ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा

सुधारणांचे स्वरुप काहीही असू शकते. सुधारणेची सूचना म्हणजे विद्यमान स्वरुपावरची टिका नव्हे. सुधारणेची सूचना म्हणजे पूर्ण करायलाच पाहिजे अशी अपेक्षा नव्हे. आणि अशा सूचना काही विशिष्ट लोकांनीच करायच्या/पार पाडायच्या गोष्टी नव्हेत. तांत्रिक सूचना म्हणजे घर बांधताना वा बांधल्यावर कुठे, काय, कसं, इ, इ. अन्य सूचना म्हणजे घरात काय व्हावं, काय नाही, कसं व्हावं, कोण यावं, कोण नाही, इ इ. संस्थळाचे व्यवस्थापन कोणत्या सुचना स्वीकार्य आहेत, कोणत्या राबवण्याच्या योग्यतेच्या आहेत, कोणत्यासाठी किती श्रम आणि द्रव्य लागेल हे ठरवेल. अर्थात या पानावर ते सगळं डोळ्यासमोर ठेऊन सूचना करायच्या नाहीत. सुचना, अपेक्षा, काय आवडले, काय असायला नाही पाहिजे, काय व्हायला पाहिजे होते, इतरत्र कुठे काय पाहि असते हे मोकळेपणाने सांगायचे आहे. सांगताना सांगणारा बुजला नाही पाहिजे. अर्थातच संस्थळाचे व्यवस्थापन ज्या गोष्टींना जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही त्याचा इथे विचार करायचा नाही आहे. 'तुम्हाला' काय वाटते ते नोंदणे महत्त्वाचे, ते किती प्रत्यक्षात उतरेल हे नंतर पाहू या.
मी सुरुवात करतो.
१. अबाउट ऐसी - ऐसी अक्षरेबद्दल माहिती असे एक पान असावे. याचा सुर माहितीपर असावा, कायद्याच्या भाषेतला नसावा. स्थापना, व्यवस्थापन, उद्देश, इ इ त्यात यावेत.
२. सर्व लोक प्रतिसाद वाचत नाहीत. ( काही फक्त तेच वाचतात) तेव्हा संस्थळाबद्दलचे मार्गदर्शन मूळ लेखांत असावे.
३. ऐसीची काही विचारसरणी असेल, कोण्या तत्त्वज्ञानाला बांधिलकी असेल/नसेल तर तसे एक पान असावे.
४. सक्रीय सदस्य आणि त्यांचे जनरल आवडते विषय वा लेखनाचे प्रकार वा विचारसरणी यांची समरी एका पानावर असावी.
५. सदस्य बनताना चार महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे चारदा अ‍ॅग्री बटन क्लिक करून मान्य कराव्या लागाव्यात - जसे व्यक्तिगत आरोप वा चिखलफेक करणार नाही.
६. नवे लेखन करताना शीर्षकातील उकार एडिट मोड मधे दिसत नाही, तो textbox मोठा असावा.
७. वर जाण्याचा अ‍ॅरो/गोल स्क्रोल केल्याशिवाय प्रकट होत नाही. तो पहिलेपासूनच दिसत असावा.
८. असाच एक अ‍ॅरो थेट खाली येण्यासाठी पण असावा.
९. माझे खाते मधे माझे लेखन पहिल्यापासून असते, ते वेगळे लिहिण्याची गरज नसावी.
१०. प्रतिसाद १, २.१.१, २.१.२, ३.१, ३.२, ३.३ असे नंबर दिलेले असावेत
११. प्रतिसाद जसजसा उजवीकडे सरकेल, तसतसे त्याचे हेडिंगकलर बदलावा. पहिली लेवल लाल, दुसरी हिरवी, पांढरी, काळी, इ इ . त्याच्यामुळे नक्की कोणता उपप्रतिसाद कोणत्या प्रतिसादाला आहे हे कळेल.
१२. सर्च इंजिनने शब्द सर्च केला पाहिजे.
१३. सर्च मधे सर्च इन प्रकार, इन शीर्षक, जेथे लेखक क्षक्षक्ष आहे, इन कंटेंट हे सगळे असले पाहिजे.
१४. लेखन सॉर्ट केल्यावर (समजा लेखकाच्या नावाने) तर प्रत्येक पान नंबराखाली त ते प अशी अनुक्रमणिका दिसली पाहिजे.
१५. नविन लेखन सॉर्ट बाय नंबर ऑफ रेटिंग्ज आणि प्रत्यक्ष रेटींग असेही असले पाहिजे. त्यासाठी दोन कॉलम जास्त लागतील.
१६. sort by number of responses हे ही हवे.
१७. sort by date of creation हे ही हवे. आता जे जास्तीचे कॉलम आहेत ते लपवता देखिल यावेत.
१८. तारांकित मधे केवळ काही पंचतारांकित लेख दिसतात. सर्वच तारे (उदा. तीन ते चार) आणि बिनतारे लेखन शोधता यायला हवे.
१९. लेखन अप्रकाशित करून साठवता येत नाही. लिहायला फार स्टॅमिना लागतो. त्यामुळे शुद्धलेखन वैगेरे दुरुस्त करण्याची गोष्ट लांबते. लोक वाचत असतात आणि लेखक संपादन करून अद्ययावत कर्त असतो.
२०. ऐसी अमेरिकन आहे कि भारतीय आणि व्यवस्थापनाच्या निष्ठा, प्रेम, कायदेशीर बांधिलकी हे स्पष्ट व्हावं.
२१. वाचक, लेखक, प्रतिसादक कोणत्या कायद्याच्या कक्षेत येतात हे स्पष्ट व्हावं.
२२. नविन लेखन, कविता, कौल, चर्चा, इ इ या क्रमात एक लॉजिक असलं पाहिजे.
२३. ट्रॅकर मधील मुख्यपानाची छोटी फाँटमधली लिंक हटवावी. ती ज्यादा आहे, कुरुपही आहे.
२४. लेखन नंबर ऑफ रिडिंग्जने पण सॉर्ट करता यावे.
२५. एका विशिष्ट तारखेपूर्वीचे लेखन वा सलग १-२ महिने इनॅक्टीव राहीलेला धागा अर्काइव मधे जावा.
२६. सदस्याच्या लेखनाची वा प्रतिसादांची क्वालिटी यावर एक पान हवे.
२७. नविन लेखन पानावर पार्श्वभूमी हिरवी आणि फाँट निलसर हिरवा हा कॉम्बो डोळ्यास इतका चांगला नसावा. Contrast वाढवावा.
२८. नविन लेखन मधे धाग्यांना अनुक्रमांक देण्यात यावा.
२९. आजची activity पाहता यावे - नवे धागे आणि जुन्या कोणत्या धाग्यावर किती प्रतिसाद. आठवडा, महिना आणि वर्ष बद्दलही असे करता येईल.
३०. आयडींची activity पाहता यावी- एकूण किती आहेत, किती तास लॉग ऑन असतात, किती लेखन केले, किती प्रतिसाद दिले, इ इ. असले स्टेट असले कि जरा मजा येते.
३१. रँक पोलचे लोजिक सुधारून लिहावे. तो क्रम लावण्याचा प्रकार सुलभ असावा.
३२. ऐसीवर फाईल लोड करता यावी.
३३. एडीटर मधे डायरेक्ट चित्र पेस्ट करता यावे.
३४. इमेज कुठे आणि text कुठे त्याचे लॉजिक सोपे असावे. L img a picture of sunset R img हे शवटी असावे.
३५. कोणत्याही icon खाली हॉवर केल्यावर text येत नाही. ते आले तर क्लिक केल्यावर काय होईल ते कळेल. ऐसीवरच्या सहा सिरियला (काय पाहिले, इ) चे जे आय्कॉन आहेत ते देखिल असेच आहेत.
३६. भाषा मधे language neutral म्हणजे काय?
३७. इतर भाषांचा (संस्थळाला भाषिक अस्मिता आहे कि वैषयिक आहे)उपयोग किती बरा किती वाईट?
३८. लिपी चे option पानाबरोबर सरकू नये. ते सतत दिसावे.
३९. 'नमस्कार अरुणजोशी' म्हणणार्‍याच्या खाली 'माझे खाते, माझे हे, ते' वाचणे चूक वाटते. नमस्कार तिथे नसावा.
४०. माझे खाते, लिपी, उपस्थित सदस्य च्या खाली इतर माहित असावी.
४१. चार पाच गोष्टी कॉपी करून ठेवणारा क्लिप्बोर्ड असावा.
४२. स्पिट समरी अ‍ॅट कर्सर म्हणजे काय?
४३. स्मायलीज फार कमी आहेत.
४४. इनपुट फॉर्म्याट म्हणजे नक्की काय ते मराठीत्ही लिहावे. बरेच लोक आय टी अज्ञ असतात.
४५. दिनविशेष पहिल्या पानावर/ वेगळ्या पानावर जास्त चांगल्यापैकी दिसेल असे पण असावे.
४६. लॉग न करता , इ-मेल देऊन प्रतिसाद देता यावा.
४७. उपप्रतिसाद देताना बाकी लेख, बाकी सगळे प्रतिसाद गायब होऊन नवीन जागी प्रतिसाद टायपाची गरज नसावी. श्रेणी दिली तसाच प्रतिसाद देऊन पुढे जाता यावे.
४८. नविन हे लाल अक्षरात नव्या प्रतिसादासाठी लिहिलेले असते ते मोठ्या अक्षरात असावे.
४९. समजा माझ्याकडे ५० प्रतिसाद एक पानावर अषी सेटींग आहे. दोन नवे प्रतिसाद आले. एक पहिल्या पानावरचा एक दुसर्‍या. पहिला वाचून दुसर्‍या पानावर जाताना तो लाल नविन तिथे नसतो. तो असावा.
५०. लाल नविन पुढे सगळीकडे 'पुढचा नविन' ही लिंक असावी.
५१. वाटचाल मधे धाग्याची लिंक न देता प्रत्येक प्रतिसादाची लिंक द्यावी. माणोस ओळखायला सोपे पडेल.
५२. नव्या आयडींना घाबरून सोडू नये. ते सभ्य असतील तर रुळेपर्यंत सांभाळून घ्यावे.
५३. अचानक कोणी नियम बनवला आहे असे वाटू नये. जुन्या आयडींना कोणाला काय आवडत नाही याची कल्पना असते. नवे आयडी निष्कारण एक समीकरण बनवून बसतात जे नंतर सुधारता सुधरत नाही. त्याकरीता आयडींना आपल्या नियमांची सवती प्रोफाई बनवावी.

आता तुमची बारी.

प्रतिक्रिया

गूगल किबोर्ड जास्त नॅचरल वाटतो. खालील शब्द गूगल किबोर्ड ला लगेच समजतात.

कृपया krupya
ऑन on
आंबा amba

उदाहरण म्हणून दिले. अजून बरेच आहेत. गमभन ला हि स्पेल्लिंग्स कळत नाहीत, उगाच जास्त टाईप करावे लागते.

नवीन येणारया लोकांना गूगल इनपुट कसे इन्स्टॉल करायचे माहित नसण्याची खूप शक्यता आहे, म्हणून डिफॉल्ट मधेच दिलं तर बरं होईल. (तसे टेक्निकली शक्य आहे का, हे मात्र मला माहित नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कीबॉर्ड नॅचरल असण्या/वाटण्यापेक्षा पाठीमागे साधारण योग्य शब्द शोधून घेण्याचा अल्गोरिदम आहे असे वाटते.

अवांतर: म्हणजे गूगल कीबोर्डावर "चोप्य पस्ते" हा शब्द टायपवता येत नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे गूगल कीबोर्डावर "चोप्य पस्ते" हा शब्द टायपवता येत नाही ?

नेहमीचे स्पेलिंग वापरले तर नाही. वेगळे स्पेलिंग वापरावे लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे गूगल कीबोर्डावर "चोप्य पस्ते" हा शब्द टायपवता येत नाही ?

जरा अवघड जातं! वन टू वन मॅपिंग नाहीए.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> गूगल किबोर्ड जास्त नॅचरल वाटतो.

नवशिक्यांसाठी पर्याय म्हणून गूगल कीबोर्ड द्यायला हरकत नाही, पण काय टंकल्यावर काय उमटेल ते स्वच्छ स्पष्ट असलेलं मला आवडतं. त्या दृष्टीनं गूगल कीबोर्ड मला अजिबात आवडत नाही, कारण वर थत्ते म्हणाले त्यानुसार तुम्हाला काय टंकायचं आहे ह्याचा आगाऊ अंदाज करायला तो जातो. माझ्यासारख्याला काय टंकायचं आहे ते स्वच्छ माहीत असतं. प्रसंगी मला मुद्दामहून भाषेशी खेळही करायचे असतात. त्यासाठी मुद्दामहून शब्दांची मोडतोड करायची असते. हे सगळं 'गमभन'मध्ये शक्य होतं, पण गूगलच्या स्बतःच्या अतिशहाणपणामुळे कटकटीचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुद्दा बरोबर आहे. अबनॉर्मल शब्द लिहायला जड जातं गूगलला.

पर्याय दिला तर बरं होईल, गमभन /गूगल असा. Assuming की नवीन वाचकाला गूगल सोपे जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं. पेर्फेच्ते. चौल्डन्त अग्री मोरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इत शोउल्द बे 'चोउल्द्न्त' अग्री मोरे. नोत 'चौल्डन्त'. गोत इत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सोर्र्य फोर थे एर्रोर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो प्रोब्लेम. योउ अरे वेल्चोमे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अम्नोबा कोअण्ता की बोर्ड वआप्रतात? (मनोबांनी हलके घ्यावे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कय बआत है तह्त्तेचआचा! शिअक्लत तुम्ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असले थर्ड वर्ल्ड ऑप्शन्स देण्यापेक्षा अ‍ॅपलचा किबोर्ड जोडता येईल का हो व्यवस्थापकिणबाई?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅपल का? बरं, बरं !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हढी इनो पाठवायची सोय पण करून दिली तर लै बरं होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अॅपल आणि इनोची एकत्र पाककृती अंजीराच्या पानावर मांडून द्या. नाहीतर तुम्हालाच बॅन करेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला सवयीने गमभन सोयीचे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गमभन चांगलं आहे. अदिती, न मोडलेली गोष्ट नको दुरुस्त करूस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

न मोडलेली गोष्ट दुरुस्त न करणं, हे मलाही मान्य आहे.

दुसरं महत्त्वाचं. गूगल आणि ड्रूपालचं इंटिग्रेशन कोणी केलेलं नाहीये. त्यामुळे ज्यांना हवंय त्यांनी आपापलं, आपापल्या कंप्यूटरवर खेळावं एवढीच माझी पेग्रेड आहे. मी पण माझ्या कंप्यूटरवर बोलनागरी वापरते. 'गमभन'सारखं 'अ' टंकत बसावं लागत नाही. इन्शाल्ला, ड्रूपाल ७ वर गेल्यावर अधिक पर्याय मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या म्यानेजरीणबाई लय हुश्शार हायत बगा! आन त्ये ड्रूपाल ७ वर ग्येल्यावर पन " न मोडलेली गोष्ट दुरुस्त न करणं " ह्ये ईसरायचं न्हाई बरं का. नायतर नवा कासरा हातात आल्यागत हुंदडत सुटाल ! Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

:D> Blum 3 :O ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

संस्थळ टिकवायचे असेल तर श्रेणीपद्धती बंद करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

इथल्या लेखांवर मतदान (+१) करता येईल का? रेडीट (reddit.com) सारखे? त्यामुळे पुढे जाऊन लोकांना चांगले लेख लवकर सापडतील, आणि पॉप्युलॅरिटी नुसार सॉर्ट पण करता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांदण्यांची सोय आहे बघा दर धाग्याच्या तळाशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो, पण कळणार कसे कोणत्या लेखाला किती चांदण्या मिळाल्या लेख उघडल्याशिवाय.

त्याऐवजी मेन बोर्डावर लेखाच्या नावाबाजूलाच रेटींग असलं तर लेख उघडायच्या आत कळेल. शिवाय रेटिंग नुसार सॉर्ट करता आले तर अजूनच चांगले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्यामायला खफचा फॉर्मॅट सर्वात नवीन पोस्ट वर ठेवण्याऐवजी सर्वात नवीन पोस्ट सर्वात शेवटी असा का नाही? दर वेळी खफ वरचे लेटेस्ट अपडेट बघायचे असतील तर मागच्या पानावर जाऊन खालपासूनन वरपर्यंत वाचत यावं लागतं. हे काऊंटर इंट्यूइटिव्ह नाही का वाटत? हे बदलता येईल का?

आणखीन एक गोष्ट, खफवर आपण आधी न वाचलेल्या खरडी 'नवीन' अशा ट्याग होऊन दिसतील का? प्रत्येक वेळी आपण आधी कुठपर्यंत वाचलं होतं हे शोधायला त्रास होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या भट ओसरीत नसून भोसरीत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खफचा फॉर्मॅट सर्वात नवीन पोस्ट वर ठेवण्याऐवजी सर्वात नवीन पोस्ट सर्वात शेवटी असा का नाही?

तसे केले तर लेटेस्ट पोस्ट बघायला दर वेळी अंतिम क्लिक करावे लागेल. टोटल पाने पन्नास च्या वर आहेत, तुम्हाला नेहमी पहिले पान दिसत राहील, जे की तुम्ही ऑलरेडी वाचले आहे.

आपण आधी न वाचलेल्या खरडी 'नवीन' अशा ट्याग होऊन दिसतील का?

असे करता आले तर बरेच होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरी सुचवणी आवडली व मान्यही आहे पण सध्याच्या वर्जनला ते कोडिंगशिवाय जमेलसे वाटत नाही. सध्या तरी इथे ते करू शकेल असे कोणी नाही Sad
क्षमस्व!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यात टोगल करता येते का? सध्या येत नसल्यास भविश्यात करता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करता येईल का नाही, याबद्दल मी बोलू शकत नाही. तेवढी माझी पत नाही.

कधी लॉगाऊट झाल्यास तुम्ही म्हणता तसे, प्रतिसाद रिव्हर्स क्रॉनॉलॉजीने दिसतात. प्रायव्हेट ब्राऊजिंग सुरू करून, नवीन खिडकीत ऐसी उघडून लॉगिन न करता वाचता येईल (म्हणजे ब्राऊजरवरचे सदस्यनाम-पासवर्ड ही माहिती तशीच राहील). प्रत्येक धाग्याखाली डिस्प्ले-फ्लॅट असं निवडा. एकदा निवडलं की ते तसंच राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिक्रियान्ची माण्ड्णी:
लॉगिन केल्यावरः क्रोनोलोजीकल
लॉग आउट केल्यावरः रिव्हर्स क्रोनोलोजीकल
असे आहे का?

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जेव्हा google chrome - mobile मधे ऐसी उघडतो तेव्हा प्रत्येक वेळी मला sign in करावे लागते.

हे gmail सारखं default होऊ शकेल का?
एकदा credentials साठवले की ऐसी उघडल्या बरोबर login झालेले असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"क्रोम मोबाइल मध्ये साईन इन" केल्यास ऐसी वर वारम्वार साईन इन करावे लागणार नाही.
(स्वानुभवानुसार)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने