सद्य भारतीय लोकमानसाविषयी अंदाज

या धाग्यामधे मोठे लोक, नेते, सेलिब्रिटी, स्टार्स, खेळाडू, उद्योगपती, कलाकार, बुद्धीवंत, माध्यमवंत, बाबू यांच्याविषयी, खुद्द यांच्याविषयी, बोलायचे टाळायचे आहे. समाजात जे काही घडत आहे त्यावरून समाजमानस कुठे चाललं आहे हे पाहायचं आहे. मोठ्या लोकांशी निगडीत बोलले तर चालेल. उदा. राजीव गांधींनी संगणक क्रांती आणली असे न म्हणता संगणकप्रणित कार्यप्रणाली भारतीय लोक हळूहळू स्वीकारत आहेत असे म्हणायचे आहे. सहसा तुरळक घटना विचारात घेणे टाळायचे आहे. घटनेला स्केल असला पाहिजे. म्हणजे दिल्लीत आज ६ तास वीज नव्हती (काल्पनिक घटना) अशी बातमी न सांगता भारतात शहरांतही आठवड्यातून ६-६ तास वीज गेलेली लोकांना चालते (काल्पनिक सर्वे) असे सांगायचे आहे. सामाजिक वर्तनाच्या भौगोलिक, धार्मिक, वायिक, समाज स्तरांबाबतीच्या, इ इ सीमांत निरीक्षणांची व्याप्ती किती आहे ते सांगायचे आहे. उदा. खेळ खेळून आपण भारतरत्न्/देव्/सुखी, समृद्ध नागरिक बनू असे तरुणांना वाटू लागले आहे असे म्हणायचे.

मी एक उदाहरण देतो-
आम आदमी पार्टीच्या नमनाच्या शॉटने भारतीय जनतेने राजकारण स्वच्छ हवे हे फार ठळकपणे सांगीतले आहे. या पक्षाचा इतर राज्यांत इतकाच प्रचार असता तर तिथेही हीच गत असती हे मानायला पुरेसे कारण नाही, पण किमान शहरी लोकांनी नैतिक स्वच्छ्ता हा मोठा मुद्दा केला आहे. काहीच पाठबळ नसलेल्या पक्षाला केवळ नैतिकतेच्या नावावर (आपला नक्की काय विधायक काम करायचे आहे हे लोकांना तर जाऊच द्या, नेत्यांन्या पण माहित नाही. दिल्ली चालवणे रॉकेट सायन्स नाही असं केजरीवाल म्हणाले आणि लोकांनी होत हो मिळवली). राजकीय नैतिकता ही भारतीय जनमानसाची मोठी अपेक्षा होऊ पाहत आहे.

या मुद्द्यावर आपल्याला काय वाटतं?

आपली अशी इतर कोणती (भारताबद्दल) निरीक्षणे आहेत?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

थोडंसं सोपं करून सांगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

१. निरीक्षण भारतावर करायचं आहे.
२. समाजात झालेला कायमचा बदल नोंदवायचा आहे.
३. त्या बदलाचं दृश्य स्वरुप सांगायचं आहे.
४. त्या बदलाची काळ व स्थानवाचक व्याप्ती सांगायची आहे.
५. सितारे लोकांना काय केले त्याची उदाहरणे पूर्णतः टाळायची आहेत.
६. शेवटी बदलाची कारणमिमांसा करायची आहे. त्यातून समाजमन कुठे चालले आहे असे आपल्याला वाटते हे सांगायचे.
उदा.२. काँव्हेंट शाला, इंग्रजी माध्यमाच्या शाळांत वृद्धी झाली आहे, पालक अधिक उत्साहाने मुलांना असे शिक्षण देत आहेत असे आपले निरीक्षण असेल तर -
'लोकांच्या मते' इंग्रजीच नोकरीसाठी तारणहार भाषा झाली आहे, लोकांनी भाषिक अस्मिता कमित कमी पाल्याच्या शिक्षणाबाबत बर्‍याच प्रमाणात बाजून ठेवली आहे, लोक इंग्रजी जाणणारांस समाजात उच्च स्थान देतात, इ इ आपणांस वाटते का, का वाटते हे सांगायचे आहे.

२. लोक उशिरा लग्न करू लागले आहेत. करण शिक्षण, स्थैर्य, जोडीदाराचा शोध, इ इ. गेल्या १०-१५ वर्षात लग्नाचे वय १८-२१ पासून २८ ते ३५ पर्यंत गेले आहे. म्हणून लोकांना कुटुंब स्थंतेत, वैवाहिक सुखात, बंधनांत, रस घेणे कमी झाले आहे (असे म्हणायचे असेल तर. ..माझा स्वतःची याचा अर्थ काढण्याची क्षमता सिमित आहे.
७. लिंका आणि डाटा दिल्या तर उत्तमच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पहिल्या ५ गोष्टींवरून ६व्यावर मारायची उडी खूपच मोठी आणि त्यामुळे काहीशी अवास्तव, अविश्वासार्ह, स्वप्नाळू / निराशावादी वाटते आहे. लोक काय नोंदतात त्यावरून माझं वाटणं किती खरं - खोटं ते ठरेल, हे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी दिलेल्या उदाहरणांत असे भासत असेल, म्हणून ती खोटी असू शकतात. पण कोणते रास्त निरीक्षण आढळल्यास लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन पहिले ५ काही निरीक्षणे नाहीत नाहीत. त्या चर्चेच्या सीमारेषा आहेत. केवळ ६ व्यात २ निरीक्षणे आणि निष्कर्ष दिले आहेत. तेही उदाहर्णाथ काय करायचे म्हणून.

ग्रंथप्रामाण्यावरचे मात्र उदाहरण व्यवस्थित आहे. मी या क्षेत्रात १५ वर्षे काम करत आहे म्हणून मला काय वाटले ते लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. निरीक्षण भारतावर करायचं आहे.
२. समाजात झालेला कायमचा बदल नोंदवायचा आहे.
३. त्या बदलाचं दृश्य स्वरुप सांगायचं आहे.
४. त्या बदलाची काळ व स्थानवाचक व्याप्ती सांगायची आहे.
५. सितारे लोकांना काय केले त्याची उदाहरणे पूर्णतः टाळायची आहेत.

अरे बापरे.. मग कठीण आहे Sad
विशेषतः १ व ४ मुळे. मुळात इतक्या मोठ्या भारतात एखादा परिणाम आहे की नाही हे सांगायला आवश्यक विदा नसल्याने व शितावरून कितीही पातेल्यांत शिजवलेल्या भाताची कल्प्ना करणे मला शक्य नसल्याने एकूणच कठीण काम दिस्तंय

(मी आधी दिलेला प्रतिसादही या पाच नियमांत बसत नाही Sad )

असो. इतर प्रतिसादांना वाचायला उत्सूक आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऑन अ लायटर नोटः

सध्या इतके कळते आहे की काल लागलेल्या निकालानंतर भारतीय जनतेची पुढील गोष्टीत खात्री झाली आहे:
१. मतदानयंत्रे व्यवस्थित चालत आहेत व त्यात घोटाळा होणे अशक्य आहे याबद्दल अनेकांची खात्री झाली आहे
२. पैसे व दारू यांनी मते विकत घेतली जायची हे आता जुने झाले आहे. आता या गोष्टी बंद झाल्या आहेत
३. "मूर्ख जनतेला कोणाला मते द्यायची हे अजिबात कळत नाही" असाही संवाद ऐकू न आल्याने जनता (अचानक) सुज्ञ झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता या गोष्टी बंद झाल्या आहेत

पूर्ण बंद झालय हे म्हणणं धाडसाचं ठरेल. पैसे वाटप अलिकडेच प्रतेक्ष पाहिलेले (आणि एखादवेळी त्यात भाग घेतलेले) लोक ओळखीचे आहेत. पैसे वाटून त्या भागातून मतं न मिळाल्यास उमेदवार पैसे परत मागतात. मध्ये प्रतिभा पाटील यांच्या मुलाच्या गाडीत काही कोटी रुपये सापडल्याची बातमी वाचली होती. त्याचं पुढं काय झालं हे कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत. मध्ये वर्षदीडवर्षापूर्वी झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पैसे वाटलेले स्वतः पाहिले आहे. शिवाय कोल्हापुरातही विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटल्याचे विश्वासू सोर्सेसकडून ऐकले आहे. त्यामुळे पैसे वाटतच नाहीत वैग्रे अतिशय चूक आहे. त्याची व्याप्ती अन परिणाम हा वेगळाच विषय आहे परंतु पैसेवाटप होते अन दाबून होते यात सौंशय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थातच.
ज्यांना उपरोध समजलेला नाही अशांसाठी: (हाय रे कर्मा, माझाच उपरोध मीच समजवावा! Wink )
फक्त वरील तीनही गोष्टींवर चर्चा/तक्रार/कॉन्स्पिरसी थियर्‍यांचे पीक भाजपा/एनडीए हरते (किंबहुना त्याहून नेमके सांगायचे म्हणजे जेव्हा काँग्रेस जिंकते) तेव्हा होते असे निरिक्षण आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिंगायत ओक ना चिकन खात ना (इतकी) दारू पीत. मग शिवराज पाटलांचे चेले काही निवडक, प्रभावी लोकांना पैसे (च) चारत. ते वितरण आदल्या दिवशी प्रत्यक्ष पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फक्त वरील तीनही गोष्टींवर चर्चा/तक्रार/कॉन्स्पिरसी थियर्‍यांचे पीक भाजपा/एनडीए हरते (किंबहुना त्याहून नेमके सांगायचे म्हणजे जेव्हा काँग्रेस जिंकते) तेव्हा होते असे निरिक्षण आहे

हा हा हा, तशी फ्याशन आहे खरी. पण सर्व पक्ष हे करतात हे मान्य करायला अडचण नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पैसे वाटणे/दारू वगैरे गोष्टी बहुतांश राजकीय प्रमुख पक्ष करतात याबद्दल सहमत.
डाव्यांबद्दल कल्पना नाही. मात्र त्यांच्याकडे गोळी किमान दांडका असतो त्या मुळे त्यांना पैसे/दारूची गरज भासते का माहित नाही.

मात्र वोटिंग मशीन व मतदारांची अक्कल मात्र बव्हंशी ठिकच चालते असे माझे मत आहे. तुमचेही असेलसे वाट्टे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मात्र वोटिंग मशीन व मतदारांची अक्कल मात्र बव्हंशी ठिकच चालते असे माझे मत आहे. तुमचेही असेलसे वाट्टे.

माहिती नाही. म्हणजे कसे की या विषयाचा अभ्यासच नाही. त्यामुळे सुरुवातीची गृहीतके अजून टाकवत नाहीत. याचा फॉलोअप घेणे सुरू केले की मत बदलेलही कदाचित. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका टेंडरींग प्रोसेस मधे ५-१० वर्षे अनुभवाला १० मार्क्स होते. ० ते ५ वर्षे अनुभवाला ० मार्क्स होते. एका निविदेत निवेदकाचा अनुभव मोजायच्या दिवशी पर्यंत (म्हणजे निविदा भरायच्या दिवशी पर्यंत) ४ वर्षे ११.५ महिने होता. ज्या दिवशी मूल्यमापन होत होते त्यादिवशी तो ५ वर्षे १ महिना होता. (पण निकष मात्र निविदेच्या तारखेपर्यंतच्या अनुभवाचाच होता). असा अनुभव तांत्रिक स्कोअस साठी वापरला जातो. पास व्हायला कमित कमी ७० मार्क लागत. तर या शून्य मार्क वाल्या कंपनीला एकूण ७१ मार्क पडले. दुसर्‍या कंपनीला बाकी सगळे सारखे असल्याने ८१ मार्क मिळाले. तांत्रिक स्कोअरला नेहमीप्रमाणे ७० आणि फायनान्स कोटला ३० वेट असते/ होते. मग पहिल्या कंपनीचा तांत्रिक स्कोर ७१*७०% =आणि दुसरीचा ८१*७०% इतका झाला. पहिल्या कंपनीचा फायनाशियल कोट १०० होता नि दुसरीचा ११४, आणि कंत्राट दुसर्‍या कंपनीला दिले गेले.
विवेक सांगतो, कंपनीला पाच वर्षाचा अनुभव तर होता पण निविदा भरायच्या दिवशी नव्हता. प्रकल्पासाठी ५ वर्षे अनुभव लागतो. सुलभीकरणासाठी तो कोणत्या तारखेस सांगायचा म्हणून संभ्रम येतो, म्हणून निविदेची तारीख सांगीतली. सरकारला १४% चे नुकसान झाले. इतक्यानी प्रकल्प महाग पडला. प्रक्रिया हाताळणारे सगळे लोक सुशिक्षित, सुज्ञ, कायदा जाणणारे, तंत्रज्ञान जाणणारे आहे. तरीही असे झाले. आणि सर्वांनाच कळत होते हे सरासर अन्याय्य आहे, पण काही करता आले नाही.

तेच निर्भयाचा सुटलेला खूनी पाहा. पण ती सामाजिक, नावाजलेली केस होती म्हणून १४-१७ वर्षांच्या मूलांना सजा देण्याची नवी पद्धती विचारात येत आहे. पण निविदांचं काय? तिथे असला कोणताच मेडिया फॅक्टर नसतो. तिथे गाढवी ग्रंथप्रामाण्य चालू राहतं.

कातडी बचावणे प्राथमिकता असल्यामुळे ग्रंथप्रामाण्याचे निकष तेव्हढा बदलला. स्वतःस शहाणे, विवेकी, वैज्ञानिक, पुरोगामी, तार्किक, इ म्हणवणारे लोक एका विशिष्ट अर्थाने पून्हा ग्रंथप्रामाण्यवादी आहेत, फक्त ग्रंथ नवे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतीय लोकमानसामधे होणारे बदल देशपातळीच्या स्केलवर एकच नाहीत. भौगोलिक, धार्मिक, शहरी-ग्रामीण याप्रमाणे त्यांचं स्वरूप वेगळं आहे. त्यातल्या त्यात समानता काही आहे का हे पहायचा प्रयत्न करता येईल. पूर्वीसारखं अखंड फिरणं नसल्याने जिथवर पोहोच आहे (माहीती आहे) तेव्हढाच विचार (मा़झ्यापुरता) करता येईल ही मुख्य मर्यादा आहे.

१. टीव्ही, मोबाईल घराघरात पोहोचले. त्यांचा प्रभाव पडतो.
२ मनोरंजनाकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढत चालला आहे. आदर्शवाद वगैरे गप्पा उडवून लावणारा मोठा समूहगट आहे.
३. स्वतःपुरतं पाहण्याची वृत्ती बोकाळत चालली आहे.
४. देशाचं चांगलं व्हावं ही सदिच्छा सर्वांचीच आहे. पण ते परस्पर झालं तर हवं आहे. भ्रष्टाचार संपायला हवाय, जातीयता संपायला हवीय हे बोलून दाखवलं जातं. पण स्वतः मात्र जातीय मेळावे, जातीय लग्नं यांचे कट्टर पुरस्कर्ते अशी उदाहरणं सर्रास दिसतात. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या टोप्या चाळीस रुपयांना खरेदी करून ऐंशी रुपयांची बिलं मागण्याचा कोडगेपणा हा समाज कुठल्या थराला पोहोचला आहे हे दाखवतो.
५. काम करणा-यांवर टीका हा ट्रेण्ड सुशिक्षितांमधे रूळत चालला आहे. सकारात्मक टीका खूपच थोडी दिसते. त्या मानाने ग्रामीण भागात काम करणा-याच्या चुकांकडे कानाडोळा करून जनता उभी राहते असं चित्र दिसतं.
६. मी, माझं घर, मा़झं कुटुंब असा दृष्टीकोण असलेली आणि सतत गॅझेटशी बिझी असलेली टेक्नोसॅव्ही पिढी वाढत चालली आहे.
७. सामाजिक प्रश्नांबाबत एकीकडे काही गट उत्साही तर काही गटांमधे वाढती उदासीनता आहे. मुख्यत्वे हा गट चंगळवादी (मॉल संस्कृतीतला) आहे.
८. नव्या विचारांना आत्मसात करणारा गट संख्येने तितकाच राहीला आहे. तंत्रज्ञान आणि उद्योग यामुळे बदल होण्याऐवजी अंधश्रद्धा आणि जातीय / धार्मिक जवळीक देखील घट्ट होत चालली आहे.
९. नकारात्मक बातम्यांचा न्युज चॅनेल्सवरून होणारा मारा सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकण्यासाठी पुरेसा आहे.
१०. अ) संवेदनशील प्रश्नांमधेही दुभंग आढळतो. उदा. काश्मिरी पंड्यांच्या हत्येबद्दल एक गट संवेदनशील असेल, तर दुसरा असेलच असं नाही. या हत्यांना हिंदुंच्या हत्या म्हणून प्रोजेक्ट केलं गेल्यास रिअ‍ॅक्शन येते हे चिंताजनक आहे.
१०. ब ) स्त्री अत्याचार प्रकरणात देश एकत्र आल्याचं दिसून येतं. त्याचवेळी गुन्ह्यांमधे वाढ झाल्याचं जाणवतं एरव्ही जर या बातम्या आल्या नाहीत तर जनमानस ढवळून निघत नाही.
१० क) दिल्ली रेप प्रकरणात संपूर्ण देशभर संतापाची भावना होती. हे चित्र आशादायी. पण त्याहीपेक्षा निघृण अशा खैरलांजी हत्याकांडाबाबत तशी संतापाची भावना सार्वत्रिक नव्हती हे कटुसत्य आहे. हे निराशाजनक चित्र आहे, ज्याचा खोलात जाऊन विचार व्हायला हवा.
११. इंग्रजी बोललं तर नोकरी मिळते असा समज होण्यामागे आईवडिलांना आलेले अनुभव आहेत. त्यामुळं इंग्रजी माध्यमाकडे गरीबातल्या गरीब माणसाचा कल आहे.
१२. सरकारने सर्वच जबाबदा-या झटकलेल्या असल्याने गरीबांचं जिणं भयानक झालेलं आहे. कल्याणकारी राज्य ही संकल्पना काहींना हास्यास्पद वाटते. तेच धोरणकर्ते असल्याने दुर्बलांना वाली कुणी राहीलेला नाही. डाळींचे भाव १९९५ साली ७ ते ८ रु किलो होते, ते दोन वर्षात १२ रु किलो, पुढच्या वर्षी २८ रु किलो आणि दोन तीन वर्षांपूर्वी १००रु किलो झाले. जीवनावश्यक वस्तूंचा सट्टा मार्केट खेळतंय, त्यात जनता भरडली जाते आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीरण या तीन शब्दांकडे बोट दाखवून सरकार हात वर करतं.
१३. पूर्वी उच्चभ्रू वर्गामधे असलेली इतर वर्गाचा विचार करण्याची क्षमता आणि आवश्यकता नष्ट होत चालली आहे.
१४. नव्या पिढीमधे बदलाची भावना तीव्र आहे. याबद्दल स्वतंत्रपणे बोलता येईल कारण तो विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. कधी नाही इतकी उलथापालथ गेल्या काही वर्षात झाल्याने त्यानंतरच्या पिढीच्या अविकसित भाग, जनता यांच्याबद्दलच्या भावना हा डिबेटचा विषय आहे.

आणखी वेळ मिळेल तसं अपडेट करीन. सध्या इतकंच
धाग्याची कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

कल्याणकारी राज्याच्या नावाखालचा कारभार पहिली पन्नास पंचावन्न वर्षे करुन झाला.
तो करुन झाल्यावरच ट्रॅक बदलला.शिवाय टॉप ब्रास वर्तुळातील लोक काय बोलतात,
ह्यापेक्षा काय करतात ह्याकडं पाहिलं पाहिजे.
अजूनही विकासाला मनवी चेहरा पाहिजे असं म्हणतात..
आम्ही कल्याणकारी राज्यसाठी नव्हे तर निव्वळ सुशासनासाठी प्रयत्न करत आहोत, हे म्हणायची आख्ख्या भारतात एकाही पक्षाची छाती नाही. शिवाय कल्याणकारी राज्यच आणायचे, तर तेही धड आणणे ह्यांच्याच्याने झाले नाही/होत नाही. नुसते नाव त्या पद्धतीचे घ्यायचे, करायचे भलतेच, असे चमत्कारिक वातावरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धाग्याची कल्पना आवडली.

धन्यवाद

आदर्शवाद वगैरे गप्पा उडवून लावणारा मोठा समूहगट आहे.

रोचक निरीक्षण. मोघम विधान करण्यापेक्षा आदर्शवादाचे स्वरुप कसे बदलले आहे, आणि त्याचा पुर्स्कार किती पटीने कमी झाला आहे हे सांगावे.

१. टीव्ही, मोबाईल घराघरात पोहोचले. त्यांचा प्रभाव पडतो.

एखादा विशिष्ट वा महत्त्वाचा चांगला वाईट प्रभाव सांगावा तर अधिक रोचक ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आदर्शवादाचे स्वरुप कसे बदलले आहे, आणि त्याचा पुर्स्कार किती पटीने कमी झाला आहे हे सांगावे
आदर्शवाद कसा मोजायचा, तुम्हीच सांगा !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी एक काटेकोर निरीक्षण घेतले तर केळं मोजण्याइतकं ते सोपं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोपे असेलही तुम्ही म्हणताय तर...
प्रश्न असा आहे की मोजायचा कसा, म्हणजे नेमकं काय मोजायचं !!
म्हणजे,
समजा मी आधी होतो त्यापेक्षा जास्त आदर्शवादी झालो, तर नेमकी कशात वाढ होइल?
किंवा
हजार माणसांचा समूह जास्त आदर्शवादी झाला तर नेमकी कशात वाढ होइल?

असो,
हे हाय्पोथेटिकल प्रश्न आहेत याची कल्पना आहे, पण या प्रश्नांच कारण असं की
"सद्य भारतीय लोकमानसाविषयी अंदाज" हा सदराखाली जे जे येईल ते 'ढोबळ अंदाज' या स्वरूपतच असणार की, म्हणूनच त्यावर 'चर्चा' होतेय, समजा अचूक संख्येच्या स्वरूपात जर सांगितलं तर त्यावर चर्चा कशी काय होउ शकेल?
उदा.
१९९० साली भारतातले ७५% लोक आदर्श्वादी होते आता १५% लोकचं आहेत...
विषय संपला, पुढे काय चर्चा होणार!
किंवा
दिवाळी मध्ये दिवे लावल्याने वातावरणाची सात्विकता ८०% ने वाढ्ते... (हे विधान सनातन प्रभातिय आहे, पण त्याबद्दल सॉरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅग्रीगेट मूल्ये घेऊ नका. छोटी छोटी निरिक्षणे घ्या. तेवढ्या बाबतीत काही विधान करता येते का पाहा.

उदा.
दोन निरीक्षणे घेऊ.
आज ऑफिसात लोक किती वेळेवर जातात. शेतकरी किती वेळेवर कामाला जायचे. शिस्त मोजायची म्हटले तर आज जास्त आहे असे म्हणावे लागेल. असेही आहे कि ती फोर्स्ड असेल. पण आहे खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्थान - भारत
काळ - २००० ते पुढे
अपवाद - जावई
वर्तुळ -शहरी

घरी आलेल्या मित्राला किंवा पाहुण्याला आवर्जून जेवू घालणे कमी झाले आहे. चहा देखिल घ्यावाच असे नाही. समजा सबब पाहुणा ३-४ दिवसांसाठी आला तर तो किती जवळचा दूरचा आहे हे पाहून सुटी काढली जाते. पण अगोदरच्या काळी (धान्याची देशाला चणचण असताना) जेवताना जो आग्रह केला जात असे, आणि जितका केला जास्त असे तो खूप कमी झाला आहे. किंबहुना नष्टच झाला आहे. तुम्हा एकदा पोळी नको म्हणालात कि तुम्हाला पोळी नंतर ऑफर केली जाणार नाही हे सुनिश्चितच!
याचे बरेच अर्थ काढता येतात -१. पाहुण्यांकडे लोकांनी लाजायचे सोडून दिले आहे (म्हणून आग्रह करायची गरज पडत नाही.). २. लोकांना मागच्या काळी कदाचित आमच्याकडे खायला प्यायला कमी नाही हे पाव्हण्याला ठासवायचे असावे. आज अन्नखर्च एकूण खर्चाच्या खूपच कमी झाल्याने आग्रह केल्याने असे काही सिद्ध होत नाही. ३. आजकाल पाव्हण्यांवर प्रेम पातळ झाले आहे. ४. दुसर्‍या बाजूला आजकाल पाहुणे आले असताना जास्त महागाचे अन्न वापरत असतील. त्यादिवशी पक्वान्ने, बासमती तांदूळ, इ इ. उच्च दर्जाचे अन्न आज प्रचंडच महाग आहे म्हणून आग्रह होत नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पर्याय २ योग्य असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझे उत्तर अर्थातच ३ आहे. Blum 3

अहो पण काही तरी कारण मिमांसा करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>२. लोकांना मागच्या काळी कदाचित आमच्याकडे खायला प्यायला कमी नाही हे पाव्हण्याला ठासवायचे असावे. आज अन्नखर्च एकूण खर्चाच्या खूपच कमी झाल्याने आग्रह केल्याने असे काही सिद्ध होत नाही.

खाउपिऊ घालून आम्हाला काही कमी नाही असे ठसवण्याचीच गरज होती असे नाही.
जुन्या काळी [किती जुन्या हे पुन्हा गुलदस्त्यात आहे] पैश्याचे व्यवहार तुलनेने कमी प्रमाणात होत असत. म्हणजे आलेल्या पाहुण्याला (किंवा त्यांच्या मुलांना) पटकन एखादी वस्तू भेट देणे हे कमी होत असे. आज असलेली वस्तूंची सार्वत्रिक उपलब्धता आणि कुटुंबांकडची सरप्लस कॅश कमीच असायची. त्यामुळे आजच्या प्रमाणे पाहुण्यावर कॅश खर्च कमी होत असे. त्या ऐवजी घरातच असलेल्या जिन्नसांमधून खाऊपिऊ घालून पाहुण्याचे स्वागत होत असे. आज पाहुणा आला तर पटकन एखादी वस्तू भेट दिली जाते [कारण ते शक्य आहे].

जुन्या काळी ज्या कुटुंबांत गरीबी/चणचण असेल तिथे काही प्रमाणात हात आखडता घेतला जातच असेल. आजही असेल.

बाकी गृहीणी अर्थार्जनासाठी बाहेर पडल्याने जेवणखाण करण्यात वेळ घालवणे शक्य नसावे ही शक्यता आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फक्त स्वतःपुरते बोलायचे असते तर फारसा (खरंतर अजिबात) सहमत नाही असेच म्हटले असते.
माझे व बायकोचे (माहेरचे) एकत्र कुटुंब असल्याने एकूणच येणी-जाणी चिक्कार आहेत. अजूनही बहुतांश विकांताला घरात सहज १०-१२ माणसे असतात - त्यात घरातलीच ६ -(प्रसंगी २०ही!), घरात इतकी माणसे नसल्यास आम्ही घरात नसण्याची (दुसर्‍या कोणाकडे अड्डा जमवला असण्याची) शक्यताच अधिक आहे. आम्हा भावंडांचा (हल्लीच्या 'युनो' भाषेत 'कझिन्स'चा ) दर २-३ महिन्यांनी एकाकडे मेळावा असतोच (सहकुटुंब संख्या किमान १८) Smile

पण आजुबाजुला बघितले की एकूणच येणी-जाणी कमी झालीयेत असे वाटु लागते हे खरे.
त्याचे कारण मात्र तुम्ही दिलेल्या कारणांपेक्षा, "आम्ही (युनो) कसे बिझी असतो" हे एकमेकांवर ठसवण्यात लोकांना प्रचंड आनंद मिळतो (का? कोण जाणे) हे असावे. एरवी "बिझी-बिझी"चा जप करणार्‍या अनेकजणांपैकी कोणाच्या घरी जाऊन थडकलो (होय आम्हाला एखाद्याकडे एखादा पदार्थ चांगला बनतो हे एकदा कळाले आणि तो खावासा वाटला की फोन करून ती व्यक्ती घरी असल्याची खात्री करतो आणि तासाभरात थडकतो. - सावधान!) की मात्र आग्रह (तो फार करावा लागत नाही हे अलाहिदा), अतिथ्य व्यवस्थित होते असा स्वानुभव आहे.

दुसरे कारण हल्ली मुक्तकंठाने स्तुती व निंदा दोन्ही कमी झाले आहे अशी माझ्या सासुबाईंची तक्रार आहे. त्यामुळे - त्या फॉर्मल वागण्यामुळे - (म्हणे) त्यांना पाहुण्यांना बोलावून-बोलावून जेवण करायचा कंटाळा येऊ लागला होता पण आमच्या आगमनाने पदार्थाची मुक्त (प्रसंगी अति)चिकित्सा होत असल्याने त्यांना (म्हणे) उत्साह आला आहे. (याला म्हणतात तारीफ अधिक टोमणा Wink ).अर्थात तुम्ही जावयाचा अपवाद केल्यामुळे हे उदाहरण गैरलागु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झालय तेच बरय असं वाटतं.
जुन्या मानसिकतेच्या घोळक्यात गेलो की ते बळजबरीनं वाढणं "आमचा ठिवत न्हाइत का" म्हणत घशात कोंबणं;
पाव्हण्यास डायबिटिस वगैरे असल्याची कल्पना असली तरी "आमचा मान म्ह्णून इतकुत्सं तरी घिवाच" म्हणत गोग्गोड पदार्थ
अवेळी , प्रसंगी नाक दाबून नरड्यात ओतणं असला मानापमानाच भपका आणि पर्यायाने त्रासदायक आतिथ्य कमी झालं तर बरंच आहे तिच्यायला.
ह्या प्रकराने त्रास झालेले बर्रेच लोक पाहण्यात आहेत. त्यामुळे त्या प्रकाराविषयी एक प्रकारची तिडिक बसली आहे.
(वैयक्तिक अनुभव चर्चेत आणणं टाळावं असं म्हणतो, पण दरवेळी द्यावेच लागतात. होतं काय, माझा अनुभव एक असणार, माझं एक वर्तुळ असणार. मी पाहिलेलं; जगलेलं, भोगलेलं फारच वेगळं असणार;
कुणा दुसर्‍याचं विश्व- वर्तुळ फार वेगळं असल्याने त्याचे अनुभवही वेगळेच राहणार. मग अनुबह्वांची जंत्री दोन्हीकदून सुरु; व शेवट एका रटाळ अनिर्णित चर्चेत होणार.
हे कलते, पण वळत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत आहे.
अश्या अतीआग्रह होणार्‍या ठिकाणी जायला नको वाटतं. (त्यापेक्षा अश्या व्यक्तींना स्वतःकडे बोलावणं मला अधिक आवडतं Wink )

"लाजु नका, टाकू नका" असं आमच्याकडे अनेकदा म्हटलं जातं, अर्थात हे सर्वत्र फॉलो होत असल्याने असे अनुभव मला अगदीच विरळ असल्याचे चालून जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात 'जॉइण्ट्ट फ्यामिली' हाच एक अघोरी प्रकार आहे, या निष्कर्षाप्रत फार पूर्वी आलेलो आहे.

एकदा 'झुंड' म्हटले, की झुंडीचे मानसशास्त्र लागू व्हायचेच. 'नरड्यात ओतणे' हे केवळ एक म्यानिफेष्टेशन झाले.

बाकी, तपशिलांत मीही शिरू इच्छीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाचे बायस कसे बनतात पाहा. एकत्र कूटुंब ही झूंड. मग ज्या कंपनीत रोज सकाळी सेवेचा रतीब लोक लावतात ती झुंड नसते तर काय असते. पण जमान्याचा रिवाज आहे म्हणून बुद्ध्या एका विशिष्ट प्रकारच्या गोष्टीकडे दुष्टभावाने पाहायचं म्हटलं तर ते सोपं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग ज्या कंपनीत रोज सकाळी सेवेचा रतीब लोक लावतात ती झुंड नसते तर काय असते.

- ज्या कंपनीत मी रोज सकाळी सेवेचा रतीब घालतो, त्या कंपनीशी माझी (एका मर्यादेपलीकडे) बांधिलकी नसते. ती वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या कारणासाठी (किंवा कारणाविना) मला हाकलू शकते, आणि उलटपक्षी (सर्वात महत्त्वाचे), मीही वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या कारणासाठी (किंवा कारणाविना) कंपनीतून बाहेर पडू शकतो.

- ज्या कं.त मी रो. स. से. र. घा., ती कं. माझ्या वैयक्तिक भानगडींत नाक खुपसू शकत नाही, आणि 'हक्काने' तर नाहीच नाही. किंवा माझ्या वैयक्तिक बाबतींत मी कसे वागावे, याबाबत दबाव आणू शकत नाही. (इण्डियातील परिस्थिती याहून वेगळी असल्यास कल्पना नाही, आणि तशी ती असल्यास, प्रामाणिकपणे, आश्चर्यही वाटणार नाही. विच इज़ नॉट टू से द्याट अमेरिका इज़ परफेक्ट, पण आमचे येथील उजव्या शक्तींनी हा देश जोवर पुरता गाढवाच्या **त घातलेला नाहीये, तोवर येथे काही किमान अपेक्षा करण्याची सोय निदान अजूनपर्यंत तरी शाबूत आहे.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या कंपनीत मी रोज सकाळी सेवेचा रतीब घालतो, त्या कंपनीशी माझी (एका मर्यादेपलीकडे) बांधिलकी नसते.

मी फ्री लान्सर लोकांबद्दल बोलत नाही. बाकी सामान्य नोकरदारांचा मोठमोठ्या वकिलांनी लिहिलेला, परीक्षिलेला करार असतो. तो टचकम मोडता येत नाही, नोटीस द्यावी लागते. आणि तो नीट वाचलाच असेल तर (नथिंग पर्सनल) त्यात आयुष्यभर बांधील अशी काही कलमं असतात.

ती वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या कारणासाठी (किंवा कारणाविना) मला हाकलू शकते, आणि उलटपक्षी (सर्वात महत्त्वाचे), मीही वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या कारणासाठी (किंवा कारणाविना) कंपनीतून बाहेर पडू शकतो.

खानदान कि इज्जत के साथ खेळलं तर कुटूंब तेच करतं. आणि एका रात्री घरातून सांगून, न सांगून जाता येते. मागे एका धाग्यावर मी मागच्या काळात लोक विस्थापित होत नसत म्हणलो तेव्हा (मन आणि अजून एकाने) प्रचंड असा विरोधार्थी विदा दिला होता. म्हणजे एकत्र कुटुंबात ही घर सोडायचं स्वातंत्र्य होतं.

माझ्या वैयक्तिक भानगडींत नाक खुपसू शकत नाही, आणि 'हक्काने' तर नाहीच नाही. किंवा माझ्या वैयक्तिक बाबतींत मी कसे वागावे, याबाबत दबाव आणू शकत नाही.

इतके तद्द्न अनाभासलेले विधान क्वचितच मिळते. किती वाजता उठायचे , कोठे रोज जायचे हे व्यक्तिगत नाही तर काय पारमार्थिक आहे का? बायस हो बायस!!! सरकारी अधिकारी राजकीय विधाने करू शकत नाही. ड्यूटीवर असताना कोण काय करू शकत नाही याची लै मोठी लिस्ट असते. इथे टंकन करणार्‍या कितीतरी लोकांच्या बॉसला हे कळले कि हे काय लिहितात, किती लिहितात, किती वेळ लिहितात तर देवच तारो! दुसरं उदाहरण नको. कितीतरी सायटीच बॅन असतात. पेन ड्राईव अलाऊड नाही. दुसरे नेट कनेक्शनस जाम केलेले असतात. जरा बायसातून बाहेर या नि निरपेक्षपणे जग पाहा. वर्क लाईफ बॅलॅन्स वर मी किती बोलू? जाऊ द्या. बायस प्रचंड असेल तर दुसरी बाजू दिसतच नाही म्हणतात.

(इण्डियातील परिस्थिती याहून वेगळी असल्यास कल्पना नाही, आणि तशी ती असल्यास, प्रामाणिकपणे, आश्चर्यही वाटणार नाही. विच इज़ नॉट टू से द्याट अमेरिका इज़ परफेक्ट, पण आमचे येथील उजव्या शक्तींनी हा देश जोवर पुरता गाढवाच्या **त घातलेला नाहीये, तोवर येथे काही किमान अपेक्षा करण्याची सोय निदान अजूनपर्यंत तरी शाबूत आहे.)

सबब धागा फक्त भारतासाठी आहे. असू शकते कि अमेरिकेत कामकाजाचे कायदे कोणत्याच व्यक्तिगत बाबतीत अडथळा आणत नाहीत. मला माहित नाही. कंपीटन्स नाही म्हणून बोलणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला बायसाचं अजून एक छानपैकी उदाहरण देतो.
शिकलेल्या म्ध्यमवर्गीय बायका भाजीवाला, दुधवाला, नोकर, रिक्षावाला, इ इ कनिष्ठ स्तरातील लोकांना भैया म्हणतात. त्यांच्या मनात किंचितही बंधुत्व नसते. "यो आर आउट ऑफ कंपिटिशन" असा त्याचा अर्थ असतो. त्याच बायका ऑफिसात कलिगला कधीच भैया म्हणत नाहीत. भलेही तिथे कंपिटेह्सन्चा प्रश्नच नसो. हाय कि नाही? का? कारण बंधुत्व कुठे लावावं याचा बायस इतका खोल शिरलेला असतो कि त्याला ओव्हरकम करणे अशक्य.

सोवळे घातलेला ब्रह्मवॄंद पाहिला कि शिसारी येणार. पण त्याच वैज्ञानिक दृष्टीकोन असणार्‍या माणसाला ९५% ह्युमिडिटी आणि ४५ डिग्री तापमान असणार्‍या दिल्लीत जुलैमधे कॉन्फरंसमधे ब्लेझर आणि टाय घालून येणारांची शिसारी नाही येणार! कारण? जमाने का रिवाज. त्या बामनांच्या आणि त्या अधिकार्‍यांच्या दोहोंच्या अकला गहाण असतात मात्र ब्राह्मणांवर टिका करणे फॅशनेबल आणि वैज्ञानिक असते! चालू द्या!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अशा कॉन्फरन्स जाणारे ए सी गाडीतून उतरून हॉटेलातील ए सी हॉल मध्ये प्रवेशात.
१२ महिने ब्लेझरसाठी योग्य अशाच वातावरणात ते स्वतःला ठेवतात.
सायकलवरून घामाच्या धारा निथळत मुंबैच्या गर्दितून, धुळीतून , दाटीवाटीतून चाललेला ब्लेझरवाला पाहण्यात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमच्या दिल्लीत आमी असे लै ब्लेझर वाले पाहतो. ए सी घर, कार, ऑफिस असणारे चिकार असतात. पण नसणारे अजून जास्त असतात. स्लीपर क्लास मधला टीटी घ्या, सेल्समन घ्या, उघड्यावर साजरे होणारे उत्सव घ्या, ... . लै कै आहे. डोळेच बंद असले कि काही दिसत नाही.
सोपं सांगतो. आजपासून उन्हाच्या महिन्यात कोणीही ए सी बाहेर ब्लेझर टाय वाला दिसला कि त्याच्या जागी सोवळ्यातल्या ब्राह्मण कल्पा. तुम्हाला निरीक्षण करायला १ वर्ष लागेल किमान. बायस फार वाईट असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतीय लोकांची तुलना परदेशी (नॉन भारतीय) लोकांबरोबर केली तर मला एक जाणवते. आपण भारतीय लोकं "इमेज-कॉन्श्स" नसतो. पण पाश्चात्य देशातील (अमेरीका) लोक खूप खूप इमेज-कॉन्शस असतात.
त्यांचा एक फसाड (दिखाव्याचा चेहरा/मुखवटा) १००% असतो. आपण तसे नसतो. हे बरे की वाईट प्रत्येकाने ठरवायचे पण हे माझे नीरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचा एक फसाड (दिखाव्याचा चेहरा/मुखवटा) १००% असतो.

म्हणजे काय? आत एक अन बाहेर एक हा फरक गोर्‍यांच्यात जास्त तीव्र आहे असे म्हणायचे आहे का?

बाकी गोर्‍यांचं माहिती नै पण देशी लोकही मस इमेज कॉन्शस असतात. फक्त इमेज कशाला म्हणावे याची परिमाणे वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाहेर दिखाऊपणाफार असतो असं मला वाटतं. उदाहरणार्थ माझ्या स्पीच क्लबमध्ये एक बाई आहे ती अभिमानाने सांगते की ती "प्रिन्सेस डायना" ची दूरची नातेवाईक आहे वगैरे. काहीच्या काहीच वाटतं ते. रिडीक्युलस!!!
स्पीचमध्ये स्वतःचे नाव गुंफताना उच्च पातळीवर पण स्लेव्हचा उल्लेख मात्र "इंडीअन स्लेव्ह" म्हणून.
थोडं दिखाऊ अन बेगडी व्यक्तीमत्व आहे. आणि या क्लबमध्ये इतकी स्तुती होते एकमेकांची की विचारु नका.
मी एकदा त्या प्रेसेडेन्ट्ला म्हटलं "आय फाईंड सम पीपल व्हेरी प्रिटेन्शिअस" तर त्याला ते लागलं. पण तो म्हणाला -वी आरे नॉट हिअर टू जज बट टू सपोर्ट इच अदर." (च्यायला! तुझ्या नानाची टांग!)

अर्थात मला जज करायचं नाहीये पण भारतीय जनमानस वगैरे विषय आहे म्हणून म्हटलं आपण वेगळ्या मुशीतून घडलो आहे अन ते लोक वेगळया आता एकमेकांचा गुण नाही पण वाण लागला असेल तर माहीत नाही. पण हे जनरल नीरीक्षण झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी योग्य बोललात. सर्वसाधारण भारतीय माणूस कसा आहे हे त्याला आणि कित्येक संबंधितांना बरेच पक्के माहित असते. पाश्चात्य लोक कसे आहेत ते मायबापापासून त्यांना स्वतःला देखिल नीट उमगलेले नसते. भारतीयांची ठाम मते असतात. ते लोक मात्र डन्नो डन्नो करत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारतीयांची ठाम मते असतात. ते लोक मात्र डन्नो डन्नो करत असतात.

"The fundamental cause of the trouble is that in the modern world the stupid are cocksure while the intelligent are full of doubt." - Bertrand Russell.

(बाकी, ठाम मते असणारे गोरेही पुष्कळ पाहिलेत. अमेरिकेत त्यांना सामान्यतः 'रिपब्लिकन्स', 'कन्झर्वेटिव्ज़', 'राइटविंगर्ज़' आदि नामाभिधानांनी ओळखले जाते. अनेकदा, ही मंडळी स्वतःची ओळख 'ख्रिश्चन' अशीही आवर्जून-अधोरेखित करून सांगताना आढळतात. यांची उत्कृष्ट उदाहरणे पाहायची-ऐकायची असतील, तर कोणत्याही रिपब्लिकन राजकारण्याने कधीही तोंड उघडलेले ऐकावे, किंवा रेडियोच्या एएम च्यानेलवरील कोणताही राजकीय टॉक-शो ऐकावा, नाहीतर टीव्हीवर फॉक्स न्यूजवरील पंडितांच्या बडबडींचा कोणताही कार्यक्रम पहावा. 'पिसाळलेले मनुष्य' - and I employ the term 'मनुष्य' extremely loosely - नेमके कशास म्हणतात, याची प्रचीती यावी. हल्ली पैशाला पासरी सापडतात. तर ते एक असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क रसेल साहेबांचे नी माझे मत जुळल्याने आनंद मानावा की नाही अशा full of Doubtमध्ये सापडलो आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म ओके. गोर्‍यांचं मला काहीच माहिती नै पण भारतीय लोक दांभिकपणात लंबर पैला मारतील एनीटैम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे ऐसीच्या भारतीय सदस्यांना लागू होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समजा होते- सो व्हॉट? हुच्चभ्रू अन अनहुच्चभ्रू दोन्ही प्रकारचे बरेच भारतीय लोक दांभिक असल्याचे पाहिले आहे. दांभिकपणा हे भारतीय बाळकडवांपैकी एक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तथाकथित हुच्चभ्रू मते नष्णारे लोकही मस दांभिक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
इकडील दांभिकतेस तोड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असेच असल्यास भारतीय दांभिकतेची व्याप्ती आणि स्वरुप याबद्दल एक पोस्ट/प्रतिसाद टाका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कशाला? कुठल्याही काळी भारतात दांभिकपणा नव्हता असेच सिद्ध होणारे शेवटी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निरागस होऊन विचारतो- ते कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जसं द्रौपदीच्या उदाहरणावरून भारतीय लोक बहुपतीत्वाला इन जण्रल मानतात असं सिद्ध झालं तसंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचा रोख सरळसरळ माझ्यावर होता तर ...
असो, माझेही दिवस येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भू भू भू भू भू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मासला होता फक्त.

बाकी दिवस सगळ्यांचे असतात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते उदाहरण कुंती आणि कर्णाचं होतं आणि अधिक माहिती अभावी आपण काही निष्कर्ष काढू शकत नाही या मतापर्यंत आपण आलो होतो. कदाचित बळेच असेल पण अपरिग्रह स्त्रोत्र रोज सकाळी वाचणारे/गाणारे लोक पिढ्यान पिढ्या चोर्‍या करणार नाहीत असाही आपण एक अर्थ काढला होता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कदाचित बळेच असेल पण अपरिग्रह स्त्रोत्र रोज सकाळी वाचणारे/गाणारे लोक पिढ्यान पिढ्या चोर्‍या करणार नाहीत असाही आपण एक अर्थ काढला होता. (डोळा मारत)

अगदी अगदी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars