छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३५ : पर्यटन
आता शाळांना सुट्टी चालू असताना, कुठेतरी भटकून यायचा बेत बहुतेक जण करतात. नंतर पावसाळ्यातसुद्धा भटकंती करणारे खूपजण आहेत. त्या अनुषंगाने, आव्हानाचा विषय ठेवला आहे: पर्यटन
पण इथे थोडा ट्विस्ट देतो. असं समजा की अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे कंत्राट तुम्हाला मिळाले आहे आणि त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर तुम्हाला मार्केटिंगचे काम करायचे आहे. त्यासाठी कॅलेंडर काढणे, पिक्चर पोस्टकार्ड बनवणे, पेपरात जाहिरात देणे असा एकंदर प्लॅन आहे. तर त्यासाठी छायाचित्रे हवी आहेत. तर मंडळी, करा सुरुवात. (फोटोबरोबर एखादी टॅगलाईन दिलीत तर एकदम दुधात साखर)
माझी चित्रे:
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १० जून रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ११ जून रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय "सूर्यास्त"
स्पर्धा का इतर?
असेच म्हंते. स्पर्धेसाठी नाही
असेच म्हंते. स्पर्धेसाठी नाही याच एवढं पीक का आलय काय माहीत :-(.
आणि स्थळांची नावंपण द्या. धाग्यातले फोटू कुठलेत?
---
अर्री येवढी इनंती करुनबी 'स्पर्धेसाठी नाही' फोटु देणार्या वै. वै. दु. लोकांना टेंपुत बशवून उनात बांधलेल्या घरात सोडून या राव कोनीतरी!
तोपर्यंत आमच्याकडून नो श्रेणी!
स्पर्धेसाठी नाही :प
तोरणा १ -
Model NIKON D50
Exposure 1/180 sec
Aperture 9.5
Focal Length 20mm
तोरणा २ -
Model NIKON D50
Exposure 1/350 sec
Aperture 6.7
Focal Length 120mm
तोरणा ३ -
Model NIKON D50
Exposure 1/250 sec
Aperture 9.5
Focal Length 20mm
तोरणा ४ -
Model NIKON D50
Exposure 1/750 sec
Aperture 4.0
Focal Length 55mm
या ठिकाणी काही उत्तम फोटो
या ठिकाणी काही उत्तम फोटो बघता येतील.
http://travel.nationalgeographic.com/travel/traveler-magazine/photo-con…
माउंट वॉशिंग्टन
वाचक ह्यांनी आठवण करुन दिल्याने माउंट वॉशिंग्टनचे छायाचित्र इथे डकवत आहे, किंबहूना माउंट वॉशिंग्टनवरुन काढलेले छायाचित्र.
१.
Model NIKON D50
ISO 0
Exposure 1/320 sec
Aperture 10.0
Focal Length 20mm
२.
Model NIKON D50
ISO 0
Exposure 1/250 sec
Aperture 10.0
Focal Length 28mm
३. खालच्या चित्रात समोरच्या डोंगरावर ज्या सरळ रेषा दिसत आहेत ते स्कीईंग लाईन्स आहेत, थंडीत बर्फ पडला की तिथे स्कीईंग केले जाते.
Model NIKON D50
ISO 0
Exposure 1/320 sec
Aperture 10.0
Focal Length 28mm
टॅगलायनी फोटो
१. फांदीसारखी झुकते सांज (Grand Teton National Park, वायोमिंग)
फांदीसारखी झुकते सांज, जांभळासारखे पिकती ढग
हवेत गारवा जड होऊन, पेंगुळपांगुळ होते जग
- बाकीबाब बोरकर
२. तसे कवडसे तीत (क्रेटर लेक, ऑरेगन)
३. वेगवेगळे फुगे उमलले :) (Cappadocia, तुर्कस्थान)
तांत्रिक माहिती
धन्यवाद, मी. तांत्रिक माहिती येणेप्रमाणे -
पहिला फोटो -
Camera : Canon EOS DIGITAL REBEL XSi
Lens : Canon EF-S 18-55mm
Focal length : 18 mm
Aperture : f/7.1
Shutter speed : 1/125
ISO : 200
दुसरा फोटो -
Camera : Canon PowerShot SD600
Focal length : 5.8 mm
Aperture : f/5.6
Shutter speed : 1/500
ISO : 75
तिसरा फोटो -
Camera : Canon EOS DIGITAL REBEL XSi
Lens : Canon EF-S 18-200mm
Focal length : 18 mm
Aperture : f/7.1
Shutter speed : 1/500
ISO : 200
फोटोचे परीक्षण
या आव्हानाला भरभरून प्रतिसाद मिळेल असे वाटले होते, त्यामानाने किंचित अपेक्षाभंग झाला. आता ऐसीअक्षरेवर फोटोचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी काय-काय बाबी लक्षात घ्याव्या लागतील? माझ्यामते सर्वात महत्वाचा ते कमी महत्वाचा हा क्रम पुढीलप्रमाणे आहे.
१. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्य थीम काय आहे? स्पष्ट “सेंटर ऑफ इंटरेस्ट” आहे का? फोटोमध्ये नजर कशावर खिळून राहते?
२. फोटोचे कंपोझिशन कसे आहे? रूल ऑफ थर्ड कितपत आहे? फोटोमध्ये अनावश्यक किंवा डिस्टर्बिंग काही आहे का?
३. फोटोचा शार्पनेस कसा आहे? फोटो शार्प आहे का आणि एक्स्पोजर व्यवस्थित आहे का? depth of field , बोके कितपत आहे? direction of light, depth of field, फोकस हे फोटोला विचलीत तर करत नाहीत ना?
४. Does the photo tell a story? रंगसंगती नैसर्गिक (natural ) वाटते का? नसेल तर रंगसंगती मुख्य थीमला मारक नाहीये ना?
५. प्रकाशयोजना कशी आहे? फ्लॅश, फिल फ्लॅश, रिफ्लेक्टर वापरून अजून काही सुधारणा करता आली असती का? व्हाइट बॅलंन्स कसा आहे, ISO ठीक आहे का की फोटोमध्ये नॉइज दिसतोय?
६. क्रिएटीव्हीटी कितपत आहे? हा फोटो वेगळ्या प्रकारे किंवा अजून चांगला घेता आला असता का?
कुणाची हरकत नसेल तर वेळ अजून ५ दिवस वाढवूया का? (१० जूनपर्यंत). नाहीतर निकाल उद्या देतो.
स्पर्धेसाठी नाही
अविस्मरणिय अबू सिंबेल
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 22mm
Exposure 1/160
F Number f/14
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 34mm
Exposure 1/320
F Number f/9
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 35mm
Exposure 1/250
F Number f/8
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 18mm
Exposure 1/320
F Number f/9
ISO 200
Lens 70.0-300.0 mm f/4.0-5.6
Focal Length 70mm
Exposure 1/500
F Number f/5.6
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 20mm
Exposure 1/320
F Number f/9
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 18mm
Exposure 1/250
F Number f/8
ISO 200
Camera NIKON D60
Lens 18.0-55.0 mm f/3.5-5.6
Focal Length 55mm
Exposure 1/320
F Number f/9
ISO 100
निकाल
निकाल आणि इतर छायाचित्रांबद्दल थोडे परीक्षणः
सर्वसाक्षी यांची अबू सिंबेलची छायाचित्रे ओव्हरएक्स्पोस्ड वाटली. अबू सिंबेलच्या छायाचित्रांसाठी फिल्टर वापरायला हवा होता म्हणजे अजून चांगला परिणाम दिसला असता. जुरॉन्ग पार्कचे छायाचित्र स्पर्धेसाठी एकदम फिट बसले असते, पण ते स्पर्धेसाठी न्हवते.
अदिती यांची छायाचित्रे अंडरएक्स्पोस्ड वाटली.
ऋषिकेश यांच्या सेंट्रल पार्कच्या चित्रात दोन तृतियांश फ्रेममध्ये विखुरलेली पाने दिसत आहेत, त्यामुळे ती "पाने" हा मूळ विषय झाला आहे. ते छायाचित्र मी असे काढले असते
नंदन यांनी पहिल्या आणि दुसर्या फोटोसाठी फिल्टर वापरायला हवा होता असे वाटते. विशेषतः क्रेटर लेक, ऑरेगनच्या फोटोत फक्त १च रंग प्रामुख्याने दिसत आहे.
बोका यांचा लोणार सरोवराचा फोटो छान वाटला, पण ढग जरा जास्तच आणि राखाडी दिसत आहेत असे वाटले. निळ्या आकाशात पांढरे ढग छान दिसले असते. (अर्थात त्याच्यासाठी कदाचित तसे वातावरण नसेल किंवा जास्त वेळ थांबावे लागले असते).
ऋता यांचे छायाचित्र मी असे काढले असते
बाकीच्या २ छायाचित्रांमध्ये त्यांनी काँपोसिशनवर जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे असे वाटले. मिसळपाववर स्वॅप्स यांनी काँपोसिशनवर १ लेख लिहिला आहे तो जरूर बघावा, असे सुचवीन.
अतिशहाणा यांची माळशेज आणि मुन्नारची छायाचित्रे छान वाटली. पॅनोरॅमिक मोडमध्ये घेण्याचा पण प्रयत्न करून बघावा, असे सुचवावेसे वाटते. घराच्या फोटोमध्ये रेषांचा वापर छान वाटला, त्यामुळे चित्राच्या डावीकडे असणारा सोलार पॅनेलचा खांब डोळ्याला खुपत नाही.
बाबा बर्वे यांनी फोटोत बोटीला अजून क्लोजपमध्ये, फ्रेममध्ये उजव्या १/३ भागात टिपले असते, तर अजून चांगले वाटले असते. तसेच शटरचा कालावधी वाढवून, पाणी जरा धूसर अजून चांगले दिसले असते. सूर्यबिंब सुंदर दिसत आहे.
मी यांनी तोरणा २ मध्ये लाल रंगाची साडी, लाल पाउलवाट आणि काँट्रास्टला हिरवे झाड हे "सेंटर ऑफ इंटरेस्ट" धरून १ प्रयत्न करावा, असे वाटते.
तर्कतीर्थ आणि धनंजय यांची काही छायाचित्रे येतील, अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. सर्वसाक्षी, मी, वाचक, अपरिमेय, यसवायजी यांची छायाचित्रे स्पर्धेसाठी न्हवती त्यामुळेसुद्धा थोडा विरस झाला.
आता निकालः
क्रमांक ३
अस्वल यांचे छायाचित्रः पर्वत ताल
पर्वताच्या वेगवेगळ्या छटा खूप छान आणि खुलून दिसत आहेत.
ते छायाचित्र मी असे काढले असते
क्रमांक २
रुची यांचे छायाचित्रः काय्लमोर अॅबी- कॉनेमारा, आयर्लंड
अतिशय सुंदर काँपोझिशन, अगदी स्पष्ट "सेंटर ऑफ इंटरेस्ट", विषयाला अनुरूप छायाचित्र. पाण्यात सॉफ्टनेस वाटत आहे आणि त्यात कॅसलचे प्रतिबिंब पण छान दिसत आहे. छायाचित्रात डाव्या बाजूला दिसणारा मुलगा, छायाचित्र अजून रोचक करत आहे. १/३ चा नियम वापरलाय हे दिसून येतंय. खरंतर हे छायाचित्र पहिल्या नंबरला येणार, पण तांत्रिक माहिती दिली नाही म्हणून १/२ गुण वजा केला. :)
क्रमांक १
नंदन यांचे छायाचित्रः वेगवेगळे फुगे उमलले
हे सुद्धा अतिशय सुंदर काँपोझिशन, अगदी स्पष्ट "सेंटर ऑफ इंटरेस्ट", विषयाला अनुरूप छायाचित्र. मुख्य बलून फ्रेममध्ये डाव्या १/३ भागात आहे, त्यामुळे तो फोकल पॉईंट होतो आणि नंतर नजर अलगदपणे इतर बलून्सवर जाते. व्हाइट बॅलन्सपण एकदम अचूक वाटला. लाल आणि हिरव्या रंगातला काँट्रास्ट छान पकडला आहे. टॅगलाईनबद्दल बोनस १/२ गुण. :D
पुढील आव्हान नंदन यांनी द्यावे, अशी त्यांना विनंती.
निकाल अचुक आहे.. मलाही हेच
निकाल अचुक आहे.. मलाही हेच छायाचित्र सर्वाधिक आवडले होते.
बादवे, मी प्रत्येक चित्रात बरीच जागा मोकळी असणारी छायाचित्रे मुद्दाम दिली आहेत. टुरीस्टांच्या पामप्लेट्सवर काही लेखी मजकूर असतो तो लिहायला मुळ विषयाला बाधा न येणारी जागा हवी असते. जसे आकाश, पाणी, हिरवळ ज्यामुळे पोस्टर अधिक चांगले दिसते. तुम्ही उदाहरणादाखल जो भाग कापला आहे नेमका तिथेच तो मजकूर लिहायचा असे डोक्यात होते. ज्यामुळे मुळ चित्र विषयावर शब्द जाणार नाहीत तरीही शब्द चित्राचाच भागस असतील नी प्रसंगी चित्राला अधिक खुलवतील.
पर्व दुसरे सुरू
या स्पर्धेच्या ३५ भागांनंतर छायाचित्रण स्पर्धेचे पहिले पर्व संपल्याची घोषणा करीत आहोत. आजवर सहभागी सदस्यांचे, आव्हानदात्याची भुमिका बजावलेल्यांचे आणि विविध प्रतिसादातून टिका-टिपणी-मार्गदर्शन करणार्या सार्यांचेच आभार.
विविध विषयांवर छायाचित्रे काढणे, ती इथे देणे व त्यावर विविध अंगांनी चर्चा करणे आपल्याला या स्पर्धेमुळे शक्य झाले. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत या स्पर्धेला अधिक रोचक बनवायचे ठरवले आहे. एक ठोस विषय दिला की छायाचित्र काढता येते, पण त्याहून अधिक सृजनशीलता, वैविध्य यांना वाव मिळावा आणि शब्द आणि दृश्य यांच्यातील बंध वेगळेपणाने समोर यावा म्हणून दुसरे पर्व काहिसे अप्रत्यक्ष असेल. (कसे ते खाली दिले आहेच)
दुसर्या पर्वात एकूण तीन बदल करत आहोतः
१. विषय थेट दिलेला नसेल. तर आव्हानदात्याने त्याला आवडणारी एखादी कविता, एखादा गद्य उतारा, एखादा नाटकातील प्रसंग इत्यादी इथे द्यायचे आहे किंवा प्रताधिकाराचा प्रश्न असेल तर त्या लेखनाचा दुवा द्यायचा आहे. लेखनाप्रमाणेच त्याऐवजी एखादे आवडते रेखाटन, चित्र, गाण्याची फित किंवा एखादा व्हिडीयोही देता येईल. प्रतिसादकांना ती कलाकृती (गद्य/पद्य/चित्र/गाणे/व्हिडीयो) वाचुन/ऐकून/बघुन सुचलेले - साजेसे कोणतेही छायाचित्र स्पर्धेसाठी द्यायचे आहे.
२. दुसरा एक बदल करत आहोत तो म्हणजे स्पर्धेचा कालावधी १५ ऐवजी २० दिवसांचा करत आहोत.
३. स्पर्धाबाह्य कितीही चित्र देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल
अन्य नियम पूर्वीप्रमाणेच रहातील
आशा आहे या दुसर्या पर्वात उत्तमोत्तम छायाचित्रांसोबतच ऐसी अक्षरेच्या सदस्यांना शाब्दिक तसेच प्रसंगी दृकश्राव्य मेजवानीही मिळेल आणि हे पर्वही पहिल्या पर्वा प्रमाणे आपल्याला समृद्धही करेल आणि आनंदही देईल.
नंदन दुसर्या पर्वातील पहिले आव्हान देईल.
सर्वांनाच शुभेच्छा!
अजून एक सूचना निकाल जाहिर
अजून एक सूचना
निकाल जाहिर करताना उपाशी बोका यांनी जसे विजेत्या छायाचित्राचे थंबनेल टाकले तसे प्रत्येक वेळी निकाल जाहिर करताना करावे, नाहीतर निकाल वाचून परत जिंकलेले छायाचित्र बघण्यासाठी सदस्य नाव कॉपी पेस्ट करून ब्राउजर मध्ये शोध घ्यावा लागतो जे रसभंग करते!
पहिल्या बदलाशी असहमत
१. विषय थेट दिलेला नसेल. तर आव्हानदात्याने त्याला आवडणारी एखादी कविता, एखादा गद्य उतारा, एखादा नाटकातील प्रसंग इत्यादी इथे द्यायचे आहे किंवा प्रताधिकाराचा प्रश्न असेल तर त्या लेखनाचा दुवा द्यायचा आहे. लेखनाप्रमाणेच त्याऐवजी एखादे आवडते रेखाटन, चित्र, गाण्याची फित किंवा एखादा व्हिडीयोही देता येईल. प्रतिसादकांना ती कलाकृती (गद्य/पद्य/चित्र/गाणे/व्हिडीयो) वाचुन/ऐकून/बघुन सुचलेले - साजेसे कोणतेही छायाचित्र स्पर्धेसाठी द्यायचे आहे.
समजा आव्हानदात्याने इथे विषय दिला "जन गण मन"चा, तर कुणाला हा विषय वाटेल राष्ट्रभक्तीचा आणि ती भारतीय संसदेचा किंवा सैन्याच्या कवायतीचा लॅण्डस्केप मोडमध्ये फोटो देईल, तर कुणाला हा विषय वाटेल राष्ट्रगीत आणि ती कवीचा पोर्ट्रेट मोडमध्ये फोटो देईल. (केवळ उदा. म्हणून). तसं बघितल तर interpretation च्या द्रुष्टीने दोघेजण बरोबर आहेत, पण फोटोग्राफीच्या द्रुष्टीने लॅण्डस्केप व पोर्ट्रेट या वेगळ्या संकल्पना आहेत. (उदा. एकात Depth of field जास्त पाहिजे, तर एकात कमी). त्यामुळे आव्हानदात्याचे, फोटोग्राफरचे आणि परीक्षकाचे interpretation याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. एक विषय देण्याचा फायदा म्हणजे सगळे एकाच लेव्हलवर विचार करायची शक्यता वाढते आणि त्यातून एका विशिष्ट गोष्टीबद्दल शिकता येते (उदा. Depth of field, बोके, स्लो शटर स्पीड, फिल फ्लॅश वगैरे)
महत्वाचे म्हणजे सरळ-सोपा आणि सुस्पष्ट विषय दिला की नवीन फोटोग्राफर बिचकत नाहीत आणि प्रतिसाद देण्याची शक्यता जरा जास्त होते. त्यामुळे मुख्यतः हौशी (amateur) फोटोग्राफर्सना पण हुरूप येतो. इथे फोटोबद्दल काय चर्चा होईल, व्यक्तिशः मला याच्यातून काय शिकता येईल का? असा माझा विचार असतो आणि म्हणून मी इथे फोटो टाकतो. विषय स्पष्ट नसेल तर फोटोग्राफी कमी आणि चिकित्सा जास्त असा प्रकार होईल, असे मला वाटते.
म्हणूनच साधे-सोपे विषय घ्यावेत, असे माझे मत आहे. काही विषय: वास्तू (architecture), लहान मूल, मोठे हास्य (big smile), कुटूंब, वहाने, पक्षी, पोशाख (costume), सण/उत्सव, फटाके, फुले, अन्नपदार्थ, नवे आणि जुने, काळे आणि पांढरे (black and white), नक्षी (patterns), पाळीव प्राणी, केवळ १ रंग (लाल/हिरवा/निळा इ.), सावली, विविध आकार (shapes), हात, डोळे, चेहरा, contrast, टेक्नॉलॉजी, वर्तुळे (circles), मैत्री, अलिप्त (standing out from the crowd), खेळणी, लाकूड, झाडे इत्यादी.
यातून शिकायच्या गोष्टी आणि टेक्नीकः
अॅपरचर/शटर स्पीड/ISO कमी-जास्त करणे, वाइड अँगल्/झूम लेन्स वापरणे, व्हाईट बॅलन्स, ट्रायपॉड कधी वापरायचा, फिल्टर कधी/कुठला वापरायचा, फ्लॅश कधी/कसा वापरायचा, Depth of field ने काय फरक पडतो, ते कमी-जास्त करणे, एक्स्पोजर कंट्रोल, मॅक्रो फोटोग्राफी, मीटरिंग, सूर्य कॅमेरासमोर असताना फोटो कसा काढायचा, फटाक्यांचा/धबधब्याचा फोटो कसा काढायचा वगैरे.
आव्हानदात्याचे, फोटोग्राफरचे
आव्हानदात्याचे, फोटोग्राफरचे आणि परीक्षकाचे interpretation याच्यावर बरेच काही अवलंबून आहे
सहमत आहे.
इथे आव्हानदात्याचे मत अंतीम व फायनल आहे याचा अर्थ आव्हानदात्यने निवडलेला विजेता नेहमीच उत्तम असेल असे म्हणण्यापेक्षा त्याचे चित्र आव्हानदात्याला सर्वाधिक आवडले असे म्हणता येते. हेच आधीही होते.
बाकी दोन्ही प्रकारात आपापले फायदे-तोटे आहेत हे मान्य आहेच. नव्या पर्वात हा प्रयोग करून बघत अहोत.
आशा आहे यशस्वी होईल, नाही झाल्यास पुन्हा नवा मार्ग चोखाळायला आपण सारेच मोकळे आहोत :)
छान विषय आहे. याच्याशी
छान विषय आहे.
याच्याशी संबंधित छायाचित्रे बर्याच जणांकडे असतील नि याला भरपूर प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त करतो.
कृपया शक्य तितकी छायाचित्रे स्पर्धेसाठी द्यावीत.