भेटीगाठी?
स्वतःला अपमानास्पद वागणूक देऊन घेऊन बरेच दिवस उलटून गेल्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटला भेट द्यावी असा मी विचार केला. त्यासाठी इतर कोणती जागा पाहण्यापेक्षा मुंबईच बरी, त्यातल्यात्यात परिचयाच्या वाटणाऱ्या लोकांमध्ये असलेलं आणखी बरं या विचाराने मी भारतात येत आहे. येणारच आहे तर भेटायचं का?
१०-११ जानेवारीला 'पिफ'च्या निमित्ताने मी पुण्यात असेन. १० तारखेच्या शनिवारी भेटायचं का? वाडेश्वरला गिळायला बरं मिळतं असा पूर्वानुभव आहे.
आणि
ठाणे/मुंबईत भेटण्यासाठी २३ जानेवारीची शुक्रवार संध्याकाळ चालेल काय?
या तारखा गुर्जी उर्फ राजेश्राव घासकडवी यांचेकडून पूर्वसंमत असल्यामुळे ते सुद्धा ठराविक ठिकाणी, विवक्षित वेळी भेटण्याची शक्यता ९९.९९% पेक्षा जास्त आहे... असं आमच्या स्थानिक टीव्हीवर सांगत होते.
पुणे कट्टा:
१० जानेवारी, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाणः विष्णूजी की रसोई, एरंडवन, पुणे
सुचवणी अशी की सर्वांनी
सुचवणी अशी की सर्वांनी हिरानंदानी मेडोज येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या मोठ्या आणि ठसठशीत लँडमार्कसमोर गेटच्या बाहेर (जरा रस्ता मोकळा सोडून) थांबल्यास सर्वांना सापडायला सोपं जाईल.
ओके. भेटायचं ठिकाण ठरलं तर
ओके. भेटायचं ठिकाण ठरलं तर मग. घाणेकर संध्याकाळी ६च्या आसपास.
आता जेवायचे ठिकाणपण ठरवून टाका.
बाकी, नौपाड्याजवळ कुठल्या हॉटेलात जायचं असलं आणि बहुतांशी पब्लिकला जमायलाच ७-७३० होणार असले (वर्किंग डे असल्याने) आणि ते पब्लिक नौपाड्यातूनच घाणेकरला जाणारं असलं तर भेटायच ठिकाण बदलू.
आणि कोणकोण येतंय? नक्कीवाले कोण? कदाचितवाले कोण?
धागा उशीरा वाचल्याने उशीरा
धागा उशीरा वाचल्याने उशीरा प्रतिक्रिया:- पुन्हा एकदा 'ललित' करणार असाल तर मी बाहेर खाऊन येईन. कट्टा आयोजकांनी जवळपास अशी पर्यायी व्यवस्था असणारे रेष्टारंट निवडावे. ;-p
बाकी शनिवारी भेटायला काय धाड भरलीये लोकांना? शन्वारी हापिसातून धावतपळत यावं लागेल त्याचं काय?
वरील दोनतीन प्रतिसादांवरुन
वरील दोनतीन प्रतिसादांवरुन मला कट्ट्याविषयी बराच संभ्रम असल्याचं दिसतं आहे. लँडमार्क विथ मॅप बरेच दिवस आधीपासून इथे असताना विक्षिप्तताईंनी पुन्हा विचारलं आणि मेघनाताई आठ नंतर कट्टा कुठे असेल असं विचारताहेत. हे राम..
२३ तारखेला ठाणे शहरात आधी कोणी भेटणारे का?
हेही बर्यापैकी संभ्रमजनक. आधी म्हणजे ?
नेमके किती वाजता किती जण
नेमके किती वाजता किती जण येणार याचा अंदाज येत नसल्याने पोझिशन अवघड दिसते आहे. घाणेकर थेटरसमोर उभे राहून तासनतास इतरांची वाट पाहणं त्रासदायक होईल. शिवाय चारपाच जण भेटून तिथून भटकायला निघाले तर मागून येणारे घाणेकरसमोर नुसतेच वाट बघत बसतील.
एकतर शार्प एका टैमाला सर्वानी पोचले तर ठीक.. पण
जर फ्लेक्झिबल टाईम ठेवायचाच असेल तर सर्वानी एका ठराविक हाटेलात बसणे आवश्यक वाटते.
डिफिकल्ट टु चेज मूव्हिंग टार्गेट.
शिवाय साडेसात नंतरची वेळ ठरत असल्याने बागेत वगैरे बसणे अंधार डास अन किडे यामुळे संक्षिप्तात येईल.
पक्की वेळ किंवा बसणेबल पक्की जागा यातील एक फिक्सवावे लागेल.
..
-घाणेकर संध्याकाळी सहाच्या आसपास
-६ वाजता अशक्य आहे. ८ नंतर कदाचित जमेल. तेव्हा कट्टा कुठे असेल (का)?
-म.रेल्वेची कृपा असल्यास ६.१५ च्या दरम्यान ठाणे स्टेशनला पोहोचते. ७ ते ७.३० पर्यंत घाणेकरला येईन
-साडेसातनंतर
-आठ वाजता
-साडेसात आठच्या सुमारास नौपाड्याहून निघेन
असे विविध सदस्यांचे विचार वाचून कट्टा फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस होणार नसल्याचे स्वतःपुरते समजत आहे.
संघभेट - एक छोटा वृत्तांत
उसंत सखू यांना भेटण्यासाठी नागपूरला जाण्याचा विचार करताना बरेचदा "संघाच्या मुख्यालयात जाणार असू तरच येईन" असे विनोद करून झाले होते. माझे विनोद सखूबाईंनी भलतेच मनावर घेतले होते. संघाची आतून टूर देण्यासाठी त्यांनी एक माजी प्रचारकही शोधले. मग मात्र मला धडकी भरली. लहानपणापासून संघिष्ट लोकांनी केलेले इमोसनल, ट्रेडिसनल, आणि कसले कसले (पैचान क्या!) अत्याचार मला पुरेसे झाले होतेच. संघाच्या मुख्यालयात सामान्य माणूस म्हणून गेल्यावर आपल्याला कसं वागवतात याबद्दलही भोचक कुतूहल होतं.
माझी संघाबद्दल असणारी मतं प्रतिकूल आहेत आणि याबद्दल मला अजिबात खेद नाही. त्यामुळे संघभेटीचं वर्णन ठराविक प्रकारानेच होईल. उगाच समतोलपणासाठी समतोलपणा ज्यांना हवाय त्यांनी पुढचा भाग वाचला नाही तरी चालेल.
संघाची जागा म्हणजे भलंमोठं पटांगण आणि त्याच्या एका कोपऱ्यात भव्यदिव्य इमारत असेल असा माझा अंदाज होता. त्याऐवजी डोक्यावर काटे धारण केलेली एक पांढरीधोप, उंच भिंत समोर आली. सध्यातरी तिथे आत जाणाऱ्यांना फोन, कॅमेरे घेऊन जाऊ देतात, पण कॅमेरा वापरण्याची परवानगी नाही. (अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये फोन, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत.) आत शिरण्याआधी गटातल्या एका व्यक्तीचं नाव, पत्ता, फोन नंबर, व्यवसाय अशा गोष्टी लिहून द्याव्या लागतात. भकास, काटेरी पांढऱ्या भिंतीच्या आत छोटंसं मोकळं अंगण होतं. फारतर दोनशे लोक मावतील तिथे. एका कोपऱ्यात सात-आठ पोलिस रिंगणात खुर्च्या टाकून गप्पा मारत बसले होते. बाहेर नाव-गाव, पर्शी तपासणे, इ सोपस्कार करून आम्ही आत शिरलो. आत एक झब्बा-लेगिन्सने आमचं स्वागत केलं, "बारा ते तीन कार्यालय बंद असतं. तुम्ही आलाच आहात तर मी व्यवस्था करतो. बसा तुम्ही." आम्ही तिथेच स्वागतकक्षात रेंगाळलो. "बसा की, दोन मिनीट बसलात तर काय त्रास होणारे?" झब्ब्याच्या चेहेऱ्यावर काहीसा स्वागतपूर्ण वैताग होता. तरीही कोणी बसायला कांकू करतंय बघितल्यावर पुन्हा एकदा बसायचा दम मिळाला. आता बसलो नाही तर हा बाब्या बाहेर घालवेल, असंही वाटलं.
बाहेरून त्या भकास पांढऱ्या, काटेरी भिंतीकडे बघून फोटो काढण्याची इच्छा होण्यासाठी 'शिंडलर्स लिस्ट' बनवणारा स्टीव्हन स्पीलबर्गच हवा, असा विचार करत होते. झब्बा आम्हाला घेऊन दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्यावर हा विचार आणखीनच पक्का होत गेला. कोणेएकेकाळी चुना लावलेल्या, रया उडलेल्या भिंती, खोक्याची आठवण करून देणारी दारं, खिडक्या, खोल्यांची रचना, किंचित, उलुसे प्रशस्त व्हरांडे आणि तिथे वाळत घातलेले कार्यकर्त्यांचे सगळ्या प्रकारचे कपडे पाहून स्पीलबर्गची आठवण फारच जोरात व्हायला लागली. अंधारे कोनाडे नव्हते एवढीच सकारात्मक बाजू. दोन मजले चढून आम्ही एका प्रदर्शनापर्यंत पोहोचलो. तिथे आत जाण्यासाठी चपला काढून ठेवाव्या लागल्या.
समोरच दिसली भारतमातेची चार फूट उंच तसबीर. तिच्या दोन्ही बाजूंना गोळवलकर आणि हेडगेवारांच्या (व्दितीय आणि प्रथम सरसंघचालक), तिच्यापेक्षा अंमळ मोठ्या तसबिरी, तिन्ही एकाच उंचीला टांगलेल्या. त्यांच्या पायाशी एकेक फूट उंचीचे, काचेत बंदिस्त केलेले पुतळे; शास्त्रीजी, वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक अशा नेत्यांचे. या नेत्यांना लोकप्रियता आहे पण हे लोक संघिष्ट नाहीत. आतमध्ये बऱ्याच वस्तू मांडलेल्या आहेत. संघाला किंवा संघिष्टांना मिळालेल्या वस्तू. त्यांतल्या बहुतेकशा पारंपरिक भारतीय शिल्पकलेचे नमुने म्हणता येतील अशा, सुंदर वस्तू आहेत. पण एकाही वस्तूचा कोणत्याही प्रकारचा आगापिछा तिथे लिहिलेला नाही. ही वस्तू कोणत्या काळात, कुठे, कोणी बनवली, कोणी कोणाला भेट म्हणून का दिली याचा काहीही संदर्भ नाही. 'वस्तू आहेत, बघायच्या तर बघा नाहीतर फुटा' या पलिकडे मला त्यातून काहीही समजलं नाही. हे एवढंच असतं तरी ठीक, पण त्यासोबत आत्तापर्यंत झालेल्या सरसंघचालकांची अंगावर येतील अश्या, अकलात्मक तैलचित्रांचा तिथे बुजबुजाट आहे. सुंदर वस्तूवरून नजर जरा हटवायची असेल तरी सावधानता बाळगावी, नाहीतर कधी ही चित्र डोळ्यांवर अत्याचार करतील याचा भरवसा नाही.
सगळ्यात 'गंमत' वाटली ती टोकाकडे असणाऱ्या एका वस्तूची. त्यात लिहिलं होतं, "बेटी सुरक्षित तो भविष्य सुरक्षित" (का अशाच अर्थाचं काहीतरी). मातीतून मानवी चेहेरा बनवून, त्यावर बंगाल्यांच्या अल्पना रांगोळ्या असतात तशा प्रकारे मुलीचा चेहेरा आणि हे वाक्य चितारलेलं. पण त्याच्या मागे मात्र एक सूप अडकवलेलं.
दहा मिनिटांच्या वर या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं. जे काही दिसत होतं त्यात अनपेक्षित काहीच नव्हतं. तिथून बाहेर पडताना आत काय पाहिलं याबद्दल चर्चा करावी असं कोणालाही वाटलं नाही. गेटसमोर 'बदला' छापाचे 'पटेल' फोटो काढले आणि निघालो.
...
यावरून हत्ती आणि सहा आंधळ्यांच्या गोष्टीची आठवण झाली.
(अर्थात, तिथे हत्ती एकच होता, त्याच्याकडे अनेक जण बोट दाखवून हा अमूक का, हा तमूक का, हा ढमूक का, हा फलाणा का, हा ढिकाणा का आणि हा (टॉमडिकहॅर्योत्तर) तिवारी का, अशा रीतीने अनेक जणांशी त्याला आयडेण्टिफाय करीत होते; इथे बोट दाखवणारी एकच जण आहे, आणि ती अमूक, तमूक, ढमूक, फलाणा, ढिकाणा, (टॉमडिकहॅर्योत्तर) तिवारी आणि इतर संकीर्ण नेहमीचेच किंवा क्वचितच उगवणारे, यशस्वी किंवा अयशस्वी किंवा निमयशस्वी१ यांच्याकडे बोट दाखवून हा गवि का, अशा रीतीने एकाच हत्तीशी त्या सर्वांना आयडेण्टिफाय करीत आहे. सेम डिफरन्स; तत्त्व तेच. आयडेण्टिटी क्रायसिस, आयडेण्टिटी क्रायसिस२ म्हणतात, तो हाच असावा काय?)
....................
१ काही ओळख नाही, देख नाही तरी सरसकट सगळ्यांना फडतूस लेखण्याइतकेच सरसकट सगळ्यांना यशस्वी लेखणेही चूक असावे, नाही का?
२ आता, ही बया सरसकट गेला बाजार सत्तर जणांवर गविंची आयडेण्टिटी जर लादत सुटली, तर या बयेकरिता नसेलही कदाचित, पण त्या सत्तर जणांकरिता तो क्रायसिस ठरणार नाही काय?
यापेक्षा "गवि तेच का ?""नाही
यापेक्षा "गवि तेच का ?""नाही ते नाहीत ,काहो ?" "माझे पाच हजार यायचेत त्यांच्याकडून" अशी पुस्ती जोडली असती तर इतरजणांनी क्राइसिस का काय ते मधून सुटल्याचा निश्वास सोडला असता +एक नवा पैलू कळला असता +कट्टा ऑलपर्पस वगैरे होत असल्याचा पुरावा {शोधणाऱ्यासाठी}हाती आला असता.
जाताजाता आमची रास -दगडाखाली दबा धरून बसणारी वृश्चिक.
?
In reply to पोटात अणुस्फोट होतो. दोनदा. by आदूबाळ
पहिल्या वेळेस पाच आणि दुसर्या वेळेस एक काय? ;-)