गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही काळापूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद योग्यच होता. पण त्यापुढे जाऊन ‘गुरुदत्तच्या चित्रपटांनी नक्की काय साध्य केलं?’, ‘भारतीय चित्रपटांत गुरुदत्तचं नक्की स्थान काय?’ आणि ‘गुरुदत्तच्या चित्रपटांत जागतिक आणि भारतीय कलाविचार कसे दृग्गोचर होतात?’ अशा काही मूलगामी प्रश्नांविषयीचे मूलगामी विचार मराठीमध्ये काही दशकांपूर्वी अतिशय प्रभावी विश्लेषणाच्या माध्यमातून अरुण खोपकर ह्या चित्रपट दिग्दर्शक-शिक्षक-लेखकानं मांडले होते. आता मात्र त्या पुस्तकाचं विस्मरण झालेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. गुरुदत्तच्या मृत्यूला पन्नास वर्षं झाली ह्या ताज्या निमित्तानं मराठीतल्या ह्या अभिजात पुस्तकाची मराठी आंतरजालावर आठवण काढावी ह्यासाठीचा हा धागा. (लेखन पूर्वप्रकाशित आहे.)

‘गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकात खोपकर ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब, बीबी और गुलाम’ ह्या तीन रसिकप्रिय चित्रपटांविषयी विवेचन आणि विश्लेषण करतात. इतर समाजांप्रमाणे मराठी समाजातदेखील एका काळापर्यंत चित्रपट ही कमी दर्जाची कला समजली जायची. त्यामुळे अनेक प्रकारची हानी झाली. साहित्याचं गांभीर्यानं विश्लेषण करण्याची, म्हणजे समीक्षेची, जशी परंपरा अस्तित्वात होती, तशी चित्रपटाच्या समीक्षेची किंवा रसग्रहणाची परंपरा मराठीत त्यामुळे निर्माण झाली नाही. पण आपल्याला ते करायचं आहे, असं खोपकर प्रस्तावनेतच सांगतात आणि पुढे दाखवूनसुद्धा देतात. त्यांच्या विश्लेषणपद्धतीला मात्र एक जागतिक वळण आणि परंपरा आहे हेही ते कबूल करतात. सिनेमाविषयी सकस लिहिण्यासाठी मुळात इतर कला, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याशीच भिडावं लागतं हे ते सांगतात. ‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

प्रत्यक्ष विश्लेषण करताना खोपकर अनेकविध संकल्पना आणि परंपरांचा अगदी लीलया फेरफटका मारत ह्या तीनही चित्रपटांची वेगवेगळी अंगं उलगडतात. त्यात ‘रोमँटिसिझम’च्या युरोपिअन परंपरेत गुरुदत्त कसा बसतो याचं विवेचन आहे. पात्रं, प्रसंग यांच्याद्वारे चित्रपटांचं रसग्रहण आहे. त्या बरोबरच चित्रपटमाध्यमाची जाण आणि तीमधून गुरुदत्तच्या व्यक्तित्वाची उकलही त्यात केलेली आहे. ‘जिनिअस’ आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाची ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ मधली मांडणी आणि ‘साहिब, बीबी...’ मधली छोटी बहू ह्यांचा संबंध कसा लागतो हेही त्यात दाखवलं आहे.

क्षोभनाट्य (मेलोड्रामा) हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. भारतीय कलापरंपरेचा प्रवाह क्षोभनाट्याच्या आधारानं जातो. गुरुदत्तचे चित्रपट ह्या पठडीतले असल्यामुळे सत्यजित रायसारख्या अधिक वास्तववादी दिग्दर्शकाच्या तुलनेत कधीकधी गुरुदत्तला कमअस्सल मानलं जातं. पण पारंपरिक मेलोड्रामा आणि गुरुदत्तचे चित्रपट ह्यांत काय फरक आहे हे खोपकर विशद करतात. तसंच योगायोग, गाणी वगैरे, म्हणजे आपल्या धंदेवाईक चित्रपटांमध्ये वापरले जाणारे घटक गुरुदत्त कशा ताकदीनं वापरतो ह्याचंही त्यात विश्लेषण केलेलं आहे.

काळोख आणि प्रकाश हा चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमातला एक अतिशय प्रभावी घटक आहे. त्याचा प्रसंगानुरुप वापर आणि चित्रपटाच्या एकंदर रचनेशी असलेलं त्याचं नातं खोपकर उलगडून दाखवतात. अवकाशाचा चित्रपटीय वापर आणि त्यातून उभा राहणारा ऱ्हास ह्यांचंही असंच विश्लेषण ते करतात.

असं सगळं उलगडून दाखवत असताना विवेचनातल्या प्रत्येक घटकाचा पाश्चिमात्य परंपरेतला वापर आणि गुरुदत्तनं केलेला वापर ह्यांतली साम्यस्थळं खोपकर दाखवतात आणि त्याचं वेगळेपणसुद्धा दाखवतात. त्यामुळे वाचकाला आपोआप एक सखोल आणि व्यापक ज्ञान मिळत जातं.

र.कृ. जोशी ह्यांचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि एकंदर मांडणी ही देखणी आणि आशयाला साजेशी आहे. पानोपानी असणारी छायाचित्रं ही पुस्तकाचा आशय उलगडून दाखवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. त्यामुळे १९८५ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची निर्मितीमूल्यं काळाच्या पुढची आहेत.

हे पुस्तक म्हणजे निव्वळ गुरुदत्तची स्तुती नाही. त्याला नीट न जमलेल्या गोष्टींचं विवेचनही त्यात आहे. त्याशिवाय अतिशय हृद्य वाटावी अशी एक तुलना त्यात आहे. ती ऋत्विक घटक ह्यांच्याशी केलेली आहे. शोकनाट्य (ट्रॅजेडी) हा गुरुदत्तच्या तीनही चित्रपटांचा गुणविशेष आहे. तोच क्षोभनाट्याच्या घाटातून मांडणारे ऋत्विक घटक हे गुरुदत्तव्यतिरिक्त आणखी एक भारतीय दिग्दर्शक आहेत. ह्या दोघांची कलात्मक तुलना आणि आपापल्या कलाकृतीतून महाकाव्य (एपिक) साकारण्याचे दोघांचे प्रयत्न ह्याविषयीचं सखोल आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण पुस्तकात आहे.

गुरुदत्तच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा घेणं पुस्तकात अभिप्रेत नाही; पण त्याची कला आणि त्याची जीवनदृष्टी ह्यांचं नातं सांगता सांगता गुरुदत्तचा करुण अंत टळण्यासाठी काय व्हायला हवं होतं ह्याचाही थोडा अंदाज खोपकर देतात. आत्मनाशाच्या प्रेरणेविषयी फ्रॉईडनं जे मनोविश्लेषणात्मक विवेचन केलं आहे त्याचाही आधार ते घेतात, आणि आपल्या अंतर्मनाला गुरुदत्त का स्पर्श करू शकतो हेही सांगतात.

सरतेशेवटी हेही नोंदलं पाहिजे की निव्वळ गुरुदत्तचे सिनेमे कळण्यासाठी पुस्तक उपयोगी नाही, तर त्याचं मूल्य त्याहून खूप अधिक आहे. आंतरजालावर आणि बाहेरही आज अनेक जण चित्रपटांचं किंवा पुस्तकांचं रसग्रहण करणारे लेख लिहीत असतात. त्यांना पुष्कळ स्तुतीही अनुभवायला मिळते. पण तीमुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याऐवजी ज्यांना सखोल आणि सघन रसग्रहणात्मक लिखाण कसं करावं ह्याचे धडे हवे असतील, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ आहे. असं लिखाण करण्यासाठी जो चौफेर अभ्यास लागतो तो कसा हवा, हेसुद्धा त्यात दिसेल. निव्वळ ‘टाईमपास’ करण्यासाठी पुष्कळ चित्रपट/पुस्तकं जगात असताना गंभीर चित्रपट/पुस्तकं ह्यांच्याकडे का वळावं, ह्याचंही उत्तर कदाचित त्यात मिळू शकेल.

पुन्हापुन्हा वाचावंसं वाटणारं, प्रत्येक वाचनात एखादा सुहृद भेटल्याचा अनुभव देणारं आणि काहीतरी नवीनही उलगडून दाखवणारं हे पुस्तक अभिजात मराठी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट करण्याला मला तरी काही पर्याय दिसत नाही.

गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका
लेखक : अरुण खोपकर
प्रकाशक : ग्रंथाली (१९८५)

(पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध आहे; पण लवकरच त्याची नवी आवृत्ती येईल असं ऐकिवात आहे. इंग्रजी आवृत्ती उपलब्ध आहे.)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

होय, या पुस्तकाविषयी नुसतंच ऐकलं आहे. इंग्रजी आवृत्ती उपलब्ध असल्याचं मात्र माहीत नव्हतं. पण आता मराठी मिळेल म्हणता तर...

अवांतरः गुरवाच्या अंगात आल्यावर तो बरोब्बर आपल्याच घराच्या दिशेनं नारळ फेकतो अशी काहीतरी म्हण आहे. तिला अनुसरून 'बीबीसी शेरलॉक'च्या दृश्य अंगाचं विश्लेषण (च् च्! चीरफाड नव्हे हो चीरफाड नव्हे, हे बरंच रंजक आहे त्याहून!) करणारा हा एक टंब्लर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अंबरिष मिश्र यांच्या 'शुभ्र काही जीवघेणे' या पुस्तकात ओ .पि नय्यर यांच्यावर एक सुंदर प्रकरण आहे. ओ. पी . यांनी बराच काळ गुरुदत्त यांच्याबरोबर काम केले होते . त्यांच्या संबंधात बरेच चढ उतार आले. अनेकदा भांडण करून एकत्र आले . अगदी गुरुदत्त यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी पण नय्यर गुरुदत्त यांना भेटले होते . अशा या नय्यर यांचे गुरुदत्त च्या गूढ Roamntic वर्ख चढलेल्या मृत्यूबद्दलच मार्मिक निरीक्षण मिश्र यांनी नोंदवल आहे. नय्यर यांच्या मते गुरुदत्त चा मृत्यू (आत्महत्या ) हि त्याच्या कमालीच्या बेहिशोबी व्यवहार आणि त्यातून आलेल्या व्यवसायिक अपयशातून झाली होती . मग त्या आत्महत्येला हि romantic डूब कशी आली ? त्याचे उत्तर देताना नय्यर म्हणतात कि nosltalgia चे गळे काढणारे चाहते आणि पत्रकार यांनी ती दिलि .
बाकी गुरुदत्त हा महान कलाकार होता हे अमान्य असण्याचे कारण नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

पुस्तक परीचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणते. पण इतका आवडला की, अजून अधिक वाचायला मिळाला असता तर अशी चुटपुट लागून राहीली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

<<पण लवकरच त्याची नवी आवृत्ती येईल असं ऐकिवात आहे.>> काय बातमी दिलीये हो. याबद्दल तुम्हाला तुमच्या आवडती फ्रेंच वाईन घेण्यासाठी रुपये १००/- चे गिफ्ट कूपॉन (हॅ: एवढ्यात काय होणार म्हणू नका. एरवी आम्ही दहा रुपयाच्या कूपॉनवर फुटवतो लोकांना, तुम्हाला म्हणून शंभर) देण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हॅ: एवढ्यात काय होणार म्हणू नका. एरवी आम्ही दहा रुपयाच्या कूपॉनवर फुटवतो लोकांना, तुम्हाला म्हणून शंभर) देण्यात येत आहे.

हाहाहा सॉलिड Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबद्दल तुम्हाला तुमच्या आवडती फ्रेंच वाईन घेण्यासाठी रुपये १००/- चे गिफ्ट कूपॉन

महागुरुंची आवडती स्टाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कुठंशी उपलब्ध आहे मुक्तसुनीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

फेसबुकावर एकांनी टाकलेलं पाहिलं. वितरित झालं आहे का नाही माहिती नाही. भारतात असलात तर चौकशी करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वर टाकलेला फोटो मीच काढलेला आहे. पुस्तक तयार आहे पण बहुधा दुकानात पोचायला एखाद दुसरा आठवडा जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणेश मतकरी