरकाम' या विषयावर विस्तृत चर्चा घडवून आणली होती. २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा जानेवारी २०१४ च्या अंकात 'घरकामाच्या गोष्टी' हा विभाग आम्ही योजतो आहोत. बदलत्या काळामध्ये 'घरकाम' या महत्त्वाच्या विषयाबाबत काय मते-मतांतरे दिसतात, घरकामाच्या बाबतीतल्या धारणा बदलल्या आहेत का हे तपासणे हा आमचा हेतू आहे. यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे ती खाली देत आहोत.

  • तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
  • 'उत्पादक काम' म्हणजे काय?
  • कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
  • आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
  • आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
  • आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
  • माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
  • घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
  • तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
  • घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
  • तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
  • घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
  • तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
  • पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
  • या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. तेव्हा सर्व मित्र-मैत्रिणींच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    यासंदर्भात काही सूचना -

    • प्रश्नावलीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेत तर छानच. पण तसे न करता या प्रश्नांच्या रोखाने तुम्हाला टिपण पाठवावसं वाटलं तर तसंही चालेल.
    • उत्तरे/टिपण वर्ड आणि पीडीएफ स्वरूपात saryajani@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे. शक्यतो युनिकोडमध्ये टाईप करावे. तसे शक्य नसल्यास फाँट फाईलही पाठवावी. विषयाच्या जागी 'घरकामाच्या गोष्टी' असे लिहावे. पोस्ट/कुरियर करायचे असल्यास मिळून साऱ्याजणी, ४०/१/ब, भोंडे कॉलनी, कर्वे रोड, पुणे - ४११ ००४ या पत्त्यावर पाठवावे. पाकिटावर 'घरकामाच्या गोष्टी' असा उल्लेख करावा.
    • तुमचा परिचय (नाव, पत्ता, फोन नंबर, शिक्षण, व्यवसाय, इतर पूरक माहिती) पाठवावा.
    • प्रतिसाद पाठवण्याची अंतिम तारीख - १२ डिसेंबर २०१३.
    • लिहिण्याऐवजी बोलावसं वाटत असेल तर ९८५०६७७८७५ किंवा ०२० - २५४५४८३५ या क्रमांकावर १२ ते ५ या वेळेत संपर्क साधावा.

    आलेल्या सर्व प्रतिसादांचे संकलन करून निवडलेल्या प्रतिसादांचा नामोल्लेखासह अंकात समावेश करण्यात येईल.

    धन्यवाद!

    प्रतिसादाच्या अपेक्षेत,

    मिळून साऱ्याजणीसाठी,

    उत्पल

    Taxonomy upgrade extras: 
    field_vote: 
    4
    Your rating: None Average: 4 (2 votes)

    गृहिणी म्हणून राहणार्‍या महिलांना "काम काय असत?" या प्रश्नाचं उत्तर म्हणून ही प्रश्नावली काढली आहे.
    जे या कामाचे मूल्य जाणून योग्य तो सन्मान देतात त्यांना या प्रश्नावलीची गरज नाही.
    उरलेल्यांना या प्रश्नावलीचा उपयोग नाही.

    सेल्फ गोलचा प्रकार वाटतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --------------------------------------------
    ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
    प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

    उत्तर देण्याच्या अपेक्षीची गरज प्रश्नकर्त्यांना आहे उत्तरकर्त्यांना नाही. जे काही चित्र समाजात आहे त्याचे सँपल म्हणुन का होईना डॉक्युमेंटेशन करावे असा हेतु त्यामागे असावा.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    प्रश्नावली भरून पाठवली आहे. उत्तरे येथे देणे अपेक्षित आहे का?

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --------------------------------------------
    ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
    प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

    नितिन थत्ते..धन्यवाद..तुमची मेल मिळाली आहे. इथे उत्तर देणे अपेक्षित नाही...

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    सदर प्रतिसाद जीमेलवर पाठवणार आहे. इथेही चर्चा व्हावी म्हणून जाहिरही टाकत आहे

    •तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?

    -- असे कोणतेही काम जे घरासाठी/कुटुंबासाठी गरजेचे आहे ते काम. यात घराची साफसफाई, धुणी-भांडी, जेवण वगैरे बरोबरच घरातील प्रकाशयोजना, रंगकाम, वाहने, सांडपाणी निचर्‍याची सोय, पाण्याची सोय (जसे नळ-टाक्या) या सार्‍यांची डागडुजी, विविध गरजेच्या गोष्टींची बिले भरणे वगैरे अनेक कामे समाविष्ट आहेत

    •'उत्पादक काम' म्हणजे काय?

    ज्याच्या पासून काहीतरी नवीन उत्पादन होते ते

    •कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?

    प्रत्येक काम (घरकाम असो वा नसो) काही तरी उत्पादीत करतच असते. तेव्हा त्या अर्थाने प्रत्येक काम उत्पादक असते. (अगदी झोपणे सुद्धा - झोपल्याने शरीराचा थकवा जाऊन इतर कामांसाठी लागणार्‍या उर्जेचे उत्पादनच होत असते)

    •आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?

    हा सापेक्ष प्रश्न आहे. जर कामाचे मुल्यमापन आर्थिकदृष्ट्या करणे 'मेंडेटरी' असेल तर (आणि तरच) माझ्यामते जी कामे करण्यास दिवसातील २ तासांपेक्षा अधिक वेळ जातो त्यांचे आर्थिक मुल्य धरावे (अपवाद झोप). बाकीच्या कामांना मुल्य नाही असे नाही पण ते मुल्यमापन करायला लागणारे कष्ट - व त्या मुल्यमापनासाठी लागणारा वेळ , पर्यायाने मुल्य - त्या कामांच्या मुल्यापेक्षा कमी वाटल्याने माझे असे वैयक्तिक मत आहे.

    •आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?

    नाही

    •आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?

    आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नाहित. प्रश्न गैरलागू

    •माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?

    हे पूर्ण सत्य नाही. कित्येक घरकामे अशी आहेत ज्याचे मुल्य बाजाराने ठरवले आहे. जसे धुणी-भांडी करणे, साफसफाई, वाहनांची धु-पुस त्याची डागडुजी, बागकाम, मुलांचा सांभाळ वगैरे घरकामांचे मुल्य आधीच बाजाराने ठरवले आहे. तीच गत बिले भरणे, घराला रंगरंगोटी (घरांची शाकारणी), नळ दुरूस्ती, सांडपाणी व्यवस्थापन आदी घरकामांचे मुल्यही बाजारानेच ठरवले आहे. प्रश्नकर्त्याला कोणते काम अभिप्रेत आहे ज्याचे मूल्य बाजारभावाने ठरवलेले दिसत नाही?

    •घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?

    प्रश्न अत्यंत ढोबळ व वरवरचाच नाही तर चुकीचा आहे. याचे ठाम असे उत्तर देणे अशक्य आहे. जर अर्थार्जन करणारी व्यक्ती घरकामही करत असेल तर त्याला हे मुल्य कोणी द्यायचे? का मग अर्थार्जन करणार्‍या व्यक्तीने घरकाम करूच नये असे प्रश्नकर्त्याला वाटते?

    •तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?

    सर्वात मोठा नकारात्मक परिणाम म्हणजे अर्थार्जन करणार्‍या व्यक्तीला घरकामात मदत कशी करता येईल? आधीच अर्थार्जन केले म्हणजे झाले असा समज अनेकांचा असतो एकदा का मोबदला दिला -पैसे फेकले - की घराकडे बघायची जबाबदारी संपली या भावनेत वाढ होईल असे वाटते. त्यापेक्षा निव्वळ घरकाम करणार्‍या व्यक्तीला अर्थार्जन करायलाही उद्युक्त करणे हा या प्रश्नावरील अधिक योग्य उपाय वाटतो.

    •घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?

    नाही. या प्राथमिक गरजा आहेत. अन्न, शिक्षण आदी गोष्टी आता कायदेशीर रित्या भारतीय नागरीकांचा "हक्क" आहे तो डावलणे कोणालाही शक्य नाही.

    •तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?

    मी घरातले पडेल ते काम करतो. स्वयंपाक/झाडलोट वगैरे आहेच शिवाय फाटलेल्या उशांच्या अभर्‍यांना टिप मारण्यापासून ते विकांताला साफसफाई करण्यापर्यंत आणि गळक्या नळांचे वॉल्व्ह बदलण्यापासून ते बिले भरण्यापर्यंत सारे करतो. तसेच पत्नी देखील तिच्या गाडीची डागडूजी पासून ते स्वतःचे आर्थिक नियोजन करण्यापर्यंत आणि रोजच्या स्वयंपाकापासून ते अपत्याचा सांभाळ करण्यापर्यंत अनेक कामे करते. आणि ही कामे तीच / मीच करतो असे नाही. कोणतेही काम कोणीही करते. अगदी आमच्या दिड वर्षाच्या बाळालाही भाजी निवडायला, बाहेर ताट-वाट्या-चमचे मांडायची वगैरे घरकामे करायला बसवतो Smile

    •घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?

    कोणतेही घरकाम दुय्यम वाटत नाही. वर दिलेली नाहिच शिवाय बिले भरणे, घरातील आर्थिक नियोजन, गाड्यांची डागडुजी, साफसफाई वगैरेही नाही.

    •तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?

    झोप काढण्यातून.

    •पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?

    नाही बघु शकत. ते पुरूष आहेत म्हणून नव्हे तर स्त्रीयांनाही अश्या भुमिकेत बघताना विचित्र वाटते - आवडत नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - ऋ
    -------
    लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

    उच्चमध्यमवर्गाच्या काही रँडम समस्यांना समोर ठेऊन त्यांना अख्ख्या समाजाच्या 'प्रातिनिधीक' समस्या वगैरे समजून घेत केलेला खटाटोप वाटत नाही का हा आपल्याला? Blum 3 Blum 3

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    हा प्रश्न मला उद्देशून आहे का धागाकर्त्याला?

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - ऋ
    -------
    लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

    तुमच्या ह्या प्रतिसादावरून जरा छळावं म्हटलं. Wink

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    Smile

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - ऋ
    -------
    लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

    नाही बघु शकत. ते पुरूष आहेत म्हणून नव्हे तर स्त्रीयांनाही अश्या भुमिकेत बघताना विचित्र वाटते - आवडत नाही.

    माझं उलटं आहे. मी पुरषांना पाहू शकते , नव्हे तर पती-पत्नीनी "मी आता ड्राईव्ह करते/तो तू मागे बस." (अर्थात मी अर्थार्जन करते तू शीक अँड शार्पन द सॉ) असे आलटून पालटून करावे या मताची मी आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    माझं उलटं आहे. मी पुरषांना पाहू शकते , नव्हे तर पती-पत्नीनी "मी आता ड्राईव्ह करते/तो तू मागे बस." (अर्थात मी अर्थार्जन करते तू शीक अँड शार्पन द सॉ) असे आलटून पालटून करावे या मताची मी आहे.

    कोणीतरी ड्राइव्ह करत असताना मागे बसण्याने नेमके कोणते शिक्षण होते? नेमका कोणता स्किलसेट वाढीस लागतो ('ब्याकशीट ड्रायव्हिंग'खेरीज)?

    (हं, आता ब्याकशीट ड्रायव्हिंगला 'शार्पनिंग द सॉ' म्हणत असाल, तर ते कदाचित अक्षरशः खरे मानता येईलही, पण ती वेगळी गोष्ट.)

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    "शीक" म्हटलय ना म्हणजे तू(मागे बसलेली व्यक्ती) एखादा व्यावसायीक कोर्स कर.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    हल्ली ब्याकशीट ड्रायव्हिंगचे कोर्सेस असतात? (आणि तेही प्रोफेशन म्हणून?)

    आमच्या वेळी असे नव्हते हो! उपजत कौशल्यावर भागवावे लागायचे, आणि हौस म्हणून (झालेच तर कर्तव्यभावनेने) करायची मंडळी ब्याकशीट ड्रायव्हिंग.

    ('व्यावसायिक'??? बोले तो, आजकाल ब्याकशीट ड्रायव्हिंग केल्याबद्दल लोकांना पैसेसुद्धा द्यावे लागतात? ताशी दर काय आहे हो सध्या?)

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    Smile

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    अगदी आमच्या दिड वर्षाच्या बाळालाही भाजी निवडायला, बाहेर ताट-वाट्या-चमचे मांडायची वगैरे घरकामे करायला बसवतो

    ह्याला चाइल्ड लेबर म्हणावे का?

    आमच्या वय वर्षे दिड बाळाची - भांडी पुसून जागेवर लावणे, झाडू ने सर्वत्र समसमान धूळ पसरवणे, वाट्टेल त्या फडक्याने फरशी पुसणे इत्यादी अतिशय आवडती कामे आहेत.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    -सविता
    ----------------------------
    || स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

    ह्याला चाइल्ड लेबर म्हणावे का? Wink

    माझ्या कल्पनेप्रमाणे (चूभूद्याघ्या), 'व्हॉलंटियर' म्हणून दाखवल्यास ती अडचण येऊ नये. (शिवाय, पैसेही द्यावे लागू नयेत, हा बोनस फायदा. [तसेही देत नसतीलच म्हणा ते.] ;))

    आमच्या वय वर्षे दिड बाळाची - भांडी पुसून जागेवर लावणे, झाडू ने सर्वत्र समसमान धूळ पसरवणे, वाट्टेल त्या फडक्याने फरशी पुसणे इत्यादी अतिशय आवडती कामे आहेत.

    Way to go. Smile

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    • तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
    घराबाहेरील (कुटुंबाबाहेरील) व्यक्तीसाठी जे केले जात नाही ते घरकाम. यात स्वयंपाक, झाडलोट, बालसंगोपन या खेरीज कुटुंबाचे अर्थव्यवहार “सांभाळणे” (त्यासंबंधी निर्णय घेणे, ते कार्यान्वित करणे वगैरे) हे सुद्धा येईल.
    • 'उत्पादक काम' म्हणजे काय?
    जे काम करून देण्याचा मोबदला मिळू शकतो ते सर्व काम
    • कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    बहुतांश सर्व घरकाम हे उत्पादक कामात मोडते. पण जे करावे अशी कुटुंबातल्या इतरांची अपेक्षा नाही ते काम उत्पादक कामात मोडणार नाही.
    • आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    आर्थिक मूल्य असतेच. कारण ते काम करून घेण्यासाठी घराबाहेरच्या व्यक्तीस मोबदला द्यावा लागेल.
    • आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    सांगता येत नाही.
    • आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    सांगता येत नाही. तसे कुठलेच काम श्रेष्ठ वगैरे नसते.
    • माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    निश्चित मत बनवलेले नाही. पण ठरवू नये असे वाटते.
    • घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    नाही. सहसा अर्थार्जन करणारा सदस्य जे आर्थिक निर्णय घेणे, सांभाळणे ही कामे करतो त्याचे मूल्य कोणाकडून घ्यायचे हा प्रश्न निर्माण होईल. शिवाय दोघेही अर्थार्जन करत असतील तर घरकामाचे मूल्य कोणी कोणाला द्यायचे.
    • तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    नकारात्मकच* परिणाम होतील. मोबदला देणारा दुसर्यावस कमी सन्मान देईन असे वाटते.
    • घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    नाही. हिशेब असा कधीच संपत नाही.
    • तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    बयाच वेळा. कधी साइड बाय साईड. कधी सेपरेट.
    • घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    नाही.
    • तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    सांगता येत नाही. प्रश्न विषयासंदर्भात गैरलागू वाटतो.
    • पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    विचार केलेला नाही. पाहू शकेन असे वाटते. प्रत्यक्ष तसा अनुभव आला नसल्याने खात्री नाही.
    *टिपण:
    १. समजा पत्नी अर्थार्जन करते नवरा घरकाम करतो. पण पत्नी मुलांना जन्म देण्याचंही “घरकाम” करते. तर त्या घरकामाचा मोबदला कोणी कोणाला द्यायचा? पुढे मुलांचं संगोपन नवर्याानेच केले असे गृहीत धरले आहे.
    २. पतीने गृहिणीला बाजारभावाने (म्हणजे धुणे धुण्याबद्दल+ भांडी घासण्याबद्दल + स्वयंपाक वगैरे बद्दल मोलकरणीला द्यावा लागतो तेवढाच) मोबदला दिल्यावर पती तिला तिचा खर्च जेवण खाण, कपडे वगैरे त्यातूनच भागवण्यास सांगू लागेल. सुखवस्तू घरातील पत्नीला नुकसानच नुकसान होईल. शिवाय घर पतीचे असेल आणि त्या घरात राहण्याचे भाडे मागितले तर ?
    ३. मोबदला देण्याचा प्रस्ताव नवरा कमावता आणि बायको गृहिणी असा विचार करून मांडलेला वाटतो. असा प्रस्ताव मांडला तर नवरे घाबरून अशा हिशोबाला तयारच होणार नाहीत असाही समज दिसतो. पण अशा रीतीने नवर्यांननी प्रत्यक्षात हिशेब केला तर ते स्त्रियांना फ़ारसे हितावह ठरणार नाही.
    पत्नीच्या घरकामाच्या आवश्यकतेकडे आणि अर्थातच त्याच्या मूल्याकडे “लक्ष वेधणे” हे ठीक आहे पण खरोखर व्यवहार करणे योग्य होणार नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --------------------------------------------
    ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
    प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

    ऋषिकेश, नितिन...धन्यवाद. उत्तरे रोचक वाटत आहेत. काही उत्तरांबाबत अधिक प्रश्न पडत आहेत आणि काही प्रश्नांचा खुलासाही करावा लागेल. पण त्याबाबत सवडीने संपर्क करेन.

    @ नितिन - इथे उत्तर देणं अपेक्षित नाही असं मी म्हटलं खरं, पण ते तुम्ही मेल अगोदरच केली होती म्हणून. अन्यथा इथे चर्चा व्हायला काहीच हरकत नाही, पण तरी जीमेलवर आपले प्रतिसाद पाठवावेतच ही सर्वांना विनंती.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
    घ्रर या संस्थेशी संबंधीत असलेल्या कुठल्याही कामाला.

    'उत्पादक काम' म्हणजे काय?
    जे काम कशाना कशाचे उत्पादन करते ते. आमच्या मते सर्व कामे उत्पाद्कच असतात. ती उपयुक्त असतात कि नाही हा वेगळा भाग आहे.तो सापेक्ष आहे.

    कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    सर्व घरकाम हे उत्पादक कामात मोडते

    आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    गरज पडली तरच आर्थिक मुल्याचा विचार असावा तो पर्यंत ते काम अमूल्यच असते.

    आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    नाही

    आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    प्रथम माणसाच्या मुलभुत गरजा भागवणारे काम श्रेष्ठ त्यानंतर पुढे मानसिक सांस्कृतीक सामाजिक वगैरे

    माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    मला ते अमुल्य वाटते. त्यामुळे बाजारभावाने मूल्य ठरवू नये.

    घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    निश्चित झाले व कंपल्सरी झाले तर द्यावे आता ते देणे कितपत परवडेल हा भाग वेगळा. अर्थार्जन व घरकाम करणारी व्यक्ती एकच असेल तर गोष्ट वेगळी आहे.

    तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    बाजारभावाने मूल्य निश्चित झाल्यास सकारात्मक परिणाम म्हणजे आपल्याला आतापर्यंत घरकाम प्रचंड स्वस्तात मिळत होते याची जाणीव होईल. नकरात्मक परिणाम म्हणजे भावनांचे बाजारीकरण होईल

    घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    तस नाही वाटत.

    तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    लौकिक अर्थाने मी काडीचेही काम करीत नाही. तरी पण बँका, बिले, वर्तमान पत्र आवरणे,पाणी भरणे, घरातल्या इतर कामात लुडबूड न करणे अशी कामे करतो. झाडलोट करत नाही. अगदी क्वचित केली असेल.

    घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    मी स्वतः अशी कामे करीत नाही व अशा कामांना दुय्यम ही समजत नाही.

    तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    आंघोळ झाल्यावर अंगावरच्या मळकुट्या काढणे, दुपारी नेटवर बसल्यावर अथवा पुस्तक वाचताना पेंगणे, घरातील वस्तु वेळेवर व जागेवर सापडतील यासाठी प्रयत्न करणे, घरी मित्रांबरोबर बिअर वा तत्सम पेय पीत गप्पा मारणे, आत्मस्तुतीला दोष न मानणे,आत्मपीडनाला गुण न मानणे बगैरे गोष्टीत आत्मिक समाधान मिळते.

    पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    होय मनमोकळे तर बघू शकतोच पण अशा लोकांनी जाणीव पुर्वक ही भुमिका स्वीकारली असल्यास आदर देखील वाटतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    हा धागा सासूबाईंना पाठविला आहे.

    ___________________________________________________

    •तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?

    - कुटुंबियांसाठी पडेल ते काम करणे = घरकाम
    __________________________________________________

    •'उत्पादक काम' म्हणजे काय?

    - टँजीएबल उत्पन्न करणारे काम उदा - स्वयंपाक, पीठ दळणे वगैरे
    __________________________________________________

    •कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?

    जोडीदाराची "सचिवाची/ पालकाची/प्रियकर/प्रेयसी/मित्राची" भूमिका उत्पदक कामातून मी वगळते. पण ते देखील एक जबाबदारीचे कामच आहे.
    __________________________________________________

    •आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    मूल्य नसावे
    __________________________________________________

    •आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    नाही. वरती उल्लेखलेली अनुत्पादक कामे श्रेष्ठ व आवश्यकच आहेत.
    __________________________________________________

    •आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    सातत्याने सुधारणा, रुम फॉर ग्रोथ, बुद्धी व विचार वापरावे लागणे
    __________________________________________________

    •माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    ठरवू नये. भावनांचे, मूल्यांचे बाजारीकरण होईल.

    __________________________________________________

    •घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    आता झालेच निश्चित तर द्यावे.
    __________________________________________________

    •तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    बाजारीकरण, मूल्यांचा र्‍हास.
    __________________________________________________

    •घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    अजिबात नाही.
    __________________________________________________

    •तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    आठवड्यातून २ दा/३ दा
    __________________________________________________

    •घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?

    ही कामे मनापासून आवडतात. दुय्यम वाटत नाहीत.
    __________________________________________________

    •तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    घरकामातून.

    __________________________________________________

    •पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    पाहू शकते. पाहीले आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    माझी उत्तरं. जीमेलवर धाडीनच.
    ***

    तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
    घर सुरळीत चालू ठेवण्याकरता जे जे करावं लागतं - घरात असो वा घराबाहेर - ते सगळं घरकाम.

    'उत्पादक काम' म्हणजे काय?
    काम करणार्‍या माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय (इनपुटला काही दुसरा बरा शब्द आहे का?) जे काम अंतिम स्थितीला आणि दर्जाला पोचू शकणार नाही ते सगळं उत्पादक काम, मग त्यात पैशाची देवाणघेवाण असो किंवा नसो.

    कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    अवघड आहे. मला अशी काळीपांढरी यादी करता येणं कठीण आहे. एरवी अनुत्पादक, नीरस वाटतील अशी कामंही रस घेऊन, सर्जनशील पद्धतींनी पैसा/वेळ/श्रम वाचवून, दर्जा उंचावून करता येतातच. हे बहुधा करणार्‍याच्या (नि पाहणार्‍याच्याही) दृष्टिकोनावर अवलंबून असावं.

    आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    जी कामं आउटसोर्स करता येतात, ती बिनदिक्कत करावीत. त्या सगळ्या कामांचं आर्थिक मूल्य असतंच. बाजार आणि आपली निकड मिळून ते मूल्य ठरत असतं बहुधा. पण ज्या कामांचं आउटसोर्सिंग शक्य नाही, त्या कामांचं आर्थिक मूल्य किचकट गणितं काढून करता येईलही, पण ते अदा करावं असं मला वाटत नाही. असं केलं तर सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन आर्थिक पद्धतींनी करण्याचा अनिष्ट पायंडा पडेल आणि एरवी अशी कामं करणार्‍या माणसाबद्दल जी कृतज्ञता असते (किंवा असावी!) ती लोप पावेल. शिवाय घरातला(ली) सदस्य असूनही केवळ आर्थिक मूल्य फेकून कामांच्या जबाबदारीतून मोकळं होण्याची घातक सवय लागेल, असं वाटतं. (हे आता माझं मलाच जाम भाबडं आणि आदर्शवादी वाटतंय. पण तरी असंच वाटतंय.)

    आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    अजिबातच नाही. वरच्या उत्तरांत ते अंतर्भूत आहे.

    आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    काम रस घेऊन, सर्जनशील पद्धतींनी पैसा/वेळ/श्रम वाचवून, दर्जा उंचावून/राखून केलं आहे की नाही हा मुख्य निकष.

    माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    वरच्या उत्तरांत ते आलं आहे.

    घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    असं मूल्य निश्चित करता येणार नाही असं माझं मत. शिवाय तसं मूल्य देऊन मोकळं होता येऊ नये, हे मी वर लिहिलं आहेच.

    तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    वरच्या उत्तरांत ते आलं आहे.

    घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    छे, अजिबातच नाही. बराच हिशेब उरतो. पण तो पैशांत फेडणं शक्य आहे असं वाटत नाही.

    तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    संडास-बाथरूम-सिंक-बेसिन धुणे आठवड्यातून दोनदा. स्वयंपाक आठवड्यातून एखाद्या वेळा. पुस्तकांची कपाटं आणि संगणकाचा कोपरा सोडून बाकी झाडलोट जवळजवळ कधीच नाही. कधीतरी सठीसहामाशी काही धूपूस केली तर. पण असला प्रसंग लईच विरळा.

    घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    सगळ्याच कामांबद्दल नाही. निवडक ताजी भाजी आणणं हे जाम जाणकारीचं काम आहे. ते मला जमत नाही. स्वयंपाक मला आवडतो, जमतोही. पण रोज तीन वेळा मला रांधायला लागलं तर तो नावडायला लागण्याची शक्यता जास्त. घर स्वच्छ करण्याचा मला विलक्षण आळस आहे. लहान मूल तासाभराहून जास्त सांभाळायचं असेल तर मला आगाऊ सूचना + मानसिक तयारीची गरज लागते. सूचना मिळूनही एक दिवसभर मूल सांभाळल्यावर मी चिडचिड करू लागण्याच्या कडेलोटावर पोचलेली असते... ही सगळी दुय्यम असल्याचा दावा मी स्पप्नातही करणार नाही. पण पोळ्या करणे, कपड्यांना इस्त्री करणे, भाज्या निवडणे, धान्य निवडणे, केर-लादी... या कामांबद्दल मला तीव्र अनिच्छा आहे. 'कुणीही करा, मला त्यात ओढू नका' अशी भावना आहे. ती करायला इतर कुणीही नसलं, तर मी शक्यतो त्या कामांवाचून निभावण्याचा प्रयत्न करते (अनेक मार्ग असतात, फक्त (अन्)इच्छा हवी!)

    तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    लेखन-वाचन, चित्रपट-नाटक, चर्चा-वादंग, भाषा शिकणे-शिकवणे यांतून.

    पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    अर्थातच पाहू शकीन, कसलाही संदेह नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    -मेघना भुस्कुटे
    ***********
    तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

    •तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
    जगातलं प्रत्येक काम मी घरकाम मानतो. अगदी औद्योगिक वाटणारी कामं देखिल अंततः घरगुतीच असतात. Everything is retail in the end. ऑफिसचे काम घरकामाचा उपप्रकार मानतो.

    •'उत्पादक काम' म्हणजे काय?
    हा शास्त्रीय प्रश्न आहे. घर काही उत्पन्न करण्यासाठी मांडलेले नसते. तरीही -ज्या कामातून कोणत्याही उत्पादाची वा सेवेची निष्पत्ती होते त्याला उत्पादक काम म्हणावे.

    •कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    सगळेच. ज्या सेवांना, पदार्थांना बाजार आहे, त्यांना बाजारणीय (मार्केटेबल) उत्पादक कामे म्हणतात.

    •आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    सर्वच कामांचे आर्थिक मूल्य असावे. कारण सहज तुलना करण्यासाठी ते उपयोगी पडावे. अर्थात् अनंत रुपयांची कामे आपल्यासाठी फुकटात होतात याचा आनंदही व्हावा म्हणूनही कामांचे आर्थिक मूल्यमापन हवे.

    •आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    तो एक निकष आहे. इतर अनेक निकष आहेत. तो निकष याकरिता आहे कि तत्समान कामाचे इतरत्र मूल्य असू शकते.

    •आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    तो सर्वश्रेष्ठ निकष नाही. सर्वश्रेष्ठ निकष भावनिक, जैविक असतात. म्हणजे मोलकरनीने बनवलेली पोळी ५ रु.ला आणि बायकोने बनवली तर ५००० रुला. आईने बनवली तर अनमोल. स्वतः बनवली तर भाषेत नवे विशेषण घुसडावे लागेल. हे सगळं व्यक्तिनुसार आणि काळानुसार सापेक्ष!

    •माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    व्यक्तिगत मत म्हणून असे सेवाबाजार असावेत. बाजारातल्या किंमती आपल्याला किती भावाने मिळताहेत हे पाहून माणूस नम्र व्हायची शक्यता आहे. आणि ज्या लोकांची मूल्येच हिशेबी आहेत त्यांना जगायला एक वास्तव जग हवेच ना?

    •घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    अर्थार्जन, घरकामे यांचे भविष्यात कसे शेअरिंग करावे याबद्दल इच्छूकांनी अगोदरच करार करायला काही हरकत नाही. माझे मत म्हणालात तर मिळून कमवावे, मिळून खर्चावे, मिळून मालकी करावी, इ इ. जसे कंपनी नावाचा कोणी माणूस नसतो पण तिच्या नावे असेट्स असतात तसे घराच्या नावे असेट्स असावेत. बाकी सगळ्या समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. समजून घेणारे कुटुंबीय असतील तर आपण फार लकी. कारण असे लिखित, अलिखित, सांकेतिक करार पाळण्याची नितीमत्ता भारतात आहे का नाही हा वेगळा विषय ठरावा.

    •तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    कराराप्रमाणे बाजारभावाने मोबदला दिला तर असे करार करणारांना काहीच फरक पडणार नाही. पूर्वज्यानाने सगळं काही होतंय. करार किती सैल वा घट्ट करायचा, नाही करायचा हे ज्याने त्याने स्वखुशीने ठरवावे. कायद्याने असा करार करण्यास बांधील ठेऊ नये.

    •घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    गृहितक चूकिचे आहे. (आपल्याकडे एखादी अशी पावती असल्यास प्रकाशित करा.) प्रश्न गैरलागू होतो.

    •तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    स्वतःला सुचतील ती, बायकोने सांगीतलेली, मुलाला गरजेची ९०% कामे करतो.स्वयंपाक (मॅगी, चहा, इ सोडून)करत नाही. क्वचित झाडलोट करतो.

    •घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    कोणी कोणते काम करावे हे रुचिप्रमाणे ठरवतो. घरात मातृसत्ताक पद्धत असल्याने खरे तर बायकोच ठरवते. किंवा मिळून ठरवतो. दुय्यम वाटणाते कोणतेही काम करण्यास साफ नकार देतो. मुलाला/लांना सांभाळण्यासाठी जान कुर्बान. भाजी निवडताना आढळलोच तर माझा मूड इतका चांगला समजा कि काहीही मागून घेता यावे. आपल्याला हवे ते उत्तर मी टाळत आहे असे वाटले तर मी असे सांगेन - समाज 'या बाबतीत' कुठे चालला आहे त्या बाबत मला काही देणं घेणं नाही. बदलत्या समाजाचं रुप माझ्या घरात दिसावं म्हणून मी कोणताही प्रयत्न करत नाही. पण संतुलन राखून पत्नीला जाच वाटेल अशी कोणतीही गोष्ट माझ्या (तिच्या) घरात होऊ शकत नाही.

    •तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    घरचे सदस्य- मूल, पुतणे, आई, वडील, बायको, बहिण, भाउ, इ इ (त्या क्रमाने) आनंदी पाहून. त्या आनंदाचं कारण मी असून.

    •पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    तसं इतरांनी काय करावं, करू नये हे सांगणं मला अपराधीपणाचं वाटतं. पण एकतर असे महापुरुष नसतात, असले तरी त्यांना मी 'सामान्य' दृष्टीने पाहत आहे हे पटवून देणं अवघड असतं. असा वैषम्यहिन पुरुष पाहिन तेव्हा फार बरे वाटेल. अजून असं झालेलं नाही. मी नेहमीच स्वतःला पुरुष म्हणून पाहत नाही, म्हणून असं सौख्य देणार्‍या स्त्रीया समाजात नाहीत याचं जास्त वैषम्य करत नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

    माझ्या सासूबाईंनी लिहीलेला उतारा (उत्पल यांना मेलही पाठवलेली आहेच.)-

    "घरकामाच्या हा गोष्टी" हा विषय वाटतो तितका सोपा नाही. बराच गुंतागुंतीचा आहे.

    आपल्या घरात केलेले काम म्हनजे घरकाम म्हटले तर, आपन घरात एखादा व्यवसाय केल्यास, ते घरकाम होईल का? बरं जर अशी व्याख्या केली की "घरासाठी केलेले काम म्हणजे घरकाम" जर म्हटले तर "नोकरी" हेही घरकाम होईल का? असो.
    साधारणतः घरात राहून गृहीणी, जी जी कामे करते त्याला, आपण घरकाम म्हणू. त्यात स्वयंपाक करणे, घराची निगा राखणे म्हणजे साफ-सफाई, कपडे धुणे, भांडी घासणे, मुलांना सांभाळणे कमीत कमी एवढे आलेच. शिवाय भाजी, किराणासामान आणणे, घरातील वस्तू जागच्या जागी ठेवून घर नीट्-नेटके ठेवणे, मुलांच्या शाळांच्या वेळा, त्यांचे आजारपण वगैरे गोष्टी त्यातच समाविष्ट आहेत. ही सर्व कामे उत्पादक व सेवा या रकान्यात मोडत असली, तरी त्यास उत्पादक न म्हणता, किंवा सेवा न म्हणता आपल्या घरासाठीच केलेली कर्तव्ये म्हणू.

    या सर्वांसाठी काही अंशी नोकर अथवा मोलकरीण अशा घराबाहेरील माणसांनी सहभाग दिला तर तिला सेवा किंवा उत्पादकता म्हणून त्याचे मूल्य देणे गरजेचे असते हे मान्य आहे. मात्र आर्थिक मूल्यमापन करताना घरासाठी, घरातीलच माणसांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन अमूल्यच. कारण घर हे त्या घरातल्या प्रत्येकाचेच म्हणजे त्या कुटुंबाचे असते. घरातील प्रत्येक घटकाने केलेली उत्पादकता किंवा सेवा ही त्या घराची म्हणजे कुटुंबाची असते.
    भारतीय संस्कृतीत घर हे पवित्र अशा विवाहबंधनातून जोडलेले असते. कोणत्याही चार भींती एकत्र बांधून आपण त्यास घर म्हणत नाही. घरातील प्रत्येक घटक एकमेकांशी संवेदनेने , भावनेने, पावित्र्याने व स्वेछेने जोडलेला असतो असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे किंवा चूकीचे होणार नाही असे मला वाटते. त्यामुळे जे समाधान, सुरक्षितता, आपलेपण आपण एकमेकांना देऊ त्यातूनच घरकामाचे खरे मूल्यमापन होईल.कुटुंबातील अर्थार्जन करणारी व्यक्ती किंवा करणार्‍या व्यक्ती या त्या घराचे अविभाज्य घटकच आहेत. त्यांनी प्रेमादरातून आपल्या सेवेचे मूल्य दिलेले अथवा घेतलेले हे असतेच. तेव्हा वेगळे मूल्यमापन करण्याचे कारणच नाही.
    घरकाम प्रत्येकाने आपले घर म्हणून करुन, एकमेकांचे नित्याचे जीवन सुखकर करण्यातच आत्मिक समाधान मानावे असे वाटते.
    म्हणून मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, विषय कठीण असला तरी अशक्य नाही किंवा सोपा नसला तरी तितकासा अवघडही नाही.
    अन पूर्णवेळ घरकाम करणार्‍यांबद्दल म्हणाल तर खरं सांगू, पुरषासच काय स्त्रीसही मी मोकळेपणाने बघू शकत नाही कार्ण घराची धुरा सांभाळण्यास, आता दोघांचाही बरोबरीचा वाटा असल्यास बरा कारण ही प्रगतयुगाची गरज आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रतिसाद इंटरेस्टिँग आहेत.

    भावना बाजूला ठेवून किँवा त्यांच्यासाठी योग्य मल्टिप्लायिँग फेक्टर वापरुन ( बायकोने किँवा आईने केलेल्या पोळीची किँमत हजार, दहा हजार पट करायची नाही Wink ) न्युक्लिअर कुटुंबातील सर्व नात्यांमधील नवरा-बायको-पालक-मुलं आपापसातील कामांचे पैशात मोल करणे आणि कोण कोणाला किती देण लागतो हे पहाणे मला आवडेल. म्हणजे लहान मुलांची व्हॉलंटरी काम पकडली तर चांगलच आहे :-P. नाही पकडली तरी ती मुलं मोठी झाल्यावर इंफ्लेशनला बीट करणारी फ्युचर इंवेस्टमेँट असावी अशी सर्वसामान्य पालकांची अपेक्षा असते ती लक्षात घ्यावी...

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    अस्मिजी, मूल्य या संकल्पनेचा मूलाधार भावना आहे. म्हणून कोणीही काहीही गुणक लावू शकतो.

    नाही पकडली तरी ती मुलं मोठी झाल्यावर इंफ्लेशनला बीट करणारी फ्युचर इंवेस्टमेँट असावी अशी सर्वसामान्य पालकांची अपेक्षा असते ती लक्षात घ्यावी...

    मूलांवर लहानपणी प्रेम करावं, मोठेपणी स्वातंत्र्य द्यावं आणि नंतर त्यांवर ओझे बनू नये असे जवळजवळ सार्‍या पालकांना वाटत असते.

    एका माणसाच्या जीवनाच्या अख्खा हिशेब मांडायचा असेल तर 'त्याला अस्तित्वात आणण्याची किंमत' पासून सुरू करावे लागेल. एखाद्या मोठ्या माणसाने पैसे देऊन ढुंगण धूवून दे म्हटले तर आपण नकार देऊ वा बरीच किंमत आकारू. म्हणून माणसाला अक्कल येते (१०-१२ वर्षे वय)तेव्हा तेव्हाच तो न फेडता येईल इतके कर्ज घेऊन बसलेला असतो. आपल्या स्वतःच्या मुलाचे काम करून तो आपले कर्ज चुकते करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं भावनिक आहे. यात हिशेब जितका दूर ठेवाल तितका बरा.

    पण ज्यांना हिशेब केल्याशिवाय जगताच येत नाही त्यांचा एक वेगळा धर्म/संस्था स्थापून त्यांच्यासाठी एक वेगळे जग/बाजार बनवावे हे मान्य आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

    पण ज्यांना हिशेब केल्याशिवाय जगताच येत नाही त्यांचा एक वेगळा धर्म/संस्था स्थापून त्यांच्यासाठी एक वेगळे जग/बाजार बनवावे हे मान्य आहे.

    ज्यांना ज्यात्त्यात अन कायम हिशेब केल्याशिवाय जगता येत नै अशी दुरुस्ती सुचवितो. नैतर हिशेब सर्वच जण करतात. त्याशिवाय जगणे अशक्यच.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

    गब्बर गब्बर

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --मनोबा
    .
    संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
    .
    memories....often the marks people leave are scars

    आज मी घरकाम केले
    १) आंघोळ केली ( हे माझ्याबाबत घरकाम या सदरात मोडते)
    २) पाण्याचे ग्सास विसळले
    ३) हार्डवेअर चा ड्रॉवर आवरला

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    ०.तुम्हाला हि कामे करण्याने समाधान मिळाले काय?
    १.ग्लास का विसळले? ग्लास विसळणे उत्पादक काम आहे काय?
    २.हि कामे ह्याच ऑर्डरमधे केलीत काय? ऑर्डर बदलली असती तर फरक पडला असता काय?

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    ० होय
    १ आदल्या दिवशी त्यातुन थोडी घेतली होती. ग्लास विसळण्यातुन स्वच्छता उत्पन्न होते म्हणजे ते उत्पादक काम आहे
    २ याच ओर्डरमधे केली. ऑर्डर बदलली असती तर फारसा फरक पडला नसता.

    अवांतर- रोज कामे केली तर रोज मरे त्याला कोण रडे म्हणून त्याची दखल घेतली जात नाही. अशी अधूनमधून कामे केली कि ती नजरेत भरतात व त्याचे कौतुक ही होते.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    १. तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?

    या प्रकारच्या कामांना मी 'घरकाम' समजते:

    • ज्यातून ते काम करणाऱ्या व्यक्तीला अर्थार्जनाची संधी उपलब्ध नाही आणि (छंद जोपासताना मिळतो तसा) फारसा आनंदही होत नाही.
    • असं कोणतंही काम जे करणं जगण्याची प्रत सांभाळण्यासाठी आवश्यक असतं. (साफसफाई, चांगलं, आरोग्यदायी अन्न/जेवण, इ.)
    • ज्या कामात तोच-तोचपणा असतो. त्यातून नवीन काही शिकायला मिळण्याची शक्यता कमी असते. (उदा: 'घ' ठिकाणापासून 'का' ठिकाणापर्यंत जाण्यासाठी करावे लागणारे कष्ट हे सुद्धा घरकाम याच प्रकारात मोडू शकतात. अगदी घराच्या आतलं काम नसलं तरीही.)

    एकच काम एका व्यक्तीसाठी घरकाम असेल; दुसऱ्या व्यक्तीसाठी नसेल. ("मोडक्या" गुणसूत्रांमुळे लादला गेलेला रोजचा व्यायाम घरकामात मोजावा का नाही याबद्दल शंका उत्पन्न होते आहे. Wink )

    २. 'उत्पादक काम' म्हणजे काय?
    अर्थाजन करून देणारं आणि/किंवा आनंददायक काम हे 'उत्पादक' काम. तसंच काही नवीन शिकण्यासाठी केलेलं काम 'उत्पादक' समजते.

    ३. कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    माझ्या व्याख्येनुसार कोणतंही घरकाम उत्पादक असत नाही.

    ४. आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    द्यायचे का घ्यायचे यावर अवलंबून आहे. Wink
    कोणत्याही कामाचं आर्थिक मूल्य किंवा कामासाठी अर्थार्जनाच्या संधी असाव्यात. ज्यांच्याकडे मोबदला देण्याची पत आहे त्यांना हे काम टाळून अधिक उत्पादक काम करता येईल; ज्यांच्याकडे इतर काही कौशल्य, शिक्षण, संधी नाहीत त्यांना या संधींचा फायदा घेता येईल. यात दोन्ही बाजूंचा फायदाच आहे.

    ५. आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    नाही. ज्यातून काही अर्थार्जन होत नाही, होण्याची शक्यताही नाही असं कामही श्रेष्ठ असू शकतं. एकच एक किंवा ठराविक प्रकारचंच काम श्रेष्ठ, हे ही पटत नाही. (दा विंचीच्या आयुष्यात त्याचं एकही चित्रं विकलं गेलं नाही. किंवा प्रसिद्ध गणितज्ञ Emmy Noether हिला इतर अनेकांपेक्षा खूप जास्त कुवत असूनही कामाचा योग्य मोबदला खूप उशीरा मिळायला लागला.)

    ६. आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    काम करणाऱ्या व्यक्तीला त्यातून मिळालेला आनंद, मिळणारं शिक्षण, स्वतः आणि/किंवा जगाकडे बघण्याचा व्यापक, ताजा दृष्टीकोन अशा अनेक, मोजता न येणाऱ्या गोष्टींचा निकषांमधे समावेश करता येईल.

    ७. माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    घरकामाचं रूपांतर उत्पादक कामात व्हायला सुरूवात झालेली आहेच. दिवाळीचा फराळ, एकूणच खाण्याच्या पदार्थांची वाढती बाजारपेठ, घरी कामाला येणाऱ्या स्वयंपाकी, गाडी चालवणारे, पाळणाघरं, यांमधून याची सुरूवात, मध्यमवर्गात काही दशकांपूर्वीच झाली आहे. राजे-रजवाडे किंवा अतिश्रीमंत लोकांकडे हे फारच आधीपासून आहे.

    घरातल्या व्यक्तीलाच याचे पैसे द्यायचे असल्यास त्याला विरोध नाही. पण ही गणितं करताना किती काटेकोरपणा आणणार किंवा यातली व्यवहार्यता किती असेल याबद्दल साशंक आहे. व्यवहारात, मोबदला घेऊन काम करायचं म्हटल्यावर कामाचे तास, सुटीचे दिवस अशाही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. त्यापेक्षा वस्तुविनीमय किंवा श्रमविनीमय पद्धती अधिक व्यवहार्य वाटते. पण आत्ताच्या स्थितीतून समानतेच्या स्थितीला जाण्यासाठी कदाचित आर्थिक मोबदल्याची पायरी उपयुक्त ठरू शकेल.

    ८. घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    होय. (खरंतर प्रश्न समजला नाही. मूल्य द्यायचं झालं तर अर्थार्जन न करणाऱ्या व्यक्ती कसं काय जमवणार?)

    ९. तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?
    असं करण्याचे परिणाम आत्तापर्यंत तरी सकारात्मक झालेले दिसत आहेत. ते अधिक वाढतील. प्र. ४ मधे याबद्दल लिहीलेलं आहेच. मुळात ज्यांना जे काम आवडत नाही, पण करण्याची सक्ती काही प्रमाणात टाळता येऊ शकते, त्यांना ते काम टाळता येईल. रोजगारनिर्मितीही होईल.

    दुसऱ्या बाजूने याचे काही नकारात्मक परिणाम दिसत आहेत. उदा: बाहेरचं, निकृष्ट किंवा कमी पोषणमूल्यं (पोषणमूल्य म्हणजे कॅलरीज वगळता इतर महत्त्वाचे अन्नघटक) असणारे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं आहे. मधुमेहाच्या (टाईप २) रुग्णांची भारतातली वाढती संख्या, पाश्चात्य देशात दिसणारं लठ्ठपणाचं वाढतं प्रमाण यातून आपण वेळेतच शिकण्यासारख्या गोष्टीही आहेत.

    घरच्या व्यक्तींना मोबदला दिल्यास, त्यामुळे या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढू शकतो. सध्या हा वर्ग प्रामुख्याने विविध वयांच्या स्त्रियांचा आहे. बाहेरच्या समाजात मिसळ्यासाठी भीती वाटणं, आर्थिक व्यवहार न समजणं असे अडथळे त्यातून काही प्रमाणात दूर होतील. नकारात्मक बाजू अशी की घरकाम करण्यालाच आयुष्याची इतिकर्तव्यता मानून, आपली कुवत नाकारण्याचेही प्रकार वाढू शकतात. 'After the second sex' मधे याच प्रश्नाबद्दल Simone de Beauvoir म्हणते, "I'm completely and utterly opposed to that! Of course! In the short term, maybe housewives who have no alternative would be glad of a wage. That is understandable. But in the long term, it would encourage women to believe that being a housewife was a job and an acceptable way of life. But being banished to the ghetto of domesteicity and the division of labour along male/female, private/public lines is precisely what women should be rejecting if they want to realise their full value as human beings. So I am against wages for housework." आर्थिक स्वातंत्र्य, स्वतंत्र बुद्धीने वर्तन इ. सगळं बाजूला सोडलं तरीही अनेक हुशार आणि कर्तबगार व्यक्तींचा समाजाला फायदा होणार नाही अशी भीती वाटते.

    या दोन्ही बाजूंपैकी कमी तोट्याची बाजू कोणती, हे प्रत्यक्ष प्रयोग/पुराव्यांअभावी ठरवता येत नाही.

    १०. घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    घरकाम करणारी व्यक्तीला जर घरकामाचा मोबदला म्हणून अनेक सोयी, सुविधा आणि वस्तू मिळत असतील तर त्या व्यक्तीला घरातलीच एक समजावं का? घरातल्या, नात्यातल्या आणि नात्याबाहेरच्या अनेक व्यक्तींशी माणसांचे स्नेहबंध जुळलेले असतात. असे व्यवहार स्नेहबंध आणि/किंवा सवय यामुळे होतात. व्यक्तीची अनेकांशी फक्त वैचारिक देवाणघेवाण होत असेल तरीही स्नेहबंध निर्माण होतात. हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे घरकामासाठी, घरात राहणाऱ्या व्यक्तींनाच मोबदला मिळायला सुरूवात झाली तरीही हा हिशोब तिथेच संपेल असं अजिबात वाटत नाही.

    मात्र ज्यांच्याशी नाईलाजास्तव जुळवून घ्यायला लागतं, ती गरज कालांतराने कमी होईल आणि याला समाजमान्यताही मिळेल, असं वाटतं.

    ११. तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    स्वयंपाक दिवसातून सरासरी दीड वेळा करते. झाडलोट आठवड्यातून एकदा. (हे अमेरिकेत, बंद घरात, एसीत राहते त्यामुळे.) स्वतःचं डेस्क, ओटा साफ करणे इ सफाई आवश्यकता दिसेल तेव्हा लगेच. याशिवाय वॉशिंग मशीनमधे कपडे धुवायला टाकणे, धुतलेले कपडे वाळवायला टाकणे, भांडी आवरणे आणि काही आर्थिक व्यवहारांची जबाबदारी माझ्यावर आहे.

    १२. घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    ही सगळी न आवडणारी कामं मला दु्य्यम वाटतात. ती करताना डोक्यात काही विचार सुरू असेल, संगीत/अन्य ध्वनीमुद्रण ऐकत असेन, फोनवर/प्रत्यक्षात कोणाशी बोलत असेन तर वेळ वाया गेला असं वाटत नाही.

    १३. तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    काहीतरी नवीन शिकल्यावर.

    १४. पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    Conditionally yes. अर्थार्जन न करणाऱ्या व्यक्तीकडे (पुरुष, स्त्री कोणीही) त्यासाठी पुरेशी कारणं असतील (वय, अपंगत्त्व, योग्य नोकरीची अनुपलब्धता, इतर बदलता न येण्यासारख्या काही गोष्टी, इ.) आणि/किंवा ही व्यक्ती, कुवतीनुसार उत्पादक काम (प्र. क्र. २ चे उत्तर पहावे.) करत असेल तर या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यच असतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    ---

    सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

    (विशिष्ट प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करताना मला डोक्यात आणखीन प्रश्न निर्माण झाले. कारण घरकाम या शब्दाची व्याख्या म्हणावी तितकी सोपी नाही. मग लक्षात आलं की मला जे म्हणायचं आहे ते संकीर्णपणे मांडलं तर यातल्या बहुतेक प्रश्नांना उत्तरं दिली जातील.)

    मी नवरा-बायको हे उत्पादन एकक आहे असे मानतो. कुटुंब म्हणजे दोघांनी स्थापन केलेली कंपनी म्हणा. कुठच्याही कंपनीचा उद्देश हा अधिकतम नफा मिळवणं हा असतो. त्यासाठी वेगवेगळी कार्य करणारी युनिट्स असतात. हे चित्र डोळ्यासमोर ठेवून माझी मांडणी आहे. मात्र या चित्रात एक महत्त्वाचा बदल आपण सुरूवातीलाच करायला हवा. सर्वसाधारण कंपन्यांसाठी नफा म्हणजे बहुतांशी भागीदारांना मिळणारे पैसे. कुटुंबाच्या बाबतीत मात्र या नफ्याची व्याख्या अधिक व्यापक करावी लागते. त्यात कुटुंबाला मिळणारा पैसा, आनंद, भविष्याची सोय या सर्वच बाबींचा अंतर्भाव होतो. एकदा आनंद हा पैशाप्रमाणेच एकदा बॉटम लाइनचा भाग झाला की अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. सर्वसाधारणपणे ज्याला 'घरकाम' म्हटलं जातं त्याची किंमत कशी करावी हा क्लिष्ट प्रश्न सोडवण्याचा मग प्रयत्न करता येतो.

    संसारासाठी आनंद म्हणजे काय याची व्याख्या करायची झाली तर अन्न, वस्त्र, निवारा, सहवास, स्थैर्य, मुलांची संगोपन, त्यांच्यावर संस्कार, शिक्षण, स्वतःची मानसिक उन्नती इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. मास्लोच्या पिरॅमिडमध्ये असलेल्या नुसत्या पायाभूत गरजाच नव्हे तर वरच्या पातळींवरच्या गरजाही मोजाव्या लागतात. त्यामुळे मी जेव्हा नवरा-बायको हे उत्पादन एकक आहे असं म्हणतो तेव्हा या सर्व गरजा वेगवेगळ्या प्रमाणात भागवण्यासाठी केलेली भागीदारी माझ्या डोळ्यासमोर येते.

    अगदी सोपं उदाहरण आपण अन्नाचं बघू. स्वतः पिकवून किंवा शिकार करून खायचे दिवस केव्हाच गेले. आता कच्चा माल बाजारातून घेतला जातो, आणि पक्का माल घरी तयार केला जातो. प्रश्न असा आहे की ही केवळ यांत्रिक सोपस्काराची प्रक्रिया आहे का? म्हणजे नॅनो तयार करायचा कारखाना सिग्नूरला आहे की गुजरातेत आहे याने टाटा कंपनीसाठी जवळपास काहीही फरक पडत नाही. बाहेर पडणाऱ्या नॅनो या तशाच असणार. फरक पडतो तो फक्त राज्य सरकारने दिलेल्या सुविधा आणि कारखान्यापासून वितरण व्यवस्थेपर्यंत गाड्या पोचवण्याच्या खर्चाबाबत. घरच्या अन्नाबाबत हे तितकं सोपं नाही. घरगुती अन्नाची चव व तिची आवड ही संस्कारातून घडलेली असते. त्यामुळे बहुतेक घरांत 'उद्यापासून घरचं उत्पादन थांबवून क्षयझ उत्पादकाकडे आउटसोर्स करायचं' हे शक्य नसतं. अर्थशास्त्रीय परिभाषेत बोलायचं झालं तर बदलाची लवचिकता (इलॅस्टिसिटी ऑफ सब्स्टिट्यूशन) कमी असते. (ही वाढवण्याचे प्रयत्न दिसतात. आणि अशा प्रयत्नांकडे पारंपारिक समाज किंवा गेली पिढी काहीशा कमीपणाने बघते) जेव्हा कुठच्याही उत्पादनाला ही लवचिकता कमी असते तेव्हा सर्वसामान्यपणे उत्पादक जास्त किंमत ग्राहकांकडून मिळवू शकतात. किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर घरी तयार केलेल्या अन्नाचं मूल्य हे वरवर दिसतं त्यापेक्षा अधिक असतं.

    कुटुंब या कंपनीचे इतरही असे अनेक पैलू आहेत जे प्रत्यक्ष उत्पादन म्हणून मोजले जात नाहीत पण आनंद वाढण्यात हातभार लावतात. एखादा सण साजरा करणं किंवा मित्रमैत्रिणींना घरी बोलवून पार्टी करणं हा जवळपास सर्वच कुटुंबांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. यातून मिळणारा आनंद साधण्यासाठी दोघेही वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावतात. श्रम, पैसा, वेळ खर्च करतात. त्यातून जो आनंद उत्पन्न होतो तोही मी या कंपनीच्या बॉटमलाइनमध्ये मोजतो.

    मग घरकाम आणि बाहेरकाम असे फरक कसे करायचे? मला हा प्रश्न थोडा तोकडा वाटतो. इतिहासाचं ओझं घेऊन आलेला वाटतो. पूर्वी कपडे धुणे, भांडी घासणे, अन्न तयार करणे, मुलांना खायला देणे, त्यांची शी-शू काढणे असे घरातल्या चार भिंतींच्या आत घडणारी कामं असायची आणि ती करण्याची जबाबदारी पूर्णपणे स्त्रीवर असायची. पुरुष घराच्या बाहेर कामाच्या जागी जाऊन बाह्य उत्पादन करून ते उत्पादन अगर ते करण्याचे श्रम विकायचा. अजूनही घराच्या चार भिंतींत अशी कामं होतात, नाही असं नाही. अजूनही घराबाहेर जाऊन उत्पादन/श्रम विकण्याची पद्धत आहेच. पण ही समीकरणं तितकी सोपी राहिलेली नाहीत. उदाहरणार्थ - एके काळी पापड घरच्या घरीच केले जायचे. म्हणजे बाजारातून आणलेल्या पिठावर प्रक्रिया करून त्याचं पापडात रूपांतर करण्याचं काम हे घरकामात मोडायचं. आता पापड विकत आणता येतात. म्हणजे जे घरकामात मोडलं जायचं ते श्रम/उत्पादन विकून मिळवता येतं. जेवणात काहीतरी कुरकुरीत, चवदार खाण्याचा आनंद मिळतो, तो मिळवण्याचा मार्ग घरातून येत असे तो बदलून बाहेरच्या बाहेरच यायला लागला. मग घरकाम या शब्दाला नक्की काय अर्थ राहतो?

    घरकाम-बाहेरचं काम असा भेद करण्याआधी आपण काम किंवा कष्ट म्हणजे काय हा मूलभूत प्रश्न विचारायला हवा. कुटुंबाला आनंद मिळण्यासाठी आदर्श कुटुंबातले दोघेही भागीदारीत आपापले कष्ट, कौशल्य विकते किंवा आंतर्गतरीत्या वापरतात आणि अधिकाधिक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा कौशल्य+कष्ट यांचं रूपांतर आनंदात करण्यासाठी भागीदारी म्हणजे कुटुंब. आणि हा आनंद जास्तीतजास्त व्हावा म्हणून जबाबदाऱ्यांची केलेली वाटणी या दृष्टिकोनातून बघायला हवं. जितक्या प्रमाणात समाजात लवचिकता अधिक तितक्या प्रमाणात या जबाबदाऱ्याची विभागणीही लवचिक होऊ शकते.

    गेल्या शतकाभरात ही लवचिकता प्रचंड वाढलेली आहे. शतकाभरापूर्वी स्त्रीचं जाणतेपणाचं आयुष्य तीस वर्षांचं होतं, आणि त्यात सात बाळंतपणं होतं. यात जाणारा काळ, इतक्या मुलांचं संगोपन करण्यात लागणारे कष्ट आणि वेळ यामुळे स्त्री घरीच असणं साहजिक होतं. घरच्या चार भिंतीत कराव्या लागणाऱ्या कामांचा धबडगाही प्रचंड होता. ती सोपी करण्यासाठी आज अस्तित्वात असलेली यंत्रसामुग्री नव्हती. तेव्हा इतकी वर्षं स्त्री घरीच असणार, तेव्हा घरातली कामंही तिनेच करावीत यात एक प्रकारची एफिशियन्सी होती. आनंद जास्तीतजास्त व्हावा म्हणून जबाबदाऱ्यांची केलेली वाटणी या व्यवस्थेत स्त्रीवर घरकामाची जबाबदारी पडणारी ठरणार आणि पुरुषाला घराबाहेर श्रम/उत्पादन विकावं लागणार याशिवाय वेगळी असणं फारच कठीण होतं. आता परिस्थिती बदलली आहे. आता स्त्रीचं जाणतं आयुष्य दीडपट ते दुप्पट झालेलं आहे. फर्टिलिटी रेट दोनच्या जवळ आलेला आहे. घरातली कामं यंत्रसामुग्रीमुळे सुकर झालेली आहेत. आणि बाहेरच्या कामांतही शक्तीपेक्षा शिक्षणावर भर आलेला आहे. या सर्व बदलांमुळे स्त्री व पुरुष हे बहुतेक ठिकाणी एकमेकांची कामं करू शकतात. त्यामुळे आनंद जास्तीतजास्त व्हावा म्हणून जबाबदाऱ्यांची केलेली वाटणी ही आता अधिक लवचिक झालेली आहे. अशा परिस्थितीत घरकाम आणि बाहेरचं काम ही विभागणी टाकून देऊन कुठची कामं करायची आहेत, आणि त्यांची विभागणी कशी करावी याचा पुन्हा मूलभूत पातळीवर, पहिल्यापासून (फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल) विचार करावा हे अधिक इष्ट.

    वर म्हटल्याप्रमाणे घरकाम-बाहेरकाम या द्वंद्वाला स्त्री-पुरुष असमानतेच्या छटा आहेत त्यामुळे 'घरकामाचं मूल्य कमावत्या व्यक्तीने द्यावं का?' या प्रश्नाचं उत्तर देणं थोडं जिकिरीचं ठरतं. 'पुरुष बाहेर जाऊन कमावणार, स्त्री घरचं काम करणार. मात्र पैशाचे सगळे अधिकार पुरुषाकडेच. घर चालवण्याचा मान पुरुषालाच. बाहेरचं काम पैशाच्या रूपात दिसतं, घरकाम दिसत नाही. तेव्हा स्त्रियांच्या कामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी त्यांना कामाचे पैसे पुरुषाने दिले पाहिजेत' हा विचार या मागे दिसतो. मात्र यात थोडी अडचण आहे. नवरा कमावणार, आणि बायकोला तो तिच्या कामाचे पैसे देणार गोंधळाचं चित्र आहे. कारण मग ती पुन्हा नवऱ्याला घरभाड्याचे पैसे देणार का? किंवा किराणामालाचं निम्मं बिल उचलणार का? घरच्या कामाचं मूल्य मिळवण्यासाठी नक्की कुठचा मार्ग अनुसरायचा?

    इथे पुन्हा मला एखाद्या कंपनीचा विचार डोक्यात येतो. एखाद्या कंपनीत प्रशिक्षण डिपार्टमेंट असतं. इतर डिपार्टमेंट्सना कंपनीची उत्पादनं आणि पद्धती यांचं प्रशिक्षण पुरवण्याची जबाबदारी त्यांची असते. तुम्ही प्रशिक्षण पुरवा, त्यासाठी होईल तो खर्च कंपनी देईल असा सरळसोट व्यवहार नसतो. तर प्रशिक्षण डिपार्टमेंट आपल्या सेवा इतर डिपार्टमेंटना पुरवते, आणि जिथे जिथे प्रशिक्षण दिलं त्या डिपार्टमेंटकडून पैसे घेते. त्या त्या डिपार्टमेंटांना प्रशिक्षणासाठी बजेट दिलेलं असतं. म्हणजे एका अर्थाने कंपनीच्याच या खिशातून त्या खिशात पैसे जातात. मात्र त्याचवेळी प्रत्येक डिपार्टमेंटला आपापल्या लोकांना प्रशिक्षण कसं द्यावं याची मोकळीक देते. काही कोर्सेस हे असे असतात जे बाहेरून घेणं शक्य नसतं. उदाहरणार्थ कंपनीच्याच उत्पादनांची माहिती - ही बहुतेक वेळा आंतर्गतच असते. मात्र 'एक्सेल कसं वापरावं' याचं प्रशिक्षण जर बाहेरून अधिक चांगलं मिळणार असेल तर ते त्यांनी तिथून घ्यावं. म्हणजे प्रशिक्षण विभागाने काय करावं, आपली शक्ती कशी वापरावी हे थोड्या प्रमाणावर आंतर्गत आणि बाह्य बाजारभावाने ठरतं. आणि प्रशिक्षणासाठी होणारा खर्च कंपनीच्या प्रशिक्षणाच्या गरजेशी मिळताजुळता होतो.

    कुटुंबाच्या कंपनीत भागीदार, सीइओ, मॅनेजर आणि कामगार ही कामं दोघांचीच असल्यामुळे विभागणी गोंधळाची होते. ते टाळण्यासाठी दोघांनी मिळून आपलं बजेट ठरवावं. म्हणजे मुलांच्या संगोपनासाठी बजेट किती, कपडे धुणं भांडी घासणं यासाठी बजेट किती, हे ठरवावं. हे ठरवताना त्या गोष्टीचं मूल्य किती किंवा महत्त्व किती आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजायला तयार आहोत हे ठरवावं. दोघांच्याही वेगवेगळी कामं करण्याच्या क्षमता काय आहेत हे लक्षात घ्यावं. आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सची शक्य तितकी न्याय्य वाटणी करावी. ज्याच्या हातात जे डिपार्टमेंट असेल त्याला आपलं बजेट जास्तीत जास्त चांगलं वापरण्याची मुभा आहे, ज्याच्यावर त्या सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे त्याने बिल करावं. उदाहरणार्थ, कपडे धुणे ही गरज दोघांचीही आहे. त्यासाठी लागणारं बजेट दोघांनाही योग्य त्या प्रमाणात मिळावं. ती सेवा पुरवण्याचं काम समजा पत्नीने अंगावर घेतलं. आता त्या बजेटमध्ये ती स्वतःचा वेळ खर्च करून हाताने कपडे धुवेल, कपडे धुवायला मोलकरीण ठेवेल किंवा वॉशर घेऊन धुवेल. तिने नवऱ्याला त्याच्या कपड्यांसाठी केलेलं बिल जर अतिरेकी असेल तर नवरा म्हणेल की मी लॉंड्रीतून धुवून आणतो. आणि मग तिला मिळणारे पैसे कमी होतील.

    हे चित्र पूर्ण अचूक रंगवण्यासाठी लागेल तितकी कंपनी फायनान्सबद्दल मला माहिती नाही. मात्र अशी व्यवस्था करता येईल अशी खात्री वाटते. या कंपनीतून दोघांना मिळणारे पैसे सारखे असतील का? बहुधा नाही. पण ते असावेच हा हट्ट योग्य नाही. दोघांच्या कष्ट+कौशल्य यांना न्याय्य प्रमाणात विभागणी होणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि याहीपलिकडे घरकाम-बाहेरकाम ही विभागणी टाळून कुटुंब या कंपनीला गरजेप्रमाणे आणि आपापल्या क्षमतेप्रमाणे कामाचं वाटप केल्यास स्त्री-पुरुष भेदभाव कमीतकमी होण्यास हातभार लागेल. 'स्त्रीमुक्ती' किंवा 'पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व कमी करणं' या चष्म्यांमधून या प्रश्नाकडे न बघता 'आपलं कुटुंब म्हणजे आपल्या विविक्षित गरजा भागवण्यासाठी एक उत्पादक युनिट आहे, ते सर्वोत्तम कसं चालेल हे पाहू' अशा दृष्टिकोनातून पाहणं ही खरी समानता ठरेल.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे. तसा सापेक्ष आहे. त्यामुळे मी माझे मत दिले तरी ते समतोल असेलच असे नाही. पण ते माझ्या अनुभवांवर आधारित आणि माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार असेल.

    *तुम्ही 'घरकाम' कशाकशाला म्हणता?
    घर आणि त्या घरातील व्य्क्तीं सुस्थितीत ( Smile ) रहावित या साठी करायला लागणारे कुठलेही काम. मग ते भांडी घासणे असेल, किंवा एलआयसी चा प्रिमीयम भरणे असेल.

    *'उत्पादक काम' म्हणजे काय?
    ज्या कामातून काही टॅन्जीबल किंवा इनटॅन्जीबल रिटर्न्स (परतावा?) मिळतात. पण घरकामाच्याबाबतीत बहूतेक वेळा हा परतावा इन्टॅन्जीबल स्वरूपात असतो. उदा. आनंद, समाधान, स्थैर्य, सुरक्षा इ. ज्याचे मोजमाप अचूक आकड्यांमधे सांगता येत नाही. पण त्यचेही महत्व असतेच.
    *कुठले घरकाम हे उत्पादक कामात मोडते? कुठले मोडत नाही? का?
    मला वाटते सर्वच उत्पादक या गटात मोडते. कारण घरासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो ते सर्व काम त्या त्या परिने महत्वाचे आणि घरासाठी जरूरीचे असते.

    *आर्थिक मूल्य कोणकोणत्या कामांचे असावे? का?
    तसा सुक्ष्मपणे विचार केला तर सर्वच कामांचे आर्थिक मूल्य ठरवता येईल पण ते तितकेसे अचूक नसेल. आणि प्रत्येक घरासाठी ते वेगवेगळे असेल. अशा कामांचे मूल्य ठरवावे की नाही हा ज्याचात्याचा प्रश्नं आहे. पण मी स्वतः असे करणार नाही.

    *आर्थिक मूल्य हाच कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष आहे का? असल्यास का?
    हा सुद्धा व्य्क्तीसापेक्ष प्रश्न आहे. कारण कुणाला काम आणि ते काम करण्यातून मिळणारे समाधान महत्वाचे वाटते, तर कुणाला त्या काम करण्यातून मिळणारा आर्थिक फायदा तसेच सामाजिक महत्वं इत्यादी महत्वाचे वाटते.
    माझ्या दॄष्टीने आर्थिक मूल्यं हाच श्रेष्ठत्वाचा निकष नाही.

    *आर्थिक निकष सर्वश्रेष्ठ नसल्यास कामाच्या श्रेष्ठत्वाचे निकष कोणते?
    योग्यंवेळ ..
    योग्यं कारण ..
    कुणी कुणासाठी केले आहे?
    कसे केले आहे?

    *माणसाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी वस्तू उत्पादन व सेवांचा पुरवठा आवश्यक आहे आणि त्याचा मोबदला म्हणून पैसे देणं आज तरी अपरिहार्य आहे. वस्तू/सेवांचं मूल्य आज बाजार ठरवतो. घरकाम हे उत्पादक काम असेल तर त्याचे मूल्य बाजारभावाने ठरवावे का? ठरवू नये असे वाटत असेल तर त्याचे कारण काय?
    घरकामाचे मूल्य निश्चित झाले तर ते मूल्य कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने द्यावे का?
    तसे केल्यास त्याचे सकारात्मक/नकारात्मक परिणाम काय होतील असं वाटतं?

    अर्थार्जन करणे हे अतिशय महत्वाचे आहे.त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास मिळू शकतो. आणि घरकामाचे मूल्यं आपण ठरवू शकतोच. पण ते कसे करायचे हा मोठा प्रश्नं आहे.
    मी ज्या देशात राहते तिथे घरकामासाठी दर ताशी मूल्य घेऊन काम करणार्‍या मेडस आहेत, आणि २४ तास तुमच्या घरी राहून सगळी कामे करणार्‍या मेडस असतात. तासावर काम करणार्‍या कुठली कामे करायची हे आधी ठरवून घेतात. आणि तितकीच करतात. समजा मी एक मेड ३ तासासाठी हायर केली आणी तिचे कामे २ तासातच संपले तरी ती ३ तासाचे पैसे घेते. तसेच २४ तास घरी असणार्‍या मेडस साठी अनेक कायदे-नियम आहेत. जसे मेडिकल इश्युरन्स, त्यांच्या एजन्सिची फी, गव्हर्मेंट टॅक्सेस, मेडचे रहाणे, जेवण, पगार त्यांच्या सुट्ट्या इ. अनेक तसेच इतके करून मिळणारी मेड किती विश्वासु असेल? ती माझ्या घराचा, फोनचा गैरवापर तर नाही करणार? माझ्या मुलांशी नीट वागेल का? इ. अनेक चिंता. ही सगळी गणिते जुळविण्यापेक्षा नोकरी न करणे इष्टं असेच वाटते. आता परत हे वाटणे व्यक्तीसापेक्ष आहे, कारण हे सगळे सांभाळून यशस्वीपणे नोकरी करणार्‍या देखिल अनेकजणी आहेतच.
    भारतात हे पैशांच्या दृष्टीने स्वस्तात मिळाले तरी कामाचा दर्जा, विशवासुपणा इ. अनेक बाबतीत तडजोड करावी लागतेच. हे सर्व निकष लावून जर गृहीणीला तिच्या कामाचे मूल्यं द्यायचे ठरवले तर ते कुणासाठीच फायदेशीर ठरणार नाही. आणि घराचे स्वास्थ्यं मात्रं हरवेल. त्यामुळे तसे न करणे इष्टं
    (आणि अवांतरः माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काही करणे मला माझा हक्क वाटायचा. तेव्हा अर्थात आर्थिक मूल्यं वगैरे काही विचार नव्हताच. आणि आता मी गृहीणी आहे, आई आहे तेव्हा मला त्यांच्या करण्याचे मूल्यं कळते आहे. किंबहूना ते अनमोल आहे असेच वाटते आहे.)

    *घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्या कामाच्या मोबदल्यात घर, सुरक्षितता, अन्न-वस्त्रादि गोष्टी मिळतात. त्यामुळे घरकाम व त्याचा मोबदला हा हिशेब तिथेच संपतो असं वाटतं का?
    अर्थातच नाही. पगारी नोकरांपेक्षा गृहीणीची घरातली गुंतवणूक नक्कीच जास्तं असते. तसेच पगारी नोकरांना एकावेळी एकापेक्षा जास्तं घरात काम करण्याची मुभा असते. मग घरकामाचे मूल्यमापन करताना अशा अर्थार्जनाची गमावलेली संधीचे मूल्यं देखिल गृहीत धरणार का?

    *तुम्ही घरातली कोणती कामे करता? स्वयंपाक किती वेळा करता? झाडलोट किती वेळा करता?
    सगळी कामे रोजच किंवा जेव्हा जशी गरज असेल तेव्हा करावीच लागतात. (अनेक वेळा बिघडलेल्या प्रकृतीचे कारण देखिल सांगता येत नाही.. कारण मी आजारी असले की माझं सगळं घरच आजारी होतं Lol

    *घरातली कामे करताना (उदा. भाजी आणणे, निवडणे, स्वयंपाक करणे, किराणा सामान आणणे, घर स्वच्छ करणे, मुलांना सांभाळणे इ. व अशी इतर कामे) आपण दुय्यम काम करत आहोत असं वाटतं का? असल्यास/नसल्यास का?
    दुय्यम काम करते आहे असे वाटत नाही, कारण समजून-उमजून मनापासून मी ही सगळी कामं स्विकारलेली आहेत. आणि ती मी दुसर्‍या कुणासाठी नाही तर मला कराविशी वाटतात म्हणून करते त्यामुळे त्यातून आनंदच मिळतो.

    *तुम्हाला सर्वाधिक आत्मिक समाधान कशातून मिळतं?
    तसं सांगणं कठीण आहे. पण मिळतं एव्हढं निश्चित.

    *पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या (नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या) पुरूषाला नवरा, वडील, मुलगा, जावई, भाऊ इ. भूमिकात तुम्ही मनमोकळेपणाने बघू शकता का? नसल्यास का नाही?
    शक्यतो नाही. म्हणजे घरकाम कमीप्रतिचे आहे असे वाटते म्हणून नाही.. पण निसर्गतः संगोपन, संवर्धन, पालन ही स्त्रीची कामे आहेत आणि तीच ती जास्तं चांगल्या पद्धतीने करू शकते (असे मला वाटते). नियमाला अपवाद असतात, पण ते नियम सिद्ध करण्यापुरता. याचं उदाहरण म्हणजे नोकरी करणारी स्त्री निवृत्त झाली तरी तिला आता काय करायचे हा प्रश्नं सहसा पडत नाही. पण निवृत्तीनंतर अनेक पुरूषांना रिकाम्या वेळेचे काय करायचे हा प्रश्नं पडताना दिसतो. (हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहे ).

    शेवटी इतकच सांगावेसे वाटते, ज्याचे घर, कुटुंब आनंदी समाधानी असते त्या व्यक्ती समाजात सकारात्मक पद्धतीने वावरू शकतात. आणि अशा व्यक्तींनी बनलेला समाज कठीण परिस्थित देखिल स्थिर राहून नेत्रदीपक प्रगती करू शकतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    *********
    केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
    गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

    मला ही प्रश्नावली काहीशी जुनाट वाटली. त्याची मुख्य कारणं काहीशी अशी आहेत -

    'गृहिणी घरकाम करते आणि तिच्या ह्या कामाची घरात (म्हणजे कुटुंबातल्या इतर सदस्यांकडून) पुरेशी कदर केली जात नाही' असं गृहीतक ह्यामागे आहे असं वाटतंय. निम्न आर्थिक/सामाजिक घरांत हे आजही खरं असेल, पण असे किती लोक अशी प्रश्नावली भरून हे जाहीर कबूल करतील ह्याविषयी मला शंका आहे. मी किंवा 'ऐसी'वरचे अनेक सदस्य ज्या मध्यमवर्गात वावरतात तिथे हे आज कितपत खरं आहे ह्याविषयी मला शंका आहे. कारण ह्या वर्गात एकीकडे स्त्रिया कमावत्या आहेत आणि घराबाहेरची कामं तसंच अर्थार्जनाची जबाबदारी आपण उचलत असल्यामुळे त्या जोडीदाराकडून घरात मदतीची अपेक्षा ठेवतात. माझ्या परिसरातल्या सर्व कुटुंबांत आपापल्या मगदुराप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि बहुतांश समजूतदारीनं घरातली कामं वाटून घेतलेली असतात. उदाहरणार्थ, जोडीदारापैकी एकाला स्वयंपाकात रस नसेल तर आयतं जेवण मागवून किंवा बाहेर जेवायला जाऊन घरातल्या स्वयंपाककर्त्यावरचा बोजा कमी केला जातो. स्वयंपाकाला किंवा इतर कामांना नोकर ठेवले जातात. त्यामुळेही घरकामाचा बोजा कमी होतो. महत्त्वाचं म्हणजे कामाचे तास अनियमित असल्यामुळे बहुतेक जोडपी घरातल्या कामांच्या बाबतीत तडजोडी करतात. तान्ह्या मुलाचा सांभाळ करायला नकार देणारा पुरुष माझ्या ओळखीत नाही. ह्याउलट आर्थिक मंदीमुळे नोकरी गेलेले पुरुष मला माहीत आहेत. बायको अर्थार्जन करते आणि नवरा घर सांभाळतो अशी परिस्थितीही त्यामुळे निर्माण झालेली मी पाहिली आहे.

    आणखी एक गोष्ट : आत्मिक समाधानाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. माझ्या ओळखीत ज्यांना घरकामापैकी कशाची तरी (उदाहरणार्थ : स्वयंपाक) आवड आहे असे लोकही रोज किंवा नित्यनेमानं ते काम करायला कंटाळतात. ह्याउलट, यांत्रिकतेनं, म्हणजे विचार न करता करायच्या काही कामांचा मला आयुष्यात उपयोग होतो. एखाद्या गोष्टीवर विचार करणं हे अशी यांत्रिक कामं करताना फार उत्तम रितीनं होतं असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी दिवसातला काही वेळ तरी डोकं न वापरता सहज करायच्या कामांत घालवतो. अशा वेळी डोक्यात भुंगा घालत असलेल्या अनेक प्रश्नांवर विचार होतो. मला म्हणून हा असा घालवलेला वेळ अतिशय उत्पादक वाटतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - चिंतातुर जंतू Worried
    "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
    भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

    पार्श्वभूमी
    १. मागच्या काळी भारतात पुरुषप्रधान एकत्र कुटुंबपद्धती होती. भावाभावांतही हिशेब नसे.(पुरोगाम्यांनो लक्ष द्या) आजही या प्रथेचे परिपालन करण्यासाठी भारत सरकार एच यू एफ ला विशेष कर सवलती देते.
    २. मग हळूहळू भाऊ फुटले. पण कुटुंबाच्या आत हिशोब होत नसे.
    ३. आज हळूहळू नवरा बायकोत काय कुणाच्या नावे आहे, आणि जोडी फूटली तर काय याचे आडाखे अगोदरपासूनच बांधून होताहेत.
    ४. सामाजिक बदल एका विशिष्ट गतीपेक्षा जास्त गतीने झाले तर एक पिढी 'होरपळून' निघते. आम्हाला आमच्या सासूची बरीच सेवा करावी लागली, आमची सून मात्र 'एकत्र' शब्द काढलाकिच नाक मुरडते, सेवा जाऊच द्या असे म्हणणारी मोठी पिढी आहे.

    अग्रभूमी -
    १. हिशेब हा अजून छोट्या छोट्या पातळीवर (कुटुंबसमूह ते कुटुंब ते व्यक्ति) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर पुढे मूलांसोबतही प्रचंड हिशेब होईल. आजच मुलाचे/मुलीचे उत्पन्न काय आहे नि त्याने त्याचे काय करावे यात पालकांनी लक्ष घालू नये हा संकेत प्रस्थापित झाले आहेत.
    २. आपल्या राहणीमानाची प्रत्येकाची अपेक्षा फार उंचावत आहे.
    ३. मुलांवर खूप खर्च होतो. माझा मुलगा आज ६-६.५ वर्षांचा आहे. त्याच्यावर (एकट्यावर) किमान १२-१३ लाख रुपये खर्च झाला आहे असा माझा प्राथमिक हिशेब सांगतो. तसा खरा आकडा, खर्चाचे वितरण (निर्दयपणे) केल्यास २५-३० लाखाच्या आसपास असेल. तो सोबत आहे म्हणून आम्ही आमच्यावर केलेला खर्च यात धरलेला नाही.
    ४. संगोपन पालकांच्या राहणीमानात आडकाठी करते. तरीही पालक तो करणे टाळतील असे वाटत नाही. यामागे जैविक प्रेरणा आहे.
    ५. मूल मोठे होते तेव्हा पालकांचे उत्पादक काळ संपलेला असतो, मेडिकल खर्च प्रचंड वाढलेला असतो. महागाई कोठल्या कोठे गेलेली असते. आज पेन्शनही नाही. म्हणून कमावताना चांगली राहणी + संगोपन + उतारवयासाठी गुंतवणूक + घर चालवणे असा अवघड खेळ पालकांना चालवावा लागतो. यात compromise करावे लागले तर राहणी व उतारवयासाठी गुंतवणूक यांचा बळी पडतो.
    ६. मुलासाठी सोसलेल्या इतर अडचणींचा तर हिशेबच नको.
    ७. जो/जी माणूस/स्त्री आपल्या जोडीदारासोबत हिशेब करेल ती मूलासोबत का करणार नाही असा प्रश्न बळावतो. शिवाय मूले स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यासाठी पालकांचे महत्त्व कमी होते. बरेच निर्णय ते पालकांच्या नावडीचे/विरोधाचे घेतात. पालकांचे प्रेमही यावेळी बालपणीच्या मानाने कमी असते. पालक म्हातारपणी मूल सोडून पून्हा एकमेकांत गुंततात.
    ८. अशा वेळी (पार्श्वभूमीतले ट्रेंड टिकून राहिले तर) मूलांनी आपल्या संगोपनाची परतफेड करण्याची मागणी बळ धरू शकते. मातृऋण, पितृऋण रुपयांत मांडला येईल. त्यासाठी सामाजिक संकेत, थंब रुल्स आणि कायदे असतील.
    ९. अशी परतफेड केल्यानंतर मुले देखिल आपल्या पालकांचा वैचारिक, सांस्कृतिक, इ वारसा झुगारण्यास पात्र असतील. म्हणजे बापाचे, आईचे आडनाव काढून त्यांना निकोलस केज आदर्श वाटत असला तर त्याचे नाव लावतील. स्वतःचे नाव देखिल बदलतील. कु. ईशान्य जोशी चा श्री. द ग्रीन हल्क केज करतील. कदाचित संगोपन कसे असावे याबद्दलच्या मार्गदर्शक तत्तांपासून पालक कसे ढळले याबद्दल खटलेही भरतील.
    १०. यात काही भावनिक पिढ्या होरपळून निघतील.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

    प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचे आभार...जानेवारीच्या अंकात मलपृष्ठावर काही प्रतिसादातील अंश प्रकाशित झाले आहेत. आगामी अंकांतून एकेक प्रतिसाद संपादित स्वरूपात प्रकाशित होतील..मेलवरून तसे मी कळवेनच. एकाच अंकात बरेच प्रतिसाद सविस्तर प्रकाशित करावेत असा बेत होता, पण तसं न करता एकेका अंकातून चर्चा पुढे न्यावी असं ठरवलं.

    एकूणात चर्चा चांगलीच झाली. तुम्हा सर्वांच्या सहभागाबद्द्ल पुन्हा एकदा आभार...

    उत्पल

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    मिळून सार्‍याजणी ची डिजीटल कॉपी आहे का?

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    हो पण त्यावर जुने अंक आहेत. जाने १४ चा अंक तिथे नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --------------------------------------------
    ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
    प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

    प्रघा व निथ दोघांनाही धन्यवाद. चाळून बघते मिळाला तर.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    अंक जुना झाला कि बहुतेक येईल साईटवर

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रकाश घाटपांडे
    http://faljyotishachikitsa.blogspot.in/

    जानेवारीचा अंक फेब्रुवारीमध्ये अपलोड होईल...सध्या तांत्रिक अडचणीमुळे काही अंक (जून, जुलै, दिवाळी आणि डिसेंबर २०१३) अपलोड व्हायचे बाकी आहेत. ते लवकरच करू...

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0