खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये...

खूप छान धुकं असायचं तेव्हा आपल्यामध्ये..
नाव, गाव, रंग, रुप यातल्या कशाचाच परिचय नसताना
फक्त एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं..
आश्वासक.. हवहवसं.. गुलाबी..
गहिरं, अधीरं.. लोभस..
तुझेपणाच्या, माझेपणाच्या
सगळ्या कक्षा सामावुन घेणारं..
ओळखीचे चकवे दाखवत हळुच,
अनोळखी होवुन जाणारं..
समजतयं असं वाटेपर्यंत,
अवघड होवुन बसणारं..
अज्ञाताच्या सोबतीने सुरु केलेला स्वतःचा शोध,
स्वतःची होत जाणारी नविनच ओळख..
तू त्या शोधात फक्त सोबत होतास..
किंवा निव्वळ तू अस्तित्वात असल्याची जाणिव..
तुही कदाचित नव्याने पाहिलंस स्वतःला
माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेची सोबत घेवुन..
मग कोणत्या क्षणी महत्वाचा झाला तुझा परिचय स्वतःच्या ओळखीपेक्षा?
का जंग जंग पछाडले त्या परिचयासाठी?
ह्म्म...
शेवटी एकदाचा झाला
तुझा माझा परिचय..
पण त्याच क्षणी वितळुन गेलं ते धुकं..
नविन सापडु शकले असते असे काही चेहरे,
पुन्हा हरवुन गेले त्या धुक्यासोबत..
अजुनही वाट चालतोय आपण एकमेकांच्या सोबतीने..
पण आता काही हुरहुर नाही..
कसलंही काहुर नाही..
स्वतःविषयी काही नविन शोधही लागत नाही आताशा..
फक्त तुझ्याकडे बघताना कधी कधी वाटतं,
खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये.....

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

गुलाबी धुक्याची प्रतिमा आवडली. आणि ते विरल्यानंतरच्या काहीतरी हरवल्यामुळे झालेला अपेक्षाभंगही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद राजेश.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

मस्त कविता जिंकलात तुम्ही ! चाबूक! कडक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद सुशेगाद.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

मस्त कविता. धुक्याचे रुपक फारच छान. 'चलो इक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो' हे गाणे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच की.. that song fits just perfectly as a sequel of the poem.. भारी आठवलं तुम्हाला एकदम अतिशहाणा.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

'चलो इक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो' हे गाणे आठवले.

+१.
कविता छानच आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद अनुप.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

राजेश व सुशेगाद ह्यांना +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मन,
राजेश व सुशेगाद यांच्या प्रतिसादावरील प्रतिसादात +१.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

+३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

कविता आवडली
शुभ्र पांढर धुकं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद विवेक.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

उत्तम रुपक वापरले आहे.
कविता आवडली

लिहित रहा! ऐसीवर स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खूप खूप आभार ऋषिकेश.. Smile
looking forward to the good times at aisi..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

कवितेतला नात्याचा प्रवास काही ओळींच्या ताजेपणामुळे आवडला -
एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं../ ओळखीचे चकवे दाखवत हळुच.. इ.
--
अवांतर -
धुके आणि प्रेमाच्या नात्यावरून 'पाषाणपालवी' या कादंबरीतली आरती प्रभूंची एक कविता आठवली तशी देत आहे -

धुक्यात आहे डोह कुठेतरी
अथांग त्याचा तळ गाठावा
म्हणोन शिरले धुक्यात तरीही
थेंब न ओठी एक पडावा ?

जळते आहे जळ नयनी या
अंतरंगही त्यात कढावा
प्रिया तुझ्या रे डोही माझा
अखेरचा हा देठ तुटावा


धुकेच आहे धुक्यात भरूनी
किती धुक्याचे गजरे माळू
जळत्या अश्रुंमधून माझ्या
ये ना सजणा काजळ घालू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक,
नेमक्या प्रतिसादाबद्दल आभार.. Smile

कविता मस्तच आहे.. कदाचित थोडी वेगळी असावी.. लय थोडी तुटतेय वाचताना. शोधून वाचली पाहिजे.. Smile धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

चलो इक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो!

आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छान कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0