दोन ऋणांचा गुणाकार धन असतो

वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हे दोन्ही
एकाच संकुलात का चालवत नाहीत?
वृद्धांचं अनाथपणही दूर होऊ शकेल
अन अनाथांची पालकत्वाची गरजही पूर्ण होऊ शकेल
किती छान होईल जेंव्हा
एखादा अनाथ मुलगा सांगेल
‘मला २५ आजी-आजोबा आहेत, मी अनाथ नाही…'
किंवा एखादे एकाकी पडलेले आजी-आजोबा
दहा-वीस मुलांना रोज गोष्टी सांगून झोपवतील…
मुलांनी वृद्धाश्रमात टाकणं हे दुर्दैवच वृद्धांसाठी
आई-बाप नसणं किंवा त्यांनी टाकलेलं असणं
हेही दुर्दैवच अनाथांसाठी
दोन ऋणांचा गुणाकार धन असतो
तसा दोन दुर्दैवांचा मेळ
या दोघांसाठी
सुदैव ठरू शकेल का?

साभार- https://www.facebook.com/prasad.shir

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

काही ठिकाणी हा प्रयोग करुन झाला आहे, मुलांचा गोंगाट म्हातार्‍यांना सहन होत नाही आणि मग म्हातारे चीडचीड करत बसतात. बहुदा हा प्रयोग पुण्यातल्या 'आपलं घर'वाल्या फळणीकरांनी केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र. का. टा. आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन ऋणांचा भागाकार सुद्धा धन असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःच्या नातवंडांचे आवाज सहन होत नाहीत, किंवा त्यांच्या आई वडिलांना अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्ती आजी आजोबांकडून होणार नाही असे पालक / आजी-आजोबा किंवा दोन्हीना वाटल्याने नातवंडे डे-केअरला सोडलेली पाहिली आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अतिशय भाबडी कल्पना वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळात वृद्ध लोकांना सहजीवन, शांततामय आयुष्य, व्यायाम, खेळ, मनोरंजन, छन्दोपासना आदि अनेक गोष्टींची निकड असते, आवड असते हे लक्षात घेउन ती ती साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत.
फक्त मुलांना सांभाळण्याच्या कामास वेठीस धरताच कामा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0