न्यायव्यवस्था आणि भ्रष्टाचार

भारतीय न्यायव्यवस्थेची सध्याची स्थिति आणि अवस्था पाहता मन विषण्ण होते. संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली . या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली . सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे. उद्या पैशाचा वापर करून ,साक्षीदार फोडून तो कदाचित निर्दोष ही सुटेल किंवा अतिशय मामुली शिक्षा होईलही ! पण त्यामुळे "न्याय"होईल असे वाटते का?

सध्याची न्यायव्यवस्था ही एक सर्कस किंवा पैशाचा खेळ बनली असून धनदांडग्यांच्या पैशाने ,सुस्त अन भ्रष्ट नोकरशाहीमुलळे आणि वेळखाऊ न्यायव्यवस्थे मुळे सामान्य मनुष्य या सर्कस मधला एक हतबल जोकर आहे ,असे मनोमन वाटून जाते.

यावर काही उपाय असू शकतो का?

पुराण काळात किंवा इतिहास काळात काही दाखले सापडतात . धर्मराजाने न्याय करताना तत्कालीन वर्णव्यवस्थे नुसार एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मण , क्षत्रीय ,वैश्य व शूद्र यांना वेगवेगळी शिक्षा दिली होती. आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थिथीत "आर्थिक उत्पन्न " या निकषावर आधारित न्यायव्यवस्था लागू करावी का?

उदाहरणार्थ -सलमानच्या खटल्यात गेल्या 20 वर्षापासून झालेला सरकारी खर्च ,कायद्यातीळ पळवाटा शोधून /साक्षीदार फोडून /वकिली काव्यांचा वापर करून ,कोर्टबाजीत आणि न्यायाप्रक्रियेत खर्च झालेला प्रचंड पैसा /वेळ आणि मनुष्यबळ ह्याचा विचार करता इतक्या वर्षांनंतर देखील फुटपाथ वर मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसाना काही नुकसान भरपाई मिळेल याची काडीचीही शाश्वती नाही. म्हणजे शेवटी त्यांना "न्याय"मिळणार नाहीच !

Justice delayed is justice denied ह्याचा विचार करता अशा प्रकरणात सलमान सारख्या गुंडाला त्याच वेळी (20 वर्षापूर्वी) अनावश्यक कोर्टबाजी टाळून जबर रकमेचा दंड (सुमारे 50 कोटी रुपये )आणि 1ते 3 वर्षाची कैद अशी शिक्षा दिली गेली असती (किंवा आताही दिली गेली )तर थोडाफार तरी "न्याय"होईल. कारण दंडाच्या रकमेतील अर्धी रक्कम मृतांच्या वारसाना आणि अर्धी रक्कम सरकारजमा करावी . आणि भविष्यातही आर्थिक निकषांवर शिक्षा देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ उपटून काढावा.

अर्थात प्रत्येक व्यवस्थेत काही फायदे /तोटे असतातच! या व्यवस्थेतही काही धोके असू शकतील . पण तरीही अशा प्रकरणात "न्याय"प्रस्थापित करण्याचा हा एक उपाय असू शकतो , असे माझे वैयक्तिक व प्रामाणिक मत आहे... चर्चा अपेक्षित !

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

न्यायव्यवस्था वेगवान व्हायला हवी याबद्दल कोणाचंच दुमत असणार नाही. मात्र वर्णाधिष्ठित दंडव्यवस्था जितकी त्याज्य तितकीच वर्गाधिष्ठित व्यवस्था त्याज्य असावीत. एकदा न्यायाच्या नजरेत एक व्यक्ती दुसरीपेक्षा वेगळी गणली जायला लागली की त्या व्यवस्थेचा पायाच ढासळायला सुरूवात होते.

शिवाय दंड अधिक केल्यामुळे खटले लवकर सुटणार कसे? दंड न्यायप्रक्रियेच्या शेवटी येतात. ही प्रक्रिया थोडक्यात आटपावी असं तुमचं मत दिसत नाही. काहीतरी करून ती प्रक्रिया लवकर आटपावी ही इच्छा दिसते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि इस्पितळांची संख्या वाढवणं इष्ट. रोगी किती श्रीमंत आहे त्याप्रमाणे त्याला अतिरेकी पैसे लावणं हा उपाय नाही. इथे न्यायालयं, न्यायाधीश, वकील, गुन्हे तपास करणारी यंत्रणा यांची शक्ती व संख्या वाढवणं हा उपाय ठरू शकेल. पण तेही सोपं नाही.

निवडणुकांच्या जाहीरनाम्यात 'आम्ही न्यायव्यवस्था बळकट आणि वेगवान करू' असं कुठचा पक्ष म्हणतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या वर्षांनंतर देखील फुटपाथ वर मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसाना काही नुकसान भरपाई मिळेल याची काडीचीही शाश्वती नाही.

१) फुटपाथ ही गाडी चालवण्याची जागा नाही.

२) फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही.

३) एखादी व्यक्ती पब्लिक प्लेस मधे झोपत असेल की जिथे झोपणे अपेक्षित नाही व नियमानुसार नाही तर त्याच जागेवरून गाडी चालवणे हे नियमानुसार नसेल तर सुयोग्य कसे ? व सलमानला शिक्षा का होत नाही ?

४) जर नियमानुसार वागले नसतील तर त्याबद्दल मृत्यु झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांस नुकसानभरपाई का मिळावी ?

५) व माणुसकीचाच जर प्रश्न असेल तर भरपाई मागणार्‍यांनी मृत्युमुखी पडलेल्यांप्रति (ते जिवंत असताना) कोणती माणुसकी दाखवली की त्यांना आज माणुसकी चे तत्व लावले जावे ? ज्यांना नुकसानभरपाई मिळावी असा त्यांचा दावा आहे त्या नातेवाईकांनी मृत्युमुखी पडलेल्यांस फुटपाथवर झोपू का दिले ? एखादा माणूस जर तुमच्यासाठी जर matters so much तर त्यास निदान झोपायला तरी जागा तुम्ही द्यायला नको का ? व इतके ही जर करणार नसाल (त्याच्यासाठी) तर तो तुमचा माणूस मृत्युमुखी पडला तर तुमचे नेमके कोणते व काय नुकसान झाले की ज्याची भरपाई तुम्हास मिळावी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खालील गुन्ह्यात अधिक मोठा गुन्हा कोणता?

१. गरीबी व तत्सम कारणामुळे फुटपाथ वर झोपणे .

२. दारु पिउन गाडी चालवणे.

३. दारुच्या नषेत रस्त्याशेजारी फुटपाथ वर (रस्त्यावर नव्हे) झोपलेल्या माणसाना चिरडणे.

४. चूक /गुन्हा कबूल न करता पैशाच्या मस्तीने /गुर्मीने शिक्षेपासून १५ वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःची कातडी वाचवत राहणे.

५. अशा माणुसकीला काळिमा फासणार्या गुन्ह्याला / गुन्हेगाराला विसरुन त्याचे चित्रपट सुपरहिट करणॅ

???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

अशा माणुसकीला काळिमा फासणार्या गुन्ह्याला / गुन्हेगाराला विसरुन त्याचे चित्रपट सुपरहिट करणॅ ???

हा गुन्हा नाही. नक्कीच गुन्हा नाही.

---

चूक /गुन्हा कबूल न करता पैशाच्या मस्तीने /गुर्मीने शिक्षेपासून १५ वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःची कातडी वाचवत राहणे.

हा गुन्हा असेल तर तो करणारा सलमान व हा गुन्हा होऊ देणारी न्यायव्यवस्था तितकीच गुन्हेगार आहे. न्यायव्यवस्थेकडे अथॉरिटी, पुरावा, मशिनरी (wherewithal) आहे ना ? मग तिचा वापर का होत नाही ?

---

दारुच्या नषेत रस्त्याशेजारी फुटपाथ वर (रस्त्यावर नव्हे) झोपलेल्या माणसाना चिरडणे. फुटपाथवर झोपलेल्या माणसांना गाडीखाली चिरडणे हा गुन्हा आहे का ? या प्रश्नाचे उत्तर -

अ) चिरडायचेच म्हणून जाणूनबुजुन चिरडले का ?
ब) फुटपाथवर झोपणे हे नियमबाह्य आहे का ?

या दोन प्रश्नांच्या उत्तरावर आहे.

स्वच्छ सांगतो - मला हा गुन्हा वाटत नाही. कारण फुटपाथवर झोपणे हे अपेक्षित नाही व नियमबाह्य आहे. एस टी चा ड्रायव्हर जर मद्य पिऊन गाडी चालवून अपघात करतो तेव्हा त्यास vehicular manslaughter च्या शिक्षेची ची तरतूद नाही. सलमानने दारू पिऊन गाडी चालवली व त्यातून अपघात घडलेला आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहेच. त्याची त्यास सजा मिळावीच. पण vehicular manslaughter ची सजा मिळू नये.

(अर्थातच शंभरातले पाच करोड लोक माझ्याशी असहमत असणारेत हे मला माहीती आहे.)

----

पैशाच्या मस्तीने /गुर्मीने

पैशाच्या गुर्मीने व मस्तीने वागणारी माणसे आदरणीय असतात. व मी त्यांचे थेट समर्थन करतो.

गरीबीच्या गुर्मीत व मस्तीत "पब्लिक चा" रस्ता व फुटपाथ सुद्धा स्वतःच्या तीर्थरूपांची मालमत्ता समजून डाराडूर झोपणार्‍यांना कोणीही काहीही बोलत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैशाच्या गुर्मीने व मस्तीने वागणारी माणसे आदरणीय असतात. व मी त्यांचे थेट समर्थन करतो.
गरीबीच्या गुर्मीत व मस्तीत "पब्लिक चा" रस्ता व फुटपाथ सुद्धा स्वतःच्या तीर्थरूपांची मालमत्ता समजून डाराडूर झोपणार्‍यांना कोणीही काहीही बोलत नाही.

कसं बोललात!
पैशाच्या गुर्मीने व मस्तीने वागणारी माणसे न्यायव्यस्था,पोलीस्,साक्षीदार ह्यांचाही योग्य "सन्मान" करतात. त्यांना विशिष्ट स्वरूपाची मदत करून आपल्या पुढच्या जन्मासाठी पुण्यदेखील गोळा करतात.
ह्या उलट गरीबीच्या गुर्मीत व मस्तीत रहाणारी माणसे असले काही उद्योग करत नाहीत. काही ठराविक दादा/मामांकडे ही क्यापाबिलिटी अस्ते पण ते शिंचे रस्त्यावर कशाला झोपतील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहेच. त्याची त्यास सजा मिळावीच. पण vehicular manslaughter ची सजा मिळू नये.

काही पॉइंट आहेत.

१. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टु मर्डरखाली शिक्षापात्र आहे. शिक्षा फाशी/जन्मठेप असणार नाही.
२. लायसन देताना ज्या कायद्याखाली ते दिले आहे त्या कायद्यातील तरतुदी लायसनहोल्डरला लागू होतील.
३. निग्लिजन्सच्या तत्त्वानुसारसुद्धा शिक्षा होऊ शकते.

४. फूटपाथवर झोपले असणे याने वरील तीन गोष्टीत काही फरक पडत नाही. समजा ते लोक झोपलेले नसून फूटपाथवर चालत असते किंवा खाली बसून बुटाची लेस बांधत असते तर?

वरील तीनही मुद्दे "गाडी चालवणार्‍यासाठी" लागू आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही, हे बरोबरच आहे; पण
फुटपाथ ही गाडी चालवायचीही जागा नाही.
फुटपाथवर व्यक्तींचा संचार असणे फार काही वेगळे ठरु नये.
(फुटपाथ झोपण्याचे हे समर्थन नाहिये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नितिनदा, ओके. मुद्दा मान्य. सहर्ष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Justice delayed is justice denied ह्याचा विचार करता अशा प्रकरणात सलमान सारख्या गुंडाला त्याच वेळी (20 वर्षापूर्वी) अनावश्यक कोर्टबाजी टाळून जबर रकमेचा दंड (सुमारे 50 कोटी रुपये )आणि 1ते 3 वर्षाची कैद अशी शिक्षा दिली गेली असती (किंवा आताही दिली गेली )तर थोडाफार तरी "न्याय"होईल.

Justice delayed is justice denied हे आपण उद्धृत केलेले सुपरिचित तत्त्व अर्थात योग्यच आहे. त्याबद्दल वाद नाही.

मात्र, त्याचबरोबर, due process असेही काही तत्त्व आपणांस कदाचित परिचित असावे. त्याच्या प्रकाशात, 'कोर्टबाजी' ही संज्ञा व तीकरिता 'अनावश्यक' हे विशेषण, दोहोंचेही आश्चर्य वाटले.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायव्यवस्थेत सुधार आवश्यक आहे याच्याशी सहमत.

विशेषतः बारीक सारीक कारणांवरून पुढची तारीख मागण्याच्या/देण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे.

त्यातून न्यायव्यवस्थेलाकसलीच अकौंटेबिलिटी नाही हेही फारसे चांगले नाही. [घटना वकीलांनी लिहिली असल्याने असे झाले असू शकेल].

वकील हा न्यायव्यवस्थेचा भाग आहे असे 'अकारण' समजले जाते. खरे तर ते कज्जेदारांचे केवळ एजंट आहेत असे समजायला हवे. उद्या आरटीओ चे ऑफीस सकाळी १० ला उघडावे की ११ ला हे ऑफीसबाहेर अनुज्ञप्ती (मराठीत- लायसन्स) मिळवून देणार्‍या एजंटांना विचारून ठरवले जाईल का?

कोर्टाच्या बाबतीत मात्र अशा दलालांच्या संघटनेचा होकार घ्यावा लागतो.

सुधार आवश्यक आहे यावर पुन्हा एकदा सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सलमान खान आणि रविंद्र पाटील (अपघाताच्या वेळेला गाडीत असलेला पोलीस काँन्स्टेबल)

याबद्दल पूर्वी वाचलेल;

Ravindra Patil: The death of a messenger
(ह्या लिंक मधीलल रविंद्र पाटील ची छायाचित्र कदाचित पाहावणार नाहीत.)

Ravindra Patil – Salman Khan Hit & Run case – The Wretched Witness

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायव्यवस्थेची स्थिती कशी आहे याबद्दल जनरीक मत नाही.

मात्र ती वाईट आहे वगैरे निष्कर्ष काढायला वापरलेली उदाहरणे रोचक वाटली

संजय दत्त सारख्या राष्ट्रद्रोही गुंडाला शिक्षा व्हायला तब्बल 20 वर्षे लागली. या कालावधीत त्याने दोषी असूनही भरपूर पैसा कामावला आणि मौजमजा केली.

संजय दत्त विरूद्ध असा खटला चालला नव्हता, तर तो कित्येक गुन्हेगारांविरुद्ध एकत्रित पणे चाललेला खटला होता ज्यात दत्त हा सुद्धा एक आरोपी होता. या खटल्याच्या हातावेगळे व्हायला लागलेली २० वर्षे ही एकट्या आरोपीवर फोडणे घाईचे वाटते.

सलमान खान देखील एकापेक्षा अधिक प्रकरणात दोषी असूनही 20 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे, आणि रगगाड पैसा कमवून "मज्जानु लाईफ " जगतो आहे.

या प्रकरणांपैकी, रस्त्यावर झोपलेल्यांना चिरडले यात निर्णय करणे बरेच कठीण आहे. एकतर तो "सदोष" मनुष्यवध आहे की 'अपघात' हे ठरवायला लागणार्‍या साक्षी पुरावे 'निर्णायक' असणे दुर्मिळ आहे. दुसरे असे की फुटपाथवर झोपणेच बेकायदेशीर असल्याने त्यांना दारू पिऊन गाडी चालवताना चिरडणे 'अनैतिक' व निषिद्ध' असले तरी कायद्याच्या नजरेत किती शासनास योग्य आहे याबद्दल साशंक आहे. यासाठी न्यायव्यवस्थेपेक्षा कायदेनिर्मितीत अधिक अचुकता आणण्याची गरज अधोरेखीत करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!