गाढवाच्या निमित्ताने...

ऐसीवर अलिकडेच एक 'संस्थळावर भाषा कशी वापरावी?' याबद्दल कळकळून केलेली एक विनंती वाचली...
त्यानंतर त्या विनंतीच्या प्रतिसादार्थ घेतलेल्या काही भावूक शपथाही वाचल्या...
आणि काही जणांचं आरशात बघून चाललेलं मुरडणंही पाहिलं!!
हसून गडाबडा लोळून झालेलं ळोळ्य संपल्यानंतर काही प्रतिसाद द्यावा अशी इच्छा मनात आली, पण त्यात दोन अडचणी उभ्या राहिल्या..
एक म्हणजे संपूर्ण प्रतीकूल प्रतिसाद देणे = धागाकर्त्याबद्दल अनादर दर्शवणे असं मानण्याची एक नवीनच प्रथा आजकाल संस्थळांवर रूढ होते आहे.
आणि दुसरं म्हणजे मनात प्रातिसादिक मुद्दे इतके जमायला लागले की केवळ एक प्रतिसाद देऊन भागेल असं वाटेना...
तेंव्हा असा विचार केला कि या विषयावर एक नवीनच धागा काढणं उचित ठरेल.
म्हणजे मग त्यात कुणाचा अनादर नाही, आपलं कर्म आपल्याकडे, काय? Smile

तर आतापर्यंत चाणाक्ष ऐसीकरांनी (बाकीचे गेले..... कुठे ते नंतर येईलच!) ओळखलंच असेल की आम्ही कोणत्या धाग्यासंदर्भात बोलतो आहोत ते! अचाणाक्षांसाठी ही लिंक देत आहोत...

http://www.aisiakshare.com/node/3732

सर्वप्रथम हे जाहीर करणं आम्ही आवश्यक समजतो की आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे कडवे समर्थक आहोत. याबाबतीत खुद्द व्हॉल्टेअरने आमच्या पायाशी बसून सोलकढी-भात खावा असे आपले आमचे प्रामाणिक मत आहे. जो जे वांछील तो ते लिहो ही आमची परम मनोकामना! मग ते आम्हाला अजिबात न पटणारं असलं तरी हरकत नाही. तेंव्हा या धाग्यात लेखकाने प्रदर्शित केलेल्या आर्ग्युमेंटसशी जरी आम्ही सर्वथा असहमत असलो तरी त्यांची मते मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे याविषयी आम्ही आग्रही आहोत....

आता एकदा हे डिस्क्लेमर दिल्यानंतर आमचे विचार...
कोणत्याही लिखाणात जेंव्हा अपशब्द येतात तेंव्हा त्यांचा शब्दश: अर्थ न घेता त्यामागील संदर्भ आणि त्यांचा भावार्थ लक्षात घेणं हे परिपक्व वाचकाचं लक्षण आहे असं आम्हाला वाटतं. बहुदा संताप, त्यातून आलेली असहायता, तिरस्कार वगैरे भावना व्यक्त करण्यासाठी असे शब्द वा वाकप्रचार वापरले जातात. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा अक्षरशः अर्थ घेऊन त्यावर वादंग माजवणं उचित नसतं. नाहीतर एक मुंबईकर कोकणी या नात्याने आम्हांला कधी "तुझ्या आवशीचो घोव" किंवा "साला" हे शब्द वापरताच येणार नाहीत. केवळ या एका घोर कुचंबणेच्या निषेधार्थ काढावे तितके धागे थोडे आहेत!!!!!!

दुसरं म्हणजे एका पिढीचे अपशब्द हे दुसर्‍या पिढीची बोलीभाषा बनलेले असू शकतात. उदा. पूर्वीच्या पिढीत 'रांडिच्च्या, शिंदळीच्या' हे कोकणात आणि 'फोकलीच्या' हे देशावर सहज वापरात असू शकतात. मी तर जुने बाप हे शब्द आपल्या स्वतःच्या मुलांना उद्देश्यून वापरतांना पाहिलेले आहेत. म्हणजे लगेच ते त्या शब्दांचा अक्षरशः अर्थ जाणून घेऊन ते शब्द मुद्दामहून वापरत असतील असे नव्हे हे आपण समजून घ्यायला हवं. तसंच आजच्या काळात साला, च्यायला, आयला, मायला, तेच्यामायला हे आणि तत्सम शब्द (बाकी ह्या धाग्याच्या निमित्ताने आम्हाला हे शब्द वापरण्यात जो आनंद होतोय तो केवळ अवर्णनीय आहे!!) जर वापरले जात असतील तर ते त्या संदर्भात लक्षात घ्यायला हवं!

तिसरं म्हणजे संस्थळाची प्रकृती. इतर काही संस्थळांवर (उदा. मायबोली, उपक्रम वगैरे) शुद्ध-अतिशुद्ध भाषेचा बोलबाला असतो आणि ते तिथे उत्तम आहे. पण ऐसीसारखी संस्थळं, ज्यांचा जन्म मिसळपावसारख्या संस्थळातून झाला आहे, त्यांना त्यांच्या बापांनी जरी कितीही नाकारायचा प्रयत्न केला (केला आहे असं म्हणत नाही आहोत आम्ही, फक्त एक शक्यता!) तरी त्यांना त्यांच्या आईचा इरसालपणा झुगारून देणं केवळ अशक्य आहे! चालकांनी ऐसीचं उपक्रम करून पहावं, माझी खात्री आहे की एकतर संस्थळ ओस तरी पडेल किंवा मग इतकं बोअरिंग होईल की त्याचं प्रति-उपक्रम असं नामकरण करावं लागेल!!! आणखी एक म्हणजे अपशब्दांचा वापर करूनच दुर्भावना दर्शवली जाते असं नव्हे. अगदी चांगले सोवळे शब्द वापरूनही ती सर्रास दर्शवली जाते. मराठी संस्थळांवरील "वाढदिवसाच्या शुभेच्छा!" हा प्रकार त्यापैकीच आहे. म्हणजेच काय की अपशब्द वापरले नाहीत म्हणून त्यामागील भावना काही फार पूज्य आहे असे नव्हे!

चवथं म्हणजे प्रत्येक माणूस हा एका विशिष्ठ संस्कारात वाढलेला असतो. पण पूर्ण वाढ झाल्यानंतर आपल्या संस्कारांव्यतिरिक्त इतरही काय आपल्या मराठी समाजात चाललेलं आहे त्याची माहिती करून घेणं गरजेचं असतं. इतरत्रीच्या गोष्टींचा स्वीकार-अस्वीकार करणं हा एक वैयक्तिक चॉईस असतो पण 'इतरत्र चाललेलं अस्वीकृत करून माझे जे श्रेष्ठ संस्कार आहेत तेच सर्वांनी आत्मसात करावेत अशी अपेक्षा बाळगणं वेडेपणाचं ठरतं, जरी तुम्हाला तुमचं म्हणणं कितिही बरोबर वाटत असलं तरीही. माझ्यावर किर्तनांचे संस्कार झालेत म्हणून तेच उत्तम आणि पवाडे-लावण्या निकृष्ट असं म्हणण्यापैकी आहे ते! "सोवळं नेसून कुठलीही भाषा वाढत नाही!" हे आमचं वाक्य नाही, एका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रमुख वक्त्याने उच्चारलेलं वाक्य आहे हे!

आता मुळातला इंटरेष्टिंग मुद्दा, गाढवाविषयी! Smile
एकतर प्राचीन मराठीमध्ये अशा प्रकारच्या अनेक गधेगाळी उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकार मराठीत काही नवीनच आलेला आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही.....
पण आपले पुर्वज जाऊद्या (कुठे ते तुम्ही ओळखलंच असेल, लबाडांनो!)पण अर्वाचीन मराठीतदेखील 'महाराष्ट्राचं लाड्कं व्यक्तिमत्व' वगैरे विशेषणांनी गौरवल्या गेलेल्या श्री. पु. ल. देशपाड्यांच्याच एका गाजलेल्या नाटकात हा शब्दप्रयोग आहे. आता जो शब्दप्रयोग एका ख्यातनाम आणि सुसंकृत नाटककाराने वापरला, त्या नाटकाचे शेकडो हाउसफुल्ल प्रयोग होऊनही तो सेन्सॉर न होता तसाच राहिला, जे नाटक अनेक प्रख्यात आणि सन्मान्य नटनटींनी करून आणि लाखो मराठी प्रेक्षकांनी पाहूनही कुणाला त्यावर आक्षेप घ्यावा असं वाटलं नाही त्यावर जर आपण आक्षेप घेत असू तर आम्हाला वाटतं की आपली आपल्या समाजाशी असलेली नाळ कुठे तुटलीय का ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा....

आता काही वैयक्तिक! होय, आमच्या ऐसीवरील स्वाक्षरीमध्ये गर्दभाच्या श्रोणीचा उल्लेख आहे. पण आमच्या माहितीनुसार श्रोणी म्हणजे कान, दुसरा काही अर्थ असल्यास जाणकारांनी नजरेस आणावा. (जाणकारांनी खरा अर्थ नजरेस आणून दिल्यामुळे ही करेक्शन, थ्यांक्यू हां, बट्टमण!) तो उल्लेख तिथे असण्याचे कारण की, संस्थळावरची अनामिक श्रेण्या देण्याची पद्धत अनुचित आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे. आक्षेप सरळ समोरासमोर नोंदवावा, लपून राहून अनामिक रितीने श्रेण्या देऊन पॅसिव्ह्स अग्रेसिव्हनेस दाखवणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे आमचे मत आहे. परंतु आम्ही या संस्थलाचे मालक वा चालक नसल्याने ही पद्धत बंद करणे आमच्या हातात नाही. त्यामुळे आम्ही आम्हाला सुचलेल्या शब्दांनुसार इतर सभासदांना संवादासाठी पाचारण केले आहे आणि ज्यांना ते न करता फक्त श्रेण्याच द्यायच्या आहेत त्यांची आम्ही काय पत्रास ठेवतो ते निदर्शिले आहे. गंमत म्हणजे ही स्वाक्षरी टाकल्यानंतरही आमच्या प्रतिसादांना श्रेण्या देण्यात आलेल्या आहेत. त्यावरून काही लोकांना या गर्दभीय जागी जाऊन बसण्यातच संतोष मिळतोय असे दिसते. असो. सभासदांचे समाधान हाच आमचा संतोष, वैग्रे, वैग्रे!! Smile

मराठी समाजात काय स्वीकृत म्हणून आज गणलं जातंय याची केवळ एक झलक म्हणून खालील लिंक देत आहोत. ही एका जाहीर कार्यक्रमाची लिंक आहे, शेकडो लोकांनी हा कार्यक्रम उघड्यावर बसून बघितलेला/ऐकलेला केलेला आहे.
सदर व्हिडिओ आपापल्या जबाबदारीवर बघावा. मराठी आहे. (श्रेयअव्हेरः श्री. संदीप डांगे; अन्य संकेतस्थलावरून)
https://www.youtube.com/watch?v=hdr7TOjbcuk

समस्तांनी कृपा करून लक्षात घ्यावं की ह्या व्हिडियोमध्ये आमचं असं काहीही नाही, केवळ रिपोर्टिंग! पण म्हणतात ना,
अशी ही शनेश्वराची कथा,
त्याचा तोचि वदविता,
आपुली तो माईकवार्ता,
करविता श्री पांडुरंग!
Smile

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

खुद्द व्हॉल्टेअरने आमच्या पायाशी बसून सोलकढी-भात खावा असे आपले आमचे प्रामाणिक मत आहे.

Biggrin
या वाक्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.

निमित्त काही का असेना, त्या निमित्ताने पिडाकाकांनी लेखणी उपसली याबद्दल आमच्या आम्हांलांच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सोलकढी भाताबरोबर खातात???
मी नुसतीच प्यायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकाऊ काय म्हणे?

स्वसंपादन- उगाच आपलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, आमच्या ऐसीवरील स्वाक्षरीमध्ये गर्दभाच्या श्रोणीचा उल्लेख आहे. पण आमच्या माहितीनुसार श्रोणी म्हणजे कान, दुसरा काही अर्थ असल्यास जाणकारांनी नजरेस आणावा.

श्रोणि या शब्दाचा संस्कृतातील अर्थ इथे बघता येईल.

http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+%E0%A4...

कान असा अर्थ कुठे दिसला नाही.

बाकी लेखाबद्दल काय बोलावे? पूर्ण सहमत आहोत इतकेच बोलतो फक्त.

तदुपरि

एकतर प्राचीन मराठीमध्ये अशा प्रकारच्या अनेक गधेगाळी उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकार मराठीत काही नवीनच आलेला आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही.....

महाराष्ट्र सारस्वत नामक ग्रंथात अशा एका गधेगाळीचा मजकूर दिलेला आहे तो टंकतो आणि थांबतो.

"अथ तु जो कोणुहु वि ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबी आपडे | तेहाची माय गाढवें झविजे |" काळ आहे शके ११०९, अर्थात इसवी सन ११८७. ही उज्ज्वल परंपरा गेली किमान ८२७ वर्षे तरी चालू आहे असे दिसते.

याचा संदर्भ खालील लिंकेत पान क्र. १६ वरती पाहता येईल.

https://archive.org/stream/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull/Ma...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखात मते यथायोग्य मांडली आहेत.
-------------------
पण काय हो, शीर्षकात नक्की कशाच्या निमित्ताने हे लिहिताना सभ्यता पाळायच्या नादात अर्थाचा अनर्थ तर झाला नाहीय ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेख आवडला. पटला. पण मला वाटतं कोल्हटकर काकांचा धागा वैयक्तिक हल्यांवर होता. ती शिवी केवळ एक तात्कालिक कारण ठरली असावी.



किंचित अवांतर: सोलकढी भात हा प्रकार रेग्युलरली खातात काय लोक? मी मला सोलकढी आवडते, भातही आवड्तो पण हे दोन पदार्थ एकत्र खाल्यास लय बोर (आमरस भातासारखे) लागतील चवील असं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंचित अवांतर: सोलकढी भात हा प्रकार रेग्युलरली खातात काय लोक? मी मला सोलकढी आवडते, भातही आवड्तो पण हे दोन पदार्थ एकत्र खाल्यास लय बोर (आमरस भातासारखे) लागतील चवील असं वाटतय.

अगदी अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी सोलकढी भातावर वाढून घेतो आणि नंतर नुसतीही पितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणखी एक म्हणजे अपशब्दांचा वापर करूनच दुर्भावना दर्शवली जाते असं नव्हे.

अगदी अगदी! मागे एकदा 'अशाने तुमच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल शंका येते' अशीही दुर्भावना दर्शावलेली पाहिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि अशा पद्धतीने दुर्भावना दर्शवणार्‍यांच्या दीडशहाण्या प्रतिसादांना रोचक, मार्मिकादि श्रेण्याही मिळालेल्या पाहिल्या आहेत. हे जर मानसिक अनारोग्याचं लक्षण नसेल तर अजून कुठलं आहे बॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिव्यांचा उपयोग फक्त कुकरच्या शिट्टीसारखा प्रेशर रिलीज व्हॉल्व म्हणून मर्यादित असता तर उत्तमच. पण एक प्रॉब्लेम असा होतो की बर्‍याचदा ज्याला शिवी मिळते त्याच्याकडे हे प्रेशर फक्त ट्रान्सफर होतं. अशावेळी मूळ विषय पूर्ण मागे पडतो आणि एकमेकांना अधिकाधिक नख्या मारणे आणि कमीतकमी शब्दात अधिकाधिक खोल घाव करणे अशी चेन रिअ‍ॅक्शन सुरु होते. अशा वेळी तो सेफ्टी व्हॉल्व न राहता ट्रिगर होऊ शकतो. भट्टीत ग्राफाईट रॉड नसतील तर चेन रिअ‍ॅक्शन वाढत जाऊन अनकंट्रोल्ड् अणुस्फोट होतो. तेव्हा शिव्या जितक्या आवश्यक तितकाच एखाद्या बुजुर्गाचा सल्ला देणारा धागाही आवश्यक आणि मॉडरेटर्सही आवश्यकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा शिव्या जितक्या आवश्यक तितकाच एखाद्या बुजुर्गाचा सल्ला देणारा धागाही आवश्यक आणि मॉडरेटर्सही आवश्यकच.

"शिवाजीमहाराजांनी मावळी पद्धतीच्या भातशेतीविषयी अफजलखानाचे हृदयपरिवर्तन केल्यामुळे खानाची आतडी पिळवटून बाहेर पडली" असे सांगणारे सांडग्याच्या चाळीतले इतिहासकार आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपेक्षित प्रतिसाद.

शिव्या हा घटक आवश्यक असला तरी त्याचा फक्त निचरा होणे असा फायदा दाखवला जाऊ नये, त्याच्यावर कंट्रोलही आवश्यक आहे असा मुद्दा आहे.

मद्य अमुक मिली घेतलं असता रिलॅक्स वाटतं..तमुक मिली घेतलं की हार्ट अ‍ॅटॅकला काही प्रमाणात प्रतिबंध होतो..कोलेस्टेरॉलवर काही बरा परिणाम होतो.. त्याहून जास्त घेतलं की स्युडो आत्मविश्वास येतो.. त्याहून जास्त घेतलं की शरीरावरचा ताबा सुटतो.. त्याहून जास्त घेतलं की उलट्या होतात.. त्याहून जास्त घेतलं की बेशुद्ध.. रोज असंच घेतलं की अनेक वर्षांनी लिव्हर खराब.

असे अनेक मुद्दे मद्य या प्रकाराशी संबंधित असतात. तेव्हा त्यातला फक्त रीलॅक्स होण्याचा एकच सिलेक्टिव्ह मुद्दा उचलून मद्याची संपूर्ण आवश्यकता प्रोजेक्ट केली जाऊ नये तर बडगाही दिसावा इतकीच इच्छा.

बडगा नव्हेच.. ती जी काय वस्तू आहे ती दिसावी. तिला बडगा समजायचे की काय तो चॉईस मद्यपीचा. पण पूर्ण चित्र दिसावं आणि किती प्यावी हे ठरवण्याची शक्यता निर्माण व्हावी इतकाच उद्देश.

शिवीने शिवी वाढणे..ऊर्फ कोंबड्यांच्या, बैलांच्या झुंजी हा एक अत्यंत मनोरंजक प्रकार असतो अनेकांसाठी. काहीजणांसाठी नसतो.. ज्यांच्यासाठी आहे त्यांनी जरुर त्याला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. बाकीच्यांनी आपापली मर्यादा ठरवण्याचा प्रयत्न करावा. इतपत बोलणे म्हणजे दादा सांडगेइझम नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवीने शिवी वाढणे..ऊर्फ कोंबड्यांच्या, बैलांच्या झुंजी हा एक अत्यंत मनोरंजक प्रकार असतो अनेकांसाठी. काहीजणांसाठी नसतो.. ज्यांच्यासाठी आहे त्यांनी जरुर त्याला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. बाकीच्यांनी आपापली मर्यादा ठरवण्याचा प्रयत्न करावा. इतपत बोलणे म्हणजे दादा सांडगेइझम नव्हे.

एका प्रतिसादावरून इतका क्रायसिस उभा राहिल्याचे चित्र निर्माण करण्याचा आभास रोचक आहे खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

..एका प्रतिसादाने?

..बरं..आपल्या एकाच प्रतिसादात जनरली दम नसतो..तो सिरियसली घेण्याची किमान पातळी प्राप्त होण्यास आपले किमान तीन प्रतिसाद आले की मगच त्यावरुन सिरियस उत्तराचा विचार करावा याची नोंद केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा विचारात न घेतल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

..रावसाहेब..तुम्ही मुद्दा मुळात समजून घेतला असतात तर घाईने अफजलखान शिवाजी रिलेशन व्हाया दादा सांडगे मधे घुसवले नसतेत.

..मान्य आहे की अश्या मध्यममार्गाने शिवाजी अफझल संवाद शक्य नव्हता.

पण जालीय संवादांना शिवाजी अफझुलखान नख्या आतडी छाप मानणे येते सर्व आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते रिलेशन मध्ये घुसवले याचे कारण प्रतिसाद हा 'संतुलितपणासाठी संतुलितपणा' छाप वाटला होता. सांडग्याच्या चाळीत जसे ऐतिहासिक लेखनात हिंसेचा उल्लेख येऊ द्यायचा नाही असा प्रकार होता तोच प्रकार इथे संतुलितपणाबद्दल वाटला म्हणून घुसडला इतकेच.

इतके दिवस सगळे फाटक्या, पारदर्शक, नाममात्र झालेल्या शालजोडीतून जोडे-बूट मारत होते तिकडे कुणी लक्षही दिले नाही आणि नंतर उघडपणे एक चप्पल काय मारली तर सगळे नैतिक दुढ्ढाचार्य झाले हाच मुळात सगळ्यात मोठा विनोद आहे. शिव्या चालाव्यात की नाही हा मुद्दा तुलनेने सेकंडरी. ए आय बी रोस्ट बघून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातलाच हाही प्रकार वाटतोय. जातपात, स्थूलपणा, इ. वरून विनोद चालतात पण लैंगिक विनोद आले रे आले की संस्कृती लयाला जाते. त्याचप्रमाणे इथेही 'मानसिक स्वास्थ्याबद्दल चिंता वाटते' छाप इन्सल्ट खपवून घेतले जातात, पण एक प्रतिसाद काय गाढवाच्या गांडीत घातला की लगेच संस्कार, मर्यादा, एटिकेट्स, सभ्यता, इ. शब्दांची मढी उकरायला लागले सगळे. हा दुटप्पीपणा खुपला, बाकी काही नाही.

शेवटी पालथ्या घड्यावर पाणी ओतून तो भरायचा प्रयत्न करायची आपली डेरिंग नाही, फक्त तो घडा पालथा आहे इतकेच सांगतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोस्ट टाइप जे कार्यक्रम आहेत त्याचा बेस हा इन्सल्ट कॉमेडी (पल्याड)हा असतो...(ज्यात सगळं कमरेवरच आणी कमरेखालचं बोलणे सर्वानाच मान्य आहे). एआय्बी रोस्ट मधे इन्सल्ट क्रिएटीवीटी नेमकी गेली कुठे ते लक्षात आलंच असेल आणी उरलं फक्त जास्तिजास्त अश्लिल बोलणे हावभाव करणे. आणी त्याला कुल इंन्सल्ट मानणे. आणी असला बिनडोक प्रकार जो केला गेला माझ्या सारख्या सलग १० वर्षे MTV Rodies unsensord चा कट्टर फ्यान असलेल्या व्यक्तीलाही रुचला नाही, रुचणार नाही. रणवीर, अर्जुन तर अजिबात रोस्ट झाल्या सारखे वाटत न्हवते उलटं ते अजुन जास्त जोरात चेकाळत होते. अन समारोपात केजोने हाइट केली. बाकी रोस्टींग आम्हाला पसंत आहे. यड*वे त्याला ट्रोलिंगही संबोधु शकतात म्हणून दुर ठेवतो

- चार्ली शीनच्या रोस्ट एपिसोडचा एक कट्टर चाहता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

सहमत आहे.
-------------
बाय द वे, दादा सांडगे फारच रोचक माणूस दिसते. कळवळ्याने आतडी बाहेर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बटाट्याची चाळ नामक पुस्तक लौकरात लौकर वाचा अशी आघाव सूचनावजा इणंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी.. अजो.. तुम्ही बचा वाचली नाही? हाय कंबख्त तूने पीही नही (खरंच पीही नही असं नाही ना?!)

याच सांडग्यांच्या चाळीत मनावर वाईट संस्कार करणारं लिखाण लोकांच्या वाचनात येऊ नये म्हणून पुस्तकांच्या ओळींवर पट्ट्या चिकटवल्या जातात आणि मजकुरात सुसंस्कृत बदलही केले जातात. उदा.

तिने ते मूल पाहिले, एक दिवस आपणही अशाच मुलाची माता होणार आहोत या विचाराने तिला आनंद झाला.

ऐवजी

तिने ते मूल पाहिले नाही, एक दिवस आपणही अशाच मुलाची माता होणार आहोत असा विचार तिच्या मनात आला नाही आणि तिला आनंद तर मुळीच झाला नाही.

यासम काहीसे.. Smile

१ - ही कितपत तीव्र शिवी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाट्याची चाळ = बचा???????? हे भगवाण बचा ले.

तदुपरि कम्बख्त ही कम-बख्त अर्थात कमी वख्तात सुचणारी एक निरुपद्रवी शिवी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कम वक्त ही शिवी ? आता याच्या उद्गमाचा विचार करणे आले.

कमी वखत.. कमी वेळ.. कमी वेळ टिकणारा .. कमजोरी ? शीघ्रता? जडीबूटींची गरज ? ग्यारंटीसे इलाज ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठलं काय. आम्ही फक्त पुनाओकीय तपश्चर्येने अभिमंत्रून एक तर्काचे पिल्लू सोडून दिले. Wink

पण तुम्ही त्या पिल्लाला पुरवलेली जडीबूटी पाहता त्याने बघता बघता आकाशी झेप घेऊन तपश्चर्येला पुनरेकवार सार्थ ठरवले.

म्हणा, गर्व से कहो.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निम्ननिर्दिष्ट गाणे आठवले.

....

कंबख्त इश्क है जो..
सारा जहां है वो
कब आता है
कब जाता है
पर रहेता है जब तक ये कंबख्त जन्नत दिखाता है..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक की माहितीपूर्ण या दुग्ध्यात अडकलो असताना आर्बिट्ररी आदामदा करून मार्मिक दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता या प्रतिसादावर सीरियस प्रतिसाद द्यायचा म्हणजे आफतच. पण कम्बख्त सवय जाता जात नाही..
तर, कमबख्त = वेळ चांगली नसलेला, योग्य काळाची बाजू कमी असलेला असा कमनशिबी. बख्त=वक्त=समय असे असावे असे वाटते.
किंवा 'अवकाळीचा' असेही असू शकेल. शिव्यांचाच धागा आहे, तेव्हा हे चालू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

बाकी कंबख्त ही शिवी (?!)दुष्टावा किंवा शत्रुत्वभावनेने उच्चारलेली वाटत नसून मित्रत्वानेच, पण बिचारा, अरेरे, दुर्दैवी अश्या अर्थाने काहीशी सहानुभूती दाखवणार्‍या टोनमधे येते असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेलही. त्याचे मूळ शोधले पाहिजे जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बख्त=वक्त=समय असे असावे असे वाटते.

शक्य आहे, पण हा शब्द मूळ अरेबिक असण्याची शक्यताही आहे. बख्त (بخت)चा अर्थ (सु)दैव असा होतो.
बख्तियार (आठवा: झेबा बख्तियार/बख्तियार खिलजी) म्हणजे सुदैवी इत्यादी. कम्बख्त हा त्याच समूहातला शब्द दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बख्त - blessed ( luck or with something good, ) असावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बख़्त = दैव, प्रारब्ध, नशीब, भाग्य, इत्यादी.
कम्बख़्त = कमनशिबी, बख़्तआज़माइश = दैव आजमावणे/नशीबाची परीक्षा, बख़्तावर/बख़्तियार = भाग्यवान, नशीबवान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह! धन्यवाद नंदनशेठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरंच पीही नही असं नाही ना?

पिलिय. पण मजा नै आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय???

सोलकढी पिऊन मजा नाही आली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोलकढी म्हणजे काय? आमच्या लातूरला बनवत नाहीत असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

...नेमके काय, ते एखादा कोकणीच व्यवस्थित सांगू शकेल. पण...

विकीदुवा

जालरेशिपी (येथे 'चकली' हे ब्लॉगकर्त्रीचे नाव आहे. रेशिपी चकलीची नव्हे. म्हणजे, चकलीचीच रेशिपी आहे, परंतु चकलीची नव्हे, सोलकढीची. गो फिगर! भाषेचे दौर्बल्य, दुसरे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बटाट्याची चाळ नामक पुस्तक लौकरात लौकर वाचा अशी आघाव सूचनावजा इणंती आहे.

नका वाचू तुम्ही जोशी
इथले पुरोगामी मग
तुझ वाचन किती तु बोल्तो किती
म्हणु शकणार नाहीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

सहमत आहे.
-------------
बाय द वे, दादा सांडगे फारच रोचक माणूस दिसतो. कळवळ्याने आतडी बाहेर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बैलांच्या झुंजी हा एक अत्यंत मनोरंजक प्रकार असतो अनेकांसाठी. काहीजणांसाठी नसतो..

बैलासाठी नसतो तो तसा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

अगदी असेच. गविंशी सहमत
कोल्हटकरांच्या धाग्याला गागांचे फक्त तात्कालिक कारण झाले असावे असे वाटते. त्याबाबत ढेरेशास्त्र्यंशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे देवा! विषय काय आणि लोक सोलकढी आणि भातातच अडकले काय! असो. जै व्होल्तेअर आणि जै पिडांकाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाच तो पॅसिव-अ‍ॅग्रेसिवनेसपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ऐसीवर चाललेला कीसपाडूपणा बघून अनेक हुशार लोक पॅसिव्ह-पॅसिव्हपणा करतात त्यापेक्षा पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा सध्या बरा वाटतोय. नाहीच तर शेवटी होईलच पॅसिव्ह-पॅसिव्हपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे देवा!

तुम्हाला देवाचा धावा करताना पाहून तो परमेश्वर कृतकृत्य झाला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि त्यातही देवीला सोडून देवाचा धावा केल्याबद्दल अजूनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नास्तिक लोक जेव्हा अरे देवा म्हणतात तेव्हा तो एक गॅप फिलर असतो. म्हणजे "अरे बिग बँगेच्या पार्टिकला" इ अजून भाषेत रूढ झालेलं नाही.
----------
शिवाय जगातले सगळे लोक अस्तिक असल्याने "त्यांच्या भाषेत" बोलावं लागतं. जसं लहान मुलांना त्यांच्या भाषेत बोलावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निदान त्या उल्लेखामुळे तरी प्रतिसाद कसा वाचायचा हे समजेल अशी अपेक्षा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक म्हणजे संपूर्ण प्रतीकूल प्रतिसाद देणे = धागाकर्त्याबद्दल अनादर दर्शवणे असं मानण्याची एक नवीनच प्रथा आजकाल संस्थळांवर रूढ होते आहे.

अगदी अगदी. या लोकांना लोकशाहीत मतदान पाच वर्षांत एकदा म्हणजे फारच कमी वाटत असावं. हा कँडीडेट पाडायचा, श्रेणीदान हे मतदान आहे अशी भावना अनेकदा दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, श्रेणी देऊन इथे कँडिडेट पडत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवी देणारानेही उलट टपाली आपले श्रोणिविदारण व मातृभगिन्नैक्य होण्याची तयारी ठेवावी म्हणजे झाले. दु:ख त्याचं नाहीच, दोन डुकरांच्या दंगलीत तळ्याचे पाणी गढूळते आणि कमळांचा चिखल होतो त्याचे दु:ख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रोणिविदारण व मातृभगिन्नैक्य होण्याची तयारी

हे शब्द देखिल वराहक्रीडा नव्हेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नव्हेत. संस्कृत-टु-हिंदी भाषांतर करून बघा मग कळेल वराहक्रीडेपासून हे कसे वेगळे आहेत ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाढवाचा नितंबबोध

जॉन अब्राहम सारखं देखण एक गाढव त्याचं फेसबुक उघडुन "अहो ध्वनी" स्टेटसत बसलं होतं. जपानी भाषेत गाढवाला "अहो" म्हणतात ते त्याला अर्थातच माहित होतं. सेन्सॉरशिप नसलेल्या एका मोकाट ग्रुपमध्ये गेले पंधरा दिवस सतत नितंब या विषयावर चाललेली रसभरित चर्चा वाचायची चटक त्याला लागली होती. त्यात वारंवार गाढवाच्या पार्श्वभागाचा उल्लेख यायचा. सर्व नद्या सागराला मिळतात तद्वत सर्व अप्रिय गोष्टींचे विसर्जन मनुष्यप्राणी गाढवाच्या पार्श्वभागातच करत असल्याचे तिथेच त्याला समजले. आयला! गाढवाला ढुंगण असते की कृष्णविवर? त्याला कळेना. एका विदुषीने सभ्यतेची पराकाष्ठा करत "गाढवाचे नितंब" असा मोहक शब्द वापरल्याने त्याला हर्षवायूच झाला. तो विदुषीवर जाम फिदा झाला. स्वतःच्या ढुंगणाला 'आस' उर्फ गाढव म्हणणार्‍या अखिल मानवजातीत चक्क गाढवाच्या ढुंगणाला नितंबाचा सन्मान देणारी विदुषी त्याला शोधूनही सापडली नसती. "दिल लगा विदुषीसे तो गधी क्या चीज है।" असे सुस्कारे तो टाकू लागला.त्याने विदुषीला, " मयत री कर्नर क?" विचारले. तिला समस्त सस्तन प्राण्यांच्या वर्तनाचे सामाजिक आणि मनोकायिक संशोधन करण्यासाठी नित्य नवे उंदीर प्रयोगशाळेत आवश्यक असतात. तिने लग्गेच या तगड्या फुरफुरणाऱ्या जॉन गाढवाशी मयतरी केली. त्याचा आनंद नितंबात मावेनासा झाला.

विदुषी वेब भिंग घेऊन त्याच्या नितंबाचा शास्त्रीय अभ्यास करू लागली नितंबाचे रुधिराभिसरण दर्शविणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याचे गुंतागुंतीचे चित्र तिच्या संगणकावर साकारू लागले. विदुषीचा अभ्यास आता शेपटीखाली अधिकाधिक गहन होत चालला होता. तिला तिच्या मित्रांच्या अप्रिय वस्तू तिथून शोधून काढून, त्याच त्यांना हॅलोविननिमित्त भेट देऊन भयचकित करायचे होते. अधूनमधून रुचिपालट म्हणून ती जॉन गाढवाला गीता वाचून दाखवत असे, पण यापेक्षा संशोधनाचा गोंधळ बरा होता असे त्याला वाटायचे. तो ख्रिश्चन असल्याने त्याला गीतेत रस नव्हता, तसे तर त्याला बायबल मध्ये ही रस नव्हता. विदुषीमध्ये मात्र तो वाढतच होता. तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो नित्य नवीन चाळे करीत असे. तिचे लक्ष नसे कारण ती मल्टीटास्किंग मध्ये पारंगत असल्याने अनेक आघाड्यांवर दिग्गज्जांना लीलया लोळवित असे. जॉनला मात्र एकच ध्यास आणि कधी घेतो विदुषीचा घास, असे झाले होते. विदुषीने हॅलोवीनसाठी पुरेशा वस्तू गोळा करून नितंबाध्ययन संपवले. जालीय समूहात बागडताना तिच्या तीक्ष्ण नजरेला तू नळी वरील शेअर केलेला एक व्हिडीओ दिसला. त्यात उकिरड्यावर निवांत चरून मनसोक्त लोळणारी एक लठ्ठ गुलाबी डुकरीण दिसली. लग्नात नवरी गौरीहार पूजते त्या बोळक्यान्च्या उतरंडीसारखी आचळांची आवळी जावळी उतरंड पाहून विदुषीची बुब्बुळे बाहेर आली. तिने आता गुलाबी डुकरीणीच्या गौरीहार उरोजांचे अध्ययन करायचे ठरवले. डुकरीणीची वार्षिक बाळंतपणे , पिल्लांची संख्या, तसेच गुलाबी डुकरीणीचे दुग्धव्यवस्थापन व आचळात त्यांचे समसमान वितरण याच्या सखोल अभ्यासाची आखणी सुरु झाली. तिने गुलाबी डुकरीणीला 'मयतरी'ची रिक्वेस्ट धाडली. जॉन गाढवाचा जळफ़ळाट होऊ लागला. त्याने घोडा, झेब्रा आणि जिराफसारख्या उमद्या देखण्या प्राण्यांचे बुरखे घेऊन फेक अकाउण्टचा आणि रिक्वेस्टचा पाउस पाडला. विदुषीचे लक्ष विचलित करायचा नेटाने निर्धार केला. विदुषी गाढवापेक्षा तंत्रज्ञानात शतपट कुशल असल्याने, तिने ते सारे अकाउण्ट लीलया ह्याक केले. जॉन गाढव आता संतापून लाथांचा अश्लील सुकाळ करू लागले. विदुषीने त्याला तात्काळ ब्लॉक करून त्याचा जालीय वध केला आणि विजयाने एक विकट हास्य केले. तेंव्हापासून हे लव्हसिक गाढव भळ्भळत्या फेसभंगाने व्याकुळ होऊन जालीय समुहात झीरपिडत असतं.

जसा नितंबबोध जॉन गाढवाला झाला तसाच तमाम सस्तन प्राण्यातील गाढवांना व्हावा हीच गाढवाची संतवाणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि काही जणांचं आरशात बघून चाललेलं मुरडणंही पाहिलं!!

ROFL
काय हो पिडां. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

याबाबतीत खुद्द व्हॉल्टेअरने आमच्या पायाशी बसून सोलकढी-भात खावा असे आपले आमचे प्रामाणिक मत आहे.

ROFL

कोणत्याही लिखाणात जेंव्हा अपशब्द येतात तेंव्हा त्यांचा शब्दश: अर्थ न घेता त्यामागील संदर्भ आणि त्यांचा भावार्थ लक्षात घेणं हे परिपक्व वाचकाचं लक्षण आहे असं आम्हाला वाटतं.

सहमत आहे. रश्दींनं "बास्टर्ड हा शब्द वापरलाच कसा" असं बडबडणार्‍यांना हेच सांगतोय दोन तीन दिवस.

अर्थात, संवाद साधताना (समोरच्याशी संवाद साधणे जर महत्त्वाचे असेल तर) समोरचा संवादापासून दूर होणार नाही अशी भाषा वापरणे महत्त्वाचे का नाही हे ज्यानेत्याने ठरवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रश्दींनं "बास्टर्ड हा शब्द वापरलाच कसा" असं बडबडणार्‍यांना हेच सांगतोय दोन तीन दिवस.

शिकू हो आम्ही. सगळे भाव समजून घ्यायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय. सोलकढी भात उत्तम लागतो! खाऊन बघा. कॉंबिनेशन आवडलं नाही तर मी प्रायश्चित्त म्हणून विवेक मुश्रनचे सगळे चित्रपट बिंज वॉच करेन.
शिवाय "तिवळ" आहेच. सोलकढीत नारळाचं दूध न घालता केवळ सोलांनी केलेली करामत म्हणजे तिवळ.
सोलकढी, भात, तेल लावलेला भाजका पापड आणि एखाद दुसरा मासा तोंडी लावायला असला तर मग "समाधीत गेले आहेत" अशी पाटी लावून टाकावी.

बाकी लेख वाचतो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिवळाबाबत एस डबल ओ आर ई. एकदाच प्यायलोय. मला आधि वाटलं कोकम सरबत आहे. छ्या छ्या छ्या... लईच वंगाळ वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

श्रोणि या शब्दाचा संस्कृतातील अर्थ इथे बघता येईल.

http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+%E0%A4...

कान असा अर्थ कुठे दिसला नाही.

आय स्टॅन्ड करेक्टेड बट्टमण! आमचं संस्कृत हे अतिशय कच्चं, अगदी पन्नास मार्कांचं, असल्याने आम्हाला श्रोणी म्हणजे कान असंच वाटलं होतं. आणि मूळ झणझणीतपणा पोहोचवता न आल्याचा क्षणिक खेदही झाला होता!
पण त्याचं काय आहे बट्टमण, आम्हाला हा शब्दप्रयोग ऐसीवरच्या एका संस्कृत महापंडिताने सुचवला होता आणि म्हणून आम्ही तो जसाच्या तसा स्वीकारला. Wink
तरी आता मूळ लेखात करेक्शन करत आहे.

इतरांसाठी: तुमचे अभिप्राय वाचतो आहे, काही काळाने पोचही देणार आहे. (नायतर म्हणायचे की पिडांकाका धागा टाकून गायब झाले!!)
पण थोड्या दिवसांनी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ऐसीवरच्या एका संस्कृत महापंडिताने

ऐसीवर ब्याटमनपेक्षा संस्कृत महापंडित कोण बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरविंद कोल्हटकर, धनंजय, किंबहुना सर्वसुखी हे तीन आयडी विसरलात वाट्टं थत्तेचाचा. यांच्यासमोर आम्ही म्हणजे शाकाय वा लवणाय वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे लोक खूप कमी दिसतात म्हणून ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवर ब्याटमनपेक्षा संस्कृत महापंडित कोण बुवा?

थत्ते विनोद करताय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

पण त्याचं काय आहे बट्टमण, आम्हाला हा शब्दप्रयोग ऐसीवरच्या एका संस्कृत महापंडिताने सुचवला होता आणि म्हणून आम्ही तो जसाच्या तसा स्वीकारला. (डोळा मारत)

अहो ते अर्थदृष्ट्या साधर्म्य अबाधित रहावे म्हणून सांगितले होते बहुधा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री. पु. ल. देशपाड्यांच्याच एका गाजलेल्या नाटकात हा शब्दप्रयोग आहे.

'रावसाहेब' मधे आहे - "तुम्ही येणार म्हणून विष्ण्याला सांगून व्हिस्की आणलंय ते काय गाढवाच्या अंअंअंअंअं?". "तुझे आहे तुजपाशी" मधेपण उल्लेख आहे? नक्की?

ता.क. - सोलकढी नुसतीच प्यावी का भाताबरोबर खावी यापेक्षा माझा प्रश्न नक्किच जास्त रास्त आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

"तुझे आहे तुजपाशी" मधेपण उल्लेख आहे? नक्की?

"तुझे आहे तुजपाशी"मध्ये पाहिल्याचा आठवत नाही; बहुधा नसावा.

मात्र, "ती फुलराणी"मध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच जोक / कोटी / वाक्यरचना एकाहून जास्त ठिकाणी वापरण्याची पुलंना सवय होती.

काही उदा.

"ये हृदयीचे ते हृदयी घातले" ही रचना अनेक लेख आणि भाषणांत

"रथचक्र उद्धरु दे" हे गाणं अनेक भाषणांत.

"नळाची प्रतीक्षा आमच्याइतकी दमयंतीनेही केली नसेल" हा जोक अनेक ठिकाणी.

इत्यादि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+ स्टांपासारखे चिकटणे हे सुद्धा उदाहरण पटकन आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा प्रतिसाद म्हणजे कदाचित वरातीमागून गाढव असा असेल. पण काय करणार, गेले चारेक दिवस गाढवाकडे इंटरनेट कनेक्शन नव्हतं.

सर्वप्रथम, अदिती म्हणते त्याप्रमाणे यानिमित्ताने पिडांकाका लिहिते झाले हे उत्तम. तसं होण्यासाठी आम्ही एकदाच काय, पण दहादा फुटकळ शब्दांवरती बंदी घालायला तयार आहोत!

असो, थोडं सीरियसली. तुमचे मुद्दे पटले. म्हणजे त्यांत न पटण्यासारखं काहीच नाही. ऐसीच्या ध्येयधोरणातच आम्ही 'असांसदीय' शब्दांना परवानगी आहे असं म्हटलेलं आहे. अर्थातच सम कंडिशन्स अप्लाय हेही लिहिलेलं आहे. असो. तर गाढवाच्या गांडीत वगैरे शब्दांना केवळ त्या शब्दांसाठी बिलकुलच विरोध नाही.

मला वाटतंं कोल्हटकरांच्या लेखाचा गाभा लक्षात न घेता केवळ 'गाढवाच्या गांडीला विरोध' इतकाच त्यातून संदेश घेतला गेला हे दुर्दैव. बऱ्याच वेळा काय होतं की उंटाच्या पाठीवर आधीच फार काड्या झालेल्या असतात. मग शेवटच्या काडीने त्याची पाठ मोडते. अर्थातच ती काडी टाकणारावर दोषारोप होतात. काही जण ती काडी तपासतात आणि इतर काड्यांशी तुलना करून म्हणतात की 'अशा इतरही हजारो काड्या आहेतच की. मग याच काडीने काय उंट मारलाय?' काही जण म्हणतात की अशा काड्या वाहणं हे उंटाचं कर्तव्यच आहे. उंटाची ते सोसण्याची प्रकृतीच आहे - इतर कोणा गुलछबू मोरा सशाप्रमाणे तो नाजूक नाही. आणि या सगळ्यात काहीच चूक नसते.

मग प्रश्न कुठे येतो? प्रश्न येतो ते ऐसीवर पोकळ शेरेबाजी, व्यक्तिगत आरोप, आणि सतत लढाया यांचा इतका प्रादूर्भाव होतो की मग त्यापलिकडे काही दिसतच नाही. म्हणजे बघा तुमच्या त्या एलेचं उदाहरण देतो. एके काळी तिथे इंडस्ट्री होती, कारखाने होते आणि अमाप गाड्या होत्या (त्या अजूनही आहेत). या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत. पण त्यांच्यातून होणारं प्रदूषण अतिरेकी झालं की आख्ख्या शहरावरच स्मॉग येऊन बसतं. ते नको का स्वच्छ व्हायला? त्यासाठी सगळ्यांनाच 'घाण जरा कमी टाका' असं आवाहन आहे. बाकी काही नाही.

अवांतर -

पण ऐसीसारखी संस्थळं, ज्यांचा जन्म मिसळपावसारख्या संस्थळातून झाला आहे, त्यांना त्यांच्या बापांनी जरी कितीही नाकारायचा प्रयत्न केला (केला आहे असं म्हणत नाही आहोत आम्ही, फक्त एक शक्यता!) तरी त्यांना त्यांच्या आईचा इरसालपणा झुगारून देणं केवळ अशक्य आहे!

आयला, सासू छळ करते म्हणून सुनेने सवतासुभा केला, तर त्याला काही 'सासूपासून जन्म होणं' म्हणत नाहीत हो काका! पण हा मायनर मुद्दा आहे. बाकीचा युक्तिवाद पटलेला आहे हेे वर म्हटलेलं आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सुनेने सवतासुभा केला,

याला बिर्‍हाड केलं असा शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्वप्रथम या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या सर्व सभासदांना धन्यवाद.
धाग्यावर विशेष काही टीका न झाल्याने (असं माझं मत बनल्याने) प्रतिवाद करण्यासारखंही काही फारसं विशेष नाहीये.
तरीपण दोन चार मुद्द्यांबाबत स्पष्टीकरणः
मूळ धाग्यामधल्या सर्व (दोषारोपादि) मुद्द्यांचा अंतर्भाव माझ्या लिखाणात नव्हता हे खरं आहे. माझं वरील लिखाण हे काही मूळ धाग्याचं परीक्षण/ रसग्रहण नव्हतं. एक म्हणजे त्या दोषारोपादि कथित पूर्वप्रसंगात माझा सहभाग नव्हता आणि मला इंटरेस्टही नव्हता. मला जे काही खटकलं तेव्हढ्यापुरतं माझं लिखाण सीमित होतं.
संस्थळांवर मॉडरेटर्सची आवश्यकता आजतरी आहे याबद्दल सहमत. ऐसीवरच्या मॉडरेटर्सनी अतिरेकी धिंगाणा घातलेला माझ्या तरी विशेष पहाण्यात आलेला नाही, किमान माझ्या बाबतीत तरी नाही. बुजुर्गांच्या सल्ल्याची गरज आहे काय याविषयी मी साशंक आहे. मला ती गरज वाटत नाही.
'प्रोफेसर गेला गाढवाच्या गांडीत!' हा शब्दप्रयोग पुलंच्या ती फुलराणी या नाटकात आहे.
कंबख्त चा मला माहिती असलेला अर्थ म्हणजे कमनशिबी. आमच्या अब्दुलखानाच्या तोंडून तो शब्द बर्‍याच वेळा ऐकलेला आहे. आणि वरती मौलाना नंदनशरीफ-डीप्-खिसा यांनीही तो अर्थ नोंदवल्याबद्दल त्यांचे मंडळ आभारी आहे.
नितंबबोध या अभिप्रायात नक्की काय म्हणायचं आहे हे आमच्या डोक्यावरून गेल्याने आमचा पास. (आम्ही 'अभ्यास वाढवण्याचा' संकल्प केलेला आहे!)
आणि हो, सोलकढी, ती एक राहिलीच!
कोकणात-गोव्यात थेट कारवारपर्यंत जेवणात सोलकढी भात अगदी पिढ्यानपिढ्या खातात. जसा देशावर शेवटचा भात हा ताकभात असतो तसाच कोकणात शेवटचा भात हा (कदाचित मासळीच्या जेवणाबरोबर ताक घेणे हे अपायकारक समजले गेलेले असल्याने)सोलकढी-भात जेवला जातो. कढी नुसती पिणे-न पिणे हा पर्सनल प्रेफरन्स...
असो.
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(कदाचित मासळीच्या जेवणाबरोबर ताक घेणे हे अपायकारक समजले गेलेले असल्याने)

हेच चिकनमटनाबद्दलही ऐकले आहे. काय कारण असावे? याला काही वैज्ञानिक आधार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मध्यपूर्वेतल्या कोशर नियमांतही मांसाबरोबर दुधाचे पदार्थ टाळले जातात. भारतात हे नियम मला फक्त पश्चिम किनारपट्टीवर आढळले. त्यामुळे ते तिथून आलेले असणं शक्य आहे. उष्ण प्रदेशात फ्रीज नसे त्या काळात मांस आणि दूध / दुधाचे पदार्थ खराब होणं नित्याचं असावं. दोन्ही एकत्र केलं तर अन्न बाधण्याची शक्यता वाढेल ह्या भीतीनं कदाचित तो नियम आला असण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक शक्यता आहे खरी. माहितीकरिता बहुत धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिष्टर जंतूंच्या शास्त्रीय दृष्टीकोनाशी आम्ही सहमत आहोत!

आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हां खोतांकडे ताक हे कामावर येणार्‍या गडीमाणसांसाठी राखून ठेवलं जात असे. उन्हातान्हात काम करणार्‍या कामगारांना पूर्वी ताक किंवा भाताची निवळ (आयुर्वेदिक दॄष्ट्या थंड समजली जात असल्याने) प्यायला द्यायची पद्धत होती.
सध्या काय प्रथा आहे ते ठाऊक नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...यामागे मुळात "प्राण्याच्या बच्च्याला त्याच्याच आईच्या दुधात शिजवणे हे पाप आहे" असे कोणतेसे धर्मतत्त्व आहे, असे कोठेतरी कधीतरी वाचले होते ब्वॉ. (आत्ता नेमका संदर्भ हाताशी नाही.) पुढे मग त्याचे रूपांतर होत होत कोठलेच मांस कोठल्याच दुधाच्या प्रकाराबरोबर एका जेवणात खायचे नाही, मांस आणि दुधाचे प्रकार दोन वेगवेगळ्या जेवणांत खायचे झाले तरी त्यात मध्ये इतकेइतके तास जाऊ द्यायचे, असे नियम आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधिक गूगलशोधात हे सापडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अधिक गूगलशोधात हे (http://en.wikipedia.org/wiki/Milk_and_meat_in_Jewish_law) सापडले. <<

हाच दुवा मी वरच्या प्रतिसादात दिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो. दिला होतात खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0