सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे.

सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात. हा अशा प्रकारचा मांजा बाजारात यायच्या आधीपासूनच पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना होणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे (निष्फळ?) प्रयत्न होत आल्येत. निष्फळ अशासाठी की माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागल्येत. यासंबंधी हवी तितकी जनजागृती होत नसावी असं वाटतं.

होळीला जागोजागी एवढी जाळपोळ होते. वाळवी लागलेली, सुकलेली, आधीच मेलेली झाडं असतील तर एकवेळ ठीक आहे पण प्रसंगी जाळायला लाकडंच नाहीत म्हणून सरळ जिवंत झाडांना तोडून जाळून टाकतात. काही वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, होळीनिमित्तच आला होता. त्यात असं म्हटलं होतं, की कचरा ओला असो किंवा सुका, तो जाळू नये. कारण तो अर्धवट जळला की त्याने निसर्गाला हानीच होते. (हेच कदाचित माणसांवर अंत्यसंस्कार करतानाही लागू होत असावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रिक चितेवर मोठ्या तापमानावर शरीर पूर्णपणे जळून जात असल्याने निसर्गाला हानीकारक घटक हवेत शिरत नसावेत?) होळी आग न लावता साजरी करता येत नाही का?

होळीच्या दिवशी आगीचा अतिरेक, तर रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा!! एवढ्या प्रमाणावर पाणी वाया जातं, की महानगरपालिकेला फतवे काढावे लागतात, अमूक अमूक प्रमाणाबाहेर एखाद्या सोसायटीने पाणी वापरलं तर दंड बसेल वगैरे. त्याचा कितपत परिणाम होतो? तरी नाही म्हटलं तरी गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब-याच ठिकाणी 'सुकी होळी' साजरी करण्यात आली. (सदाशिव आमरापूरकरांच्या शेजारच्या कॉलनीतले 'रेन डान्स' सारखे अपवाद सोडून) पण या सुक्या होळीने काय साध्य केलं? सहजासहजी न निघणा-या पक्क्या रंगांना ऊत आला आणि मग ते काढण्यासाठी आंघोळ करताना जेवढं पाणी एरव्हीच्या आंघोळीपेक्षा जास्त वाया गेलं असेल त्याचा काय हिशेब?

जम्प टू दहिहंडी आणि गणेशोत्सव. गोंगाट, गर्दी, वाहतूकीची तारांबळ, होर्डिंग्जचा कचरा, इ. हे दरवर्षी ठरलेलं. गणपती उत्सवांत एवढा गोंगाट असतो, आणि त्यात पीओपीचे गणपती. म्हणजे ध्वनी आणि जल प्रदूषण. तरी बरेच जण हल्ली शाडूच्या मूर्तींकडे आणि विसर्जनासाठी खास तयार केलेल्या कृत्रिम तलावांकडे वळू लागल्येत हे त्यातल्या त्यात बरं.

सगळ्यात शेवटी दिवाळी. निसर्गाला त्रास देण्याचा उच्चांक गाठणारा हा सण. याला तोड नाही. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, फटाक्यांचा, दारूचा, फटाक्यांच्या बॉक्सेसचा कचरा जिकडे तिकडे पडलेला असतो. नीट पाहिलं तर हवेत स्मॉगचा एक काळसर जाड पट्टा असतो या काळात, त्याच्या वरती मग आकाश दिसतं. रात्रीच्या वेळी रॉकेट्सची रोषणाई पाहायला म्हणून गच्चीत गेलो तर लक्ष फटाक्यांऐवजी फटाका फुटण्याच्या प्रत्येक आवाजानिशी त्या आवाजाजवळच्या पक्ष्यांच्या होणा-या धावपळीने वेधून घेतलं. वर्षभरात कधीही साधं लग्नाच्या किंवा क्रिकेटच्या निमित्ताने कुणी एखादा जरी फटाका फोडला तरी या पक्ष्यांची तारांबळ उडते. सैरावैरा धावत सुटतात. फटाक्यांच्या आवाजाने आपल्या सारख्या ५-६फूटी माणसांना सुद्धा त्रास होतो, त्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल? आणि हे सगळं फक्त पक्ष्यांच्या बाबतीतच नाही, तर इतर छोट्या-मोठ्या प्राण्यांच्या बाबतीतही होतच असणार.

या सगळ्या सणांच्या साजरीकरणाविषयीच्या आक्षेपांवर ब-याच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं मिळतात -

१. एवढे जण सेलिब्रेट करतात. आम्ही केलं तर काय मोठा फरक पडणार आहे? (असाच विचार प्रत्येक जण करत बसला, तर परिस्थितीत बदल कसा होईल?)
२. होळी/रंगपंचमी/दिवाळी/संक्रातीच्या वेळी आमच्या चिमुकल्या मुलांचा आनंद पाहून धन्यता वाटते. (तुमच्या चिमुकल्यांच्या हौशीपायी तुम्ही इतर कित्येक निरपराध चिमुकल्या जीवांना विनाकारण त्रास देता त्याचं काय?)
३. संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे? (म्हणजे वर्षभर तुम्ही निसर्गाला इजा न पोचवण्यासाठी घेतलेली काळजी एका दिवसात धुळीला मिळते)
४. फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय? (सगळं कबूल. पण "दुसरा गू खातो मग मी खाल्ली तर काय बिघडलं?" या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? आणि आपण आपल्या स्वतःमध्ये काही सुधारणा करता येते का हे आधी बघावं. आपल्या सणांमध्येच नको त्या गोष्टी होत असताना इतरांच्या सणांविषयी आक्षेप घेतले, तर 'आधी स्वतःच्या नाकाचा शेंबूड पूसा' असंच आपल्याला लोक म्हणणार ना)
५. जगभर होणारी युद्धं, गाड्या, कारखाने यांच्यातून निघणारे दूषित वायू, सांडपाणी, ऐरोप्लेनच्या आवाजाने जवळपासच्या लोकांना होणारा त्रास, फिल्म्समध्ये दाखवल्या जाणा-या खोट्या पावसात होणारा पाण्याचा अपव्यय यांच्या मानाने आम्ही खेळलेल्या रंगपंचमीने, उडवलेल्या फटाक्यांनी होणा-या प्रदूषणाचं प्रमाण अत्यल्प म्हणावं लागेल. (अच्छा, म्हणजे सगळी दुनिया येन केन प्रकारेण निसर्गाची वाट लावतंच आहे, त्यात आपणही खारीचा वाटा उचलावा असा उद्दात्त हेतू दिसतो मंडळींचा)
६. तू एवढा बोलतोयस, निसर्गाला हानी, निसर्गाला हानी... स्वतः काय करतोस रे भाड्या? (निसर्गाला होणारी हानी दिसून आल्यावर, पतंग उडवणं, होळी/रंगपंचमी खेळणं [सुकी असो वा ओली], घरी गणपती आणणं, दहीहंडीत भाग घेणं [मला तसंही कोण घेणार म्हणा], दिवाळीला किंवा अगदी ३१स्ट ला सुद्धा फटाके उडवणं,
बंद केलं आहे

. तरी माझ्या परीने हे सगळे सण निसर्गाला त्रास न देता एंजॉय करायला शिकलो आहे.)

सुधारणेला सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात. मी तर केली, इतर अनेकांनी करण्याची वाट पाहतोय. [काय रे नेहमीचं तेच तेच रटाळ विषय किती किस पाडणार?? - (कळत/नकळत निसर्गाला हानी पोचवून सण साजरा करणा-या दहा लोकांनी समजा लेख वाचला, तर निदान एकाच्या तरी डोक्यात प्रकाश पडून आचरणात बदल होईल अशी लेख लिहीण्यामागची आशा... पुढेही वेळीवेळी याच आशयाचा किस [जमल्यास अधिक सशक्तपणे] पाडत राहीन...)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

लेख आवडला - तळमळीने लिहिला आहे असं जाणवतं. मी सण साजरेच करत नाही कारण माझा उत्सवी स्वभाव नाही. दिवाळीत फटाके उडवणे लहानपणीच बंद केले आहे. …स्वतःच्या सोसांपुढे, हौसेमौजेपुढे लोकांना हा विनाश किरकोळ वाटत असणार. पण त्याचे परिणाम कधी न कधी आपल्यापुढे महासंकटे बनून उभे ठाकणारच आहेत हे खरं आहे - तेव्हासुद्धा हे लोक देवांची करुणा भाकण्यासाठी यज्ञ वगैरे करून त्यात बळी देतील / धान्याची नासाडी करतील अशी खात्री आहे माझी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

लेख आवडला - तळमळीने लिहिला आहे असं जाणवतं. मी सण साजरेच करत नाही कारण माझा उत्सवी स्वभाव नाही. दिवाळीत फटाके उडवणे लहानपणीच बंद केले आहे. …स्वतःच्या सोसांपुढे, हौसेमौजेपुढे लोकांना हा विनाश किरकोळ वाटत असणार. पण त्याचे परिणाम कधी न कधी आपल्यापुढे महासंकटे बनून उभे ठाकणारच आहेत हे खरं आहे - तेव्हासुद्धा हे लोक देवांची करुणा भाकण्यासाठी यज्ञ वगैरे करून त्यात बळी देतील / धान्याची नासाडी करतील अशी खात्री आहे माझी!!
तंतोतंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेख अतिशय आवडला. ५ स्टार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३. संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे?
५. जगभर होणारी युद्धं, गाड्या, कारखाने यांच्यातून निघणारे दूषित वायू, सांडपाणी, ऐरोप्लेनच्या आवाजाने जवळपासच्या लोकांना होणारा त्रास...

हे दोन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. निव्वळ सणच नव्हे तर मानवाच्या अस्तित्वामुळेच निसर्गावर परिणाम होतो. सण साजरे करणं हा या सर्व जगण्याच्या पॅकेजमध्येच अंतर्भूत होतं. प्रश्न असा आहे की हे दुष्परिणाम टाळण्याचा सर्वात उत्तम उपाय काय? तर नुसतं सणांवर लक्ष केंद्रित न करता सर्वसामान्य जीवनच प्रदूषणरहित करायला हवं. गेल्या शंभर वर्षात जी लोकसंख्येची प्रचंड वाढ झाली आहे तिला शिकवणं, जीवंत ठेवणं आणि प्रगती साधणं यापायी प्रदूषणाचा मुद्दा मागे पडला.

पन्नास आणि साठच्या दशकांत न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांत स्मॉगचा प्रचंड प्रादुर्भाव होता. यावर उपाय केले जाऊन आता ती शहरं जवळपास स्मॉगमुक्त झाली आहेत. सांगायचा मुद्दा असा की असे प्रयत्न चालू आहेत. त्यांना यश मिळण्याचा इतिहास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात 'निसर्ग' म्हणजे नक्की काय काय हे समजलं नसल्याने 'त्याला' होणारा त्रास याचा एका पातळीहून अधिक विचार मी करत नाही.
मात्र सभोवताली हिरवाई असावी, मला आवडते तसे विविध पक्षी बघता यावेत म्हणून वृक्षतोड टळावी असे वाटते. अस्वच्छतेतून रोगराई पसरते, मनाला अप्रसन्न वाटते त्यामुळे मला कचरा टाकणे/प्लॅस्टिक वापरणे आवडत नाही. वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण जसे माझ्या आरोग्याला घातक आहे तसेच ते सार्वजनिक आरोग्यालाही घातक आहे त्यामुळे माझ्या खिशाला परवडेल तेवढे त्या प्रदुषणात सहभागी होणे टाळतो.

बाकी, या सवयी एरवीही ही असल्या की निव्वळ सणांसाठी म्हणून काही वेगळे वागावे लागत नाही.

मी सण साजरे वगैरे यथेच्छ करतो, फक्त त्यामुळे इतरांना क्षणिक/दूरगामी तसेच मला (क्षणिक/दूरगामी) त्रास होणार नाही याचे भान ठेवतो. ते निसर्ग वगैरेचे मला कळत नाही आणि त्याचे तितकेसे सुतकही नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दरवेळी संतुलन राखणं/दाखवणं गरजेचं आहे का?
होळीला सगळे बोंब ठोकत असताना "गाढवाच्या बैलालाsss" अशी हाक देउन पाहता येतेच ना.
अशा धाग्यांतही "निसर्ग वगैरेला वाचवणं नितांत गरजेचं वगैरे आहे" अशी बोंब ए सी मध्ये बसून ठोकायला नेमकं काय जातं?
तेवढं तरी करा नं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

संतुलन आहे का माहिती नाही. मला खरच असं वाटतं

उलट "निसर्ग कित्ती कित्ती छान अस्तो. मी 'निसर्ग'(!) वाचवायला मदत करतो" वगैरे बोलणं अधिक संतूलीत समजलं जातं असे कळते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. पूर्वी फक्त होळीला बोंबा मारायचे. आता प्रत्येक सणाला मारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मुळात 'निसर्ग' म्हणजे नक्की काय काय हे समजलं नसल्याने...

देवाची कृपा आहे हो तुमच्यावर! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव म्हणजेही मला नक्की काय समजलं नाहिये Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निसर्ग उरला आहे का?

अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया वजा जाता इतरत्र निसर्ग अगोदरच माती करून झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बळंच? दक्षिण आम्रिकेतील अ‍ॅमेझॉन खोरे अन आफ्रिकेतील बराच भाग अजूनही शिल्लक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहारा वाळवंटदेखिल निसर्गातच मोडत असावं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्र हा निसर्गात किम्वा पर्यावरणात मोडतो का?
नसेल तर मग अमेरिकेवाले चंद्राला अणु तंत्रज्ञानानं उडवून द्यायचा प्लॅन करु लागल्यावर लोकांची झोप का उडाली?
निसर्गात येत असेल तर :-
पृथ्वीबाहेरही निसर्ग आहे?
पृथ्वी संपली म्हणजे निसर्ग संपला असे होणार नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निसर्ग म्हणजे आधी तुमची व्याख्या सांगा मग याबद्दल बोलता यावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारत्, पाक, बांग्लादेश, इंडोनेशिया, चीन, मेक्सिको, ब्राझिल, द . आफ्रिका, इ इ अनेक देशांत जे महानगरांत वा गावांत लोक राहतात त्यांच्याभोवतीचा परिसर अत्यंत घाण आहे. एका सुंदर ग्रहावर आपण किती घाणीत वाढत आहोत याची या लोकांना कल्पनादेखिल नसते.

पुण्याचेच उदाहरण घ्या. ध्वनिप्रदूषणाला काही मर्यादा नाही. जुने पुणे अत्यंत वर्दळीचे आहे. नद्या घाण झालेल्या आहेत. रस्त्यांकाळी सर्वत्र कचरा आहे. धूळ आहे. झाडे कापली गेली आहेत. डोंगर बोडके आहेत. सगळी घरे घाण डीजाईनची आहे (अल्पशा कॉलन्या सोडल्या तर). शहर संपता संपत नाही. प्लास्टीकने सगळीकडे थैमान घातले आहे. कोणते कोणते कारखाने कोणता कोणता धूर सोडत आहेत. स्कायलाईन कंजेस्टेड घरांची दिसते. रस्ते छोटे. पार्किंगला जागा नाही, गाडी मंद वेगाने चालवायची. असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकांकडे गाड्या आहेत म्हणून पार्किंगचा प्रॉब आहे.
लोकांकडे घरं आहेत म्हणून दाटीवाटी आहे.
उंच बिल्डिम्गा बांधायचे तंत्रजनान उपलब्ध आहेत व सोयीसथी लोक वापरत आहेत.
लोकं भरपूर संख्येने जिवंत आहेत म्हणून दाटीवाटी आहे.
इंडास्ट्र्या आहेत. मान्वी जीवनास उपयुक्त वस्तू त्या बनवत आहेत.

थोडंफार इकडचं तिकडं झालं तर बिघडलं काय?
आशावादी व्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे सगळं नसलं तरी काही फरक पडत नाही.

माणसाला खाणारी आणि हागणारी मशिन बनवणारी संस्कृती मान्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुणाला मान्य नाही??? आणि फरक कुणाला पडत नाही?

आणि तसेही मानवजात या पृथ्वीतलावर नसली तरी शष्प फरक पडत नाही.

काही झालं तरी तुम्हीसुद्धा त्या काळात इतक्या वर्षांनंतर परत जाऊ शकणार नाही. म्हणजे गेला तरी राहवणार नाही. नव्याच्या नवलाईचे नऊ दिवस झाले की पुनरेकवार त्या गोङ्गाटात यावेसे वाटतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा प्रश्न काय तुमचं उत्तर काय?
तुम्ही निसर्ग कशाला म्हणता ते सांगा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निसर्गापेक्षा सायकलिंग केल्याने अधिक कॅलरीज् जाळल्या जातात.
निसर्ग क्यालरी कशा जाळाव्यात, ढेरी कशी कमी करावी ह्याबद्दल बोलत नाही.
हाड थू त्या निसर्गाच्या.
प्राणवायू देणार्‍या झाडांपेक्षा muscle मजबूत करणारी gym श्रेष्ठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात निसर्गापासून दूर राहून जंक फूड खाऊनच हा एक्सेस क्यालरीजचा प्रश्न उद्भवला आहे. निसर्गाशी जवळीक साधलीत, आवश्यक तेवढेच खाल्लेत तर ढेरी वाढणारच नाही. रोज चाललात, वेळोवेळी ट्रेकिंग केलेत तर मसल्सचा मसला हल होऊन जायला अडचण ती कसली?????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निसर्गापेक्षा सायकलिंग केल्याने अधिक कॅलरीज् जाळल्या जातात.

नाही रे. पूर्ण वाढ झालेल्या माणसाला, काहीही व्यायाम न करता, आहे तो आकार कायम ठेवण्यासाठी निदान १८०० ते २००० कॅलऱ्यांची आवश्यकता असते. चयापचायचा दर कमी असणाऱ्यांना कमी लागतील, तरी निदान १४०० तरी असतातच. (हे आकडे जिममधेच मोजलेले पाहिले आहेत.) दारिद्रय रेषा मोजायला २००० कॅलरी धरतात. एकदा दिवसात सायकल चालवून किंवा धावून किंवा व्यायाम करून, सामान्य माणूस दिवसाला ५००-७०० पेक्षा जास्त कॅलऱ्या खर्च करू शकणार नाही. आणि रोजच्या रोज तर नाहीच नाही.

यात माणसाचं शरीर नैसर्गिक असं मानलं आहे. शरीरात कसलेही इंप्लांट्स नसणाऱ्यांबद्दल हे गृहितक ठीक मानता यावं, नाही का?

---

अवांतर - "मज्यशि बहिनशिप कर्नर क ?" या सहीमुळे हे गाणं, विशेषतः त्याचा शेवट आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही सर्व माहिती निसर्गात राहून मिळत नाही.
निसर्गानं कधी हे आकडे असे लिहून आपल्या हातात ठेवलेले नाहित.
ती जिममध्ये जाउन किम्वा इतरत्र राहूनच मिळते.
निसर्ग भोसडिचा हरामखोर आहे.
हाड थू त्या निसर्गाच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओक्के निसर्ग म्हणजे जिम का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही प्रश्न कशाला म्हणता ते सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्याख्येचा खेळ कुठपर्यंत खेळायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खेळापेक्षा हत्ती श्रेष्ठ.
हत्तीवर बसून सवारी घेता येते
खेळावर बसून सवारी घेता येत नाही.
थुत त्या खेळाच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी पुढिल वाक्याला तरी नक्की प्रश्न म्हणतो, त्याचं उत्तर द्या:
"तुमच्या मते निसर्गाची व्याख्या काय?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रश्नापेक्षा पॅण्ट्री श्रेष्ठ.
पॅण्ट्रीमध्ये जाउन खाता येते.
प्रश्नात जाउन खाता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पँट्रीपेक्षा प्रश्न श्रेष्ट
प्रश्न विचारता येतो
पेंट्री विचारता येत नाही
थुत त्या पँट्रीच्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅण्ट्री ?
ही पहा पॅण्ट्री "विचारली".
थुत त्या प्रश्नाच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा!
मनोबाची टेम्पेट मोडली!!!
थुत त्या टेंप्लेटच्या Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मार्मिक दिली, पण विनोदी देता येईना, म्हणून स्वतंत्र प्रतिसाद!

बाकी टेम्प्लेट कुठून उचललेय ते कळलंय आम्हांला. पण जेणू काम तेणू थाय, मनोबा करे सो गोता खाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टिव्ही बघणे म्हणजे पण निसर्गाला त्रास आहे, सण वगैरेवर लेख लिहिताना तुम्ही जो मॉनिटर वापरलात त्याने पण निसर्गाची हानी होते.

बरं ते जाऊदे हि लिस्ट बघा -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सणांना शिव्या घालणारे सगळे या प्रतिसादावर शांत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकांच्या तथाकथित भूमिकेचा निषेध करतानाही तुम्ही तंत्रज्ञान वापरून एनर्जी वाया घालवत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एनर्जी फक्त आपल्याच पद्धतीने वाया जावी असा हेका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हेका नाही हे तुमच्यासाठी अतिशय चुकीचे वर्णन आहे इतकेच म्हणतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी दांभिकपणे लॅपटॉप वापरण्याबद्दल बोलत नाही म्हटलं. स्वतःचं मुसळ दिसत नाही पण लोकांचं कुसळ दिसतं असा धागा आहे हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL

सण साजरा करण्याच्या नावाखाली डॉल्बीच्या भिंती उभारून लोकांच्या कानाचे पडदे फाडणे, फटाक्यांनी अख्खे वातावरण भरून टाकणे हे कुसळ असेल तर तुम्हाला कोपरापासून नमस्कार.

३१ डिसेंबर असो नैतर गणेशोत्सव, दोन्ही ठिकाणी असले राडे करणारे लोक सारख्याच फटकावण्याच्या लायकीचे आहेत.

लॅपटॉप वापरणे ही माझी गरज आहे.

तेही एक असो.

पण हे मी सारखंसारखं स्पष्टीकरण का देत बसू???? तेही तुम्हाला?

असं बोलायचं कारण म्हणजे परंपरेने चालत आलेल्या कुठल्याही गोष्टींवर टीका करायचीच नाही असा तुम्ही विडा उचलला आहे. पारंपरिक गोष्टींवर टीका करायची तर आधी मॉडर्न गोष्टींकडे पहा असा जो एकसुरी हेका आहे तो अतिशय हास्यास्पद आहे. हे म्हणजे वडीलधार्‍यांनी चूक केली तर त्यांना बोलण्याअगोदर स्वतःकडे पहा असे म्हणण्यासारखे आहे. असे केले तर काहीच साध्य होणार नाही.

मॉडर्न गोष्टींत लाख दोष असतील, दॅट डजंट मेक परंपरा राईट. जिथे चुकते आहे तिथे दोहोंनाही फटकारलेच पाहिजे. दोहोंपैकी कुणाला फटकावले जावे हा प्राधान्यक्रम ज्यानेत्याने आपापल्या आवडीनुसार ठरवावा. त्यात कुणी कुणाला बोलायचं काम नाही तू यालाच का शिव्या घालतोस आणि त्याला का नाही म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लॅपटॉप वापरणे ही माझी गरज आहे.

+१

असं बोलायचं कारण म्हणजे परंपरेने चालत आलेल्या कुठल्याही गोष्टींवर टीका करायचीच नाही असा तुम्ही विडा उचलला आहे. पारंपरिक गोष्टींवर टीका करायची तर आधी मॉडर्न गोष्टींकडे पहा असा जो एकसुरी हेका आहे तो अतिशय हास्यास्पद आहे. हे म्हणजे वडीलधार्‍यांनी चूक केली तर त्यांना बोलण्याअगोदर स्वतःकडे पहा असे म्हणण्यासारखे आहे. असे केले तर काहीच साध्य होणार नाही.

मॉडर्न गोष्टींत लाख दोष असतील, दॅट डजंट मेक परंपरा राईट. जिथे चुकते आहे तिथे दोहोंनाही फटकारलेच पाहिजे. दोहोंपैकी कुणाला फटकावले जावे हा प्राधान्यक्रम ज्यानेत्याने आपापल्या आवडीनुसार ठरवावा. त्यात कुणी कुणाला बोलायचं काम नाही तू यालाच का शिव्या घालतोस आणि त्याला का नाही म्हणून.

माझे कष्ट वाचवल्याबद्दल अनेक आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॅपटॉप वापरणे ही माझी गरज आहे.

लॅपटॉपपेक्षा रबरी ट्यूब श्रेष्ठ.
रबरी ट्यूब घेउन पाण्यात उडी मारता येते.
लॅपटॉप घेउन तशी उडी कुठे मारता येते?
थुत त्या लॅपटॉपच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे ए! मुसुंकडून टेम्प्लेट बनवायचे धडे घेतलेस का काय?!

संभाव्य प्रतिसादः
टेम्प्लेटपेक्षा कॉपीपेस्ट श्रेष्ठ.
कॉपीपेस्ट करून श्रेय लाटता येते.
टेम्प्लेट घेऊन श्रेय कुठे लाटता येते?
थुत त्या टेम्प्लेटच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघु तैं पेक्षा हॅलेचा धूमकेतू श्रेष्ठ.
धूमकेतूचे निरिक्षण खगोलअभ्यास करावयास लावते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखातील पॅरानॉइड अ‍ॅटिट्युड पटला नाही. मांजा, होळी, रंगपंचमी, दहिहंडी, दिवाळी हि उदाहरणे निसर्गाला त्रास होणारी वाटत असल्यास कुठल्याच 'लक्झरी' परवडणार्‍या नाहित हे ध्यानात घ्यायला हवे. उदा. मांजामुळे पक्षी मरत असल्यास त्यांची शेती करावी, मांसाहार करणार्‍यांनी ह्या उदाहरणाविरुद्ध बोलणे गैर आहे. ह्याप्रकारे प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद होउ शकतो, सणांमुळे कचरा होत असल्यास महानगरपालिकेला सणांमुळे मिळणार्‍या उत्पन्नातुन त्याचे व्यवस्थापन करावे, सणांच्या मर्यादा निश्चित कराव्यात, पण साध्या टिव्हीसारख्या लक्झरी सोयी वापरताना होणारे दुष्परिणाम ह्या सणांच्या अनेक पट आहेत.

स्पिकरच्या भिंतीवर मर्यादा असण्याबद्दल आक्षेप नाहिच ते चूक आहेच त्यावर मर्यादा हव्याच, पण इतर उदाहरणे व त्यांचे विश्लेषण पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सणांमुळे कचरा होत असल्यास महानगरपालिकेला सणांमुळे मिळणार्‍या उत्पन्नातुन त्याचे व्यवस्थापन करावे, सणांच्या मर्यादा निश्चित कराव्यात, पण साध्या टिव्हीसारख्या लक्झरी सोयी वापरताना होणारे दुष्परिणाम ह्या सणांच्या अनेक पट आहेत.

कसंय, जे थांबवणे तुलनेने सहज शक्य आहे ते थांबवा असा अ‍ॅटिट्यूड आहे हा. सणांपेक्षा लाँग टर्म दुष्परिणाम अन्य गोष्टींचे होतात हे आजिबात अमान्य नाही, पण कमी प्रदूषणाकडे जाताना सहज शक्य आहे ते थांबवण्यावर फोकस केला तर हर्कत काये? शक्य तिथे पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणे, शक्य तिथवर चालत जाणे, इ. अनेक गोष्टी आपल्या हातात आहेत. पण त्यासोबत प्रदूषण करणार्‍या अनेक गोष्टी गरजेचा भाग होऊन बसल्यात, उदा. लॅपटॉप वापरणे इ. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त काही हाती लागणारच नाही पण जितकं होतंय तितकं तरी करू!!

३१ डिसेंबर वैग्रेलासुद्धा जो राडा चालतो तोही तितकाच मूर्खपणाचा असतो आणि तितकाच डोक्यात जातो. हाही एक सणच म्हटला पाहिजे. हा तुलनेने सेकुलर असला म्हणून काय झालं???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसंय, जे थांबवणे तुलनेने सहज शक्य आहे ते थांबवा असा अ‍ॅटिट्यूड आहे हा. सणांपेक्षा लाँग टर्म दुष्परिणाम अन्य गोष्टींचे होतात हे आजिबात अमान्य नाही, पण कमी प्रदूषणाकडे जाताना सहज शक्य आहे ते थांबवण्यावर फोकस केला तर हर्कत काये?

तत्वतः पटणारी भुमिका.

फक्त वेगळा परिप्रेक्ष्य मांडणारे एक उदाहरण सांगतो, सुबत्ता असलेल्या हॉलंडमधील एक शहर युत्रेख, शहरात सर्व सोयी, सगळीकडे(ऑलमोस्ट) कसं स्वच्छ आणि नेटकं, बहुतांश नागरीक उत्तम सिव्हिक सेन्स असणारे, एके दिवशी सफाई कर्मचारी संपावर जातात, त्यादिवशी फार फरक पडत नाही, एक आठवड्यानंतर ते शहर एवढं बकाल होतं कि नाक मुठीत धरुन बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी वावरावं लागतं.

मुद्दा असा कि लोकांकडे सिव्हिक सेन्स असणं गरजेचं आहेच पण लोकांना पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणं तेवढचं गरजेचं आहे, आपल्याकडे सार्वजनिक सोयी वापरल्या जात नाहित असं नाही, बस/रेल्वे/पोस्ट/हॉस्पिटल/रस्ते/शौचालये/जिने/कचरा कुंड्या ह्या सगळ्याच सार्वजनिक सोयी (ओव्हर)वापरल्या जातातच, त्यामुळे नागरीकांचा सिव्हिक सेन्स जज करण्यासाठी महापालिकेला अजुन बर्‍याच सोयी करणे गरजेचं आहे.

आणि दुसर्‍याला चुकत आहेस हे सांगताना, निदान मीहि चुकतो आहे हे मान्य करुन भुमिका मांडायला हरकत नाही(हे मुळ लेखाला उद्देशुन).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा असा कि लोकांकडे सिव्हिक सेन्स असणं गरजेचं आहेच पण लोकांना पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणं तेवढचं गरजेचं आहे, आपल्याकडे सार्वजनिक सोयी वापरल्या जात नाहित असं नाही, बस/रेल्वे/पोस्ट/हॉस्पिटल/रस्ते/शौचालये/जिने/कचरा कुंड्या ह्या सगळ्याच सार्वजनिक सोयी (ओव्हर)वापरल्या जातातच, त्यामुळे नागरीकांचा सिव्हिक सेन्स जज करण्यासाठी महापालिकेला अजुन बर्‍याच सोयी करणे गरजेचं आहे.

सिव्हिक सेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांचा असा वन टु वन संबंध असतो का? रस्त्यावर थुंकणे किंवा कचरा करणे या गोष्टी मिरजेतल्या झोपडपट्टीत चालतात तशा मुंबैच्या पॉश इलाख्यातही चालतात. द अग्ली इंडियन या बेंगलोरमधल्या अफाट कार्यक्रमाबद्दल तुम्ही वाचलं असेल. नसेल तर ही लिंक.

दोहोंचा काहीएक संबंध असतो हे मान्य, पण इन्फ्रास्ट्रक्चर असूनही भारतीय लोक घाण करतात तेव्हा ते अगदीच पूर्णपणे म्हणवत नाही.

बाकी सहमतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण इन्फ्रास्ट्रक्चर असूनही भारतीय लोक घाण करतात तेव्हा ते अगदीच पूर्णपणे म्हणवत नाही.

ह्या वाक्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं बोलायचं कारण म्हणजे परंपरेने चालत आलेल्या कुठल्याही गोष्टींवर टीका करायचीच नाही असा तुम्ही विडा उचलला आहे. पारंपरिक गोष्टींवर टीका करायची तर आधी मॉडर्न गोष्टींकडे पहा असा जो एकसुरी हेका आहे तो अतिशय हास्यास्पद आहे.

बॅटमॅन, असं कोणी म्हटलं कि परंपरांवर टिका करायचीच नाही? पण फक्त परंपरांवर टिका करायची हा दांभिकपणा आहे. तुला जे म्हणायचं आहे त्यापेक्षा मला वेगळं काही म्हणायचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बॅटमॅन, असं कोणी म्हटलं कि परंपरांवर टिका करायचीच नाही? पण फक्त परंपरांवर टिका करायची हा दांभिकपणा आहे. तुला जे म्हणायचं आहे त्यापेक्षा मला वेगळं काही म्हणायचं नाही.

कारण तुम्ही परंपरेने चालत आलेल्या कुठल्याही गोष्टीवर टीका करत नाही. त्यामुळे तसा ग्रह होणे स्वाभाविकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी मूळ लेखात निसर्ग ऐवजी परिसर किंवा पर्यावरण असा शब्दप्रयोग करायला हवा होता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे?>>

अगदी बरोबर.
बकरी इदला प्राण्यांचा कळवळा येत नाही बरं कुणाला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकरी इदला प्राण्यांचा कळवळा येत नाही बरं कुणाला

हा प्रश्न ब-याच जणांनी विचारलाय... एक शंका आहे. बकरी इदेला ज्या प्राण्यांची सामूहिक कतल होते, ती झाल्यानंतर या प्राण्यांना खातात की अल्लाला बळी देऊन मग त्यांना फेकून देतात?? जर फेकून देत असतील, तर त्याला विरोध झालाच पाहिजे. जर खात असतील, तर ते त्यांचं अन्न आहे. त्याला विरोध का करायचा? एकाच वेळी एवढ्या संख्येने मारले जातात म्हणून?? ही प्रामाणिक शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकरी ईद ला कुर्बान केलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठीच असते. त्या मांसाचे तीन समान भाग करतात. एक स्वतः व कुटुंबियांसाठी, एक मित्र आणि आप्तांसाठी आणि एक गोर-गरीबांसाठी. ही तीन भागांची विभागणी धार्मिक नियमानुसार आवश्यक असते. प्राण्याची कातडी (जिची किंमत बर्यापैकी असते) अनाथालये/ मदरसे यांना दिली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनापेक्षा मी श्रेष्ठ
मी स्वतःला गप्प बसवू शकतो
मनाला मी गप्प बसवू शकतो का?
थूत त्या मनाच्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॅण्ट्री ?
ही पहा पॅण्ट्री "विचारली".

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे.

निसर्गाचा एवढा पुळकाच असेल तर जीडीपी थोडा कमी करा, लोकसंख्या कमी करा. लोक आपल्या पैशानी, कायदे पाळून जे करतात त्यावर आक्षेप घेऊ नका. लोकसंख्या आणि राहणीमान यांच्यामुळे निसर्गाची जी हानी होते त्याची तुलना सणांशी करता येणार नाही.

हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात. हा अशा प्रकारचा मांजा बाजारात यायच्या आधीपासूनच पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना होणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे (निष्फळ?) प्रयत्न होत आल्येत. निष्फळ अशासाठी की माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागल्येत.

तुम्हाला काय रस्त्यांत जागोजागी मरून पडलेले पक्षी आणि जखमी माणसे दिसतात का? मला तर नाही दिसले. असेच असेल तर इतके खतरनाक विजेच्या तारा, गॅसच्या पाईपलाईन्स काढून टाका. तारांत अडकून किती माकडे मरतात.

होळीला जागोजागी एवढी जाळपोळ होते.

कारखान्यांत त्यापेक्षा जबरदस्त आगी लागतात. ते बंद करा.

वाळवी लागलेली, सुकलेली, आधीच मेलेली झाडं असतील तर एकवेळ ठीक आहे पण प्रसंगी जाळायला लाकडंच नाहीत म्हणून सरळ जिवंत झाडांना तोडून जाळून टाकतात.

बांधकाम आणि कागद क्षेत्रात किती झाडे लागतात त्याची कल्पना आहे का? नुसत्या त्या टाईम्सच्या जाहीराती नसत्या तर भारत कितीतरी टक्क्यांनी सुंदर दिसला असता.

काही वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, होळीनिमित्तच आला होता. त्यात असं म्हटलं होतं, की कचरा ओला असो किंवा सुका, तो जाळू नये. कारण तो अर्धवट जळला की त्याने निसर्गाला हानीच होते.

उद्योगजगत कितीतरी लाख वर्षे अपघटन होणार नाही असे प्लास्टीकचे ग्रेडस बनवत असते. ते बंद करा.

(हेच कदाचित माणसांवर अंत्यसंस्कार करतानाही लागू होत असावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रिक चितेवर मोठ्या तापमानावर शरीर पूर्णपणे जळून जात असल्याने निसर्गाला हानीकारक घटक हवेत शिरत नसावेत?) होळी आग न लावता साजरी करता येत नाही का?

पक्षी सगळ्या ऑफिसांचे एसी बंद करा. अमेरिकेत नैसर्गिक वायूने घरे गरम राखतात. ते बंद करा.

असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जीडीपी थोडा कमी करा, लोकसंख्या कमी करा. लोक आपल्या पैशानी, कायदे पाळून जे करतात त्यावर आक्षेप घेऊ नका. लोकसंख्या आणि राहणीमान यांच्यामुळे निसर्गाची जी हानी होते त्याची तुलना सणांशी करता येणार नाही.

म्हणजे?
कमी जीडीपी व लोकसंख्या असलेल्या देशात निसर्गाची हानी(ही निसर्गाची म्हणजे काय? हे तुम्हीही अजून सांगु शकलेला नाहित हे आहेच)होत नाही असा तुमचा दावा आहे काय?
दुसरे जिथे जीडीपी व लोकसंख्या कमी आहे त्या देशांतील नागरीकांनी सणांच्या निमित्ताने निसर्गाची हानी (!!!) केली तरच ती गैर असेल असे आपले मत आहे काय?

बाही तुम्ही बेछुट बोलत रहायचे आणि आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहित या खेळामुळे तुमची भुमिका उघडी पडत चाललीये बरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्याही सुज्ञ माणसास प्रदूषणाच्या संबंधाने निसर्ग म्हणजे काय त्याची व्याख्या द्यायची गरज नाही. मी व्याख्या दिली तर त्यातील शब्दांच्या व्याख्या विचारून पुन्हा विषय लांबवणार. मी निसर्ग शब्दाचा असा कोणता आगळावेगळा वापर केला आहे जेणेकरून व्याख्या विचारावी लागावी?

आणि प्रत्येक विधानाचा व्यत्त्यास लेखकास अभिप्रेत असतो (आणि असा व्यत्त्यास खरा असतो) हे कसे गृहित धरता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रदुषणाच्या संदर्भातही व्याखेची गरज आहेच.
तुम्ही जेव्हा माणूस निसर्गाची हानी करतोय म्हणताय तेव्हा त्या 'निसर्गाची' कोणती सीमा तुम्हाला अभिप्रेत आहे?
दुसरे असे निसर्गाची हानी म्हणजे काय? माणसाला धोका निर्माण होणे (एकवेळ) समजू शकतो. 'निसर्गाला धोका' किंवा 'निसर्गाची हानी' म्हणजे काय?

ऑक्सीजन हा ही निसर्गाचा भाग व कार्बनही मग कार्बन वाढल्याने निसर्गाला कशी हानी पोचेल?

तेव्हा माणूस 'निसर्गाला हानी' पोचवतोय असे घाऊक वक्तव्य करायच्या आधी दहादा विचार करा इतकेच अधोरेखीत करायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसं आहे, माणसाला सगळे शोध लागले आहेत, माणूस म्हणजे काय हे कळले आहे हे तुमचे गृहितक आहे. तुम्ही जो मानव म्हणता त्यात तुम्हाला एक निर्जीव रेणूसंच अभिप्रेत आहे. मी जो माणूस म्हणतो त्यात मला स्वतंत्र अनादी अनंत असा जीव अभिप्रेत आहे. मी अजूनही कितीतरी शोध लागायचे आहेत असे समजतो. आपण सगळे शोध लावून झाले आहेत असे समजता. जगातल्या कोणत्या गोष्टीचं इतर कोणत्या गोष्टीशी पूर्ण नातं काय आहे हे मला माहित नाही म्हणून मी कुठे छेडछाड करण्यापूर्वी विचार करतो.

देहपोशी अर्थव्यवस्था इतकेच म्हणून निसर्गाकडे मी पाहत नाही. म्हणून माणसाला धोका यापलिकडे निसर्गाला धोका या संज्ञेलाही माझ्याकडे अर्थ आहे. पण सध्याला माणसाला धोका हा तुमचाच सोपा अर्थ घेऊ. अगदी त्या दिशेनेही माणसाचं वर्तन नीट नाहीय. पारंपारिक दिसलं काही कि दे ठोकून! आणि रोज आपलाच प्राण घोटायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी अजूनही कितीतरी शोध लागायचे आहेत असे समजतो. आपण सगळे शोध लावून झाले आहेत असे समजता.

उगाच? तुम्हाला काय समजायचं ते समजा माझ्या माथी काहीही आरोप का?
मी असं कधी म्हटलंय? बाप दाखव नैतर... असोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ज्या अर्थी निसर्गाच्या सीमा आपण मला विचारत आहात, त्या अर्थी सगळे शोध लागलेले आहेत असे होत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी कधी निसर्गाच्या सीमा विचारल्या? मी जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी म्हणता तेव्हा तुम्हाला त्या निसर्गात "तुम्हाला" काय अभिप्रेत आहे? तुमच्यासाठी निसर्गाची सीमा काय हे विचारले आहे? तुमच्या सोयी साठी प्रश्न जसाच्या तसा पेष्टवत आहे:

तुम्ही जेव्हा माणूस निसर्गाची हानी करतोय म्हणताय तेव्हा त्या 'निसर्गाची' कोणती सीमा तुम्हाला अभिप्रेत आहे?

प्रश्न तुमच्या मताबद्दल - पर्सेप्शनबद्दल आहे, तुम्ही तुमच्यापुरत्या केलेल्या व्याख्येबद्दल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि दुसर्‍याला चुकत आहेस हे सांगताना, निदान मीहि चुकतो आहे हे मान्य करुन भुमिका मांडायला हरकत नाही(हे मुळ लेखाला उद्देशुन).

पर्यावरणाला सणांच्या साजरीकरणाच्या विशिष्ट 'पद्धतींमुळे' होणा-या हानीकडे लोकांचं लक्ष वेधून घेऊन त्याबद्दल(च) भूमिका मांडायचा हेतू होता. टीव्ही बघणे गरजेचेच आहे असं नाही, त्यामुळे त्याबाबतीत मीही चुकतो हे मी मान्य करतो. पण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरणे, गाड्या ही माझ्या कामानिमित्तच्या गरजा भागवणारी साधनं आहेत ज्यांना सध्यातरी पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले (आणि मला परवडणारे) उपाय उपलब्ध नाहीत. स्वतःच्या गाडीऐवजी सार्वजनिक वाहतूक सेवांचा जास्तीत जास्त लाभ मी घेतोच पण जिथे बस ट्रेनने किंवा पायी जाणं सोयीचं नसेल तिथे मला माझी स्वतःची गाडी वापरावी लागेलच ना. सण अमूक एकाच पद्धतीनं साजरा झाला पाहिजे, मग ती पद्धत पर्यावरणाला मारक असली तरी चालेल, अशी सक्ती आहे का? सण अमूक एकाच पद्धतीने साजरे करणं 'गरजेच' नाहीये. सणांच्या नाझ्या साजरीकरणाच्या बाबतीत म्हणत असाल तर त्यात मी नेमका कुठे चुकतोय हे कृपया सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकून दोनदा दिलेला प्रतिसाद काढून कसा टाकावा??

@अरूण जोशी :

माणसाच्या अशा कित्येक अचाट उद्योगांमुळे कितीतरी प्राणी-पक्षी मरत असतातच की. काचेच्या इमारतींवर आपटून मरणा-या पक्ष्यांची संख्या जास्त असली म्हणून कमी 'इ-स्ट्राँग' दर्जाचे मांजे वापरल्याने जे काही चार-दोन पक्ष्यांचे जीव (तात्पुरते) वाचतील ते काय थोडं आहे??
या सर्वच बाबतीत सकारात्मक विचार आणि क्रिया व्हायला हव्या आहेत पण एका वेळी एका समस्येबाबत चर्चा करू. एक समस्या दाखवणा-यावर त्या समस्येची शिकार ठरणा-यांच्या इतर सगळ्याच (मानवनिर्मित) समस्या एकाच वेळी त्याच्यावर प्रतिवाद करायचा म्हणून उलट्या मारल्यात तर समस्या दाखवणारा प्रसंगी गप्पच बसेल आणि मग त्याला पुरोगामीत्वाचा अजून एक सोंगाड्या समजून लोक त्याच्या योग्य त्या मुद्यांकडेही दुर्लक्ष करतील. अशाने एक तरी समस्या सुटेल का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादातील संवादी सूर मला आवडला.

दोन्-चार पक्ष्यांचे जीव वाचावे म्हणून पतंग उडवायचा, त्यातला जास्तीचा आनंद घेणे चूक. पक्षांचे प्रेम असेल तर विमानसेवा बंद करा असे म्हणा. जगातले सगळे टर्बाईन बंद करा. सगळे साप मारून टाका. ...सारी पोल्ट्री देखिल सर्वात अगोदर बंद करा. लाखो चिकन रोज खाल्ली जात असताना, काय घेऊन बसलात २-४ पक्ष्यांचे?

मांज्याने पक्षी मेल्याचे कोणते वृत्त वैगेरे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुन्हा तेच!!!

दोन्-चार पक्ष्यांचे जीव वाचावे म्हणून पतंग उडवायचा, त्यातला जास्तीचा आनंद घेणे चूक. पक्षांचे प्रेम असेल तर विमानसेवा बंद करा असे म्हणा. जगातले सगळे टर्बाईन बंद करा. सगळे साप मारून टाका. ...सारी पोल्ट्री देखिल सर्वात अगोदर बंद करा. लाखो चिकन रोज खाल्ली जात असताना, काय घेऊन बसलात २-४ पक्ष्यांचे?

मघाचच्या प्रतिसादातही म्हटलं मी, आत्ताही म्हणतो. या सर्वच बाबतीत सकारात्मक विचार आणि क्रिया व्हायला हव्या आहेत पण एका वेळी एका समस्येबाबत चर्चा करू. एक समस्या दाखवणा-यावर त्या समस्येची शिकार ठरणा-यांच्या (इथे पक्षी) इतर सगळ्याच (मानवनिर्मित) समस्या, एकाच वेळी, त्याच्यावर(समस्या मांडणा-यावर) प्रतिवाद करायचा, म्हणून उलट्या मारल्यात तर समस्या दाखवणारा प्रसंगी गप्पच बसेल आणि मग त्याला पुरोगामीत्वाचा अजून एक सोंगाड्या समजून लोक त्याच्या योग्य त्या मुद्यांकडेही दुर्लक्ष करतील. अशाने एक तरी समस्या सुटेल का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा तेच!!!

वेलकम, वेलकम! वेलकम टू ऐसी अक्षरे, वेलकम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

==))
बादवे वेलकम टू ऐसी अक्षरे, वेलकम
ह्यापेक्षा वेलकम टू जोसी अक्षरे, वेलकम
चपखल बसेल नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्हाला विषय कसा हाताळायचा, समस्या कश्या सोडवायच्या याचं ज्ञान (विषय मांडायला घेतलाच आहे तर) असणं अभिप्रेत आहे.

मांजाने मरणारे पक्षी किती आणि पोल्ट्रीत मरणारे किती? This matters, matters to such an extent that it decides whether to rake the issue of मांज्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही तुलना काहिशी चूक आहे. पोल्ट्रीमधले पक्षी मारायच्या हेतूनेच वाढवलेले असतात. कावळा चिमणी कबूतर असे न पाळलेले पक्षी मेल्याबद्दल धागालेखकाल दुखः आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरूण जोशींशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरूण जोशींशी सहमत आहे.

प्रतिसादात "चक्क" हा शब्द राहून गेलाय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही निसर्गाची हानी म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय? >>>> मूळ लेखातला माझाच शब्दप्रयोग चुकला. आपण कोण निसर्गाची हानी करणारे? आपण कितीही आदळाआपट केली तरी निसर्गाला शष्प फरक पडत नाही. कारण आपण जे काही करतो तो निसर्गाच्याच एकूण प्रक्रियेचा एक छोटासा भाग आहे. याविषयावर एक वेगळा धागा (मिपावर पूर्वप्रकाशित) इथे काढण्यासाठी हात शिवशिवतायत....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेलकम, वेलकम! वेलकम टू ऐसी अक्षरे, वेलकम!

धन्यवाद. पण मिपाचा (प्रतिक्रिया-वाचनमात्र) दांडगा अनुभव आहे. Wink त्यामुळे यात काही नाविन्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, अस्संच आम्हांलाही वाटायचं. असो! तुम्हांलाही कळेलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्हाला विषय कसा हाताळायचा, समस्या कश्या सोडवायच्या याचं ज्ञान (विषय मांडायला घेतलाच आहे तर) असणं अभिप्रेत आहे.

छे!! काहीच ज्ञान नाही. जे दिसतं, जसं आकलन होतं, त्यावर आपलं मत मांडतो.

मांजाने मरणारे पक्षी किती आणि पोल्ट्रीत मरणारे किती?

इथे संख्यात्मक तुलना करणं मला तरी बरोबर नाही वाटत. सेवन करण्यासाठी प्राण्यांना मारणं वेगळं आणि आपल्या अनावश्यक (हा महत्त्वाचा शब्द आहे) उद्योगांमुळे मरणा-या प्राण्यांचा प्रश्न वेगळा. बाकी पोल्ट्रीत मरणारे म्हणजे भक्ष्य करण्यासाठी मारले जाणारे की व्यवस्थित निगा न राखली गेल्यामुळे किंवा रोगाची लागण वगैरे होऊन मरणारे, नेमकं कोणाबद्दल बोलताय ते कळलं नाही. अर्थात ते (इथेतरी) महत्त्वाचं वाटत नाहीये कारण इथे धागा काढण्याचा मूळ उद्देश 'सणासुदीतल्या मनोरंजनापायी पर्यावरणाला होणा-या (स्वतःवर नियंत्रण ठेवून रोखल्या जाऊ शकणा-या) नुकसानाला आक्षेप' हा आहे.

अहो, अस्संच आम्हांलाही वाटायचं. असो! तुम्हांलाही कळेलच!

चांगलंय. नवे अनुभव घ्यायला नेहमीच उत्सुक असतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यावरील माझा वाह्यातपणा थांबवतोय.
माझ्या काही अनाकलनीय,असंबद्ध वाटतील अशा प्रतिक्रिया मी हायपर असताना दिल्या आहेत.
अरुण जोशी ह्यांचे " विज्ञानापेक्षा धर्म श्रेष्ठ " हे विधान, त्यावर मी काढलेला धागा "अरुणराव का जगायचं" व त्या धाग्यावरील, इतरत्र ठिकाणचे त्यांचे प्रतिसाद ह्यांची संगती कळत नव्हती.
म्हणजे सुटा सुटा शब्द कळतो; पण पूर्ण वाक्याचा काहीही अर्थबोध होत नाही अशी अवस्था होइ.
कशापेक्षा काय श्रेश्ठ टह्रवायचं हे वाचाताना डोक्याला शॉट्ट लागला.
म्हणून मग मी ही काहीशा मिश्किल पद्धतीनं प्रतिसाद म्हणून "अमक्यापेक्षा तमकं श्रेष्ठ" असे प्रतिसाद दिले.
ह्यातील "अमकं" आणि "तमकं" ह्यात काही परस्परसंबंध असायला नको ह्याची पुरेपूर काळजी घेतली.
टगेगिरीत सामील झालेल्या ऋ, मेघु तै, अस्मि व इतर सर्वांचे आभार.
टागेगिरीस कारणीभूत अरुण जोशींचे विशेष आभार.
निखळ दंगा (व असंबद्ध बोलून वैचारिक सूड उगवणे) इतकाच हेतू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझी निसर्गाची कल्पना जेम्स लव्हलॉक या शास्त्रज्ञाच्या गाईया थियरीशी मिळतीजुळती आहे हे काही काळापुर्वी मला समजले.
मला असं वाटतं की सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, पृथ्वीवरील मर्यादित द्रव्य व इतर (उप)ग्रहगोलांची बलाबले यांपासून बनलेली जीवनानुकूल अशी संतुलित बंदिस्त व्यवस्था (सिस्टीम) म्हणजे निसर्ग.
ऊर्जेचा व द्रव्याचा सामान्य परिस्थितीत नाश होत नसल्याने निसर्गाला त्रास म्हणजे या व्यवस्थेच्या संतुलनाला त्रास असे समजण्यास हरकत नसावी.
बादवे, ही व्यवस्था म्हणजेच आमचा देव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्गायण ह्या पुस्तकात ऑल्मोस्त अशीच भूमिका मांदली होती.
म्हणजे सान्त स्रोत कसे सायकल करुन अनंतकाळ निसर्ग वापरतच राहतो हे मस्त दिलं होतं.
बहुतेक गोष्टी ह्या ठाउक असलेल्याच होत्या, पण त्या अशा पद्धतीनं मांडल्या की अधिक स्पष्ट झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चांगली व्याख्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!