लायब्ररी प्रेम
तसे आमचे लायब्ररी प्रेम फार जुणे नाही. शाळा- कॉलेजात असताना लायब्ररीने कधी फार आकर्षित केले नाही. इंजिनियरीईग मध्ये तर ४ वर्षे चक्क तोंडही पाहिले नाही. हे प्रकरण सुरु झाले ते पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेपासून. आता दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिथे जात असला की प्रकरण तर होणारच. माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी ही अर्थश्स्रात सर्वात उत्तम पैकी एक होती. मात्र हे प्रकरण हातघाईवर आले ते सध्या असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये. इथे हे प्रकरण घट्ट व्हायला खरे म्हणजे लायब्ररीचे अंतरंग कारणीभुत नसून सौंदर्य कारणीभुत आहे. जिथे गेल्यावर अभ्यास करण्याआधी फक्त इमारतीचे सौंदर्य पाहत रहावे असे वाटते, तिथे आम्ही तरी काय करणार. युनिव्हर्सिटीत सगळ्या मिळून ६०-६५ लायब्ररीज तरी असतील. शक्य तितक्या लायब्ररीजला भेट देणे हा एक उपक्रम. पुष्कळ लायब्ररीज ह्या मर्यादित लोकांसाठी असल्याने काही जरा अवघड आहे. तर जश्या जश्या भेट देत जाईन तशी तशी ही पोस्ट अपडेट करत राहीन.
१) ब्रेझनोज कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड -
हे म्हंजे घरचे प्रकरण. आमच्या कॉलेजची लायब्ररी तशी छोटी पण देखनी.

अभ्यासासाठी सोय उत्तम

आणि अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब.

संपादकः width व height हे आकडे रोमन अंकात द्यावेत
हम्म
माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी ही अर्थश्स्रात सर्वात उत्तम पैकी एक होती
नक्की काय म्हणायचय?
१) माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी
२) भारतातील माझ्या कॉलेजची लायब्ररी
३) भारतातील कॉलेजची माझी लायब्ररी
अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब
यावरून एक जुना ज्योक आठवला -
गंपूचे वडील गंपूला, "काय चक्क नापास? त्या शेजारच्या पमीकडे बघ. नव्वद टक्के मिळवलेत!"
गंपू, "तिच्याकडेच तर बघत होतो. म्हणून ..."
असो, पुलेशु.
फोटू मस्त आहेत. लायब्ररी हे
फोटू मस्त आहेत. लायब्ररी हे आवडते ठिकाण. आमच्या कराडात मस्त लायब्ररी आहे. भरपूर पुस्तके आहेत. माझे अनेक मित्र लायब्ररीमुळेच मित्र बनले.
तुमच्या विद्यापीठाचे नाव तरी सांगा.
---
आणि अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब.
तुमच्या जागी मी असतो तर हे वाक्य - आणि अभ्यास न करताना दिसणारा नजारा तर लाजवाब. - असे लिहिले असते. :-)
---
बाकी आजकालची तरूण पिढी पुस्तके वाचत नाहीत (फेसबुकावर वेळ घालवतात) असा आरडाओरडा अनेक रिकामटेकड्या वयस्कांकडून ऐकलेला आहे.
छान
छान, पण फार त्रोटक वाटले. थोडे वाढवले तर आवडेल.