परदेशातील भारतिय

परवाचीच गोष्ट मी ज्या स्पीच क्लबमध्ये जाते तेथिल एका गोर्‍या बाईने एक "काल्पनिक" गोष्ट सांगीतली. तिला पूर्वीचा काळ रेखाटण्याची असाइनमेन्ट होती.या कथेत तिने स्वतःचे नाव गुंफले होते व ते संपूर्ण स्पीच "विचक्राफ्ट अर्थात चेटूकविद्या" या विषयाला वाहीलेले होते. "चेटूकविद्येच्या आरोपावरुन स्त्रियांना देण्यात येणारा मृत्यूदंड" ही अघोरी पद्धत पूर्वी कशी बोकाळलेली होती अन त्याविरुद्ध कोणी काय कार्य केले अशा स्वरुपाचे ते रोचक स्पीच होते.मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे त्या बाईने "इन्डियन स्लेव्ह" टुटूबा म्हणून केलेला उल्लेख.

(१) पूर्वीचे चित्र रेखाटताना तो उल्लेख आवश्यकच असावा अशा संशयाच्या फायद्याला (बेनेफिट ऑफ डाऊट) जागा होती
(२)मला खरच आरडा ओरडा करुन, अर्थात ती बाब मुद्दाम सर्व गोर्‍यांच्या ग्रुपमध्ये निदर्शनास आणून काही साध्य होईलसे वाटले नाही.शिवाय तितकं भांडण माझ्या प्रकृतीला झेपणारही नव्हते.

मग मी स्वतःपुरता "माफक बाणेदार" निर्णय घेतला - (१) तो ग्रुप सोडला (२) त्या ग्रुपच्या प्रेसिडेन्ट्कडे तक्रार नोंदवली. जी त्यांनी कानाआड केली. (३) अन्य एका (सो कॉल्ड) मैत्रिणीकडे मन मोकळे केले.सो कॉल्ड कारण ऑफीसमध्ये कोणी मैत्रिण अशी नाहीये तरी एका सहकारी बाईला हा प्रसंग सांगीतला.

तिने मला काही पॉइंटर्स दिले - (१) ती बाई अमेरीकन इंडीअन स्लेव्ह बद्दल बोलत होती का इंडीअन (२)तिचा उद्देश्यही नसेल कोणाला खाली दाखविण्याचा वगैरे

पण माझे काही दिवस त्रासदायक गेले ते गेलेच. अर्थात त्रासाला प्रत्येक वेळी बाह्य बाबी जबाबदार नसतात, माझ्या पर्सेप्शनमध्ये चूक असावी असे म्हणून मी विचार करत राहीले.

मला निवासी-अनिवासी वाद न घालता अनिवासी भारतियांना हा प्रश्न विचारायचा आहे की-
(१)तुम्ही खंड बदलला. मायग्रेट झालात. पण "खरोखर" इथलेच होऊन रहाण्याकरता तुम्ही काय परिश्रम घेता आणि त्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळते का?
उदाहरणार्थ - सार्वजनिक जागेत आपल्या मातृभाषेत न बोलता कटाक्षाने इंग्रजी बोलणे.
(२) काही नग तुम्हाला "टफ टाइम" देणारच, रेसिस्ट असणारच. असे किती नग तुम्हाला भेटले आहेत? कशा प्रकारे त्यांनी त्रास दिला आहे.
उदाहरणार्थ, एक गे+कॅनेडीअन मॅनेजर अत्यंत हलकट होता. मला व माझ्या एका गोर्‍या सहकार्‍याला क्युब मध्ये बोलावून त्याने माझ्यावर "अप्रत्यक्ष" अपमानांची जी फैर झाडली होती. बाप रे!! अन ती कंपनी अतिशय लहान होती त्यामुळे व अपमान "इन्डायरेक्ट" असल्यामुळे म्हणजे लेकी बोले सूने लागे प्रकारचा, मला बोलता आले नाही.

आजही आम्ही नवर्‍याच्या डिपार्ट्मेन्टल डीनरला गेलो होतो तेव्हा एकाने विचारले "तुमचा देश तुम्हाला भारत वाटतो की अमेरीका." ऑफ कोर्स दॅट वॉज अ माइल्ड प्रोबींग. पण हे प्रश्न या लोकांच्या डोक्यात येतात म्हणजे त्यांना आपण वेगळे वाटतो ही वस्तुस्थिती आहे.

अर्थात हा धागा तक्रारवजा नाहीये. हे सर्व सोसण्याची तयारी असेल त्यानेच बाहेर पडावे. उदा- परा माझा एक मित्र चेष्टेत पण वेल, बोचरं म्हणालाच होता तसे "मग आम्ही तुला सांगीतलं होतं का देश सोड म्हणून?"
किंवा अदिती. तिच्याशी मी "स्त्रियांना गर्दीत येणारे वाईट अनुभव" या विषयावरच्या धाग्याबद्दल बोलताना ऐकले "पण मग स्त्रियांनी बुरख्यात/घरात बसणे हा त्यावरचा उपाय नाहीच्चे" त्याच चालीवर - "थोडाफार वर्णद्वेष सहन करावा लागतो म्हणून देशांतर करायचेच नाही हा उपाय नव्हे."

तर बॅक टू मूळ मुद्दा - धाग्यात १०० तक्रारी असल्या तरी हा धागा तक्रारवजा काढला नसून, हे विचारण्यासाठी काढला आहे की कसे मिसळायचे? काय परीश्रम घ्यायचे? स्वतःच्या वेगळेपणाने उठून कसे दिसायचे? नकी परदेशात कसे रहायचे असते?

एका धाग्यावर कोणीतरी नीरीक्षण नोंदविले होते की - कोणी भारतीय जरा वाईट वागले उदाहरणार्थ न्यू जर्सीत रस्ते सिग्नलशिवाय कसेही बेशिस्त ओलांडणे, पचापच थुंकणे (याइक्स्!!!)या गोष्टी कोणाही भारतीयांनी केल्या तरी आपल्याला, तसे न करणार्‍या अन्य भारतीयांना त्रास होतो कारण आपण स्वतःला "अघोषित देशदूत" समजू लागतो म्हणा किंवा स्वतःला त्या सामाजकंटक कृतीशी समहाऊ आयडेंटीफाय करतो.

मग हे आयडेंटीफाय करणे योग्य की अयोग्य? अन आपण मारे आयडेंटीफाय नकरो, पण हे इथले गोरे आपल्याला व त्या थुंकणार्‍या व्यक्तीला एकाच पारड्यात तोलत असतील तर त्याचे काय? : (

असो असे अनेक प्रश्न आहेत. मुख्य प्रवाहात मिसळण्याची आणि तरीही वेगळेपण जपण्याची धडपड आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

बाहेर वेगळेपणा दाखवू नका, तिथे अमेरिकन व्हा. घरात मात्र भारतीयत्व जपण्यास हरकत नाही, उलट अवश्य जपा. इकडे भारतात नाही का आपण घरात मराठी, पंजाबी, मलयाळी, जैन असतो आणि बाहेर भारतीय असतो? तशीच 'युनिटी इन डाय्वर्सिटी' तिथेही जपता येईल.
मनातल्या मनात : पण हे शिंचे 'भारतीयत्व' म्हणजे नक्की काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रा॑ही भारतियत्व जपणे यामध्ये असंख्य लोकांसाठी असंख्य गोष्टींचा अंतर्भाव असू शकतो. माझ्यापुरता सांगायचे तर भाषा, खाद्यसंस्कृती, सणवार यात मोडता. पण या गोष्टींना नक्कीच मुरड घातली आहे. उदाहरणार्थ - आपल्या भाषेत बाहेर शक्यतो न बोलणे कारण लोकांना नादमय पण असंबद्ध उच्च्ररव कानावर पडल्याने ते अनॉईंग वाटते. तसेच कपडे मुद्दाम भारतिय न घालणे, भारतिय सण घरापुरता मर्यादित ठेवणे वगैरे.
पण मजा म्हणजे - गोईंग अ‍ॅ एक्स्ट्रा माईल्,नाताळ (इथला सण) साजरा करणे, या लोकांच्या संभाषणात सिन्सिअरली भाग घेण्याचा प्रयत्न करणे मग इंग्रजीवर भाषाप्रभुत्व व उच्चार्प्रभुत्व किती का नगण्य असेना.आदि काही गोष्टी केलेल्या आहेत. अर्थात ही गरजच आहे. कोणावर केलेले उपकार नाहीत. पण हे उपाय कमी पडलेले दिसून येतात त्यामुळे अन्य काय केले पाहीजे ही चाचपणी.
इथे लोक हंटींग/फिशींग करतात व त्या विषयावर बोलतात, बरेच जण सॉकर टीम्स(लेकर्स्/वायकींग्ज) वगैरे चे डाय-हार्ड फॅन असतात ते त्याबद्दल बोलतात. या विषयात गती नसेल तर, आपली थोडी गोची होते.
मला व्हरमाँट. डेलावेअर, कॅलिफोर्निआ, पेन्सिल्वेनिआ. टेक्सास आदि स्टेट्मध्ये न आलेला "अ‍ॅक्सेंट" चा प्रचंड प्रॉब्लेम विस्कॉन्सिन्/मिनेपोलिस मध्ये होतो आहे. त्यामुळे खूप एकटं पडायला होतय हेही खरं आहे कारण कितीदा "परत बोला/परत बोला" करणार? - आपणदेखील अन ते लोकं देखील.
मला जाणून घ्यायचे आहे की काही समस्या या अनव्हॉइडेबलच आहेत (उदाहरणार्थ अ‍ॅक्सेंट) पण अनेक अशा गोष्टी असतील ज्यावर आपले नियंत्रण आहे पण आपण करत नाही. अशा कोणत्या सुचताहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला व्हरमाँट. डेलावेअर, कॅलिफोर्निआ, पेन्सिल्वेनिआ. टेक्सास आदि स्टेट्मध्ये न आलेला "अ‍ॅक्सेंट" चा प्रचंड प्रॉब्लेम विस्कॉन्सिन्/मिनेपोलिस मध्ये होतो आहे. त्यामुळे खूप एकटं पडायला होतय हेही खरं आहे कारण कितीदा "परत बोला/परत बोला" करणार? - आपणदेखील अन ते लोकं देखील.

दाक्षिणात्य (त्यातही खास करून दाक्षिणात्य कृष्णवर्णीय) आघात आपण बहुधा कधी ऐकला नसावात, असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजमध्ये अनेक कन्नडीगा मुली होत्या, नोकरीत अनेक तमिळ लोक भेटलेले आहेत पण अप्रत्येक वेळेला "परत बोल" म्हणण्याचा प्रसंग आलेला नाही. दाक्षीणात्य उच्चार पचनी पडले. गोर्‍या लोकांच्या (तेही विस्कॉन्सिन्/मिनेपोलीस मधील) उच्चारांइतके न कळणारे उच्चार कोणाचेच ऐकले नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आमचे" दाक्षिणात्य!

(अ‍ॅज़ इन, सदर्नर्स. सदर्न युनायटेड स्टेट्सची जनता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां हां जॉर्जिआ वगैरे का? अरे हो एक मुलगी आहे इथे पण मी तिला परत "विस्कॉन्सिअनच" गणतेय. हो ती अटलांटा ची आहे. कसला भयानक अक्सेन्ट आहे Sad मला कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर तुम्ही वेगळे आहातच तर तुमचा अॅटिट्यूड असा हवा की मी वेगळी आहेच पण ते वेगळेपण राखून मी तुमच्यात मिसळायला तयार आहे.
जर इतर सारे आपले आचार, ऊच्चार वेगळे असूनही संवाद साधू शकतात तर तुम्ही कमीपणा घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही लिहील्यात त्या गोष्टींचा त्रास होतो कधी कधी. पण ते जर फुटबाॅल / बेसबाॅलचे फॅन असतील तर माझे क्रिकेट असते की. माझा असा अनुभव आहे की आपण त्यांचे अगत्याने ऐकून घेतले तर तेही आपले विषय ऐकून घेतात.
पण मला असे वाटले की तुम्ही इंडीयन स्लेव्हवर आक्षेप घ््यायला नको होता. कारण तो त्या वक्त्याचा वैयक्तिक अनुभव असावा. मला तरी त्यात काही गैर वाटले नाही.

- शेखर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न तुमच्यासाठी परदेशीयां बरोबर नेमके कसे अ‍ॅडजस्ट करुन घ्यायचे ? असा साधा सरळ प्रॅक्टीकल च आहे का ? म्हणजे तो तितकाच मर्यादीत असेल तर मग ठीक आहे पण तो जर माझी आयडेंटीटी काय आहे ? आणी त्या संदर्भातील असेल तर मग तो फार खोलवर जाणारा आहे. कारण एकाच व्यक्तीच्या अनेक ओळखी असतात आणि त्या परस्पराशी विसंगत ही असतात.
अजुन एक महत्वाचा प्रश्न तुम्ही ब्राम्हण आहात का ? नसाल तर ठीक आहे, असाल तर मात्र एक जबरदस्त सिच्युएशन क्रीएट होताना दिसतेय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण असल्याने काय सिच्युएशन निर्माण होत असावी बरं. मी सर्व खाते - बीफ्/पोर्क अन अन्य सर्व मांसाहारी पदार्थ. आई, बाबा, सासूबाई तीघे भिन्न भिन्न जातीचे आहेत पण वडीलांचीच जात जर लागत असेल तर मी ब्राह्मण नाही. आता बोला नक्की काय सिच्युएशन होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीफ/पोर्क अन् अन्य सर्व मांसाहारी पदार्थ खाण्या-न खाण्याचा नि ब्राह्मण असण्यानसण्याचा नेमका काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार फार पूर्वीची गोष्ट आहे काही विशिष्ठ जाती सोडल्यास ब्राह्मण अभक्ष्य भक्षण (ज्याला आता मांसाहार म्हणतात) ते करत नसत. अजूनही काही लोक (*) (ज्यात मी येत नाही) तीच अपेक्षा बाळगून असतात उदाहरणार्थ - बामणांनी मटन महाग केलं अशी वाक्ये ऐकायला मिळतात.यावर प्रत्युत्तर म्हणून कोणीतरी अन अन्य लोकांनी शिक्षण महाग केले असे वक्तव्य केल्याचे माझ्या वाचनात आले होते.
माझ्या वाचनात आले म्हणजे ते "न"वी बाजू या व्यक्तीच्या वाचनात आलेच असेल असे नाही हे मान्य आहे.

*- कुमार कौस्तुभ हे त्या प्रकारात मोडणारे असतील तर या विचाराने मी म्हणून वरील उहापोह केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार फार पूर्वीची गोष्ट आहे काही विशिष्ठ जाती सोडल्यास ब्राह्मण अभक्ष्य भक्षण (ज्याला आता मांसाहार म्हणतात) ते करत नसत. अजूनही काही लोक (*) (ज्यात मी येत नाही) तीच अपेक्षा बाळगून असतात उदाहरणार्थ - बामणांनी मटन महाग केलं अशी वाक्ये ऐकायला मिळतात.यावर प्रत्युत्तर म्हणून कोणीतरी अन अन्य लोकांनी शिक्षण महाग केले असे वक्तव्य केल्याचे माझ्या वाचनात आले होते.

त्या सर्वांची वाक्ये ही ब्रह्मवाक्ये (आणि त्यांच्या अपेक्षा ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ) कधीपासून होऊ लागली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कधी म्हटले की "सारीका" हा आय डी फकस्त ब्रह्म्वाक्यांचेच दाखले देते अन देणार Wink Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक महत्वाचा प्रश्न तुम्ही ब्राम्हण आहात का ? नसाल तर ठीक आहे, असाल तर मात्र एक जबरदस्त सिच्युएशन क्रीएट होताना दिसतेय..

हे जरा अधिक स्पश्ट कराल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

ते खर्‍या (रेड)इंडीयन स्लेव्ह्जबद्दल बोलत नव्हते हे नक्की ना?

बाकी, आपणच आपली ओळख वेगवेगळ्या स्तरावर जपत असतो. "आपण कसे आहोत?" आणि "इतरांच्या नजरेत कसे असायला हवे / असलेले आवडेल?" यामध्ये द्वीधा निर्माण झाली की बरेच प्रश्न निर्माण होतात.

असो. या निमित्ताने बर्‍याच वर्षांपूर्वी उपक्रमावर विकास यांच्या 'ओळख' या लेखावर याच्याशी समांतर चर्चा झाली होती. ती वाचणे उद्बोधक ठरेल अशी आशा आहे. मुळातील लेख/प्रकटनही वाचनीय आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.

हा ऐडेंटिटी क्रैसिस फक्त मराठी माणसाला जास्त जाणवतो की काय असे वाटले जरासे आपले उगीचच. नैतर गुज्जू, मार्वाडी, पञ्जाबी हे औत्तरेय आणि समस्त दाक्षिणात्य हे जाईल तिथे आपापला मिनीघेट्टो तयार करतात अशी ख्याती आहे म्हणून विचारले इतकेच. आणि लेखाशीही सहमत आहे. इतरांशी पूर्ण मिसळू पाहिलं की असे अण्भव येणारच. सबब आब राखून योग्य ते अंतर ठेवलेलेच बरे. अन मुख्य म्हणजे हा न्यूनगंड भारतीयांमध्येही मराठी लोकांना जास्त असावा असे वाटते. खरेच याचे कोडे उलगडत नाही. सांस्कृतिक स्वाभिमानाचे इतके खच्चीकरण झालेले असते काय लिब्रळ होण्याच्या नावाखाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ऐडेंटिटी क्रैसिस फक्त मराठी माणसाला जास्त जाणवतो की काय असे वाटले जरासे आपले उगीचच.

कल्पना नाही. माझ्या परिचयातील बहुतांश भारतीय जन्तेलाच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला हा क्रायसिस जाणवताना कोणत्या ना कोणत्या प्रसंगात पाहिले आहे. भारतीयांत प्रमाण जास्त असावे किंवा कसे हे मी खात्रीने सांगू शकत नाही कारण इतर देशीय व्यक्तींबद्दल काही सांगायला सँपल सेट मला पुरेसा वाटत नाही.

भारतातल्या भारतात माझा मित्रपरिवार हा मोठ्या प्रमाणात अ-मराठीच आहे. आणि असा क्रायसिस प्रत्येकाला असतोच असतो.

नैतर गुज्जू, मार्वाडी, पञ्जाबी हे औत्तरेय आणि समस्त दाक्षिणात्य हे जाईल तिथे आपापला मिनीघेट्टो तयार करतात अशी ख्याती आहे म्हणून विचारले इतकेच.

हे निरिक्षण रोचक असले तरी असे घेट्टो बनवणं हेच मुळात हा ऐंडेंटिटि क्रायसिस व त्यायोगे येऊ पाहणारा न्यूनगंड लपवायचा क्षीण प्रयत्न आहे असे मला वाटत राहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रैट्ट. घेट्टो तयार करणे हा एका अर्थी क्रैसिसचा परिणाम म्हणता येईलही, पण त्याचे प्रकटीकरण पाहिले तर सेल्फ-अ‍ॅसर्शन अजून दृढ आहे असे दिसते. क्रैसिस असे म्हणालो तरी मला न्यूनगंड असे म्हणायचे होते. अन्य भारतीयांना न्यूनगंड कितपत असतो काय माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अन्य भारतीयांना न्यूनगंड कितपत असतो काय माहिती.

जे गट जितके कडवे (असल्याचे दाखवतात/भासवतात) तितका त्यांना न्यूनगंड अधिक असे ढोबळपणे म्हणता यावे काय? Smile

तसे असल्यास एक गट म्हणून मराठी गटाचा क्रमांक सुरूवातीच्या काही जणांत लागावा. व्यक्ती म्हणून एकटे असताना मात्र हा न्यूनगंड भोवताली कमी जाणवतो - ज्यांच्यात जाणवतो ते इतके कोशात जातात की त्यांचे असणेच लक्षात येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म, तसे असावे खरे. Smile या न्यूनगंडाचे रूपांतर सेल्फब्याशिङ्गमध्ये करण्यात मात्र मराठियाञ्चा हात कवणे धरणे नोहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin
खरंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Thanks for the link Rishikesh. I will read it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पोस्ट वाचून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Wow! Too good an article. I feel exact the same - Nancy how do you make a pie, Nancy what is considered good manners, Nancy who taught you to modulate tone when talking, Nancy teach me this /teach me that ......... I want to be your shadow. ADOPT me like a sister.

OMG!!! This is exact I feel Meghana.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

I want to be your shadow. ADOPT me like a sister.

याचा भारतीयत्त्वाशी किंवा अमेरिकनत्त्वाशी - पक्षी मूळ चर्चाविषयाशी - असलेला संबंध समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तुम्ही खंड बदलला. मायग्रेट झालात. पण "खरोखर" इथलेच होऊन रहाण्याकरता तुम्ही काय परिश्रम घेता आणि त्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळते का?>> + I suggest, kindly read the link quoted by Meghana.

In foreign country most times person becomes acutely aware of the cultural gap, the differences between main stream & his/her culture. From that gap stems the identity crisis. One feels a need to learn new ways of that country ppl, relearn own strengths in order to impart the same to new country.

>>>>>> जर कोणी मला विचारलं, की अमेरिकन संस्कृतीबद्दल मला काय वाटतं, तर मी म्हणेन, "मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअर मधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तीभावाने सिनॅगॉगमधे Hebrew School ला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात???">>>>

I was echoing the above mentioned feeling of that article. I sincerely agree with the same feelings.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती लिंक वाचली. राग मानू नका मोकळेपणाने सांगायचे झाले तर इतर काही करायला नसले की असे प्रश्न सुचतात असे वाटते.

मी आणि बायको दोघे मोठ्या ग्रोसरी शॉपमध्ये जातो तेव्हा तीदेखील किती वेगळ्या वस्तू उचलते हे पाहून मला (आणि माझ्या खिशाला) आश्चर्य वाटते. त्यामुळे अशा प्रसंगात दोन देशांच्या नागरिकांच्या किंवा संस्कृतीच्या मानसिकतेचा काही संबंध आहे असे वाटत नाही.

प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते कदाचित मला अशा cultural gap स्वरुपाचे अनुभव विशेष वाटत नाहीत. ते सामान्य आहेत असे वाटते. भारतातील शहरी जीवन आणि अमेरिकेतील मध्यमवर्गीय जीवन यात आता खूप मोठा सांस्कृतिक फरक राहिला आहे असेही वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राग अजिबात नाही. प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीकोनामधून आलेल्या प्रतिसादांचे स्वागतच आहे. सगळीच मते एकाच माळेचे मणी असते तर शिकायला कुठून मिळाले असते?

१० वर्षांपूर्वी मी जेव्हा नुकतीच अमेरीकेत आले होते तेव्हा रोज रात्री कमीत कमी १२-१ पर्यंत एक कंपनी राबवत असे. तेव्हा ना झोप ना कौटुंबिक स्वास्थ्य ना व्यायाम - कशालाही वेळ नव्हता असे ३ वर्षे चालले अन मी खूप कंटाळले होते. पण त्या काळात कोणी एक व्यक्ती एका विशिष्ठ कलेच्या अभिव्यक्तीबद्दल फार भरभरुन बोलत होती. लंडन बेसड एका कलाकाराने अनेक तात्पुरती टिकणारी मंडलं बनवली होती त्याबद्दल सिनेमा होता व त्या सिनेमाबद्दल ते मत होते. अन मी पटकन बोलून गेले (स्नॅप्ड अ‍ॅट) की वेळ फार असला की असली थेरं सुचतात. यांच्याकडे भूक, गरीबी, कमावण्याची धडपड असे प्रश्न नसल्याने अशा मंडलं अन तत्सम "तात्पुरती" कला सुचते. ऑफ कोर्स माय रिमार्क वॉझ नॉट "रिसीव्ड" टू वेल.

तेव्हाच्या दिवसांची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अजूनही मूळ प्रश्न समजलेला नाही. जन्मदेशात काही काळ घालवल्यानंतर प्रौढवयात दुसऱ्या देशात आल्यावर पूर्णपणे तिथले होता येत नाही या धनंजय यांच्या निरीक्षणाशी सहमत आहे. मात्र जर कायदेशीर नियम पाळून दुसऱ्या देशात राहत असल्यास, आणि दुसऱ्या देशातील रहिवाश्यांवर तुमची संस्कृती छटपूजा स्टाईलने लादत नसाल तर याउप्परही 'तिथलेच' होणे यात आणखी काही अपेक्षित आहे का? एकदा प्रश्न समजल्यावर उत्तर शोधता येईल.

I want to be your shadow. ADOPT me like a sister.

यामागे नक्की काय अपेक्षित आहे हे समजलेले नाही.

हा प्रतिसाद अत्यंत प्रामाणिकपणे विचारला असून त्यात उपरोध किंवा अपमान अपेक्षित नाही हे आधीच स्पष्ट करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सर्वच गोष्टी पॉइंट आउट करता येत नाहीत. पण जोपर्यंत स्पीच क्लब जॉइन केलेला नव्हता तोवर बराच आलबेल होते. ग्रुपमध्ये थोड़ा सवता सुभा मला वाटू लागला.(लक्षात येऊ लागला म्हणत नाही कारण may be my perception was that way )

(१) इम्प्रोमपटू स्पीच मध्ये मला मुद्दाम वेगळे प्रश्न विचारणे (putting at spot) वगैरे भेदभाव मला वाटला. तो तसा नसेलही.
(२) कोणाची तरी Ugly sweater competition होती तर सगळे जुन्या बाजारात गेलो होतो. तिथे तू येथून काही घेत का नाही? जरुर घे अशा प्रकारचा "प्रेमळ" आग्रह - मला आवडला नाही. It may be unintentional.

ग्रुपमध्ये जा अन मग निरीक्षण करा एवढीच विनंती. याउप्पर मला जास्त विस्ताराने सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके भेदभावांबाबत असेल तर निदान मला तरी तुमचा अटिट्यूड चुकीचा वाटतो. (to each his own)

एकतर मला तेवढाच भेदभाव भारतात वाट्याला आला आहे. मी मराठा नसल्यामुळे गावात असताना आणि ब्राम्हण नसल्यामुळे पुण्यात आल्यावर थेट आणि आडून असे दोन्ही प्रकारचे भेदभाव भारतात अनुभवले आहेत. अमेरिकेतही असे भेदभाव अर्थातच जाणवले आहेत. गंमत म्हणजे अमेरिकेत भारतीय लोकही जास्त discrimatingly वागतात (भारतीय वंशाचे अमेरिकन सिटीझन्स किंवा ग्रीनकार्डधारक vs वर्कव्हिसाधारक) असे निरीक्षण आहे. परंतु सवय असल्याने दुर्लक्ष करता येते ;). पण माझे सगळे सोडून मी स्थानिक लोकांची सावली व्हावे (दुधात विरघळलेली साखर वगैरे) असे मला निश्चितच वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमत म्हणजे अमेरिकेत भारतीय लोकही जास्त discrimatingly वागतात (भारतीय वंशाचे अमेरिकन सिटीझन्स किंवा ग्रीनकार्डधारक vs वर्कव्हिसाधारक) असे निरीक्षण आहे.

Somehow I have failed to notice this trait.

Thanks for your input अतिशहाणा ji.
I am particularly expressing this incidence to test whether I have been over critical, moody, sensitive with other people. As per your input & the paradigm shift that came after Dhananjay's comment, I am indeed reading between the lines. I was suspecting it but am quite sure now.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित अनिवासी भारतीयांच्या रेसिडेन्सी स्टेटसऐवजी हे जातीशीही संबंधित असावे. मी त्यावर फारसा विचार केला नाही पण सुरुवातीला पॉटलक किंवा तत्सम गेटटुगेदर कार्यक्रमांना येणारी निमंत्रणे 'तुमच्यात असं नसतं?' हे कळाल्यानंतर हळूहळू कमी होत जातात व तुम्हाला टाळले जाते हे दोनतीन शहरांमध्ये अनुभवले आहे. असो. यात जातीबरोबरच प्रांतभेद, भाषाभेद वगैरे अनेक पैलूही असतील. बहुसंख्य भारतीय माणसे कुठेही गेली तरी जात सोडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्ञानदा देशपांडे नामक एक समाजशास्त्रज्ञ आहेत (पीयच्चडी फ्रॉम बर्कले युनवर्शिटी). त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी याबद्दल एके ठिकाणी लिहिलेले आहे.

"पहिल्या फळीत आलेले उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय भारतीय होते. त्यांच्या बोच-या जातीय-ब्राह्मणी-जाणिवा आता ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ बनल्यात. ब्राह्मणेतराना ‘चॅरिटेबली’ सामावून घेतल्यासारखं दाखवायचं आता ‘अनकूल’ ठरलंय. माझ्या एका कार्यक्रमात आलेल्या नितीन कांबळे या आयटी तज्ञानं जेव्हा ही स्पर्धात्मक गुणवत्तेच्या वेष्टनाखालची आयटीवाल्यांची जातीयता खेचून बाहेर काढली तेव्हा मला कसनुसं झालेलं आठवतंय."

संदर्भ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा. मजेशीर लेख आहे. काही निरीक्षणे नेमकी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks for the link. It's interesting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Gyanbachi Mekh - This speech group is my FIRST group here. I haven't tried getting involved in any group. That may be reason.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण माझे सगळे सोडून मी स्थानिक लोकांची सावली व्हावे (दुधात विरघळलेली साखर वगैरे) असे मला निश्चितच वाटत नाही.

नेमके!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा प्रतिसाद बघून तुम्हांला देवनागरी टंकण्यात अडचण येत नसावी असे वाटते. मग बाकीच्या ठिकाणी इतके इंग्रजीत का टंकले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Please ask such questions in KHAVA. ASk me & I might answer. Good luck.
________________________

Mihir, one machine does not support Devnagri font. I have to go to Kavitakosh.org & type in there which is very cumbersome. But another machine supports the font. It depends on which machine I am logged in.
Sorry to have snapped at you. Sad
I just thought that "Avantar" but I could have mentioned in nice way.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मला सावली व्हायचे आहे" या रूपकात अतिरेकी स्वहनन आहे - स्वतःचे शरीर शिल्लक न ठेवणारी दुसर्‍याची छाया.

परंतु इंग्रजीतले "फ्लाय ऑन द वॉल" हे रूपक त्याच जातकुळीचे असूनही रिवाजामुळे स्वघातक वाटत नाही.

एखाद्या समाजातले लोक आपापसात, तिर्‍हाइतापुढे धरलेला मुखवटा न घालता, कसे वागतात? हे कुतूहल योग्य आहे. आणि त्याकरिता त्या समाजात काही प्रकारे सवयीचे, किंवा एका प्रकारे अदृश्य व्हावे लागते. लग्न करून किंवा बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेंड म्हणून परदेशी कुटुंबात प्रवेश मिळवला की वेगळा घरगुती पैलू बघायला मिळतो. तो पुष्कळदा शाळा-कॉलेज वा ऑफिसमित्रांच्या घरी जाऊन मिळत नाही.

फक्त रोटीचा व्यवहार ही अनौपचारिकतेची पहिली पायरी आहे खरी, तरी रोटीबेटीच्या व्यवहारापेक्षा ती स्थिती पुष्कळच औपचारिक असते.

----
परवा एक पक्क्या अमेरिकन आजीबाई मला सांगत होत्या : त्यांचे आजी-आजोबा आयर्लंडहून यू.एसमध्ये आले आणि लहानपणी त्या बॉल्टिमोरमध्ये मध्यमवर्गीय खात्या-पित्या घरातल्या होत्या. परंतु बॉल्टिमोर शहराच्या "पहिल्या कुटुंबांपैकी" त्या नव्हत्या आणि तशा समाजात त्यांची ये-जा नसे. !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I didn't mean shadow as in "dissolving my self" & imitating. It meant so that I can be with Nancy & learn details about her culture I wouldn't know otherwise.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सावली होणं" अतीच अजीजी केल्यासारखं (वाईट भाशेत बोलायचं तर लाचार झाल्यासारखं वाटलं.)
"मला तुमच्यात मिसळायचय; गप्पा गोष्टी करायच्यात " इतकं सांगितलं तर पुरे ठरलं असतं.
अर्थात कुणाला काय आणि किती पुरे ठरावे हा ही ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे वगैरे आहेच.
मला स्वतःला माझ्या मायभूमीतही alienate झाल्यासारखच वाटतं.
त्यासाठी विदेशात जायची गरज पडलेली नाही.
लोकं शारुख चांगला की सल्मान ? ह्यावर तातावाने गप्पा हाणतात. आपण आपले गप बसतो.
बरं, तिथं डाळ शिजत नाही म्हणून इतरत्र गेलो तर डायरेक शारुख्-सल्मान ह्या हीन थिल्लरीकरणातून सुटका होते पण डायरेक "मोझार्ट व बीथोवेन " ह्यावर गाडी सरकते तेव्हा अजूनच तामिळ ऐकल्यासारखा चेहरा होतो. ऐसीवरच पहायचं झालं तर मंडळी कास्ट अवे, शेरलॉक वगैरेचा मूळ इंग्रजीतून आस्वाद घेउन गप्पा हाणतात. इथे ऑफिसात व मित्रवर्गातही बरेचसे तसेच आहे. ते सर्व बाउन्सर जाते.
मग आहोत तसे ठीक आहोत, हे शांतपणे मान्य करण्यात हरकत नसावी. बाकी , वागणूक -मिसळणं ह्या हळूहळू, निरंतर होत असणार्‍या प्रक्रिया आहेत; त्या होण्यासाठी आपल्या बाजूनं पावलं उचलावित; पण लागलिच फरक दिसला नाही तर उतावीळ व हताश होउ नये. केविलवाणं , अगतिक तर अजिबात होउ नये. त्यापेक्षा माज केलेला बरा. (खरं तर तोही करुच नये; पण अगतिक होण्यापेक्षा माज बरा.) स्वर्गाचा रस्ता दूरवरचा म्हणत धीर धरावा.
.
.
पुन्हा एकदा :-
अर्थात कुणाला काय आणि किती पुरे ठरावे हा ही ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे वगैरे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरती धनञ्जय यांना "सावली" म्हणजे काय त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तेवढं मेघना ने दिलेला लेख वाचला तर सावली म्हणजे नक्की काय म्हणायचाया ते कळलं असतं अन लाचार वगैरे vaaktaaDan स्फुरले नसते. याउप्पर ज्याची त्याची जाण ज्याची त्याची समज बोलून गप्प बसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी.
अवांतर :- मूळ लेखावर फारशी कमेंट दिली नाही. "सावली" हा शब्द दुसर्‍या ठिकाणी दुसर्‍या स्थळावर दिसला. तो संदर्भ अधिक दोक्यात होता, हा कमी.
भाषा सौम्य वापरली तर संदेश नीट पोचण्याची शक्यता असते ; अन्यथा समोरचा दुखावतो हे ठाउक असलं तरी वारंवार विसरतो.
प्रामाणिकपणे म्हणतोय .क्षमस्व.
वरील प्रतिसाद पुन्हा अधिक सौम्य भाषेत लिहिण्याचा प्रय्त्न करत आहे.:-

"सावली होणं" नको तितकं नम्र झाल्यासारखं किंवा इतरांना जरा जास्तच मोठेपणा दिल्यासारखं वाटलं.
"मला तुमच्यात मिसळायचय; गप्पा गोष्टी करायच्यात " इतकं सांगितलं तर पुरे ठरलं असतं.
अर्थात कुणाला काय आणि किती पुरे ठरावे हा ही ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे वगैरे आहेच.
मला स्वतःला माझ्या मायभूमीतही alienate झाल्यासारखच वाटतं.
त्यासाठी विदेशात जायची गरज पडलेली नाही.
लोकं शारुख चांगला की सल्मान ? ह्यावर तातावाने गप्पा हाणतात. आपण आपले गप बसतो.
बरं, तिथं डाळ शिजत नाही म्हणून इतरत्र गेलो तर डायरेक शारुख्-सल्मान ह्या हीन थिल्लरीकरणातून सुटका होते पण डायरेक "मोझार्ट व बीथोवेन " ह्यावर गाडी सरकते तेव्हा अजूनच तामिळ ऐकल्यासारखा चेहरा होतो. कारण अगदिच असं जागतिक सिनेमाचं वगैरे आपल्याला एक्स्पोजर नाही, अजून तितकी आपल्याला जाण नाही; ह्याची जाणीव आहे.
ऐसीवरच पहायचं झालं तर मंडळी कास्ट अवे, शेरलॉक वगैरेचा मूळ इंग्रजीतून आस्वाद घेउन गप्पा हाणतात. इथे ऑफिसात व मित्रवर्गातही बरेचसे तसेच आहे. ते सर्व बाउन्सर जाते.
मग आहोत तसे ठीक आहोत, हे शांतपणे मान्य करण्यात हरकत नसावी. बाकी , वागणूक -मिसळणं ह्या हळूहळू, निरंतर होत असणार्‍या प्रक्रिया आहेत; त्या होण्यासाठी आपल्या बाजूनं पावलं उचलावित; पण लागलिच फरक दिसला नाही तर उतावीळ व हताश होउ नये. अगतिक तर अजिबात होउ नये. त्यापेक्षा माज केलेला बरा. (खरं तर तोही करुच नये; पण अगतिक होण्यापेक्षा माज बरा.) स्वर्गाचा रस्ता दूरवरचा म्हणत धीर धरावा.
.
.
पुन्हा एकदा :-
अर्थात कुणाला काय आणि किती पुरे ठरावे हा ही ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे वगैरे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

This is that para -

"मला एक दिवस खरी सावली म्हणून इथे जगायचंय. माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या घरात तिच्या पाठोपाठ शिरायचंय. ग्रोसरी स्टोअर मधे आम्ही दोघी जातो, पण ती किती वेगळ्या वस्तू उचलते! मग ती घरी जाऊन त्यांचं काय करत्येय ते बघायचंय. माझ्यासारखा तिच्याकडेही असेल पसारा? कोणतं गाणं लावते ती, संध्याकाळी थकून घरी आल्यावर! शनिवारी ती जाते का भक्तीभावाने सिनॅगॉगमधे Hebrew School ला? तिच्या मुलांच्या वाढदिवशी Sprinkler Party म्हणजे नक्की काय करतात???"

मनातल्या मनात यादी करतांना मी शेवटी थकून जाते. सगळ्या गोष्टी शिकता येतात, पण संस्कृती? अदृश्य भिंतीसारखी ती खुणावते, पण दार सापडत नाही. कधी मला वाटतं ती धबधब्यासारखी आहे, पण माझे फक्त तळवेच टेकलेत कसेबसे पाण्यात. बाकीची मी- अधांतरी! कदाचित सावलीचं प्राक्तनही ह्यापेक्षा बरं असेल!

How amazing that it has captured the essence so well that I yearned to put in this article.
___________

Also, Man don't say sorry. I understand sometimes there is magnified effect of words. May be it was my fault too. So chill! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावातून शहराकडे गेलेला माणूस असो वा शहरातून विदेशी, एक वेगळेपणाची वा अस्वीकृत असल्याची भावना घेऊन चालला आहे असे असू शकते. असे असो वा नसो, आपले मनोगत दाबून ठेवायचे आणि हसते दिसायचे, ज्याचा प्रघात आहे त्यात हो ला हो मिळवायची ही संस्कृती आहे. हा धागा त्या वाटेपासून दूर आहे, मनोगत मोकळे करण्याची जागा आहे, वाचून बरे वाटले.

कदाचित ऐसीवर भारतीय शहर्‍यांचा असा धागा असता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या सहकारी बाईंचा मुद्दा क्रमांक १ बरोबर आहे. टिटूबा ही बहुधा अमेरिकन आदिवासी समाजातली होती (पूर्ण किंवा काही अंश-वंश) , आणि गुलामही होती (दुवा).

तपशिलात गेलो, तर या घटनेच्या संबंधात राष्ट्रीय उगमभेदाचा (discrimination by national origin) अनुभव जाणवायला नको होता.

अर्थात, एखाद्या घटनेतून दुसर्‍याच, पण महत्त्वाच्या विषयाबाबत अंतर्मुख होऊ शकतो. ते ठीकच आहे.

(१) प्रौढ वयात स्थलांतरित झालेल्यांना "पूर्णपणे" तिथले होता येत नाही, असे वाटते. तरी. मुद्दाम प्रयत्न केला नाही, तरी माझ्या बोलण्याचा हेल गेल्या १५-२० वर्षांत बदललेला आहे. आजकाल माझे बोलणे अमेरिकेतील लोकांना ("पुन्हा हळू सांगता का?" असे न विचारता) लगेच समजते.
माझा "आपला" समाज वेगवेगळ्या देशांतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांचा आहे. त्यांच्यात मी चांगला मिसळतो.

(२) थेट अपमान करणारे नग क्वचित भेटतात. ऑफिसात अजून भेटलेले नाहीत. बाजारात वगैरे क्वचित भेटले आहेत. सप्टेंबर ११, २००१ नंतरच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात विमानतळावरती एका व्यक्तीने "इथे बाँब करण्याऐवजी घरी जा" म्हणाला होता. आणि मागे काही वर्षांपूर्वी २००४च्या त्सुनामीनंतर रस्त्यावरच्या एका दरिद्री/देवभोळ्या व्यक्तीने थांबवून विचारले : "ज्या अर्थी तुमच्या तिकडे एवढा मोठा प्रकोप झाला, तो देवाकडून पापाची सजा म्हणून असला पाहिजे." दोन्ही प्रसंगी मी कुठलाही वाद घातला नाही, आणि संवाद थांबवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Dhanjay you are awesome!!!!!!! I am grateful to you for this link & for paradigm shift that dawned off that link. Indeed Liz mentioned of Abigil Williams in her story!!! OMG!!!! This is great .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म, वर्ण, जात, भाषा, लिंग, खाण्यापिण्याच्या सवयी, आर्थिक स्तर यासार्या गोष्टींवरून कळत-नकळत अपमान करणारे लोक मला भारतात आणि भारताबाहेर सारख्याच प्रमाणात भेटले आहेत पण भारतापेक्षा परदेशात ते व्यक्त करण्याच्या पध्दतीत थोडे अधिक 'साटल्य' असते असे जाणविले आहे. त्यामुळे इतरांना आपल्याहून कनिष्ठ दाखवून हिणविणे म्हणजे आपण महान असल्याचे लक्षण असा त्यांचा स्वभाव असे गृहित धरून मला पुढे जाता येते. या गोष्टींना भारताबाहेर राहिल्याने मला अधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. नोकरी-व्यवसायातही मला समान संधी मिळाल्या आहेत असेही प्रामाणिकपणे वाटते, जवळच्या मित्रमैंत्रिणींतही भारतीय आणि परदेशी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि त्यांच्याकडून अतिशय स्नेहपूर्ण, प्रेमळ वर्तुणूकीचा अनुभव आला आहे. ह्या सगळ्यामागे केवळ मी नशीबवान आहे असे नसून माझ्या जीवनशैलीचा आणि मी प्रयत्नपूर्वक केलेल्या काही गोष्टींचा भाग आहे असे वाटते.
मी जेंव्हाजेंव्हा स्थलांतर केलेय तेंव्हा फक्त आर्थिक किंवा तत्सम संधींसाठी मारून-मुटकून नवीन देश स्विकारतेय असे समजण्याऐवजी आपल्या अनुभवांची क्षितिजे रुंदावण्यासाठी स्थलांतर करतोय या भावनेने केले असल्यामुळे नवीन जागेचा इतिहास, संस्कृती, भाषा-साहित्य, खाद्यपदार्थ, राजकारण या सगळ्यात आस्थेने रस घेतला आहे. त्यामुळे स्थानिक व्यक्तींशी बोलताना मला विषयांची कधीच उणीव भासली नाही. आपण इतरांच्या आवडीच्या विषयांत रस घेतला की तेही आपल्याशी 'आपल्या' विषयांवर बोलतात आणि आपल्याबद्द्ल जाणून घ्यायला उत्सुक असतात असे समजल्यामुळे मलाही माझे वेगळेपण कधीच दडपून ठेवावे लागले नाहीय. मला स्वयंपाकात रुची आहे त्यामुळे मला इतरांना घरी बोलावून खाऊ-पिऊ घालायला आवडतं, इतरांकडून त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्द्ल शिकायला आवडतं. नवीन मित्रमैत्रीणी बनवताना अशा अघळपघळ जेवणावळींचा खूप उपयोग होतो. जेवणाच्या टेबलावर माणसे मोकळी होतात, औपचारिकतेच्या पलिकडे जाऊन जिव्हाळा तयार होतो. स्थानिक लोकांचे नातेसंबंध आधीच बनलेले असतात पण नवख्या व्यक्तीला हे नातेसंबंध प्रयत्नपूर्वक बनवावे लागतात, हे एकदा मान्य केले की असे प्रयत्न सोपे होतात. असे करणे म्हणजे आपल्याकडे कमीपणा घेणे असे नसून आपल्या बाजूने सुरुवात करणे असते. एक मात्र नक्की आहे की हे मैत्रीचे संबंध बनविताना मुळात आपल्याला ही व्यक्ती आवडते का, आपल्याला त्या व्यक्तीकडून काही शिकता येईल का, त्या व्यक्तीशी आपली मूल्ये जुळतात का याचा मात्र विचार जरूर करते (केवळ परदेशीच नव्हे तर भारतीय व्यक्तींशी मैत्री करतानाही हेच निकष वापरते).
ज्यांच्याशी अशी जवळीक तयार होऊ शकत नाही पण ज्यांच्याबरोबर काम करावे लागते तेंव्हा शक्यतो अकारण कडवटपणा टाळते म्हणजे भेटल्यावर काही औपचारिक पण खेळीमेळीचे बोलून संबंध गोड ठेवते पण त्यांच्या वर्तणूकीने स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्याचे टाळते.
हे सगळं केल्याने मला माझे 'भारतीयपण' गुंडाळून ठेवावे लागलेय असे मुळीच नाही. जे बंध मला हवेसे होते ते आजही आहेतच पण आता अजून काही नवीन बंधही निर्माण झालेत ज्याचा माझ्या भारतीयत्वाशी काही संबंध नाही हेही खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks Ruchi.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पचापच थुंकणे (याइक्स्!!!)या गोष्टी कोणाही भारतीयांनी केल्या तरी आपल्याला, तसे न करणार्‍या अन्य भारतीयांना त्रास होतो कारण आपण स्वतःला "अघोषित देशदूत" समजू लागतो म्हणा किंवा स्वतःला त्या सामाजकंटक कृतीशी समहाऊ आयडेंटीफाय करतो.

- (तंबाखू खाऊन वगैरे) पचापच थुंकणे ही भारतीयांची/भारतवर्णीयांची खासियत नाही. (आपण दक्षिणेत - "आमच्या" दक्षिणेत; बोले तो, सदर्न युनायटेड स्टेट्समध्ये - कधी फारशा फिरकल्या नसाव्यात, अशी शंका येते. किंवा, फिरकल्या असलातच, तर "लालमाने" ज्यांना म्हणतात, त्या पब्लिकशी आपला फारसा संबंध आला नसावा, असे वाटते. आमच्याकडे पैशाला पासरी मिळतात.)

- आपण "(घोषित किंवा अघोषित) देशदूत" वगैरे तर अजिबात नाही. (ही "घोषित किंवा अघोषित देशदूतत्वा"ची खुळचट संकल्पना ज्याने कोणी सर्वप्रथम शोधून काढली - तो भारतवर्णीयच असावा, याबद्दल निदान माझ्या मनात तरी संदेह नाही; स्वतःबद्दल आणि स्वजातीयांबद्दल/स्ववर्णीयांबद्दल पराकोटीच्या आणि विनाकारण न्यूनगंडाच्या बाबतीत भारतवर्णीयांचा हात धरू शकणारे आजमितीस त्रिभुवनात शोधल्यास कोणी सापडू शकेल, याबद्दल मी व्यक्तिशः साशंक आहे. - तो जिवंत असल्यास, मराठीत, त्याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी देणे अत्यावश्यक आहे. इंग्रजीत, ही शुड बी टेकन औट अ‍ॅण्ड शॉट.)

मग हे आयडेंटीफाय करणे योग्य की अयोग्य? अन आपण मारे आयडेंटीफाय नकरो, पण हे इथले गोरे आपल्याला व त्या थुंकणार्‍या व्यक्तीला एकाच पारड्यात तोलत असतील तर त्याचे काय? : (

हू केअर्स? व्हाय शुड एनीवन केअर?

उद्या मी जर अमेरिकेतील तमाम गौरवर्णीयांची गणना (मग ते स्वतः करोत वा ना करोत) "लालमान्यां"मध्ये करू लागलो, तर माझ्या मताची दखल घेतली जाईल काय? घेतली जावी काय?

तूर्तास एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hahaha. We have a curling club near our home. One FRI me & my husband we went their to see car racing. Most public was Red neck public. I didn't know that term till my husband told me.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपमानव्यंजक संज्ञेचा वापर.
- कलोअहेवि Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

(तंबाखू खाऊन वगैरे) पचापच थुंकणे ही भारतीयांची/भारतवर्णीयांची खासियत नाही.

(तंबाखू खाऊन वगैरे) जागच्याजागी पचापच थुंकणे ही भारतीयांची/भारतवर्णीयांची खासियत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0