यत्र यत्र बात्रा तत्र तत्र हनी सिंग!

यत्र यत्र बात्रा तत्र तत्र हनी सिंग!

लेखक - श्रीरंजन आवटे

ज्येष्ठ मवाळ संस्कृतिक्रांतिकारक दीनानाथ बात्रा यांच्या घरी तरुण जहाल संस्कृतिक्रांतिकारक हनी सिंग गेले. त्या दोघांच्या भेटीदरम्यान काय झाले याची उत्सुकता तमाम भारतीयांना लागून राहिल्याचे समजते, पण ‘अच्छे दिन’ कव्हर करण्यात बिझी असणा-या माध्यमांनी बात्रा-सिंग यांच्यामध्ये झालेल्या ’बायलॅटरल ऍग्रीमेंट’विषयी काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्यात घडलेला संवाद तपशीलवार सांगणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

पहिल्यांदा बॅकग्राउन्डची पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. झालं असं, हनी सिंगची गाणी कोकिळेच्या आवाजापेक्षाही कर्णमधुर असतात, त्या गाण्यांमुळे डायबेटीसचा धोका संभवत असल्याचे ’शिक्षा बचाव आंदोलन समिती’चे प्रमुख दीनानाथ बात्रा यांना वाटले. सवयीप्रमाणे त्यांनी तशी तक्रार केली उच्च न्यायालयात. मग ’यो यो हनी सिंग’ चिडला; पण म्हणाला, ’आजोबांना आपण पटवू या. मॅनेज करू म्हाता-याला.’

संध्याकाळच्या वेळेस हनी सिंग बात्रांच्या घरी गेला. दरवाजा उघडताच बात्रांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडं पाहिलं. हनी सिंगचा इगो गळून पडला.

शेवटी स्वतःला इन्ट्रॉड्युस करावं म्हणून तो म्हणाला, “मी यो यो.”

सचिन तेंडुलकर नामक खेळाडूचे नाव ऐकल्यानंतर मारिया शारापोआच्या चेह-यावर उमटलेले भाव सन्माननीय दीनानाथ बात्रा यांच्या चेह-यावर तरळले; पण त्यांना काही कळेना. बात्रा म्हणाले, “तू जा जा.”

“ऐसा क्या करते हो दादाजी? मैं हनी सिंग. गाने गाता हूं.”

“ठीक. क्या काम था?”

“मुझे आपसे कुछ बात करनी थी,” हनी सिंग सभ्यपणे म्हणाला. (हनी सिंग सभ्यपणेच म्हणाला.)

“मुझे कुछ नही है बोलना,” असं म्हणून बात्रांनी दरवाजा बंद केला.

नाराज झालेला हनी सिंग परत जाणार होता; पण शेवटचा ट्राय म्हणून त्यानं पुन्हा बेल वाजवली. दीनानाथांनी दरवाजा उघडला. ते ऐकेचनात हे बघून हनी सिंग चिडला.

तो म्हणाला, “आता माझी सटकली… मला राग येतोय.” दीनानाथांना अर्थ समजला नाही, पण त्यातली भावगर्भता पाहून त्यांनी त्याला आत बोलावलं.

“आईये... बैठिये.”

हनी सिंग ऍटिट्यूडमध्ये सोफ्यावर बसला.

“क्या लेंगे आप?” असं दीनानाथ बात्रांनी त्याला विचारलं. पण तो काय उत्तर देईल या भीतीपोटी ते पुढं म्हणाले, “क्या है ना हनी बेटा, हमारे यहां कोई शराब नही लेता. तो वोडका तो है नही. और चार चार बोतल रोज का तो पॉसिबलही नही है. चाय लोगे?”

“ठीक है. कोई बात नही.” हनी बेटा म्हणाला.

बात्रांनी त्यांच्या धर्मपत्नीला ऑर्डर केली आणि हनीला म्हणाले, “हनी..”

हनी इकडं तिकडं पाहू लागला.

“मैं आपसे कह रहा हूं बेटा.”

“ओह, सॉरी. मुझे लगा आप अपनी बीवी को कह रहे हो ’हनी…’!”

“अरे बेटा, ऐसे संस्कार नही है मेरे घर के.” बात्रा रागातच म्हणाले.

हनीनं मान डोलावली.

हनी शांत बसलेला पाहून बात्रा म्हणाले, “कैसा है ना बेटा, शराब चीज बहुत बुरी होती है. और चार बोतल रोज-रोजका ये अच्छी बात नही है बेटा. तुम समझ रहे हो ना मै क्या कह रहा हूं?”

“हां दादाजी. ओ तो सिर्फ गाने में था… मैं इतना...”

हनीला मध्येच तोडत बात्रा म्हणाले, “और ओ लडकियां... उनको कपडे दे दो. ऐसा अच्छा लगता… नही ना… हमारी हिंदू संस्कृती में क्या कहा है...”

“दादाजी गरीब घर की है वो…” हनीनं त्रासलेल्या चेह-यानं सांगायला सुरुवात केली. “लेकिन आपको प्रॉब्लेम क्या है मेरे गाने से?”

हे बोलत असताना अचानक ’ओम भुर्र भुर्वस्वः’ असा भयानक गायत्री मंत्र सुरू झाला.

“ये आप का गाना है?” हनी सिंगने निर्विकार, निरागस चेहरा करत विचारलं.

“बेटा, ये मंत्र है” बात्रा चिडत म्हणाले.

“ओह सॉरी! गाने को मंत्र बोलते है आपके यहां, ये मुझे पता नही था.” हनीने लगेच बात्रांची माफी मागितली.

“क्या है ना लेकिन, बीटस स्लो है इसकी..” हनीनं खंत व्यक्त केली. “दादाजी, ये ऐसा होना चाहिये - ’ओम भुर्र भुर्वत्सा…’” तर्जनी-अंगठा-करंगळी यांचा कौशल्यपूर्ण वापर करत मानेला लचके देत तो पुढं म्हणाला, “’तत्सवितुर विरेन्न्न्म - हे मेनु प्यार ना…’”

“बस करो ये गुस्ताखी! ये संस्कृती के साथ खिलवाड है..” बात्रांचा राग अनावर झाला.

“यही पसंद नही है मुझे. इसलिये मैने केस दर्ज की...”

बात्रांचं वाक्य संपेस्तोवर हनी एक गुडघा टेकवून बात्रांच्या पायाजवळ आला आणि म्हणाला, “ऐसा ना बोलो दादाजी, आज मेरा बर्थडे है...”

बात्रांनी त्याच्याकडं दयाभावानं पाहिलं.

हनीनं त्याच्या बॅगमधून केक काढला आणि तो केक कापणार इतक्यात चहा घेऊन सौ. बात्रा आल्या.

“इन्हे मत दिजीये. बहुत मीठा खाते है ये.” सौ. बात्रा हनीला म्हणाल्या.

“खामोश...” बात्रा परत भडकले.

“बर्थडे को केक कांटते हो? ये भी कोई तरीका है अपना बर्थडे सेलिब्रेट करने का?”

हनी घाबरला.

“आप मत खाइये. आंटी और मैं खाते हैं...” हनी केविलवाणा चेहरा करत म्हणाला.

“मूरख बेटे, आज बर्थडे है, तो गाय को खिलाओ. गाय हमारी माता है.” बात्रांच्या घराबाहेर असलेल्या गोठ्याकडं त्यांनी हात केला.

“अच्छा अच्छा!” हनी गुणी बालकासारखं म्हणाला.

“कुछ बालबच्चे है तुम्हारे?” बात्रांनी हनीला विचारलं.

“जी नही.”

“तो गाय की पूजा करो. बच्चे हो जायेंगे.”

“लेकिन मैंने शादी नही की है..” हनीनं प्रामाणिकपणे सांगितलं.

“शादी नही की तो क्या हुआ? पहले तुम गाय की पूजा करो. मैं कहता हूं बच्चे हो जायेंगे, तो हो जायेंगे...”

बिच्चारा हनी! केककडं आशाळभूत नजरेनं पाहत तो गोठ्यात गेला. गायीची पूजा करून आला.

“अब मैं केक खाऊ?” हनीनं विचारलं.

“बेटा, दूध पी...”

आता मात्र हनी चिडला. “मैं क्या दूधपीता बच्चा हूं?”

“अरे बेटा, ये पाश्चात्य संस्कृती हमारे लिये अच्छी नही है, बेटा. हम हिंदुस्तानी है.” बात्रांनी नेहमीचा प्रवचन मोड ऑन केला. “तुम्हे पता है आज जो विज्ञान तंत्रज्ञान ने क्रांती की है, वो तो हमने महाभारत के जमाने मे की है… देखो बेटा, अब तुम ये जो ऍपल का आयफोन इस्तमाल करते हो, इसका शोध हमने लगाया है. तुम्हे तो पता होगा, पांडव और कौरव ऍपल खाते थे. पांडव जो ऍपल खाते थे, ओ अच्छे किस्म का था. इसी ऍपल के आयफोन लॅपटॉप निर्माण किये गये…”

हनी सिंग चक्कर येऊन पडलाच असता. इतक्यात त्याला आतून त्याच्याच गाण्याचा आवाज आला, ’पार्टी ऑल नाइट... पार्टी ऑल नाइट…’

बात्रांचा नातू आत टीव्ही पाहत होता. तो हॉलमध्ये आला नि हनी सिंगला पाहून आनंदून गेला.
’पार्टी ऑन माय माइंड…’

हनी उठला आणि बात्रांच्या नातवासोबत ’पार्टी यूंही चलेगी’ म्हणू लागला तेव्हा सौम्य-सोज्ज्वळ-शांत-संयत बात्रांचा संयम सुटला आणि ते कडाडले-

“बंद करो ये बकवास!”

हनीला वाटलं, बात्रा स्वागत करत आहेत. म्हणून तो ‘पार्टी यूंही चलेगी’ असं म्हणत नाचू लागला.

“अभी यहां से निकलो.” बात्रांची सटकली. “गेट आउट!”

चुकून आपण हिंदीऐवजी इंग्रजी बोलल्याचा त्यांना खेद वाटला; पण ते मनातच ठेवून हनीला बाहेर काढण्यासाठी ते झाडू घ्यायला गेले.

एकूणच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्याने हनीने एकदम सज्जन मुलासारखा गरीब दीनवाणा चेहरा केला. हनी शाहरु्खसारखी नौटंकी करत एक गुडघा जमिनीवर टेकवून दीनानाथ बात्रांना म्हणाला, “दादाजी, गुस्सा मत करो. मैंने आप के उपर एक कविता लिखी है.”

कविता म्हटल्यावर बात्रा हरखले; पण हनीच्या चेह-याकडे पाहून त्यांना शंका आली. “तुम और कविता?”

“मतलब मेरे एक फ्रेंड की है.” हनी प्रामाणिकपणे म्हणाला.

“ठीक है, सुनाओ.” बात्रा म्हणाले.

हनी उठून उभा राहिला आणि प्रार्थनेला उभा असल्याप्रमाणे हात जोडून उभा राहिला. त्याचे ते पोश्चर पाहूनच दीनानाथ बात्रा खूश झाले.

हनी कविता गाऊ लागला -

“हे इतिहासकार बात्रा, हे ज्ञानदेव बात्रा
मैं भक्त हूँ तुम्हारा, बाँचो मेरा भी पत्रा

पुरखे हो तुम हमारे, तुम ज्ञान पर हो वारे
तुमने हमें बताया, इतिहास इक नया रे

बकरी को अपने साथ महमूद लेकर आया
मुर्गी को भी उसी ने गज़नी से था मंगाया

आर्य, गंगा व गाय तीनों, हैं मूल बस यहाँ के
बाकी सभी हैं आये याँ, न जाने कहाँ-कहाँ से

दुनिया ने विमान देखो भारत से ही है पाया
ईसा से भी तो पहले मोटर कार था बनाया

संस्कृत को हम जो भूले, ये सब भी हमसे रूठे
इंग्लिश को अब भुलाकर इनको ही अब है जपना

तुमने बताया सागर, हम तो समझे थे कतरा
हे ज्ञानदेव बात्रा, बना दो मेरा भी जत्रा
दसों उंगलियाँ हो घी में, कोई रहें न खतरा...”

“बस. बस भी करो अब!” बात्रांचा त्रस्त चेहरा पाहून हनीही थांबला.

“ये तो दुसरे किसी की कविता गा रहे हो. तुम खुद तो अश्लील गीत बनाते रहते हो. हमारे सांस्कृतिक राष्ट्र के चरित्र के लिये ये अच्छा नही है.”

हनीच्या क्रिएटिव्हिटीलाच आव्हान दिलं गेल्यानं तो दुखावला गेला. तो गहनगंभीर विचारात बुडाला. छताकडं पाहत म्हणाला, “दादाजी, अब मैं आप के लिये अच्छा गाना बनाता हूं.”

“अच्छा गाना और तुम?” बात्रांच्या अविश्वासानं दुखावला गेलेला हनी त्यांची आर्जवं करत म्हणाला, “आप मुझ पर भरोसा किजिये बात्राजी. मैं अभी आप के लिये गाना बनाता हूं. क्या है, जो भी पुराना है, वो सब कुछ बुरा नही है. मैं नया और पुराना मिक्स कर के गाना बोल देता हूं...”

हनी कोणतीतरी चाल गुणगुणत एकदम उभा राहिला-

“सर, सुनिये...

चार बोतल वोडका, शुभंकरोति कल्याणम
काम मेरा रोजका, आरोग्यम धनसंपदा
ना मुझको कोई रोके, शत्रुबुद्धी विनाशाय
ना किसी ने रोका, दीपज्योती नमोस्तुते...”

बात्रा उभा राहिले.

त्यांच्या डोळ्यांत पाहताच हनीला गहिवरून आलं. बात्रांनी हनीला ’जादू की झप्पी’ दिली आणि त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत म्हणाले, “बस कर पगले, अब रुलायेगा क्या?”

( सदर ओळी मसउद अख्तर यांच्या आहेत )

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.2
Your rating: None Average: 2.2 (5 votes)

प्रतिक्रिया

बात्रा आणि हनी सिंग यांना भेटवण्याची कल्पना आवडली. सुरूवातही झकास आहे, पण पुढे ती लय राखता आलेली नाही असं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थॅन्क्स फॉर हॉनेस्ट रिप्लाय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्पना जितकी मोहक आहे, तितकं हसू नाही आलं. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अदिती आणि मेघनाशी सहमत.
खरंतर या लेखाऐवजी तुम्ही 'रामभाऊ विसरलेंची मुलाखत' दिवाळी अंकासाठी पाठवायची होती. ती भारीय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक संमिश्र टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत.
रामभाऊ विसरलेंचा लेख नंतर लिहिला होता.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Are Honey Sing Kuthe neun thewlay "Baatraa" mazhya...?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0