Skip to main content

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

ललित लेखनाचा प्रकार

राजेश घासकडवी Sun, 05/01/2014 - 05:40

भारी. या ग्रीकांच्या कथात रामायण महाभारतातल्यासारखी अस्त्रं नव्हती. त्यातही रामायणाच्या दूरदर्शन मालिकेत यायचे तसले बाण तर नाहीतच. एक डावीकडून लालपिवळे रंग फिरवत टिव डिव डिव डिव करत यायचा, दुसरा उजवीकडून निळे हिरवे रंग वेगळ्या पॅटर्नमध्ये फिरवत ड्याव ड्यूव ड्याव ड्यूव करत यायचा. कुठचा डावीकडून येतोय आणि कुठचा उजवीकडून येतोय हे कळण्यासाठी अनेक वेळा ते दाखवून झाल्यावर बऱ्याच वेळाने एकमेकांना बरोब्बर आपटून पडायचे. मग पुन्हा सुरू. यांच्यात काय, भाला - फेकला - लागला किंवा चुकला. त्यामुळे लोकं दणादण मरतात.

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 15:16

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद :)

बाकी सहमत आहे, पण यांचं इम्याजिनेशन अंमळ कमीच म्हणावं लागेल. यांचे देव प्रत्यक्ष युद्धात भाग घेतात आणि आपल्या फेव्हरीट योद्ध्याच्या बाणाला स्वतः हात लावून त्याची गती वाढवणे, विरुद्ध बाजूच्या योद्ध्याला चकवणे, इ. प्रकार करतात. त्याउलट आपल्याकडे एकदा तपश्चर्या करून वरदान मिळवलं की देव उरला आशीर्वादापुरता किंवा अँटिडोटपुरता. अस्त्रे हे बाकी भारतीय पेटंट आहे, नाद नै करायचा. शिवाय बी आर चोप्रांच्या सीर्यलमध्ये जसे बाण एकमेकांवर कोसळायचे ते रिप्रझेंटेशन जुन्या मंदिरांच्या शिल्पांमध्ये आहे तस्स्से बघून अंमळ भडभडून आले. लै खत्रा शिल्पे आहेत.

अवांतरः महाभारतात जी काही अस्त्रे नमूद आहेत त्यांपैकी कुठले अस्त्राचा प्रयोग करताना कुठला मंत्र म्हणावा याचे मॅन्युअल असलेले एक जुने हस्तलिखित नुकतेच दक्षिणेत मिळालेले आहे.

बातमी.

मन Sun, 05/01/2014 - 14:03

लेख वाचल्यावर लगेच डोोक्यात आलेल्या प्रतिक्रिया :-
१.२अजॅक्स - डायोमीड हे हुमदांडगे दिसतात.
२.पॅरिस ला लोकांच्या पायात ,मांडित, टाचेवर लपून बाण मारण्याचा छंद दिसतो.
३.५ तुकडयाअ घेउन पायी खंदक कसा काय ओलांडाता येइल? खंदक म्हणजे प्राणिसंग्रहायलात असलेला प्राणी बाहेर येउ नयेत म्हणून खणलेला खोल खड्डा असेल, तर तो पायी कसा ओलांडाणार? त्यासाठी पूल वगैरे बांधायचं वर्णन दिसलं नाही.
.
.
४.ुद्धाचे पारडे बराचवेळ समतल राहिले. अखेरीस हेक्टरच्या "हरहर महादेव" ने त्याची तुकडी बुरुज चढून पुढे आली. दरवाजा तर काही केल्या फोडणे अवश्यमेव होते. शेवटी हेक्टरने एक भलाथोरला धोंडा घेतला आणि नीट नेम धरून, पूर्ण वजन टाकून दारावर नेमका मध्यभागी आदळला. त्या डबल डोअरला मागे दोन आडणे तिरपे बसवले होते. हेक्टरच्या आघाताने ते दोन्ही आडणे मोडले, दाराच्या दोन्ही बिजागर्‍याही मोडल्या आणि दारही तुटले. दगड त्याच्या वजनामुळे पुढे आत जाऊन पडला.
बाब्बौ. हा तलवार -भाला ह्यातच तरबेज बसून दगड-धोंडे असले अधिक ताकतीचे उद्योगही अचूक करायचा वाट्टं./
.
.
५.ग्रीकांकडचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर ट्यूसर याने इंब्रियस नामक ट्रोजन योद्ध्याला ठार मारले. भाला फेकला तो सरळ कानाखाली घुसला. इंब्रियस जागीच कोसळला.
धनुर्धर की भाला-धर आपल्या युधिष्ठीरासारखा?
.
.
६.आता अकिलिसची खणखणीत नि रक्तरंजित एण्ट्री होणार असं दिसतय.

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 14:46

In reply to by मन

अजॅक्स अन डायोमीड हे लैच हुमदांडगे होते.

पॅरिस अधूनमधून लढल्याचे वर्णन आहे याच भागात पण ते क्रॉप केलेय =))

खंदकाचं असं आहे की तो दौलताबादच्या किल्ल्याबाहेर असतो तितका मोठा खंदक नव्हता. जहाजांभोवती माती-लाकडाची भिंत, त्याभोवती लाकडी वासे अन थोडासा खड्डा इतकाच प्रकार होता. त्यामुळे तटबंदीपर्यंत पायी जाणे अवघड नव्हते. शिवाय हे लक्षात घेतले पाहिजे की ग्रीक जहाजे समुद्रकिनार्‍याजवळ पार्क केलेली होती, त्यामुळे उंचवटा वैग्रे भानगडी फार कै नसणारच.

धोंड्याने मारामारी हे हेक्टर, पॅट्रोक्लीस, डायोमीड, अजॅक्स, इ. अनेक लोकांचे वैशिष्ट्य आहे.

ट्यूसरने एकदोनदा भालाफेक केली, पण तो मूळचा धनुर्धारी होता.

अकिलीसची एंट्री फारच जबराट आहे. कळायचं बंद होतं तो आवेश पाहून.

अजो१२३ Sun, 05/01/2014 - 14:03

लैच मोठा लेख आहे. हळूहळू भरवायला पाहिजे होता. या इतिहासाची पूर्वीपासून माहिती असेल तर रसग्रहण सोपे जाईल.

राही Sun, 05/01/2014 - 19:51

१)बुळगटशिरोमणि, गडॅशगडॅश, अन्झेपेबल वगैरे शब्द होमरच्या महाकाव्यात पाहून (आधीच्या भागांप्रमाणेच) खूपच करमणूक झाली. रामायण-महाभारतात हे शब्द कुठे कुठे वापरता येतील याचा तर्क करता करता वेळ मजेत गेला.
२)लेख दोन भागात करायला हवा होता. एका वेळी इतके डीटेल्स 'अन्झेपेबल' वाटले.
३)लेख आवडला. (हेवेसांनल)

बॅटमॅन Sun, 05/01/2014 - 23:30

In reply to by राही

धन्यवाद :)

रामायण-महाभारतातही खूप ठिकाणी हे शब्द वापरता येतील.

लेख दोन भागात करायला हर्कत नव्हती पण कथाभाग फार पुढे सरकत नसल्याने एकच भाग केला. बाकीचे डीटेल्सच जास्त आहेत, ते नक्की कुठे क्रॉप करावे याबद्दल इथून पुढे नीट पहावं लागेल असं दिसतंय. त्यातले बरेच डीटेल्स रोचक असल्याने ठेवले इतकंच. ते ओव्हरलोड होत असल्यास क्रॉप करेनच, णो प्रॉब्ळेम.

ऋषिकेश Mon, 06/01/2014 - 16:28

आरामात वाचायला बाजुला ठवला होता.. आज वाचला
लै झ्याक!
आता पुढल्या भागाला वेळ नका लाऊ (नैतर लावा .. वेळ लावा. वेळ लाऊन नंतर इतकं छान काही देणार असाल तर वेळ लागलेला चालेल :) )