मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग १

"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "First Fish - of Fathers & their Children" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -

.
माझ्यासमोर आत्ता माझ्या मुलीचा जेसिकाचा फोटो आहे. जेसिका उणीपुरी ४ वर्षाची सुद्धा असेल-नसेल जेव्हा हा फोटो काढलेला आहे. फोटोत तिचे सोनेरी केस जुलै च्या लख्ख उन्हात चमकतायत अन हिरव्या डोळ्यात अभिमानाची स्पष्ट झांक दिसते आहे पण एक विसंगतीही आहे, ज्या पकडलेल्या sunfish बद्दल तिला अभिमान वाटतो आहे त्याच्यास्वतःच्या हातातील चिमटीत धरलेल्या माळेपासून ती भीतीने, किंचीत दूरच उभी आहे. मला हा दिवस आठवतो जेव्हा याच sunfish वरती आम्ही बटाट्याच्या काचर्‍यांबरोबर ताव मारला होता.
हां तिला काही तो दिवस आठवत नाही मात्र जेसिका, मासेमारी करण्याइतकी मोठी झाली अन तोपावेतो, अहिंसेचे भूत तिच्यावर स्वार झाले होते. यावरुन आमचे वाद होत असत नाही असे नाही कारण मी मासेमारी करुन, ते खातो हे तिच्या पचनीच पडत नसे. माझे म्हणणे असे की प्राणी हे माणसाला खाण्याकरताच निसर्गाने निर्माण केलेले आहेत, " A big MAC is just a dead cow." याउलट जेसिकाचे म्हणणे असे की "माशांनाही भाव-भावना असतात.". अनेकानेक वाद होत, तासंतास एकमेकांना आपापला मुद्दा पटवून देण्याचा निष्फळ प्रयत्न होई. पण जेसिका ऐकत नसे ना मी ऐके. अर्थातच, बाप-मुलीचे जे नाते होते. माझ्यातील हटवादीपणा तिने बरोब्बर उचलला होता.
.
मात्र या वादविवादाने, या मतमतांतराने एकदा अगदी परमोच्च सीमाच गाठली जेव्हा आम्ही सर्वजण मित्रांच्या बरोबर विस्कॉन्सिनच्या Boundary waters canoe area मध्ये सहलीला गेलो होतो. जेसिका असेल १२ वर्षाची तेव्हा. कधी नव्हे ते मोठ्ठा ४-४१/२ पौंडाचा smallmouth मासा माझ्या गळास लागला होता व कधी एकदा तो मासा तळून आम्ही खातो असे मनसुबे आम्ही सर्वजण आखू लागलो होतो. सर्वजण except जेसिका. जेसिका म्हणू लागली, "बाबा त्या माशाला सोडा, त्याची कच्चीबच्ची त्याची घरी वाट पहात असतील." आता मात्र माझा धीर सुटू लागला होता. मी तिला खूप समजविण्याचा प्रयत्न केला की "अगं मुली ही मोठेठी मासोळी मी जर सोडली तरी ती पिलांना कुशीत घेऊन झोपण्याऐवजी, त्यांचा चट्टामट्टा उडविण्याचीच शक्यता जास्त आहे." पण ऐकेल तर ती जेसिका कुठची. तिने आता शेवटचे अन अमोघ बालास्त्रच उगारले - रडणे. मग मात्र मी माघार घेतली, तो मासा परत पाण्यात सोडून दिला.

काही प्रसंगच असे असतात जेव्हा जिंकणं हे हरण्यापेक्षा महाग पडू शकते. अन हा प्रसंग त्याच पठडीतला होता हे माझ्यातील बापाने जाणले.

.
अर्थात बाप-मुलीचे नाते काय और असते हे मी तुम्हाला सांगायले हवे अशातील भाग नाही. अर्थातच पुढे, जेसिका काही प्रमाणात तरी माझ्या मासेमारीच्या छंदाबद्दल सहानुभूती बाळगू शकली, तिला माझा छंद ही माझी गरज आहे हे पटू शकले, मात्र मत्स्यशेती, शिकार आदि काही गोष्टींबद्दल तिच्या मनात तिडीक कायमची राहीली. अन अर्थातच तिची खात्री होती की तिला सग्गळं कळतं. अन का नाही तिच्या वयाचा असताना तिच्या बापालाही तोच दांडगा आत्मविश्वास होता की आपल्याला सग्गळं कळतं.

मला आत्ता ४० व्या वर्षी जे माहीत आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी १६ व्या वर्षी माहीत होत्या.

.
उदा - १६ व्या वर्षी माझी ही खात्री होती की आपला बाप मारे सद्गुणांचा पुतळा का असेना, आपल्याला , आपल्या बापासारखे व्हायचे नाही. त्याच्या पावलावरती पाऊल टाकायचे नाही. जग जिंकायचे ते आपल्या बाहूबळावर, आपल्या कर्तुत्वावर!
........ अन तरीही, तरीही कुठेतरी मित्रांनो माझ्या आयुष्याचा अमोल छंद- मासेमारीचा , त्याचे मूळ कुठेतरी माझ्या बालपणाच्या वडील-मुलगा या नात्यातच दडले आहे. असे नाते जे तेव्हा संदीग्ध होते, अजुनही आहे अन आता पुढेही राहील. एक क्लिष्ट, संदीग्ध, emotionally charged नाते. माझ्या वडीलांचे अन माझे नाते. एका पीढीचे पुढच्या पीढीबरोबरचे नाते.
.
मी पकडलेला पहीला मासा होता "bullhead" मासा. एका नीरव संध्याकाळी, चंद्रप्रकाशात, विस्कॉनसिनच्या तळ्यावर जादू झाली. मी माझा पहीला मासा पकडला. बाबा तळ्याकाठी माझ्यावर व माझ्या धाकट्या भावावर स्टीव्ह वरती नजर ठेऊन होते. आम्ही खोल पाण्यात शिरु नये म्हणून मध्ये मध्ये सूचना देत होते. त्यांच्या सिगरेटचे लाल टोक अन गूढ चंद्रप्रकाशात न्हायलेली त्यांची धूसर आकृती मला अजुनही लख्ख आठवते. आमच्या गळांना आमच्याच बाळमुठीएवढे बॉबलर्स लावून बाबा, खाली गांडूळ लाऊन देत होते. अन आम्ही हेच बॉबलर्स पाण्यात टाकून शांतपणे मासा पकडण्याची तपःश्चर्या करत होते. बॉबलर्स तर अक्षरक्षः चाच्यांच्या खजिन्यातील सोने-चांदी-रत्न-माणकांप्रमाणे त्या चांदण्यात चमकत होते, वरखाली, वरखाली डुचमळत होते. मासा गळाला लागला की गळ जड होऊन खाली जाई अन आम्ही तो बाबांच्या मदतीने सरसर वर खेचत उत्सुकतेने काय आले ते पहात असू. असे एकामागे एक bullhead मासे आम्ही पकडत गेलो अन बाबा आमच्या गळाला गांडुळे लावून, गळाची फेक आम्हाला शिकवत गेले. ती संध्याकाळ मी विसरु शकत नाही कारण त्या संध्याकाळी मी पहील्यांदा थरार अन थ्रिल अनुभवले, जोश अन यशाची चव चाखली, जादू जादू होती.

I was hooked to fishing forever.

बाबांनी मला माझा छंद मला सुपूर्त केला होता, पुढच्या आयुष्यात ज्याने मी झपाटून जाणार होतो अशी passion मला दाखवली होती.
.
सकाळी आम्ही अंडी-बेकन अन अर्थात माशांचा नाश्ता केला. सर्वात चविष्ट असा नाश्ता.

.
क्र-म-शः
.

field_vote: 
0
No votes yet