छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद
याआधीच्या भागात अतिशय कमी एंट्रीज आल्याने त्या भागाचा निकाल न लावता पुढिल भाग द्यायचे ठरवत आहोत. याही भागात कमी इंट्रीज आल्या तरीही आलेल्या इंट्रीजपैकी एक चित्र निवडून निकाल दिला जाईल
या वेळच्या आव्हानासाठी "सात सक्कं त्रेचाळीस" या किरण नगरकर यांच्या पुस्तकातील एक लहानसा उतारा देत आहोतः
--------
कोथरूडच्या मळ्यात ताई म्हणाली, "माझे पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त. नमस्कार कर कुशंक. दगडात पण देव आहे" असेल. दगडात देव असला तरी देवात एक शेंदूर फासलेला दगड आहे. सार्या विश्वातल्या एकाही माणसाच्या श्वाशोच्छवास त्याच्या नजरेतून सुटत नाही, त्याच्या पोत्यातून सांडत नाही. त्याला पापण्या नाहित. कधी एके काळी होत्या त्या थकून जळून गेल्या. त्यांना काम नव्हतं. देव आपले डोळे मिटत नाही. शकत नाही. त्याचा हा जबरदस्त अधाशीपणा. त्याला इलाज नाही. आनि आपल्याला झालाय नाइलाज. मला ह्या आताच्या क्षणाचं काही नाही. मला आहे ते एका क्षणाचं. मरायला दिवस नाही वर्ष लागतील, पण मरण्याचा क्षण एकच. माझा रात्रंदीन, जगाच्या सुरूवातीपासून विरोध आहे तो या क्षणाला. तुझ्या, माझ्या, आई गेली त्या. मी त्याला आणि त्याच्या कारभाराला समजु शकत नाही. समजून घेण्याची इच्छा नाही. तू म्हणाली होतीस की आपल्या वाट्याला चॉइस आलेला नाही. खरंय. त्याने डोळे सताड उघडे ठेवायचं ठरवलं आहे. मी घट्ट मिटून. त्यानं अगणित अपराध पोटात घातले आहेत. माझा पण घालेल. शेवटी आज ना उद्या तो सगळ्यांनाच गिळतो. माझी लक्ष्मणरेखा त्यानं आखलेली आहे. पण मला ओरडता येतं. ओरडण्याला आवाज नाही हे मानलं. दुसर्यांना तेवढाच कमी त्रास. वॉर. टोटल वॉर.
-------
वरील परिच्छेद/अंश वाचुन जे सुचेल/वाटेल ते छायाचित्रात बंदीस्त करायचे हे आव्हान आहे. बघुया कितीजण आणि कसे हे आव्हान पेलतात.
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २२ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
व्यवस्थापकः सदर धाग्यावर छायाचित्राव्यतिरिक्त इतर विषयांवर फारशी चर्चा करू नये. समांतर चर्चेसाठी वेगळा धागा काढावा वा मनातले प्रश्न/विचार यातील ताज्या धाग्यावरही विचार मांडता येतील
स्पर्धा का इतर?
बघुया! वाटतेय तितकाही हा
बघुया! वाटतेय तितकाही हा परिच्छेद कठीण वाटत नाहीये मला. गाभा स्वयंस्पष्ट आहे असे वाटतेय.
शिवाय कित्येक वाक्ये अशी आहेत की नेहमी दिसणारी कित्येक चित्रे डोळ्यासमोर उभे रहावीत. जरा विचारांना चालना द्यावी लागेल हे मान्य, पण त्यातच तर मजाय असे मला वाटते.
बाकी, निकाल ठरवायला एकच एक निकष नाहिये. जो च्यालेंज देतोय त्याचे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उत्तमोत्तम चित्रे बघायला मिळणे हा उद्देश आहे, निकालाची अचुकता तुलनेने गौण आहे.
जमवाच हो! वाट
जमवाच हो! वाट पाहतोय
पुस्तकाचं ह्रिदम इथे उपलब्ध नसल्याने इच्छुकांनी दोन-तीन वेळा उतारा वाचावा आणि मगच प्रयत्न करावा.
+१
मुळात या पुस्तकातही हे लेखन जेव्हा येते तेव्हा वाचकाकडे फार पार्श्वभूमी नसते. ;)
त्यामुळे पुस्तक पहिल्यांदाच हाताशी दिले व या परिच्छेदापर्यंत वाचुन काढले तरी फार मोठा फरक पडणार नाही.
दगड
दगड
अलीप्ततेचा शाप असलेला कोरडा पाषाण…
हात, पाय, तोंड नसतानाही
असंख्य शक्यता पोटात घेऊन
निपचित पडून राहिलेला गोटा…
कुणी घडवेल तसा घडणारा,
कुणी रंगवेल तसा रंगणारा,
कुणी रचवेल तिथे रचणारा
एक अत्यंत निर्विकार धोंडा…
आपल्या नावाचं विशेषण
फडतूस माणसांना लावलेलं पाहूनही
बंड करू न शकणारा….
पायरीचा दगड…
देवाचा दगड….
अर्धवट आकारांचा दगड…
अवांतर
(चित्रे जालाहून घेतली आहेत)
बदामीतली अजून एक मूर्ती या प्रतिसादावरून एकदम आठवली,
अर्थात ती इथे फ़क्त 'सौष्ठव' याच अनुषंगाने दावता येईल.
कदाचित मागच्या धाग्यावर शोभली असती.
गणपतीची इतकी विशिष्ट मूर्ती मी तरी पाहिली नाही. तो ज्या ठेचात बसलाहे ते लाजवाब. हाताची विलक्षण ठेवण पकडताना मूर्तीचा जो समतोल साधला आहे तो मस्त आहे. मोजकीच आभूषणे पण तीही सरधोपट पद्धतीने कोरली नाहीत. गळ्यातील हार कसा मस्त स्वैर सांडला आहे:
बाकी मूर्ती दुर्दैवाने भग्न आहे.पण खालील उपलब्ध इमेजवरून कल्पना यावी:
.
.
.
.
वरील परिच्छेदामधील जन्म मृत्यूचे संदर्भ पाहता आणि जीवनेच्छेचे प्रकटन पाहता बदामीतील लज्जागौरीची जननमार्ग उघडल्या उतान्या अवस्थेतील आडवा कल असलेली मूर्ती दावता येईल.
अर्थात स्पर्धेसाठी नाही
हा विषय वाचून मला जे काही डोळ्यापुढे येते त्याच्याशी साधर्म्य साधणारे काही जालावर मिळाले. काही चित्रे काही छायाचित्रे.
आधी काही चित्रे इथे देतोय. सर्व चित्रे आंतरजालावरून साभार. प्रताधिकाराची कल्पना नाही!
"Study after Velazquez's Portrait of Pope Innocent X" by Francis Bacon:
=====
काही छायाचित्रे:
सात सक्कं त्रेचाळीस
हा असाच अवचित अज्ञात कवड्सा उजळुन टाकी आत्मा ......प्रवास चालु आहे .....भस्म करायचे कि प्रकाशमान करायचे हा जसा त्याचा प्रश्न आहे .....
तसा तो दिलेला पर्याय स्वीकारणे इतकेच काय ते माझ्या हातात, शेवटी अस्तिव संपणे हेच काय ते अंतिम सत्य ...
हा फोटो भुलेश्वर येथे काढला आहे canon 7D 18-135 mm Morning Hours around 8 AM
निकाल
वेळेच्या अनुपलब्धतेमुळे फार तपशीलात निकाल देत नाहिये. क्षमस्व.
तृतीय क्रमांकः विलासराव यांचा महात्मा गांधींचा फोटो. हल्ली अनेकांना स्वार्थासाठी देवत्त्वाच्या दर्जा देऊनही डोळे मिटूनच पण कार्यमग्न असणारा हा दगडी पुतळा. बरेच काही सांगणारा.
द्वितिय क्रमांकः प्रसाद वैद्य यांचे "प्रकाशचित्र".
आणि पहिला क्रमांकः धनंयज यांचे नंदी तंद्री हे चित्र.
एकुणच देव जागा आहे असे मानणारा आणि त्यावर आपला भार टाकून निवांत डोळे मिटून घेतलेला भक्त ही जोडगोळी मोठी रोचक आहेच. शिवाय म्हटले तर दगडातील देवत्त्व म्हटले तर सुंदर शिल्पातील सौंदर्य दाखवणारे हे चित्र मला खूप आवडले.
धनंजय, अभिनंदन! पुढील विषय द्यावात ही विनंती!
प्रचंड साशंक
आर्टवर्क (चित्र/फोटो वगैरे) ते इंटरप्रिटेशन हा प्रवास समजण्यासारखा आहे. पण आधीच एक अॅबस्ट्रॅक्ट इंटरप्रिटेशन सदृश कल्पना (पक्षी: एक संदर्भ सोडून काढलेला परिच्छेद) याचं फोटो मधे रुपांतर कसं होईल आणि झालंच तरी कुठला फोटो त्या परिच्छेदाचा गाभा पकडणारा आहे हे कसं ठरवणार याबद्दल प्रचंड साशंक आहे. एकुणातच असं फोटोग्राफी चॅलेंज कधी पाहाण्यात आलेलं नाही. 'सुखकर्ता दु:खहर्ता' प्रमाणेच याची अवस्था होऊ नये अशीच मनोमन इच्छा!!