एक Serious अन हृदयस्पर्शी "Timepass"…

आत्ता काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट बघितला…"Timepass"…
Trailar इतके आवडले होते याचे की, Release झाला की लगेच Theater गाठायचं हे तसं आम्हा मित्रांचे पूर्वीच नक्की झाले होते…
आलो मग बघून "Timepass"…
हा चित्रपट इतका आवडला की तो बघून आल्यानंतर असा एकही दिवस गेला नसेल ज्या दिवशी ह्याच्यातील dialogues बद्दल बोललो नसेल मी…
भेटल्यावर, जेवतांना, चहाला गेल्यावर, office मध्ये कधी फारंच bore झालं की "Timepass" चा विषय निघणार हे नक्कीच… कधी तो दगडू, ती प्राजू आणि कधी-कधी तर तो बालभारती देखील…
तसं ह्या चित्रपटाबद्दल लिहावं असं तो बघत असतांना वाटलं होतं पण आता लिहायलाच हवं हे आज वाटतंय, mobile मध्ये दुसऱ्यांदा बघतांना…

"Timepass" अजूनही HouseFull सुरुये आणि चांगलीच कमाई करतोय… (तसं "धूम-३" सारखा चित्रपट देखील कमवतो म्हणा आजकाल… )
पण खरंच… Theme, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, संगीत हे सारंच "उत्कृष्ट" आहे… "The Perfect Combo…"
"प्रेम" हा अतिशय नाजूक तरी कठीण आणि गुंतागुंतीचा विषय इतक्या व्यवस्थित आणि सहजरीत्या देखील हाताळता येऊ शकतो, हे ह्या चित्रपटातून रवी जाधव याने सिद्ध केलंय …

एक-एक प्रसंग आठवतोय मला ह्या "Timepass" मधला…"दगडूची" entry… त्याचं जरा "खेडवळ" पण "बागी" look… त्याची ती "टपोरी" भाषा… त्याचं ते daring… त्याचा भोळेपणा…
बालभारती, मलेरिया, कोंबडा आणि हा… अशी ही त्याची "चांडाळ चौकडी"… सारं कसं मस्तच अगदी…

एकीकडे "दगडू"… एका गरीब रिक्षावाल्याचं आगाऊ पोरगं… कोळी वाड्यातंच लहानाचा मोठा झालेला तो…
ना कुणाला जुमानणारा, ना कसल्या बंधनांत अडकणारा… एक स्वैर-स्वच्छंदी "कारटं"…
प्रत्येक क्षणाला मनसोक्त जगणारा , प्रत्येक संकटाला बिनधास होऊन tackle करणारा असा तो…
याची भाषा म्हणजे काय सांगावं आता…? मराठीची पूर्ण वाट लावतो हा… याचा "प्यापर गळपटतो" हातातून… ये एक I -Card नही लाया तो क्या गलती "होया"…
ह्याला दोन गोष्टी लई आवडतात- "काजू-कतली आणि त्याची प्राजू पतली…"
"अरे हम गरीब हुए तो क्या हुवा, दिल से हम आमिर है… हम जियेंगे अपनी मर्ज़ी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्ज़ी से... चले हवा आन दे…"

आणि दुसरीकडे "प्राजक्ता"… सुसंस्कृत आणि educated कुटुंबात वाढलेली…
"सातच्या आत घरात…" ह्या नियमाला गप-मुकाट पाळणारी…
आपल्या वडिलांनी (शाकालने) लावून दिलेल्या बंधनांना बांधलेली… एक "गोड" पोरगी…
हिची भाषा म्हणजे मराठीतले जणू "गोड" अभंगच म्हणावेत… प्रेमाचा इकरार देखील इतक्या काव्यात्मक पद्धतीने करते ही…
"मनाने उठाव केला, मेंदू गदागदा हलवला, आतमध्ये स्पंदनं निर्माण झाली, त्यांना हिंदोळे देत मी इथवर येवून पोहचले …"
हे असले शुध्द मराठी ऐकून त्या दगडूचा "मेंदू" पार "गळपटतो"… Biggrin

परस्परांमध्ये जमीन-आसमानाचा फरक असतांनाही, ह्या दोघांना जणू एकमेकांसाठी धाडलं असावं "त्याने"…
त्यांच्यातली understanding, मैत्री, प्रेम मनाला स्पर्शून जातं… विचार करायला भाग पाडतं…
Library मध्ये त्यांनी फक्त पुस्तकांच्या शीर्षकावरून केलेलं संभाषण म्हणजे अफलातूनच… एकही शब्द न बोलता, शब्दांतूनच व्यक्त केलेलं ते प्रेम…

आणि हो… "बालभारती" हे पात्र तर लईच भारी घेतलंय… दगडूच्या gang मधलं सर्वात "प्रगल्भ" व्यक्तिमत्व…
हा दगडूला मुलींचे types समजावून सांगतो… अधून-मधून याचे ते वैचारिक dose, त्याचे ते जगावेगळे सल्ले…
"अरे माणूस प्रेमात पडला ना की आंधळा होतो, खोटं बोलायला लागतो…कारण त्याचं मन त्याला तसं करण्यास भाग पाडतं…" वगैरे वगैरे… हे त्याचे सल्ले…

पण काहीही म्हणा, दगडूचं प्राजक्ता बद्दलचं प्रेम बघून जर आपल्याला आपलं "पहिलं प्रेम" आठवलं नसेल तर शप्पथंच…
प्राजू साठी दगडूने आणलेलं गुलाबाचं फूल तो शाकाल आदळून-आपटून पार तोडून टाकतो… पण नंतर गुपचूप ती प्राजू त्या तुटलेल्या गुलाबाची एकेक पाकळी वेचते आणि पुस्तकात जपून ठेवते... एक वेगळीच निरागसता जाणवते ह्या नाजूक बंधनातली… इतकं निखळ निस्वार्थ प्रेम आज-काल खरंच हरवलंय… "प्रेमाची" व्याख्याच पार बदलून गेलीये… हल्ली प्रत्येक जण आपापल्या सोयीने प्रेमाची "व्याख्या" ठरवतंय… असो…तो मुद्दा वेगळाच…

सर्वात जास्त जर काही आवडलं असेल ना मला, तर ते म्हणजे "पराजू" (प्राजक्ता) चा साधेपणा, शालीनता, सोज्वळता…
तिचं हसणं, लाजणं बघून माझ्यासारखा एखादा वेडा घायाळ झाल्यावाचून राहणार नाही…
"बालभारती"च्या भाषेत म्हणायचं झालं तर "हा पोरींमधला सगळ्यात भारी प्रकार, जो आजकाल गायब होत चाललाय…" Smile

केतकीची acting म्हणजे जबरदस्त…काय ते चेहेऱ्यावरचे तिचे expressions, कमालच होते खरं… अप्रतिम…
एखाद्या मुरलेल्या अभिनेत्रीला देखील लाजवेल कदाचित ती…
जितकी गोड ती दिसलीये, तितकाच गोड आवाज आहे तिचा… "मला वेड लागले, प्रेमाचे… " हे गाणे ऐकून खरंच कुणालाही वेड लागेल…
मी तर त्या "पराजू" च्या प्रेमातच पडलोय बुवा… Wink
आणि हो…ह्या गाण्याच्या lyrics करिता "गुरु ठाकूर" ला विसरून कसं चालणार…? "थेट काळजाला भिडणारी जोरदार शब्द-रचना" हा तर गुरूचा हुकुमी एक्काच…
आपला "दगडू" म्हणजे प्रथमेश देखील कुठे मुळीच कमी पडला नाहीये… याची देखील acting मस्तच आहे…

खूप काही शिकण्यासारखं वाटलं मला "Timepass" मधून… प्रेमाचं नातं नेमकं कसं असावं, त्यात मैत्री हवी, "समर्पण" आणि विश्वास हवा, समजुतदारी हवी, त्याच बरोबर स्वातंत्र्य आणि स्वतःची एक Identity सुद्धा किती महत्वाची असते हे…
एकंदरीत, खूप mature पद्धतीने मांडलंय हे सारं…

चित्रपट बघतांना इतकं एकरूप झालो होतो की सारखं वाटत होतं, निदान "ह्या" दगडूलातरी "त्याची प्राजू" मिळू दे रे देवा…
पण प्रेम कहाणीत Twist नसेल तर ते प्रेम कसले… नाही? दोघांची ताटा-तूट होतेच, त्या शाकालमुळे…
ह्या विरहाच्या काळात देखील त्यांचं प्रेम कणभरही कमी होत नाही… त्यांची एकमेकांबद्दलची हळ-हळ खूप Genuine वाटते…
असा experience असेल तर जरा जास्तंच "Genuine" वाटेल हे सगळं…
"हे प्रेम की, यातना…" हे गाणं अगदी प्रसंगानुरूप आहे…
पण "वास्तविक" प्रेम कहाण्यांमध्ये जसा शेवट होतो, बस्स तसाच झाला ह्या प्रेम कहाणीचा शेवट देखील… नकोसा असला तरी अपेक्षितच…
"प्राजू" निघून जाते…दूर… तिच्या "दगडू"ला सोडून… आणि त्याला बदलून जाते…

ह्या चित्रपटातले काही dialogues खूप मार्मिक वाटले मला… हृदयात खोलवर रुजणारे…
दगडूची एक-दोन वाक्ये आठवताय मला… तो त्याच्या प्राजूला म्हणतो की, "आपलं कसंय, घर छोटंय पण लई जागाय… तुझं घर मोठंय पण जागाच नाय…"
"आता कळलं आपल्याला, आपण शिकला नाय पण आपल्याला बोलता येतं… तू शिकली, पण तुला बोलता नाय येत… "

चित्रपटाच्या शेवटी "To Be Continued…" असं म्हटलंय… म्हणजे sequel येण्याची दाट शक्यता आहे… तोही असाच उत्तम असेल अशी आशा करतो…

तर मित्रांनो (आणि मैत्रिणींनो), ज्यांनी बघितला नसेल, त्यांनी आवर्जून पहावा हा चित्रपट आणि तोही theater मध्येच…"पैसे वसूल" movie आहे…

(काही मजेदार dialogues साठी पुढील link check करा : Timepass)

- सुमित विसपुते

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम परीक्षण, अभिनंदन.

जाताजाता मागे एकदा अन्यत्र कुठेतरी केलेली टिप्पणी इथेही पुन्हा करतो:

परीक्षण / रिव्ह्यू / चित्रपटपरिचय लिहीताना कथासूत्राची ढोबळ कल्पनाच फक्त द्यावी. अथ पासून इति पर्यंत - द एंड पाटीपर्यंत- पूर्ण कथा सांगून टाकू नये. कारण त्यामुळे अद्याप ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांचा रस प्रत्यक्ष पाहताना बराच कमी होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि,

तुमचं बरोबर आहे…
Actually हाच विचार करून जरा उशीराच टाकली ही समीक्षा…
या पुढे लक्ष्यात ठेवेन… Smile

धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

चित्रपटाने अपेक्षाभंग केला. पहिल्याच दिवशी पाहायला गेलो होतो. सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे, गाणी सुद्धा मस्त आहेत - यात वाद नाही. ही पोली साजूक तुपातली असं म्हणत नाचणारी तर भारीच!! पण एकूण चित्रपटाने अपेक्षाभंग केला. अख्ख्या चित्रपटात खरोखर हसण्यासारखे जे काही थोडेफार प्रसंग होते ते ट्रेलर मध्येच दाखवून टाकल्येत. प्राजक्तासारखी सुसंस्कृत घरातली मुलगी दगडू सारख्या फाटक्या मुलावर केवळ त्याच्या डायलॉगबाजीमुळे सहज इम्प्रेस होते, हे अजिबात न पटण्यासारखं आहे(असं असतं तर आम्ही कित्ती पटवल्या असत्या). या चित्रपटात अजुनही ब-याच गमतीजमती अपेक्षित होत्या. मध्यांतरानंतर तर अक्षरशः कंटाळा आला. भाषेच्या अशुद्धतेवरून विनोदनिर्मिती एकवार करणं ठीक आहे, पण संपूर्ण पिक्चरभर त्याच्याच जोरावर लोकांना हसवण्याचा प्रयत्न दिसून येतो.

Library मध्ये त्यांनी फक्त पुस्तकांच्या शीर्षकावरून केलेलं संभाषण म्हणजे अफलातूनच… एकही शब्द न बोलता, शब्दांतूनच व्यक्त केलेलं ते प्रेम…

हे संभाषण सुद्धा जरा जास्तच लांबवलंय असं वाटलं. एकमेकांना प्रश्नोत्तरं करणारी पुस्तकांची शीर्षकं एखाद-दोन पुस्तकांनी केली तर त्याची गंमत वाटली असती, हे दोघं एकामागून एक पुस्तकं काढतच जातात. बरं यांनी बाहेर काढलेल्या सगळ्या पुस्तकांवर एकाच लेखकाचं नाव (कोणीतरी फडके, नासी नव्हेत). नेमक्या दगडू उचलतो त्याच सगळ्या पुस्तकांना एकाच प्रकारचं बाइंडिंग... मजा घालवली.

चित्रपटाचा शेवट सॅड होणार हे फू बाई फू मध्ये प्रियदर्शन जाधवांनी केलेल्या स्किटमुळे आधीच लक्षात आलं होतं.

पिक्चर वाईट आहे असं नाही... बरा आहे.. पण अगदीच पैसा वसूल वगैरे वाटला नाही. अधिक खुलवता आला असता, निदान तसं अपेक्षित होतं. अर्थात, हे वैयक्तिक मत होतं. पण दोन दिवसांनी पेपरातलं परिक्षण आणि माझं सिनेमाविषयीचं मत (कधी नव्हे ते) जुळतंय म्हटल्यावर 'मला टाईमपास म्हणजे नुसताच टाईमपास वाटला' हे ठामपणे सांगण्याचा आत्मविश्वास वाढला. असो. तुम्हांला आवडला, तुमचे पैसे वसूल झाले, तुम्ही सुदैवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वडापाव,

खरंय… प्रत्येकाची आपापली मते असतात… त्यात वादच नाही… मला एकंदरीत आवडला हा चित्रपट…

आणि हो… तुम्ही जर नीट बघाल तर लक्षात येईल की पुस्तकांवर असलेलं "स.दा.फडके" हे लेखकाचं नाव नसून ते "वाचनालय" आहे...
पुस्तकाच्या शीर्षकाखाली "लेखक/लेखिका" वेगवेगळे आहेत… Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मला तर बरा ही म्हणवत नाही. तरीही बराच म्ह्णुया. मराठीत वेगळ्या विषयांचे चित्रपट येऊ लागले आहेत. पण हा over hiped वाटला. त्यामुळे अपेक्षाभंगा शी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर बरा ही म्हणवत नाही. तरीही बराच म्ह्णुया. मराठीत वेगळ्या विषयांचे चित्रपट येऊ लागले आहेत. पण हा over hiped वाटला. त्यामुळे अपेक्षाभंगा शी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बालक पालक" सारखा टुकारपट (कसाबसा) बघितल्यानंतर या रवी जाधवचं काही बघावं का विचारच करावा लागतोय Sad
पण मग नटरंग नी बालगंधर्व आठवतात, पण तरी हा चित्रपट पाहिनसे वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बालक पालक हा टुकारपट म्हटल्याबद्दल या ऋषिकेशचा खच्चून निषेध करीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बालक पालक ओव्हर हाइप्ड आहे असं नम्रपणे साम्गू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुझ्याशी सहमती अशक्य आहे इतकेच नम्रपणे सांगू इच्छितो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतका काही खास नव्हता! ठीक होता, त्यामुळे मनराव जे ओव्हरहाइप्ड म्हणताहेत त्याला आपलीही विनम्र सहमती!

- (अति विनम्र) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, 'बीपी' ओव्हरहाइप्ड नि 'नटरंग' नि 'बालगंधर्व' त्याहून बरे? यावर काय कर्माची कमेण्ट करणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरुणजोशीय पोटेन्शिअलवालं विधान आहे हे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटॅ, बेट्या माझी अशी अपकिर्ती करतोस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देअर इज नो सच थिंग अ‍ॅज ब्याड पब्लिशिटी.

-बॅटमॅन गोबेल्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नटरंग व बालगंधर्व ह्याबद्दल काहीही कमेंट करण्यास नम्र नकार देत आहे.
बालक पाल्क, शाळा, हरिश्चंद्राची फॅक्टरी,मुंबै पुणे मुंबै ह्याबद्दल विचारल्यास मत देउ शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुंबै पुणे मुंबै नामक पिच्चरमध्ये दोन्ही शहरांचे शॉव्हिनिस्ट ईगोज गोंजारल्याने आम्ही त्या पिच्चरला कधीचे फाट्यावर मारले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अन् बाकिचे पिक्चर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकीच्या पिच्चरबद्दल बोलू शकतो. पण पुणे मुंबै पुणे थोडका पाहोन हे काव्य सुचले

"त्यांच्या दादुलेपनाचा भपकारा | न साहावेचि अन्य लहानथोरां | बॅटा म्हणे तेहासि मारा | फाटियावरी ||"

आणि च्यानेल चेञ्ज केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिनेमाचं एक ठीकच आहे. त्याच्याबद्दल मला काय लई प्रेम नाही. पण तुझ्या सिनेमाविषयक मतात स्थानीय अस्मितांची भूमिका (खुल्या मनाच्या चित्रपटरसिकास जितकी हवी त्याहून) बरीच मोठी आहे हे णम्रपणे इत्यादि नोंदू इच्छिते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अस्मिताच रँडम या, कुठून कशा उसळाव्या Wink

बाकी एक दुरुस्ती: णम्रपणे हे चूक आहे. णम्रपने हे बरोबर आहे. णनयोरभेदः नसून णनयोर्विनिमयः असे मराठीतील सूत्र आहे असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चूक माण्य ए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बाकी बालगंधर्वांना २५००० रुपयांची अत्तरं हवी असतात त्याचं उदात्तीकरण करणारा तो सीन बघताना मला एकदम 'घ्या, बालगंधर्व इन अ नटशेल' असं ओरडावंसं वाटलं होतं. माणसाचं मोठेपण कशात, तुम्ही दाखवताय काय, अत्तरं काय, बांगड्या भरून पैसे जमवीन काय, महाराष्ट्रातल्या झाडून सगळ्या तत्कालीन महापुरुषांची पडद्यावर हजेरी काय... पटकथेची गम्माडीगंमतच होती.

नि नटरंग संपल्यावर संदेश भंडारेचे फोटो श्रेयनामावलीबरोबर झळकताना पाहून वाटलं, आयला, या सिनेमाची गाणी नि हे शेवटचे फोटो यांच्या पासंगाला पुरावा म्हणून तरी थोडा बरा सिनेमा काढायचा की राव. सगळी शक्ती अतुल कुलकर्णीच्या प्रसिद्धीत खपवली नसतीत, तर कदाचित जमलंही असतं.

नि हे दोने सिनेमे 'बीपी'पेक्षा बरे? का म्हणे? बीपीचा शेवट गंडलाय म्हणून? की तो तथाकथित बोल्ड नि नाजूक्क्क विषयाला तथाकथितपणे सवंग करतो म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उधळ्या, व्यसनी आणि अव्यवहारी कलावंताची शोकांतिका या मसाल्यावरती अनेक कथा कादंबर्‍या सिनेमे आले अन् चालले.
त्यात त्यांच्या वागण्याचे थोडेफार उदात्तीकरण होत जाते हे मला पटत नाही तरी आप्ली एक गोष्ट म्हणून ठीकच ...पण कलाकाराच्या कलेच्या कौतुकामध्ये त्याच्या जीवनातल्या अयोग्य वागण्याचा उल्लेख येऊ न देण्याची कसरत काही आपल्याला जमत नाही .. ते असो...

बालगंधर्व पाहताना ही गोष्ट अजून फार चांगली सांगायला हवी होती असं वाटलं

सगळी शक्ती अतुल कुलकर्णीच्या प्रसिद्धीत खपवली नसतीत, तर कदाचित जमलंही असतं.
अतुल कुल्कर्णी ?? की सुबोध भावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळी शक्ती अतुल कुलकर्णीच्या प्रसिद्धीत खपवली नसतीत, तर कदाचित जमलंही असतं.

तेे वाक्य 'नटरंग'बद्दल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हं बरोबर... आमची चूक झाली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नि हे दोने सिनेमे 'बीपी'पेक्षा बरे? का म्हणे? बीपीचा शेवट गंडलाय म्हणून? की तो तथाकथित बोल्ड नि नाजूक्क्क विषयाला तथाकथितपणे सवंग करतो म्हणून?

खरं पाहता निव्वळ कथा किंवा मांडणी या बाबतीत नटरंग व बालगंधर्व सारखेच आहेत असे मला वाटते. तरीही ते चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी मला तुलनेने बरे वाटले. नटरंग हा चित्रपट अधिक बांधीव व मुळ कथेपासून फारसा कधीच ढळत नाही. दुसरे असे की नटरंगची सिनेमॅटोग्राफी मला आवडली. तिसरे असे की मुळ कथा ही तपाशापट नसून किंवा त्यासोबत एकुणच पुरूषी व स्त्रैण भावनांचे द्वंद्व रेखाटणारी आहे. चित्रपटात कादंबरी इतकी नाही पण ते द्वंद्व त्या नायकाच्या मनातले तसेच समाजाच्या मनातलेही चितारण्यात यशस्वी झाल्यासारखा वाटला. बाकी अतुल कुलकर्णीवर गरजेहून अधिक - वारेमाप- प्रकाश झोत वगैरे तृती आहेतच. आणि प्रकाशयोजना, ध्वनी वगैरे तांत्रिक अंगानेही चित्रपट बेतास बात वाटला.

बालगंधर्व हा चित्रपट एक चरित्रपट म्हणून मला तितका आवडला नैच. पण एक लहान क्रिस्प चित्रपट / बांधीव चित्रपट हा प्रकार मराठीत दिसू लागला आहे त्याप्रकारच्या सुरवातीच्या चित्रपटांपैकी एक मला वाटतो. दुसरे असे की 'पिरीयड फिल्म' या अंगाने तो इतर अनेक चित्रपटांपेक्षा तत्कालिन परिस्थितीचे भान बाळगणारा वाटला. (अगदी या बाबतीतत 'हरिशचंद्राच्या फ्याक्टरी'इतका मास्टरपीस नसेलही, पण मोठ्या 'मुदलातल्या'चुका टाळल्या आहेत)

या तुलनेने जेव्हा बालक पालक बघितला तेव्हा याच दिग्दर्शाकाच्या आधीच्या दोन चित्रपटांची तुलना होणे अपरिहार्य होतेच. शिवाय या चित्रपटाची प्रचंड जाहिरात झाली होती. विषय अनोखा आहे हे मान्यच आहे पण तो विषय मांडलाच नाहिये असे माझे मत आहे. लहानपणाची चावट्ट फॅटसीच्या आठवणी जागवून लोकांना 'एरॉटिकली नॉस्टॅल्जिक' करणे सोडून हा चित्रपट काही विशेष योगदान देतो असे वाटत नाही. अगदीच ढिसाळ तांत्रिक अंगे, अगदी रद्दी संवाद यामुळे तर भ्रमनिसारच झाला. त्यामुळे आधीच्या दोन चित्रपटांच्या तुलनेत हा अजिबात म्हंजे अजिबातच नै आवडला.

नव्या चित्रपटाचे ट्रेलर्सही "त्या" नॉस्टॅल्जियाला एक्सप्लॉईट करणे सोडून काही करतोय असे वाटले नाही म्हणून तो ही बघायचा नाही असे ठरवले आहे.

(समांतरः शाळा या कादंबरीतही हाच नॉस्टॅल्जिया वापरला आहे पण त्याचे एकच एक अंग चवीचवीने चघळल्याचे फिलिंग येत नाही. आणि तिथेच कादंबरी जिंकते असे मला वाटते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ट्रेलर पाहूनच सिनेमा बघावासा वाटला नाही.

अवांतर - लिहीताना एका पूर्णविरामाच्या जागी तीन टिंबं, एका परिच्छेदात रहातील अशी वाक्य एकामागोमाग एक लिहीण्याऐवजी नव्या ओळीवर नवं वाक्य असं फॉरमॅटिंग यामुळे लिखाण 'पाहून' वाचण्याची इच्छा होत नाही. ललित लेखनाच्या तुकड्यात हे कदाचित खपून जाईल, पण चित्रपट 'समीक्षा' वाचताना हे पहावत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'टिंबिका' हा नवा लेखनप्रकार जाललेखनाने अस्तित्त्वात आणला आहे........ Smile
.........
त्याविषयीची अनभिज्ञता खटकली. Sad
.....................
.......
तुम्हाला अजिबातच 'टिंबभान' नसल्याचे पाहून वाईट वाटले...... Sad
.......
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन टिंबे चालतात असे वाटते.
http://www.grammar-monster.com/lessons/quotation_%28speech%29_marks_elli...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे वरचा धागा नक्की किती मोठा होता, असा तुमचा तर्क आहे? पैज लावायची का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिवंगत कवी प्रा. सदानंद रेगे यांना खालील ओळी सुचण्यामागची प्रेरणा आमच्या आत्ता लक्षांत आली !

आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन,
ऊनपावसाचे पक्षी
आणी ओंजळीमधून.

आता धरतील फेर
कवडशांची डाळिंबे,
वर्षतील नभातून
शाश्वताची निळी टिंबे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बाकी श्रावण आणि टिंबकविता यांचे नाते अनद्यतन दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

द.मा. मिरासदारांची पात्रं एकमेकांना टिंब ठेवून देण्याबद्दलच बोलतात ना? का तो वेगळा शब्द आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीन टिंबांपेक्षा अनेकजण नऊ दहा उद्गारचिन्हे एकामागोगामग एक लिहितात तेव्हा जास्त डोक्यात जातात!!!!!!!!

http://www.youtube.com/watch?v=3rd7j-aSqFU
असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नटाने भाषेचा लहेजा आणि करेक्ट हेल वगैरे पकडणं आधीच मुश्कील ... त्यात तो ओढून ताणून काहीतरी आव आणून करत असेल तर पाहवत नाही..

उदाहरणार्थ मराठी मोलकरणीची भाषा म्हणून जे काही हिन्दी सिनेमातलं तथाकथित प्रकर्ण आहे त्याच भाषेत जर गोडबोले नावाचा मध्यमवर्गीय चाळमालक बोलेल तर पाहणे अवघड होईल.( हेराफेरी सिनेमा फार भारी असला तरी परेश रावलने भाषेवर मेहनत घेतली असती तरी चालले असते किंवा आडनाव बदलाले असते तर अधिक सोपे झाले असते ). किंवा हिंदी सिनेमातला सिंधी माणूस ज्या भाषेत बोलतो तसे बोलणारे सिंधी भेटणं अवघड.वगैरे वगैरे

टाईमपास या सिनेमाच्या ट्रेलरमधला दगडू अशीच "ओवर द टॉप " उच्चारात भाषा बोलतो. "चला आता माझ्या भाषेला हसा बघू" "... " घ्या, अजून एक भारी ड्वायलॉक.. परत हसा बघू" अशा पद्धतीने सीन चित्रीत झाले आहेत असं ट्रेलर पाहताना वाटलं. त्यामुळे असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0