Skip to main content

हिवाळ्यातल्या संध्याकाळी स्नो वितळतांना

कविता म्हणजे
काय असावे
-प्रश्नचिन्हं नसलेला प्रश्न समजून
दुर्लक्ष करण्याजोगा प्रकार-
किंवा 'न समजू शकलेली कविता'
तर काय धागा असावा. हा प्रामाणिक
पूर्णविराम
तर शब्द असतांना
चिन्हांची काय गरज?
हा न समजलेला प्रश्न

'वरच्या दहा ओळी दुर्लक्ष करण्याजोग्या का नाहीत?' या विषयावर निबंध लिहायचा असल्यास
कवितेबद्दल विचार करतांना सूचलेले
किंवा साचलेले.

तोतया Sat, 06/12/2014 - 07:11

अर्थ किंवा सौदर्य
कालसापेक्ष अर्थ किंवा कालातीत सौंदर्य
संदर्भहीन कालसापेक्ष अर्थ किंवा इनव्हिझिबल कालातीत सौंदर्य
काळवंडलेला संदर्भहीन कालसापेक्ष अर्थ किंवा पारदर्शक इनव्हिझिबल कालातीत सौंदर्य

विकिवर फुकोबद्दल वाचतांना
सूचलेले
किंवा आठवलेले

तोतया Wed, 10/12/2014 - 08:22

भाषा हेच एक साधन आहे
पण साध्याचा अर्थ
भाषेशिवाय कसा लागू
शकतो
हे न समजणे
म्हणजे
कविता असेल काय?

स्वानंदात
स्मृती नावाच्या म्हशीवर
बसून
वाळवंटी वैष्णव भाऊ
नाचतांना
मिचमिच पहूडलेल्या डोळ्यांनी
साचवतांना अनुभव एकत्र आले तो अनुभव

तोतया Fri, 12/12/2014 - 05:21

मी डिजिटल हसतो
तेव्हा ओळख
शोधत असतो
अ‍ॅनालॉग
अविरत

तोतया Sat, 13/12/2014 - 06:38

प्रतिबिंब न्याहाळतांना
प्रकाश नेमकी कशी अस्तित्तवाची गांड मारतो
असा साक्षात्कार होऊन
ऑडियन्स हा कवितेचा विषय आहे
ही कविता त्याने लिहीण्यास घेतली.

God is a belief that it exists

तोतया Sat, 13/12/2014 - 23:23

मला जगवा
असे म्हणत
तो गुहेत शिरला
जेव्हा प्रकाश दिसला
तेव्हा आपण मृत आहोत का?
असे तो स्वतःला विचारत होता

अस्वल Sun, 14/12/2014 - 01:41

In reply to by तोतया

घुबडांच्या घूत्कारांत
प्रकाशाचे दिवे उजळले तेव्हा
अंधाराच्या शोधात निघाले होते
सूर्य आणि ८ ग्रह.
प्लूटो मात्र चेरॉनबरोबर असूनही एकटाच.

वामा१००-वाचनमा… Sun, 14/12/2014 - 04:07

In reply to by तोतया

चिवडा हादडा
असे म्हणत
तो मुदपाकखान्यात शिरला
जेव्हा लाटणं घेतलेली ढालगज भवानी दिसली
तेव्हा आपण भुकेले आहोत का?
असे तो स्वतःला विचारत होता

तोतया Mon, 15/12/2014 - 04:33

खोदणे ही एक आदीम प्रेरणा असावी
असा विचार करत तो मेंदु कुरतडू लागला
तेव्हा
त्याचे डोके दुखू लागले

अस्वल Thu, 18/12/2014 - 08:41

In reply to by तोतया

मी तुमच्या कवितांचा फ्यान आहे,
हे मला जेव्हा कळलं
तेव्हा माझ्याही कवितेला बहर आला!
असं मी लिहू शकलो असतो-
पण मी कवी नाही.

तोतया Thu, 18/12/2014 - 06:30

'संध्याकाळचा राग येणे'
'रागावण्याबाबत काही संकेत नसणे'
'कशाचाही राग येऊ शकतो'
'फक्त न कळलेल्या गोष्टींचा राग येत असेल'
'संध्याकाळ आणि पाठीवरचा अलैंगिक बलात्कार थांबल्याप्रमाणे
वाळक्या पानांसारख्या तरल दु:खी मनाने प्रवास करणार्‍या मुंग्या, त्यांच्या राणीमुंग्या
ऑफिसातुन परतणारी फेसाळ
पण मुक्त बापुडवाणी लोकजत्रा'
'न आठवणार्‍या गायी आणि सूर्यास्त'

तोतया Fri, 19/12/2014 - 06:23

एकदा श्वासांशी खेळत असतांना
पडलेला प्रश्न
माणुस
एका समाजात
साखळीत बांधलेला
लाकडाच्या मोळीसारखा शिडशिडीत
यंत्र आहे
यापेक्षा भयानक
नकविता काय असू शकेल?

तोतया Sat, 20/12/2014 - 09:44

समजा माणसाला कान नसते
तर ऐकायला येणे
या घटनेची नोंद
भौतिकात न सापडणे
ही घटना
समांतर विश्वात घडली असती काय?

तोतया Sun, 21/12/2014 - 09:06

काही मुद्दे
माणसे वेगळी आहेत
मग संवाद कसा शक्य आहे
म्हणजे संवादाचा अर्थच संघर्ष असेल तर

तर वरील शब्दांपासून अर्थापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही
काय काय
कराल

तर
गाळलेल्या जागा भरा
हा प्रश्न
मठ्ठपणा आहे (घरवापसी)
किंवा
प्रत्येक मनुष्य
एका स्वतंत्र विश्वात जगत आहे

तोतया Sun, 21/12/2014 - 09:24

म्हणजे या नसत्याच तर
वार्ताहर किंवा रात्रौ
या शब्दांचा अर्थ न समजणे
वृत्तपत्र किंवा पुस्तकं
यातले नेमके काय वाचल्यास मोक्ष मिळेल
अशा भुक्कड कल्पनांना
का?

तोतया Mon, 22/12/2014 - 05:39

मी मेटालयात तपश्चर्या करत असतांना
विवेकानंदांच्या पत्रांमधले प्रवास
आठवले

(म्हणजे विवेकानंदांच्या स्वप्नातला
भारतीय समाज फेसबुकनामक प्रलयात
अविशेष)