घासकडवी - नगरीनिरंजन पैज

(ही बातमी वाचलीत का धाग्यावर पीक ऑइल विषयीची चर्चा फारच गमतीदार व्हायला लागली म्हणून हा स्वतंत्र धागा बनवला आहे. ऐसी अक्षरे या माध्यमातून सदस्यांनी एकमेकांशी पैसे लावून पैजा लावणे योग्य नाही. पण ही पैज एक चर्चा म्हणून महत्त्वाची वाटते.)

मुद्दा असा आहे की 'पीक ऑइल' मध्ये तेल संपणार, ऊर्जा संपणार आणि त्यामुळे प्रचंड उत्पात होणार असं अनेक जण अनेक वर्षं ओरडत आहेत.

पीक ऑईल म्हणजे तेल संपणार असे कोणीही म्हणत नाही पण पीक ऑईल थियरिस्ट्सना सरसकट दुर्लक्षित ठेवण्यासाठी अशी मतं वापरली जातात.
अजूनही बरंच तेल जमिनीत असेल पण ते काढण्यासाठी $१५० किंमत द्यावी लागेल आणि बहुतांश अर्थव्यवस्थांना ते परवडणार नाही असे म्हणणे म्हणजे तेल संपणार असे म्हणणे नाही. कृपया विपर्यास करु नये. पीक ऑईल म्हणजे पीक ऑईल प्रॉडक्शन रेट होय.
शिवाय पीक ऑईल म्हणजे तेल खूप महाग होत जाईल असेही नाही. अर्थव्यवस्थांचा वेग मंदावल्याने उलट मागणी न वाढल्याने तेलाच्या किंमती एका मर्यादेच्या पुढे वाढणार नाहीत.
जितक्या लोकांना याची जाणीव असेल तितका उत्पात कमी होईल. (लोकांना अंधारात ठेवले नाही तर उत्पात व्हायचे कारण नाही.)
असो. बाकी १० वर्षाच्या काळाची निवड पाहून पॉल एह्लरिच व जुलियान सायमन यांच्या प्रसिद्ध पैजेची आठवण झाली. त्या दशकात सायमनने पैज जिंकली खरी पण ती जास्त वर्षांसाठी असती तर सायमन हारला असता.
Economists have noted that Ehrlich would likely have won if the bet had been for a different ten-year period.Asset manager Jeremy Grantham wrote that if the Simon–Ehrlich wager had been for a longer period (from 1980 to 2011), then Simon would have lost on four of the five metals. He also noted that if the wager had been expanded to "all of the most important commodities," instead of just five metals, over that longer period of 1980 to 2011, then Simon would have lost "by a lot." He concluded, "So, please "Cornucopians," let's not hear any more of the Ehrlich-Simon bet ... Ehrlich's argument was right (so far).

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

मग आपण लावायची का घासकडवी - नगरीनिरंजन बेट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येत्या दहावर्षांत (१ जानेवारी २०२४ रोजी) जागतिक क्रूड ऑइल + लीज कन्डेन्सेटचे उत्पादन ८० एमडीबीपेक्षा जास्त असेल आणि ब्रेन्ट क्रूड बॅरलची किंमत आजच्या $१०० पेक्षा कमी असेल तर चूक कबूल करुन तेव्हाचे १००० युएसडी द्यायला हरकत नाही. Smile
संदर्भासाठी:
EIA world oil production
वा
Historical production sheet EIA

स्पॉट किंमतीच्या संदर्भासाठी:
Spot prices EIA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम, तो हजार डॉलरचा भाग काढून टाकू. आपल्यासाठी ब्रॅगिंग राइट्स पुरेसे ठरावेत. बाकी पैजेत नक्की काय असावं याच्या वाटाघाटी स्वतंत्र करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या पैजेच्या निमित्ताने माझेही विचार थोडे स्पष्ट होतील अशी आशा आहे.

अजूनही बरंच तेल जमिनीत असेल पण ते काढण्यासाठी $१५० किंमत द्यावी लागेल आणि बहुतांश अर्थव्यवस्थांना ते परवडणार नाही असे म्हणणे म्हणजे तेल संपणार असे म्हणणे नाही. कृपया विपर्यास करु नये. पीक ऑईल म्हणजे पीक ऑईल प्रॉडक्शन रेट होय.

हे मान्यच आहे. तांत्रिक व्याख्या मांडून विपर्यास करण्याची इच्छा नाही. मला खरं तर त्याहीपलिकडे जायचं आहे. प्रत्यक्ष प्रॉडक्शन रेट काय आहे, पीक ऑईल आहे की नाही, याहीपेक्षा माझी खात्री आहे ती म्हणजे तेल संपण्याच्या/कमी होण्याच्या प्रक्रियेत मनुष्यजातीला फारसा त्रास होणार नाही. म्हणजे 'तेल संपणार' असं म्हणतात म्हणून त्यांचं चूक असं नाही, तर 'अराजक माजणार, सावळागोंधळ होणार' अशा बागुलबोव्यावर अविश्वास आहे. एहर्लिक आणि सायमन यांनी कुठल्यातरी धातूंच्या किमतींबद्दल पैज लावणं मला काहीसं पोरकट वाटलं होतं. कारण पॉल एहर्लिकने जे भीषण चित्र रंगवलेलं होतं ("By the year 2000 the United Kingdom will be simply a small group of impoverished islands, inhabited by some 70 million hungry people ... If I were a gambler, I would take even money that England will not exist in the year 2000.") त्यासाठी त्याने अधिक उंच बार ठेवायला हवा होता.

त्यामुळे पैज लावायची तर ती तेलाच्या किमती आणि उत्पादनावर न लावता जगावर होणाऱ्या परिणामांबाबत लावावी असं माझं मत आहे. (कदाचित तेलाचं उत्पादन वाढलं आणि किमती बदलल्या नाहीत तर त्यात ते अंतर्भूत असेल. कदाचित किमती त्याच रहाव्यात ही अट जास्त कडक असेल.) म्हणून मी खालील बाबींचा विचार करतो आहे.

- सिग्निफिकंट ऊर्जा टंचाई जाणवणार नाही.
- ऊर्जेपोटी सिग्निफिकंट मार्केट फ्लक्चुएशन्स होणार नाहीत.
- भारतासारख्या विकसनशील देशांचा विकासदर विशिष्ट पातळीच्या वर राहील.
- तेल उत्पादन कमी झाल्यास इतर ऊर्जास्रोत त्यांची जागा घ्यायला सहज उभे राहतील.
- तेलाची किंमत आजच्या १०० डॉलर इतकीच राहील असं म्हणण्यापेक्षा आज आजच्या १०० डॉलरच्या तेलात जे मिळू शकतं तेच दहा वर्षांत आजच्या १०० डॉलरमध्ये मिळणाऱ्या तेलात मिळू शकेल. हा थोडा सटल मुद्दा आहे. पण उदाहरण द्यायचं झालं तर कार्सचं घेऊ. आज जर शंभरातल्या पन्नास लोकांकडे गॅलनला ३० मैल देणाऱ्या गाड्या असतील, आणि २०२४ मध्ये १५० पैकी ७५ लोकांकडे गॅलनला ४५ मैल देणाऱ्या गाड्या असतील तर जरी पेट्रोलची किंमत दीडपट झाली असली तरी त्यातून मिळणारा आनंद कमी झालेला नाही.

हे सगळं क्वांटिफाय करणं कठीण आहे, पण मी लवकरच थोडा प्रयत्न करून बघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझेही विचार या निमित्ताने स्पष्ट करायला आवडेल.
पीक ऑईल म्हटलं की लगेच सगळं डूम-ग्लूम नाही हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. माणसांसाठी तर हे अजिबात वाईट नाहीच उलट उपकारक ठरेल जर वेळीच याचा विचार करून तयारी* केली तरच.
औद्योगिक संस्कृतीच्या प्रकृतीसाठी मात्र तेलाचे उत्पादन न वाढणे धोकादायक आहे आणि औद्योगिक संस्कृतीशिवाय आपण जगू शकणार नाही यावर ठाम विश्वास असल्यास याचा वस्तुनिष्ठपणे विचार करणे नकोसे वाटते आणि आपण डिनायल मोडमध्ये जातो.
सध्या आपल्या ऊर्जेचा ८०% भाग तेल (३१.५%), वायू (२१.३%) आणि कोळसा (२८.८%) जाळून मिळतो. जैवइंधने, आण्विक, जलविद्द्युत वगैरे मिळून १९% आणि रिन्युएबल्सचे प्रमाण फक्त १% आहे यावरून आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येईल. (http://www.iea.org/publications/freepublications/publication/KeyWorld2013.pdf)
दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचा विचार करताना फक्त तेलाची उपलब्धता आणि त्याचा वापर इतकाच करून चालणार नाही. तेलाचा वापर आपल्या आयुष्यात इतका मुरला आहे की तेलाचे उत्पादन वाढत नसल्याचे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थे पासून मानवी संबंधांपर्यंत प्रत्येक पैलूवर होईल.
तेल महाग झालं म्हणून एफिशियंट गाड्या काढल्या आणि लोकांनी त्या घेतल्या अशी अर्थव्यवस्था चालत नाही. अर्थव्यवस्था गुंतवणूकीच्या परताव्यावर चालते आणि त्यामुळेच सतत वाढत राहिली नाही तर कोलमडते.
तेलाचे उत्पादन न वाढण्याचे कारण आहे ते शोधून खणून काढण्याची किंमत वाढणे.
तेलाचे सोपे-सोपे साठे संपल्याने अवघड जागी जाऊन तेल काढावे लागते आणि त्यासाठी खर्च जास्त येतो. एक्सॉन मोबिलने नवे तेलसाठे शोधण्यासाठी व विकसित करण्यासाठी गेल्यावर्षी सात अब्ज डॉलर्स खर्च केले पण त्यामानाने त्यांचे उत्पादन तेवढे वाढलेले नाही. या वाढीव खर्चासाठी तेलाची वाढलेली किंमत हे प्रोत्साहन आहे. वाढलेल्या किंमतींमुळे तेल कंपन्यांना विक्रमी नफा होऊ शकतो (आठवा एक्सॉन मोबिलचा गेल्या वर्षीचा विक्रमी नफा) पण तेलाची किंमत वाढल्याने इतर उद्योगांना फटका बसायला सुरुवात होते. उदाहरणार्थ औद्योगिक शेती तेलावर प्रचंड प्रमाणावर अवलंबून आहे; यंत्रे, कीटकनाशके, धान्य वाहतूक इत्यादी सगळ्यावर तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम होऊन अन्नधान्याच्या किंमती वाढू लागतात. तसेच इतर उद्योगांच्याही खर्चात वाढ होऊन अर्थव्यवस्था मंदावायला लागते; नफा वाढता राहावा म्हणून काही लोकांचा रोजगार जातो; ज्यांना रोजगार आहे त्यांचे वेतन वाढणे बंद होते.
हळूहळू लोकांची क्रयशक्ती कमी होऊन तेलाचा वापर कमी व्हायला लागतो. सध्या अमेरिकेत जो तेल वापर कमी झाल्याचा ट्रेंड दिसतोय त्यातला काही भाग नॅचरल गॅसच्या मुबलकतेमुळे आणि काही भाग लोकांच्या थकलेल्या क्रयशक्तीमुळे आहे; फार थोडा भाग वाढलेल्या कार्यक्षमतेचा व रिन्युएबल्सचा असेल. लोकांचा तेलाचा वापर अशारितीने घटू लागल्यास तेलाच्या किंमती वाढणे बंद होते आणि त्या स्थिरावतात. तेलाच्या किंमती वाढत नसल्यास तेल कंपन्यांना नव्या तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासासाठी मिळणारे प्रोत्साहन नाहिसे होते. जर किंमती वाढत नसतील तर गुंतवणूकदार या कंपन्यांमधे अतिरिक्त गुंतवणूक करायला तयार होत नाहीत आणि या कंपन्या वाढीव डिविडंड्स देऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यायला सुरुवात करतात.
अशावेळी सरकार कृत्रिमरित्या व्याजदर कमी ठेऊन आणि भरपूर पैसा ओतून लोकांचा रोजगार आणि क्रयशक्ती टिकवायचा प्रयत्न करते. तेलाचे भाव स्थिरावले आणि अर्थव्यवस्था वेगळ्या पातळीवर स्थिरावून वाढेल असे वाटले की थोड्याकाळाने तेलाची मागणी पुन्हा वाढू लागते, मागणी वाढली की किंमत वाढते आणि पुन्हा एकदा कंपन्या नवे स्रोत शोधायला जातात. किंमतींच्या चढ-स्थैर्याची अशी सायकल्स व्हायला लागतात आणि प्रत्येक वेळी काही लोक रोजगाराच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. शेवटी अशी परिस्थिती येईल की मागणी अभावी तेलाच्या किंमती वाढणार नाहीत आणि तेल कंपन्या डबघाईला येतील पण तेलाचा पुरवठा अचानक बंद होऊ नये म्हणून या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करावे लागेल. सरकार या कंपन्या चालवायला घेईल (अनेक देशांत तेल कंपन्या सरकारीच आहेत). या कंपन्या तगवणे व लोकांना सरकारी मदत देणे, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खर्च करणे यामुळे सरकारे कर्जबाजारी होऊ लागतील (झाली आहेत).
तिकडे लोकांचा तेलाचा वापर घटल्याने (कमी गाड्या घेणे, कमी ड्रायव्हिंग करणे इ. मुळे) वाहनउद्योगाला पुरेसा नफा मिळणे अवघड होत जाईल. वाढीव नफा नसल्यास अधिक कार्यक्षम गाड्यांसाठीच्या संशोधनासाठी अधिक खर्च करणे या कंपन्यांना परवडणार नाही. जरी असा खर्च केला तरी तो वसूल करावा म्हणून या गाड्यांची किंमत जास्त असेल आणि लोकांना जास्त पैसे घालून या गाड्या घेणे परवडणार नाही. नव्या गाड्यांचा उठाव कमी होऊन वापरलेल्या गाड्यांच्या किंमती वाढू लागतील, तरुण लोकांना चांगल्या पगाराची नोकरी शोधणे व कार घेणे अवघड होऊ लागेल.
इतकी वेळ यायच्या आधीच सरकार पर्यायी ऊर्जास्रोत विकसित करायच्या कामाला लागले असेलच, पण पर्यायी ऊर्जास्रोतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या विकासासाठीही भरपूर तेल लागते हे सत्य सरकारला केव्हाच उमगलेले असेल. सौर प्रतलांसाठीची खनिजे व अणुऊर्जेसाठीच्या युरेनियम खणण्यासाठी व वाहून नेण्यासाठी, रिअ‍ॅक्टर बनवताना, इमारती बांधताना, इलेक्ट्रिक ग्रिडच्या मेंटेनंन्ससाठी वगैरे तेलाची आवश्यकता असतेच. उद्योगधंद्यांमधे वापरल्या जाणार्‍या कितीतरी रसायनांसाठी तेलाची गरज असते. वाढलेल्या तेलाच्या किंमतीमुळे सरकारच्या पर्यायी ऊर्जा विकासाच्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसलेली आहे. काही मोठ्या सौरप्रतल निर्मिती कंपन्यांना व पवनऊर्जा ननिर्मितीतल्या कंपन्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली आहे. जगभर सरकारे रिन्युएबल्सचा पुरस्कार करत असली तरी या रिन्युएबल्सच्या अत्यंत कमी आर्थिक व ऊर्जापरताव्यामुळे त्यांचे आर्थिक गणित सतत चुकतेच आहे.
हळूहळू सरकारला तेलाचा वापर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आधी व्हावा म्हणून नियम करावे लागतील. नागरी सुरक्षा व बाह्य शत्रूकडून असलेला धोका म्हणा वा घुसखोरी म्हणा रोखण्यासाठी लष्करावरही खर्च वाढवावा लागेल. लष्करासाठी लागणारे तेल, महत्त्वाच्या दळणवळणासाठी लागणारे तेल, शेतीसाठी लागणारे तेल बाजूला काढले जाईल. या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा ताबा सरकार घेईल. रिन्युएबल्स व अणुऊर्जा विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होतील.
त्यात काही लोकांना रोजगार मिळेल पण बहुसंख्य तरुण लोकांना काम मिळणे अवघड होऊ लागेल. त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी अंतर्गत सुरक्षा बळकट करावी लागेल (किंवा आधीच केलेली असेल).
समजा सगळे सुरळीत झाले, रिन्युएबल्स व अणुऊर्जेच्या साहाय्याने (प्रत्यक्षात अनेक देश सरळ कोळशासारखे प्रदूषणकारी मार्ग ऊर्जेसाठी चोखाळतील. http://www.theguardian.com/environment/2012/nov/20/coal-plants-world-resources-institute) किमान घरा-घरात वीज, थंड भागात हीटिंग आणि सुपरस्टोअर्स व मंडयांमध्ये भाज्या-फळे येत राहिली तरी लोकांना आपल्या जीवनशैलीत बरेच बदल करणे भाग पडू लागेल.
अशा वेळी बहुतेक लोकांना कळून चुकले असेल की तेलाने आणलेल्या सुबत्तेइतकी सुबत्ता पुन्हा भविष्यात मिळण्याची शक्यता कमी आहे. या बिंदूवर माणसाचा सामना औद्योगिक संस्कृतीने समाजात प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या हावेशी होईल.
तेलाच्या अतिप्रचंड व स्वस्त ऊर्जेतून आलेला प्रचंड अहंकार, स्वकेंद्रितपणा आणि हाव या स्वत:तल्याच शत्रूंशी माणसाची पहिल्यांदाच समोरासमोर गाठ पडेल. ती माणसाची अंतिम लढाई असेल आणि जर उत्पात व्हायचा असेल तर त्या लढाईत माणूस हारल्यानेच होईल, तेल मिळणे अवघड झाल्याने नाही.

*तयारी काय करायची त्यावरही चर्चा करूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्देसूद मांडणी आवडली. आत्तापर्यंत 'मागणी वाढेल, पुरवठा कमी पडेल, भाव कडाडतील आणि त्यातून अर्थव्यवस्था कोलमडतील' या स्वरूपाचं चित्र वाचलं होतं. पहिल्यांदाच 'भाव वाढल्यामुळे मागणी कमी होईल, नफा कमी होईल, उत्पादन कमी होईल, आणि मंदी येईल' या स्वरूपाचं भाष्य वाचलं.

या विश्लेषणावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तेलाच्या किंमतीबाबत पैज लावणं कितपत सार्थ आहे? कारण तेलउत्पादन घटण्याचे वाईट परिणाम दिसूनही जर मागणी कमी होऊन किमती स्थिर राहणार असतील तर तुमचं म्हणणं बरोबर ठरूनही पैज हरू शकाल. आणि जिंकण्या-हरण्यापेक्षा, आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्यांविषयीचीच पैज असणं योग्य. तुमच्या मांडणीत जी राष्ट्रियीकरण, मंदी, जीवनशैलीत बरेच बदल इत्यादी गोष्टी मांडल्या आहेत त्याविषयी काहीतरी भाकितं करणं योग्य ठरेल.

वर कुठेतरी मी तेलवापर कमी होतो आहे याविषयी आशादायक विधान केलं होतं. अधिक वाचनानंतर पुढील गोष्ट लक्षात आली. अमेरिकेचा तेलवापर कमी झाला आहे त्यातला किंचित काही वाटा गाड्या चांगल्या झाल्या आहेत म्हणून झाला आहे, काही वाटा लोकांनी प्रवासच कमी केल्यामुळे झाला आहे. पण बराच वाटा वस्तूंच्या उत्पादनासाठी होणारा तेलाचा वापर कमी झाला म्हणून झाला आहे. यात उत्पादन आउटसोर्स करण्याचा भाग किती, आणि एफिशियन्सी वाढीचा वाटा किती हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं 'जीवनशैलीत बदल' होतील किंवा होत आहेत याबद्दलही वाद नाही. हे बदल हळूहळू, विनासायास होतील की गचके बसतील याबद्दलच प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विश्लेषणावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तेलाच्या किंमतीबाबत पैज लावणं कितपत सार्थ आहे?

मी फक्त तेलाच्या किंमतीवर पैज लावत नाहीय. उत्पादन वाढल्याने तेलाच्या किंमती कमी झाल्या असे होणार नाही यावर पैज लावतोय.
तेलाच्या किंमती एक तर मागणी घटल्याने कमी होतील किंवा कमी होणार नाहीत.
म्हणूनच तेलाचे उत्पादन ८०एमबीडीच्या वर असणे व किंमत $१०० च्या खाली असणे असे दोन एकत्र निकष मी वरती लिहिले होते.

बाकीच्या बदलांचे स्वरुप इतके वेगळे व अन्य घटकांवर अवलंबून असू शकते की त्याबाबत ठामपणे काहीही भाकित करणे अवघड आहे.
तेल निर्यातदार देशांचे निर्यातीतले उत्पन्न घटल्याने इजिप्तसारखी परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवू शकते.
अन्न-धान्याच्या किंमती निश्चितच वाढणार पण त्यापूर्वीच अन्न-धान्याची वाहतूक न करता जास्तीत जास्त लोकलायझेशनवर भर दिला असेल तर असंतोष टाळता येईल अन्यथा बर्‍याच ठिकाणी अशांतता माजण्याची शक्यता आहे.
भारतासारख्या तेल आयातदार देशांमध्ये कारचे कौतुक कमी करून सायकल वगैरे वापरण्याला प्रतिष्ठा व अग्रक्रम देणे आवश्यक आहे. पण ते वाहनउद्योगाला मारक असल्याने केले जाणार नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की 'तेलाच्या किमती सिग्निफिकंटली वाढणार नाहीत' हे वाक्य तुम्ही मांडलेल्या 'आजचे १०० डॉलर' यापेक्षा खालील पद्धतीने अधिक चांगलं मांडता येईल. हे जर वाक्य खरं असेल तर प्रत्यक्ष उत्पादन किती आहे याने फरक पडत नाही. तेव्हा खालील विधानावर मी पैज लावायला तयार आहे.

(तेलाचा भाव)/(परचेसिंग पॉवर पॅरिटीनुसार दरडोई जागतिक उत्पन्न) यांची गेल्या (२०२० ते २०२३) तीन वर्षांची सरासरी आजच्या (२०१० ते २०१३) सरासरीच्या एकशेदहा टक्क्यांपेक्षा कमी असेल.

-तीन वर्षांची सरासरी घेण्याचं कारण म्हणजे २००७, ०८, ०९ साली झाली तशा ऑस्सिलेशन्समुळे फरक कमी पडेल.
-दहा टक्क्यांची माया एकंदरीतच सिग्निफिकंट वाढीचं प्रमाण म्हणून, वाढती एफिशिअन्सी लक्षात घेण्यासाठी, आणि प्रतिवर्षी होणारे स्विंग्ज थोडे कॉंपेन्सेट करण्यासाठी घेतलेली आहे.
-प्रत्यक्ष उत्पादन किती हा माझ्या मते तसा गौण मुद्दा आहे. त्यामुळे ८० एमडीबीविषयी पैज लावण्याची गरज वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेलाच्या किंमती व्हॅक्य्युममध्ये वाढत नाहीत. तेलाच्या किंमती तेव्हाच वाढणार जेव्हा त्याला मागणी असेल. म्हणजे कोणीतरी त्या वाढलेल्या किंमतींमुळे श्रीमंत होणार. शिवाय मागणीअभावी समजा तेलाच्या किंमती पडल्या तरी "दरडोई" उत्पन्नावर परिणाम व्हायला किती वेळ लागतो हे नक्की नसल्याने तीन वर्षांच्या सरासरीने कळेल असे नाही.
त्यामुळे तेलाची किंमत आणि दरडोई उत्पन्न याची सांगड घालायचे कारण मला दिसत नाही. दरडोई उत्पन्नापेक्षा मध्य (मेडियन) उत्पन्न घेतले तर ठीक आहे.

पीक ऑईल नंतरही किंमती एका मर्यादेपेक्षा जास्त वाढणार नाहीत हे पीक ऑईल थियरिस्ट्ससुद्धा मान्य करतात त्यामु़ळे पीक ऑईलमुळे किंमती सतत वाढत राहातील असे नसून एका ठराविक पट्ट्यात काही काळ (किती ते माहित नाही) हेलकावत राहतील.
पीक ऑईल थियरीला विरोध करणारे म्हणतात की तेलाचे उत्पादन वाढत आहे, मग गेल्या दहा वर्षाचा वाढीचा दरावरून पुढच्या दहावर्षात समजा अगदी ८० एमडीबी नाही तर किमान ७८-७९ एमडीबी होईल अशी त्यांना खात्री असली पाहिजे. शिवाय तेलाची किंमत वाढून अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानामुळे तेलाची मागणी घटल्याने तेलाची किंमत वाढणे बंद होऊ शकते इतकेच नव्हे तर तेल उत्खननाचा व्यवसाय कोसळल्यास तेलाची किंमत कोसळूही शकते.
तेलाचे उत्पादन खरोखरच वाढते आहे आणि ते वाढल्याने किंमती कमी होताहेत हे सिद्ध करण्यासाठी मी सांगितलेले दोन निकष थेट आणि बरोबर आहेत.
तुम्ही सांगितलेले निकष तेलाच्या टंचाईला कोणत्याही उत्पाताशिवाय जग यशस्वीरित्या तोंड देत आहेत हे सिद्ध करणारे आहेत (म्हणजे तेलाची टंचाई होईल हे मान्य करून) पण तो आपल्या पैजेचा विषय नाही.
उत्पात होतील हा माझा दावा नाही आणि त्यावर मी पैज लावलेली नाही. आपली पैज तेलाचे उत्पादन वाढेल की नाही यावर आहे.
तरीही क्रूड तेलाच्या किंमतीच्या मध्य उत्पन्नाबरोबरच्या गुणोत्तराच्या सरासरीवर मी पैज लावायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात उर्जा स्रोत संपतील हेच मला पटत नाही.
एक संपला तर दुसरा उर्जा स्रोत वापरण्याच्या पद्धती शोधल्या जातील इतकेच घडेल.
डिझेलच्या गाड्या गोडेतेलावर धावतील.
फार तर परत कोळश्याकडे वळावे लागेल. जगाचा सध्याचा वेग काहीसा मंदावेल. हे परिवर्तन होताना काही गचके बसतील इतकेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

मंडळी नक्की कशाच्या जीवावर इतकी आश्वस्त असतात?
कितीही आणि कोणतेही इंधनसाठे असले तरी ते सान्त नाहित असे वाटते का?
एकाऐवजी दुसरे वापरले तरी ते संपणार नाहिच का?
की "शिवाय मानव जे मिळतय ते पूर्ण कन्झ्युम करुन संपवायच्या मागे लागतो " हे मान्य नाहिये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

की "शिवाय मानव जे मिळतय ते पूर्ण कन्झ्युम करुन संपवायच्या मागे लागतो " हे मान्य नाहिये ?

'माणसाला आपल्या फायद्याचे जे मिळते ते त्याला तत्कालिक फायदा होत असेपर्यंत कन्झ्युम करतो' हे विधान मला मान्य आहे आणि त्याचे हे वर्तन काही स्वार्थी कारणांमुळे (मानवजातीला पक्षी माझ्या भावी पिढ्यांना हे कदाचित धोकादायक होऊ शकते त्यामुळे) मला अस्वस्थ करते. त्यामुळे इतर जीवांवर काय परिणाम होतात? खरचं होतात का? असल्यास त्यावर काय उपाय करावेत? वगैरेंचा त्या परिणामांमुळे माणसाला फरक पडक असल्याशिवाय मला फार काळजी वाटत नाही. निव्वळ एखादी प्रजाती नष्ट होत आहे म्हणून तिचे चार-दोन जीव वाचवावे (व माणूस (पक्षी मी) कित्ती कित्ती ग्रेट म्हणत फिरावे) यात मला काहीही हशील दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मा. श्री. जुलियन सायमन म्हणाले की पृथ्वीवर सात अब्ज माणसे सात अब्ज वर्षे आनंदाने काहीही अडचण न येता राहतील.
मग कोणीतरी त्यांना सांगितलं वाटतं की भौ सात अब्ज वर्षांमधे तर सूर्यसुद्धा संपेल.
मग त्यांनी सात अब्जाची सत्तर लाख वर्षे केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्यायला दुसरा सूर्य आणायची व्यवस्था होउनच जाइल की आत्त्ता.
येत्या दोनेक शतकात आहे तो सूर्य विझवायची आणि नवा सूर्य बनवायची क्याप्याशिटी माणूस नक्की बनवेल ह्याची खात्री आहे आपल्याला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

येत्या काही वर्षांमधे फ्युजनचे प्रयोग यशस्वी झाल्यास देशोदेशी असे अनेक छोटे सूर्य तयार करून पाळता येतील.
नुसत्या तेलाने इतकी विषमता निर्माण केली, जर फ्युजनचे अमर्याद ऊर्जेचे तंत्रज्ञान खरेच तयार झाले तर काय होईल कल्पना करवत नाही.
Energy And Equity

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वास्तवातील शक्यता :- अवकाशातून energy import ??!!

http://www.loksatta.com/lokprabha/indian-space-program-348955/?nopagi=1

.
.

लेखातील काही अंश :-

...केवळ चीनच नव्हे तर जपानही आता चंद्राच्या बाबतीत वेगळा विचार करतो आहे. जपानला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्य़ानंतर जपानने अनेक बाबींचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली असून त्यात तंत्रज्ञानाची मदत महत्त्वाची आहे. जपानमधील शिमिझू कॉर्पोरेशनने तर आता थेट चंद्रावरून वीज आयात करण्याचा नवा उपाय शोधला आहे. त्यासाठी त्यांचे संशोधक कामालाही लागले आहे. सामान्य माणसाला याबाबत अनेक प्रश्न मनात येणे खूपच साहजिक आहे. पण संशोधकांना मात्र यात काहीच अडचण वाटत नाही. हे सहज शक्य नाही पण अशक्यही नाही, अशी प्रतिक्रिया जगभरातील सर्व संशोधकांनी या प्रकल्पाबाबत व्यक्त केली आहे. संशोधकांची एक मोठी फळी त्यासाठी कामालाही लागली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये चंद्राच्या विषुववृत्ताच्या भागामध्ये म्हणजेच तब्बल ११ हजार किलोमीटर्स लांब अशा गोलाकारात सौरऊर्जेसाठी पॅनल्स बसविण्यात येणार आहेत आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा पृथ्वीवर पाठविली जाणार आहे. त्याच्या उभारणीचे काम चंद्राच्या विषम वातावरणात करण्यासाठी रोबो तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. २०३५ पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फारच रोचक आहे. वीज म्हणजे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह असे मी समजत होतो. चंद्र आणि पृथ्वीमधल्या निर्वात पोकळीतून ही वीज पृथ्वीवर कशी आणणार ते समजले नाही.
एका यानाचा पेलोड लक्षात घेता ११००० किमी लांबीचा सौरप्रतलपट्टा तयार करण्यासाठी लागणारी सगळी सामग्रीतरी २०३५ पर्यंत चंद्रावर पोचेल की नाही शंकाच आहे. कदाचित काही यानांचेच सौरप्रतलात व काहींचे रोबॉट्समध्ये रुपांतर होऊ शकेल अशी ट्रान्स्फॉर्मर याने बनवत असावेत. प्रत्येक यानातून दहा किलोमीटरचा पट्टा तयार होतो असे समजले तरी ११०० याने लागतील २१ वर्षांत; म्हणजे महिन्याला चार!
असो. थर्मोडायनॅमिक्स व फीजिक्सचे अनेक नियम आजकाल सैल करण्यात येत आहेत हे पाहून बरे वाटले.
किती दिवस असं खुरडत खुरडत चालणार? It's time we stop following those rules and start flying!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे ननि किनै फार फार दूश्ट आहेत. सौंशोधकान्ना काम करू देतील की नै!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चंद्रावर जाऊन सौर ऊर्जा मिळवणं हा प्रचंड भंपकपणा वाटतो आहे. पृथ्वीवरच लाखो स्क्वेअर किलोमीटरची वाळवंटं ओस पडलेली आहेत. जवळपास तीन चतुर्थांश भाग समुद्राने व्यापलेला आहे. पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या एक दशसहस्रांश भागातला सूर्यप्रकाश हा सध्याची ऊर्जेची गरज भागवायला पुरेसा आहे. असं असताना चंद्रावर जाणं म्हणजे सायन्स फिक्शन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं असताना चंद्रावर जाणं म्हणजे सायन्स फिक्शन आहे.

सैन्स फिक्षणकारांतर्फे मी वरील वाक्यास आक्षेप घेतो.प.पू. ओकगुर्जी सोडले तर समस्त म्लेंच्छ सैन्स फिक्षणकारांपैकी कुणाचीही कल्पनाशक्ती इतकी जबराट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत.
आणि दशसहस्त्रांश कशाला; औद्योगिक संस्कृतीच्या अस्तानंतर आपली ऊर्जेची गरजही कमी होईलच.
सगळं काही विजेवर चालणार नाही. वीज ही तेलासाठी पर्फेक्ट सबस्टिट्यूट नाही. शिवाय ती साठवून ठेवता येत नाही अशी छोटीशी अडचण असल्याने एव्हर ग्रोईंग उद्योगधंदे शक्य होणार नाहीत.
अखेर कधीतरी पुन्हा गाड्या-कारखान्यांच्या कोलाहलाशिवायचे, जुल्मी वेळापत्रकाशिवायचे शांत-निवांत आयुष्य जगता येईल अशी आशा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसांपासून एक अवांतर शंका इच्यारनार व्हतो, बरी लक्षात आली आत्ता.

इंधनाचे पर्याय कुणी म्हणतं उपलब्ध होतील, कुणी म्हणतं नाही.

ते एक असो. पण इंधन सोडून अन्य रॉ मटीरिअल्सचे पर्याय काय आहेत? पेट्रोलादि इंधनास पर्याय आहे म्हटले तरी लोखंड, तांबे, इ.इ. धातूंना पर्याय काय आहेत? पर्याय मिळाले नसतील तर त्यांचे मायनिंग एव्हरग्रोइंग रेटने झाल्यास प्राब्ळम नै का होणार? मग चंद्रादि ग्रहोपग्रहांवर बोंबलत फिरावे लागेल तेवढ्यासाठी, नै का?

इथेही लोक उदा. देतात औद्योगिक क्रांतीचे. म्हणजे इंग्लंडातील कोळशाच्या खाणीतली कोळशाची लेव्हल खाली गेली होती, तेव्हाच्या टेक्नॉलॉजीनुसार काही येत नव्हतं. मग कुणीतरी तो व्हॅक्यूम पंप शोधून काढला अन कोळसा भसाभस निघू लागला.

पण हे असं इन्डेफिनिटलि शक्य आहे का होणं? नाही वैग्रे ठीके, पण उदा. पुढील १० हजार वर्षे तरी धोका नाही असे चित्र आहे का? नसेल तर काय पर्याय हुडकलेत लोकांनी? माझे स्मरण बरोबर असेल तर रॉ मट्रियलमध्ये क्रांती तादृश झालेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Limits to Growth या पुस्तकात सगळ्या गोष्टींचा उहापोह केलाय. धातूंच्या यिल्डचाही ट्रेंड त्यात आहेच. रिसायकलिंग करून धातू वापरु शकतो, पण त्यातून वाढ होणार नाही.
आणि कोळशाच्या उदाहरणावरूनच जेव्हन्स पॅरडॉक्स मांडला गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. पुस्तक मुळातून वाचेनच-शेवटी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण तूर्तास थोडक्यात शंकासमाधान कराल का प्ळीज? अगदी बेशिकमध्ये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बेशिक सगळ्या स्रोतांचं सारखंच आहे. उत्पादन वाढत जाऊन एका चरम बिंदूपर्यंत जाऊन त्यापुढे वाढत नाही कारण ते खणण्याचा खर्च वाढत जातो.
गेल्या आठवड्यात जगातल्या एका प्रमुख गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने आपल्या अशीलांसाठी काढलेले एक गुंतवणूक पत्रक वाचले.
त्यात खाणकामकंपन्यांमधे यावर्षी गुंतवणूक कशी फायदेशीर व सुरक्षित आहे ते लिहीले होते.
प्रमुख दोन कारणे अशी: १. खनिजांचे विक्रमी उत्पादन झाले आहे म्हणून या कंपन्या भांडवली खर्च (म्हणजे नवी यंत्र-सामुग्री वगैरे) करणार नाहीत आणि २. भांडवली खर्च न केल्याने फ्री कॅश फ्लो जास्त राहून रिटर्न्स चांगले मिळतील.
हे पत्रक कटू सत्य शर्करावगुंठित करुन सांगण्याचा नमुना आहे. सामान्यतः (म्हणजे एफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणावर अचानक वाढली नसताना) अर्थव्यवस्था वाढत असेल व मागणीनुसार खनिजांचे उत्पादन वाढत असेल तर प्रत्येक वर्षच विक्रमी उत्पादनाचे असते कारण त्यावर्षीचे उत्पादन आधीच्या वर्षापेक्षा जास्त असते.
त्यामुळे भांडवली खर्च न करण्याचे कारण विक्रमी उत्पादन नसून कमी मागणी वा परताव्याच्या मानाने वाढीव खर्च यापैकी एक असू शकते.
थोडक्यात या मायनिंग कंपन्या आता ग्रोथ कंपन्या न राहता कॅश काऊज होत आहेत म्हणजेच खनिजांचा उत्पादनाचा दर वाढणार नाही अशी लक्षणे आहेत.
चीन व इतर देशांनी आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत तांब्याच्या खाणी वारेमाप पैसे देऊन विकत घेतल्या आहेत. तांब्याच्या नव्या खाणी सापडण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे आणि आहेत त्या खाणींमध्येही खूप खोलवर खणावे लागत आहे.

तांबे, लोखंड, अ‍ॅल्युमिनियम वगैरे धातूच नव्हे तर अणुऊर्जेसाठी लागणारे युरेनियम मिळणेही खर्चिक होत आहे. एकतर जास्त खोलवर खणावे लागते व दुसरे म्हणजे खणून काढलेल्या ओरमध्ये शुद्ध धातूचे प्रमाणही कमी होत जाते.
पुस्तकात गेल्या काही दशकांमधला विदा दिलेला आहे त्यावरुन अधिक चांगली कल्पना येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विस्तृत विवेचनाबद्दल बहुत धन्यवाद!!!

पुस्तक वाचेनच लौकर. हे सगळं भीषण वाटतं आहे खरं. कधी अंत येईल काय की. अन अंत होईल तेव्हा काय होईल कुणास ठाऊक. इन्शागणपती मी जिवंत नसेन तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदाहरणार्थ आज अनेक धातूंना पर्याय म्हणून प्लॅस्टिकचा वापर होत आहे.

त्यात अडचण ही की हे प्लॅस्टिक पुन्हा त्या मेल्या क्रूड तेलातूनच मिळतं ना?

शिवाय लोखंड/तांबं वगैरे हायली रीसायक्लेबल असतं. आणि प्लॅस्टिकप्रमाणे रिसायकल्ड लोखंडाच्या प्रॉपर्टीज इन्फिरिअर नसतात.

वाढत्या गरजेचा प्रश्न असेलच. पण आधीच्या मागास तंत्रज्ञानामुळे जेथे जाड धातू वापरले जात असतील तिथे आता पातळ धातू शक्य* आहेत. (एका अ‍ॅम्बेसेडरचं लोखंड रिसायकल केलं तर त्यात तीन मारुत्या बनतील असं काहीसं). I mean additional mining is not required to that extent.

* पूर्वी मला ३ मिमी जाडीचे कास्टिंग करता येत नसे म्हणून मी १० मिलिमीटर जाडीचं कास्टिंग वापरत असे. (डिझाइन वाइज ३ मिलिमीटर जाडी पुरेशी आहे).

अर्थात कोणते धातू संपायला आले आहेत वगैरे ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मीमांसा पटणीय आहे खास. धन्यवाद थत्तेचाचा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय प्लॅस्टिक बनवण्यासाठी फालतू क्रूड ऑईल चालतं असं असू शकेल. कल्पना नाही. उदा. लोखंड शुद्धीकरणासाठी जो कोक वापरतात त्यासाठी चांगल्या दर्जाचा कोळसा (मोस्टली इम्पोर्टेड) लागतो. पण वीजकेंद्रात बॉयलरमध्ये जाळायला फालतू कोळसा (देशी) चालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म, तसेही असेल. नैतर क्रैसिस तयार झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्लास्टीक बनवायला इथिलीन आणि प्रॉपिलिन लागतात. हे म्हणजे क्रूड ऑयलचा एकदम निक्का निक्का भाग झाला. शिवाय नैसर्गिक वायूपासून प्लास्टीक बनवतात. त्यातही त्या वायूतला निक्का निक्का हिस्सा लागतो. हामी रिलायन्स आणि गेलमधे दोन्ही प्रक्रिया पाहिल्या/हाताळल्या आहेत. रिच नॅचरल गॅस असेल तरच ही प्रक्रिया व्हायेबल ठरते. If higher alkanes are extracted in the upstream in LNG liquefaction plant, it is not possible to extract polymers from them in the downstream. किंबहुना जामनगरचा रिलायन्सचा पीपीचा प्लॅंट जगातला सर्वात मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निक्का निक्का म्हणजे शुद्ध, हाय क्वालिटी वैग्रे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद.

'फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके' ही काव्यपङ्क्ति वगळता आजवर हा शब्द ऐकला वा वाचला नव्हता. मराठवाड्यात हा शब्द प्रचलित आहे हे बघून छान वाटले. आमच्या मराठवाडीय मित्रांच्या बोलण्यात मात्र हा शब्द आला नव्हता कधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धारोष्ण दूध तसेच पिणयला "निक्कं दूध प्यायलो" असा वाक्प्रचार ऐकला आहे ग्रामीण भागाक्डून आलेल्या लोकांकडून.
व्यक्ती मूळची मराटह्वाडयची का कोल्हापूरची ह्याबद्दल डौट आहे. खात्री नाही. ग्रामीण आहे हे निक्की, आपलं नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओह अच्छा. कोल्हापूरचा असेल तर निक्कं न म्हणता निरसं म्हणेल. धारोष्ण दुधाला आमच्याकडे निरसे दूध म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(कोकणात) निरसं म्हणजे ताजं असं नाही. जे तापवलेले नाही असे दूध ते निरसे (त्यातून फॅट सायीच्या रूपात निघून गेलेले नाही असे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्र माझी अंमळ चूक झाली असं वाटतं. निरसं हा शब्द या अर्थीही वापरलेला पाहिला आहे. पुन्हा कन्फर्मवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निरसं हा शब्द ऐकलेला आहे व निरशा दुधाचा चहा असा हे प्रयोग ऐकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरसं दूध म्हणजे धारोष्ण (५-१० मिनिटापेक्षा कमी काळापूर्वी काढलेलं) असं अगदी नसलं तरी दुधाचे (त्यातही क्रीम न काढलेल्या दुधाचे) एकूण आयुर्मान पाहता तीनएक तासापेक्षा जुनं नसणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद क्लॅरिफिकेशनसाठी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा एकूणात किती काव्यपंक्ति तुम्हाला माहित आहेत. सिरियसली विचारतोय.

लोकांनी काव्य म्ह्णून काहीतरी खरडावं आणि आपण ते तशास तसं लक्षात ठेवावं हे मला फार अन्यायकारक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला किती शब्द ठाउक आहेत?
लोकांनी काही चिन्ह अर्थबोधक म्हणून ठरवावीत आणि आपण ती तशीच वापरावीत हे मला अन्यायकारक वाटातं.
जोक्स अपार्ट, एखादी गोष्ट दुसर्‍अयनं केली आहे, म्हणूनच ती नाकरली पाहिजे हे पटत नाही.
बरं "आता मी इतकय इतक्या काव्य पंक्ती लक्षात ठेवतो" असं म्हणून कुणी सुरु करत असेल असं वाटत नाही.
अहो काव्यपंक्ती लक्षात "राहतात" ; लक्षात "ठेवायच्या" नसतात.
काव्यपंक्ती डोक्यात रुळणे ही मुद्दाम केलेली कृती नसून आपोआप घडणारी क्रिया आहे.
तुम्हालाही काही ना काही गाणी (अगदि पिच्चरची का असेना) लक्षात रहात असतीलच.
काव्यपंक्ती हे तांत्रिकदृष्ट्या नक्की त्याहून काय वेगळं आहे?
बॅटमन बद्दल मला ठाउक नाही, लक्षात कसं ठेवतो ते वगैरे; ते त्यानच सांगावं.
मी जनरल अंदाज व तर्क सांगतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोकांनी काही चिन्ह अर्थबोधक म्हणून ठरवावीत आणि आपण ती तशीच वापरावीत हे मला अन्यायकारक वाटातं.

ठ्ठो ROFL

आणि @अरुणजोशी: फार काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समोर आलेली गोष्ट कुठल्याश्या अनरिलेटेड ठिकाणी आढळल्याचं स्ट्राइक होणे ही ग्रेट अ‍ॅबिलिटी आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बॅटॅचं काव्य लक्षात ठेवणं, ते योग्य त्या ठिकाणी आठवणं मला कौतुकास्पद वाटतं, अगदी निके हा शब्द (जो त्याने क्वचितच ऐकलाय) तो सांगायला देखिल त्याच्याकडे एक काव्य आहे म्हणजे नवल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याचं कुणी कौतुक केलं की माझ्या पोटात दुखतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ग्राइप वॉटरची बाटली आहे, पाठवू का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

त्यावरून

"काय झालं???"

"बाळ रडत होतं."

"ग्राईप वॉटर दे त्याला. तू लहान असताना मीही तुला हेच देत होते."

ह्या वर्ल्डमेफमस झैरातीचं इडंबण आम्ही

"काय झालं???"

"बाळ रडत होतं."

"दोन लाथा घाल त्याला. तू लहान असताना मीही तुला हेच करत होते."

असे करत असू त्याच्या आठवणीने ड्वॉळॅ पाणावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"दोन लाथा घाल त्याला. तू लहान असताना मीही तुला हेच करत होते."

ROFL ROFL __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औद्योगिक संस्कृतीच्या अस्तानंतर आपली ऊर्जेची गरजही कमी होईलच.

हे गंभीरपणे म्हटलेलं आहे की चेष्टेने ते कळलं नाही. जर हे गंभीरपणे तुम्हाला वाटत असेल तर मग आपण क्षुल्लक पेट्रोलच्या किमतीविषयी का पैज लावण्याचा विचार करतो आहोत? कारण पेट्रोल कमी झाल्यावरही पेट्रोलच्या किमती एकतर मंदीमुळे कमी होतील, किंवा इतर स्वरूपात ऊर्जा उपलब्ध झाल्यामुळे कमी होतील. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर जे भविष्य आहे ते किंवा माझ्या डोळ्यासमोर जे भविष्य आहे ते; कुठचंही आलं तरी पेट्रोलच्या किमती वाढत नाहीत. मग संस्कृतीचा अस्त म्हणजे नक्की काय होईल ते सांगा ना, आपण त्याविषयी पैज लावू.

अखेर कधीतरी पुन्हा गाड्या-कारखान्यांच्या कोलाहलाशिवायचे, जुल्मी वेळापत्रकाशिवायचे शांत-निवांत आयुष्य जगता येईल अशी आशा.

हे होईलच, पण कारखाने बंद पडल्यामुळे नव्हे, तर तांत्रिक प्रगतीतून ऑटोमेशन आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढल्यामुळे होईल. ही प्रक्रिया आत्ताच चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गंभीरपणे म्हटलेलं आहे. का ते सांगतो; पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की पेट्रोलच्या किंमती कमी होतील असे मी म्हटलेले नाही. पेट्रोलच्या किंमती एका मर्यादेच्या पुढे वाढणार नाहीत असे म्हटले आहे आणि या दोन गोष्टींमध्ये फरक आहे.
औद्योगिक संस्कृतीचा अस्त म्हणजे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्पादन, देश किंवा जागतिक पातळीवर मालाची वाहतूक, प्रचंड प्रमाणावर आयात-निर्यात हे सगळं कमी-कमी होत जाऊन स्थानिक अर्थव्यवस्थांचा उदय होईल आणि पेट्रोलच्या किंमती एका मर्यादेपुढे न वाढणे हेच असा अस्त व्हायचे प्रमुख कारण आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे अधिकाधिक अवघड प्रक्रियेतून तेल काढण्याचा खर्च वाढत चालला आहे. असा वाढणारा खर्च करण्यासाठी तेल कंपन्यांना तेलाची किंमत वाढती राहणे आवश्यक आहे. तेलाची किंमत वाढती न राहिल्यास नफा न मिळाल्याने या कंपन्यांना तेल काढण्यासाठी खर्च करण्यात काहीही रस नसेल. मुळात असे झाल्यानेच तेलाचा उत्पादन दर वाढत नाहीय. पर्यायी ऊर्जास्रोतांचा विकास करण्यासाठीही तेलाची आवश्यकता आहे आणि आधीच महाग असलेले हे ऊर्जास्रोत अतिरिक्त तेल मिळणे बंद झाल्यास कधीच विकसित होणार नाहीत.
इथे दोन प्रकारची परस्परविरोधी बले कार्य करत आहेत. तेलाच्या किंमती वाढवण्याचा तेल कंपन्या प्रयत्न करतात आणि तेलाच्या किंमती वाढल्या की इतर उद्योगांना ते परवडेनासे झाल्याने मंदी येऊन तेलाची मागणी घटते. किंमत वाढली तरच उत्पादन वाढेल पण किंमत वाढली तर इतर उद्योगांच्या नफ्यावर परिणाम होतो अशी इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती झालेली आहे.
बर्‍याच लोकांना वाटते की तेल परवडत नसेल तर उद्योगधंदे रिन्युएबल ऊर्जा स्रोतांकडे वळतील. हा समज सध्यातरी चुकीचा आहे; कारण रिन्युएबल ऊर्जास्रोतांची किंमत तेलापेक्षाही जास्त आहे. तेलाची सध्याची किंमतच परवडत नसेल तर या उद्योगांना त्यापेक्षाही महाग असे रिन्युएबल्स वापरणे व त्यावर संशोधनाला खर्च करणे कसे परवडेल?
रिन्युएबल्स महाग आहेत कारण त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून सगळी तयारी करायची आहे, शिवाय सौर आणि पवनऊर्जा सलग मिळत नाही त्यामुळे त्या ऊर्जेचा परतावा अतिशय कमी आहे. अजूनही पूर्णपणे खनिजइंधनमुक्त अशी एकही इंडस्ट्री नाहीय आणि पुढच्या दहा वर्षांमध्येही नसेल. १% रिन्युएबल्सवरून नुसतं ५% पर्यंत जायलाही प्रचंड खर्च आहे.
आधीच तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना, ९९% लोकांचे उत्पन्न फारसे वाढत नसताना (संदर्भः95% of Income Gain Went To Top 1%) हा वाढीव खर्च कोण करणार? सरकारला पुरेसे करउत्पन्न मिळत नसताना वाढत्या बेरोजगारांना आधार देणे आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, संशोधनावरही पैसा खर्च करणे आणि लष्कराकडेही दुर्लक्ष न करणे अशा सगळ्या गोष्टी राजकारण सांभाळून करणे शक्य होत नाही. त्यामुळेच चीन, भारत व इतरही देश प्रदूषणाचा धोका पत्करुनही सरळ कोळशाचे पॉवरप्लॅन्ट्स उभारत आहेत.
समजा सरकारांनी असा खर्च केला तरी रिन्युएबल्स तेलाची जागा पूर्णपणे घेऊ शकणार नाहीत आणि वाहतूक उद्योगावरतरी त्याचा मोठा परिणाम होईल.
बाकीचे खासगी उद्योगसुद्धा हा खर्च नक्कीच करणार नाहीत, त्यापेक्षा तुम्ही म्हणता तसे आधी एफिशियन्सी वाढवण्याकडे हे उद्योग लक्ष देणार.
पण एफिशियन्सी दोन प्रकारची असते. एक म्हणजे फीजिकल आणि दुसरी इकॉनॉमिक. फीजिकल एफिशियन्सी वाढवायला वेळ लागतो, संशोधनावर पैसा खर्च करावा लागतो.
इकॉनॉमिक एफिशियन्सी (म्हणजे कामगार कमी करणे, आऊटसोर्सिंग करणे, पगारवाढ न देणे इत्यादी) झटकन वाढू शकते आणि फारसा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे हे उद्योग आधी इकॉनॉमिक एफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न करतात आणि त्यातून पुरेसा नफा झाला तरच फीजिकल एफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न करतात.
उद्योगांची इकॉनॉमिक एफिशियन्सी वाढली तरी या उद्योगांनी बेरोजगार केलेल्या अनेक लोकांची क्रयशक्ती आणखी खालावते. त्यातून आणखी मंदी येते आणि उद्योगांच्या नफ्यावर आणखी परिणाम होतो असे हे दुष्टचक्र चालू होते.
काही काळ हे असेच चालू राहील. उत्पन्न न वाढणे वगैरे लोक काही वर्षे सहन करतील पण लोकसंख्या स्थिर नाहीय, ती वाढतच आहे आणि त्याबरोबर अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतच जातील. विद्यार्थी मोठाली कर्जे काढून शिकतात पण ती कर्जे फेडता येतील अशा नोकर्‍या बाजारात उपलब्ध नसतील तर ते किती दिवस सहन करणार? सध्या काही लोकांना झळ पोचतेय, अजून दहा-वीस वर्षांनी आणखी लोकांची भर त्यात पडेल. अमेरिका-युरोपात तरूण बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे आणि तिकडे मागणी व उपभोग कमी झाल्याने विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांवरही परिणाम होतो आहे. अमेरिकेत रिटेल उद्योगात मोठ्या प्रमाणावर मंदी आली आहे आणि वॉलमार्टचे कर्मचारी वेतन वाढून मिळावे म्हणून आंदोलन करताहेत.

जेव्हा इकॉनॉमिक एफिशियन्सी वाढवण्याचे सगळे उपाय थकतील तेव्हा औद्योगिक संस्कृती कोसळायला सुरुवात होईल आणि मोठमोठ्या कंपन्या जाऊन रिन्युएबल ऊर्जेवर चालणारे स्थानिक छोटे-छोटे उद्योग त्यांची जागा घेतील. पण ते कोणताही उत्पात न होता होईल की नाही ते आज काय केलं जातंय त्यावर ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम, समतोल आणि मार्मिक प्रतिसाद. खूप कमी शब्द वापरून अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तुमच्या आधीच्या प्रतिसादातल्या उपरोधापेक्षा इथे केलेले स्पष्ट आणि मुद्देसूद भाष्य अधिक आवडले हे नमूद करते. पण हे करायला फार जास्त वेळ, अभ्यास आणि थंड डोके लागते हे मान्यच आहे.
विशेषतः शेवटचे वाक्य अधिक महत्वाचे वाटते, संभाव्य धोक्यांची सूचना देणार्या व्यवस्थांना केवळ 'डूम अँड ग्लूम' म्हणण्याऐवजी पाणी नाकापर्यंत पोहचण्याआधी त्यावर उपाययोजना करणे अधिक जबाबदारीचे वाटते.
स्थानिक उद्योगधंद्यांऐवजी जागतिकीकरणाच्या झालेल्या प्रसाराने आर्थिक दरीत किती मोठी वाढ झाली आहे यासंदर्भात अलिकडे ही बातमी वाचण्यात आली. या बातमीचा या धाग्याशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्ष संबंध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनकम किंवा वेल्थ इनइक्वॅलिटी हा फारच रोचक विषय आहे. मी गेल्या काही शतकात सर्वात श्रीमंत ५०-१०० माणसांची मालमत्ता अशीच सर्वात खालच्या साडेतीन बिलियनांइतकी होती का हे शोधत होतो, पण अजून सापडलेलं नाही.

या दुव्यावरचा पान १७ वरचा ग्राफ बघण्यासारखा आहे. आणि पान १६ वरचं टेबल क्र ५ ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे खरेच, लेख नीट वाचला नाहीय पण त्या आलेखात जगाच्या गेल्या तीस वर्षात दुप्पट झालेल्या लोकसं़ख्येचा काहीच विचार केलेला नाही असे दिसले त्यामुळे नुसत्या आकड्यांना काहीच अर्थ उरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसंख्येचा विचार केलेला आहे. डाव्या अक्षावर लोकसंख्याच आहे. संपूर्ण लोकसंख्या काढण्यासाठी आपल्याला त्या बिंदूंची बेरीज करावी लागते. एरिआ अंडर द कर्व्ह हे मोजणं तितकं बरोबर होत नाही कारण क्ष अक्ष लॉगॅरिथमिक आहे. पण तरीही एरिया थोडा वाढलेला जाणवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनकम व वेल्थ इनॅक्विलिटी हे दोन वेगळे प्रकार समजले जातात असे वाटते. रुचींनी दिलेली बातमी वेल्थ इनॅक्विलिटीच्या बाबतीत आहे आणि तुम्ही दिलेला दुवा इनकम इनॅक्विलिटीच्या बाबतीतला आहे.
शिवाय पान १७ वरचा ग्राफ आणि टेबल ५ हे सगळ्यांचे इनकम वाढते आहे हे दर्शवतात आणि १८०० ते २००० या काळात प्रचंड संपत्ती निर्माण झाली आहे यात दुमत नाही. पण तौलनिक दृष्टीने काहींची संपत्ती/उत्पन्न इतरांपेक्षा जास्त वाढली हे सत्य आहे. टेबल ६ मध्ये जिनी गुणोत्तरात ते दिसते.
शिवाय हा विदा २००० पर्यंतचाच आहे. २००० ते २०१३ मध्ये दोन्ही इनकम व वेल्थ इनॅक्विलिटीत वाढच झालेली आहे असे दिसते.

१: निर्माण की रुपांतरित हा वादाचा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही मांडणी पटली नसली तरी सुसंगत आणि मुद्देसूद आहे. माझं म्हणणं असं आहे की पैज लावायची तर या परिणामांपैकी एकावर लावावी, नुसत्या पेट्रोलच्या किमतीवर लावू नये.

इथे मांडलेल्या चित्रात सप्लाय साइडचाच विचार केला गेलेला आहे. डिमांड प्रचंड इलॅस्टिक असून किमती किंचित वाढल्यावर कोसळेल असं गृहितक आहे. मला ते बरोबर वाटत नाही. माझ्या मते इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही खूप कमी आहे, त्यामुळे तेल महाग झालं तरी डिमांड खूप कमी होणार नाही.

रिन्युएबल्स महाग आहेत कारण त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून सगळी तयारी करायची आहे

सौर ऊर्जा तितकी महाग नाही. आत्ताच सौर ऊर्जेची पॅनेल्स तयार करायला लागणारी ऊर्जा ही त्या पॅनेलमधून सुमारे १ ते १.५ वर्षांत मिळते.

१% रिन्युएबल्सवरून नुसतं ५% पर्यंत जायलाही प्रचंड खर्च आहे.

भारतात इलेक्ट्रिसिटी आत्ताच १२% रिन्युएबल विंड आणि आणि १९% रिन्युएबल हायड्रो इतकी आहे. २०२२ पर्यंत सध्याच्या ९% वीज सौर ऊर्जेपासून मिळवण्याचा प्लान आहे. यासाठी खर्च येणार आहे २० बिलियन डॉलर. आणि त्याचा परतावा सुमारे पाच ते सात वर्षांत मिळेल. अर्थातच तेलाच्या वापराचा प्रश्न त्याने प्रत्यक्ष सुटणार नाही, पण वीज स्वस्त झाली, किंवा स्वस्तच राहिली की इलेक्ट्रिक कार्स दिसतील. म्हणजे तेलाचा वापर किंचितच वाढवून किंचित वाढलेल्या किमतीचं तेल विकत घेतलं जाईल.

फीजिकल एफिशियन्सी वाढवायला वेळ लागतो

फिजिकल एफिशियन्सी गेली कित्येक वर्षं वाढत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कॉंप्युटरायझेशन वाढल्यावर कागदाचा वापर कमी झालेला आहे. निव्वळ बेरजा करणाऱ्या कारकुनांची गरज कमी झालेली आहे. कागदं इथून तिथे नेण्यासाठीचा वेळ कमी झाला आहे. टेलिकम्युटिंग आणि टेलिकॉन्फरन्समुळे प्रवास कमी झाला आहे. कॉंप्युटरायझेशन चालूच रहाणार, कारण त्याला पायाभूत असलेलं सेमिकंडक्टर इंडस्ट्रीमधलं हे इनोव्हेशन पुढची दहा वर्षं तरी थांबणार नाही.

असो. माझा मुद्दा पुन्हा असा आहे की या परिणामांबद्दल आपल्यात दुमत आहे, पेट्रोलच्या किमतीत हे परिणाम परावर्तित होतीलच असं नाही. तेव्हा किमतीवर पैज लावण्यात काय अर्थ आहे? लावायची तर या परिणामांपैकी कशावर लावू.

(शब्द अचूक नाहीत पण) उदाहरणार्थ
१. २०२४ पर्यंत जग आर्थिक मंदीत असेल किंवा मंदीतून गेलेलं असेल आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तेलाची उत्पादन घट - किंमतवाढ - मागणीघट हे असेल. (मी याच्या विरुद्ध काहीतरी म्हणेन.)
२. २०२४ पर्यंत रीन्युएबल ऊर्जा ही जगातल्या एकंदरीत ऊर्जावापराच्या अमुक एक टक्केपेक्षा अधिक नसेल (मी म्हणेन असेल)
३. २०२४ पर्यंतच्या दहा वर्षात भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सरासरी ६ टक्केपेक्षा कमी असेल (६ च्या जागी योग्य तो आकडा; मी म्हणेन असेल)

काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. २०२४ पर्यंत जग आर्थिक मंदीत असेल किंवा मंदीतून गेलेलं असेल आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तेलाची उत्पादन घट - किंमतवाढ - मागणीघट हे असेल. (मी याच्या विरुद्ध काहीतरी म्हणेन.)
हा मुद्दा quantifiable नाही. किम्वा त्यात cause-effect वर कायम वाद होउ शकतात.
खरोखर मंदी आलीच , तरी ती तेलासंबंधित घडामोडिंमुळेच आली आहे हे निर्विवाद सगळ्यांना मान्य होणे अशक्य आहे.
कायम एक ना दुसरी बाजू भलभलत्या कारणांकडे बोट दाखवत राहणार.
मंदी आलीच नाही, तरी "माझे म्हणणे कसे खरे झाले " हे एक बाजू म्हणत राहू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तेलाची डिमांड इनॅलिस्टिक असली तरी ज्यांच्या निर्मितीसाठी तेलाची आवश्यकता आहे अशा सगळ्या वस्तूंची डिमांड इनॅलिस्टिक नाही. तेल महाग झाल्याने ज्यांची डिमांड इलॅस्टिक आहे अशा वस्तू महाग होणार आणि त्यांची डिमांड कमी होणार. त्यांची डिमांड कमी होणार म्हणजे त्या वस्तू तयार करणारे काही कारखाने बंद पडणार म्हणजेच तेलाची डिमांड कमी होणार. तेल ही काही स्टँडअलोन कमोडिटी नाही. सध्याच्या इकॉनॉमिक्समध्ये इतर सर्व कमोडिटीजप्रमाणेच तेलाची किंमत ठरवण्याची घोडचूक केलेली आहे आणि तेलाचा संबंध अर्थव्यवस्थेच्या बहुतेक सगळ्या भागांशी असल्यामुळेच तेलाचे उत्पादन न वाढल्यास काय होईल याचे भाकित किंवा कल्पना करणे खूप अवघड जाते.

सौर ऊर्जा तितकी महाग नाही. आत्ताच सौर ऊर्जेची पॅनेल्स तयार करायला लागणारी ऊर्जा ही त्या पॅनेलमधून सुमारे १ ते १.५ वर्षांत मिळते.

सौर ऊर्जेचा EROEI १.२ वगैरे असेल आणि सध्या तेलाचा EROEI १० वगैरे आहे (पूर्वी १०० होता). तेलाच्या मानाने सौर ऊर्जा प्रचंड महाग आहे. शिवाय मेंटेनन्ससाठी तेलाचा बॅक-अप लागतोच.

फिजिकल एफिशियन्सी गेली कित्येक वर्षं वाढत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कॉंप्युटरायझेशन वाढल्यावर कागदाचा वापर कमी झालेला आहे.

कागदाचा वापर १९८० पासून दीडपटीने वाढला आहे तरी कागदाचा वापर कमी होतोय असे का म्हटले जाते ते कळत नाही. कागदाच्या वापराच्या वाढीचा दर कमी होतोय असे म्हणायला हरकत नाही. तसेही कोणत्याही एफिशियन्सीला १००%ची मर्यादा आहे. त्यामुळे औद्योगिक संस्कृती नष्ट होणार की नाही हा प्रश्न नसून कधी एवढाच प्रश्न खरेतर आहे.

असो. खालील तीन मुद्द्यांवर पैज लावून टाकू आता.
१. दहा वर्षांमध्ये पर्यायी ऊर्जास्रोतावर चालणारे एकही मालवाहू जहाज/कमर्शियल प्रवासी विमान निर्माण होणार नाही.
२. चीनचा सरासरी जीडीपी ग्रोथ रेट ८% पेक्षा कमी व भारताचा ६% पेक्षा कमी असेल. (संदर्भ: वर्ल्ड बँक)
३. जर जगाचा ऊर्जावापर कमी झाला नाही तर जागतिक ऊर्जावापरात सौर/पवन/जिओथर्मल ऊर्जेचे प्रमाण ५% पेक्षा कमी असेल. (संदर्भ:IEA)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रमांक १ वर मी पैज लावत नाही, कारण तो फार मोठा प्रकल्प आहे, आत्ता तंत्रज्ञान असेल तरी दहा वर्षांत काही तयार होईल याची शाश्वती नाही.

क्रमांक २ मध्ये दोन विधानं आहेत. पैकी चीनवर माझा फार भरोसा नाही. त्यामुळे चीनला ८% द्यायला मी तयार नाही. तेव्हा हीच विधानं, पण मर्यादित स्वरूपात आपण घेऊ.

१. भारताचा सरासरी जीडीपी ग्रोथ रेट ६% पेक्षा कमी असेल. (संदर्भ: वर्ल्ड बँक) [मी म्हणतो अधिक असेल]
२. जर जगाचा ऊर्जावापर कमी झाला नाही तर जागतिक ऊर्जावापरात सौर/पवन/जिओथर्मल ऊर्जेचे प्रमाण ५% पेक्षा कमी असेल. (संदर्भ:IEA) [मी म्हणतो अधिक असेल]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या पैजा/कलं ठीक वाटताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरच्या माझ्या प्रतिसादात दोन चुका आहेत.
१. लिखाणाच्या भरात इनॅलिस्टिक लिहीले आहे ते इनिलॅस्टिक असे वाचावे.
२. सोलर पीव्हीचा EROI 8 आहे असे समजले जाते. काही केसस्टडीजनुसार तो 3.5 आहे. फायनॅन्शियल व मनुष्यबळ खर्च वजा केल्यावरच तो 2 च्या खाली जातो.

ह्या पैजा/कलं ठीक वाटताहेत.

पीक ऑईल हा प्रकार आहे हे दोन्ही बाजूंना मान्य झाले असून फक्त त्याचे परिणाम औद्योगिक संस्कृतीसाठी मारक आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी आता ही पैज आहे असे फॉर द रेकॉर्ड स्पष्ट करुन ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाईम स्पॅन काय आहे?

आणि समजा औद्योगिक प्रगती खुंटली तर ती जगातल्या सर्व मनमोहनसिंगांमुळे खुंटली की पीक ऑईलचा परिणाम म्हणून खुंटली हे ठरवण्याचे मार्ग आत्ताच शोधून ठेवलेले बरे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टाईमस्पॅन १० वर्षेच आहे.
२००७-८ मध्ये अचानक तेलाच्या किंमती वाढल्यानंतर चालू असलेला ट्रेंड तसाच चालू राहतो की नाही ते दहा वर्षांत स्पष्ट होईल अशी आशा.
आणि समजा त्या दरम्यान जगभरातले ममो जाऊन नमो आले आणि तरीही जीडीपी वाढला नाही तर तेलाचाच प्रॉब्लेम आहे असे म्हणणारे लोक निर्माण व्हायला हरकत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ममो जाऊन नमो आले

ही कोटी प्रचंड लाइकवण्यात आली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ऐसीवर मन - नगरीनिरंजन - बॅटमॅन - अरुणजोशी असा एक अक्ष बनतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ह्या झाल्या अक्ष सत्ता.
दोस्त सत्ता कोण कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना बहुतेक वैचारिकली दोस्तांचा अक्ष असं म्हणावयाचं असेल Wink

-हेल बॅटलर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हैला! हे केव्हा झालं?

मनोबा, बॅट्या, ननि आणि अजो! है शाब्बास! मज्जाय बॉ तीन माणसांची Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो असं काय करता, तुम्हीपण या..दोस्त, अक्ष, मॉडर्न, पोष्टमॉडर्न, सगळ्यांनाच स्वराज्याच्या सूत्रात ओवू आपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नको.. युच डू मज्जा
यु आर द 'चोझन' वन/थ्री Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'चोझन'

Chozhan? आम्हांला Rajaraja Chozhan वगळता अजून कोणी 'चोझन' असल्याचे ठाऊक नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही चौघे सोडून पलिकडच्या अक्षावर जाताना वाटेत 'संतुलन सांभाळक' असा तूच असतोस. ते नमो वैगेरे लोक सोडले तर आमच्यापैकी कोणी तुला इतके वर्ज्य नाही. आजकालमधेच मनमोहनांवर इतके सारे आक्षेप घेतलेस - ते थत्ते चाचा तुला लोटत असणार आमच्या अक्षात. सबब कृपा आपल्यावरही आहे आणि You too are one of the lucky ones हे लक्षात ठेवावे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पैजेच्या टर्म्स तरी दहा वर्षात फायनल ठरणार का? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऑयल सेक्टरमधे काम करून देखिल मला कळत नाहीय कि या लोकांनी पैज नक्की कशाची लावली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही दोघं कोनत्या भाषेत बोलताहेत ह्याचाच अजून अम्दाज येत नाहिये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

1. They must confirm the bet is about peak oil.
2. They must confirm the definition of oil. Whther oil from Zatropha will be eligible, etc.
3. They must agree on which crude oil or MTOC of crude oil.
4. They must agree on interconversions of p1, p2 and p3 reserves with technology.
5. What about gas to liquid technology?
6. Treatment of condensate.
7. The period (year or month) and date and time of peak oil.
8. Permissible fluctuation due to market forces seen as very short term trend.
9. Dip in demand due to reasons other than increase in price and shortage in supply
10. Whether both of them are long in USD on the said date.
11. If not, the exchange rate mechanism
7b. Time period to confirm that peak oil has indeed occurred or not after the said date.
12. Mode of payment
13. Documentation of the future contract.
14. Any share for us- aisikars.
15. What happen's to the world while reaching and post-reaching that point could be an interesting topic of discussion but should not affect outcome of bet.
16. Someone typed that today's 1000 USD will paid by the loser. If that is the agreement, the discouting rate should be agreed between.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"तेव्हाचे १००० युएसडी द्यायला हरकत नाही." असे म्हटले आहे हो. तुम्ही नीट वाचले नाही असे दिसते अन्यथा इतरही मुद्दे वर दिलेल्या लिंकांमध्ये निकालात निघालेले आहेत.
असो. पैज आता फक्त ब्रॅगिंग राईट्सची असावी या घासकडवींच्या मुद्द्याशी मी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! मला फक्त तेवढाच भाग (बोल्ड केलेला) व्यवस्थित कळला होता! Wink

- (युएसडीची किंमत जाणून असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, तुम्ही १ एप्रिल २०२५ ला पिक ऑयल होणार म्हणून शर्यत लावली. तर आता नंतर एखादा दुसरा वर्ष वाट पाहून निश्चित करणार कि हो खरोखरच पिक ऑयल झाला किंवा नाही. हा काळ आजच ठरवायला लागणार. १ अप्रिल २०२५ चे १००० डॉलर दोन वर्षांनी द्यायचे असतील तर कंपाऊंडींग रेट ठरवलेला बरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काही अंशी अवांतरः Toyota Will Sell You a Hydrogen-Powered Car Next Year

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

या पैजेत मी नगरीनिरंजनच्या बाजूने सामील होऊ इच्छितो. त्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे -
१) आपण पीक ऑईल बद्दल बोलताना फक्त तेला बद्दल बोलतो पण 'real elephant in the room' आहे लोकसंख्या! तेल उत्पादनाचा आलेख आणि लोकसंख्येचा आलेख ह्यात इतके साम्य आहे हा काही योगायोग नाही. तेलापूर्वीचे मुख्य उर्जा स्त्रोत - १८ व्या शतकात लाकूड आणि १९ व्या शतकात कोळसा - ह्यांचा लोकसंख्येवर तेला इतका परिणाम झाला नाही. तेलाच्या साठविण्याच्या आणि वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे (portability) आणि त्याद्वारे औद्योगिक स्तरावर अन्न पिकावण्याच्या, खाद्यपदार्थ, औषध आणि इतर उत्पादने बनविण्याच्या आणि या सर्व गोष्टी वाहतुकीच्या माध्यमाने जगभर पसरविण्याच्या क्षमतेमुळे तेलाचा लोकसंख्या वाढीवर परिणाम अधिक स्पष्ट आणि विस्तृत आहे. जगाची लोकसंख्या १९७० नंतर आज पर्यंत दुप्पट झाली आहे. त्यामुळेच तेलाचे उत्पादन जरी स्थिर राहिले किंवा त्यात किंचितही घट झाली तरी त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि लोकसंख्येवर परिणाम अटळ आहे.

IEA च्या माहितीनुसार तेलाचे उत्पादन गेले ४ ते ५ वर्षे साधारणपणे 89 to 90 MBD च्या आसपास आहे. इथे दुवा
आता आपण लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धीचा संबंध बघूया. खरी आर्थिक वृद्धी ही लोकसंख्या वाढीशिवाय एका मारीयदेनंतर साध्य होणार नाही असे दिसते. नोबेल विजेते सर जॉन सॉल्स्टन सध्या UK Royal Society साठी या विषयावर सध्या संशोधन करत आहेत. जपान हे ह्या तत्वाचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दहा वर्षात जपानची लोकसंख्या वाढली नाही आणि त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था पण वाढली नाही.
इथे दुवा

चीनच्या लोकखंख्येच्या संदर्भातही एक रोचक निरिक्षण, चीनने एक मुलाचे धोरण का निकालात काढले?

२) वरच्या प्रतिसादांप्रमाणे निसर्गातले तेल संपत आलेले नाही पण सहज मिळणाऱ्या तेलाचे नवीन साठे सापडत नाही आहेत. सध्या तेल उत्पादक कंपन्या ऑईल सँड्स, फ्रॅकिंग, डीप सी ड्रिलिंग आणि अर्टिक्ट तेल संशोधनाच्या मागे आहेत हा त्याचा पुरावा आहे. नगरीनिरंजन यांनी लिहिल्या प्रमाणे सोपे मिळणारे तेल संपले की मगच लोक ह्या अवघड आणि खर्चिक तेल उत्पादनाकडे वळतात.
इथे दुवा

तेल काढणे जितके अवघड तेवढे त्याला मिळवण्याचा खर्च अधिक होतो कारण त्याच्या processing ला लागणारा वेळ आणि पैसा अधिक असतो. अल्बर्टाच्या डर्टी क्रूड ला लिब्याच्या स्वीट क्रूडपेक्षा खूप जास्त processing लागते. हे ऑईल सँड्सचे तेल त्यामुळे किंमतीवर अवलंबून असते. २००८-२००९ च्या मंदीत जेव्हा तेलाची किंमत $३० (बॅरल) झाली होती, तेव्हा अल्बर्टामधे तेल उत्पादन ठप्प होते, अल्बर्टाचा रहिवासी असल्याने या चढउउतारांशी आमचा फार जवळून संबंध येतो. ऑईल सँड्स मधे १ बॅरल तेल काढायला साधारण $३० लागतात (Production cost). ते शुद्धीकरण करण्याची आणि बाजारपेठेत आणायची किंमत वेगळी.
पूर्वी बीपी. मध्ये काम करणारे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड मिलर यांच्या म्हणण्याप्रमाणे तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी जगाला ३ ते ४ वर्षाला एक नवीन सौदी अरेबिया सापडावा लागेल.

३) रिन्युएबल्स बद्दल एकच म्हणायचे आहे - "To make things that make things that make renewable energy require oil".

या पैजेत खालील दोन मुद्द्यांवर मी नगरीनिरंजनच्या बाजूने सामील होऊ इच्छितो.
१. चीनचा सरासरी जीडीपी ग्रोथ रेट ८% पेक्षा कमी व भारताचा ६% पेक्षा कमी असेल.
२. जर जगाचा ऊर्जावापर कमी झाला नाही तर जागतिक ऊर्जावापरात सौर/पवन/जिओथर्मल ऊर्जेचे प्रमाण ५% पेक्षा कमी असेल.

शिवाय आधी मोडीत काढलेल्या मुद्द्यावर माझे विचार खालील प्रमाणे:
१. नजीकच्या काळात (येत्या पाच-सहा वर्षात) तेलाचे भाव खूप वाढतील आणि त्याने आलेल्या आर्थिक मंदीमुळे त्यापुढील चार-पाच वर्षात तेलाचे भाव पडतील. एकूणात, दहा वर्षांनंतर तेलाची किंमत आजच्या पेक्षा (inflation adjusted) कमी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker

डॉ. रिचर्ड मिलर यांच्याबद्दलच्या ज्या बातमीचा दुवा तुम्ही दिला आहे त्या बातमीवरुनच ही चर्चा आणि पैजप्रकरण सुरु झाले आहे. Smile
बाकी, तेल व लोकसंख्येच्या संबंधाबद्दल सहमत आहे आणि रिन्युएबल्स बद्दलचे वाक्य थोडक्यात मुद्दयाचे सांगणारे आहे (फक्त त्यात To make ऐवजी To make and maintain असं आणखी बरोबर होईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेल उत्पादनाचा आलेख आणि लोकसंख्येचा आलेख ह्यात इतके साम्य आहे हा काही योगायोग नाही.

योगायोग नाहीच. असाच साम्य असलेला आलेख धान्य उत्पादन आणि लोकसंख्या यांमध्ये सहज दाखवता येईल. पण त्यावरून काहीच कार्यकारणभाव सिद्ध होत नाही.

खरी आर्थिक वृद्धी ही लोकसंख्या वाढीशिवाय एका मारीयदेनंतर साध्य होणार नाही

सर्वच देशांच्या बाबतीत लोकसंख्यावाढीचे टप्पे हे आर्थिक प्रगतीशी बांधलेले असतात. भारताची वाढ अजून चालूच राहील. चीन भारताच्या पुढे आहे त्यामुळे चीनची वाढ मंदावेल. (म्हणूनच चीनला ८% द्यायला मी तयार नाही) जपानची किंवा अमेरिकेची आर्थिक वाढ थांबलेली किंवा मंदावलेली आहे. पण ही वाढ थांबणं हे थोडं फसवं आहे. कारण प्रॉडक्टिव्हिटी वाढतेच आहे. आणि आयुष्य सुधारतं आहेच. उदाहरणार्थ, १९४५ सालपासून आत्तापर्यंत एका सरळ रेषेत वाढत वाढत प्रॉडक्टिव्हिटी चौपट झालेली आहे. अमेरिका गेली ३० वर्षं तरी पोस्ट इंडस्ट्रियल देश असला तरी आजच्या पिढीकडे सेलफोन, इंटरनेट, अधिक स्वस्त सुरक्षित व फ्युएल एफिशियंट कार्स, अधिक स्वस्त आणि उत्कृष्ट टीव्ही या सगळ्या गोष्टी आहेत. मोजायला सोपी समृद्धी वाढणं थांबलं असलं तरी मोजायला कठीण समृद्धी वाढतेच आहे. याला कारण लोकसंख्या नसून यांत्रिकीकरण, कॉंप्युटरायझेशन, इंटरनेट, फोन यांतून आलेली आहे.

तेलाच्या उत्पादनात किंचित घट झाल्यामुळे या सगळ्या गणितात फार फरक पडत नाही. कारण जगाच्या एकंदरीत ऊर्जेच्या वापरात तेल सुमारे ३५% आहे. त्यामुळे तेलाचं उत्पादन ५% कमी झालं तरी एकंदरीत हिशोबात २% चाच फरक पडतो. तेवढा स्लॅक भरून काढण्यासाठी अधिक कार्यक्षम कार्स, कमी प्रवास, प्रगत देशांत कागदाचा कमी वापर आणि इतर अनेक पर्यायी सोर्सेसचा विकास एवढं पुरेसं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर तेलाचे उत्पादन, लोकसंख्या, अन्न उत्पादन हे सगळे आलेख एकसारखे दिसायला लागले तर नक्कीच त्यांच्यात काही कार्यकारणभाव असला पाहिजे. औद्योगिक स्तरावर खाद्य पिकवायला तेलाचीच गरज लागते, खत बनवायला तेलाची गरज लागते, ट्रॅकटर, हार्वेस्टर चालवायलाही तेलाची गरज....

नगरीनिरंजननी एका पुस्तकाचा दुवा दिला आहे, 'लिमिट्स टू ग्रोथ' त्यात म्हटल्याप्रमाणे वाढीबरोबर कार्यक्षमतेच्या वाढीला पण मर्यादा आहेतच. २००८ च्या मंदीनंतर कार्यक्षमता वाढली कारण मंदीत नोकरी टिकवायची असेल तर शेजाऱ्यापेक्षा जास्त काम करणे आलेच. पण त्यालाही मर्यादा असतातच. आज १०० मि. पळण्याच्या शर्यतीचा जो विश्वविक्रम आहे तो जेंव्हा बनला तेंव्हा आधीच्या विक्रमापेक्षा ०.५ सेकंदाने वगैरे मोडला गेला आणि ते साध्य झाले ते पळणाऱ्या व्यक्तीच्या कौशल्याने आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या अथक प्रयत्नांनी. पण म्हणून आजचा जो विक्रम आहे तो अजून ५० वर्षांनी ५ किंवा ६ सेकंद होउन मोडेल का? नाही. रेकॉर्डस तोडले जातील का? जरूर, पण फार कमी फरकाने, आता ते रेकॉर्ड जो कोणी मोडेल ते १/१०० सेकंद किंवा १/१००० सेकंद नि तोडेल. हे त्या प्रॉडक्टिव्हिटीचे लिमिट असेल.

तुम्ही दिलेली तेलाच्या वापराची टक्केवारी बरोबर आहे तरी हे ३५% तेल आपल्या संस्कृतीचे खऱ्या अर्थाने वंगण आहे. उदाहरणार्थ आज कोळश्याचा वापर जरी २६% असला तरी हा कोळसा (गॅस, रेडीअम, इत्यादी) काढायला आणि तो कारखाना किंवा विद्युत निर्मिती केंद्रापर्यंत न्यायला तेलच लागते. आजची अर्थव्यवस्था स्वस्त तेल आणि त्याच्या वाहून नेण्याच्या क्षमतेवर (portability) आधारित आहे आणि त्यामुळे त्याच्या उत्पादनात घट झाली तर त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर फार मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. माझे म्हणणे आहे की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीची नोंद घेऊन पाऊले उचलली तर मनुष्य हा अडथळा पार करू शकेल पण आपण जर Status Quo चालू ठेवला तर त्याचे दुष्परिणाम जास्त होतील. Status Quo चा विरोधाभास आणि अट्टाहास Wall Street Journal च्या या बातमीत दिसतो. ह्या बातमीतील खास वाक्य आहे

Finding the energy to boil the water will be even tougher. Chevron could use oil, instead of natural gas—literally burning oil to produce oil—but that would burn profits, too. So the company likely will be forced to import natural gas from overseas, an expensive process that involves chilling it to turn it into a liquid, then shipping it thousands of miles.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker

जर तेलाचे उत्पादन, लोकसंख्या, अन्न उत्पादन हे सगळे आलेख एकसारखे दिसायला लागले तर नक्कीच त्यांच्यात काही कार्यकारणभाव असला पाहिजे.

परस्परसंबंध नाकारत नाही, फक्त कार्य कुठचं आणि कारण कुठचं हे इतक्या सहजपणे वेगळं काढून 'तेलाच्या उत्पादनामुळे लोकसंख्या वाढली' हे स्पष्टपणे म्हणता येत नाही इतकंच.

पण म्हणून आजचा जो विक्रम आहे तो अजून ५० वर्षांनी ५ किंवा ६ सेकंद होउन मोडेल का? नाही.

हे उदाहरण आवडलं. मात्र हे या परिस्थितीत पूर्णपणे लागू होतं असं वाटत नाही. धावण्याच्या बाबतीत आपण या मर्यादेच्या अतिशय जवळ आहोत. उत्पादनक्षमतेबाबतही तितकेच जवळ आहोत हे तितकं उघड नाही. आणि हे महत्त्वाचं आहे कारण ही संपूर्ण चर्चाच रेट ऑफ चेंज विषयी आहे. पीक ऑइल म्हणजे त्या क्षणापासून तेल मिळणं बंद असं नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे 'द डेव्हिल इज इन डीटेल' या न्यायाप्रमाणे नक्की किती जवळ आहोत, नक्की किती काळात तेल इकॉनॉमीपासून पर्यायी इकॉनॉमीवर जावं लागेल हे महत्त्वाचं आहे.

एक उदाहरण देतो. गेली तीसेक वर्षं भारताचं दूध उत्पादन वाढत आहे. आता प्रश्न असा आहे की ते अजून वाढू शकेल का? तर उत्तर होय असं आहे. कारण अजूनही आहेत त्या गायींऐवजी दुप्पट दूध देणाऱ्या गायी वापरता येतील, अजूनही साठवणी आणि वितरण व्यवस्थेत सुधारणेला वाव आहे. अमेरिका किंवा स्वित्झर्लंडमध्ये त्या मानाने कमी वाव आहे. तिथे तुमचं उदाहरण चांगलं लागू पडतं. भारतात नाही.

आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीची नोंद घेऊन पाऊले उचलली तर मनुष्य हा अडथळा पार करू शकेल

मान्य. माझं म्हणणं थोडं पुढे - म्हणजे पावलं उचलली जात आहेत, आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा वेग आणि शक्तीही वाढेल. पहिल्या अर्ध्या भागाबाबत काही विदा आहे, आणि दुसऱ्या अर्ध्या भागाबाबत नाही. म्हणूनच तर पैज लावायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वितरण व्यवस्थेत सुधारणेला वाव आहे.

स्थानिक माल स्थानिक लोकांनीच वापरणे हीच ती सुधारणा.
तेलाच्या जीवावर जी इनेफिशियन्सीची चैन चालू होती ती संपून कमी ऊर्जेवर चालणारी एफिशियंट स्थानिक अर्थव्यवस्था निर्माण होईल हेच तर माझे म्हणणे आहे.
आणि तेलाचा आणि लोकसंख्येचा तुम्ही म्हणता तसा थेट संबंध नसल्यास आहे तेवढी लोकसंख्या सपोर्ट करणेही अशक्य होणार नाही.
इंडस्ट्रीयल स्केलवरचं काहीही चालवणे परवडणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे. असो.

तेलाची गुंतागुंत तुम्ही सोयीस्करपणे नजरअंदाज करत आहात.
तेलाचे उत्पादन वाढले नाही तर इतर ऊर्जास्रोतांनी वाढीसाठी आवश्यक अशी जास्तीची ऊर्जा मिळेल असे म्हणणे सोपे आहे.
पण जास्तीचा कोळसा किंवा जास्तीचे युरेनियम किंवा जास्तीची विंड टर्बाईन्स किंवा जास्तीची सोलर पॅनेल्स नुस्ती वाहून आणायला (तयार करणे तर सोडाच) जास्तीचे तेल कुठून आणणार? एवढे तेल वाचण्याएवढी एफिशियन्सी एका वर्षात वाढणार का? किंवा लगेच पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार का? पर्यायी ऊर्जेवर चालणारे ट्रकतरी १० वर्षात तयार होणार का?
थोडं तपशीलवार सांगितलं तर त्या दृष्टीने विचार करता येईल.
आणि समजा तेलाचे उत्पादन कमी झाले तर ती घट भरूनही वर वाढीसाठीची जास्तीची ऊर्जा मिळेल एवढी एफिशियन्सी इतक्या ताबडतोब वाढणार?
हे कसं होईल हे काही माझ्या डोक्यात शिरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेलाचं उत्पादन घटणार म्हणजे तेल संपणार असं नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर क्ष ऊर्जा दरवर्षी निर्माण करणारी सौर पॅनेल्स तयार करून ती वाहून नेऊन ती इन्स्टॉल करायला २क्ष इतकी ऊर्जा लागते. तेव्हा दहा वर्षांत ३५% तेल ऊर्जेचं डिस्ट्रिब्यूशन ३०% तेल आणि ५% सौर ऊर्जा यात बदलायचं असेल तर दर वर्षी सुमारे ०.२% ऊर्जा (तेल) सौर पॅनेल्ससाठी खर्च करावी लागेल.

त्यासाठी प्रत्यक्ष सोलार पॅनेल्सवर किंवा सौर ऊर्जेवर चालणारे ट्रक्स, ऑइल टॅंकर्स तयार होण्याची गरज नाही. ती ऊर्जा बॅटरीवर चालणाऱ्या कार्समध्ये वापरून तेल वाचवता येतं, जे सध्याच्याच टॅंकर्ससाठी वापरता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Oil prices plunge, and the bottom is not yet in sight!

Oil prices fell to their lowest level in 12 years; futures of West Texas intermediate crude for February delivery settling at $31.41 a barrel, down 5.3 per cent.
.
.
आत्ता तराजूचा काटा पैजेतल्या कुठल्या बाजूकडे झुकलेला आहे ?
.
.
पैज नेमकी क्वांटिफाय झालेली नसली ( पैजेचं विधान नेमकं बनलेलं नसलं ) तरी खेळाडूंनी आपापले अंदाज वर्णनात्मक रुपात लिहिले आहेतच.
तर आत्ताची परिस्थिती कुणाच्या अंदाजाच्या जवळ जाते आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं नगरीनिरंजन यांचं म्हणणं होतं की तेलाच्या किमती पडल्या तर तेल उत्पादन करणं फायद्याचं ठरणार नाही. मग उत्पादन कमी होईल आणि त्यातून आर्थिक मंदी उद्भवेल. किमती कमी झालेल्या आहेत, त्यामुळे उत्पादन कमी होतंय का आणि मंदी येते आहे का हे पाहायचं आहे. मला वाटतं ओपेकने उत्पादन मोठ्या प्रमाणावर चालू ठेवलं आहे म्हणून किमती पडलेल्या आहेत.

पैज क्वांटिफाय झालेली आहे. त्यात तेल आणि हायड्रो सोडून इतर (मुख्यतः सौर आणि वात ऊर्जा जगाच्या एकंदरीत ऊर्जा वापराच्या विशिष्ट टक्केवारीपर्यंत पोचेल किंवा नाही, आणि भारताचं जीडीपी विशिष्ट गतीने वाढेल की नाही (मंदी येईल की येणार नाही) अशी दोन विधानं आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवी फार चतुर आहेत. त्यांच्या बाजूने भारत सरकारची सांख्यिकी प्रचारयंत्रणा आहे हे त्यांना पुरेपूर माहित आहे.
उदा.
India's GDP growth estimate is a joke

In 2016, the government last week said, India’s economy is expected to grow between 8.1% and 8.5%. According to the International Monetary Fund (IMF), China’s GDP is projected to grow (pdf) at 6.3% in 2016.
These high growth numbers are the result of what the Central Statistical Office (CSO), the agency that computes the GDP, industrial growth and consumer price indices among others, did in January. It shifted the reference year for measuring inflation-adjusted growth from 2004-05 to 2011-12. The CSO also included new data sources, classification systems, and items like LED television sets and smartphones to the country’s national accounts. As a result, in 2013-14 the economy grew at 6.9%, rather than 4.7%, the CSO data showed earlier.

दुसरीकडे ओपेक देशांना तेल उत्पादन कमी करता येत नाहीय कारण मंदीच्या काळात तेलाचे उत्पादन जो कमी करेल त्याचा मार्केट शेअर कमी होईल. तेलातून मिळणारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे ते देश अस्वस्थ आहेत. त्यामुळेच सौदी अरेबिया व इराणमध्ये तणाव वाढायला लागला आहे. त्यात शिया-सुन्नी एवढेच काही कारण नाही. अमेरिकेतल्या फ्रॅकिंग कंपन्यांचे दिवाळे कधी वाजेल याची ते वाट पाहात आहेत.
An oil boomtown that became a symbol of the fracking revolution is dropping fast

तिकडे अल्बर्टा टार सॅन्ड्स प्रकल्पांमध्ये जॉब्ज जाऊ लागल्याने तिथे आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
Suicide rate in Alberta climbs 30% in wake of mass oilpatch layoffs

संपूर्ण जगात कन्व्हेन्शनल ऑईल एक्स्प्लोरेशनचा केवळ एकमेव प्रकल्प सध्या चालू आहे असे माझा ऑईल इंडस्ट्रीतला एक मित्र म्हणाला. नवीन ऑईल शोधण्याचे महागडे काम कंपन्यांना परवडत नाहीय.
ऑईलच्या किंमतींमध्ये अतिप्रचंड चढ-उतार होणार हे भाकित खरे ठरतेय.

Why it won't be long before oil prices rise again

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात चातुर्याचा भाग नाही. मुळात ते विधान आलं होतं याचं कारण तेलाचं उत्पादन बदलल्यामुळे मंदी येईल आणि भारताच्या जीडीपीवर त्याचा परिणाम होईल असं भाकीत होतं. असो. आत्ता कुठे पैजेच्या कालखंडातला सुरूवातीचा भाग आहे. त्यानंतर काय होतं हे पाहू. जर सरकारने वारंवार अशा चमत्कृतीपूर्ण बदल करून वाढतं जीडीपी दाखवल्याबद्दल तज्ञांचं एकमत होत असेल तर मी ते लक्षात घ्यायला तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेस इअर खरं तर यूपीएच्या कालखंडाच्या अखेरीसच बदललं होतं आणि त्यानुसार ग्रोथ जास्त दाखवली. पण तोवर भारताची अर्थव्यवस्था गाळात आहे हे लोकांच्या मनात पुरेसं "सिंक इन" झालं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्या पैजेचं काय झालं?

मला हा सगळा धागा वाचूनही नेमकी पैज काय आहे आणि कधीपासून कधीपर्यंत आहे हे समजेना. घासकडवी/ नगरीनिरंजन हे दोघेही ऐसीवर दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

घासकडवी/ नगरीनिरंजन हे दोघेही ऐसीवर दिसत नाहीत.

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काही काळ नव्हतो, पण आता परत आलो आहे.

वरच्या प्रतिसादांत शोधलं तर २०१२ ते २०२२ या काळात भारताचा जीडीपी वाढीचा सरासरी दर ६% राहील व २०२२ पर्यंत सौर, पवन ऊर्जा ही एकूण ऊर्जेच्या विशिष्ट टक्केवारीपर्यंत जाईल यावर पैज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आता परत आलो आहे.

येल्कम येल्कम जय मल्हार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैज २०१४ ते २०२४ ह्या दहा वर्षांच्या काळात भारताचा जीडीपी वाढीचा दर सरासरी ६% दरसाल ह्यापेक्षा जास्त राहील ह्यावर लागली आहे.
रिन्युएबल एनर्जीच्या प्रमाणासाठीही हीच दहा वर्षे आहेत.
(हा धागा १ मे २०१४ ला आलाय आणि पूर्वलक्ष्यी प्रभावाने पैज लावण्याबद्दल चर्चा झाल्याचे आठवत नाही).
जाता जाता, जीडीपीच्या वाढीचे आकडे पाहण्यासाठी वर्ल्ड बॅंकेची वेबसाईट पाहावी असे मी लिहीले होते; पण तेव्हा ते आकडे भारत सरकारनेच दिलेले असतात हे मला माहित नव्हते. असो.
https://thewire.in/macro/india-gdp-growth-arvind-subramanian

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेलकम ननि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थॅंक यू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैजेवरची चर्चा खूपच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिस्टॉरिकल ग्रोथ रेट वरून (आणि भारताची वर्कीग पॉप्युलेशन ग्रोथ, एफडी आय आणि प्रायव्हेट गुंतवणूकीतून येणार्‍या कॅपिटलवरून) ५ वर्षापूर्वीच काय अगदी कालपर्यंत पण जीडीपी ग्रोथ रेट ६% च्या वर "सहज" राहील असंच म्हटलं असत. पण अरविंद सुब्रमण्यम यांच्या पेपरवरून आणि त्यानंतर त्यावर या क्षेत्रातल्या जाणकारांच्या आलेल्या प्रतिक्रियांवरून, कॅल्क्युलेशन मेथडॉलॉजी मध्येच एकमत नसेल तर नेमका जीडीपी ग्रोथ रेट काय आहे यावरच एकमत होणार नाही आणि पैजेच्या पहिल्या मुद्द्यावरच कोण जिंकलं ते ठरवणं कठीण होऊन जाईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या सात वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा आलेख असा दिसतो:

वित्तीय वर्ष २०१३-१४ मध्ये जीडीपी १.९७८ ट्रिलियन डॉलर होता तो २०२०-२१ मध्ये २.७०७ ट्रिलियन डॉलर आहे. ( Constant 2010 US$).
म्हणजे सरासरी वाढीचा दर काढायचा झाला तर:
((2.707 / 1.978)1/7 - 1 ) X 100 = 4.5842%

२०२४ पर्यंतच्या दहा वर्षांमध्ये सरासरी ६% वाढीचा दर असायला २०२४ मध्ये जीडीपी ३.५४२३ ट्रिलियन डॉलर असायला हवा.
म्हणजे उरलेल्या तीन वर्षांमध्ये
((3.5423/2.707)1/3 - 1) X 100 = 9.379% ने दरवर्षी जीडीपी वाढायला हवा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे रिन्युएबल ऊर्जा स्रोतांचे प्रमाण:
२०१४ पासून २०१८ पर्यंत रिन्युएबल्स मधून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण १% पासून २.१% पर्यंत वाढले आहे. त्यानंतरच्या सहा वर्षांमध्ये ते दुपटीपेक्षा जास्त वाढून ५% च्या वरती जाईल का ते पाहू या.

https://www.iea.org/data-and-statistics/charts/total-primary-energy-supply-by-fuel-1971-and-2018

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0