मी नाही मानत !!!
मी नाही मानत !!!
हल्ली एक नवीनच फॅड चालू झालंय. खरंतर नवीन का जुनं ते नाही माहित ; पण सद्ध्या नक्कीच जोमात आहे. 'मानलेला भाऊ आणि मानलेली बहिण'.
तसं पाहायला गेलं तर भाऊ किंवा बहिण ही मानायची नाती कधीच नव्हती आणि माझ्या दृष्टीने नसतीलही. भाऊ एकतर असतो नाहीतर नसतो. बहिण एकतर असते नाहीतर नसते. ही दोन्ही नाती (खरतरं एकच नात आहे) digital systems मध्ये येतात analog नाही. सांगायचा मुद्दा हा की भावासारखं किंवा बहिणीप्रमाणे असं काही नसतं.
माणसाच्या प्रत्येक (विचारपूर्वक) कृतीमागे हेतू असतो. तसाच यामागेही. आता एखाद्या मुलीला व मुलाला एकत्र (फिरवायचं नसून ;) ) फिरायचं असेल (सावधान एक अक्षरही धोकादायक आहे !!!) आणि "आमच्यात 'तसलं' काहिचं नाहिये." हे थोडक्यात आणि effectively सांगायच असेल तर "मानलेली बहीण आहे रे !" यापेक्षा चांगलं वाक्य नाही. किती सहजपणे एका पवित्र नात्याचं आवरण चढवल जात एका असमंजस नात्याला. (याला नातही म्हणाव की नाही ?)
एक काळ होता जेव्हा एकलव्याने गुरु मानला होता. पण त्या नात्यात एक समर्पण होत. मागितल्यावर अगंठा दिला एकलव्याने. पण आज या मानलेला भाऊ बहिण या नात्याच समर्पण परीक्षेच्या आदल्या दिवशी notes देण्याइतपत जाईल अस मला तरी वाटत नाही.
पण ज्यनी कोणी सुरु केल त्याच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल. आयुष्याभर पाप करून गंगास्नान करून सगळ काही धुवून टाकव (जात नसेल तरी समजुत महत्त्वची!) तस केलेल न केलेल पाप धुवून टाकण्याचा प्रकार हा (पुन्हा एकदा समजुतच!!!) पण कोणी तरी लक्षात घ्या की ही गंगा तुमच पाप पोटत घेवुन प्रदुषित होत आहे.( हो फक्त प्रदुषितच. अपवित्र करण्याची ताकद नाही तुमच्यात!!!)
म्हणूनच म्हणतो , मी नाही मानत !!!.
मला तरी ह्यात काहीच चूक वाटत
मला तरी ह्यात काहीच चूक वाटत नाही.
आधी पोरांनी-पोरींबरोबर फिरण्यात आई-बापांना प्रॉब्लेम. मग त्यावर उपाय म्हणून असल्या गोष्टी करणारच की ते!
उद्या त्या पोरा-पोरींनी रीतसर डेटींग करायला परवानगी विचारली तर बघायलाच नको,घरी रडारड सुरू- चारित्र्य वगैरे आलंच.
मग असल्या पळवाटा काढून जर त्यांना एकमेकांसोबत थोडा वेळ घालवता येत असेल तर जरूर!
:)
"दादा-भाई 'नवरो'जी" हा प्रकार फार जुना असावा.
आमच्याकडे भांडी घासायला येणार्या मावशींनी तर एके दिवशी सोबत आणलेल्या मुलीची ओळख "ही आमची मानलेली सून" अशी करून दिली होती! आता बोला!
भुमितीतल्या "या आकृतीला आपण गोल मानून" शेवटी सबब हा गोल नाही हे सिद्ध होते, तसेच हे भाऊ-बहिण मानलेले नाते शेवटी अनेकदा सबब हे भाउ-बहिण नाहीत हे सिद्ध करून संपते! ;)
आजकाल काही घरांमध्ये एकुलता
आजकाल काही घरांमध्ये एकुलता एक मुलगा असतो किंवा मुलगी. अश्या वेळी भावनात्मक गरज भागविण्यासाठी बहिण-भावांचे नाते मानले जातात. अश्या नात्यात बहुधा खर्या बहिण भावांच्या नात्यापेक्षा ही अधिक घट्टपणा असतो.
बाकी काही नात्यांच्या उपहास करणारे लोक ही असतात. पण त्या मुळे असे विधान करणे उचित नाही.
बाकी काही नात्यांच्या उपहास
बाकी काही नात्यांच्या उपहास करणारे लोक ही असतात. पण त्या मुळे असे विधान करणे उचित नाही.
असं कसं असं कसं? अहो आजकाल उपहास नै केला, प्रचलित व्यवस्थेला चार शिव्या नै घातल्या तर लोक ढुंकूनही बघत नाहीत. त्यामुळे, "येनकेन प्रकारेण प्रसिद्धो मनुजो भवेत्" या न्यायाने करतात ते योग्यच आहे.
खोटं बोलूच नये याच मताची मी
खोटं बोलूच नये याच मताची मी आहे पण कधीकधी कशातच काही नसतं अन मग आपला समाज प्रश्नांचं मोहळ उठवतो. त्याला कोण तोंड देत बसणार त्यापेक्षा खोटं बोलणं परवडलं असं काहींना वाटू शकेल.
कोर्ट्शिप कालावधीत एकमेकांची पारख महत्त्वाची असते अन त्यातून नातं आकारासही येऊ शकतं किंवा फिसकटूही शकतं. जर फिसकटलं तर उगा कोणाकोणास तोंड देत बसणार म्हणून मग बचावात्मक पवित्रा म्हणून भाऊ-बहीण लेबल लावलं जात असावं.
यात गैर काही नाही. तुम्ही (समाज) एवढे टिक्कोजीराव लागून गेले की सग्गळं खर्र खर्र तुम्हाला सांगीतलच पाहीजे?
कंस
दोन कंस पूर्ण करायचे राहिलेत. एरर येईल!