कल्ट फिल्म या शब्दाच्या व्याख्या

कल्ट फिल्म या शब्दाच्या अनेक ठिकाणी अनेक व्याख्या दिसतात. पण एखाद्या सिनेमाची खालील काही लक्षणं गृहीत धरुन मी असं म्हणून इच्छितो की अशा कल्ट फिल्म्सवर (भले त्या कालबाह्य वाटत असल्या तरी) कोणीतरी इथे सीरीज लिहावी.

१. ज्या फिल्ममधली पात्रे, डायलॉग्ज अनेक वर्षांनीही कुठेही थेट वापरले तरी जनरली त्याचे संदर्भ द्यावे लागत नाहीत.
२. ठराविक वयोगटातल्या बहुसंख्य मंडळींनी किमान दोनदा किंवा जास्तवेळा तो सिनेमा पाहिलेला असतो.
३. अजूनही तो व्हीएचएस कॅसेट किंवा सीडीरुपात संग्रही ठेवलेला असतो.

वगैरे.

शोले-गोज विदाउट सेईंग..

-अंदाज अपना अपना (मैं तेजा हूं, मार्क इधर है) (सुनो सुनो दुनिया के लोगो सबसे बडा है मिस्टर गोगो) (फिरौती है या मय्यत का चंदा)

-बनवाबनवी (धनंजय माने इथंच राहतात का?)

-झपाटलेला (भगभुगे भग्नी भागोदरी)

सीरीज नाही तरी अशा फिल्म्सची आठवण काढणारा एक धागा तरी असावा.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अमुक पालेकर यांनी पुढील भेटीत 'गोलमाल'चे ड्वायलाक मारून दाखवावेत अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरेरे धागा जरा उशीराच पाहिला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दीवार. कल्ट नाही म्हणता येणार पण अमिताभने त्यात खराखुरा अँग्री यंग मॅन उभा केला आहे तो त्यालाही पुन्हा जमला नाही.

"तुम मुझे बाहर ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूॅं"
"मैं आजभी फेंके हुए पैसे नही उठाता"
"तुम समझते हो यह काम तुम अकेले कर सकते हो?" "नही, मैं जानता हूॅं के यह काम मैं अकेला कर सकता हूॅं"
"धंधा करना तो आप को नही आता अगरवाल सेठ, इस बिल्डींग के लिए आप जितना रुपिया माॅंगते मैं दे देता"
"सुना है के लिफ्ट की दिवारों के कान नही होते"

या अशा डायलॉग्जपेक्षाही देवळासमोरच्या पारावर देवळाकडे पाठ करुन कुबड काढून बसलेला तो जास्त परिणामकारक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चमेली की शादी

"है ना... है ना..." म्हणून आजूबाजूच्यांचं अप्रूव्हल घेणारा कल्लूमल कोयलेवाला. त्याची सातवीतच नापास होणारी बेटी. तिची माफक देहप्रदर्शन करणारी मैत्रीण.
काहीही काम न करणारा चरणदास. त्याचा कुस्तीतला गुरू मस्तराम पहेलवान आणि त्याचे पठ्ठे. त्यांना भिडणार छदमी मामा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

..ट्रेंडसेटर म्हणू किंवा कल्ट..पण टीव्ही सीरियल्सही आहेत.बुनियाद,हमलोग,मालगुडी डेज,वागले की दुनिया..

".गुड नो?" इति वागळे.

.बुनियाद हमलोग नुसते ऐकलेय.त्यावेळी आमच्या गावी टीव्ही ट्रान्समिशन नव्हते सुरु झालेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हमलोग मी सेकंड टेलिकास्टला पाहिली. (मध्यंतरी पुन्हा दाखवली तेव्हा).
अशोककुमारची मिमिक्री म्हटलं की दोन्ही हात पुढे क्रॉस करून तोंडाने श्वास सोडतानाच हमलोग म्हणणे हा प्रकार तेव्हाच सुरु झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट 'कल्ट ' होणे आणि त्याचा बॉक्स ऑफिस वरचा धंदा यांचा फारसा संबंध नसावा . अंदाज अपना अपना त्यावेळेस फारसा चालला नव्हता . पण टीवी , सीडी , विसीआर वैगेरे माध्यमातून माउथ टु माउथ पब्लिसिटी झाल्याने त्याला कल्ट चे स्वरूप आले . असाच एक चित्रपट म्हणजे नवदीप सिंग (Nh १० चा दिग्दर्शक ) चा पहिला चित्रपट , मनोरमा सिक्स फिट अंडर . हा चित्रपट उघडच इंग्रजी चित्रपटावरून बेतलेला आहे . राजस्थान च्या दुष्काळी आणि रुक्ष पण सुंदर वाळवनटि प्रदेशात ल्या एका हौशी गुप्तहेराची हि कथा . एकदम अप्रतिम चित्रपट आहे . काहीजणांना हा चित्रपट संथ वाटू शकतो पण त्याच संथ असण हि चित्रपटाच्या कथेची गरज आहे . का ते चित्रपट बघितल्यावरच कळेल . यात अभय देओल आणि गुल पनाग आहेत . गाणी पण भन्नाट आहेत . विशेषतः शेवटी येणार कैलाश खेर च ये आंखे हे गाण . चित्रपटाच्या श्रेय नामावलीत पटकथा लेखकात एक आश्चर्यकारक नाव आहे . आपल्या दबंग फेम अभिनव कश्यप च . सध्या या चित्रपटाची रसिक वर्तुळात जाम क्रेझ आहे . नक्की बघाच एकदा . नवदीप सिंग भारी आहे हे तेंव्हाच कळल होत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मी झकत आयनॉक्सला बघीतला होता कारण सिंगल्स्क्रीन थेटरच (चित्रपटला) मिळाले न्हवते. त्यात एकुण टाळकी जमली १२ त्यातली मध्यंतरापर्यंत ८ जण उठुन गेलेली. मला अभय देओल व गुल पनाग आवडतात म्हणूनच आवर्जुन चित्रपट बघायला गेलो. अभय देओल अप्रतिम, अभिनयाचा वादच नाही. गुल्पनाग्चा मेकॅनीकल किस आणी पराकोटीचा संथ वा रटाळ संबोधणेही स्तुती ठरेल इतका स्लो चित्रपट. बरं रायमा सेननेही विषेश गरम केले नाही. म्हणजे अजुन एक निराशा. नंतर वाटले होते किमान राजस्थानमधे चित्रपट चालला असेल (त्यातील पार्श्वभुमी आहे) मग बिकानेरमधील एका परिचीताला रिव्ह्यु विचारला तर तो म्हणाला अशा नावाचा कोणता चित्रपटच अस्तित्वात नाही Smile

बघु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खरतरं देव आनंदचे सिनेमे कल्ट मानत नाहीत पण का कुणास ठाउक ते बघताना सतत असं वाटत राहतं, ह्याला काय झालयं.. हा असा का तिरका तिरका चालतोय.. आता हा अजुन एकदातरी तिरका चालला तर समोरच्या झाडावर जाउन आदळेल बहुदा. शाडुख च्या बाबतीत असं वाटत राहतं

चित्रपट-हम दोनो- श्रवणीय गाणी, जरा वेगळा प्लॉट, हँडसम दिसणारा देव, सोजव्ळ नंदा व साधना, बर्‍यापैकी संयत अभिनय, पण अधुन मधुन कुठेतरी गाडी घसरतच होती. आई ला सारख्या मिठ्या..नाहीतर हिरवीणीला(हा बहुतेक सगळ्या हिंदी चित्रपटाचा सेम प्राब्लेम आहे)

त्यावेळी अवजड डायलॉगची बरीचशी कसर गाणी व त्याचे उर्दु शब्द पुरे करायचे.म्हणजे त्या वेळच्या आजुबाजुच्या सामाजिक परिस्थीती मध्ये जिथे स्त्री आणि पुरुष, मुलगा-मुलगी साधं बोलणंही दुर्मिळ असावं तिथे चित्रपटां मधुन बाकी वेग़ळं चित्र दिसत होतं.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या वेळच्या आजुबाजुच्या सामाजिक परिस्थीती मध्ये जिथे स्त्री आणि पुरुष, मुलगा-मुलगी साधं बोलणंही दुर्मिळ असावं

पावनं कंच्या गावचं मनायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने