ऐतिहासिक व्यक्तींना भारतरत्न

बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक मदन मोहन मालवीय ह्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान दिल्याची बातमी वाचली. त्यांचे कार्य महनीय होते आणि योग्य वेळी हा सन्मान देता आला असता तर त्यात आक्षेपार्ह काहीच वाटले नसते हे प्रथम स्पष्ट करतो.

आक्षेपार्हता त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी तो सन्मान दिला जाण्याला आहे. एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर लगेचच तो सन्मान दिला गेला तर तेहि समजण्याजोगे असेल. पण १९४६ मध्ये स्वर्गवासी झालेल्या कोणाला तदनंतर ६८ वर्षांनी तो देण्यामागे काय कारण असावे अशी शंका मनामध्ये येते. त्याचे उत्तरहि सुचते - हिंदुत्व अजेंडयाचा तो भाग आहे असे वाटू शकते.

भारतरत्न सन्मान असे राजकीय संदेश प्रसारित करण्यासाठी वापरणे हा अनिष्ट पायंडा आहे. ऐतिहासिक व्यक्तींना असे सन्मान द्यायचे ठरविले तर प्राचीन काळातील अर्ध-ऐतिहासिक व्यासांपासून चन्द्रगुप्त मौर्य, अशोक, चन्द्रगुप्त विक्रमादित्य, कालिदास, ज्ञानेश्वर, शिवाजी, अशी अनेक क्षेत्रांमधील शेकडो नावे डोळ्यापुढे उभी राहतील. त्यांपैकी कोणाला वगळायचे? अशा सर्वांनाच हा सन्मान द्यायचे ठरले तर शेकडो भारतरत्न निर्माण होऊन तेहि हास्यास्पद वाटेल. आजच्या व्यक्तींनी अशा ऐतिहासिक दिग्गजांना असा सन्मान देणे हे औद्धत्यपूर्ण आणि अनुचित वाटते. ह्या व्यक्ति तशी भलावण कोणी न करताच स्वयंप्रकाशी भारतरत्न आहेत. त्यांना आजच्या लोकांनी असेल सन्मान बहाल करतांना आपली पायरी सोडू नये आणि लहान तोंडी मोठा घास घेऊ नये हेच बरे!

महात्मा गांधीना अद्यापि हा 'सन्मान' दिलेला नाही हे नशीब!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

'भारत'रत्न मौर्य किंवा शिवाजींना कसे काय?
तेव्हा भारत नावाचा एकसंध देशच नव्हता अर्थात मालवीय सुद्धा स्वतंत्र भारताचे नागरीक नव्हते हे ही खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. मरणोत्तर भारतरत्न देण्याचा खुळचटपणा बंद झाला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुरस्कार देताना राजकीय विचारधारा लक्षात घेणे हे नवे नाही. यापूर्वीही हे झाले आहे आणि यापुढेही होत राहील. अगदी नोबेल पारितोषिकदेखिल यातून सुटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा नवा सन्मान चालू करावा. भारतभूषण या नावाने. संबंधीत व्यक्ती ही भारतीय नागरीक आहे या बद्दल कौतुक व आदर व्यक्त करण्यासाठी वापरायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कल्पना चांगली आहे, पण नाव जरा अजून वेगळे लागेल. नाहीतर कोणताही अभिनेता हा पुरस्कार स्वीकारायला तयार होणार नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

समकालीन हा निकष आवडला.
तसेच आंतरजाल हे वेगळ विश्व आहे बाह्य प्रुथ्वी या ग्रहापेक्षा वेगळ प्लॅनेट आहे,
म्हणुन एक संस्थळ रत्न हा पुरस्कार सुरु करावा अशी अपेक्षा.
संस्थळश्री संस्थ़ळविभुषण हे थोडे दुय्यम दर्जाच्या योगदानासाठी चे पुरस्कार हि चालतील
यावर निवड मात्र मतदानानेच व्हावी.
शिवाय एका संस्थळरत्न च्या पुरस्कारासाठी निवड समिती हि दुसरया संस्थळाचीच असावी
म्हणजे पक्षपात होणार नाही.
आंतरजालीय सर्वसंस्थळसंचारी फुलपाखरांना वेगळा निकष लावावा,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय एका संस्थळरत्न च्या पुरस्कारासाठी निवड समिती हि दुसरया संस्थळाचीच असावी
म्हणजे पक्षपात होणार नाही.

तुम्ही तर पक्षपाताची रेशिपीच सांगू रैहले भौ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संस्थळ-रत्न ROFL काहीतरीच विनोदी वाटतय!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर आंतरजालीय संस्थळांबद्दल काही कल्पना नाही. पण सुरूवात म्हणून 'ऐसी अक्षरे'वर निदान चार-पाच जणांना एकत्र करुन 'ऐसी रत्ने' असा कॉमन पुरस्कार द्यायला हरकत नसावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ खरंच रोचक कल्पना आहे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
कोण कोण ४-५ जणं सांगा पाहू Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यासाठी मतदान घेतले पाहिजे. एक कौल चालू करा. मला वाटतं शहराजाद यांचा एक धागा होता लिंक देते शोधून त्यातल्या सर्वांना नॉमिनेट करा. इतर अधीकचे पर्याय ऐसीकर सुचवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचन्द्र बोस याना देखील मरणोत्तर सुमारे ४०/५० वर्‍षानी भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे , हे स्मरणात असावे.

अनेक जणांच्या मते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक हे या पुरस्काराचे आद्य दावेदार आहेत.

डो.व्ही व्ही गिरी आणि गुलझारीलाल नन्दा याना नक्की कोणत्या निकषान्वये भारतरत्न देण्यात आले ? फक्त तत्कालीन सत्ताधर्यांची हुजरेगिरी केली म्हणून ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

महात्मा गांधीना अद्यापि हा 'सन्मान' दिलेला नाही हे नशीब!

गांधींच नशीब निदान या बाबतीत तरी बरं म्ह्णायला हर्कत नाही. तस आमचं ही नशीब काही वाइट नाहीच अथवा खा. तेंडुलकर आणि गांधी एकच भारतरत्नांच्या पेज-३ वर बघावे लागले असते.
अर्थात इतरही आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0