अजित डोवाल : बस नाम हि काफी है

"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .

अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते .

मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल ,

कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

खूप आभार
पडद्यामागच्या कलाकराची ओळख करून दिल्या बद्द्ल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! छान लेख आहे. आवडला!

http://www.ndtv.com/article/people/ajit-doval-the-spy-who-came-in-from-t...
हा लेख सापडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रोचक.
जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउदच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस. >> डी डे आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आणि माहितीपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोजक्या शब्दात करून दिलेल्या थेट ओळखीबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाबद्दल आभार.

डोवाल यांच्यासारख्या अनेक लोकांना एवढं काम करूनही काहीही प्रसिद्धी, मान मिळत नाही. देशाच्या, नागरिकांच्या हितासाठी हे करणं इष्टच. यासारख्या लेखामुळे असे लोक कार्यरत आहेत याची जाणीव करून देणं अगत्याचं आणि महत्त्वाचं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देशाच्या, नागरिकांच्या हितासाठी हे करणं इष्टच.

केवळ देशाच्या नि नागरिकांच्याच नव्हे, तर खुद्द अशा लोकांच्या स्वतःच्या हिताकरितासुद्धा त्यांना प्रसिद्धी न मिळणे इष्ट नव्हे काय?

यासारख्या लेखामुळे असे लोक कार्यरत आहेत याची जाणीव करून देणं अगत्याचं आणि महत्त्वाचं वाटलं.

ते ठीकच. पण तसे करतानासुद्धा त्यांची आयडेंटिटी उघड करणे आवश्यक असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. होय.

२. डोवाल आता उच्चपदावर असल्यामुळे आता त्यांच्या आधीच्या कामांबद्दल (काळजी घेऊन) लिहायला हरकत नाही. पण बाकीच्या, प्रकाशझोतात नसणाऱ्या लोकांबद्दल फार (किंवा काहीही) लिहू नये.
फक्त हे लोक काहीच करत नाहीत असा सार्वत्रिक गैरसमज असतो, तो असू नये. प्रकाशझोतात असणाऱ्या लोकांबद्दल लिहील्यामुळे असे गैरसमज दूर व्हायला मदत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त हे लोक काहीच करत नाहीत असा सार्वत्रिक गैरसमज असतो, तो असू नये

काय फरक पडतो?

उलट, 'आपली' संघटना कुचकामी आहे, काहीही काम करु शकत नाही, अशा सार्वत्रिक प्रतिमेचे कव्हर असणे फायद्याचे नाही काय?

काही गोष्टी ब्रॅग न केलेल्याच बर्‍या असाव्यात. (ब्रॅग करता येण्यासारख्या असल्या, तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही गोष्टी ब्रॅग न केलेल्याच बर्‍या असाव्यात. (ब्रॅग करता येण्यासारख्या असल्या, तरीही.)

मान्य.

पण जालीय होलसेलपणाचा कंटाळा आलाय असं उघडउघडपणे म्हणण्यापेक्षा जागरुकता वाढावी असं आर्ट फॉर्म बनवून, शर्करावगुंठीत पद्धतीने म्हटलेलं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उलट, 'आपली' संघटना कुचकामी आहे, काहीही काम करु शकत नाही, अशा सार्वत्रिक प्रतिमेचे कव्हर असणे फायद्याचे नाही काय?

ही दुधारी तलवार आहे. एका बाजूला 'आम्ही मोसाद, आम्ही लै डेंजर माणसं आहोत' अशी प्रतिमा जाहीरपणे राखणं फायद्याचं असतं. ज्या जनसामान्यांसाठी आपण काम करतो त्यांच्या मनात 'आपले अज्ञात पाठीराखे आहेत' अशी भावना निर्माण होणं चांगलं नाही का? दुसऱ्या बाजूला रॉसारख्या संस्थेने आपल्या कृत्यांची जबाबदारी झिडकारली की सरकारला 'आमचे हात स्वच्छ आहेत. आम्ही सज्जन, आम्ही कधी कुणाची कुरापत काढत नाही' वगैरे साळसूद प्रतिमा राखता येते. या दोनपैकी नक्की कुठचं टोक स्वीकारायचं? दोन्ही साधता आलं तर उत्तमच. पण सध्या तरी आपलं हेरखातं सगळ्या हालचाली अंधारात करतं असं दिसतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाईन दणका!!! जबरी माणूस दिसतोय एकदम. भारी ओळख करून दिलीत, काहीच माहिती नव्हते यांच्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगली ओळख.
आधीचे राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा वगैरे मंडळीही बरीच काही करुन गेलीत.
अर्थात त्यांची सारीच कामे हेडलाइन्स बनत नसल्याने, व तेच इष्ट असल्याने पब्लिकला फारशी माहिती नसावी.
बादवे, भारत काही करत नाही हे समजणे म्हणजे गंमतच आहे.
इस्राइलनं इराकची नव्यानं उभी राहू पाहणारी आण्विक क्षमता ८० च्या दशकात बेचिराख करुन टाकली;
तस्साच प्रयत्न भारताने पाकबद्दलही केला होता. तो नेमका थोडक्यात फसला.
पण प्रयत्न केला होता ही फ्याक्ट आहे.
(एका सार्वभौम देशावर युद्धपरिस्थिती नसताना असले हल्ले करण्याचे इरादे ठेवणे म्हणजेच आपण दुधखुळे आणि दुध के धुले नाहित;
हे समजण्यात पुरेसे ठरावे.)

शिवाय llte चा प्रभाकरन....
त्यालाही छापामार स्टाइल (ओसामा बिन लादेनला अमेरिकेने अचानक येउन उडवला तसा) भारताने उडवायचा प्रयत्न केला.
ती चकमक फसली. भारताचे २७ का ३० जवान/कमांडो मारले गेले.

पण ह्याचाचा अर्थ हा की "शिंचं भारत सर्कार कैच करत नै" असं समजणं चूक आहे.

काही प्लान्स फसलेही असतील. आणि जे यशस्वी झालेत ते फारसे गवगवा न झालेलेच बरे; असे असू शकतात;
सगळ्याच गोष्टी उघड सांगून चालत नाहित. समजून घ्याव्यात अशी अपेक्षा करणं चूक नाही.

अर्थात मी वरती उल्लेख केलेल्या गोष्टी; असे काही प्रयत्न केलेले असणं भारत सरकारने अधिकृत पातळीवर नाकारलेल्या आहेत;
आणि ते नाकारणच तार्किकही आहे.
इतकं असलं तरी रविंदर कौशिक सारख्यांबद्दल किम्वा सरबजीत बद्दल वाचून तीव्र दु:खही होतच.
http://en.wikipedia.org/wiki/Ravinder_Kaushik

कधी कारगिलची माहिती हेरांमार्फत मिळण्याऐवजी आपली गुरं चरायला घेउन जाणार्‍या मेंढपाळांकडून मिळावी ह्याचंही आश्चर्य वाटलं होतच.

समस्या असली तर हीच की भारत सरकार हेरगिरीत सामील असलेल्या सार्‍यांचीच कामगिरी पूर्ण झाल्यावर काळजी घेत नाही;
कित्येकांना वार्‍यावर सोडते; असा उल्लेख वाचला. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अशा कामगिरी बजावून परत आलेल्या हेरांच्या
संघटनेने लिहिलेल्या लेखात, "नंतर भारत सरकार आम्हाला वार्‍यावर सोडते" ह्या तक्रारीत तथ्य असेल तर मात्र ते खरच दुर्दैवी आहे.

बाकी मोरारजी देसाई, गुजराल ह्यांची कारकीर्द ह्या संदर्भात विसरुन जाणं इष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"अर्थात त्यांची सर्वच कामे हेड्लाइन्स बनत नसल्याने आणि तेच इष्ट असल्याने पब्लिकला फारशी माहिती नसावी". "पण ह्याचाच अर्थ हा की 'शिंचं भारत सर्कार कैच्च करत नै'असं समजणं चूक आहे."
शंभरवेळा सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण सर्वांनी रामेश्वरनाथ काव हे नाव ऐकले असेलच. एक अद्भुत माणूस होऊन गेला. R & A.W.स्थापनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. 'रॉ'चे ते बरीच वर्षे संचालकही होते.सुरवातीच्या सेवाकनिष्ठतेच्या काळात ते पं नेहरूंचे सुरक्षा-सल्लागार होते. नंतर इंदिरा गांधींच्या काळात 'रीसर्च्'चे कॅबिनेट सचिव होते. त्यांच्यानंतर 'रॉ'च्या प्रत्येक डायरेक्टरने हे पद भूषविले आहे. राजीव गांधींच्या काळात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांच्या काळात त्यांची गणना जगातील पाच सर्वोत्तम गुप्तहेरांमध्ये होत असे.'रॉ' ही देशाला अभिमानास्पद अशी संस्था आहे.'रॉ'ची आणि तिथल्या कर्मचार्‍यांची कामगिरी जगापुढे कधीच येणार नाही. पण २००२ साली काव यांच्या मृत्यूनंतर स्मृतिलेखांमधून त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीबद्दलची पडद्यामागची बरीच माहिती बाहेर आली होती. त्यानंतर 'The Kav boys of R&AW' हे बी.रामन यांचे पुस्तक आले आणि त्यातल्या काव यांच्या अद्भुतरम्य शौर्य-धैर्य-चातुर्यकथांमधून त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाची थोडीफार झलक पहायला मिळाली. हे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचावे.
अशा अनाम वीरांना सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्याच्या घटकेला एवढेच म्हणेन, श्री अजित डोवाल अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहे, अनेक वरीष्ठतम अधिकाऱ्यांच्या तोंडून त्यांची स्तुती आपल्या कानाने ऐकली आहे. ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली व महत्त्वपूर्ण ओळख
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!