एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

१९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता.
... अर्थात त्यावेळी मी पंधरा वर्षांचा असल्याने तेंव्हा हा चित्रपट बघता आला नव्हता, मात्र इंदूरच्या 'रीगल' टॉकीज वर वैजयंतीमालाचे एक अतिभव्य, सुंदर कट-आऊट लागले होते, ते बघत भान हरपून उभे रहाणार्‍यात मी पण असायचो.
........ हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे आजच प्रदर्शित झालेला, सनी लिओनीची प्रमुख भूमिका असलेला 'एक पहेली लीला' हा चित्रपट. जणू ६६ साली राहून गेलेली इच्छा इतक्या वर्षांनी पूर्ण करण्यासाठी, जन्मात प्रथमच मी या पिच्चरचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघून आलो.
या चित्रपटाचे कथानक लंडन मधील एका नृत्यापासून सुरू होते, ते पुढे राजस्थान मधील अप्रतिम स्थळे, तेथिल ठाकुर मंडळींच्या अलिशान हवेल्या, वेगवेगळी नृत्य-गीते, रोमांचक प्रणय प्रसंग, हळूहळू आकार घेणारे रहस्य, नाडी-ग्रंथ वगैरेतून भविष्यवाणी वगैरे वळणावळणाने पुढे सरकत जाते, आणि अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपते.
सुंदर छायाचित्रण, बर्‍यापैकी संगीत - नृत्ये, उत्कंठावधक कथानक, यथायोग्य पात्र-निवड आणि दिग्दर्शन, उतमोत्तम वस्त्राभूषणात नटलेली नायिका या सर्वामुळे चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. सनीताईंकडून उत्तम अभिनयाची कुणीच अपेक्षा करणार नाही, मात्र तिने सुंदर रंगबेरंगी भारतीय वेशभूषेत आपल्या कमनीय रूपवैभवाची जी उधळण केली आहे, त्याबद्दल तिला सलाम.
.

एकदा तरी सिनेमागृहात जाऊन बघाण्यालायक असलेल्या या चित्रपटात आणखी एक गंमत आहे. आपण किती सरधोपटपणे विचार करत असतो, आणि समोर उलगडत जाणार्‍या घटना-क्रमातून जो तार्किक निष्कर्ष आपण काढत असतो, त्याचा व्यत्यास सुद्धा तितकाच खरा असू शकतो, हे चित्रपट संपता-संपता जाणवते, आणि आपण स्वतःशीच काहीसे खजील होत बाहेत पडतो.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सुंदर छायाचित्रण, बर्‍यापैकी संगीत - नृत्ये, उत्कंठावधक कथानक, यथायोग्य पात्र-निवड आणि दिग्दर्शन, उतमोत्तम वस्त्राभूषणात नटलेली नायिका या सर्वामुळे चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही.

एव्हडं सगळं असल्यावर फक्त कंटाळवाणा वाटत नाही इतकेच म्हणने म्हणजे...

समोर उलगडत जाणार्‍या घटना-क्रमातून जो तार्किक निष्कर्ष आपण काढत असतो, त्याचा व्यत्यास सुद्धा तितकाच खरा असू शकतो

व्यत्यास म्हणजे काय ? हे लक्षात आले तर वाक्य (मला) समजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

व्यत्यास म्हणजे कॉनव्हर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे दिलेलं पहिलं चित्र बघून ३०० मधल्या क्षेरेक्सिसशी (नावाबद्दल चू.भू.) साधर्म्य वाटलं. सनीताईंची पोझिशन डिट्टो वाटते आहे.
ट्रेलर पाहिला तर बराच चित्रपट आजच्या काळात आहे असं दिसलं, तसं असेल तर पास..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0