स्ट्रेट फ्रॉम द हार्ट .

कुठलीही चळवळ एका विशिष्ट हेतु च्या प्रचारासाठी अन्य्याया चा विरोध करण्यासाठी सुरु होत असते. समलैंगिक चळवळ ही समलैंगिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काम करते. समलैंगिक हे ही इतरांसारखेच सामान्य आहेत त्यांना त्यांची लैंगिकता जोपासण्याचा हक्क आहे. आदि महत्वपुर्ण अशा हक्कासाठी ही चळवळ काम करते. माझा या चळवळीला विरोध नाही. त्यांच्या हक्कांची व स्वातंत्र्याची मी कदर करतो. मात्र मला या चळवळीने जे सध्या एक नकारात्मक वळण घेतलेले आहे त्याविषयी आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्यातही काही दोष आहेत त्या विषयी आता इथे माझे म्हणणे मांडायचे आहे. या चळवळीतल्या लोकांची एक नकारात्मक बाजु देखील आहे. ज्याची चिकीत्सा करणे आवश्यक बनलेले आहे.

सध्या एक वातावरण असे झालेले आहे की तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्हाला तुमची राष्ट्रनिष्टा सतत सिद्ध करावी लागते. जर ब्राह्मण असाल तर तुम्हाला दलितांच्या वेदना कळुच शकत नाहीत. तसेच जर तुम्ही स्ट्रेट असाल तर गे चळवळी विरोधात तुम्ही अगदी साधा जरी मुद्दा मांडु लागलात तर तुम्ही प्रतिगामी आहात असा शिक्का तात्काळ मारला जातो. हे अतिशय चुकीचे आहे. यातील समलैंगिंकांचा जो एक आक्रमक असा वर्ग आहे व तो ज्या पद्धतीने कार्य करत आहे ते अतिशय चुकीचे व अन्यायकारक असे आहे. या विरोधात कुणीच बोलायला धजत नाही म्हणुन समलैंगिकांचे गैरसमज वाढत च चालले आहेत. म्हणुन मी समलैंगिकते विरोधात माझे म्हणणे मांडत आहे.

समलैंगिक चळवळीची सुरुवात अगोदर अतिशय संयत संयमी रीतीने सुरु झाली. यातील लोक अगोदर सभ्य रीतीने आपला मुद्दा मांडत असत. सिव्हीलाइज्ड रीतीने आंदोलने, मिरवणुका आदि माध्यमातुन आपले विचार मांडत असत. पोलिसांना फ़ुल देणे आदि सकारात्मक रीतीने आंदोलन होत होते. असे सध्याही होते. मात्र हळुहळु यात एक बदल होतांना दिसत आहे. समलौंगिकांची पहीली लज्जा बुजरा स्वभाव जाउन त्याची जागा उद्दामपणाने घेतलेली दिसत आहे. आता ते अधिकाधिक उद्दामतेने वागु लागलेले दिसताहेत. याला अनेक कारणे आहेत. यातील महत्वाचे कारण म्हणजे समाजाने दाखविलेली आंधळी सहानुभुती. आंधळी अशासाठी की आपण जर समलैंगिकतेला विरोध केला तर आपली गणती ही प्रतिगामी मागास लोकांत होइल या भितीने वा अगोदर मनात असलेल्या गिल्ट ने की आपण या लोकांना फ़ार वाइट वागवलेले आहे. गिल्ट व रेकग्निशन च्या प्रेरणेतुन ( पुरोगामीत्वाच्या रेकग्निशन साठी) दिलेली सहानुभुती ही लंगडी च असते. कारण त्यात चिकीत्से चा अभाव व प्रत्येक च बाबतीत वाजवा रे वाजवा जे काय करताय ते चांगलच आहे व तुमच्यासारखे तुम्हीच ही भावना असते. मात्र हे कौतुक दिर्घ काळ टीकत नाही.

या बाबतीत दलित साहीत्य व त्याला उच्चवर्णीयांनी दिलेला प्रतिसाद याची तुलना करणे चुकीचे ठरणार नाही. दलित साहीत्याचे आगमन झाले तेव्हा त्याला असाच चिकीत्साशुन्य प्रतिसाद तेव्हाच्या उच्चवर्णीय लेखकांनी दिला होता. त्यात पु.ल. देशपांडे सर्वात आघाडीवर होते आला दलित लेखक की दे प्रस्तावना सर्व च लेखनाच डोळे झाकुन कौतुक टीकेचा अवाक्षर ही नाही अगदीच चिकीत्साशुन्य समीक्षा का ? तर प्रचंड गिल्ट आपल्या पुर्वजांनी केलेली पाप फ़ेडायची तर मग पाठींबा दिलाच पाहीजे ही भावना. मग सर्वच खटकणारया बाबींकडे दुर्लक्ष करायच. मग त्यांच्या मागे मागे बाकी समाज. याला समंजस चिकीत्सक ब्रेक लावला तो नरहर कुरुंदकर यांनी भजन व तेंडुलकरांनी कन्यादान या नाटकाने. कुरुंदकर या निर्भीड साक्षेपी विचारवंताने दलितांना त्यांच्या चुकीच्या दिशेने जात असलेल्या चळवळीची तिच्या मर्यांदांची चुकांची जाणीव करुन दिली. कन्यादान नाटकाने तेंडुलकरांनी दलित युवकांच्या मनात असलेल्या द्वेषाला नकारात्मक बाजुला उघड करुन दाखविले. व त्यानंतर नामदेव ढसाळ जे अगोदर घाशीराम कोतवाल या नाटकासाठी तेंडुलकरांच्या पुरोगामित्वाचे कौतुक करत होते. तेच ढसाळ तेंडुलकरांनी आपले घाशीराम चे पाप धुण्यासाठी तेंडुलकरांनी आता कन्यादान नाटक केलेले आहे असा दांभिक आरोप करत. पुढे जाउन दलित साहीत्याच्या मर्यादा काळाने स्पष्ट केल्या.पण दलित लेखकांनी इतक्या टोकाच्या अहंकार बाळगला की जे उच्चवर्णिय सुरुवातीला सहानुभुतीने त्याकडे वळले होते त्यांनी ही अखेर कंटाळुन त्याकडे पाठ फ़िरवली. कारण कोण ऐकुन घेइल हो. एक तर पुर्वजांनी केलेल्या पापाचा तिच्या वंशजाशी काय संबंध वर सारख सारख तुम्हाला आमची भाषा आमचे दु:ख कळुच शकत नाही. बर कॊणी संवेदनशीलतेने संवाद साधु पाहतोय प्रामाणिक प्रयत्न करतोय तर तुमची आम्हाला समजुन घेण्याची क्षमता तर नाहीच शिवाय समीक्षा करण्याची देखील लायकी नाही आम्ही आमचीच समीक्षापद्दती निर्माण करु आम्ही आमचेच समीक्षक विकसीत करु,मग याचा परीणाम जो व्हायचा तोच होणार. स्वत:च्याच व्यासपीठांवर स्वत:च्याच मर्यादित वर्तुळात ते साहीत्य फ़िरु लागले. मग पॆंथर चळवळ आली, राजा ढाले काय करणार तर सत्यकथे ची होळी करणार. का ? कारण त्याला पर्यायी साहीत्य निर्माण करण्याची क्षमता नाही म्हणुन ?

तर अगदी याच मार्गावर याच रीतीने आता समलैंगिक चळवळ चाललेली आहे. करण जोहर चे च उदाहरण पहा. आपला मुद्दा पोहोचावा यासाठी त्याने अगोदर विनोदाचा कुशल वापर केला व समलैंगिकता ही कन्सेप्ट दोस्ताना या चित्रपटाच्या माध्यमातुन हसत खेळत लाइटली का होइना हळुच मागील दाराने कुशलतेने पोहोचवली. आता त्याच्यात च झालेला बदल बघा काही काळानंतर तो बॉम्बे टॉकीज चित्रपट बनवतो. त्यातुन एक अत्यंत उग्र असा उद्दाम असा समलैंगिक कथानायक दाखवितो. ज्याच एकमेव क्वालिफ़ीकेशन तो समलैंगिक आहे हेच . त्याला मन मानेल तस तो वागतो अत्यंत तुछ्चतेने सभोवतालच्या लोकांशी च नव्हे तर स्वत:च्या कुंटुंबियांशी वर्तन करतो. कारण तो गे आहे त्याला सर्व समाज दांभिक वाटतो. त्याला प्रत्येक ठीकाणी ओरडुन आक्रस्ताळेपणाने मी गे आहे मी गे आहे असे ओरडण्याची अटेन्शन सीकींग ची सवय लागलीय. त्याच्या विचारसरणीला पुष्टी देइल असा दुसरा गे त्याच्या आयुष्यात येतो. हा दुसरा गे अतिशय भ्याड दांभिक असा आहे. स्वत: सुशिक्षीत सुस्थित असुनही तो एकटा अविवाहीत वा उघड गे म्हणुन राहण्याचे सर्व पर्याय नाकारुन एका खोट्या विवाह बंधनात त्याने स्वत:ला अडकवुन घेतलेल आहे. व त्यामुळे राणी मुखर्जी या त्याच्या पत्नीला तो लैंगिक तुप्ती देण्यात कमी पडतो. आहे. इथे अतिशय सुंदर निरागस असलेली राणी गोंधळात स्व-संशयाच्या चक्रात या भ्याड समलैंगिकामुळे अडकलेली आहे. तिचा विवाह फ़सलेला आहे. यातील हा उद्द्दाम तरुण मुलगा मग त्याला जबरदस्तीने त्याच्या कोशातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तो भर रस्त्यात कुठे ही कसा ही बेताल उद्दाम वागतो. राणीला तिच्या भावनांची कुठलीही कदर न करता अतिशय क्रुरतेने तिचा नवरा गे आहे हे वास्तव तिच्यापुढे उघड करतो. वास्तविक ती त्याच्या इतकीच परीस्थीतीची बळी आहे. तो अधिक संवेदनशीलतेने तिचे दु:ख समजुन घेउ शकतो. मात्र तो तसे करत नाही. कारण करण जोहर हा समलैंगिक एक मेसेज एक विशीष्ट अशी मानसिकता जी अनेक समलैंगिकांची बनलेली आहे उद्दाम असंवेदनशील ती त्या पात्राद्वारे व्यक्त करतो. अतिशय विचारपुर्वक मेसेज देण्यासाठी बनविलेला चित्रपट समलैंगिकांची जहाल पणा कडे होत असलेली वाटचाल दाखवतो. करण जोहर नेमका हाच मेसेज या चित्रपटाद्वारे देउ पाहतो. की आम्हाला पर्वा नाही तुमची तुमच्या समाजाची आम्हाला काय वाटेल त्या रीतीने आम्ही वागु तुम्हाला पटत नसेल तर दोष तुमच्यातच आहे. हा उद्दाम नायक व त्याची वर्तणुक ही काल्पनिक नसुन प्रत्यक्षातील समलैंगिकांची झलक मात्र आहे. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो तर या आरशात समलैंगिकांच्या वास्तव जीवनातील उद्दामता स्पष्ट दिसुन येत आहे. नव्हे ती मिरवलेली आहे. अमिताभ ने जंजीर नंतर एक प्रचंड मोठा प्रभाव त्या काळातील तरूणाई वर टाकलेला होता. तसाच परीणाम गे कम्युनिटी वर या चित्रपटाने टाकलेला आहे. मात्र हा अटीट्युड वाईट आहे.

समलैंगिकांमध्ये पुर्वी व्यक्त होण्यापासुनच लज्जा होती आता मात्र त्या लज्जेची जागा विचीत्र उद्दामतेने घेतलेली आहे. अगोदरचा इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स तसाच आहे मात्र आता त्यात एक अरोगन्स ऑफ़ इनफ़ेरीअरीटी कॉम्प्लेक्स दिसु लागलेला आहे. यामागे एक विशीष्ट शिकवण फ़ार महत्वाची भुमिका बजावते. जे लोक गे चळवळीला विरोध करतात तीच खर म्हणजे आतुन गे असतात व त्यांचा हा कडवा विरोध हा वास्तविक त्यांचा डिफ़ेन्स मेकॆनिझम असतो ही शिकवण ही अत्यंत घातक अशी शिकवण आहे. जी सातत्याने या चळवळीत मांडली जाते. हीचा पगडा असलेला समलैंगिक समाजातील इतर स्ट्रेट व्यक्तीकडे याच नजरेने बघत असतो. व स्ट्रेट ने जर समलैंगिकाच्या आग्रही लैंगिक मागणी ला विरोध केला (तर हा त्या स्ट्रेट माणसाचा डिफ़ेन्स मेकॆनिझम च आहे ही घटट समजुत गोड गैरसमज असलेला) गे हा त्याच्या अधिकाधिक मागे लागुन त्याला जबरदस्तीने तु गे च आहेस तु स्वत:ला फ़सवतोय आदि म्हणुन ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत असतो.. आणि विशेष म्हणजे अशा समलैंगिकाला आपण दुसरयाच्या लैंगिक हक्कावर स्ट्रेट असण्याच्या चॉइस वर गदा आणतोय असे वाटतच नाही. या फ़ोर्स करण्याचे प्रमाण समलैंगिकां कडुन वाढत आहे.

कोणी स्पष्ट बोलत नाही मात्र सार्वजनिक मुत्र्यांमध्ये असा अनुभव नेहमीच येत असतो. कोणी ना कोणी गे सारखा तिथे घुटमळत असलेला आढळतो. बाजुला कोणी स्ट्रेट व्यक्ती असेल तर अशा माणसाला किळस येइल अशा प्रकारचे हातवारे, इशारे, स्पर्श व लगट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. जसा एक मुलगा जर एका मुलीची लैंगिक छेड अश्लिल इशारे आदि करुन काढत असेल तर तो तिचा विनयभंग मानला जातो. एखादा गे आहे व त्याला जबरदस्तीने एखाद्या स्ट्रेट ने छेडणे हे ही विनयभंग च आहे. त्याच प्रमाणे जो माणुस स्ट्रेट आहे त्याला गे कडुन होणारा आक्रमक लौंगिक छळ हा त्या स्ट्रेट व्यक्तीचा झालेला विनयभंग च असतो. यात भेदभाव का केला जावा. विनय ही जर नैसर्गिक भावना आहे तर ती मुली साठी वेगळी मुला साठी वेगळी गे साठी वेगळी अशी कशी असु शकेल. गे व्यक्तीसारखीच स्ट्रेट व्यक्तीला देखील या जबरदस्तीची किळस च वाटत असते. मात्र एखादी मुलीची छेड काढणारा मवाली जो असतो त्याला कीमान मनात गिल्ट तरी असते. मात्र ज्या गे ला चळवळीतुन समलैंगिकाला व त्याच्या मागणी ला विरोध करणारे स्ट्रेट हे गे च असतात व अधिक कडवा विरोध करणारे तर अधिक च निश्चीत गे असतात अशी शिकवण सातत्याने मिळत असते. त्यांच्या मनात तर काडीचादेखील गिल्ट नसतो. उलटपक्षी या स्ट्रेट मधला लपलेला गे बाहेर काढण्याचे सत्कार्य च आपण करत आहो अशी भावना असते. यामागे कमिंग आउट चे झालेले भव्य स्वागत ही कारणीभुत आहे. मी बाहेर आलो या धाडसाचे जे अफ़ाट कौतुक केले जाते. उदा. बिग बॉस मध्ये सलमान खान सुशांत या समलैंगिकाची ज़ोळख करुन देतांना त्याच्या थोर कार्याचा परीचय करुन देण्याच्या थाटात हा कसा करेजियसली कमिंग आउट झाला हे सांगतो.( विशेष बाब म्हणजे अशांनी बाकी कुठल्या क्षेत्रात काय योगदान दिले काय शिक्षण/ कर्तुत्व आहे आदि बाबी अगदीच गौण मानल्या जातात )

याचा परीणाम असा होतो की आपण बाहेर येतोय याचाच एक ग्रेटनेस अहंकार या लोकांमध्ये एका बाजुस बळावतो व (गे चे विरोधक हेच गे आहेत या अतिविचीत्र बेसलेस शिकवणूकीमुळे) दुसरया बाजुने मी या स्ट्रेट मधला गे बाहेर काढतो. हा उद्दामपणा सुरु होतो. या बिगबॉस मध्ये ही बघा हा सुशांत नाव असलेला गे सारख सारख त्याच्या वागणुकीतुन मी गे आहे मी गे आहे याचे जमेल तितके भांडवल करुन घेतांना दिसतो. सारखा आपल्या वागणुकीतुन अटेन्शन सीकींग करण्याचा प्रयत्न करणे, मुद्दाम भडक अशी कृती केस आदि करुन ही गे ची अजुन एक खासियत बनत चाललेली आहे.

मला स्वत:ला असे काही अतिशय वाईट अनुभव समलैंगिकांचे आलेले आहेत. मात्र तरीही मी ते जनरलाइज न करता अजुन ही सर्वच गे असे असतात वा चळवळीतले सर्वच लोक असे आहेत असे मानत नाही , मी जी काळजी व्यक्त करतोय ती अशांचे प्रमाण वाढत असलेल्या बाबतीची. गे चळवळतील लोक आत्मपरीक्षण स्वत:च्या दोष वा इतिहासात ही गे च्या बाजुने ही काही अन्न्याय कधी झालेला आहे का या अर्थाने कधीच करतांना दिसत नाही. हे तर त्यांच्या गावी ही नसत. त्यांची एकांगी च विचार करण्याची पध्दत रुढ होत चालली आहे असे दिसते. इतरांनी दाखवलेले मंथनासाठी देखील न स्वीकारणे, आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य अशी भुमिका घेणे नित्याचे झालेले आहे.
.( एक किस्सा या बाबतीत आठवतोय तो इथे रेलेव्हंट आहे. कार्ल पॉपर हा महान तत्वज एकदा विटगेस्टाइन या दुसरया तत्वज्ञाला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा कार्ल ने काही फ़िलॉसॉफ़ीक प्रॊब्लेम्स संदर्भात आपली आरग्युमेंट्स विटगेन्स्टाइन समोर मांडली तेव्हा विटगेनस्टाइन ने ती कुठलाही तार्केक प्रतिवाद न करता ती सर्व मुद्दलातच बाद ठरविली. ही आठवण सांगतांना कार्ल म्हणतो Popper recalled that Wittgenstein “ had been nervously playing with poker.” Which he used “ like a conductor’s baton to emphasize his assertions” and when a question came up about the status of ethics wittgeinsin challenged him to give an example of moral rule. “ I replied: “ Not to threaten visiting lecturers with pokers “. Whereupon Wittgenstein in a rage , threw the poker down and stormed out of the room, banging door behind him,” यातील विटगेनस्टान चे समलैंगिक असणे हा एक रोचक योगायोग च म्हणायला हवा असो)

याची गे ने केलेल्या समलैंगिकांच्या हरॅसमेंट ची फ़ारशी वाच्यता कुणी करत नाही कारण ती गोष्ट स्ट्रेट व्यक्तीला अनेकदा कीळसवाणी व टाळावीशी वाटते. काही दिवसांपुर्वीचे सोनु निगम ची केस या संदर्भात बघावी. झा नावाच्या एका प्रतिथयश समलैंगिक पत्रकाराने सोनु निगम चा अतोनात मानसिक छळ केला. शेवटी कंटाळुन सोनु ने पत्रकार परीषद घेउन आपली व्यथा मांडली. सोनु स्प्ष्ट म्हणतो की तो गे चळवळीच्या विरोधात नाही मात्र तो स्वत: स्ट्रेट आहे त्याला तशा संबधात अजिबात रस नाही. हे सर्व झा ला समजावुन ही झा ने त्याचा पिछा सोडला नाही. सोनु ने स्पष्ट विरोध केल्यावर तर समलैंगिक झा ची मजल इतकी वाढली की त्याने सोनु विरोधात स्वत:ची पत्रकारीतेची पोजिशन वापरुन सोनु विरोधात चिखलफ़ेक करायला सुरुवात केली त्याय्चा करीयरला अपाय होइल असे बदनामीकारक लिखाण हीन पातळीवर जाउन सुड भावनेने केले. झा मधील आक्रमक पणा ही केस हे प्रातिनीधीक आहे. अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्याची वाच्यता करुन स्वत:वर शिंतोडे उडवुन घेण्याची कोणाची इछ्चा नसते. त्यामुळे या समलैंगिकांच आणखी च फ़ावत. आपल्याला विरोध करणारे प्रतिगामी मानले जातील हे माहीत असल्याने व आपण जे करतोय ते किळस मुळे हे लोक उघड करणार नाहीत .यामुळे मग यांचा आक्रमकपणा वाढत जातो. हिंदीत एक म्हण आहे नंगे से खुदा डरे ! तिचा अर्थ समलैंगिकांना सर्वात जास्त कळलेला आहे. या म्हणी मागील भितीचा ते कुशलतेने वापर करतात. सोनु निगमचे समोर आलेले उदाहरण अत्यंत बोलके आहे. व हे समोर आले म्हणुन कळले इतकेच. सोनु त जे धाडस आहे ते क्वचितच कोणी दाखवितो. म्हणुन ही काळी बाजु समोरच येत नाही. जे येत ते एकतर्फ़ि चित्रण ज्यात गे वर काय अन्याय झाला त्याचीच बाजु येते,

गे इतरांच शोषण करु शकतो गे इतरांना आपल्या स्थानाचा पॉवरचा उपयोग करुन एक्सप्लॉइट करु शकतो या बाजुने कोणी बोलण तर फ़ार दुरची गोष्ट विचार देखील करुन बघायला तयार नाही. व अनेकांच्या मनात संताप असतो त्याला वाट करुन देत नाही असेही असते.

भारतीय फ़ॅशन उद्योगात अनेक प्रख्यात डीझायनर रोहीत बाल सारखे व बॉलिवुड मध्ये अनेक गे प्रोड्युसर करण जोहर सारखे आहेत. या दोन्ही क्षेत्रात पडद्यामागे अनेक युवा स्ट्रगलर्स चे प्रचंड मोठ्या प्रमाणात समलैंगिक शोषण होत आहे. या विषयी च्या कास्टींग काउच च्या अनेक टीव्ही वरील चर्चेच्या कार्यक्रमात इंडस्ट्रीतल्याच लोकांनी ही बाब अनेकदा मान्य केलेली आहे. एका कार्यक्रमात करण जोहर ने गंमत करत असल्याचा आव आणत बॆण्ड बाजा बाराती चा नायक असलेल्या हिरोला प्रश्न केला की यशराज मध्ये असा प्रकार तुला आढळला का ( समलैंगिक शोषणाचा अनुभव ) त्याने जेव्हा इनोसंटली यशराज मध्ये तर नाही मात्र मला असे काही अनुभव बॉलिवुड च्या काही समलैंगिक प्रोड्युसर कडुन आले आहेत त्याविषयी सांगावयास सुरुवात केली. त्याबरोबर करण ने अरे मी तर गमतीने विचारत होतो म्हणुन कुशलतेन विषय टाळुन दिला कारण तो त्याच्या भाउबंदाना अडचणीत आणु शकणारे कटु सत्य मांडु लागला होता म्हणुन.

समलैंगिकाने एखाद्याअ स्ट्रेट माणसाकडुन ( माहीतीच्या अभावात) प्रेमाची मागणी करण्यात काही गैर नाही विशेष ही नाही मात्र एकदा स्ट्रेट कडुन नकार आल्यानंतर तो त्याने पचवायलाही शिकले पाहीजे. समलैंगिक चळवळीत गे लोक पोलिसांचे कौन्स्लींग करतात की त्यांनी गे ना कसे ट्रीट केले पाहीजे. पत्रकारांचे करतात की त्यांनी गे संदर्भातील विषय कसे हाताळले पाहीजेत. मला वाटत सर्वात जास्त गरज गे लोकांच्याच काउन्सेलिंगची आहे ती अशी की स्ट्रेट माणुस कसा ओळखावा ? त्याच्या लैंगिकतेचा सम्मान कसा करावा? आपल समलैंगिकत्व हे त्यांच्यावर थोपण स्ट्रेट लोकांचा विरोध हा त्यांचा डिफ़ेन्स मेकॆनिझम नसुन त्यांचि व्यक्तीगत निवड आहे. याच भान ठेवण या संदर्भात गे च कौन्सेलींग होण आवश्यक आहे. तसेच आपल्या आग्रही मागणीने स्ट्रेट व्यक्त्ती ला कीळस वाटु शकत त्याचा ही विनयभंग होउ शकतो याच ही कौन्सेलींग करण गरजेच आहे. पण ज्यांना आपले दु:ख च खरे आपल्या वेदना च खरया असे च वाटते. त्यांना काय कळेल कितपत कळेल सांगण कठीण आहे.

एक स्ट्रेट व्यक्ती म्हणुन सर्व समलैंगिकांना मला सांगावस वाटत की आमच्या डोक्यावरील आमचे केस हे नैसर्गिक खरेखुरे आहेत त्याला विग समजुन उपटण्याचा प्रयत्न करु नये आम्हाला ही त्याचा त्रास होत असतो. तसेच आमचा चेहरा हा खरा आहे त्याला मुखवटा समजुन ओरबाडण्याचा प्रयत्न करु नये आम्हास वेदना होतात.

गे व्यक्तींनी देखील आपल्या सत्तास्थानाचा अनेकदा दुरुपयोग केलेला आहे. गे व्यक्तींनी स्ट्रेट लोकांच शोषण केलेल आहे. अनेक शक्तीशाली सधन समलैंगिक नवाबांनी राजांनी आपल्या समलैंगिक वासनापुर्तीसाठी अनेक निरागस आयुष्यांना चिरडलेल आहे. प्रत्येक गे हा अन्यायग्रस्त च असतो असे नाही सुसंक्रुत असतो असेल च असे ही नाही. सर्वात महत्वाच म्हणजे गे असण हेच जणु काय क्वालिफ़ीकेशन आहे असे जे समजल जात ते चुकीच आहे.

समलैंगिकांना आपल “वेगळ” असण हेच जणु काही” विशेष” आहे अस वाटु लागलय.

गे चळवळीने आपल्यातील वाढत चाललेल्या उद्दामपणा ला असंस्कुत पणा वर चिंतन करणे आपल्यातील दोषांची चिकीत्सा करणे अत्यंत आवश्य्क आहे. गे चळवळीने जे विघातक वळण घेतलेल आहे ते समाजासाठी घातक आहे.

खालील अरुण कोलटकरांच्या कवितेतील समलैंगिक बलात्कार भोगणारया कोवळ्या मुलाची प्रातिनीधीक वेदना समलैंगिकांनी समजावुन घेणे अगत्याचे आहे.
- हो गया ?
- हो गया.
मी मेणाचा भावला
चिकणा हिजडा
भादरलेला
दरबारी हजामानं
हिरेजडीत वस्तरा उघडताच
मी काखा वर केलेल्या
मांड्या फ़ासटलेल्या
पोटावर सुगंधी साबण फ़ेसाळताच
माझा श्वास मंद झालेला
रंगमहालात मी उताणा उखाणा
पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम
बदामी होणारा सलामत
नसत्या झुंबराला
पेटवतो
माझा दुबारा सलाम
मी कुशीला वळेन
तेव्हा माझी विकतची पाठ
ओलावेल गुलाबपाण्यानं
आणि माझ्यावर अंधार पडेल
सुरकुतलेल्या राजाप्रमाणं
लटलटत.
मेणाचा मृत्युंजय भावला
उच्चारेल मृत्याचा राजलंड
बोबडा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (8 votes)

लेखाची मांडणी काहीशी आक्रस्ताळी वाटली. लेखामागचं गृहितक असं आहे - 'लोक समलैंगिकतेच्या चळवळीला पाठिंबा देतात, कारण तसा दिला नाही तर आपण पुरोगामी ठरणार नाही याची भीती वाटते'. अनेक सज्जन, सुजाण लोकांच्या बुद्धिमत्तेचा यातून अपमान होतो आहे असं वाटत नाही का? माझ्या मते लोक पाठिंबा देतात याचं कारण त्यांना मनापासून पटलेलं असतं की 'इतके दिवस जे अन्याय झाले ते योग्य नव्हेत. आता परिस्थिती बदलायला हवी.' माझ्या मते असा मानवतावादी विचार अनेक जण करतात, त्यांना भित्रट म्हणणं योग्य नाही.

आणि अन्यायांची उदाहरणं खूप आहेत. इतिहासात समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सजा-ए-मौत किंवा इतर शिक्षा असणं सर्रास होतं. भारतात आजही गुन्हा आहे. अनेक देशांमध्ये मृत्यूदंड आहे.

An early law against sexual intercourse between men is recorded in Leviticus by the Hebrew people, prescribing the death penalty.

During the Middle Ages, the Kingdom of France and the City of Florence also instated the death penalty. In Florence, a young boy named Giovanni di Giovanni (1350–1365?) was castrated and burned between the thighs with a red-hot iron by court order under this law.

Iran:[15] Since 1979, the government has executed more than 4,000 people charged with homosexual acts.[16]

कायद्यांपलिकडे समाजही आपल्या हातात कायदा घेऊन समलैंगिकांवर अन्याय करत आलेला आहे.

...the rate of murders of homosexuals in Brazil is particularly high, with a reported 3,196 cases over the 30-year period of 1980 to 2009 (or about 0.7 cases per 100,000 population per annum).

Violent hate crimes against LGBT people tend to be especially brutal, even compared to other hate crimes: "an intense rage is present in nearly all homicide cases involving gay male victims". It is rare for a victim to just be shot; he is more likely to be stabbed multiple times, mutilated, and strangled. "They frequently involved torture, cutting, mutilation... showing the absolute intent to rub out the human being because of his (sexual) preference".[32] In a particularly brutal case in the United States, on March 14, 2007, in Wahneta, Florida, 25-year-old Ryan Keith Skipper was found dead from 20 stab wounds and a slit throat.

अशी उदाहरणं हजारोंनी सापडतील. समलैंगिकांना अशी वागणूक दिली जाते, हे अनेकांना माहीत असतं. त्याबद्दल जी सहानुभूती वाटते तिचा असा अपमान करणं बरोबर वाटत नाही. उद्या तुम्ही म्हणाल की स्त्रियांवर अत्याचार होऊ नये म्हणणारेही पुरोगामीपणा जपण्याच्या भीतीने म्हणतात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिटलर ने लाखो ज्युं ची कत्तल केली
हिटलर ने ज्यु विरोधात अनेक अन्यायकारक कायदे केले
हिटलर ने ज्यु विरोधात खोटा वंशवादी प्रचार केला
हिटलर बर खटला दाखल झालेला असतांना त्याची सुनावणी सुरु असतांना त्याच्या विरोधातील आरोपांची शहानिशा न करता चिकीत्सेला सामोरे न जाता त्याचा प्रतिवाद न करता
त्याने काढलेल्या मुठभर चित्रांची त्यात वापरलेल्या रंगसंगतीची चर्चा त्याचे चित्रकलेतील स्थान यावर केलेली टीप्पणी
केवळ मुळ गंभीर आक्षेपां पासुन आरोपां पासुन दुर पळण्याची
त्याचा सामना करण्याची क्षमता संपल्याचे निदर्शक असते.
तुम्ही समलैंगिक करत असलेल्या स्ट्रेट व्यक्तीवरील अन्यायाच्या आरोपाबाबत कुठलीहे स्पष्टीकरण देत नाही आहात.
तुम्ही मुळ मुद्दा टाळत आहात.
त्यामुळे प्रतिवाद करण्यात अर्थ नाही
असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिकांकडून एखाद्याला समलैंगिक बनवलं जातं .. किंवा त्यावर समलैंगिकत्व लादलं जातं - हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.
चित्रपटांतील संबंध किंवा सोनू निगमची केस ही ह्याबद्दल प्रातिनिधिक वर्तणूक नक्कीच समजता येणार नाही.
तसंच एखाद्या समलैंगिकाचं वर्तन एवढं आक्रमक असतं- असा अनुभव कधीच आला नाही, त्यामु़ळे पास.
तुमच्या वैयक्तिक अनुभवातून जर तुम्हाला समलैंगिकांची आक्रमकता जाणवत असेल तर त्रागा समजू शकतो; पण निष्कर्ष पटले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिकांकडून एखाद्याला समलैंगिक बनवलं जातं .. किंवा त्यावर समलैंगिकत्व लादलं जातं - हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.

जर एखाद्या विषयाची एकच एक बाजु सतत मांडली गेली.
आपण त्या एकाच बाजु मांडल्या गेलेल्या वर्गातच वावरत असलो तर,
तर एखाद्या विषयाला दुसरी बाजु असेल असे आपल्याला स्वप्नातही वाटत नाही.
असे असतांना आपल्याला अपरीचीत सवयीचा नेहमीचा विचाराच्या विरोधी जाणारा विचार पहील्यांदा समोर आल्यावर हे पहील्यांदा च कानावर पडतय असे त्या मर्यादित एकांगि वर्तुळात फिरणारया व्यक्तीची पहीली स्वाभाविक प्रतिक्रिया असते.
ही प्रतिक्रीया त्या व्यक्तीच्या एकांगि विचाराची निदर्शक असते.
रा,स्व्,संघात बौद्धिक घेण हा जसा विनोदी प्रकार असतो.
वा एखादा ब्रेन वॉश झालेला कल्ट मेंबर जेव्हा बाहेरच्या जगाला प्रथमच सामोरा जातो तेव्हा देखील त्याची प्रतिक्रीया अशीच असते. दलित साहीत्यातील कठोर वास्तव समोर आल्यानंतर देखील अनेकांची प्रतिक्रीया अशीच होती
अरे अस ही असत आम्हाला तर माहीतच नव्हत.
जर तुम्ही समलैंगिक ते चा बहुआयामी अभ्यास नेहमीच्या वर्तुळाबाहेर जाउन केला असता तर अस पहील्यांदा च कानावर पडल नसत.
बिहार चे मुख्यमंत्री मांझी ज्या समाजाचे आहेत त्यातील अनेक लोक केवळ उंदीर खाउन जगतात. हे उघडकीस आल्यावर अनेकांकडुन ही अशीच प्रतिक्रीया आली
हे पहील्यांदाच एकतो आहे.
गे रॅगिंग हा कीती भयानक प्रकार असतो याचा तुम्हाला अनुभव नाही मला ही नाही पण आपल्या दोघांना अनुभव नाही म्हणुन तो अस्तित्वात च नाही का ?
सोनु निगम ची केस हे हिमनगाच टोक आहे. ते बाहेर आलेल आहे म्हणुन दिसल इतकच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ दादा,
गे रॅगिंग, रा.स्व संघ,ब्रेनवॉशिंग, उंदीर खाणं .. विषय काय, तुम्ही पोचला कुठे?
सगळ्यांशीच एकदम पंगा घेऊ नका- मग लोकांना प्रतिवाद करण्यातही रस उरत नाही.
@मूळ विषय- सॉरी. गे रॅगिंग हा एवढा भयानक प्रकार असल्याचं तुमचा लेख सोडून कुठूनही खरंच माहिती नाही.. माझं अज्ञान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर एखाद्या विषयाची एकच एक बाजु सतत मांडली गेली.
आपण त्या एकाच बाजु मांडल्या गेलेल्या वर्गातच वावरत असलो तर,
तर एखाद्या विषयाला दुसरी बाजु असेल असे आपल्याला स्वप्नातही वाटत नाही.

शाब्बास !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नेहमीच पडणारा खूपच बेसिक प्रश्न.

बलात्कार, विनयभंग, छेडछाड, लैंगिक छळ इत्यादि कृती या कायद्याने गुन्हा ठरतात. हे अगदी योग्य, कारण तिथे कोणावरतरी जबरदस्तीने अन्याय झालेला असतो.

पण गे किंवा लेस्बियन या संबंधांबाबत, (भले ते नैसर्गिक, अनैसर्गिक, नॉर्मल, अ‍ॅबनॉर्मल असे काही का असेनात) त्यात कायदा या घटकाचा संबंध येतोच कुठून ?

शीर्षासन करण्यावर पण कायदेशीर बंदी घाला मग. नैसर्गिक नाहीय्ये ते.

मला स्वतःला गे ही कल्पना अत्यंत अनाकर्षक वाटत असली तरी कोणालातरी समजा ती योग्य वाटते तर लेट इट बी.. पण त्यात कायद्याने कसले नाक खुपसायचे? नुकसान होते तिथेच कायद्याचा हस्तक्षेप असतो ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात साधा प्रश्न जसा स्त्रीयांना ,गे ला विनय असतो. तसा मुलभुत विनय स्ट्रेट पुरुषाला असतो की नाही? आणि कुणी त्याचा भंग केला तर स्त्री व गे प्रमाणेच त्याला इजा पोहोचते की नाही ? त्याच मानसिक नुकसान होत की नाही? मग त्याला प्रतिबंध करणारा कायदा असावा की नाही कसा असावा हा पुढचा प्रश्न झाला. माझ्या मते तुम्हाला अजुन पुरुषाला स्ट्रेट पुरुषाला विनय असतो की नाही याचा मुळात विचारच करावासा वाटत नाही. जो काय विनय आहे तो स्त्रीयांना वा गे ला च .
आता यात समलैंगिकता नैसर्गिक की अनैसर्गिक याचा कुठे संबंध येतो. मी नुकसाना विषयीच बोलतोय.
एक साध उदाहरण घ्या भारतात माझ्या मते मोठ्या प्रमाणावर जवळजवळ ५० ट्क्के बालकांचे लैंगिक शोषण होते असा सर्व्हे सांगतो. मी तर म्हणतो की तुम्हीच कीती पर्सेंट आहे ते सांगा मला मान्य आहे तुमचा आकडा
त्यातील एक फीमेल चाइल्ड चे मेल कडुन केलेले शोषण अत्याचार एक भाग
दुसरा मेल चाइल्ड चे मेल कडुन केलेले लैंगिक शोषण अत्याचार दुसरा भाग
तिन व चार ही कॉम्बीनेशन होउ शकते सध्या बाजुला ठेवा
आता मला सांगा एकुण जर भारतातील च कीमान ४० टक्के ( कमी धरतोय) बालकांचे लैंगिक शोषण होत असेल तर
त्या ४० टक्के बालकांमधले प्रमाण जर २० टक्के मुली व २० टक्के मुल असे असेल तर
२० टक्के मेल चाइल्ड चे लैंगिक शोषण करणारे पुरुष हे समलैंगिक बलात्कार करत नसतात का ?
या समलैंगिकां विरोधात काही आवाज उठवला तर त्यात काही चुकल का?
तिथे ते समलैंगिक व त्यांची जीवनशैली ही नैसर्गिक असो की अनैसर्गिक हा मुद्दाच नाहीये
तिथे ते करत असलेल लहान मुलांच अब्युज व त्यापासुन त्यांना रोखण हे महत्वाच आहे. क्र. १ ३ व ४ यांना ही रोखण तितकच गरजेच आहे. पण समलैंगिकांचा चाइल्ड अब्युज मधील सहभाग काय दर्शवितो.
भारतात इत्क्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या समलैंगिक बलात्कारा विरोधात आज पर्यंत कुठल्या समलैंगिक चळवळी कडुन एकदा तरी स्पष्टीकरण आलेले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता यात समलैंगिकता नैसर्गिक की अनैसर्गिक याचा कुठे संबंध येतो. मी नुकसाना विषयीच बोलतोय.

पण पण पण.. मी तुमच्या म्हणण्याला आणि मताला विरोध करत नाहीच आहे मुळी.. मी या निमित्ताने फक्त कायद्याचा "समलैंगिकता" अ‍ॅज सच या गोष्टीला मान्यता वा अमान्यता देण्यात काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित करतोय.

विनयभंग, अन्याय, बलात्कार वगैरे हे गुन्हे आहेत. त्यांच्या विरोधात कायदा हवाच, आणि आहेच. मग तो प्रकार समलिंगी अथवा विषमलिंगी अथवा अन्य कसल्याही प्रकारच्या संबंधात झाला तरी तो "ऑफेन्स" म्हणून गुन्हा.

केवळ समलैंगिक "असण्या"ला कायद्याने विरोध करण्याचा प्रश्नच कुठे येतो? असं माझं म्हणणं.

शॉपलिफ्टिंग ऊर्फ चोरी हा गुन्हा आहे. मग ती चोरी कोणीही केली आणि कोणत्याही प्रकारच्या दुकानात केली तरी तो गुन्हाच, त्यामधे कायद्याला लोकस स्टँडिंग आहे. पण किराणामालाचे बंदिस्त दुकान किंवा एखादे छोटे डिपार्टमेंटल शॉप किंवा मोठ्या मॉलमधेही उचलेगिरी होऊ शकते. अशावेळी उचलेगिरी हा गुन्हा असावा.
..पण (उदा.) मॉल हा विक्रीप्रकारच कायद्याने प्रतिबंधित ठेवण्याचा प्रश्नच येत नाही.

गे व्यक्ती अन्यायकारक वागत असतील तर अन्यायाला कायदा असावा.. गे असण्यानसण्याबद्दल कायदा कसा लावता येईल?

चिकन बिर्यानीत आमरस कालवून खाणे हे स्टॅटिस्टिकली "अ‍ॅबनॉर्मल" असावे. समजा मी तसे खातो.. तर यात कायदा कसा मधे येऊ शकतो ? जोपर्यंत मी इतरांना नाक दाबून ते खायला लावत नाही तोपर्यंत ?

इथे तुमचा मुद्दा मान्यच आहे.. पण सध्या कायदा जबरदस्तीविरोधात नसून बिर्याणीत आमरस मिसळून खाण्यालाच बेकायदेशीर ठरवतो आहे. हा काय प्रकार आहे? कायदा नेमका कशासाठी असतो ?

अर्थात ज्या देशात सरकारतर्फे विमानसेवा आणि फाईव्ह स्टार हॉटेल्ससारखे व्यवसायही तोट्यात जात जात चालवले जातात त्या देशात कोणाचेही नाक कशातही खुपसले जाणे साहजिकच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिकन बिर्यानीत आमरस कालवून खाणे हे स्टॅटिस्टिकली "अ‍ॅबनॉर्मल" असावे. समजा मी तसे खातो.. तर यात कायदा कसा मधे येऊ शकतो ? जोपर्यंत मी इतरांना नाक दाबून ते खायला लावत नाही तोपर्यंत ?

गे व्यक्ती अन्यायकारक वागत असतील तर अन्यायाला कायदा असावा.. गे असण्यानसण्याबद्दल कायदा कसा लावता येईल?

विनयभंग, अन्याय, बलात्कार वगैरे हे गुन्हे आहेत. त्यांच्या विरोधात कायदा हवाच, आणि आहेच. मग तो प्रकार समलिंगी अथवा विषमलिंगी अथवा अन्य कसल्याही प्रकारच्या संबंधात झाला तरी तो "ऑफेन्स" म्हणून गुन्हा.

या तुमच्या वरील विधानांशी शत प्रतिशत सहमत आहे

माझी तक्रार ही आहे की पुरुषाचा विनयभंग झाल्यास समलैंगिकांकडुन तर कुठलाही कायदा सध्यातरी अस्तित्वात नाही. मुळात पुरुषाला विनय असु शकतो व त्याचा भंग होउ शकतो.हीच गोष्ट मान्य नाही,
विनय केवळ स्त्री ला च असु शकतो इतरांना नाही असा सध्याचा भारतातील कायदा तरी सांगतो नविन सुधारणा नवा कायदा आला असल्यास माहीत नाही.
तुमचा प्रतिसाद व त्यातील उदाहरणे आवडली. वेगळा विचार मांडणारा तुमचा प्रतिसाद मला नविन दिशेने विचार करण्याची प्रेरणा देतो म्हणुन देखील आवडला
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी तक्रार ही आहे की पुरुषाचा विनयभंग झाल्यास समलैंगिकांकडुन तर कुठलाही कायदा सध्यातरी अस्तित्वात नाही. मुळात पुरुषाला विनय असु शकतो व त्याचा भंग होउ शकतो.हीच गोष्ट मान्य नाही,
विनय केवळ स्त्री ला च असु शकतो इतरांना नाही असा सध्याचा भारतातील कायदा तरी सांगतो नविन सुधारणा नवा कायदा आला असल्यास माहीत नाही.

वेळेअभावी याचर्चेत सहभाग टाळत होतो, पण तुर्तास फक्त एक पुरवणी जोडतो

हे काहीसे उलट आहे. आधी कायदा जेंडर न्यूट्रल होता.
२०१३मध्ये सरकारने/संसदेने आंदोलनामुळे घाईत बदल केलेल्या क्रिमिनिल कायद्यात बदल करताना अनेक गुन्हे (जसे सेक्स्युअल हरासमेंट, स्टॉकिंग वगैरे) फक्त एका स्त्री विरोधात पुरूषच करू शकतो असा बदल केला आहे. Sad (संदर्भ)

हा बदल दुर्दैवी आहे. असा गुन्हा हा गुन्हाच असतो

======

अर्थात असे गुन्हे घडतात म्हणून परस्परसंमतीने जोडीदार असणार्‍या समलैगिंकांना गुन्हेगार ठरवायचे तर स्त्रीवर बलात्कार होतात म्हणून परस्परसंमतीने भिन्नलिंगी संबंध असणार्‍या/ठेवणार्‍यांनाही का नाही? असा प्रश्न पुढे येईल

===
कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये देशातील बहुमताला मान्य अशा वयापासून परस्परसंमतीने ठेवलेल्या संबंधांमध्ये कायदा येऊ नये असे माझे मत मांडून खाली बसतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा बदल दुर्दैवी आहे. असा गुन्हा हा गुन्हाच असतो
मी देखील तेच म्हणत आहे गुन्हा हा गुन्हाच असतो. तो गे ने केला स्ट्रेट ने केला कींवा तृतीयपंथियाने केला तरी त्यासाठी तरतुद हवीच.
तशी तरतुद सध्याच्या कायद्यान बदलली आहे असे तुम्ही म्हणता पण कधी काळी ती होती यावर विश्वास बसणे कठीण वाटते. तरी मान्य करतो की ती होती.
आता ती बदलल्यावर अनेक गे गुन्हेगार आता कायद्याच्या कचाट्यातुन वाचु शकतील (एखाद्या गे ने एखाद्या पुरुषाचा विनय भंग केल्यावर) अशी परीस्थीती निर्माण या नव्या कायद्याने झालेली आहे हे उघड आहे.
या गे च्या बाजुने पक्षपाती फायदा होत असलेल्या कायदे संदर्भात काय म्हणाल ?
गे च्या हक्कांसाठी कायदा हवा मात्र जिथे गे ला फायदा होत आहे तेथे काय भुमिका घेते समलैंगिक चळवळ काहीच नाही
याचा विचार करण्याची चळवळीला गरजच नाही कारण अस काही होत याचा त्यांना एकतर पत्ताच नाही कींवा माहीत असुनही यावर गप्प च बसायचय कारण
गे कम्युनिटी ला हा एक बेनेफीट मिळतोय तर तो का सोडावा ?
स्ट्रेट मात्र गे चा विनयभंग करु शकत नाही ( विनयभंगातील लैंगिक भाग बेस मानला तर जिथे कायदा प्रवेश करतो तो भाग) कारण अगदी साध आहे.
स्ट्रेट हा स्ट्रेट आहे त्याला गे शी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची गरजच नसते. ( म्हणुनच तर तो स्ट्रेट आहे त्याच स्ट्रेट असण हेच त्याच्या गे पुरुषाचा विनयभंग ( लैंगिक बेस भाग मानलेला ) तो करणार नाही आणि त्याने केला तर तो स्ट्रेट या व्याख्येच्या बाहेर फेकला जातो. तो गे बनतो
या दांभिक कायद्या चा फायदा मुकपणे समलैंगिकांची चळवळ एकीकडे घेत आहे
दुसरीक्डे स्वतः च्या लैंगिक हक्कांसाठी आक्रमक पवित्रा
हा विरोधाभास ही विसंगती कीती विलक्षण आहे !
म्हणजे एकीकडे आमचे लैंगिक हक्क महत्वाचे मात्र दुसरीक्डे त्याच कायद्यातील पळवाटेने आम्हाला दुसरयांच्या लैंगिक हक्कांवर गदा आणता येत असेल तर छानच आहे
यावर समलैंगिक चळवळीचे समर्थक ( असा माझा तुमच्याविषयीचा समज गैरसमज असल्यास माफी मागतो) म्हणुन तुमच मत काय आहे ?

अर्थात असे गुन्हे घडतात म्हणून परस्परसंमतीने जोडीदार असणार्‍या समलैगिंकांना गुन्हेगार ठरवायचे तर स्त्रीवर बलात्कार होतात म्हणून परस्परसंमतीने भिन्नलिंगी संबंध असणार्‍या/ठेवणार्‍यांनाही का नाही? असा प्रश्न पुढे येईल

परस्पर संमतीने जोडीदार स्वखुशीने जे राहतात त्यात कोणी कोणावर जबरदस्ती केलेलीच नसते त्यामुळे मी ज्या विनयभंगा विषयी बोलत आहे तो अशा नात्यामध्ये संभवतच नाही
त्यामुळे असा प्रश्न पुढे येण्याचा प्रश्न च निर्माण होत नाही.

कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये देशातील बहुमताला मान्य अशा वयापासून परस्परसंमतीने ठेवलेल्या संबंधांमध्ये कायदा येऊ नये असे माझे मत मांडून खाली बसतो!
तुमच्या या अखेरच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे मात्र सध्याच्या चर्चेत हा मुद्दा तसा गैरलागु आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२०१३मध्ये सरकारने/संसदेने आंदोलनामुळे घाईत बदल केलेल्या क्रिमिनिल कायद्यात बदल करताना अनेक गुन्हे (जसे सेक्स्युअल हरासमेंट, स्टॉकिंग वगैरे) फक्त एका स्त्री विरोधात पुरूषच करू शकतो असा बदल केला आहे.

????

पुरुषाविरोधात स्त्री तक्रार करू शकते असा कायदा आहे ओ. लिहिताना असा एकदम उफराटा बदल करायचे कारण काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Very good subject.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद
सुशेगाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !