अॅडम आणि इव्ह
लेखक - अवलक्षणी
ईव्ह म्हणाली अॅडमला,
"हे तळं किती छान आहे नाही? चल, मस्तपैकी पोहू या तळ्यात."
"मला ना, सारखा स्विमसूट काढा-घालायचा कंटाळा आलाय." अॅडम आळोखेपिळोखे देत म्हणाला.
"मग असंच पोहू. स्विमसूट न घालता."
"बरी आहेस! झाडावरची माकडं बघतील तर काय म्हणतील? एरवी ठीक आहे, पण पोहताना अंगात काहीतरी पाहिजे ना?”
--------------------------------------------------------------------------------------
ईव्ह म्हणाली अॅडमला,
"असं रे काय? तू एकटा त्या टेकडीवर जातोस. मला मात्र कधी नेत नाहीस. पलीकडे काय आहे, ते मला बघायचं आहे."
ईव्ह हट्टाला पेटली, म्हणून अॅडमनं तिला एकदा टेकडीवर नेलं.
शिखरावर पोचल्यावर पलीकडचं दरीतलं द्दश्य पाहून ईव्ह दचकून मागं झाली आणि म्हणाली, "चावट कुठला! तरीच तू रोज इकडे येतोस, आंबट-शौकीन लेकाचा! "
खाली दरीत पायघोळ झग्यानं पूर्ण अंग झाकलेल्या कितीतरी स्त्रिया फिरत होत्या.
--------------------------------------------------------------------------------------
"अरे, ते पान कमरेखाली 'त्या' जागी का लावलंस?" ईव्हनं कुतूहलापोटी अॅडमला विचारलं.
"का म्हणजे? रोगजंतूंपासून संरक्षण म्हणून. साथ पसरलीय ना जंगलात." अॅडमनं खुलासा केला.
"अरे वेड्या, तोंडाला लाव ते." ईव्ह अॅडमचा कान पकडत म्हणाली, "बावळट कुठला! स्वाईन फ्ल्यूचे जंतू नाकातोंडातून शरीरात जातात."
--------------------------------------------------------------------------------------
तळ्याकाठी उभ्या असलेल्या अॅडमला ईव्हनं म्हटलं,
"तू होमो आहेस का रे?"
"कशावरून म्हणतेस तू हे?" अॅडमनं रागावून विचारलं.
"कशावरून म्हणजे? मला काय कळत नाही काय? बघावं तेव्हा त्या तळ्यातल्या पुरुषाकडे टक लावून पाहत असतोस."
--------------------------------------------------------------------------------------
अॅडम फळं घेऊन गुहेत शिरला आणि ईव्हला म्हणाला,
"हे काय, अशी नग्न काय बसल्येस? वल्कलं कुठे गेली तुझी?"
"अरे, झालं काय, की दोन हरणं शिरली अचानक गुहेत. बिचारी भुकेली होती."
--------------------------------------------------------------------------------------
"चल नाचू या दोघं." अॅडमच्या हातात हात घालून ईव्ह म्हणाली.
"एकत्र नको. आधी तू नाच. मग मी नाचतो." ईव्हनं पुढं केलेला हात झिडकारत अॅडम म्हणाला.
"का रे? एकत्र नाचलो तर काय होईल?"
"अगं, प्रेक्षक नकोत का कुणी समोर?”
--------------------------------------------------------------------------------------
"अरे, या शिळेवर हे काय लिहून ठेवलंस?" दोन्ही हातांनी शिळा उचलत ईव्ह म्हणाली.
"मी कथा लिहिलीय. कथेच्या नायकाचं नाव वात्सायन आहे. वाचून बघ, कशी वाटते ती."
"नको रे बाबा", शिळा जमिनीवर ठेवत ईव्ह म्हणाली, "तुला माहित्ये ना, मला सायन्स फिक्शन वगैरे वाचायला अजिबात आवडत नाही."
--------------------------------------------------------------------------------------
"अगं, मला आज कॅब्रे डान्स बघावासा वाटतोय. तुला येतो ना कॅब्रे करता?" अॅडमनं विचारलं.
"येतो."
"मग कर ना!“
"अरे पण, एवढी घाई कसली? आधी कपड्यांचा तर शोध लागू दे."
--------------------------------------------------------------------------------------
"मला घटस्फोट घ्यायचाय." अॅडम गंभीर मुद्रेनं म्हणाला.
"का पण?"
"माझं मन दुसरीवर जडलंय."
"हात वेड्या! त्या दिवशी तुला पाण्यात दिसलं, ते माझंच प्रतिबिंब होतं." ईव्ह जोरजोरात हसायला लागली.
--------------------------------------------------------------------------------------
ईव्ह तळ्यात जलक्रीडा करण्यात मग्न होती. अर्थात विवस्त्र.
अॅडम निरागस, निर्विकार बालकासारखा काठावर उभा होता. पण का कुणास ठाऊक, त्यात त्याला काही मजा वाटेना. मध्येच त्याला काय सणक आली कोण जाणे, तो तिथून नाहीसा झाला आणि ईव्हला पोहताना एका झुडुपाच्या आडून चोरून पाहू लागला.
बघता बघता त्याच्या मनात कामेच्छा निर्माण झाली.
तळ्यात उतरून तो ईव्हच्या अंगाशी झटू लागला.
--------------------------------------------------------------------------------------
एकदा ईव्हला वाटेत नारळाच्या झाडाची झावळी मिळाली. तिनं ती कमरेला गुंडाळली.
अॅडमसमोर तशा अवस्थेत उभी राहून ती म्हणाली, "अॅड, बघ ना, कशी दिसते मी या सी-थ्रूमध्ये?"
"एकदम सेक्सी." अॅडम डोळे विस्फारत म्हणाला.
ईव्हनं झावळी अंगापासून दूर केली नि म्हणाली, "आणि आता? आता कशी दिसते रे मी?"
"एकदम काकूबाई." अॅडम म्हणाला.
--------------------------------------------------------------------------------------
भर दुपारी एका झुडपाशेजारी अॅडमनं ईव्हला कवटाळलं. तिला गवतावर निजवायचा प्रयत्न तो करू लागला.
"अरे, हे काय, आपल्याला पाहील ना कोणीतरी." ईव्ह त्याला दूर सारत म्हणाली.
"अगं, आहे कोण इथं बघायला... आसपास एकदेखील प्राणी नाही." अॅडम म्हणाला.
"काहीतरीच काय बोलतोस? ही मुंग्यांची भली मोठी रांग दिसत नाही तुला? आणि त्या झाडाच्या बुंध्यापाशी बघ, केवढे कृमी-कीटक जमा झालेत फुकटचा तमाशा पाहायला."
--------------------------------------------------------------------------------------
"मी अगदी बोअर झालोय." अॅडम जांभई देत म्हणाला.
"एवढा कशानं बोअर झालायस?" ईव्हनं विचारलं.
"अगं, ही तीच तीच झाडं, तेच तेच प्राणी आणि तुझं तेच तेच शरीर. हे सर्व रोजच्या रोज बघून बोअर झालोय मी."
"मग काय, आता मी नाचू म्हणतोस तुझ्यासमोर?" ईव्ह त्याच्यासमोर हात नाचवत म्हणाली.
"अशी किती वेळ नाचशील?"
"डार्लिंग, तू म्हणशील तितका वेळ नाचेन. तुझ्या करमणुकीसाठी त्या टीव्हीचा शोध लागेपर्यंत नाचेन."
--------------------------------------------------------------------------------------
अॅडम ईव्हच्या शरीराकडे टक लावून पाहत म्हणाला,
"तुझ्यापेक्षा माझ्यापाशी अक्कल जास्त आहे हे तुला मान्य करावं लागेल."
"तू अक्कल म्हणतोस होय त्या अवयवाला?"
"मग, तू काय म्हणतेस?" ईव्हची हनुवटी चिमटीत पकडत अॅडम म्हणाला.
"मी इगो म्हणते त्याला आणि तुझा इगो मी क्षणात उतरवू शकते हे ठाऊक आहे ना तुला?"
--------------------------------------------------------------------------------------
अंजिराचं पान चण्याच्या पुडीसारखं वाकवून अॅडमनं त्याचा कंडोम बनवला आणि ईव्हला दाखवला.
"हे काय नवीन?" त्याच्या आकाराकडे बघत ईव्ह म्हणाली.
"कळेलच तुला. अगं, त्या आकाशातल्या बापाचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य या एवढ्याशा पानात आहे. बायबलची स्टोरी इथंच संपवायला भाग पाडणार आहे मी त्याला."
--------------------------------------------------------------------------------------
अॅडमच्या पाठीवर नखांचे ओरखडे बघून ईव्ह म्हणाली, "खरं सांग अडू, कोण भेटली तुला जंगलात?"
"कोणी नाही."
"मग हे ओरखडे कसले पाठीवर?"
"अगं, तुझी शप्पथ, कोणी नाही. एक सिंहीण भेटली होती वाटेत. तिच्याशी थोडीशी झटापट झाली."
"अस्सं! झटापट?", डोळे मोठाले करत ईव्ह म्हणाली, "ती सिंहीण, आणि मी शेळी काय? थोडीशी झटापट काय?"
--------------------------------------------------------------------------------------
अॅडमनं एक छानशी ब्रेसियर बनवली, वेली आणि पानांची, आणि दिली ईव्हला.
ईव्ह हातातल्या त्या वस्तूकडे बराच वेळ पाहतच राहिली.
"अगं, बघत काय बसल्येस? घालून बघ तरी."
"अशी कशी घालू? तू आधी पाठ कर ना माझ्याकडे." ईव्ह लाजत म्हणाली.
--------------------------------------------------------------------------------------
ईव्हनं सफरचंद तोंडाजवळ नेलं, तसा अॅडम ओरडला,
"अगं, नको खाऊस ते."
"पण का?" ईव्हनं विचारलं.
"अगं, वल्कलांचा खर्च झेपणार आहे का आपल्याला? घरात मी एकटा कर्ता पुरुष."
--------------------------------------------------------------------------------------
अॅडम एका दगडावर दुसऱ्या एका अणकुचीदार दगडानं काहीतरी खरडत बसला होता. ईव्ह मागून आली.
अॅडमनं खरडणं थांबवलं, तसं ईव्हनं आपल्या हातातल्या चपट्या दगडानं अॅडमच्या दगडावर ’ठोक्’ केलं.
"हे तू काय केलंस?" अॅडमनं विचारलं.
"काय केलं म्हणजे? तुझ्या मेसेजला लाइक केलं." ईव्ह म्हणाली.
--------------------------------------------------------------------------------------
रात्री ईव्हनं फुलांची शय्या तयार केली आणि अॅडमला हाक मारली.
"ही काय थेरं? अगं, पहिली रात्र थोडीच आहे ही आपली?" अॅडम तो सारा पसारा पाहून म्हणाला.
"हो आहे. आपण कंबरेला ते अंजिराचं पान लावायला सुरवात केल्यानंतर पहिलीच." असं म्हणून ईव्हनं अॅडमला जवळ घेऊन त्याच्या कंबरेच्या पानाला हात घातला.
--------------------------------------------------------------------------------------
"हे असं उघडं-नागडं फिरणं मला बाई अश्लील वाटतं." ईव्ह अॅडमला म्हणाली.
"अगं, आता हे काय नवीन काढलंस? तुला ठाऊक आहे ना, अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत असते." अॅडमनं तिला समजावलं.
"तरीच! तुझ्या डोळ्यांत सदानकदा मला माझं नग्न शरीर दिसतं."
--------------------------------------------------------------------------------------
अॅडम आणि ईव्ह मजल दरमजल करत उत्तर ध्रुवावर येऊन पोहोचले.
त्या बर्फाळ प्रदेशात पोहोचून ते आडवे झाले, तेव्हा सूर्यास्त झाला होता. सहा महिन्यांचा दिवस मावळून उत्तर ध्रुवावरची रात्र सुरू झाली होती.
सकाळी ईव्ह उठली, तेव्हा ती सहा महिन्यांची गरोदर होती.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
_/\_
_/\_ :-D
अगंगंगं.
काय अब्यास काय अब्यास. _/\_
असेच म्हणतो. साष्टांग!!!!
असेच म्हणतो.
साष्टांग!!!! _/\_
-----/\------
-------/\---------
पुढची कथा अत्युच्च वाटली :-
"अगं, मला आज कॅब्रे डान्स बघावासा वाटतोय. तुला येतो ना कॅब्रे करता?" अॅडमनं विचारलं.
"येतो."
"मग कर ना!“
"अरे पण, एवढी घाई कसली? आधी कपड्यांचा तर शोध लागू दे."
.
.
कपडे असल्याशिवाय कपडे काढण्याचं कौतुक नाही.
परत एकदा तुलना. स्वारी,
परत एकदा तुलना. स्वारी, स्वारी! मला शिरवाडकरांची 'कल्पनेच्या तीरावर' आठवली. लैंगिकतांचे (आणि इतर अनेक सामाजिक 'सत्यां'चे) संदर्भ स्थलकालाला किती चिकटलेले असतात, ते दाखवणारी ती गोष्ट नि:संशय या वात्रटिकेहून मोठी आहे. पण या वात्रटिकेत त्याच दृष्टिकोनाचे पडसाद उमटलेले दिसतायत, हेही आहेच.
भारी आहे!
"अस्सं! झटापट?", डोळे मोठाले
=)) मस्त!!!
____________
सर्वच चुटकुले अप्रतिम आहेत. नारळाच्या झावळ्यांचा चुटकुला सुं-द-र!!! अवलक्षणी, कसं सुचतं तुम्हाला इतकं मिश्किल लिहायला?
____________
वाचताना, प्रचंड मजा आली.
______________
चित्रदेखील क्युट्च!!!
मस्त!!!
:D
मस्त!!!
मस्त !
लेख मस्तच आहे. खट्याळसुद्धा आणि अंतर्मुख करणारासुद्धा.
असाच हात नेहमी दाखवत र्हावा म्हणजे असंच अवलक्षण होत राहील.
कळावे आपला
- एक अवलक्षणी कार्टा.
किमान शब्दांत कमाल आशय. मज्जा
किमान शब्दांत कमाल आशय. मज्जा आली. चित्रसुद्धा मजकुराइतकंच डँबिस आहे.
डँबीस! याकरता मार्मिक
डँबीस!
=))
याकरता मार्मिक देण्यात आलेली आहे. चैन करा लेको!
आमचाही बारीक हात
---------------------------------
अॅ डम दुपारी यथेच्छ आर्किओप्टेरेक्स की असल्याच कुठल्या पक्षाचे ताजे भाजलेले मांस भरपेट खाऊन 'आलोच जरा फेरी मारून' म्हणून बाहेर गेला होता. उन्हे उतरतीला आली तरीही गुहेत परतला नाही हे नुकत्याच तळेविहारावरून आलेल्या ईव्हच्या ध्यानी आले. तिने थोडावेळ वाट पाहिली आणि तिला अजिबात करमेना.(गुहा खायला उठली वगैरे). ती मग स्वत:च अॅडमच्या शोधार्थ बाहेर निघाली.
बराच वेळ शोधाशोध केल्यावर एका पश्चिममुखी सुनसान गुहेत तिला हालचाल दिसली. निदान जाता जाता संध्याकाळच्या जेवणाची तरी बेगमी होईल या आशेने ती आत आली. अंगावर मावळतीची किरणे झेलत अॅडम एकाग्रचित्ताने कुठूनतरी उचललेला कोळसा घेऊन दगडी भिंतीवर काहीतरी काढत होता. ईव्हने भिंत काळजीपूर्वक पाहिली. ती अनेक चित्रं,आकृत्यांनी आधीच भरली होती.
ईव्ह: तू दुपारपासून ही इतकी चित्रे काढलीस ?
अॅडम : छे! पूर्वी नियांडरथळ लोकांनी बरंच काहीतरी काढलंय. हा म्हणजे मोठाच सांस्कृतिक विदा आहे. ही बघ त्यांच्यातली मादी. भलतीच रोडावली दिसतेय नाही.
ईव्ह: मग तू काय काढतोयस?
अॅडम : अगं मी त्यांची विडंबने करतोय.
ईव्ह: भलताच आहेस! चल, मीच काहीतरी चित्र काढते. दे तो लाकडाचा अर्धा जळलेला तुकडा.
ईव्हने हाती कोळसा घेतला आणि ती काहीतरी काढू लागली. ती चित्र काढत असता अॅडम तिला पाठीमागून निरखत होता. इतके दिवस आपण हिला इतके लक्ष देऊन पाहिलेच नाही हे त्याच्या लक्षात आले. आर्किओप्टेरेक्स की असलेच कुठले पक्षी खा खाऊन ईव्ह इथून तिथून फुगली होती. तिचे दंड मॅमूथच्या पिलांच्या पायांगत झाले होते. पाठीमागून दिसणारे तिचे सुटलेले पोट अगदी खोचलेल्या मृगजिनासारखे लटकत होते. कोहळ्यांसारखी तिचे दांडगे नितंब आणि तिचे एकंदर धूड पाहता तिचा त्यांच्या गुहेतला बसायचा दगड इतक्या लवकर गुळगुळीत का झाला असावा याचा उलगडा झाला. उत्क्रांतिला आलेली असली पसरट फळे पाहून त्याला निराश वाटू लागले.
इतक्यात ईव्ह बाजुला झाली.
ईव्ह : "हे बघ माझे चित्र. करून दाखव पाहू याचे विडंबन!"
.
.
हे चित्र पाहताच अॅडम पेटून उठला आणि गुहेत मावळत्या सूर्याच्या साक्षीने तिच्याशी झटू लागला.
सर्वच चुटकुल्यांना एक प्लेझंट
प्रकाटाआ
सर्वच चुटकुल्यांना एक प्लेझंट
सर्वच चुटकुल्यांना एक प्लेझंट लैंगिक अंडरटोन आहे. म्हणून तशा प्रकारची मत्सर या विषयावरची -
ईव्ह रुसुन अॅडमला म्हणाली, "खरं सांग अॅडम, तुझ्या उरलेल्या २३ बरगड्यांपासून इतर टवळ्या मेल्या बनल्या असतीलच की नाही?"
यावर अॅडम सवयीप्रमाणे, धूर्तपणे, इव्हला जवळ घेत म्हणाला "होय ग, पण तूच माझी लाडकी राणी."
यावर भोळी , त्याच्यावर चटकन विश्वास टाकणारी इव्ह सुखावली. अन डँबीस अॅडॅम परत मोकाट सुटलेल्या वळूसारखा उंडारायला मोकळा झाला :P
(No subject)
=))
आवडते पेंटींग
"लाज(shame)" ही भावना प्रभावी रीतीने दाखविणारे हे अॅडम-इव्ह चे पेंटींग - "The Expulsion from the Garden of Eden"
स्त्रोत - http://en.wikipedia.org/wiki/Expulsion_from_the_Garden_of_Eden
विषयाला अनुरुप असल्याने इथे देत आहे.
बहुदा हेच चित्र आमच्या
बहुदा हेच चित्र आमच्या आठवी-नववीच्या चित्रकलेच्या पुस्तकात होतं. अॅडम-ईव्हची गोष्ट माहीत नसताना, लैंगिकतेच्या कोणत्याच विचारांबद्दल काहीही स्पष्टता नसताना हे चित्र पाहिल्यानंतर जे काही 'स्कँड्यूलस' गॉसिप केलं होतं ते आठवून आता आणखीनच गंमत वाटली. वरचे सगळे किस्से आणखीनच आवडले.
!!!
आयला! ही ईव्ह??? रामारामारामा!
काय पाह्यलंन हिच्यात, रे देवा, त्या ॲडमनं, तुलाच ठाऊक. बाकीच्या सटव्या सगळ्या काय मेल्या होत्या काय? दुसरी बरी कोणी भेटली नाही काय ह्याला? हीच शेवटची शिल्लक राहिली होती काय जगात?
तरीच आता असा शेण खाल्ल्यासारखे तोंड करून कपाळाला हात लावून बसलाय! अरे, गाढवा, पण हा विचार आधी सुचायला नको होता काय? तेव्हा कोठे चरायला गेली होती तुझी अक्कल?
(की, मजबूरी का नाम हव्वा बिन्त बरगडी? उपप्रश्न: आदमला हात नव्हते काय? की, बरगडीबरोबरच तेही कामी आले?)
बाकी, ते 'दफ़ा हो जा मेरी नज़रों से| खानदान की इज़्ज़त मिट्टी में मिला दी!'-छाप हावभाव करणारे पात्र तेवढे छान रेखाटलेय.
मुळात ऐडम आणि ईव्ह यांना
मुळात ऐडम आणि ईव्ह यांना बेंब्या कशा असतील? चित्र चुकीचंय.
ओहोहो!!! जिओ.
ओहोहो!!! जिओ.
मार्मिक
🎯
हीही
देवाला पण बेंबी असणार नक्की. कारण ऍडम देवाने स्वतःच्या प्रतिमेतून (स्वतःसारखा) केला होता. मग उगाच इव्हला का ऑड गॅल आउट सोडा ? म्हणून बेंबी टाकली असेल.
.
'ईव्ह ॲडमवर बेंबीच्या देठापासून किंचाळली' असे विधान पुढेमागे करता येण्याची सोय, एवढ्याच कारणास्तव ती बेंबी तेथे पेरण्यात आलेली आहे. काय समजलेत?
आणखी एक निरीक्षण...
सफरचंद खाण्याअगोदर ॲडम आणि ईव्ह संपूर्ण विवस्त्रावस्थेत राहात होते. आणि त्याचे त्यांना काही वाटत नव्हते. कारण तोपर्यंत त्यांना 'ज्ञान' प्राप्त झाले नव्हते. बरोबर?
किंबहुना, ॲज़ द ष्टोरी गोज़, सफरचंद खाल्ल्यानंतर त्यांना 'ज्ञान' प्राप्त होऊन लज्जा उत्पन्न झाली, नि ते अंजीरपाने लावू लागले. ती अंजीरपाने देवाने पाहिली, म्हणूनच चोरी पकडली गेली, नि त्यांची हकालपट्टी झाली. इथवर ठीक.
आता, त्या "दफ़ा हो जा मेरी नज़रों से! खानदान की इज़्ज़त मिट्टी में मिला दी|" म्हणणाऱ्या पात्राकडे नीट पाहा. अगदी नखशिखान्त नाही (म्हणजे, बुरखाबिरखा घातलेला नाही), तरी मुंडक्याच्या खालपासून अगदी पायघोळ कपडे आहेत. कोठे कातडे दिसायला म्हणून फारसा वाव नाही. आहे की नाही?
बहुधा, सफरचंदांचे टोपले पुढ्यात ठेवून मनसोक्त खादाडी झालेली दिसतेय!
मार्मिक. (आणि वर एक विनोदी.)
मार्मिक. (आणि वर एक विनोदी.)
ठीक. पुढचा प्रश्न.
देव स्वत: कपडे घालीत होता काय?
हाहाहा. स्फरचंदांची मनसोक्त
हाहाहा. स्फरचंदांची मनसोक्त खादाडी =)) =))
प्रतिप्रश्न
कुत्र्यांतील१/माणसांतील नरांना जर स्तनाग्रे असू शकतात, तर ॲडम आणि ईव्हना बेंब्या का असू नयेत?
देवानेच त्या तेथे बसविल्या, प्रोटोटाइप म्हणून. अहो, पक्का तो! त्यास नेमके ठाऊक, की पुढे ही मंडळी सफरचंदे खाणार, नि गडबड करणार, म्हणून!
----------
१ आय ष्ट्याण्ड करेक्टेड, बरे का!
'द हाइट ऑफ अमूकतमूक' सीरीज़: आणखी एक एंट्री
द हाइट ऑफ कल्पनेची भरारी: ॲडमला आईवरून शिवी.
भन्नाट्च आहे.
भन्नाट्च आहे.
भारी
असेच म्हणते...
काय अब्यास काय अब्यास. _/\_
आठवण
आज हा धागा आठवला.