Skip to main content

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

पुस्तक परिचय - अंधार छाया

प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी आत्मनिवेदनात्मक, सत्य घटनेवर आधारित कादंबरी... कै ती दादांना व कै आईस सादर समर्पित...

ही कादंबरी रुपातील सत्यकथा आहे. याचे लिखाण हा पहिल्या गुरूचरित्र पारायणाचा प्रचिती रुपाने मिळालेला प्रसाद आहे. सन 1985 ते 2013 पर्यंतच्या दर दत्त जयंतीच्या आधीच्या आठवड्यात गुरूचरित्राचे पारायण अखंडपणे चालू राहिले आहे. ही गुरूंची कृपा आहे कि या 28 -29 वर्षांच्या काळात बदल्या, सेवा निवृत्ती यामुळे वरचे वर घरे बदलली जाणे, सीमेवरील तणावाच्या वातावरणात काश्मीर, पंजाब सारख्या अत्यंत महत्वाच्या हवाई केंद्रावर जबाबदारीची व रात्रंदिवसाच्या ड्युट्यांची वेळ सांभाळून पारायणाच्या काळात कधीही खंड पडला नाही. ही गुरू महाराजांची कृपा दृष्टी होय.

अवनी दिवाळी अंकातून 1986 मधे प्रकाशित झाल्यावर काही प्रतिक्रिया वाचायला ऐकायला मिळाल्या. काहींना वेगळ्या विषयावरील वेधक लिखाण वाटले...
आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील वाटतात असे काहींनी मत नोंदवले...
दादा हे व्यक्तिमत्व फार छाप टाकणारे आहे. अडचणीतून मार्ग शोधून, विपरीत परिस्थितीत न डगमगता धीराने वाट काढत जाणारे दादा वेळोवेऴी विविधांगाने भेटतात. कधी अध्यात्मिक विचारकाच्या बाजात तर कधी गुप्त हेराच्या मानसिकतेने घटनांचा अन्वय लावायला सरसावणाऱ्याच्या थाटात या प्रकारांची उकल करायला प्रेरित करतात....

एकांनी पत्रात म्हटले, भीषण प्रसंगी वातावरण निर्मिती प्रभावी झाली आहे...
साधारण वाचकांचे मत होते की अनेकदा पात्रांची नावे व नाते संबंध सरमिसळ झाल्याने वाचकाला गोंधळात पडायला झाले होते. उदा. कादंबरीतील पात्र काका लेखकाच्या आईच्या वडिलांचे नाव. पण व्यवहारात वडिलांच्या भावाच्या अर्थाने वापरले जाते म्हणून काही वेळा ते नक्की कोण ते कळायला जड जाते. एकाच पात्राला अनेक तऱ्हेने संबोधण्याने काहीसा गोंधळ उदा. लता, शशी मुले ज्यांना दादा म्हणतात त्यांना मंगला ह्यांना म्हणून संबोधते तर आजी त्याला जनार्दन म्हणून हाका मारतात. आत्मनिवेदन कोणाचे चालू आहे. भान न राहून असे होते खरे. यासाठी पात्रांचे अंतर्गत संबंध व नावे असा परिचय सोबत दिला आहे.
काहींचे मत पडले की गुरूचरित्राच्या पारायणाची चर्चा अनेक खाजगीत करतात. पण ही सार्वजनिक झालेली घटना श्रद्धा व चिकाटीचा प्रत्यय कसा आणतात याचे उत्तम उदाहरण आहे. काही म्हणाले, ‘ॐ नमःशिवाय या पंचाक्षरात मंत्रसामर्थ्य आहे. या नामजपाने मनोशक्ती तयार होऊन मानवेतर योनीतील प्रभावावर उपाय म्हणून उपयोग होतो, याचे धडधडीत उदाहरण म्हणून मानता येईल’. ‘नामजप म्हणजे वेळ जाण्याचा विरंगुळा नाही. जप करणे म्हणजे अमानवीय शक्तीला प्राप्त करण्याचे प्रभावी साधन किंवा शिडी आहे.’
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनेकडे बोट दाखवता येईल.

आता ईपुस्तक रुपाने ह्या लेखनाला प्रकाशनासाठी मी एकुलत्या एक कॉपीची रोज थोडी थोडी टायपिंग करून एक नवी प्रत बनवून तयार केली. त्यात हे नवे लेखकाचे मनोगत घातले आहे. काही उपलब्ध फोटोतून कथानकाशी अनुरूप त्यावेळच्या व्यक्ती, स्थळे व सध्या त्यांचे रूप ही सादर केले आहे. कादंबरीचे उपनामकरण विषय-वस्तूला समर्पक ॐ नमः शिवाय असे केले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

शशिकांत ओक Tue, 11/11/2014 - 15:46

प्रकाश जी,
आणखी काहींनी तशी फर्माईश केली तर करू सादर...

अरविंद कोल्हटकर Wed, 12/11/2014 - 02:15

ॐ नमःशिवाय या पंचाक्षरात मंत्रसामर्थ्य आहे. या नामजपाने मनोशक्ती तयार होऊन मानवेतर योनीतील प्रभावावर उपाय म्हणून उपयोग होतो, याचे धडधडीत उदाहरण म्हणून मानता येईल’. ‘नामजप म्हणजे वेळ जाण्याचा विरंगुळा नाही. जप करणे म्हणजे अमानवीय शक्तीला प्राप्त करण्याचे प्रभावी साधन किंवा शिडी आहे.’

योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनेकडे बोट दाखवता येईल.>

असे विचार येथे बहुसंख्यांना - मी धरून - न पटणारे आहेत असे मला वाटते. तरीहि तुम्हाला जो अनुभव आला असे प्रामाणिकपणे वाटते तो येथे मालिकेच्या रूपात जरूर यावा असे सुचवितो.

शशिकांत ओक Wed, 12/11/2014 - 14:16

In reply to by अरविंद कोल्हटकर

अरविंद कोल्हटकरजी व अन्य मित्रांनो,
जे लेखन आहे ते अनुभवजन्य आहे. त्यात काय म्हटलय हे इथल्या वाचकांना पटावे म्हणून उपलब्ध करायचे असेल तर उपयोग नाही कारण त्यातून वैचारिक मतभेद किंवा असहमतितून न कळत घटनांच्या सत्यतेवर प्रश्न चिन्ह लावायची चढाओढ चालू होईल. ज्यांनी त्या घटना अनुभवल्या नाहीत त्यांना त्या घटना अविश्वसनीय वाटणार. इतर कशाला, मलाही अशा घटनांची सत्यता जर त्या माझ्या अपरोक्ष झाल्या असत्या तर मान्य करायला अशक्य वाटले असते. सत्यता नेहमी आपल्याला अनाकलनीय असते असे मी प्रत्यक्ष घटनांचा साक्षी असल्याने म्हणावेसे वाटते.
तथापि कादंबरीचा आस्वाद घेतला जावा ही इच्छा आहे.

वामा१००-वाचनमा… Thu, 13/11/2014 - 01:32

In reply to by शशिकांत ओक

वैचारिक मतभेद किंवा असहमतितून न कळत घटनांच्या सत्यतेवर प्रश्न चिन्ह लावायची चढाओढ चालू होईल.

+१

प्रार्थनेचे फायदे प्रत्येकाचा व्यक्तीगत अनुभव असावा. मला तरी "भक्तीसागर" मधून किंवा नेटवरुन वाचलेल्या स्तोत्रांमुळे मानसिक आंदोलने कमी होतात व मूड स्थिरावतो व शांत वाटते.

देवीची स्तोत्रे म्हटल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या / किंवा रस्त्याच्या कडेस बहरलेल्या पानाफुलांकडे लक्ष वगैरे जाऊन कोमल सौंदर्याचा साक्षात्कार वगैरे होतो. म्हणजे मी व माझ्या शेजारचा माणूस त्याच अगदी त्या पानांकडे बघतही असेल पण मला ज्यात त्यात सौंदर्य दिसू लागते. हे विशेषतः देवीची (स्त्री शक्ती) आराधना केल्यानंतर जाणवले आहे. आता हे कसे पटवून द्यायचे की माझी सौंदर्यदृष्टी (aesthetic sense) स्तोत्रपाठाने heighten होतो, ते मला माहीत नाही :)

शशिकांत ओक Fri, 14/11/2014 - 22:57

In reply to by वामा१००-वाचनमा…

आपली मागणी कळली. असे वाटते की सर्व कादंबरी एकत्रितपणे वाचणे गरजेचे आहे. ती सोय ईसाहित्य.कॉम वरून फुकट डाऊनलोड करून सवडीने वाचणे जास्त सोईचे ठरावे.
तरीही काहींनी म्हटले तर लिचार करता येईल.